मंगळवार, ३ जून, २०२५
"इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
☺️ "करूया ह्या हृदयीचे त्या हृदयी" जाणिवा विस्तारु
या ध्येयामुळे गेली पाच सहा वर्षे मी शब्द, बोल, दृश्य अशा विविध माध्यमांतून वा रूपातून सोशल मीडियावर उपक्रम सादर करत आहे, त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. बदल हा केव्हाही आवश्यक असतो, त्यामुळे नवनवीन कल्पना सुचण्याचा मार्ग मोकळा होतो.
🤣 "बोल अमोल" च्या पाठोपाठ "वाचता वाचता, वेचलेले" ही संकल्पना आता चांगले मूळ धरायला लागलेली आहे. परंतु वास्तवतेचे एकंदर अकार्यक्षम यंत्रणेचे, व्यवस्थेचे तसेच मनोवृत्तीचे अनेक अनेक नकारात्मक परिणाम आपल्याला विविध प्रसारमाध्यमातून पहायला लागतात.
"कुठेतरी काहीतरी चुकतंय" हे या साऱ्या वरून समजून येते आणि म्हणूनच जागे होणे, आवश्यक सुधारणा करणे तर नितांत गरजेचे, चालसे कल्चर यापुढे टाकले पाहिजे ह्या प्रामाणिक हेतूने "इकडे तिकडे वाकडे तिडके" ही नवीन संकल्पना प्रदर्शित करणे सुरू केले आहे.
🤣 "वर्तमानपत्रातील पुढील चिंताजनक वृत्तमथळे पहा:
# "तरूणही पाठदुखीने बेजार
बैठी जीवनशैली व्यसने व्यायामाचा अभाव
# मोबाईल हॅक करून खात्यातून पैसे लंपास..
# गल्यांमध्ये हिरवा चिखल
छाटणीनंतर पालापाचोळा फांद्या रस्त्यावर पडून...
# रेल्वे तिकिटासाठी खासदाराचे बनावट पत्र....
# पोलिसांनी वेषांतर करून आवळल्या मुसक्या
'बहुरूपी' चोराकडे लाखोंचे घबाड. .
# अलिबाग जिल्हा रुग्णालय गैरसोयीचे आगार
स्वच्छतागृह बंद
रुग्णांसह नातेवाईकांचे हाल...
# "अकरावी परीक्षेचा घोळ संंपता संपेना...
.......
......
विकासाच्या, प्रगतीच्या, पराक्रमांच्या वल्गना करता करता पायाखाली काय जळते आहे, याची जाण करून देणारे हे व्रुत्तमथळे... 🤣🤣🤣
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा