बुधवार, २६ मार्च, २०२५
बोल अमोल-314 ते 320A !":
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-314 !":👌
💐"मराठी रंगभूमी हे एक मराठी माणसाचे जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. रंगमंचावर नाटक सादर होणे आणि ते समोर असून पाहणे, हा त्याच्या अत्यंत आवडीचा विषय
आहे. आज मराठी रंगभूमीला दीडशे वर्ष होऊन गेली परंतु मराठी माणसाचे नाटकांवरील प्रेम तसूभर ही कमी झालेले नाही. या व्हिडिओमध्ये आठवणींना उजाळा देत रंगदर्शन घडवले आहे !"💐
ही लिंक उघडा...
https://youtu.be/BeVPDw94VrU?si=qktC4aDjF5JwuVyt
-----------------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-315 !":👌
😀 "नववर्षात जेन बिटाचे स्वागत !":😀
सालाबाद प्रमाणे मावळत्या 2024 वर्षाला समस्त जगाने उत्साहाने आनंदाचा जल्लोष करत निरोप दिला आणि 2025 या नववर्षाचे उत्स्फूर्त स्वागत केले गेले.
तंत्रज्ञानाच्या स्फोटामुळे अनेक नवनवे बदल आगामी दशकात घडणार आहेत आणि यापुढे जन्माला येणाऱ्या पिढीला जेन बीटा असे नांवही देण्यात आले आहे.
चंगळवादाचा तीन दशकापूर्वी उदय झाल्यापासून सातत्याने अशा तऱ्हेचे सामूहिक अत्यानंद बेदरकारपणे साजरे करण्याची प्रथा पडली आहे. म्हणूनच जाता जाता हे जाणवत जाते की,अशा तऱ्हेचे स्वागत दैदीप्यमान रोमहर्षक परंपरा असलेले आपण आपल्या नववर्षाचे म्हणजे गुढीपाडव्याचे करतो कां !":😇
---------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-317 !":👌
💐"माणसाला मिळालेले सर्वोच्च वरदान- वाणी !":
"ओंकार' त्यातून सारे विश्व निर्माण झाले असे म्हणतात. ओंकारातून वाणी आणि वाणी द्वारे शब्द, शब्दांमुळे परस्परसंबंध आणि ज्ञानाचे जाणिवांचे माहितीचे आदान प्रदान ! वाणी आणि शब्दब्रह्माची किमया
खरोखर अलौकिक असते !":💐
----------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-318 !":👌
💐 "समाधानाची सप्तपदी":💐
आज हे सात मंत्र देताना मला विलक्षण आनंद होत आहे:
१. डोके वापरा.
२. दृष्टी बदला.
३. जीभेला आवरा.
४. हाताने नेहमी देत रहा.
५. ह्रदयापासून प्रेम करा.
६. मन काबूत ठेवा.
७. पायाने चालत रहा !":💐
----------.
---------------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-316 !":👌
😀 "कसं जगायचं, असं की तसं?!":
शरीर हे एकमेवाद्वितीय साधन,
तर मन आश्चर्यकारक शक्ती; त्यांच्या समन्वयाने,
होतं जीवनाचं सोनं, वा माती!":😀
?--------
💐II मंगल प्रभात II💐
👍" बोल अमोल 318 !":👌
💐""संभवामी युगे युगे"!:
"आगळे वेगळे, हे सगळे"!!:
पुराणातले दशावतार आपल्याला माहीत आहेत आणि आपण ह्या संकल्पनेची तुलना, डार्विनच्या 'सजीवांच्या उत्क्रांती सिद्धांता'सारख्या अत्यंत महत्त्वाच्या व जगमान्य गोष्टीशी करू शकतो.
"संभवामि युगे युगे" हे सूत्र आपल्याला गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात. ह्याचाच अर्थ एका जन्मानंतर दुसरा जन्म शक्य आहे हे ध्वनित होते. पुनर्जन्मावर विश्वास ठेवावा, असे हे सारे आपले संचित आहे.
जर पुनर्जन्म असेल तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे जी व्यक्ती आपल्या आई-वडिलांच्या अगोदरच मृत्यू पावते, तिला पुनर्जन्म मिळण्यासाठी जेवढा वेळ लागेल, त्या तुलनेत ज्या व्यक्तीच्या आई-वडिलांचा मृत्यू तिच्या हयातीतच होतो, त्या व्यक्तीला
पुनर्जन्मासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा खूप जास्त असणार हे उघड आहे.
आपण येथे "डी एन ए" ह्या मूलभूत सूत्राची कामगिरी लक्षात ठेवली पाहिजे. कारण कुणीही त्याच आई-वडिलांच्या पदरी जन्माला येऊ शकणार, हे सत्य यामागे आहे. कदाचित म्हणूनच आपल्या परंपरेमध्ये स्त्रिया जन्मोजन्मी हाच पती लाभो असं तर म्हणत नसतील?
पुनर्जन्माची ही कथा
--------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-319 !":👌
जीवनात असे ही काही दिवस येतात,
माणसाला माणसापासुन लांब घेऊन
जातात …. पण जी माणसे लांब
असुनही आठवण काढतात,
त्यांनाच तर आपली खरी माणस
म्हणतात…!
🙏🏻शुभ सकाळ 🙏🏻
𝗚𝗼𝗼𝗗 𝗠𝗼𝗿𝗻𝗶𝗻𝗚
----------
बोल अमोल-320
किमयागार भाषा:
१ तीन वर्षे: तीन तेरा!
उपरोधिक, पण ठाम विधान.
आता, जर उद्गार चिन्हाऐवजी, प्रश्नचिन्ह येथे टाकले, तर....
२ तीन वर्षे: तीन तेरा?
हो अथवा नाही अशी शक्यता दर्शविणारे विधान.
३ तीन वर्षे: तीन तेरा, कां?
इथे फक्त स्वल्पविरामामुळे, होकारार्थी विधानाची संभाव्य कारणे अपेक्षित असलेले विधान.
शब्दांचे अर्थ, एक चिन्ह बदलू शकते.
'Our days are numbered.'
Myth: This is a statement meant for senior citizens.
Truth: This is a statement meant for One and All.
शब्दांचे अर्थ फसवे असतात, गर्भितार्थ पूर्ण वेगळाच असू शकतो.
------------
💐II (अ?)मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-320 A !":👌
😇 "यक्षप्रश्न !":😇
😭 "2019---ते------2024 आणि पुढेही...
"सुवर्णसंधी----------ते-------संकटांचा चक्रव्यूह?"
"असे काय केले गेले नाही म्हणून आणि काय केले गेले म्हणून, आताची अशी धायकुतीची वेळ महाराष्ट्रावर आली"?:😭
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा