मंगळवार, १० जून, २०२५
"दाद प्रतिसाद!":
👍" दाद प्रतिसाद-घरं, घर करतात !:👌
💐 "घरं ही माणसाच्या आयुष्यातील सुख दु:खांची साक्षीदार असलेली गोष्ट! सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (सीनियर ) यांनी वेगवेगळ्या चित्रपट, मालिका यामध्ये अभिनय करताना जी घरं त्यांना पाहायला, अनुभवायला मिळाली त्याबद्दलचा एक लेख वाचनात आल्यावर, त्याला हा असा आगळावेगळा प्रतिसाद आणि दाद श्री सुधाकर नातू यांनी दिली !":💐
ती समजण्यासाठी पुढील लिंक उघडा.....💐
https://youtu.be/ywGuarXcR0g?si=KnTfdbVlKoz3wMMF
###@####@###@#####@
"दाद प्रतिसाद !":
संपादक
'ललित' मासिक,
मुंबई
सप्रेम नमस्कार
मराठी नियतकालिकांमध्ये मासिक हा प्रकार दुर्मिळ होत चाललेला असताना "ललित' सारखे केवळ साहित्यविषयक मासिक आपण गेली 62 वर्षे प्रकाशित करत आला आहात, याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
मे'25 ललित अंकातील
"अक्षरधन' निवडक महाराष्ट्र साहित्य पत्रिका विसावे शतक"
संपादक: डॉक्टर नीलिमा गुंडी
पृष्ठे: 1016 मूल्य: रुपये 1500
ह्या संग्राह्य दस्तावेजाची रसास्वादात्मक ओळख डाॅ सुजाता शेेणई यांनी समग्रपणे करून दिली आहे. साहजिकच ललितच्या अंकातील 'मानाचे पान' ठरावा असाच हा लेख आहे.
ह्या महत्त्वपूर्ण अशा प्रकल्पाची पार्श्वभूमी व महत्त्व, संपादकांची निवड त्याचप्रमाणे त्यातील प्रत्येक विभागाची आणि त्यातील निवडक लेखांची सटीप अशी नोंद या लेखात घेतली आहे. साहित्य शारदेच्या विश्वात हा एक अमोल ग्रंथ ठरावा असेच या लेखावरून वाटते.
तसेच जे साहित्य प्रेमी नसतीलही त्यांनाही
साहित्याविषयी, मराठी भाषेविषयी कुतुहूल निर्माण होऊन आपणही अधिकाधिक वाचन करायला हवे असे जाणवून देणारा हा लेख वाचनीय आहे.
धन्यवाद
----------------------------
😀 "वाचाल, तरच वाचाल !":😀
"काय वाचले आणि काय जाणवले !":
# महाराष्ट्र टाइम्सची संवाद पुरवणी नेहमीच वाचनीय असते.
त्यातील 'वाघांच्या कुटुंबातला माणूस' हा श्री सुनील करकरे यांचा लेख भारतीय व्याघ्र संरक्षणातील महत्त्वाचे नांव असलेले वाल्मीक थापर यांच्या एकंदर कार्यकर्तृत्वाचा विशाल पट आपल्याला थक्क करतो. रणथंबोरमधील वाघांच्या कुटुंबाचा भाग होऊन आयुष्याच्या अखेरपर्यंत व्याघ्र संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या ह्या असामान्य वन्यजीव कार्यकर्त्याचे हे हृदयस्पर्शी स्मरण आपल्या मनात घर करून जाते.
# तंबी दुराई यांची 'दीड दमडी' -'गैरसमज दूर व्हावे म्हणून' हे
एक कॉलमी स्फूट, खरोखर चटका लावणारे आणि डोळ्यात अंजन घालणारे ठरावे ! 'बार' आणि तेथे चालणारे उपद्रव तसेच जुगाराचे अड्डे आणि एकंदरच व्यवस्थेतील देवाणघेवाण जिला भ्रष्टाचार असे पॉलिटिकली करेक्ट नांव दिले जाते, त्यासंबंधी वास्तवाचे रोचक, बोचणारे दर्शन ही 'दीड दमडी' आपल्याला देऊन जाते आणि अंतर्मुख करते.
# त्याच 'तंबी दुराई' अर्थात श्रीकांत बोजेवार यांचा 'सामना' तेव्हा आणि आता" लेख हा बदलत्या राजकीय सामाजिक परिस्थितीचा आणि पन्नास वर्षांपूर्वी घडूून गेलेला दुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधील 'सामना' या कालातीत चित्रपटाची ओळख 'तेव्हा आणि आता' ह्यांचा अतूट संबंध खुबीने मांडतो. 'सत्ता आणि मत्ता' यांचे एकमेकांशी असलेले अतूट नाते आज पन्नास वर्षे उलटूनही तसेच राहिले आहे आणि म्हणूनच सामना चित्रपटातील मास्तर आणि हिंदुराव यांच्यातला संघर्ष आजही नव्याने राक्षसी थैमान घालत असल्याचे आपल्याला दिसून येते.
चित्रपटाचे निर्माते रामदास फुटाणे दिग्दर्शक जब्बार पटेल आणि द्रष्टे लेखक विजय तेंडुलकर या त्रिकुटाचे असे एकत्र येणे, हे 'सामना' विलक्षण प्रभावी आणि परिणामकारक होण्याचे कारण होते हेही आपल्याला या लेखावरून समजून येते.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा