"शब्द रुची" दिवाळी अंक'१८":
महान चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर ह्यांच्या जगमान्य योगदानाचे चित्र मांडणारा लेख
श्री. रंजन जोशी ह्यांनी ह्या अंकात लिहीला आहे.
त्यामध्ये त्यांनी विविध बिरुदे आणि त्यामागील सामाजिक मानसिकता ह्यांचा समग्र वेध घेतला आहे, तो नोंद घेण्याजोगा आहेः
"विविध बिरुदे आणि सामाजिक मानसिकता":
'अठराशे तीस नंतरच्या काळात रावबहादुर, लोकहितवादी, न्यायमूर्ती, महात्मा आणि लोकमान्य ही बिरुदे लोकोत्तर व्यक्तींना दिली जात असत. लोकहितवादी देशमुख हे इंग्रज सरकारच्या नोकरीत असून भारतीय समाजाला इंग्रजी राजवटीत आलेला आधुनिक विचार मानणारे होते. भारतीय रूढीग्रस्त मानसिकता त्यामुळे नाही शी होईल अशी त्यांची धारणा होती. महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी राजवटीचे समर्थक होते कारण भारतातील हजार वर्षे चार वर्ण आणि जातीव्यवस्थेचे उच्चाटन होऊन शूद्र म्हणून हिणवला गेलेला कष्टकरी मुक्त होईल, या हेतूने त्यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली. त्यातूनच लोकांनी महात्मा हे सन्माननीय विरोध त्यांना दिले. कोल्हापूरचे शाहू महाराज प्रजाहितदक्ष राजा म्हणून ओळखले गेले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे ब्रिटिशांच्या नोकरीत होते, तरी त्यांचे भारतीय समाज सुधारणांचे प्रामाणिक प्रयत्न लोकांनी अनुभवले. ते सर्वार्थाने न्यायमूर्ती म्हणून ओळखले गेले.
लोकमान्य हे बिरूद बाळ गंगाधर टिळक यांना लोकांनीच लावले, कारण ते कष्टकरी तसेच अगदी सुशिक्षित वर्गात देखील देशपातळीवर स्वातंत्र्य चळवळीचे नेते मानले गेले. समाजसुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर ओळखले गेले. महर्षी म्हणून धोंडो केशव कर्वे यांच्या शिक्षण देण्याच्या कार्यामुळे समाजाने दिले.
महात्मा गांधी अहिंसावादी सामाजिक व राजकीय विचारांच्या धोरणांनी नवयुगाची सुरुवात करणारे म्हणून त्यांची जागतिक पातळीवरही घेण्यात आली. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन करणारे म्हणून मान्यता पावले. अशी काही बिरुदे देशप्रेम व स्वातंत्र्य चळवळीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील लोकनायक जयप्रकाश नारायण अशा पद्धतीने मान्य झाले. नंतरच्या काळात ह्रदयसम्राट हे बिरूद उदयाला आले."
-------------------------
रावबहादुर आणि थोर चित्रकार महादेव धुरंधर यांचा व्यक्ती म्हणून आणि चित्रकलेचा एक महान उपासक म्हणून, आपण संशोधनपूर्वक, अत्यंत अभ्यासपूर्ण असा जो हा लेख लिहिला आहे, तो खरोखर एखाद्या डॉक्टर पीएचडी साठी लिहिलेल्या प्रबंधाचा जणू सीनाँपसिस अथवा सारांश असावा इतक्या दर्जाचा झाला आहे. माहितीबरोबरच त्यांनी चितारलेली विविध पद्धतीची अशी प्रत्यक्षदर्शी चित्रे, आपण या लेखासोबत दिली आहेत. त्यामुळे या लेखाची शोभा वाढून दर्जा उच्च झाला आहे.
चित्रकला हा खरं म्हणजे आमच्यासारख्या सामान्यांच्या दृष्टीने एक ऑप्शनला टाकू शकणारा विषय. पण त्याचे इतके काही संदर्भ, रूपे आणि प्रकार असू शकतात, हे आम्हाला त्यामुळे कळले. शेवटी चित्रकार आणि लेखक यांच्यात काहीतरी साम्य आहे आणि तेही एक लेखक म्हणून मी जाणू शकतो. ही चित्रे जेव्हा त्यांनी काढली असतील, तेव्हा विचारांची त्यामागे बैठक मजबूत असणार, एवढे निश्चित. एक वाचनीय आणि चित्रकलेबाबत संपूर्ण नवी दृष्टी देणार्या, या
लेखाबाबत लेखकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
--------------------------
"शब्द रुची" दिवाळी अंक'१८ मधला श्री. दिलीप पांढरीपट्टे ह्यांचा "नव्या वाटा, नवे ठसे हा लेख वाचला आणि त्यांनी आपल्या जीवनप्रवासाची विशेषतः साहित्यिक आणि शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीचा लेखाजोखा अगदी मोजक्या शब्दात येथे मांडला आहे. गझल पासून सुरुवात करून विविध साहित्यिक योगदानाप्रमाणे, शैक्षणिक आणि व्यावसायिक अधिकारपद त्यांनी मिळवल्याचे त्यावरून समजले.
असाच आपआपल्या क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा संक्षिप्त आढावा ह्या अंकात रत्नाकर मतकरी, डॉक्टर अविनाश सुपे, रामदास भटकळ यांनी देखील घेतला आहे. त्यामुळे आपल्याला माणूस कसा असतो आणि तो अंगभूत गुणांच्या आणि परिश्रमांच्या जोरावर आपल्याला आवडीचे असे क्षेत्र कसे निवडतो आणि त्यामध्ये आपले गुण प्रदर्शित करत मान्यता कशी मिळवतो ते समजते त्यामुळे विविध अशा क्षेत्रांची तर माहिती होतेच परंतु त्या त्या लेखकाच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात आपल्याला प्रत्यवाय येतो.
-----------------------------------------------
"कल्पनाशक्तीची व्यायामशाळा !":
मी whatsapp व फेसबुक हे सोशल मिडिया म्हणजे कल्पनाशक्ती व्रुद्धिंगत करणारी व्यायामशाळाच आहे, असं मानतो. त्यांत मी नवनवीन कल्पना विचार व दिशा मांडत असतो.
एखाद्या मातेला जसे आपले मुल, सर्वगुणसंपन्न आहे असेच वाटत असते, त्याप्रमाणे मलाही माझी ही कल्पनांची भरारी नेहमी प्रिय भासते....
# "बिचारी लाचारी":
स्वाभिमानाच्या राणा भीमदेवी थाटात, विरोधी वल्गना करत, लाचारी एकदा स्विकारली की, ती सुटता सुटत नाही.
आपल्या अकार्यक्षमतेची आपणच दिलेली ती कबुली असते. परिस्थितीवर धैर्याने मात करणं आपल्याला अशक्य असल्याची ती दवंडी असते.
लाचारांची जागा, नेहमीच घराबाहेर असते.
# जे सुधारणे आवश्यक व शक्यही आहे,
अशा मुद्दयांवर
"सोमि" मध्ये विधायक संदेश प्रदर्शित करणे, सार्वजनिक हिताचे द्रुष्टिने गरजेचं आहे.
# विभूतीपूजा व सरंजामशाही ही आपली पूर्वापार अटळ अढळ परंपरा (समस्या?) आहे.
राजकारण त्यात अपवाद अशक्यच !
# सार्वजनिक ठिकाणी बिनदिक्कतपणे धुम्रपान करणारे, आपल्या आनंदासाठी इतरांच्या आरोग्याची हानी कां करत रहातात?
कधी व कसे,
ते सुधारणार?
# निष्क्रियता व चालढकलीचे, दुष्परिणाम होतात. 'जेव्हांचं तेव्हा,
ज्याचं त्याला,
जिथली गोष्ट जिथल्या तिथे.'
हा मंत्र नेहमी उत्तम!
# "आज हरलो, पण उद्या जिंकणार नाही कशावरून?"
ह्या जाहिरातीच्या धर्तीवर,
"काल हरलो,
पण आज जिंकणार नाही कशावरून?"
# "घराणेशाही होती, आहे आणि रहाणारच आहे.
अगदी
'घराणेशाहीला नाकं मुरवडणार्यांकडे'ही!"
# ह्रदयी धरा, हा बोध खरा!":
"'मूर्ती' लहान, पण 'कीर्ती' महान": मौलिक विचार!
# "काही मिळवण्यासाठी, काही द्यायलाच लागते,
मात्र,
काही न देताच, मिळतो,
तो फक्त जन्म!"
# आपल्यामुळे दुसर्याचे जरी भले करता आले नाही, तरी इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही हे ध्यानात घ्या......
# मन हळवं असावं पण दुबळं नसावं...!
कारण
हळव्या मनास भावना कळतात तर
दुबळ्या मनास नेहमी वेदना छळतात...!*
धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
ह्या शिवाय
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट तसेच ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडून......
एकसे बढकर एक विडीओज् पहा.....
subscribe करा......
https://www.youtube.com/user/SDNatu
ही लिंंक तुमच्या whatsapp grps वर शेअरही करा.........

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा