शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

"सोशल मिडीया":"प्रतिभाशक्तीची व्यायामशाळा-२!":


"सोशल मिडीया":
"प्रतिभाशक्तीची व्यायामशाळा-२!":

फेसबुक, whatsapp अशी माध्यमे, माणसांतील अंगभूत कल्पनाशक्तीला वाव देत लेखनकौशल्य सुधारण्यासाठी आहेत, असे मी सुरवातीपासून मानत आलो आहे. माझ्याप्रमाणेच, त्यांचा उपयोग अनेकजण आपल्या लेखनगुणांत उत्तरोत्तर उत्तम सुधारणा होण्यासाठीच करताना दिसतात.

माझ्यापुरते बोलायचे झाले, तर मी देखील स्वनिर्मित संदेशच शक्यतो तेथे प्रदर्शित करत आलो आहे. ते मी सोशल मिडीया, म्हणजे
प्रतिभाशक्तीची व्यायामशाळाच आहे असे मानत आल्या मुळेच.

अचानक सहज कल्पना आली की, माझी सोशल मिडीयावर जे विचारगर्भ व कल्पकतेचा आविष्कार असलेले व संवेदनशील व्यक्तींना अंतर्मुख करणारे निवडक कल्पक विचारपुष्पे वाचकांसाठी एकत्रित मांडावित.
ती जरूर अवलोकन कराः

#सोशल मिडीयावरील सहभाग, कसा असावा? तर असा": सोशल मीडियावर विचारपूर्वक कलात्मक भाग घेणे हे एक कौशल्य असते. ते साऱ्यांनाच जमते असे नाही. आपण जे काही पुढे पाठवतो, ते समयोचित आहे ना हे जसे बघायला लागते, त्याचप्रमाणे ते कुणाला कशाकरता पाठवतो, त्यालाही आपल्याला प्राधान्य द्यावे लागते. उगाचच कोणतेही संदेश, कुणालाही कसेही पाठवणे हे योग्य नसते. आलेले वा स्वतःला सुचलेले नवीन विचार, नवीन दिशा, नवीन कल्पना किंवा उपयुक्त व सत्य अशीच माहिती वा आठवणी अथवा संगीत नाट्य नृत्य आदि कलांसंबंधी योग्य ते आविष्कार, योग्य अशा मुहुर्तावर पाठवले तर, ते पाठवणार्या व्यक्तीचा ठसा उमटू शकतो. त्या व्यक्तीकडून येणार्या संदेशांची जेव्हा उत्सुकतेने प्रतिक्षा केली जाणे, हे यशाचे द्योतक ठरते. सहाजिकच हे साधणे, चिकीत्सक रसिक कल्पक बुद्धीचे तसेच प्रयत्न आणि कष्टांचे आहे. त्याकरता आपल्या संदेशांच्या स्विकारकांची योग्य ती ओळख त्यांच्या आवडी-निवडीची जाण असणे नितांत आवश्यक आहे, म्हणून हे काम खरोखर येरागबाळ्याचे नाही. हे माध्यम अंगभूत कल्पनाशक्तीला वाव देत, लेखनकौशल्य सुधारण्यासाठी आहे आणि त्याचा उपयोग आपल्या लेखनगुणांत उत्तरोत्तर उत्तम सुधारणा होत रहाण्यासाठी केला जावा असेच मला शेवटी म्हणावेसे वाटते.  

# "हा हंत, हा अंत!":
काळ हा आहे, कलियुगाचा
अपेक्षा कां आता, सत्ययुगाच्या?
करु या, विश्वासघात मतदारांचा
उड्या मारु या, झटपट पक्षांतरांच्या!
कास धरु या, खुर्च्या त्या सत्तेच्या!!
आला कां जवळी अंत, तो लोकशाहीचा??
"विक्रीयोग्य सेवा देणार्याने,
प्रामुख्याने पैशांपेक्षा,
ग्राहकाच्या हिताला व समाधानाला,
प्राधान्य देणे अत्यावश्यक असते."

# लाजिरवाणी अधोगती:
वाढती गुन्हेगारी, विशेषत: महिलांवरील अत्याचार, खूप विलम्बाने न्याय, भ्रष्टाचाराचा महाराक्षस, जीवघेणी महागाई, खड्डयानी भरलेले रस्ते, वेगाने वाढणारी अनधिकृत बांधकामे आणि झोपड़पट्टी, हे साधण्यासाठी मतपेटीकड़े लक्ष ठेवून कसेही वाकवले जाणारे क़ायदे, सार्वजनिक वहातूकीची दयनीय स्थिती, रखडत चाललेली व खर्च नाहक वाढणारी विकासकामे ही यादी अशीच वाढतच जाईल. सरकार कोणतेही येवो, सर्वसान्यांचे जीवन जिकीरीचे झाले आहे, हेच खरे आहे. आज ७ दशकांनंतरही असे चित्र असणे, हे निश्चित भूषणावह नाही. ही अधोगती कोण कशी आणि किती कालानंतर थांबवणार?

# कोणत्याही गांवांत, शहरात वा महानगरांत वहातूक खड्डयानी अत्यंत जिकीरीची बनवली आहे. अपघात विलंब, मनसताप रोजचे झाले आहेत. ७ दशकांनंतरही ही विदारक अवस्था असणे, हे दूर्दैव व लांछनास्पद होय. हयाचे कारण आपली अकार्यक्षमता की वैयक्तीक फ़ायद्यासाठी सार्वजनिक हिताचा दिलेला बळी ?
सर्वसामान्यांना कोणी वाली नाही हेच खरे!

# मालिकांचे 'महाभारत'":
"पुनश्च हरी ओम्":
लॉकडाऊनच्या विश्रांती वा विसाव्यानंतर मालिकांचे पुनश्च हरि ओम् आता १३ जुलैपासून चालू होईल. तेव्हा......

१ जुन्या चावून चोथा झालेल्या आणि कथानकात काहीही नाविन्य न उरलेल्या मालिका पुढे दाखविल्या जाऊ नयेत. प्रेक्षकांचा जरा तरी मान राखला जावा, त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये......

२ ह्या पुढे तरी शक्यतोवर टी-20 सामन्यांप्रमाणे मर्यादित भागांच्या आणि निश्चित कथानकाचा शेवट असलेल्या नवीन मालिकाच दाखविल्या जाव्यात......

३ तसेच अनुषंगाने कुठल्याही मालिकेत प्रचलित कायद्यांच्या विपरीत असे काहीही दाखवले जाणार नाही ना, असे यापुढे तरी त्यांच्यावर सेन्सॉर नियंत्रण ठेवले जावे........

४ ज्याप्रमाणे महाभारत मालिकेमध्ये प्रत्येक भागाच्या शेवटी त्या त्या भागातील कलाकारांचा सहभाग असे, त्यांच्या नावाची श्रेयनामावली दाखवली जायची, तीच पद्धत यापुढे मालिकांमध्ये सुरू केली जावी.......

५ कोणत्या वेळी, कोणत्या जाहिराती दाखविल्या जाव्यात ह्याचे तारतम्य ठेवले जावे......

६ बातमीपत्रांच्या वाहिन्यांनी त्याच त्याच बातम्या केवळ अँकर बदलत, न दाखवता ताज्या नवीन बातम्याच दाखवाव्यात. जाहिरातींच्या रतीबाचा अतिरेक टाळवा.....

याशिवाय
काय?....काय?... काय?...
जे तुम्हाला वाटते ते प्रतिसादात जरूर लिहा."

# "भाऊबंदकी, फितुरी आणि निष्क्रियता ह्यामुळे भवितव्याचा कायम र्हास होत रहातो."

# "काही मिळवण्यासाठी,
काही द्यायलाच लागते,
मात्र,
काही न देताच, मिळतो,
तो फक्त जन्म!"

# "भूतकाळाचा गर्भितार्थ समजत,
वर्तमानातील अन्वयार्थाच्या दिशेने मार्गक्रमणा केली तर,
भविष्यात क्रुतार्थता लाभते."

# "स्वार्थ सोडून, निस्वार्थ बुद्धिने चरितार्थ करायचे ठरवले,
तरच जीवनांत खराखुरा चिरस्थायी अर्थ निर्माण होऊ शकतो."

# "सौहार्द, निष्ठा आणि क्रुतीशीतलता ह्यामुळे उज्वल भवितव्याचा मार्ग गवसत रहातो."

# "हे" 'असे', अन् "ते"ही 'तसे',
सांगा, आपले व्हायचे कसे?
त्यातून निवडायचे कसे, कसे?
जुळवतो, बापुडे कसेबसे!"

# "आजचा दिवस माझा"!
लाँक डाऊन होऊन आता चार महिने उलटून गेले. जेव्हा तू लाँक डाऊन सुरू झाला तेव्हा त्याच्यातील काही नाविन्य होते नवे आव्हान होते आणि तेव्हा आशा होती की ही दशा, जशा एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यावर रिझल्ट लागतात जून जुलैला पुन्हा नवीन वर्ष उमेदीने सुरू होते, त्याप्रमाणे हे कोरोनाचे महासंकट तेव्हा दूर होईल, सर्व काही पूर्ववत होईल आणि लालक डाऊन वगैरे जाऊन, आपल्याला पुन्हा पहिल्यासारखं मनमोकळेपणाने बाहेरही जाता येईल. पुनश्च आपल्या इतर कामांना सुरुवात करता येईल आणि जीवनाला काहीतरी चांगला अर्थ भरेल, रंग भरेल.

परंतु तसे काही सध्या होताना दिसतच नाही. तसेच ही परिस्थिती केव्हा संपेल,याची काही शाश्वती नाही. त्यामुळे पुष्कळ जण खरोखर निराश झालो आहेत, काही जणांना सैरभैर होऊन, तर काय करावं याची त्यांना कुठलीही कल्पना येत नाहीये. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना तर जखडल्यासारखे होऊ शकते, कारण त्यांनी बाहेर जाणं हा एक मोठा धोका असू शकतो. त्यांना घरातच बसणे भाग आहे.

अशा वेळेला काही ना काहीतरी वेगळी दृष्टी देणारे आणि मनामध्ये योग्य ती जाणीव करून देणारा येणार्‍या परिस्थितीला जुळवून कसं घ्यायचं, त्याच्यातच आनंद कसा मानून घ्यायचा, हे आपण शोधत रहा. तो शोध नवी दृष्टी नवी दिशा, नक्की देईल. आणि समजू लागाल,
"आजचा दिवस माझा"!

# *मन हळवं असावं पण दुबळं नसावं...!*
*कारण*
*हळव्या मनास भावना कळतात तर*
*दुबळ्या मनास नेहमी वेदना छळतात...!*

# "वाट पहाणे,
वाटेला लावणे,
वाट गवसणे,
वाटेला लागणे आणि वाट लावणे, ह्या पंचसूत्रीने आयुष्य बनते!"

# मारली एकच एक अशी
"मिठी",
जणु ठोक ठोक ठ़ोकणारी काठी!
मारला एकच एक नजरेचा "तीर",
करून जातो, चमत्कारच चमत्कार!!

सध्या इतके पुरे.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच चित्ताकर्षक साहित्य आणि तसेच १५० हून अधिक वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com

ह्या शिवाय
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट तसेच ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे विडीओज् पहाण्यासाठी........

आजच ही लिंक उघडून......
एकसे बढकर एक विडीओज् पहा.....
subscribe करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

ह्या लिंकस् संग्रही जरूर ठेवून शेअरही करा.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा