"आजोबांचा बटवा-१०":
"हे प्रणयगंध किती अनंत-४":
'मुखवटे आणि चेहेरे':
माणसाला स्वतःला विसरायला लावणारी ही प्रेमभावना. तिच्या विळख्यात प्रत्येकजण केव्हा ना केव्हा सापडत असतो हेच खरे. जगात आपण चाकोरीतून जाण्याकरता मुखवटे घालून नाटकी चेहर्यांनी वागत असतो. पण प्रत्येकाने मनाच्या आरशात डोकावले, तर कित्येकांना लक्षात येईल की अभिलाषेचे अनेक आवेगी तरंग वा कोमल स्नेहमय प्रेमभावनेचे अनेक रंग उधळत असलेले आढळतील. या साऱ्यांचे अर्थ तर्का पलीकडले आहेत, ते गवसता गवसत नाही इतकी ही आपुलकी आणि प्रेमभावना गहन आहे.
संसार अर्ध्यावर होऊन गेल्यावर केवळ विरंगुळा म्हणून शिकायला बाहेर जाणारी उषा, एका प्राध्यापकाचा प्रेमात पडते. तो सुमार रूप असलेला, किडकिडीत शरीरयष्टीचा विश्वास, तिच्याहून दहा वर्षांनी खरं म्हणजे लहान असतो. उषेच्या संपूर्ण समर्पणाच्या एकंदर वर्षावाखाली तो अक्षरशः गुदमरून जात, स्वतःला विसरून जातो. एवढं कशासाठी अभिसारिकेसारखे उषाचे असे वागणे? तिच्याकरता तो स्वतः लग्न न करता चाकोरीबाहेरच्या प्रेमात गुंतून आयुष्य भरकटवत रहातो? याला काय म्हणायचं?
खेड्यात राहून आपल्या मुलांचे भले होणार नाही, अशा विचाराने शिक्षक असलेल्या मनोहरला-आपल्या नवर्याला सोडून, शहरात दूरच्या परिचीताच्या-रघूच्या घरी, त्याच्या आधाराने उभे राहू पाहणारी रागिणी, सहवासात पोटी, त्या परिस्थितीचा गुलाम होऊन जाते. स्वतःच्या नवऱ्याबरोबरचे कधी तरी अधून मधून उपभोग घेणारे क्षण कसेबसे रंगवत राहते. तर दुसऱ्या बाजूला रघूच्या आपल्याबद्दलच्या त्यागामुळे, संपूर्ण मदतीमुळे तिची मुले खूप पुढे येतात. पण त्यांच्या अवैध संबंधांबद्दलचा विखार विसरू शकत नाहीत. शिवाय तिच्या नवऱ्याचा ह्यात काय दोष?
तिसरे उदाहरण, घरी सोन्यासारखी बायको सुस्वरूप सुशिक्षित आणि सुस्वभावी आणि तीन मुले असूनही, प्रौढ वयात, चंचलासारख्या मादक, उच्छ्रुंखल स्रीच्या आहारी जाणारा गणेश, कित्येक वेळा ऑफिसमध्ये न जाता सरळ तिच्या घरी जातो किंवा दौरा आहे सांगून तिच्याबरोबर इष्काची मौजमजा करून परत येत असतो. इथे गणेश स्वतःबरोबर स्वतःच्या बायकोला मुलांनाही फसवत असतो आणि चंचला देखील आपल्या नवऱ्याला.
ही आणि अशी अनेक उदाहरणे आपल्याला प्रेमाच्या गावा जावे तेव्हाच बघायला मिळतात. खरंच ही मदनबाणांची दुनिया अनोखी हेच खरे! माणसाला मन असते, तसेच वासनेच्या आहारी जाणारे शरीरही. मन हे जणू एखाद्या प्रलयकारी महासागरा सारखे असते. पण ह्या अशा जगावेगळी परस्पर आकर्षणाची ओढ कुणाला कुणाबाबतीत होऊन जाईल ते सांगणे कठीण असते.
असे रंगढंग पाहून वाटतंः
"हे प्रणयगंध किती अनंत.....
दोन जीवांचे मिलन ज्वँलंत,
अनंगरंगी हे अनंगरंग....
हे प्रणयगंध किती अनंत....."
सुधाकर नातू
ता.क.
(ही कथा 'रोहिणी' मासिक जून १९८३ च्या अंकात प्रकाशित)
इथपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, मी असेच वैशिष्ट्यपूर्ण लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्टला Share करायला विसरू नका.
असेच चित्ताकर्षक साहित्य आणि तसेच १५० हून अधिक वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:
http://moonsungrandson.blogspot.com
तसेच
अनोख्या नांवाचा माझा you tube चँनेल:
moonsun grandson
Subscribe करा....
त्याची ही लिंक उघडा....
https://youtu.be/45NFWw1_nLg
अनेक वैशिष्ट्यपूर्ण विडीओज् पहा
लिंकस् संग्रही जरूर ठेवून शेअरही करा.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा