"राहू व केतूच्या आगामी राश्यंतराचे दूरगामी परिणाम":
गेल्या वर्षी २३ मार्च'१९ रोजी राहू केतूचे राश्यंतर अनुक्रमे मिथून व धनु राशींमध्ये झाल्यानंतर आतापर्यंत अनेक संकटांच्या मालिकांना आपण सर्व तोंड देत आहोत. आता ह्या वर्षी १९ सप्टेंबर'२० रोजी राहू-केतू चे पुनश्च राश्यंतर होत आहे.१९ सप्टेंबर'२० रोजी राहू मिथूनेतून वक्री होत, व्रुषभ राशीत आणि केतू धनु राशीतून व्रुश्चिकेत प्रवेश करणार आहे. ही राहू केतूची स्थिती १६ मार्च २०२२ पर्यंत राहणार आहे. ह्या कालखंडातमध्ये राहू केतूच्या ह्या राश्यंतराचा एकंदर काय परिणाम आम्ही ह्या खास लेखात मांडत आहोत.
मात्र ह्या राहू केतू संक्रमणानंतर हे जग जवळ जवळ ठप्प करणारे कोरोना महासंकटात काय अनुकूल बदल होऊ शकेल ह्याचा अंदाज करायला हवा. मागील वर्षी जेव्हा राहू-केतू चे राश्यंतर झाले, तेव्हा पुढे काय होईल याची कल्पना कोरोनाचे महासंकट आल्यानंतरच आली. त्यानंतरच विविध ग्रह बदलांचा अभ्यास करून तर्क लावून या संकटाची मींमासा करण्यात आली. हे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणणे असा प्रकार होता. म्हणूनच तीच चूक पुन्हा होऊ नये, ह्यासाठी पुढील वर्षातील इतर ग्रह बदलांचाही विचार होणे आवश्यक आहे.
त्यानुसार आगामी वर्षात महत्वाच्या ह्या ग्रहस्थितीचा गांभीर्याने विचार व्हावा:
"परिणामकारक गुरुबदल":
गुरु 20 नोव्हेंबर 2020 मकरेत. नंतर गुरु 5 एप्रिल 2021 मध्ये कुंभ राशीत. त्यानंतर परत तो उलटा १४ सप्टेंबर 2021 मकरेत. नंतर 20 नोव्हेंबर 2021 कुंभेत.
ह्याचा अर्थ राहू केतू स्थित्यंतर १९ सप्टेंबर'२० ते गुरु मकरेत २० नोव्हेंबर'२० ला जाईपर्यंत गुरु राहूला षडाष्टकात व शनी केतूच्या पापकर्तरी योगांत अशी अनिष्ट स्थिती राहील. त्यामुळे सध्याच्या महामारीच्या महासंकटाची तीव्रता ह्या काळात अधिक चिंता वाढविणारी ठरेल की काय, त्याचा ज्योतिष अभ्यासकांनी सखोल विचार करावा.
२० नोव्हेंबर'२० रोजी गुरू मकरेत गेल्यानंतर ३ जानेवारी'२१ हा कालखंड आशादायी मार्ग दाखवू शकेल. ह्याच काळात बहुधा चातकासारखी जिची वाट पाहिली जात होती, ती कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होऊ शकेल. तसे खरोखरच घडले तर चांगलेच. कारण त्यानंतर सर्व महत्वाचे ग्रह राहू केतुच्या अर्धवर्तुळाच्या एका बाजूला येणार असल्याने कालसर्प हा अनिष्ट कुयोग होणार आहे.
"कालसर्पयोग":
3 जानेवारी 2021 ला शुक्र धनुमध्ये प्रवेश केल्यावर निर्माण होणारीकालसर्पयोग सदृश्य परिस्थिती ही १३ एप्रिल 2021 ला मंगळ मिथूनेत जाईपर्यंत रहाणार आहे.
म्हणून वरील कालखंडात परिस्थिती अधिकाधिक बिकट बनू शकेल कां ह्याची चिकित्सा होणे गरजेचे आहे. Worst is Yet to come ह्याची प्रचिती कदाचित ह्या कालखंडात येऊ शकेल. कारण २०२० मधील कालसर्प योग कालखंडात महामारीच्या संकटाने उग्र रूप दाखवले होते.
त्यपुढील १३ एप्रिल'२१ ते १४ सप्टेंबर'२१ ह्या काळात गुरु कुंभेत असून शनी त्याच्या बाराव्या ह्या अनिष्ट स्थानी मकरेत व राहू केतू त्याच्या केंद्रयोगात रहाणार आहे. हा कालखंड देखील चढ उतारांचा विशेषतः अर्थव्यवस्था खालावू शकण्याचा असू शकतो. मकरेत गुरु १४ सप्टेंबरमध्ये गेल्यावर पुढील २० नोव्हेंबर'२१ हा काळ विसकटलेली घडी सावरता येण्याजोगा ठरेल.
मागच्या राहू केतूच्या स्थित्यंतरानंतर आलेल्या एकंदरच विविध संकटांना तोंड देत शेवटी सार्या जगाला जणु बंदिस्त करणारे कोरोना रुपी भस्मासूराने काय काय प्रताप दाखविले त्याचा अनुभव आपण सारेच घेत आलो आहोत. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने म्हणूनच आगामी वर्षात राहू केतूच्या 19 सप्टेंबर 20 रोजीच्या स्थित्यंतर आनंतर होणाऱ्या विविध ग्रहस्थिती नुसार आम्ही काळाची योग्य ती विभागणी अभ्यासून या लेखात करण्याचा प्रयत्न केला आहे.
आमचे एकंदर निरीक्षण कदाचित योग्य ठरू शकेल किंवा त्यामध्ये काही बदल होऊ शकतात. इथे कुणालाही घाबरवण्याचा हेतू नाही. वस्तुस्थितीनुसार ज्योतिषाच्या आधारे अभ्यास केल्यानंतर कदाचित काय काय संभाव्य असू शकेल, याचा फक्त एक छोटासा मार्ग आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
ह्या लेखात आम्ही सर्वांगीण परिणामांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यासूंनी त्यावर अधिक सखोल विचार करून आपले मत बनवावे. सर्वसाधारण वाचकांनी ह्या निरीक्षणांकडे, एक दिशादर्शक अशा दृष्टीने बघून आपले प्रयत्न आणि अपेक्षा ह्यांची समन्वयता साधावी.
त्यातून जर हे महान संकट लवकरच दूर झाले तर चांगलेच, एवढे आम्ही सध्या म्हणू शकतो. थोडक्यात सर्वच ज्योतिषाने ह्या दृष्टीने राहू-केतू स्थित्यंतर आणि इतर महत्त्वाच्या ग्रहांची स्थिती यांचा अभ्यास करून त्याप्रमाणे मार्गदर्शक विचार मांडावेत असे आम्ही शेवटी सुचवितो.
ह्या पुढील लेखात आम्ही राहूकेतूच्या १९सप्टेंबर'२० मधील राश्यंतराच्या राशीनिहाय परिणामांची मीमांसा करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
१ मी वैयक्तिक ज्योतिष सल्ला वयोमान झाल्यामुळे बंद केले आहे, ह्याची नोंद घ्यावी.
२ my you tube channel
moonsun grandson
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........
moonsun grandson Channel link:
https://www.youtube.com/user/SDNatu
moonsun grandson
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........
moonsun grandson Channel link:
https://www.youtube.com/user/SDNatu
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा