बुधवार, २६ मार्च, २०२५

"मल्लीनाथी !":

😭 "मल्लिनाथी-20 'जागते रहो !":😭 😇 "अडचणीतून संधी कशी निर्माण होते, त्याचा मला आज अनुभव आला. सर्वसाधारणपणे मी सकाळी फिरायला जाताना बरोबर पाण्याची बाटली आणि मोबाईल घेत असतो. परंतु आज तोच विसरला गेला. काही फिरल्यानंतर मी विसावा घेतो आणि त्या वेळेला मला जे सुचतं ते मी 'बोल अमोल' व 'मल्लीनाथी' रूपात निर्माण करून सादर करीत असतो. आज आपण तसे करू शकणार नाही, कारण आपल्याजवळ मोबाईल नाही असे वाटले खरे, परंतु युक्ती सुचली बरोबर फिरणाऱ्या पत्नीचा मोबाईल मी थोडा वेळ मागितला, कट्ट्यावर बसलो आणि जे जसं सुचलं ते येथे सादर करत आहे. सध्याची परिस्थिती ही तितकीशी उत्साहवर्धक नाही, असे विविध प्रकारच्या गुन्हेगारी चित्रांमधून दिसत आहे आणि त्याचेच प्रतिबिंब पुढील छोट्याशा व्हिडिओत आणि ध्वनीफितिमध्ये आढळून येईल. वेळीच जागे व्हा नाहीतर पुढे अंध:कार आहे, अशीच दुर्दैवाने या वर्षाच्या सुरुवातीला वेळ आली आहे !":😇 ------------ 😇 "मल्लिनाथी- !":😇 😄 " आधार सुनेचा: शाब्बास सुनबाई !":😄 😭"हे स्वप्नरंजन नव्हे कां? विवाह झाल्यानंतर स्वतंत्र राहण्याची, फक्त राजा राणीचा संसार करण्याची अपेक्षा असणाऱ्या पुष्कळशा मुली वधु परीक्षेचा कांदेपोह्याच्या कार्यक्रमाला गेल्या असताना हळूच विचारतात, 'घरात 'वेस्ट पेपर बास्केट' आहेत कां?' इथे 'वेेस्ट पेपर बास्केट'? म्हणजे घरातील संभाव्य सासू सासरे व ज्येष्ठ व्यक्ती नाही कां ! वास्तवात अशी आदर्श सून पाहायला मिळणे कठीणच हेच खरे !":😭 ------ 😭 "मल्लिनाथी-21 !":😭 😇 "क्रिकेटचा अतिरेक थांबवा !":😇 "दरमहा रतीब घातल्यासारखे वेगवेगळ्या संघांबरोबर सामने ! खेळाडूंची दमछाक होईल, इतके त्यांंना खेळायला लावणे आणि क्रिकेटचा, कोंबड्या झुंजवाव्या असा बाजार भरवणे, कितपत योग्य आहे? "अति तेथे माती !" याकडे कोणी लक्ष देणार की, नाही?? विचार करा आणि.... तुमचे मत सांगा.....😀 ------------- 💐II मंगल प्रभात II💐 👍"मल्लिनाथी !":👌 😀 "वाकडे, तिडके, इकडे, तिकडे. उघडे, बोडके, इकडे, तिकडे. थापाडे, खोटार्डे, इकडे, तिकडे, खादाडे, माजोर्डे, इकडे, तिकडे. सब घोडे, बाराटक्के, इकडे, तिकडे चोहीकडे!! करावी, कशी निवड? कुणाला, आहे सवड!!":😀 ------------- 😇 "मल्लिनाथी- टेलीरंजन !":😇 😭 # आता 'काहीही हं हं 'नाही, तर 'इडियट बॉक्स'चे नांव सार्थक करण्याची अहमहीका !": # 'घरोघरी मातीच्या चुली' ' मुलगी पसंत आहे' ' नवीन जन्मेन मी'.... सारख्या पोरखेळ करत लांबत जाणाऱ्या अनेक मालिका ! # 'लॉ ऑफ डिमिनिशिंंग रिटर्नस्' आणि 'प्रॉडक्ट लाइफ सायकल' प्रमाणे प्रारंभ दमदार, पण नंतर सुमार हे सिद्ध करणाऱे कार्यक्रम.... # रोज सगळीकडे त्याच त्याच, कणभर बातम्या आणि मणभर जाहिराती. पुन्हा पुन्हा दाखवणाऱ्या वाहिन्या.... # प्रतिभा, कल्पकतेचा दुष्काळ... अन् निखळ करमणुकीचे मृगजळ ! # आता दर्शकांनी कीव करावी, की दया दाखवावी, करमणुकीचा बाजार उठवणाऱ्यांची !": #सहजजगत्या मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग जवळजवळ सगळ्याच समाज माध्यमांवर वाढत चालला आहे, हे दृश्य खरोखर चिंताजनक आहे. कारण त्यामुळे उपलब्ध तंत्रज्ञान आणि संसाधने यांचा इतका दुरुपयोग होत असताना समाजामध्ये नको ते आदर्श उभे रहात आहेत, याचा सगळ्यांनी गंभीर्याने विचार करायला हवा पण दुर्दैव हे की, याला आळा घालायला कोणालाच सध्या तरी शक्य नाही. अंध:कारमय वातावरणात, नीतिमत्ता हरवलेला गमावलेला समाज हे उद्याचे कदाचित वास्तव असेल असेच सध्या दिसते !": शेवटी हेच खरे... What goes up goes down !":😭 ------------- 😇 "मल्लिनाथी- टेलीरंजन !":😇 😭 # आता 'काहीही हं हं 'नाही, तर 'इडियट बॉक्स'चे नांव सार्थक करण्याची अहमहीका !": # 'घरोघरी मातीच्या चुली' ' मुलगी पसंत आहे' ' नवीन जन्मेन मी'.... सारख्या पोरखेळ करत लांबत जाणाऱ्या अनेक मालिका ! # 'लॉ ऑफ डिमिनिशिंंग रिटर्नस्' आणि 'प्रॉडक्ट लाइफ सायकल' प्रमाणे प्रारंभ दमदार, पण नंतर सुमार हे सिद्ध करणाऱे कार्यक्रम.... # रोज सगळीकडे त्याच त्याच, कणभर बातम्या आणि मणभर जाहिराती. पुन्हा पुन्हा दाखवणाऱ्या वाहिन्या.... # प्रतिभा, कल्पकतेचा दुष्काळ... अन् निखळ करमणुकीचे मृगजळ ! # आता दर्शकांनी कीव करावी, की दया दाखवावी, करमणुकीचा बाजार उठवणाऱ्यांची !":😭 # सहजजगत्या मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग जवळजवळ सगळ्याच समाज माध्यमांवर वाढत चालला आहे हे दृश्य खरोखर चिंताजनक आहे कारण त्यामुळे उपलब्ध तंत्रज्ञान आणि संसाधने यांचा इतका दुरुपयोग होत असताना समाजामध्ये आदर्श हे भलतेच उभे राहत आहेत, याचा सगळ्यांनी विचार करायला हवा. दुर्दैव हे की याला आळा घालायला कोणालाच सध्या तरी शक्य नाही. अंधकारमय भवितव्य, नीतिमत्ता हरवलेला गमावलेला समाज हे उद्याचे कदाचित वास्तव असेल, असेच सध्या दिसत आहे ! शेवटी....हेच खरे... What goes up, goes down ! --------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा