बुधवार, २६ मार्च, २०२५
" मुक्तसंवाद !":
😀 "कल्पनांचे तराजू-1"::😀
या शीर्षकामुळे गोंधळून जाऊ नका. मनांतील कल्पना, तोलून मापून प्रत्यक्षात येणे, कितपत शक्य आहे हे उमंगण्यासाठी तराजू हा शब्द वापरला आहे. या नव्या उपक्रमामध्ये मला सुचणाऱ्या कल्पना मी मांडत जाणार आहे.
शुभारंभ असा:
ज्याला आपण ड्रेस कोड किंवा गणवेश अथवा युनिफॉर्म असं म्हणतो, तो आपल्याला जागोजागी सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणाऱ्या मंडळींच्या रूपाने दिसतो. जसे परिवहनामधल्या चालक, वाहक किंवा निरीक्षक, संरक्षण विभागात लष्करी अधिकारी आणि जवान सिक्युरिटी गार्ड्स अशांच्या अनेक गणवेशांचे आपल्याला दर्शन पदोपदी घडत असते. त्यामुळे कोणती व्यक्ती कोणत्या स्वरूपाचे काम आणि जबाबदारी पार पाडत आहे, याचा अंदाज येतो.
याच कल्पनेला पुढे नेऊन लोकसेवक अर्थात अगदी ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्यांचे सदस्य आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान एवढेच काय तर उपराष्ट्रपती, ते राष्ट्रपती अशा सगळ्या महोदयांना देखील योग्य तो गणवेश सार्वजनिक ठिकाणी वावरताना असावा, अशी ती कल्पना आहे !"
आपल्या प्रतिक्रिया माझ्या व्हाट्सअप पेजवर देऊ शकता.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
---------
: 😝 "फसवा फसवी !":😝
😄 "असं म्हटलं जातं की,
'दिसतं तसं नसतं'
आणि म्हणून जग फसतं !'
पुुस्तक वाचनासंबंधी माझा एक अनुभव इथे त्या संदर्भात मांडण्याचा मी प्रयत्न करतोय.
मी काही मोठा दर्दीवाचक नाही, पण वाचनाची मात्र मला जरूर आवड आहे. त्यामुळे वाचनालयातून पुस्तके आणणे व मासिके आणणे हा माझा अत्यावश्यक ऑक्सीजन आहे. सर्वसाधारणपणे मला व्यक्तीचित्रे वा आत्मचरित्रे वाचायला आवडतात. कथा मला बिलकुल आवडत वा पटत नाहीत. कारण जे सांगायचं ते खरं म्हणजे एका पानात संपू शकत असतं, तेच उगाचच लांबत नेलं जातं आणि पाच दहा पानं उगाचच आपल्याला वाचायला लागतात, असं माझं मत आहे. साहजिकच माझ्या वाचनाच्या मर्यादा आहेत हे मी मान्य करतो.
आता मुद्द्यावरच येतो. वाचनालयात गेल्यावर मी पुस्तके शोधताना नेहमी व्यक्तीचित्रे आत्मचरित्र आहेत ना याची खात्री करूनच पुस्तक घरी नेत असतो. पण परवा मोठी गंमत झाली आणि आजचा जो विषय 'फसवा फसवी' चा त्याचा सुखद अनुभव आला.
शिरीष कणेकरांचे
'एकला बोलो रे' हे पुस्तक निवडण्यासाठी मी हाती घेतले आणि अनुक्रमणिका पाहायला गेलो तर तिथे अनुक्रमणिकाच नव्हती. पण त्यांच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकांची यादी होती.
साहजिकच मी पुस्तकातील धडेच म्हणतो (प्रकरणे म्हणत नाही) पहायला सुरुवात केली आणि मला फक्त धड्यांचे क्रमांक दिसले आणि बरोबर त्या त्या धड्याच्या क्रमांकांवर वेगवेगळ्या व्यक्तींची रेखाचित्रे दिसली. सुरुवातच मुळी माधव मनोहर, व पु काळे, राजेश खन्ना ऋषी कपूर एवढेच काय, जयवंत दळवी यांची रेखाचित्रे पाहून मला वाटले हे त्या त्या व्यक्तीच्या संदर्भातील जसे कणेकरांना अनुभव आले तसे असेल.
साहजिकच मी ते पुस्तक वाचायला घरी आणले आणि वाचायला लागलो तर लक्षात आले की, हाती घेतलेले हे पुस्तक त्यांच्या 'फिल्लंबाजी' 'फटकेबाजी' 'कणेकरी' अशा एकपात्री अर्थात 'एकला बोलो रे' या नावाला समर्पक असे त्यांचे त्या कार्यक्रमासमोर संदर्भीचे विविध बरे वाईट, चमत्कारिक आणि कधी कोपरखळ्या मारणारे अनुभव उलगडलेले होते.
माझा कल्पनेप्रमाणे हे व्यक्तीचित्रात्मक पुस्तक नव्हते तर कणेकरांच्या नेहमीच्या खेळकर (की खोडकर ?) भाषेतील लघुनिबंध होते. अर्थात पुस्तक तितकेच वाचनीय होते आणि मी दोन-तीन दिवसात ते वाचून पूर्णही केले.
'दिसते तसे नसते',
'तरी जग फसतेच असे नाही !' असेच आता शेवटी मला म्हणणे भाग आहे !":😄
----------
" नॅशनल लायब्ररी बांद्रा- मुंबईच्या साहित्यिक कला आणि सांस्कृतिक प्रगतीची साक्षीदार !":
"अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानविज्ञानाच्या, जाणिवांच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या अशा
वाचनालयासारख्या 'पाणपोया' गल्लोगल्ली, गावोगावी असायला हव्यात. वाचनसंस्कृती वाढत, माणसांची सांस्कृतिक भूक भागवली जाऊ लागणे गरजेचे आहे. सशक्त समाजाचे ते एक व्यवस्थित लक्षण आहे.
दुर्दैवाने आज तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आणि जीवघेण्या स्पर्धांमुळे
वाचनसंस्कृती लयाला जात आहे, हे आपणा सर्वांचे दुर्दैवच ! अशावेळी नॅशनल लायब्ररीसारख्या 75 वर्षाहून अधिक कार्यरत राहणाऱ्या संस्थांचे आपण कौतुक केले पाहिजे.":
---------
😄 "नाट्यसंपदेचे प्रख्यात निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते प्रभाकर पणशीकर यांच्या "आठवणीतील मोती" या मर्मस्पर्शी आणि मनोरंजक पुस्तकाचा रसास्वाद वाचण्यासाठी पुढील लिंक उघडा....😄
https://moonsungrandson.blogspot.com/2025/03/blog-post_14.html
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा