सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

"फोनचे धक्के!":

"फोनचे धक्के"!: ---------------------;;;---------;;;------- फोन आल्यावर समोरून कोण बोलत आहे हयाची खात्री न करता एकदम बोलत सुटणे किती चुकीचे व धोकादायक असते, त्याचा मी काही दिवसांपूर्वी एक अनुभव घेतला होता. त्याचे झाले असे : मला फ़ोन आला व आवाजावरून तो ओळखीचा वाटला आणि मी अघळपघळ बोलू लागलो. पण ती समोरची व्यक्ती अनोळखी निघाली आणि मला खजील व्हायला झाले. Sorry म्हणत मला तिची क्षमा मागावी लागली. तेव्हापासून फ़ोन आला की, प्रथम आपण आपले नांव सांगावे, नंतर आपण कोण बोलत आहात ते विचारावे, आपले काय काम आहे, वा आपण फोन कां केलात ते कृपया सांगता कां असे विचारावे, हाच धड़ा मला मिळाला! ह्याहीपेक्षा चमत्कारिक व क्लेशकारक अनुभव, जेव्हां आपण एखादा फोन पुष्कळ दिवसांनंतर आपल्याच कुणा परिचीताला करतो, तेंव्हा येऊ शकतो. सुमारे २५/३० वर्षांपूर्वीचा हा अनुभव आहे. तेंव्हा घरी फोन मिळण्यासाठी खूप प्रतिक्षा करावी लागे आणि एकदा कां तो फोन आला की, कुणाकुणाला फोन करूं असे होत असे. घरी नवीन फोन आल्याने, एकामागोमाग मी असेच फोन करत असताना, मला माझ्या बरोबर असलेल्या काॅलेजमधील एका मित्राची आठवण झाली. तिथे फोन लागल्यावर मी 'मि.+++ हे आहेत कां?' अशी विचारणा केली मात्र, तो फोन घेणार्या महिलेच्या रडण्याचाचा आवाज़ ऐकू येवू लागला. हुंदके देत ती म्हणाली "ते, माझे यजमान, काही दिवसांपूरवीच एका आॅपरेशनचे वेळी ते मरण पावले". हे ऐकताच माझा नवीन फोन घरी आल्याचा आनंद कुठल्या कुठे उडून गेला आणि मी जवळ जवळ कोसळलोच. दुसरा असाच विचित्र अनुभव दिवाळीच्या शुभेच्छा पाठविताना मला आला होता. नेहमी प्रमाणे अनेकांना मी तसे ई मेल पाठवले होते. प्रथेप्रमाणे त्यांची उलट शुभेच्छा देणारी उत्तरे येत होती. पुष्कळ दिवस झाले तरी एका जेष्ठ परिचिताकडून काहीच उत्तर न आल्याने मी चिंतेत होतो. थोड्या दिवसांनंतर त्यांच्या मुलाचा मला मेल आला आणि मला अक्षरशः धक्काच बसला: त्या जेष्ठाच्या पत्नीचे नुकतेच एका भीषण अपघातांत निधन झाले होते. त्यामुळे मला इतके दिवस मला पोच दिली गेली नवहती; वाटले, आपण आनंदात, तर ज्यांच्याकडे आपण तो व्यक्त करू पहातो, तो अशा दु:खांत असताना त्यांना काय यातना, कळत न कळत आपण दिल्या. तिसरा अनुभव ह्याहूनही अधिक भयानक होता. असाच पुष्कळ वर्षानी मी एका शहरात कामासाठी गेलो होतो. कामे आटोपून सायंकाळी त्या शहरातील ओळखीच्या मंडळींशी बोलायचे मी ठरवले आणि अचानक मला मि@@@ हयांची आठवण झाली, हे महाशय काही वर्षांपूवीॅ आमच्याच शहरात आमच्या परिसरांत रहात होते, एक खेळकर, हौशी व सर्वांना आपलेसे वाटणारे कर्तबगार व्यक्ति होतें. आमचे शहर सोडून त्यांना त्या शहरात येवून बहुधा पुष्कळ वर्षें झाली होती. त्यांची विचारपूस करावी, ह्या हेतूने मी त्यांचा फोन नंबर शोधला व तेथे फोन केला. फोनवर एका तरूणाचा आवाज़ ऐकू आला. पण मला जे ऐकायला मिळाले, ते भयंकर होते. तो तरूण त्यांचाच मुलगा होता. तो सागत होता "Sorry, मला सांगायला खूप दु:ख होते की माझे बाबा आता ह्या जगांत नाहीत, त्यांनी काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली" डोके बधीर करणारी, मन कुंठीत करणारी ती बातंमी होती. अशा समंजस, हुशार व हरहुन्नरी माणसाने आत्महत्या करावी, हा धक्का सहन न करता येणारा होता. मी करायला काय गेलो होतो आणि झाले होते हे असे भलतेच विपरीत व अतर्क्यच वास्तव हे कल्पनेपेक्षाही भयंकर व चमत्कारिक असते, हेच खरे! सुधाकर नातू ता.क. हा लेख कसा वाटला ते प्रतिसादात अवश्य सांगा. असेच वैविध्यपूर्ण अनुभवण्यासाठी. "१ रंगभूमी-रसिकांना आत्मानंद देणारा अपूर्व त्रिवेणी संगम".... २ "तुझे आहे तुजपाशी": जे आपल्याजवळ आहे त्यांत समाधान मानायला कां हवे ते चटका लावणारा विडीओ... ३ "आशावादी रहा, हेही दिवस जातील, ही खात्री बाळगा.".. ४ "सोशल मिडीयावरील सहभाग कशासाठी, कुणासाठी हा अट्टाहास?.... ५ "माणसं वाचायला शिका........ ६ "जीवनातील ताणतणाव घालविण्यासाठी एक व्यावहारिक गुरुमंत्र..... ७ "वैयक्तिक विकास आत्मप्रेरणेसाठी सुलभ मार्गदर्शन..... हे व असेच शंंभराहून अधिक एकसे बढकर एक विडीओज् पहाण्यासाठी....... माझा blog ची ही लिंक उघडा...संग्रही ठेवा.... www.moonsungrandson.blogspot.com माझा you tube channel moonsun grandson आजच उघडा... शेअरही करा........ <

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा