शुक्रवार, २१ मार्च, २०२५
"छाप (पड)लेले शब्द-!": " माणसातले माणूसपण हरवत आहे कां?":
छाप (पड)लेले शब्द-!": " माणसातले माणूसपण हरवत आहे कां?":
आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधील श्री दिनकर गांगल यांचा लेख खरोखर सुसंस्कृत माणसाला विचार करायला लावणारा आहे. भौतिक विकास झाला, परंतु सांस्कृतिक वातावरण अक्षरशः भकास होत चालले आहे. कारण सगळीकडे ताण-तणाव चढाओढ आणि अधिकाधिकाची हाव यापायी कोणालाच आता सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावावी असे वाटत नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळे मोबाईल वरील डिजिटल माध्यमांमध्ये देखील टाइमपास सारखीच अवस्था आलेली आहे.
खरं म्हणजे विचार, संस्कृती आणि नैतिकता या साऱ्यांचाच दुष्काळ होत चाललेला दिसत आहे. तीन दशकापूर्वी बाजारूवृत्ती आल्यापासून पैसा हेच सर्वस्व झाले आहे आणि अक्षरशः समाज आपली संस्कृती हरवत चालला आहे की काय अशी भीती वाटते.
कुठल्याही छापील व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये बातम्या कसल्या येतात, तर त्या जास्तीत जास्त गुन्हेगारी भ्रष्टाचार घोटाळे अशा दुरावस्थे संबंधित अधिक असतात. हे खरंच दुर्दैव आहे आणि कुठेतरी थांबायला हवे. समाजामध्ये शांती समाधान आनंद निर्माण व्हायला हवा. आपला देश जगामध्ये आनंदी माणसांच्या गणनेत 118 वा आहे ही आजची बातमी तर मन व्यथीत करणारी आहे.
त्या निमित्ताने विचार मंथन व्हावे म्हणून 22 मार्चला ठाणे येथे जो कार्यक्रम होणार आहे तो खरोखर महत्त्वाचा आहे. अशा उपक्रमांना शुभेच्छा देता देता मला असे सुचवावेसे वाटते की अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा व्हिडिओ यु ट्यूब सारख्या डिजिटल माध्यमांवर प्रकाशित केला तर लाखो लोक त्याचा अनुभव घेऊ शकतील आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हायला मदत होईल.
सोबत चालले एक वाचा आणि अंतर्मुख होऊन जरूर विचार करा.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा