शनिवार, २२ मार्च, २०२५
"सोशल मीडियावरील मुसाफिरी-भाग 2 !";
सोशल मीडियावरील मुशाफिरी अनेक वेळा काही काही मनात ठेवण्याजोग्या भावणाऱ्या अशा संदेशांना सामोरे जाते त्यातीलच काही निवडक येथे उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत
*नवऱ्याची २१ कर्तव्ये*
*०१.* कुकरखालचा गॅस
तीन शिट्यांनंतर बंद करणे.
*०२.* उतू जाणाऱ्या दूधाखालचा गॅस
धावत जाऊन बंद करणे.
*०३.* डोअरबेल अटेंड करणे.
*०४.* उंचावरचा डबा काढून देणे.
*०५.* डब्याचं झाकण उघडून देणे.
*०६.* सॉसच्या बाटलीचं बुच
ओपनरने उघडून देणे
*०७.* घरात पाल, झुरळ इत्यादी डायनासोर्स पेक्षा भयंकर वन्य प्राणी मारुन घराबाहेर टाकणे.
*०८.* नविन गॅस सिलेंडर शेगडीला लावून देणे.
*०९.* सांगितलं तरंच मुलांना रागावणे, संभाळणे.
*१०.* पेपर आल्यावर लगेच न वाचणे, शब्दकोडं न सोडवणे.
*११.* बाहेर पडतंच आहात, तर
'ह्या खतरनाक वाक्यानंतर', दिलेल्या
यादीनुसार सर्व वस्तू आणणे.
*१२.* कपडे इस्त्रीला देणे, आणणे.
गिरणी वरुन दळण दळून आणने
*१३.* बिलं भरणे, बँक व्यवहार संभाळणे.
*१४.* महिन्याचं सामान मॉलमधून
आणतांना पिशव्या उचलणे, पेमेंट करणे.
*१५.* शॉपिंग करतांना मॉलमधे तासनतास, निरर्थक, न कंटाळता मागेमागे फिरणे,
इशारा होताच चपळाईने पेमेंट करणे.
*१६.* सासरचे पाहुणे येऊन जाईपर्यंत
घरात पडेल ते काम करणे,
शहाण्या मुलासारखं वागणे.
*१७.* घरातली प्लंबिंग, इलेक्ट्रिकची
छोटीमोठी कामं करणे.
*१८.* वारंवार जमिनीवर पडणारा रिमोट, जरासंधासारखा परत-परत जिवंत करणे (दुरुस्त करणे)
*१९.* घरचं वाहन असेल तर वाहनचालकाची भूमिका न कंटाळता पार पाडणे.
*२०.* वाहन नसेल तर भाड्याची गाडी ऑनलाईन बुक करणे, इत्यादी इत्यादी.
---------------
आणि.
*२१.* 'मलाच मेलीला घरातील
सर्व कामे करावी लागतात.
एकाची मदत होत नाही'
असे वाक्य ऐकून शांत बसणे.
अजून बरीच कर्तव्यनिष्ठ कामं बायकोची नवऱ्याला करावी लागतात.
*बिचारे नवरे......😃😃😃*
----------------------
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा