सोमवार, १७ मार्च, २०२५

"चिंतन-मनन !":

😄 "नव्या वर्षाचे नवे संकेत !": "चिंतन-मनन-1!":😄 💐"काहीही न करता निर्विकार, निर्विचार केवळ पाचही मिनिटे देखील माणूस स्वास्थ बसू शकत नाही. त्याला कुठल्या ना कुठल्यातरी व्यवधानात तन मन गुंतवावेसे वाटते, व्यग्र रहावेसे वाटते. हा कदाचित त्याचा नैसर्गिक स्वभावधर्म असावा. खरं म्हणजे जगाच्या, त्या पलीकडे जाऊन विश्वाच्या अफाट अनंत फापटपसार्या पुढे, तुम्ही काही केले नाही किंवा केले तरी काहीही फरक पडत नसतो. सातत्याने काही ना काही साध्य करण्याचे, मिळविण्याचे माणसाचे जे प्रयत्न सातत्याने चाललेले असतात, त्याची खरं काय गरज ? मनाला जर शांती सुुख समाधान हवं असेल, तर निर्विकार निर्विचार राहायला शिकणं ही आजची नितांत गरज आहे. पूर्वी तपस्वी म्हणूनच एका पायावर उभे राहून कित्येक दिवसच नव्हे तर वर्षानं वर्ष कशी एकाग्रता राखत तपश्चर्या करत असतील याचे नवल वाटते. आज तशा तऱ्हेचा क्रांतिकारी बदल दिवसातून निदान एकदा तरी माणसाने साधायला हवा !":💐 ------------------ 😀 "कल्पनांचे तराजू-1"::😀 या शीर्षकामुळे गोंधळून जाऊ नका. मनांतील कल्पना, तोलून मापून प्रत्यक्षात येणे, कितपत शक्य आहे हे उमंगण्यासाठी तराजू हा शब्द वापरला आहे. या नव्या उपक्रमामध्ये मला सुचणाऱ्या कल्पना मी मांडत जाणार आहे. शुभारंभ असा: ज्याला आपण ड्रेस कोड किंवा गणवेश अथवा युनिफॉर्म असं म्हणतो, तो आपल्याला जागोजागी सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणाऱ्या मंडळींच्या रूपाने दिसतो. जसे परिवहनामधल्या चालक, वाहक किंवा निरीक्षक, संरक्षण विभागात लष्करी अधिकारी आणि जवान सिक्युरिटी गार्ड्स अशांच्या अनेक गणवेशांचे आपल्याला दर्शन पदोपदी घडत असते. त्यामुळे कोणती व्यक्ती कोणत्या स्वरूपाचे काम आणि जबाबदारी पार पाडत आहे, याचा अंदाज येतो. याच कल्पनेला पुढे नेऊन लोकसेवक अर्थात अगदी ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्यांचे सदस्य आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान एवढेच काय तर उपराष्ट्रपती, ते राष्ट्रपती अशा सगळ्या महोदयांना देखील योग्य तो गणवेश सार्वजनिक ठिकाणी वावरताना असावा, अशी ती कल्पना आहे !" आपल्या प्रतिक्रिया माझ्या व्हाट्सअप पेजवर देऊ शकता. धन्यवाद श्री सुधाकर नातू--------- ----------------------- /🌹🌹माझ्या एका मित्राने 1970 सालातील डेक्कन परिसरातील एक सुंदर छोटी फिल्म मी पाहीली. एकदम 55 वर्षांपूर्वीच्या काळात आपण कधी जातो कळत पण नाही.🌹🌹 मला वाटून गेले... 🤕 " अहा, ते सुंदर दिन हरपले !":🤕 🤢 " आज अविश्वसनीय वाटावा असाच हा सारा मनभावन नजारा आहे. त्यावेळचे पुणे आणि त्या वेळच्या पुण्यातला माहोल व वावरणारी माणसे खरंच किती शांत शीतल आणि ध्वनी प्रदूषण/हवेचे प्रदूषणाच्या विरहित असे चढाओढ नसलेले ताण-तणाव कमी असलेले जीवन जगत होती ! आज 55 वर्षानंतर हे सारे पाहताना कुठे होतो आणि कुठे आलो असे वाटू शकते. तंत्रज्ञान वेगाने वाढले, भौतिक विकास कमालीच्या वेगाने होत आहे. परंतु माणसांच्या जीवनातील समाधानाचे, आनंदाचे काय? त्या वेळेला जर हल्ली जगातल्या समाधानी, आनंदी देशांचे सर्वेक्षण केले जाते तसे केले गेले असते, तर आजच्यासारखा 118 वा नंबर नक्कीच आला नसता. उलट कदाचित आपण पहिल्या 10त असतो असे वाटूून गेले. "अहा, ते सुंदर दिन हरपले !, भुलल्या त्या साऱ्या आठवणी !!"🤢👍"कालच्या महिलादिनाच्या निमित्ताने.... खास आठवणीतील भेट.....👌💐 "हा खेळ सावल्यांचा !": "प्रेरणादायी दिशादर्शक 'आनंदी गोपाळ'": "आनंदी गोपाळ" हा चित्रपट बघितला. पाल्हाळ न लावता, पहिलाच मुद्दा सांगतो की, हा चित्रपट इतका सर्वांगसुंदर आहे की, तो भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात यावा. "त्या" वेळची माणसं, आणि "त्या" वेळचे वातावरण, तसेच कर्मठ समाजाची परंपरागत मनोधारणा, अशा माहोलात गोपाळराव जोशींसारख्या एका विक्षिप्त म्हणवल्या जाणाऱ्या माणसाने, स्त्रियांच्या परावलंबित्वातून निर्माण झालेल्या अगतिकतेवर उपाय म्हणून, आपल्या बायकोला काहीही करून सुशिक्षित करावयाचे हा घेतलेला अट्टाहास, पाहिलेले ते स्वप्न, हा खरोखर जगावेगळा वेडेपणा होता. कारणपरत्वे आपले मूल योग्य तर्हेची लक्षणांची जाणीव, व सत्वर उपाय न मिळाल्यामुळे व डॉक्टर वेळेवर न मिळाल्यामुळे मरण पावले, या विषण्ण करणार्या जाणिवांतून आनंदीबाईंच्या मनात तर, भावी समाजाच्या भल्यासाठी, डॉक्टर होण्याचे स्फुल्लिंग निर्माण होते हीच बाब अतुलनीय! त्या आदर्शवत् ध्येयाचा पाठपुरावा, हे अद्वितीय जोडपे, अनेक अडचणी संकटे येऊनही कसे पूर्ण करते, त्याचे ह्रदयंगम चित्रण हा बोलपट प्रभावीपणे करतो. अशा जीवघेण्या कसोटी पहाणार्या धडपडीमुळेच, आनंदीबाई जोशी, ह्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आणि तेही केवळ २२ वर्षांच्या अल्पायुष्यात, एखादी ग्रीक ट्रँजेडी शोभावी अशा दुर्देवी तर्हेने. चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारा असला, तरी आजपर्यंत, ज्या ज्या स्रीयांनी विविध क्षेत्रांत, असे चाकोरीबाहेरचे 'पहिल्यात पहिले', असे योगदान दिले, त्या सार्यांची मांदियाळी रूपेरी पडद्यावर झळकते व ती पहात पहात सारे प्रेक्षक ताठ मानेने व भारावून जावून चित्रपटग्रहाबाहेर पडतात. हा चित्रपट खरोखर उत्तम अभिनय योग्य असे संवाद आणि कार्यकारणभाव पटेल, परिणाम आणि कृती यांचा मेळ घालता येईल असे प्रसंग, त्याचबरोबर योग्य त्या पार्श्वभूमीचे चित्रण, त्या जोडीला अनुरूप असे संगीत ह्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. प्रमुख योगदान अर्थातच नायक ललित प्रभाकर आणि नायिकेच्या रूपात भाग्यश्री मिनिंग यांनी दिले आहे. प्रथम पत्नीच्या सासुबाई झालेल्या श्रीमती कुलकर्णींचेही खरोखर वैशिष्ट्यपूर्ण असे काम झाले आहे. एकूणच सर्वच पात्रे आपाआपली व्यक्तिरेखा चपखलपणे सादर करत असल्यामुळे, हा चित्रपट एक चविष्ट असा हवाहवासा मसाला बनलेला आहे. हे सारे घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून, श्री. समीर विद्वांस ह्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. उत्क्रांती हा सर्व सजीवांचा मूलभूत असा आविष्कार आहे, नव्हे त्यांची ती गरज आहे. सहाजिकच हजारो वर्षे स्त्रियांना जाणीवपूर्वक शिक्षणापासून दूर ठेवल्यामुळे, त्यांच्यावर जी परावलंबित्वाची, एक प्रकारच्या गुलामीची वेळ आली होती, ती द्रष्ट्या अशा अनेक समाजसेवकांच्या कामगिरीमुळे दूर झाली. त्यामध्ये गोपाळराव जोशी या माणसाचा सिंहाचा वाटा होता हे आपल्याला मान्य करावेच लागेल. आज आपल्या भोवती स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर काम करताना दिसतात. त्याचे मूळ गेल्या शतका दीडशतकातील क्रांतिकारक अशा समाजसुधारणांत आहे. हा चित्रपट बघितल्यामुळे प्रत्येकच व्यक्तीला, विशेषतः स्त्रियांना वाटेल की आज माझी जी परिस्थिती आहे, ती मी काही करून अधिक उत्तम बनविण्यासाठी कष्ट घेईन; तसेच पुरुषही स्वतःची प्रगती करता करता, आपल्या कुटुंबातील समस्त स्त्रीवर्गालाही, योग्य ते प्रोत्साहन देऊन त्यांच्या गुणांना योग्य तो मार्ग दाखवत प्रगतीसाठी साधू शकतील. अशा तऱ्हेची प्रेरणा देणारा चित्रपट खरोखर दुर्मिळच! म्हणूनच सुमार चरित्रपटांच्या भाऊगर्दीत "आनंदी गोपाळ" हा चित्रपट एखाद्या कोहिनूर हीर्यासारखा मुकूटमणी म्हणून शोभतो. धंदा कला आणि विचार अशा त्रिवेणी संगमातून निर्माण केली जाणारी करमणुकीची कलाकृती ही नेहमीच असामान्य मानली जाते. त्या तुलनेत "आनंदी गोपाळ" चित्रपटाने ह्या गुणत्रिवेणीचा यथोचित समतोल साधून, वेगळी दिशा दाखवण्याचे महत्कार्य केले आहे. म्हणूनच पुन्हा सांगतो की, हा चित्रपट ऑस्कर मिळविण्याच्या लायकीचा आहे. प्रत्येकाने तो बघावाच अशी माझी कळकळीची सुचना आहे. सुधाकर नातू. ---------- 👍"कालच्या महिलादिनाच्या निमित्ताने....😄 "नव्या वर्षाचे नवे संकेत !": "चिंतन-मनन-1!":😄 💐"काहीही न करता निर्विकार, निर्विचार केवळ पाचही मिनिटे देखील माणूस स्वास्थ बसू शकत नाही. त्याला कुठल्या ना कुठल्यातरी व्यवधानात तन मन गुंतवावेसे वाटते, व्यग्र रहावेसे वाटते. हा कदाचित त्याचा नैसर्गिक स्वभावधर्म असावा. खरं म्हणजे जगाच्या, त्या पलीकडे जाऊन विश्वाच्या अफाट अनंत फापटपसार्या पुढे, तुम्ही काही केले नाही किंवा केले तरी काहीही फरक पडत नसतो. सातत्याने काही ना काही साध्य करण्याचे, मिळविण्याचे माणसाचे जे प्रयत्न सातत्याने चाललेले असतात, त्याची खरं काय गरज ? मनाला जर शांती सुुख समाधान हवं असेल, तर निर्विकार निर्विचार राहायला शिकणं ही आजची नितांत गरज आहे. पूर्वी तपस्वी म्हणूनच एका पायावर उभे राहून कित्येक दिवसच नव्हे तर वर्षानं वर्ष कशी एकाग्रता राखत तपश्चर्या करत असतील याचे नवल वाटते. आज तशा तऱ्हेचा क्रांतिकारी बदल दिवसातून निदान एकदा तरी माणसाने साधायला हवा !":💐 खास आठवणीतील भेट.....👌💐 "हा खेळ सावल्यांचा !": "प्रेरणादायी दिशादर्शक 'आनंदी गोपाळ'": "आनंदी गोपाळ" हा चित्रपट बघितला. पाल्हाळ न लावता, पहिलाच मुद्दा सांगतो की, हा चित्रपट इतका सर्वांगसुंदर आहे की, तो भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात यावा. "त्या" वेळची माणसं, आणि "त्या" वेळचे वातावरण, तसेच कर्मठ समाजाची परंपरागत मनोधारणा, अशा माहोलात गोपाळराव जोशींसारख्या एका विक्षिप्त म्हणवल्या जाणाऱ्या माणसाने, स्त्रियांच्या परावलंबित्वातून निर्माण झालेल्या अगतिकतेवर उपाय म्हणून, आपल्या बायकोला काहीही करून सुशिक्षित करावयाचे हा घेतलेला अट्टाहास, पाहिलेले ते स्वप्न, हा खरोखर जगावेगळा वेडेपणा होता. कारणपरत्वे आपले मूल योग्य तर्हेची लक्षणांची जाणीव, व सत्वर उपाय न मिळाल्यामुळे व डॉक्टर वेळेवर न मिळाल्यामुळे मरण पावले, या विषण्ण करणार्या जाणिवांतून आनंदीबाईंच्या मनात तर, भावी समाजाच्या भल्यासाठी, डॉक्टर होण्याचे स्फुल्लिंग निर्माण होते हीच बाब अतुलनीय! त्या आदर्शवत् ध्येयाचा पाठपुरावा, हे अद्वितीय जोडपे, अनेक अडचणी संकटे येऊनही कसे पूर्ण करते, त्याचे ह्रदयंगम चित्रण हा बोलपट प्रभावीपणे करतो. अशा जीवघेण्या कसोटी पहाणार्या धडपडीमुळेच, आनंदीबाई जोशी, ह्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आणि तेही केवळ २२ वर्षांच्या अल्पायुष्यात, एखादी ग्रीक ट्रँजेडी शोभावी अशा दुर्देवी तर्हेने. चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारा असला, तरी आजपर्यंत, ज्या ज्या स्रीयांनी विविध क्षेत्रांत, असे चाकोरीबाहेरचे 'पहिल्यात पहिले', असे योगदान दिले, त्या सार्यांची मांदियाळी रूपेरी पडद्यावर झळकते व ती पहात पहात सारे प्रेक्षक ताठ मानेने व भारावून जावून चित्रपटग्रहाबाहेर पडतात. हा चित्रपट खरोखर उत्तम अभिनय योग्य असे संवाद आणि कार्यकारणभाव पटेल, परिणाम आणि कृती यांचा मेळ घालता येईल असे प्रसंग, त्याचबरोबर योग्य त्या पार्श्वभूमीचे चित्रण, त्या जोडीला अनुरूप असे संगीत ह्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. प्रमुख योगदान अर्थातच नायक ललित प्रभाकर आणि नायिकेच्या रूपात भाग्यश्री मिनिंग यांनी दिले आहे. प्रथम पत्नीच्या सासुबाई झालेल्या श्रीमती कुलकर्णींचेही खरोखर वैशिष्ट्यपूर्ण असे काम झाले आहे. एकूणच सर्वच पात्रे आपाआपली व्यक्तिरेखा चपखलपणे सादर करत असल्यामुळे, हा चित्रपट एक चविष्ट असा हवाहवासा मसाला बनलेला आहे. हे सारे घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून, श्री. समीर विद्वांस ह्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. उत्क्रांती हा सर्व सजीवांचा मूलभूत असा आविष्कार आहे, नव्हे त्यांची ती गरज आहे. सहाजिकच हजारो वर्षे स्त्रियांना जाणीवपूर्वक शिक्षणापासून दूर ठेवल्यामुळे, त्यांच्यावर जी परावलंबित्वाची, एक प्रकारच्या गुलामीची वेळ आली होती, ती द्रष्ट्या अशा अनेक समाजसेवकांच्या कामगिरीमुळे दूर झाली. त्यामध्ये गोपाळराव जोशी या माणसाचा सिंहाचा वाटा होता हे आपल्याला मान्य करावेच लागेल. आज आपल्या भोवती स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर काम करताना दिसतात. त्याचे मूळ गेल्या शतका दीडशतकातील क्रांतिकारक अशा समाजसुधारणांत आहे. हा चित्रपट बघितल्यामुळे प्रत्येकच व्यक्तीला, विशेषतः स्त्रियांना वाटेल की आज माझी जी परिस्थिती आहे, ती मी काही करून अधिक उत्तम बनविण्यासाठी कष्ट घेईन; तसेच पुरुषही स्वतःची प्रगती करता करता, आपल्या कुटुंबातील समस्त स्त्रीवर्गालाही, योग्य ते प्रोत्साहन देऊन त्यांच्या गुणांना योग्य तो मार्ग दाखवत प्रगतीसाठी साधू शकतील. अशा तऱ्हेची प्रेरणा देणारा चित्रपट खरोखर दुर्मिळच! म्हणूनच सुमार चरित्रपटांच्या भाऊगर्दीत "आनंदी गोपाळ" हा चित्रपट एखाद्या कोहिनूर हीर्यासारखा मुकूटमणी म्हणून शोभतो. धंदा कला आणि विचार अशा त्रिवेणी संगमातून निर्माण केली जाणारी करमणुकीची कलाकृती ही नेहमीच असामान्य मानली जाते. त्या तुलनेत "आनंदी गोपाळ" चित्रपटाने ह्या गुणत्रिवेणीचा यथोचित समतोल साधून, वेगळी दिशा दाखवण्याचे महत्कार्य केले आहे. म्हणूनच पुन्हा सांगतो की, हा चित्रपट ऑस्कर मिळविण्याच्या लायकीचा आहे. प्रत्येकाने तो बघावाच अशी माझी कळकळीची सुचना आहे. सुधाकर नातू. -----------‌ "अनुभवाचे बोल !": "काळ अन् वेळेचा जमाखर्च!": कुणालाही न सांगता काळ हा जातच असतो पुढे पुढे. त्याला मागे वळणे माहीत नाही, तो अव्याहत पुढेच जात रहाणार असतो. मागे गेलेला काळ आणि वेळ फुकट गेली की, चांगल्या समाधानकारक अशा गोष्टींसाठी वापरली गेली, ह्याची आपल्याला कायमच रुखरुख लागली पाहिजे. कारण उपलब्ध वेळ तुम्ही कसा वापरता, कशा करता वापरता, ह्यावर आणि फक्त ह्यावरच तुमचे समाधान, यश अवलंबून असते. ध्यानात ठेवा, आयुष्य हा लिमिटेड ओव्हर्सचा सामना असतो आणि ज्याचा "रन रेट" अधिक तोच जिंकणार! थांबला, तो संपला! पण दुर्दैवाने, आपल्याला वेळेचे भान राहत नाही, आपण नको त्या गोष्टीत वेळ घालवत राहतो, आणि नंतर फक्त पश्चाताप करायची पाळी येऊ शकते. कायम सजग राहून आपण वेळ कसा घालवला, वा कसा अधिक चांगल्या प्रकारे घालवता येईल किंवा घालवण्यापेक्षा वापरता येईल, ह्याचाच सातत्याने विचार केला पाहिजे. त्यासाठी दररोज सकाळी, कालचा दिवस समाधानकारक आणि कोणत्या उपयुक्त योगदानांमध्ये गेला, ह्याची नोंद ठेवणे उपयुक्त ठरू शकते. हे अंतिम सत्य आहे की, काळ, वेळ ही सगळ्यांना सारखी असते. कदाचित मृत्यु आणि वेळ ह्या, दोनच गोष्टी अशा आहेत की, जिथे कुठलीही भेदभावाची सुतराम शक्यता नाही. ते लक्षात ठेवून, समोर आलेला प्रत्येक क्षण अधिकाधिक उपयुक्त गोष्टींसाठी, स्वतःला किंवा इतरांना समाधान देण्यासाठी वापरता आला तर आपला दिवस चांगला गेला असे म्हणता येईल. ----------- दिवाळी अंकांची मांदियाळी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक साहित्य चपराक गेले काही दिवस मी साहित्य चपराक असे चमत्कारिक नाव असणारा 2024 सालचा दिवाळी अंक वाचत आहे त्यातील प्रत्येक लेख हा माहितीपूर्ण मनोरंजक आणि आपल्याला वेगळ्या जाणीव करून देणारा आहे तसेच अंतर्मुख करून त्या त्या विषयावर आपल्या मनातील स्पंदने व्यक्त करणारा असा आहे व्यक्त करायला लावणारा असा आहे ज्या वेळेला जे वाटते ते त्याच वेळेला संग्रहित करणे गरजेचे असते हे आता माझ्या ध्यानात आले आहे आणि म्हणूनच मी नुकताच त्या अंकामधील नवकवितेला जन्म देणारे बासी मर्ढेकर यांच्या मरणे येथील गिरणाशीरणा झालेल्या घराचे नूतनीकरण करून त्याला नवीन शांत प्राप्त करून देण्याचे जी धडपड कोषाध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद विनोद कुलकर्णी यांनी त्यांच्या लेखात मांडली आहे ती वाचून मी सद्गतीत झालो आणि या सगळ्या इंद्रधन शिवधनुष्य मिळण्यासाठी त्यांना जी यातायात करावी लागली त्यामध्ये त्यांना कस कसे वेगवेगळ्या मर्ढेकर नातेवाईकांचे सहाय्य लाभले आणि अखेरीस दिमागदार अशी मर्ढेकरांची माडी उभी राहिली त्याचीच कथा या अप्रतिम जिव्हाळ्याने मांडलेल्या शब्दातील लेखाची आहे या एका लेखावरूनच आपल्याला ध्यानात येईल की किती उत्कृष्ट दर्जाचा हा दिवाळी अंक आहे असा दिवाळी अंक सहसा वाचायला मिळत नाही आणि तो मिळाला याचे मला एक वाचक रसिक रसिक वाचक म्हणून समाधान वाटते ------- ----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा