रविवार, २ मार्च, २०२५
" सोशल मीडियावरील माझे योगदान
😝 "फसवा फसवी !":😝
😄 "असं म्हटलं जातं की,
'दिसतं तसं नसतं'
आणि म्हणून जग फसतं !'
पुुस्तक वाचनासंबंधी माझा एक अनुभव इथे त्या संदर्भात मांडण्याचा मी प्रयत्न करतोय.
मी काही मोठा दर्दीवाचक नाही, पण वाचनाची मात्र मला जरूर आवड आहे. त्यामुळे वाचनालयातून पुस्तके आणणे व मासिके आणणे हा माझा अत्यावश्यक ऑक्सीजन आहे. सर्वसाधारणपणे मला व्यक्तीचित्रे वा आत्मचरित्रे वाचायला आवडतात. कथा मला बिलकुल आवडत वा पटत नाहीत. कारण जे सांगायचं ते खरं म्हणजे एका पानात संपू शकत असतं, तेच उगाचच लांबत नेलं जातं आणि पाच दहा पानं उगाचच आपल्याला वाचायला लागतात, असं माझं मत आहे. साहजिकच माझ्या वाचनाच्या मर्यादा आहेत हे मी मान्य करतो.
आता मुद्द्यावरच येतो. वाचनालयात गेल्यावर मी पुस्तके शोधताना नेहमी व्यक्तीचित्रे आत्मचरित्र आहेत ना याची खात्री करूनच पुस्तक घरी नेत असतो. पण परवा मोठी गंमत झाली आणि आजचा जो विषय 'फसवा फसवी' चा त्याचा सुखद अनुभव आला.
शिरीष कणेकरांचे
'एकला बोलो रे' हे पुस्तक निवडण्यासाठी मी हाती घेतले आणि अनुक्रमणिका पाहायला गेलो तर तिथे अनुक्रमणिकाच नव्हती. पण त्यांच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकांची यादी होती.
साहजिकच मी पुस्तकातील धडेच म्हणतो (प्रकरणे म्हणत नाही) पहायला सुरुवात केली आणि मला फक्त धड्यांचे क्रमांक दिसले आणि बरोबर त्या त्या धड्याच्या क्रमांकांवर वेगवेगळ्या व्यक्तींची रेखाचित्रे दिसली. सुरुवातच मुळी माधव मनोहर, व पु काळे, राजेश खन्ना ऋषी कपूर एवढेच काय, जयवंत दळवी यांची रेखाचित्रे पाहून मला वाटले हे त्या त्या व्यक्तीच्या संदर्भातील जसे कणेकरांना अनुभव आले तसे असेल.
साहजिकच मी ते पुस्तक वाचायला घरी आणले आणि वाचायला लागलो तर लक्षात आले की, हाती घेतलेले हे पुस्तक त्यांच्या 'फिल्लंबाजी' 'फटकेबाजी' 'कणेकरी' अशा एकपात्री अर्थात 'एकला बोलो रे' या नावाला समर्पक असे त्यांचे त्या कार्यक्रमासमोर संदर्भीचे विविध बरे वाईट, चमत्कारिक आणि कधी कोपरखळ्या मारणारे अनुभव उलगडलेले होते.
माझा कल्पनेप्रमाणे हे व्यक्तीचित्रात्मक पुस्तक नव्हते तर कणेकरांच्या नेहमीच्या खेळकर (की खोडकर ?) भाषेतील लघुनिबंध होते. अर्थात पुस्तक तितकेच वाचनीय होते आणि मी दोन-तीन दिवसात ते वाचून पूर्णही केले.
'दिसते तसे नसते',
'तरी जग फसतेच असे नाही !' असेच आता शेवटी मला म्हणणे भाग आहे !":😄
----------------------
"👍"Thought of the Day !":👌
'Learning is an exploration from darkness to Light, from the unknown to known, from unawareness to awareness; thus expanding your 'World', broadening your horizons.
Our five sense organs that enable us to see, to smell, to hear-listen, to feel and to think, are the tools for this learning process and also to our critical appreciation ability.
What one does, when he sees a scene, a picture, a film or a drama, or reads literature,or interacts with others, etc. he likes it or hates, or avoids it and differentiates between what's good and what's not.
Thus critical appraisal is an advance application of the unique 'Learning Process":
काल मराठी भाषा दिनी, 'माहेर' दिवाळी अंकातील श्रीमती मोनिका गजेंद्रगडकरांच्या वडिलांसंबंधीच्या-( विद्याधर पुंडलिक) लेखातून मला तीन अनोखे शब्द गवसले: शहाणीव, ( शहाणपण)
प्रातिभ रुप ( प्रतिभावान)
आणि शब्दस्पर्श !
आपली मराठी ही अभिजात भाषा कां आहे याचा त्यामुळे प्रत्यय आला !":😄
😄 "आज मराठी भाषा दिन. कवी श्रेष्ठ आणि भाषा प्रभू कुसुमाग्रजांचा हा जन्मदिन 27 फेब्रुवारी 1912. यावेळच्या मराठी भाषा दिनाचे वैशिष्ट्य आहे की आता मराठीला अभिजात भाषा हा दर्जा प्राप्त झाला आहे.
अशा या मंगल दिवशी आपण प्रत्येकाने निश्चय करूया:
# यापुढे मी कायम व्यवहारात घरात सगळीकडे मराठी भाषा वापरीन.
# माझ्या मुलांना व इतरांनाही सांगेन की त्यांच्या मुलांना त्यांनी मराठी भाषा शाळेत शिकवावे.
# माझ्या वाढदिवसाच्या व इतर समारंभा निमित्तच्या कार्यक्रमातील केकवर मराठी भाषेत शुभेच्छा देईन.
# मराठी चित्रपट नाटके मालिका आणि बातम्या आवर्जून पाहिन.
# " माझ्या मोबाईलवर मराठी भाषा प्रामुख्याने डिफॉल्ट भाषा म्हणून वापरीन...
😄
मुक्त संवाद जन्मगाठीचे रहस्य
https://youtu.be/c5kjMdJTBlY?si=BRwnFED_pP2Az7In
😇पर्याय आणि द्विधा मनस्थिती म्हणजे बिंब प्रतिबिंब किंवा कोंबडी आधी का अंड आधी असा प्रकार माणसाच्या आयुष्यात अशी अनेक वेळा वेळ येते की जेव्हा त्याला पर्याय निवडावे लागतात आणि तेव्हा त्याची द्विधा मनस्थिती होते जो अचूक पर्याय अचूक वेळी निवडतो आणि त्याप्रमाणे कृती करतो तो आयुष्यात विकसित होत जातो आणि समाधानी होतो !":😇
*दिव्यातील तेल संपले की दिवा विजला जातो तसेच माणसाची कर्म संपली की त्याच्या भाग्यरेषा देखील पुसून जातात म्हणून माणसाने आपल् मन कर्मावर लावल की भाग्य कधीच संपत नाही.*
*🙏राम कृष्ण हरी 🙏*
*शुभ सकाळ*
💐"स्वार्थासाठी जवळ आलेली माणसं काही क्षणात तुटतात,पण विघांरांनी व
प्रेमाने जुळलेली माणसं आयुष्यभर
सोबत असतात.
सुप्रभात,शुभ सकाळ,सुंदर दिवस
आनंदमय शुभेच्छा !"💐
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
💐 ";पैज लावायची तर स्वत: सोबतच लावा कारण जिंकला तर,स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल---आणि हरला तर स्वत:चाच अहंकार हराल--- ध्येय
दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका--!!
शुभ रविवार सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌷🌷🙏🏻🙏🏻🌷🌷
आमची मराठी अभिजात मराठी !":💐
👍"Intensity- जवळीक,
यामधील भावनिक असोशी जवळीक या शब्दातून अधिक प्रभावीपणे मांडली जाते.
Mevaric- अतरंगी, तीच कहाणी अतरंगी शब्दाची त्यामधून माणसाचे जे व्यक्तिमत्त्व अभिप्रेत आहे ते अधिक संकल्पना प्रकट होते.
Plane- भवताल, येथे परिप्रेक्ष हा शब्द अप मार्केट असू शकतो पण भवतालाचा जो आसमंत प्रकट होतो तो अधिक पारदर्शक असतो, नाही कां?
म्हणूनच 'आमची मराठी अभिजात मराठी !'
त्याकरताच भाग्य आम्हाला लाभले बोलूया मराठी !!":👌
मुक्त संवाद अरे वेड्या मना कांरे, तळमळीतून ?
जीवनातील ताणतणावामुळे सध्या मानसिक आरोग्य ही एक मोठी समस्या झाली आहे. मन चंगा तो कठौती में गंगा असं म्हटलंय ते खोटं नाही आनंदी मन ठेवायचं कसं आणि ती साऱ्यांना जमते असं नाही. मानसिक अनारोग्य याविषयी सोप्या भाषेत आपल्याला माहिती दिली आहे.
ही लिंक उघडा
https://youtu.be/Qxmh1quyJhk?si=AlS6saaSj6zkMKln
मुक्तसंवाद-जन्मगाठींचे रहस्य !":
जीवनामध्ये जन्मानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे विवाह योग. पण विवाहाच्या जन्म गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात ते कितपत खरे असा तो अनाकलनीय एक प्रकारचा जुगारच म्हणावा सगळ्या बाजू अनुकूल असूनही विवाह न जुळण्याची कारणे काय यामागची याचा उहापोह येथे केला आहे
ही लिंक उघडा
https://youtu.be/c5kjMdJTBlY?si=PQrhuOKdxSLqqtjW
3
💐II " नवीन वर्षाचा नवा संकल्प-6 II💐
👍" शारदोत्सव-रसास्वाद !":👌
'नटखट नट-खट मोहन जोशी':
एक मनस्वी, तेजस्वी, यशस्वी कहाणी!
--–👌--------------👌--------------👌---------
'नटखट नट-खट मोहन जोशी' हे श्री. जयंत बेंद्रे ह्यांनी शब्दबद्ध केलेले सुमारे 500 पानी आत्मनिवेदन, ह्या अत्यंत मनस्वी आणि कर्तबगार अभिनेत्याची एखाद्या कादंबरीपेक्षाही चित्तथरारक जीवनकहाणी नुकतीच वाचून झाली.
अंगभूत गुणांना आणि कौशल्याला अपार जिद्द व कष्ट, निश्चित ध्येय आणि ह्या जोडीला थोडी नशिबाची साथ मिळाली, म्हणजे सामान्यांतून अचंबित करणारे यशस्वी कर्तुत्व कसे आकाराला येते त्याचे एखाद्या आशयघन चित्रपटासारखे दर्शन येथे घडते.
गरजूंना, अडचणीत सापडलेल्या अभाग्यांना सर्वशक्तीनिशी मदत करणारा हा माणूस, जेवणांत जर काही अन्न उरले तर ते वाया न जाऊ देता गरजू भुकेलेल्यांच्या तोंडी जाईपर्यंत स्वस्थ न बसणारा हा माणूस, एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की, मग कितीही अडचणी, संकटे आडवी आली तरी न डगमगता ती यशस्वीपणे पूर्णत्वाला नेणारा हा माणूस, आपले कुटूंबीय, पत्नी मुले ह्यांची काळजी घेणारा, जिव्हाळ्याने वागणारा हा माणूस, व्यावसायिक जीवनांत प्रामाणिकपणे आपल्यांतील कर्तुत्वाला सिद्ध करणारा हा माणूस इतक्या पोटतिडकीने आणि तटस्थ प्रांजलपणाने आपला जीवनपट येथे उलगडतो की थक्क व्हावे.
अनेक हिंदी, मराठी चित्रपट तसेच मालिका आणि नाटके करणारा, विविध पुरस्कार मानसन्मान मिळवणारा, हा गुणवंत अभिनेता सुरेल गीतेही गातो. अ.भा.नाट्यपरिषदेचा अध्यक्ष ह्या नात्याने ते करत असलेली रंगभूमीची सेवा तर थक्क करणारी आहे. अशा ह्मा माणसाने व्यावसायिक जीवनाची सुरवात मालवहातूकीच्या क्षेत्रांत एक वहानचालक-मालक म्हणून केली होती! जीवनसंग्रामात माणूस कुठे असतो आणि किती थक्क करणारी शिखरे पादाक्रांत करू शकतो ते ह्या पुस्तकावरून जसे समजले, तसेच कुणालाही नेहमी उपयोगी पडतील असे अनुभवाचे मंत्र येथे आहेत.
ह्या पुस्तकातील अनोखा आगळा वेगळा असा भाग म्हणजे, त्यांच्या पत्नीने एक प्रियकर पती म्हणून आणि दोन मुलांनी एक कर्तव्यदक्ष प्रेमळ वडील म्हणून आलेल्या सहवास क्षणांची केलेली ह्रदयंगम उजळणी होय. तसेच मोहन जोशींनीच स्वत:शीच स्वत:चा घेतलेला रोखठोक लेखाजोखाही ह्या आत्मनिवेदनाची उंची वाढवतो.
कुठेही कंटाळा न येता उत्सुकतेने वाचावी अशी ही आत्मसमाधान देत, आत्मपरिक्षणही करायला लावणारी, ५०० पानी जीवनगीता मला अवचितपणे वाचायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
हँटस् आँफ टू श्री मोहन जोशी
व-त्यांचे शुभचिंतन.
4
https://youtu.be/gALHjo9z1a8?si=BIqS7YMISseqSC8T
😇 "प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच प्रश्न!":😇
😀 'आपण आपल्या जागतेकपणीचा वेळ कसा घालवतो, हा प्रश्न वैयक्तिक आवश्यक व्यवधाने व व्यावसायिक जबाबदारी सोडून किंवा प्रवासाचा वेळ सोडून आपण कसा उपयोगात आणतो ? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने निदान दर महिन्यात एकदा तरी शोधले पाहिजे. एक प्रकारचा असा आत्मसंवाद केला पाहिजे, त्यामुळे आपण कसे जगतो, कां जगतो याचे उत्तर मिळू शकेल.
विशेषत: जेष्ठ नागरिकांना काही सन्मानानीय अपवाद वगळता, हा तर मोठा यक्षप्रश्नच असतो की वेळ कसा घालवायचा? त्यासंबंधीचा आमचा गमतीशीर अणुुकथेचा भाग आपण ऐकला असेलच. आपल्याला विविध प्रश्नांची प्राथमिक उत्तरे देण्याची गरज आहे, ते प्रश्न असे किंवा मुद्दे असे:
झोपण्यात गेलेला वेळ
सकाळी व सायंकाळी फिरण्यातला वेळ लिहिणे, वाचन करणे, टीव्ही बघणे,
सिनेमा व नाटकाला जाणे इत्यादी इत्यादी, अनेक गोष्टी आपण नेहमी करत असतो त्यासाठी किती वेळ गेला हे आपण पाहिले पाहिजे. त्याशिवाय वेळे व्यतिरिक्त आपण प्रश्न असा केला पाहिजे की, या प्रत्येक गोष्टी बाबतीत आपण त्या त्या गोष्टी का करतो, त्या नाही केल्या तर आपले काही नुकसान होणार असते कां? त्या गोष्टीचा फायदा काय ? इत्यादी इत्यादी सर्वंकष व्यापक दृष्टिकोनातून आपण गेलेल्या किंवा घालवलेल्या वेळेविषयी जागृत राहून प्रश्न विचारले पाहिजेत.
एक ध्यानात ठेवा, वरीलपैकी कुठलीही गोष्ट आपण जरी केली नाही तरी वेळ कुणासाठी थांबत नसतो.
त्यामुळे तो आपोआप तर जाणारच असतो. तर आपण हे सगळं कां करतो? खरोखर त्याची गरज आहे कां? थोडक्यात आपल्या वेळेचा व आपल्या भावविश्वाचा परस्पर संबंध काय असतो, काय असावा? याचा सखोल शोध घेण्यासाठी हा सारा खटाटोप ! त्यामुळे मूलभूत योग्य वा अयोग्य गोष्टी आपल्यासमोर येतील आणि त्यातून आपल्याला आपला वेळ अधिक सकारात्मक अधिक योगदान देण्याजोगा व आत्मसमाधान देण्याजोगा वापरता येईल, असे मला वाटते !"
आता जाता श्री स्वामी समर्थ रामदास यांचे
हे विचार ध्यानात घ्या म्हणजे मला काय सांगायचंय ते चांगले लक्षात राहील
# "अलिप्तपण दे रे राम,
मजविण तू मज दे रे राम !"
# " मनी आणावे ते होते,
विघ्न अवघेची नासोनी जाते !":😄
5
निवडणूकीचे विदारक वास्तव:
धोरण नियोजन व त्यांची अंमलबजावणी फसल्याची लक्षणे
“What can happen, due to whatever has happened.” By Peter Drucker.
ध्येय व धोरण ठरविणार्या शासनकर्त्यांनी जरूर ध्यानांत ठेवावेत असे हे बोल, त्या जागतिक कीर्तीच्या व्यवस्थापकीय सल्लागाराचे आहेत. आज सात दशकांनंतरही अपयशाचे आक्रोश करावयाची वेळ येणे, हे धोरण नियोजन व त्यांची अंमलबजावणी फसल्याची लक्षणे आहेत.सर्व प्रकारची नैसर्गिक साधन सामुग्री आणि विपुल सुशिक्षित कुशल मनुष्यबळ लाभूनही, अन्न, वस्त्र, निवारा अशा मुलभूत गरजांपासून आणि नागरी सुविधांपासून लोकसंख्येतील लक्षणीय भागाला वंचित रहावे लागते आहे, ह्यासारखे दुर्दैव ते कोणते? शहरी आणि ग्रामीण, इंडीया आणि भारत, आहेरे आणि नाहीरे, अशी विचित्र विभागणी, सात दशकांच्या प्रयत्नांचे फलित होय, हे कटू वास्तव नाही कां?
लोकसेवकांना परत बोलविण्याचा अधिकार
खरे म्हणजे जनतेच्या आशा आकांक्षा जाणून घेवून, लोकसेवकांनी शासकीय यंत्रणेद्वारे त्या प्रत्यक्षांत आणत कायद्याच्या चौकटींत राहून जनहित व विकास साधायचा असतो. लोकसेवकांचे हितसंबंध आणि प्रत्यक्ष आम जनतेचे भले होणे, असे परस्परांच्या विरूद्ध कसे असू शकते? म्हणूनच न्यायाने जनतेलाही अशा लोकसेवकांना परत बोलविण्याचा अधिकार असणे, संयुक्तिक नव्हे कां? त्या अनुषंगाने कायद्यांत योग्य ते बदल करण्याचा विचार व्हावा....
ह्या आठवड्याच्या वेधक विचारमंथनासाठी log on to my blog http//moonsungrandson.blogspot.com
💐II आकाशातील पाळणे अभिवाचन समूह II💐
👍 "अर्थसाक्षर- गरीबी मागील अर्थशास्त्र भाग दोन !":👌
"अभिवाचन क्रमांक 343 !":
😄" पैसा आहे सर्वस्व मानायला सुरुवात झाल्यापासून गरीब आणि श्रीमंत यामधील दरी वाढत चालली आहे. गरिबी कमी करण्यावर बहुतेक देशांचा विकसनशील देशांचा धोरणात्मक प्रयत्न चाललेला असतो परंतु त्या कितपत यश येतं याची शंका आहे कारण गरीब आणि श्रीमंत यामधील दरी स्वातंत्र्य मिळाल्यापासून वाढतच चालली आहे 90% लोकांकडे केवळ दहा टक्के संपत्ती तर दहा टक्के लोकांकडे 90% संपत्ती असे भीषण व्यस्त प्रमाण असल्याचे दाखले दिले जातात या अभिवाचनामध्ये श्री उदय पिंगळे यांनी त्यांच्याच लेखाच्या आधारे गरिबी मागील अर्थशास्त्र आपल्याला सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे त्यामुळे अर्थव्यवहाराकडे बघण्याचा डोळसपणा आपल्याला अंगी करता येईल असा विश्वास आहे !"😀
खाऊजा' किंवा 'LPG' संस्कृती 1991 नंतर निर्माण झाल्यापासून चंगळवाद फोफावला. कमीत श्रमामध्ये जास्तीत जास्त पैसा मिळवायचा काही जणांना छंद लागला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींनी तर 'सायबर क्राईम' सारखे उपद्व्याप केले. झटपट श्रीमंतीचे हे वेड कुठे जाऊन थांबते, ते हल्ली अनेकांनेक घोटाळ्यांमधून बाहेर येऊ लागले. तरीही कुठलाही विचार न करता जास्त परतावा मिळतोय, म्हणून अति हाव ठेवून लोकांचे करोडो रुपयांचे नुकसान केले गेले. येथे श्री उदय पिंगळे त्यांच्या मार्गदर्शक आणि डोळे उघडणाऱ्या लेखाचे अभिवाचन करताना, नुकत्याच झालेल्या एका महाघोटाळ्याचा ढांडोळा घेत आहेत. असे नुुकसान होऊ नये, म्हणून काय करायचे तेही ते सांगत आहेत !":😭
https://drive.google.com/file/d/17xWTJqNbxe-0G4ovx17SGu-Ihfuc3Alz/view?usp=drivesdk
6
💐II मंगल प्रभात II💐
👍" बोल अमोल 332 !":👌
😀 "
7
"काव्यरंग!"
":😀
8
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-92 ":👌
💐 " हिंदी चित्रपट सृष्टीतील गीत संगीताची स्वरबहारयुगांतील 3
सुमधुर गीते, पुढील लिंकस् उघडून....
1 प्यार किया दिल ने कहा हो तुम......
2 नही चांद होगा ना तारे रहेंगे हम हमेशा तुम्हारे रहेंगे....
3 बाबूजी जरा धीरे चालना.....
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
9
👍 "छाप डलेले शब्द !":👍
💐"
!":💐
😀 "
वाटले ते पारदर्शकपणे मांडले.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा