"ह्रदयसंवाद-२५": आयुष्याचा जमाखर्च":
# "आयुष्याचा जमाखर्च°:
-------------------
आयुष्यात जशी यशाची, प्रगतीची, असामान्य कर्तृत्वाची समाधान देणारी, अभिमानाने मान ताठ करणारी शिखरे-'Victory Points' असतात, तशीच केलेल्या चुकांची, फसलेल्या प्रयत्नांची वा निर्णयांची, अवहेलनांची, शरमेने मान ख़ाली घालायला लावणार्या वागण्याची आणि जीवघेण्या प्रसंगांची, पराभवांची खोल विवरेही असतात. जीवनाचा जमाखर्च वा हिशोब अशी शिखरे व विवरेच ठरवतात.
कालचचक्राच्या ओघांत आपल्या जीवनाला वळणे देण्याची किमया तीच करतात. 'हे' असे घडले वा घडले नसते तर', अशासारखी प्रश्नचिन्हे त्यामुळेच उभी होत रहातात. अधून मधून आपण प्रत्येकाने आपल्या अशा शिखरांचा व विवरांचा लेखाजोखा मांडावा आणि नीरक्षीर विवेकाने काय बरोबर, काय चूक; काय योग्य, काय अयोग्य ह्याचा मनाशी निवाडा करावा. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो, हे कधीही विसरू नये.
---------------------------
# "सोशल मिडीयाचा लेखाजोखा":
"फेसबुक, वाँटस् अँप इ.इ. सोशल मिडीया जेव्हा नव्हता, तेव्हा सारं लिमिटेड होतं तेच बरं होतं आणि आपले आयुष्य खूप सुखी होते. पण आता "सोमि"मुळे, सगळंच अनलिमिटेड झालंय.... आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालंय", हे असं म्हणणं कितपत रास्त आहे?
शेवटी लाईफही लिमिटेड आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणूनच, सोशल मिडीयाचे असे दोष केवळ अल्पसंतुष्टता दर्शवितात. जाणीवांचे, सार्या भवतालाचे, ज्ञानाचे अन् बहुत जनांच्या तितक्याच अनेकविध अनुभवांचे, कर्तृत्वाचे विशाल विश्व आपल्यासमोर एका क्लिकने उलगडते. हा विश्वरूप दर्शनाचा आविष्कार असा अव्हेरण्यात काय अर्थ आहे?
---------------------------
# राजकारण हया शब्दांतच तयाचा मतिता़र्थ वा प्रयोजन दडलेले आहे. राज्य करणयासाठी अर्थातं सत्ता मिळविण्यासाठी करावयाचे कोणतेही,कसेही प्रयत्न महणजेच राजकारण होय असे प्रयत्न अनेकविध असतात: भावनिक आवाहनाचा, विकासाची स्वप्ने दाखवून, विविध आश्वासने देवून, विरोधी गटांवर टीकांची झोड उठवून सत्ता काबीज करण्याचे डाव खेळले जातात. सत्ता कुणाला नको असते? कारण सत्ता म्हणजेच इतरानी काय करावे वा काय करू नये, हे ठरविण्याची निर्णयशक्ती मिळविणे असते, आपण ठरवू ते आणि तेच बरोबर हे सर्वांना सांगण्याचा अधिकार!
-------------------------
# लोकशाहीत एकदा कां कसेही करून बहुमत मिळविणे, हाच सत्ता देणारा मार्ग असतो. मताधिकार न बजावणार्यांचे प्रमाण पाहिले, तर मिळविलेले बहुमत खर्या अर्थाने किती फसवे असते, ते ध्यानांत येईल. ह्याच पार्श्वभूमीवर, व्यक्तिपूजेवर,घराणेशाहीवर आजवर चाललेली सारी व्यवस्था सर्व सामान्याना अपेक्षित फले देण्यास अपुरी वा असमर्थ ठरलेली दिसत आहे.
दुसरे असे की सत्ता ही लोकहितापेक्षा, आपलेच हित व भरभराट कशी करू शकेल, असेच विचार व कृती करणारी मंडळीच राजकारणांत अधिक प्रमाणांत दिसतात, तसेच शिरतात. स्वातंत्र्य मिळविण्याच्या एकमेव ध्येयाने प्रेरीत होवून, स्वार्थ सोडून सर्वस्वाचा त्याग करणारी माणसे कुठे आणि आजचे बहुसंख्य राजकारणी कुठे! कर्तव्यापेक्षा आपलेच हक्क व फ़ायदे हयांना प्रधान समजणारी माणसेच जर कारभार करत असतील, तर जनतेला अपेक्षित असणारी कामे कशी होणार? सर्वांगीण विकास कसा केंवहा साधला जाणार?
-------------------------
# जोपर्यंत घराणेशाही नाहीशी होवून, केवळ गुणवत्ता नैतिकता आणि कार्यक्षमता हयाच निकषांवर व्यक्तींची निवड केली जात नाही; त्याच बरोबर विशिष्ट ध्येये,धोरणे,विचार प्रणाली ह्या व ह्याच पक्षांचा गाभा ठरत नाहीत; मतदानाची टक्केवारी वाढत नाही, तोपर्यंत सत्तेचा आजवरचा हा भूलभूलैया सर्व सामान्यांना हितकारी ठरणे कठीण आहे.
-------------------------
# " मौलिक विचार:
# जीवनशैली, माणसापाशी असलेल्या ऐहिक साधन संपत्तीच्या मोजमापावरून, कधीही ठरवली जाऊ नये; तर ती त्याच्या विचार, वर्तुणुकीवरुन, सभोवतालच्या जगाकडे बघण्याच्या, त्याच्या द्रुष्टिकोनांतून आजमावली जाणेच इष्ट आहे.
जीवनामध्ये तीच माणसे खरीखुरी सुखी व समाधानी, ज्यांना आपल्याला आवडणार्या गोष्टी, निर्धोकपणे सातत्याने करावयाची संधी मिळते. त्यांत कलावंत व खेळाडू ह्यांचा अग्रक्रम असतो.
# लक्षात ठेवा:
''आजचा दिवस,
कालच्यापेक्षा चांगला होता,
असे उद्या वाटायला हवें.'
# चंगळवाद, (प्रामुख्याने, प्रगत देशांच्या फायद्यासाठी असणाऱ्या)
खुल्या अर्थव्यवस्थेनंतर सुरू झाला:
पैसा व उपभोगाचे
हे दुष्टचक्र!
---------------------------
# सत्ता शक्तिने,युक्तिने किंवा भक्तिने जशी मिलविता येतें त्याच प्रमाने बुद्धि,विचार वैभवाचे जोरावर आणि मते मिलवुन प्राप्त होतें. शक्तिने जी सत्ता येते तिच्यात बलजबरी असते,भक्तीच्या सत्तेमध्ये प्रेम,तर युक्तिने आलेली सत्ता फसवी ठरू शकते. ह्या उलट बुद्धि आणि विचार वैभवाची सत्ता आदराने चिरंतन होते. मते जरी सत्ता देतात, परंतु ती टीकविणे कठीण असते.
सत्तेचा माज चांगला नव्हे, त्याच्यामुळे केंव्हा होत्याचे नव्हते, होईल काही सांगता येत नाही. हा सत्तेचा खेळ घरीं, दारी आणि सर्वत्र नेहमी चाललेला दिसतो.
--------------------------
'कोंबडं कितीही झाकलं, तरी सूर्य ऊगवायचा थांबत नाही'. पदोपदी थापा व बाता मारून सत्य, कितीही लपवायचा प्रयत्न केला, तरी केव्हां ना केव्हा, सत्य सूर्यप्रकाशासारखे प्रत्यक्षात येतेच, येते.
तशीच, आपली (नसलेली) कुवत, कार्यक्षमता, छाती फुगवून, कितीही वाढवलेली दाखवली, तरी ती केव्हां, ना केव्हा, आपली जागा इतरांना दाखवतेच, दाखवते. अशा वेळी, अपेक्षित 'सुशासन' हे एक म्रुगजळच ठरते.
---------------------------
# "एका संसारी स्त्रीचे अध्यात्म"
संसारात राहून देखील परमार्थ साधता येतो.
जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांना द्यावे ही वृत्ती म्हणजेही परमार्थ.
शेजाऱ्यांना जेष्ठ दांपत्याला बँकेचे व्यवहार करण्यात मदत करणे, हाही परमार्थ..
आजारी हॉस्पिटलमधल्या रोग्याच्या सोबतीला राहणे....हाही परमार्थ..
"एका संसारी स्त्रीचे अध्यात्म:"
संसारात आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडणे हा परमार्थ.
विवेकसंपन्न रहाणे गरजेचे.
"एका संसारी स्त्रीचे अध्यात्म:"
मी माझे असे कधी करू नका.
अनाठायी आसक्ती सोडा.
स्वतःला इतरांच्या जागी समजून संयमाने वागा.
संत एकनाथांचा आदर्श ठेवा.
"एका संसारी स्त्रीचे अध्यात्म:"
ही लिंक उघडा व पहा.......
https://youtu.be/4-W_sYfi9E0
-------------------------
# "जीत्याची खोड" : 'कुणी कधीही कसे वागू नये', हे सांगणारी गोष्ट":
"इतरांच्या भावनांची पर्वा न करता इतरांना व स्वतःच्या पत्नीलाही जिव्हारी लागेल असे कायम वर्षानुवर्षे बोलणार्या बेमूर्वत माणसाच्या पत्नीचे हे भावचित्र.
"जीत्याची खोड" :
मेल्याशिवाय जात नाही.
स्वभावाला औषध नाही.
ही लिंक उघडा व पहा......
https://youtu.be/VaWlNZ5tRt8
----------------------------
# "सासूवास आणि सूनवास":
"व्यक्ती तितक्या प्रक्रुती, म्हणायचे दुसरं काय?"
ही लिंक उघडा.......
https://youtu.be/i0SKi_V1wfU
----------------------------
# माझा you tube channel
moonsun grandson
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........
moonsun grandson Channel link:
https://www.youtube.com/user/SDNatu
चँनेल subscribe करा..
-------------------------
# सध्या बाजार (की, बाजारू?) संस्कृतीची लाट आहे, सहाजिकच आपल्या उत्सवांमागून उत्सवांचे बाज़ारीकरण होत चालले आहे. त्यामधे मतलबी नेते आपली पोळी भाजून घेणे हिलाच जणु आपली संस्कृती समजत आहेत.
'आयजीच्या जीवावर बायजी उदार' असा हा खेळ आहे. अशा वेळी, सामान्य जनतेने 'नीर क्षीर' विवेकाचा मार्गच अंगिकारणे, हाच शहाणपणा आहे.
--------------------------
"सोशल मिडीयाचा लेखाजोखा":
"फेसबुक, वाँटस् अँप इ.इ. सोशल मिडीया जेव्हा नव्हता, तेव्हा सारं लिमिटेड होतं तेच बरं होतं आणि आपले आयुष्य खूप सुखी होते. पण आता "सोमि"मुळे, सगळंच अनलिमिटेड झालंय.... आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालंय", हे असं म्हणणं कितपत रास्त आहे?
शेवटी लाईफही लिमिटेड आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणूनच, सोशल मिडीयाचे असे दोष केवळ अल्पसंतुष्टता दर्शवितात. जाणीवांचे, सार्या भवतालाचे, ज्ञानाचे अन् बहुत जनांच्या तितक्याच अनेकविध अनुभवांचे, कर्तृत्वाचे विशाल विश्व आपल्यासमोर एका क्लिकने उलगडते. हा विश्वरूप दर्शनाचा आविष्कार असा अव्हेरण्यात काय अर्थ आहे?
---------------------------
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा