बुधवार, २६ मार्च, २०२५

"छाप (पड)लेले शब्द !":

" छाप पडलेले शब्द !": " बिकट बदल पण घडेल तेच पसंत !": In Nature 'Change is the only constant' असे म्हटले जाते खरे परंतु काही काही बदल इतके अवघड आणि बिकट असतात की त्यांच्याबरोबर जुळवून घेणे केवळ अशक्य असते. गेल्या काही दशकांमध्ये एकंदरच तंत्रज्ञान आणि इतर अनेक विकासाच्या घटना यामुळे सर्वच काही बदलून गेले आहे आणि त्यांच्याबरोबर जुळवून घेणे ही शक्य होत आहे. जीवनाला आवश्यक असा प्राणवायू अर्थात ऑक्सिजन लेवल कमी होणे आणि त्याबरोबर आपल्या आयुष्याची घडी जुळवून घेणे हे खरोखर अतिशय अवघड आणि त्रासदायक बदलाचे लक्षण होय. परंतु अशी परिस्थिती असतानाही या महिलेने पुरेसा ऑक्सिजन आपल्याला मिळत नसला तरी कसे जुळवून घेतले, ते या छोट्याशा लेखात उलगडले आहे. खरोखर त्यांच्या धीरोदात्तपणाचे व समंजसपणाचे कौतुक करावे ! आपल्यालाही जीवनामध्ये कुठलाही बदल जर घडला तर त्याबरोबर जुळवून घेण्याची प्रेरणा निश्चितच यामुळे मिळेल !": ----------- [13/3, 9:44 AM] Sudhakar Natu: "छाप पडलेले शब्द !": " आरोग्यम् धनसंपदा: 'मूत्रपिंडाचे महत्वपूर्ण कार्य !": माणसाच्या शरीरामध्ये प्रत्येक अवयव महत्त्वाचा हे खरेच, परंतु अत्यंत जीवनावश्यक असे कार्य करणारे मेंदू हृदय, फुफ्फुस, यकृत याबरोबरच मूत्रपिंडाचे देखील तितकेच अत्यावश्यक असे कार्य शरीरामध्ये चाललेले असते. या महत्त्वाच्या अवयवाबद्दल सोबतच्या महाराष्ट्र टाइम्सच्या लेखामध्ये सविस्तर माहिती दिली आहे, ती सर्वांनी जरूर वाचावी !": ------------ "छाप पडलेले शब्द !": " वाचन माझा ध्यास, तर लेखन माझा श्वास !": "योगायोग किती गमतीशीर असतात बघा: महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीमध्ये 'माझा ऑक्सिजन' या सदरामध्ये वरील लेख माझ्या नजरेत आला आणि मला समजून चुकले की, जे माझ्या मनात आहे तेच इथे तंतोतंत व्यक्त होत आहे ! स्मार्टफोन हाती आल्यापासून आणि मला तिथे काही ना काही लिहीणे जमायला लागल्यापासून उत्तरोत्तर गेल्या पाच सहा वर्षात माझी लेखनाची हौस पुरेपूर भागत आहे. त्यातून व्हॉइस टू टेक्स्ट या एप्लीकेशन मुळे तर या "हृदयीचे त्या हृदयी" करण्याचा माझा संकल्प सातत्याने मला पुरा करता येत आहे. आपण सारे रसिक वाचा ह्या आनंददायी वाटचालीचे साक्षीदार आहात. माझ्या लेखना बद्दल आपला जो काही प्रामाणिक स्पष्ट प्रतिसाद असेल तो मला जरूर 'व्हाट्सअप' वर आपण थेट देऊ शकता. 'निंदकाचे घर असावे शेजारी' या म्हणीप्रमाणे माझ्या लेखनात बदल करता येतील. माणसाला जे जमते जे आवडते आणि ते त्याला जेव्हा सातत्याने करायला मिळते तेव्हा त्याला जणू एखादा सुखी माणसाचा सदरात गवसतो, असाच अनुभव मला या सगळ्या वाटचालीत येत आहे. धन्यवाद. ?----------- " छाप पडलेले शब्द !" : " ये मुंबई है मेरी जान !!": 💐"जगाला जशी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत अमेरिका प्रिय व खुणावत असे, तशीच भारतवासीयांना आपली मुंबई ! स्पोर्ट्स मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट प्रथमच मुंबईमध्ये स्थापन करणाऱ्या निवृत्त क्रिकेटपटू श्री निलेश कुलकर्णी यांचा हा म. टा. पुरवणीमधील लेख, प्रत्येक मुंबईकराला अभिमानाने आनंदाश्रू ढाळायला लावणारा आहे हे निश्चित ! जगभर कोणीही कुठेही मुंबईकर जरी गेला तरी, 'ये मुंबई है मेरी जान !' असे म्हणत परत येणारच ! लेख वाचत वाचत जुन्या आठवणींना मनामध्ये चाळत, माझ्यासारखा मुंबईकर मनाशी अर्थातच म्हणतो की, आमचे भाग्य हे की आम्ही येथे मुंबईत वाढलो, सर्वांनाच नवनवीन संधी देणाऱ्या मुंबईत आमच्यातील गुणांना वेगाने वाढवत गेलो, प्रगती करत, कठीण काळातही फिनिक्स पक्षासारखी झेप घेण्याची उर्मी आम्हाला मुंबईनेच दिली !"💐 ------------ 👍 "छाप डलेले शब्द !":👍 💐"कर्तृत्ववान माणसांचे व मुंबईचे जीवाभावाचे नाते !":💐 😀 "सोबतच्या महाराष्ट्र टाइम्स पुरवणी मधील वृत्तात, आत्मसंवाद करणारे श्री सुहास पेडणेकर हे प्रथम रुईयाचे प्राचार्य आणि नंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते, एवढीच फक्त माहिती मला होती. पण मनमोकळ्या आणि पारदर्शक आत्मसंवादामुळे त्यांची कोकणातील खेड्यात असलेली शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी आणि तेथून मुंबईत येऊन त्यांनी स्वतःच्या गुणांवर व कष्टांवर कशी गरुड भरारी घेतली, हे समजून मन भरून आले ! गुणवत्ता त्या जोडीला जर जिद्दीने कष्ट घ्यायची तयारी असेल, तर ही मुंबापुरी तुम्हाला कोणतीही स्वप्न साकार करायची संधी देते हेच या साऱ्या निवेदनावरून उमजले. कुणालाही विलक्षण प्रेरणादायी वाटणारी ही कहाणी खरोखर कौतुकास्पदच !त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा. जाता जाता, माझ्याही रुईया कॉलेज आणि त्याच्या परिसरातल्या आठवणी जाग्या झाल्या. कारण आम्ही सारी भावंडे रुईया कॉलेजचेच ! त्यातील मी तर जवळच असलेल्या किंग जॉर्ज हायस्कूलचा विद्यार्थी, जोडीला माझे वडील रुईया कॉलेजच्या स्थापनेपासून ते रजिस्टर होऊन निवृत्त होईपर्यंत रुहयामध्येच ! खरंच हे माटुंग्याचे रामनारायण रुईया कॉलेज आणि मुंबईत येऊन विविध क्षेत्रात कीर्तिमान होणाऱ्या व्यक्तींचे नाते खरंच जीवाभावाचे आहे!":😀 --?--------' 😇 "छाप पडलेले शब्द !":😇 😭 "अभिजात मराठीची दुरावस्था 😭 🤢 'मराठी शाळा बंद कां पडत आहेत' ?":🤢

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा