बुधवार, २६ मार्च, २०२५

"मल्लीनाथी !":

😭 " मल्लिनाथी !":😭 😭 "कायदा आणि सुव्यवस्था यांचा संपुर्ण बोजवारा उडालेला महाराष्ट्र मध्ये उघड उघड दिसत आहे. गेंड्याची कातडी पांघरलेले निगरगट्ट राजकारणी त्यांच्या सत्तालोलुपतेपोटी, काय भयावह आदर्श समाजापुढे ठेवताय ते उघड दिसते आहे. अक्षम्य विलंबाने न्याय मिळणे हेही एक अत्यंत महत्त्वाचे कारण सध्याच्या दुरावस्थेसाठी आहे. कालचा मंगळवार हा महाराष्ट्राच्या इतिहासात काळाकुट्ट अंध:कार करणारा मंगळवार म्हणावा लागेल. एका दिवशीच वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या मन विषण्ण करणाऱ्या वृत्तांची ही मालिका पुढे सादर करताना एवढेच म्हणावेसे वाटते 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ?':😇 ---------- मल्लिनाथी https://youtu.be/dJwIw6InRMg?si=VU9_1Px4LER4UynS // ही योजना लागू करताना कुठलीही तपासणी न करता पैसे वाटण्यात आले. निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी ही जणु एक प्रकारची आमीष देण्याचाच प्रकार नव्हे कां? आणि हा चालूवून घेऊन कुठला आदर्श निर्माण केला गेला याचा विचार करायला हवा. 'आयजीच्या जीवावर बायजी उदार !" अशा तऱ्हेचा हा प्रकार केवळ निवडणुका समोर ठेवून करण्यात आला, हे दुर्दैव. शिवाय निवडणूक आयोगाने 'ध्रुतराष्ट्रा'सारखी या योजनेकडे कानाडोळा केला, हे वेगळेच. अपात्र ठरणाऱ्या प्रत्येक महिलेकडून दिले गेलेले, पैसे परत घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. कारण ते पैसे जनतेचे आहेत. पण तसे करणार नाही अशा घोषणा नेतेमंडळीच करत आहेत. कुठे चाललो आपण ! कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ? ------------------@ मल्लिनाथी "गुन्हेगारी इतकी वाढण्याचे कारण महत्त्वाचे असे की अक्षम्य विलंबाने मिळणारा न्याय. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी जेव्हा हे सरकार निवडून सत्तेवर आले, त्यावेळेला किती खटले विविध कोर्टामध्ये प्रलंबित होते, याचा अभ्यास करून लवकरात लवकर म्हणजे ठराविक समयामध्ये निकाल लागलाच पाहिजे, यासाठी किती नवीन न्यायालये आणि किती नवीन न्यायाधीशांच्या नियुक्त केल्या हे तपासणे गरजेचे आहे. शिवाय यापुढे कोणताही खटला किती मर्यादेपर्यंत चालवून त्याचा निकाल दिलाच पाहिजे, असा कायदाही संसदेत कां मांंडला जात नाही ? याचे प्रमुख कारण म्हणजे राजकारण्यांनाच असे काही व्हायला नको आहे. सहा वर्षांची निवडणुकांपासून बाद, एवढीच मर्यादा शिक्षा झालेल्या लोकसेवकाला पुरेशी आहे, आजन्म बंदी नको असे तर या सरकारनेच नुकते मांडले आहे ! यावरून हे म्हणणे मान्य व्हावे. सामान्य जनताला इथे कोणी वाली नाही. सत्तेच्या सौदागर यांचा हा खेळ असाच चालू राहणार आहे. 'मुकी बिचारी मेंढरे, कशीही हाका" अशी सारी परिस्थिती आहे. "मल्लीनाथी !": वीज प्रवाह खंडित होण्याचे आपले त्रासदायक अनुभव हेच सांगतात की 'बैल गेला झोपा केला !' 'तहान लागल्यावर विहीर खणा !' सदनिका विकत घेताना बहुतेक सर्वांनीच हा वीज खंडित झाल्यावर पर्यायी वीज पुरवठा असणारी यंत्रणा बिल्डर देतो आहे कां, तसेच स्ट्रेचर जाऊ शकणारी लिफ्ट देणार आहे कां? याचा विचार कोणीही केला नाही. त्यामुळे ही अशी वेळ आली, हे सत्य आता मान्यच करायला हवे. यापुढे आपण प्रत्येकाने आपल्या परिचय वर्तुळाला या महत्त्वाच्या विषयांवर अवगत करायला हवे, त्याचप्रमाणे महारेराने अशा तऱ्हेची सक्ती बिल्डरला मान्यता देताना करायला हवी अशी सुचना/मागणी हवी. --------- "मल्लीनाथी- दिव्याखाली अंधार !": " देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि विलक्षण गतीने विकास होत जगामध्ये पहिल्या पाच क्रमांकात आणि नंतर तिसऱ्या क्रमांकापर्यंत झेप घेण्याची दवंडी माध्यमांमध्ये अधून मधून बडवली जाते. पण वास्तव किती भयानक आणि चिंताजनक आहे त्याची प्रचिती देणारा हा फोटो खूप काही सांगून जातो. मुंबईतील माहीम रेल्वे फाटकाजवळच्या स्कायवाॅक वरील 'नाही रे' वाल्यांचे संसार कसे लटकत आहेत त्याचे हे विदारक दृश्य चिंताजनकच आहे. एकीकडे 80 कोटी लोकांना जरुरीचे मोफत धान्य पुरवठा करावयाची वेळ आली असताना, आपण आपली अर्थव्यवस्था उत्तम आहे हे कसे म्हणू शकतो? मूठभर श्रीमंत आणि ढीगभर दैन्यामध्ये अशी परिस्थिती असताना, शिवाय श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत तर गरीब अधिकाधिक बिकट परिस्थितीत ढकलले जात आहेत, आपले नियोजन कुठेतरी चुकते आहे ! स्कायवाॅक सारखी सुविधा आणि तिचा हा कल्पनाही करू शकणार नाही असा उपयोग (?) काय सुचवतो: ' दिव्याखाली अंधार !': ही लिंक उघडा https://drive.google.com/file/d/1R8734rw1-to9RQKv9AEC4i1ECssAhalq/view?usp=drivesdk

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा