बुधवार, २६ मार्च, २०२५
" मुक्तसंवाद !":
😀 "कल्पनांचे तराजू-1"::😀
या शीर्षकामुळे गोंधळून जाऊ नका. मनांतील कल्पना, तोलून मापून प्रत्यक्षात येणे, कितपत शक्य आहे हे उमंगण्यासाठी तराजू हा शब्द वापरला आहे. या नव्या उपक्रमामध्ये मला सुचणाऱ्या कल्पना मी मांडत जाणार आहे.
शुभारंभ असा:
ज्याला आपण ड्रेस कोड किंवा गणवेश अथवा युनिफॉर्म असं म्हणतो, तो आपल्याला जागोजागी सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणाऱ्या मंडळींच्या रूपाने दिसतो. जसे परिवहनामधल्या चालक, वाहक किंवा निरीक्षक, संरक्षण विभागात लष्करी अधिकारी आणि जवान सिक्युरिटी गार्ड्स अशांच्या अनेक गणवेशांचे आपल्याला दर्शन पदोपदी घडत असते. त्यामुळे कोणती व्यक्ती कोणत्या स्वरूपाचे काम आणि जबाबदारी पार पाडत आहे, याचा अंदाज येतो.
याच कल्पनेला पुढे नेऊन लोकसेवक अर्थात अगदी ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्यांचे सदस्य आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान एवढेच काय तर उपराष्ट्रपती, ते राष्ट्रपती अशा सगळ्या महोदयांना देखील योग्य तो गणवेश सार्वजनिक ठिकाणी वावरताना असावा, अशी ती कल्पना आहे !"
आपल्या प्रतिक्रिया माझ्या व्हाट्सअप पेजवर देऊ शकता.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
---------
: 😝 "फसवा फसवी !":😝
😄 "असं म्हटलं जातं की,
'दिसतं तसं नसतं'
आणि म्हणून जग फसतं !'
पुुस्तक वाचनासंबंधी माझा एक अनुभव इथे त्या संदर्भात मांडण्याचा मी प्रयत्न करतोय.
मी काही मोठा दर्दीवाचक नाही, पण वाचनाची मात्र मला जरूर आवड आहे. त्यामुळे वाचनालयातून पुस्तके आणणे व मासिके आणणे हा माझा अत्यावश्यक ऑक्सीजन आहे. सर्वसाधारणपणे मला व्यक्तीचित्रे वा आत्मचरित्रे वाचायला आवडतात. कथा मला बिलकुल आवडत वा पटत नाहीत. कारण जे सांगायचं ते खरं म्हणजे एका पानात संपू शकत असतं, तेच उगाचच लांबत नेलं जातं आणि पाच दहा पानं उगाचच आपल्याला वाचायला लागतात, असं माझं मत आहे. साहजिकच माझ्या वाचनाच्या मर्यादा आहेत हे मी मान्य करतो.
आता मुद्द्यावरच येतो. वाचनालयात गेल्यावर मी पुस्तके शोधताना नेहमी व्यक्तीचित्रे आत्मचरित्र आहेत ना याची खात्री करूनच पुस्तक घरी नेत असतो. पण परवा मोठी गंमत झाली आणि आजचा जो विषय 'फसवा फसवी' चा त्याचा सुखद अनुभव आला.
शिरीष कणेकरांचे
'एकला बोलो रे' हे पुस्तक निवडण्यासाठी मी हाती घेतले आणि अनुक्रमणिका पाहायला गेलो तर तिथे अनुक्रमणिकाच नव्हती. पण त्यांच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकांची यादी होती.
साहजिकच मी पुस्तकातील धडेच म्हणतो (प्रकरणे म्हणत नाही) पहायला सुरुवात केली आणि मला फक्त धड्यांचे क्रमांक दिसले आणि बरोबर त्या त्या धड्याच्या क्रमांकांवर वेगवेगळ्या व्यक्तींची रेखाचित्रे दिसली. सुरुवातच मुळी माधव मनोहर, व पु काळे, राजेश खन्ना ऋषी कपूर एवढेच काय, जयवंत दळवी यांची रेखाचित्रे पाहून मला वाटले हे त्या त्या व्यक्तीच्या संदर्भातील जसे कणेकरांना अनुभव आले तसे असेल.
साहजिकच मी ते पुस्तक वाचायला घरी आणले आणि वाचायला लागलो तर लक्षात आले की, हाती घेतलेले हे पुस्तक त्यांच्या 'फिल्लंबाजी' 'फटकेबाजी' 'कणेकरी' अशा एकपात्री अर्थात 'एकला बोलो रे' या नावाला समर्पक असे त्यांचे त्या कार्यक्रमासमोर संदर्भीचे विविध बरे वाईट, चमत्कारिक आणि कधी कोपरखळ्या मारणारे अनुभव उलगडलेले होते.
माझा कल्पनेप्रमाणे हे व्यक्तीचित्रात्मक पुस्तक नव्हते तर कणेकरांच्या नेहमीच्या खेळकर (की खोडकर ?) भाषेतील लघुनिबंध होते. अर्थात पुस्तक तितकेच वाचनीय होते आणि मी दोन-तीन दिवसात ते वाचून पूर्णही केले.
'दिसते तसे नसते',
'तरी जग फसतेच असे नाही !' असेच आता शेवटी मला म्हणणे भाग आहे !":😄
----------
" नॅशनल लायब्ररी बांद्रा- मुंबईच्या साहित्यिक कला आणि सांस्कृतिक प्रगतीची साक्षीदार !":
"अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानविज्ञानाच्या, जाणिवांच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या अशा
वाचनालयासारख्या 'पाणपोया' गल्लोगल्ली, गावोगावी असायला हव्यात. वाचनसंस्कृती वाढत, माणसांची सांस्कृतिक भूक भागवली जाऊ लागणे गरजेचे आहे. सशक्त समाजाचे ते एक व्यवस्थित लक्षण आहे.
दुर्दैवाने आज तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आणि जीवघेण्या स्पर्धांमुळे
वाचनसंस्कृती लयाला जात आहे, हे आपणा सर्वांचे दुर्दैवच ! अशावेळी नॅशनल लायब्ररीसारख्या 75 वर्षाहून अधिक कार्यरत राहणाऱ्या संस्थांचे आपण कौतुक केले पाहिजे.":
---------
😄 "नाट्यसंपदेचे प्रख्यात निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते प्रभाकर पणशीकर यांच्या "आठवणीतील मोती" या मर्मस्पर्शी आणि मनोरंजक पुस्तकाचा रसास्वाद वाचण्यासाठी पुढील लिंक उघडा....😄
https://moonsungrandson.blogspot.com/2025/03/blog-post_14.html
"मल्लीनाथी !":
😭 " मल्लिनाथी !":😭
😭 "कायदा आणि सुव्यवस्था यांचा संपुर्ण बोजवारा उडालेला महाराष्ट्र मध्ये उघड उघड दिसत आहे. गेंड्याची कातडी पांघरलेले निगरगट्ट राजकारणी त्यांच्या
सत्तालोलुपतेपोटी, काय भयावह आदर्श समाजापुढे ठेवताय ते उघड दिसते आहे. अक्षम्य विलंबाने न्याय मिळणे हेही एक अत्यंत महत्त्वाचे कारण सध्याच्या दुरावस्थेसाठी आहे. कालचा मंगळवार हा महाराष्ट्राच्या इतिहासात काळाकुट्ट अंध:कार करणारा मंगळवार म्हणावा लागेल.
एका दिवशीच वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या मन विषण्ण करणाऱ्या वृत्तांची ही मालिका पुढे सादर करताना एवढेच म्हणावेसे वाटते 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ?':😇
----------
मल्लिनाथी
https://youtu.be/dJwIw6InRMg?si=VU9_1Px4LER4UynS
// ही योजना लागू करताना कुठलीही तपासणी न करता पैसे वाटण्यात आले. निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी ही जणु एक प्रकारची आमीष देण्याचाच प्रकार नव्हे कां? आणि हा चालूवून घेऊन कुठला आदर्श निर्माण केला गेला याचा विचार करायला हवा. 'आयजीच्या जीवावर बायजी उदार !" अशा तऱ्हेचा हा प्रकार केवळ निवडणुका समोर ठेवून करण्यात आला, हे दुर्दैव. शिवाय निवडणूक आयोगाने 'ध्रुतराष्ट्रा'सारखी या योजनेकडे कानाडोळा केला, हे वेगळेच.
अपात्र ठरणाऱ्या प्रत्येक महिलेकडून दिले गेलेले, पैसे परत घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. कारण ते पैसे जनतेचे आहेत. पण तसे करणार नाही अशा घोषणा नेतेमंडळीच करत आहेत. कुठे चाललो आपण ! कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ?
------------------@
मल्लिनाथी
"गुन्हेगारी इतकी वाढण्याचे कारण महत्त्वाचे असे की अक्षम्य विलंबाने मिळणारा न्याय. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी जेव्हा हे सरकार निवडून सत्तेवर आले, त्यावेळेला किती खटले विविध कोर्टामध्ये प्रलंबित होते, याचा अभ्यास करून लवकरात लवकर म्हणजे ठराविक समयामध्ये निकाल लागलाच पाहिजे, यासाठी किती नवीन न्यायालये आणि किती नवीन न्यायाधीशांच्या नियुक्त केल्या हे तपासणे गरजेचे आहे. शिवाय यापुढे कोणताही खटला किती मर्यादेपर्यंत चालवून त्याचा निकाल दिलाच पाहिजे, असा कायदाही संसदेत कां मांंडला जात नाही ? याचे प्रमुख कारण म्हणजे राजकारण्यांनाच असे काही व्हायला नको आहे. सहा वर्षांची निवडणुकांपासून बाद, एवढीच मर्यादा शिक्षा झालेल्या लोकसेवकाला पुरेशी आहे, आजन्म बंदी नको असे तर या सरकारनेच नुकते मांडले आहे ! यावरून हे म्हणणे मान्य व्हावे.
सामान्य जनताला इथे कोणी वाली नाही. सत्तेच्या सौदागर यांचा हा खेळ असाच चालू राहणार आहे.
'मुकी बिचारी मेंढरे, कशीही हाका" अशी सारी परिस्थिती आहे.
"मल्लीनाथी !":
वीज प्रवाह खंडित होण्याचे आपले त्रासदायक अनुभव हेच सांगतात की 'बैल गेला झोपा केला !' 'तहान लागल्यावर विहीर खणा !' सदनिका विकत घेताना बहुतेक सर्वांनीच हा वीज खंडित झाल्यावर पर्यायी वीज पुरवठा असणारी यंत्रणा बिल्डर देतो आहे कां, तसेच स्ट्रेचर जाऊ शकणारी लिफ्ट देणार आहे कां? याचा विचार कोणीही केला नाही. त्यामुळे ही अशी वेळ आली, हे सत्य आता मान्यच करायला हवे. यापुढे आपण प्रत्येकाने आपल्या परिचय वर्तुळाला या महत्त्वाच्या विषयांवर अवगत करायला हवे, त्याचप्रमाणे महारेराने अशा तऱ्हेची सक्ती बिल्डरला मान्यता देताना करायला हवी अशी सुचना/मागणी हवी.
---------
"मल्लीनाथी- दिव्याखाली अंधार !":
" देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि विलक्षण गतीने विकास होत जगामध्ये पहिल्या पाच क्रमांकात आणि नंतर तिसऱ्या क्रमांकापर्यंत झेप घेण्याची दवंडी माध्यमांमध्ये अधून मधून बडवली जाते. पण वास्तव किती भयानक आणि चिंताजनक आहे त्याची प्रचिती देणारा हा फोटो खूप काही सांगून जातो.
मुंबईतील माहीम रेल्वे फाटकाजवळच्या स्कायवाॅक वरील 'नाही रे' वाल्यांचे संसार कसे लटकत आहेत त्याचे हे विदारक दृश्य चिंताजनकच आहे. एकीकडे 80 कोटी लोकांना जरुरीचे मोफत धान्य पुरवठा करावयाची वेळ आली असताना, आपण आपली अर्थव्यवस्था उत्तम आहे हे कसे म्हणू शकतो? मूठभर श्रीमंत आणि ढीगभर दैन्यामध्ये अशी परिस्थिती असताना, शिवाय श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत तर गरीब अधिकाधिक बिकट परिस्थितीत ढकलले जात आहेत, आपले नियोजन कुठेतरी चुकते आहे !
स्कायवाॅक सारखी सुविधा आणि तिचा हा कल्पनाही करू शकणार नाही असा उपयोग (?) काय सुचवतो:
' दिव्याखाली अंधार !':
ही लिंक उघडा
https://drive.google.com/file/d/1R8734rw1-to9RQKv9AEC4i1ECssAhalq/view?usp=drivesdk
"बोल अमोल-331 ते 342 !"::
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 331!":👌
💐 "आमची मराठी, अभिजात मराठी !":💐
👍"Intensity- जवळीक,
यामधील भावनिक असोशी जवळीक या शब्दातून अधिक प्रभावीपणे मांडली जाते.
Mevaric- अतरंगी, तीच कहाणी अतरंगी शब्दाची, त्यामधून माणसाचे जे व्यक्तिमत्त्व अभिप्रेत आहे ते सर्वंकषपणे प्रकट होते.
Plane- भवताल, येथे (परिप्रेक्ष हा शब्द अपमार्केट असू शकतो, पण) भवतालामुळे जो आसमंत नजरेसमोर येतो, तो अधिक पारदर्शक असतो, नाही कां?
म्हणूनच 'आमची मराठी अभिजात मराठी !'
त्याकरताच 'भाग्य आम्हाला लाभले बोलण्या मराठी' !!":👌
------------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 332 !":👌
💐 ";पैज लावायची तर स्वत: सोबतच लावा कारण जिंकला तर,स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल---आणि हरला तर स्वत:चाच अहंकार हराल--- ध्येय
दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका--!!
शुभ रविवार सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌷🌷🙏🏻🙏🏻🌷🌷
----------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 333 !":👌
💐 "पैज लावायची तर स्वत: सोबतच लावा कारण जिंकला तर,स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल---आणि हरला तर स्वत:चाच अहंकार हराल--- ध्येय
दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका--!!
शुभ रविवार सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌷🌷🙏🏻🙏🏻🌷🌷
-------#
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 334 !":👌
💐"स्वार्थासाठी जवळ आलेली माणसं काही क्षणात तुटतात, पण विघांरांनी
व प्रेमाने जुळलेली माणसं आयुष्यभर
सोबत असतात.
सुप्रभात,शुभ सकाळ,सुंदर दिवस
आनंदमय शुभेच्छा !"💐
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 336 ":👍
😄 "काल मराठी भाषा दिनी, 'माहेर' दिवाळी अंकातील श्रीमती मोनिका गजेंद्रगडकरांच्या वडिलांसंबंधीच्या-( विद्याधर पुंडलिक) लेखातून मला तीन अनोखे शब्द गवसले: शहाणीव, ( शहाणपण)
प्रातिभ रुप ( प्रतिभावान)
आणि शब्दस्पर्श !
आपली मराठी ही अभिजात भाषा कां आहे याचा त्यामुळे प्रत्यय आला !":😄
----------@
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 337 ":👍
"👍"Thought of the Day !":👌
'Learning is an exploration from darkness to Light, from the unknown to known, from unawareness to awareness; thus expanding your 'World', broadening your horizons.
Our five sense organs that enable us to see, to smell, to hear-listen, to feel and to think, are the tools for this learning process and also to our critical appreciation ability.
What one does, when he sees a scene, a picture, a film or a drama, or reads literature,or interacts with others, etc. he likes it or hates, or avoids it and differentiates between what's good and what's not.
Thus critical appraisal is an advance application of the unique 'Learning Process":
--------
बोल अमेल 339
👍"Thought of the Day !":👌
'Learning is an exploration from darkness to Light, from the unknown to known, from unawareness to awareness; thus expanding your 'World', broadening your horizons.
Our five sense organs that enable us to see, to smell, to hear-listen, to feel and to think, are the tools for this learning process and also to our critical appreciation ability.
What one does, when he sees a scene, a picture, a film or a drama, or reads literature,or interacts with others, etc. he likes it or hates, or avoids it and differentiates between what's good and what's not.
Thus critical appraisal is an advance application of the unique 'Learning Process":
----------
💐II मंगल प्रभात II💐
👍" बोल अमोल 339 !":👌
💐 "ज्ञान म्हणजे तुम्ही काय करु शकता याचे "भान" असणे---
आणि शहाणपण म्हणजे कधी काय करु नये याचे"ज्ञान " असणे.
दुसऱ्याच चांगल (भलं) करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज
नसते.तर फक्त मनात चांगली "भावना" असावी लागते----
शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !":💐
-------------------
💐II मंगल प्रभात II💐
👍" बोल अमोल 340 !":👌
💐 "ज्ञान म्हणजे तुम्ही काय करु शकता याचे "भान" असणे---
आणि शहाणपण म्हणजे कधी काय करु नये याचे"ज्ञान " असणे.
दुसऱ्याच चांगल (भलं) करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज
नसते.तर फक्त मनात चांगली "भावना" असावी लागते----
शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !":💐
--------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल-341 !":👍
💐 "आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे, आयुष्य एक कोडे आहे, सोडवाल तितके थोडे आहे !":
----------
💐II मंगल प्रभात II💐
👍" बोल अमोल 342 .!":👌
😄 "निखळ वास्तवाची जाणीव करून देणारं, अचूक उत्तर मिळविण्यासाठी,
अचूक प्रश्न विचारता येण्याची कला आवश्यक असते.":😄
"बोल अमोल 321 ते 330 !":
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-321 !":👌
😄 "रोजनिशी लिहीणे खरोखरच चांगले व कौतूकास्पद, परंतु सर्वांनाच ते सर्वकाळ साधता येतेच असे नाही. संकल्प करणेही असेच उत्तम व जरूरीचे, परंतु सर्वच संकल्प सिद्धीस नेणे, सर्वांनाच जमते असे नाही.
पण निराश होण्याचे कारण नाही, एक साधा, सोपा आणि सगळ्यांनाही सहज जमू शकेल असा मार्ग आहे. तो म्हणजे, दररोज सकाळी, दिवसाच्या प्रारंभीच, आपण काल कोणती, कोणती कामे पूर्ण केली, त्याची एक एक ओळीमध्ये नोंद करणे. गेलेला दिवस अर्थपूर्ण आणि समाधानकारक होता, किंवा कसे हे जसे त्यामुळे समजेल, तसेच त्या अनुषंगाने आजच्या दिवसाच्या प्रयत्नांना योग्य दिशाही मिळेल, वेळेचा दुरूपयोग टाळण्याचा मार्गही गवसेल.
मी अशी सोपी सवय जेव्हापासून सुरू केली आहे, तेव्हापासून, मला आजचा दिवस, कालच्यापेक्षा चांगला गेला, हे प्रत्येक उद्द्याला समजण्याची गुरूकिल्ली सापडली आहे!
विचार करा आणि तुम्हीही ही सुलभ संवय अवश्य अंगिकारा !":😄
------------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 326 !":👌
💐 " ओंकार हा विश्वातील पहिला स्वर !
त्यामधून निर्माण झालेलीआवाजाची दुनियाच न्यारी ! मानवाने मानवाला दिलेली सर्वोत्कृष्ट देणगी कुठली असेल तर ते म्हणजे गीत संगीत कसे ते समजण्यासाठी पुढील लिंक उघडा
https://drive.google.com/file/d/1hyXAhA9zBmqVKzqjQzBOr-X3vS-xwHDQ/view?usp=drivesdk
---------
💐II मंगल प्रभात II💐
👍" बोल अमोल 327 !":👌
😀 " जगात जे घडतं, त्यामागे काही ना काही कारण असतं. यासाठी कार्यकारण भाव प्रत्येक वेळेला शोधला पाहिजे. छातीत कफ होतो, त्याचं कारण या माणसाला रात्री दूध हळद पिताना फ्रीजमधून दूध काढल्यावर त्याच्यावरची साय खाण्याची सवय होती. दिवसेंदिवस या सवयीमुळे त्याला कफ झाला, हा शोध त्याला त्याने जेव्हा कार्यकारण भाव यावर विचार केला तेव्हा समजले. तसे करणे सोडून दिल्यावर त्याचा कफ हळूहळू कमी होत नाहीसाही झाला !
लक्षात ठेवा,काहीही आपोआप घडत नाही कारण शोधा उपाय करा !":😀
💐II मंगल प्रभात II💐
👍" बोल अमोल 328 !":👌
😀 " जगात जे घडतं, त्यामागे काही ना काही कारण असतं. यासाठी कार्यकारण भाव प्रत्येक वेळेला शोधला पाहिजे. छातीत कफ होतो, त्याचं कारण या माणसाला रात्री दूध हळद पिताना फ्रीजमधून दूध काढल्यावर त्याच्यावरची साय खाण्याची सवय होती. दिवसेंदिवस या सवयीमुळे त्याला कफ झाला, हा शोध त्याला त्याने जेव्हा कार्यकारण भाव यावर विचार केला तेव्हा समजले. तसे करणे सोडून दिल्यावर त्याचा कफ हळूहळू कमी होत नाहीसाही झाला !
लक्षात ठेवा,काहीही आपोआप घडत नाही कारण शोधा उपाय करा !":😀
-------------
[19/2, 8:08 PM] Sudhakar Natu: https://www.facebook.com/share/p/1Fu52PWuUz/
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 329!":👌
https://www.facebook.com/share/
p/15f7BhrQDi/
----------☆
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 330 !":👌
😀 "सोशल मिडीयावरील मुशाफिरी!"😀
https://www.facebook.com/share/p/1Fu52PWuUz/
"छाप (पड)लेले शब्द !":
" छाप पडलेले शब्द !":
" बिकट बदल पण घडेल तेच पसंत !":
In Nature 'Change is the only constant' असे म्हटले जाते खरे परंतु काही काही बदल इतके अवघड आणि बिकट असतात की त्यांच्याबरोबर जुळवून घेणे केवळ अशक्य असते. गेल्या काही दशकांमध्ये एकंदरच तंत्रज्ञान आणि इतर अनेक विकासाच्या घटना यामुळे सर्वच काही बदलून गेले आहे आणि त्यांच्याबरोबर जुळवून घेणे ही शक्य होत आहे. जीवनाला आवश्यक असा प्राणवायू अर्थात ऑक्सिजन लेवल कमी होणे आणि त्याबरोबर आपल्या आयुष्याची घडी जुळवून घेणे हे खरोखर अतिशय अवघड आणि त्रासदायक बदलाचे लक्षण होय. परंतु अशी परिस्थिती असतानाही या महिलेने पुरेसा ऑक्सिजन आपल्याला मिळत नसला तरी कसे जुळवून घेतले, ते या छोट्याशा लेखात उलगडले आहे. खरोखर त्यांच्या धीरोदात्तपणाचे व समंजसपणाचे कौतुक करावे !
आपल्यालाही जीवनामध्ये कुठलाही बदल जर घडला तर त्याबरोबर जुळवून घेण्याची प्रेरणा निश्चितच यामुळे मिळेल !":
-----------
[13/3, 9:44 AM] Sudhakar Natu: "छाप पडलेले शब्द !":
" आरोग्यम् धनसंपदा:
'मूत्रपिंडाचे महत्वपूर्ण कार्य !":
माणसाच्या शरीरामध्ये प्रत्येक अवयव महत्त्वाचा हे खरेच, परंतु अत्यंत जीवनावश्यक असे कार्य करणारे मेंदू हृदय, फुफ्फुस, यकृत याबरोबरच मूत्रपिंडाचे देखील तितकेच अत्यावश्यक असे कार्य शरीरामध्ये चाललेले असते. या महत्त्वाच्या अवयवाबद्दल सोबतच्या महाराष्ट्र टाइम्सच्या लेखामध्ये सविस्तर माहिती दिली आहे, ती सर्वांनी जरूर वाचावी !":
------------
"छाप पडलेले शब्द !": " वाचन माझा ध्यास, तर लेखन माझा श्वास !":
"योगायोग किती गमतीशीर असतात बघा: महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीमध्ये 'माझा ऑक्सिजन' या सदरामध्ये वरील लेख माझ्या नजरेत आला आणि मला समजून चुकले की, जे माझ्या मनात आहे तेच इथे तंतोतंत व्यक्त होत आहे !
स्मार्टफोन हाती आल्यापासून आणि मला तिथे काही ना काही लिहीणे जमायला लागल्यापासून उत्तरोत्तर गेल्या पाच सहा वर्षात माझी लेखनाची हौस पुरेपूर भागत आहे. त्यातून व्हॉइस टू टेक्स्ट या एप्लीकेशन मुळे तर या "हृदयीचे त्या हृदयी" करण्याचा माझा संकल्प सातत्याने मला पुरा करता येत आहे. आपण सारे रसिक वाचा ह्या आनंददायी वाटचालीचे साक्षीदार आहात. माझ्या लेखना बद्दल आपला जो काही प्रामाणिक स्पष्ट प्रतिसाद असेल तो मला जरूर 'व्हाट्सअप' वर आपण थेट देऊ शकता. 'निंदकाचे घर असावे शेजारी' या म्हणीप्रमाणे माझ्या लेखनात बदल करता येतील.
माणसाला जे जमते जे आवडते आणि ते त्याला जेव्हा सातत्याने करायला मिळते तेव्हा त्याला जणू एखादा सुखी माणसाचा सदरात गवसतो, असाच अनुभव मला या सगळ्या वाटचालीत येत आहे.
धन्यवाद.
?-----------
" छाप पडलेले शब्द !" :
" ये मुंबई है मेरी जान !!":
💐"जगाला जशी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत अमेरिका प्रिय व खुणावत असे, तशीच भारतवासीयांना आपली मुंबई ! स्पोर्ट्स मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट प्रथमच मुंबईमध्ये स्थापन करणाऱ्या निवृत्त क्रिकेटपटू श्री निलेश कुलकर्णी यांचा हा म. टा. पुरवणीमधील लेख, प्रत्येक मुंबईकराला अभिमानाने आनंदाश्रू ढाळायला लावणारा आहे हे निश्चित ! जगभर कोणीही कुठेही मुंबईकर जरी गेला तरी, 'ये मुंबई है मेरी जान !' असे म्हणत परत येणारच ! लेख वाचत वाचत जुन्या आठवणींना मनामध्ये चाळत, माझ्यासारखा मुंबईकर मनाशी अर्थातच म्हणतो की, आमचे भाग्य हे की आम्ही येथे मुंबईत वाढलो, सर्वांनाच नवनवीन संधी देणाऱ्या मुंबईत आमच्यातील गुणांना वेगाने वाढवत गेलो, प्रगती करत, कठीण काळातही फिनिक्स पक्षासारखी झेप घेण्याची उर्मी आम्हाला मुंबईनेच दिली !"💐
------------
👍 "छाप डलेले शब्द !":👍
💐"कर्तृत्ववान माणसांचे व मुंबईचे जीवाभावाचे नाते !":💐
😀 "सोबतच्या महाराष्ट्र टाइम्स पुरवणी मधील वृत्तात, आत्मसंवाद करणारे श्री सुहास पेडणेकर हे प्रथम रुईयाचे प्राचार्य आणि नंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते, एवढीच फक्त माहिती मला होती. पण मनमोकळ्या आणि पारदर्शक आत्मसंवादामुळे त्यांची कोकणातील खेड्यात असलेली शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी आणि तेथून मुंबईत येऊन त्यांनी स्वतःच्या गुणांवर व कष्टांवर कशी गरुड भरारी घेतली, हे समजून मन भरून आले !
गुणवत्ता त्या जोडीला जर जिद्दीने कष्ट घ्यायची तयारी असेल, तर ही मुंबापुरी तुम्हाला कोणतीही स्वप्न साकार करायची संधी देते हेच या साऱ्या निवेदनावरून उमजले. कुणालाही विलक्षण प्रेरणादायी वाटणारी ही कहाणी खरोखर कौतुकास्पदच !त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा.
जाता जाता, माझ्याही रुईया कॉलेज आणि त्याच्या परिसरातल्या आठवणी जाग्या झाल्या. कारण आम्ही सारी भावंडे रुईया कॉलेजचेच ! त्यातील मी तर जवळच असलेल्या किंग जॉर्ज हायस्कूलचा विद्यार्थी, जोडीला माझे वडील रुईया कॉलेजच्या स्थापनेपासून ते रजिस्टर होऊन निवृत्त होईपर्यंत रुहयामध्येच ! खरंच हे माटुंग्याचे रामनारायण रुईया कॉलेज आणि मुंबईत येऊन विविध क्षेत्रात कीर्तिमान होणाऱ्या व्यक्तींचे नाते खरंच जीवाभावाचे आहे!":😀
--?--------'
😇 "छाप पडलेले शब्द !":😇
😭 "अभिजात मराठीची दुरावस्था 😭
🤢 'मराठी शाळा बंद कां पडत आहेत' ?":🤢
" स्वरानंद 88 ते 92 !":
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-88!":👌
💐 " पुढील लिंक उघडून मधुर नाट्य गीते ऐका....
1 कर हा करी धरिला शुभांगी......
https://youtu.be/85v-ppnvUZA?si=cEKyU1VS41Sw1qxn
2 जयोस्तुते उषादेवते......
https://youtu.be/Py-AqUSFer8?si=qCf-mfa1TdQouMoJ
3 देवा घरचे ज्ञात कुणाला.....
https://youtu.be/Fh3skGvy8Xk?si=gou-iiPWe2e9ioJX
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
-------------
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-89 !":👌
💐 " जवळजवळ महिन्याभराने स्वरानंद हा उपक्रम पुन्हा प्रारंभ करत आहे. त्यासाठी निमित्तही यथोचित अशा मंगलमय निवडक प्रार्थनांच्या रूपाने येथे सादर करत आहे. माणसाच्या शरीराला आहार जसा पोषक, तसाच आत्म्याला प्रार्थना अत्यावश्यक !
पुढील लिंकस् उघडून त्या ऐका....
1 सर्वात्मका सर्वेश्वरा......
https://youtu.be/L36_XB7x3IU?si=K_8pI61X4rHGZEg2
2 करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.....
https://youtu.be/Wbv8wJagKEg?si=t1S9o8y_xKh9yebu
3 गगन सदन तेजोमय......
https://youtu.be/TiexOdP5ZzQ?si=OtN7HF-49EqmCU6V
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
---------
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-90 !":👌
💐 " गीत संगीताची स्वरबहार म्हणजे माणसाच्या आयुष्यातील जणू पारिजातकाच्या फुलांचा सडाच ! सुरेल संगीताचे, मधूर स्वराचे वरदान ज्यांना लाभते ते खरंच भाग्यवान !
बाकी तुम्हा आम्हा सारखे बाथरूम सिंगरच !
पुढील लिंकस् उघडून....
3 सुरेल गाणी ऐका.......
1 गाना आये ना आये गाना चाहिए...
https://youtu.be/90EKsdZ1rAs?si=RUFdSdXMBAK89Zfm
2 तू कहे अगर, जीवनभर .....
https://youtu.be/emuDkBWbibI?si=JwnYjqE8FxlgLzK3
3 झूम झूम कर नाचो आज....
https://youtu.be/Sln3l13aNIU?si=Te4gKO794fBU3b3_
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
-------👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-91!":👌
💐 "बोल शब्दातील 3
सुमधुर गीते, पुढील लिंकस् उघडून ऐका...
1 ना.बोले ना बोले रे.. ...
https://youtu.be/bMd_Ab7U8VU?si=41oisZ-Pb1ws1jH8
2 बोल रि कठपुतली डोरी .....
https://youtu.be/pRhZgkUlBoQ?si=dJUdNYfd7Y7QiNR8
3 बोले चुडिया बोले कंगना.....
https://youtu.be/pncfRaXjZlw?si=vRbi0-zbUSb7PJbo
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
----------
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-92 !":👌
💐 "बोल शब्दातील 3
वसंत देसाईंच्या संगीत दिग्दर्शनाची 3 सुमधुर गीते, पुढील लिंकस् उघडून ऐका...
1 " ऐ मालिक तेरे बंदे हम......
https://youtu.be/fFc9TMxRbQg?si=8s3xvyGjF2Z1KeGM
2 " तेरे सूर और मेरे गीत....
https://youtu.be/TiW-wm7jY58?si=N_m0mYtDKr-vKibw
3 " जीवन मे पिया तेरा साथ रहे......
https://youtu.be/Hekj4MgNRG4?si=MDcQC-8-GsvTVZjq
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
-----#-
"मल्लीनाथी !":
😭 "मल्लिनाथी-20 'जागते रहो !":😭
😇 "अडचणीतून संधी कशी निर्माण होते, त्याचा मला आज अनुभव आला. सर्वसाधारणपणे मी सकाळी फिरायला जाताना बरोबर पाण्याची बाटली आणि मोबाईल घेत असतो. परंतु आज तोच विसरला गेला. काही फिरल्यानंतर मी विसावा घेतो आणि त्या वेळेला मला जे सुचतं ते मी 'बोल अमोल' व 'मल्लीनाथी' रूपात निर्माण करून सादर करीत असतो.
आज आपण तसे करू शकणार नाही, कारण आपल्याजवळ मोबाईल नाही असे वाटले खरे, परंतु युक्ती सुचली बरोबर फिरणाऱ्या पत्नीचा मोबाईल मी थोडा वेळ मागितला, कट्ट्यावर बसलो आणि जे जसं सुचलं ते येथे सादर करत आहे.
सध्याची परिस्थिती ही तितकीशी उत्साहवर्धक नाही, असे विविध प्रकारच्या गुन्हेगारी चित्रांमधून दिसत आहे आणि त्याचेच प्रतिबिंब पुढील छोट्याशा व्हिडिओत आणि ध्वनीफितिमध्ये आढळून येईल.
वेळीच जागे व्हा नाहीतर पुढे अंध:कार आहे, अशीच दुर्दैवाने या वर्षाच्या सुरुवातीला वेळ आली आहे !":😇
------------
😇 "मल्लिनाथी- !":😇
😄 " आधार सुनेचा: शाब्बास सुनबाई !":😄
😭"हे स्वप्नरंजन नव्हे कां? विवाह झाल्यानंतर स्वतंत्र राहण्याची, फक्त राजा राणीचा संसार करण्याची अपेक्षा असणाऱ्या पुष्कळशा मुली वधु परीक्षेचा कांदेपोह्याच्या कार्यक्रमाला गेल्या असताना हळूच विचारतात, 'घरात 'वेस्ट पेपर बास्केट' आहेत कां?' इथे 'वेेस्ट पेपर बास्केट'? म्हणजे घरातील संभाव्य सासू सासरे व ज्येष्ठ व्यक्ती नाही कां ! वास्तवात अशी आदर्श सून पाहायला मिळणे कठीणच हेच खरे !":😭
------
😭 "मल्लिनाथी-21 !":😭
😇 "क्रिकेटचा अतिरेक थांबवा !":😇
"दरमहा रतीब घातल्यासारखे वेगवेगळ्या संघांबरोबर सामने ! खेळाडूंची दमछाक होईल, इतके त्यांंना खेळायला लावणे आणि क्रिकेटचा,
कोंबड्या झुंजवाव्या असा बाजार भरवणे,
कितपत योग्य आहे?
"अति तेथे माती !"
याकडे कोणी लक्ष देणार की,
नाही??
विचार करा
आणि....
तुमचे मत सांगा.....😀
-------------
💐II मंगल प्रभात II💐
👍"मल्लिनाथी !":👌
😀 "वाकडे, तिडके,
इकडे, तिकडे.
उघडे, बोडके,
इकडे, तिकडे.
थापाडे, खोटार्डे,
इकडे, तिकडे,
खादाडे, माजोर्डे,
इकडे, तिकडे.
सब घोडे, बाराटक्के,
इकडे, तिकडे चोहीकडे!!
करावी, कशी निवड?
कुणाला, आहे सवड!!":😀
-------------
😇 "मल्लिनाथी- टेलीरंजन !":😇
😭 # आता 'काहीही हं हं 'नाही,
तर
'इडियट बॉक्स'चे नांव
सार्थक करण्याची अहमहीका !":
# 'घरोघरी मातीच्या चुली'
' मुलगी पसंत आहे'
' नवीन जन्मेन मी'....
सारख्या पोरखेळ करत लांबत
जाणाऱ्या अनेक मालिका !
# 'लॉ ऑफ डिमिनिशिंंग रिटर्नस्'
आणि 'प्रॉडक्ट लाइफ सायकल'
प्रमाणे
प्रारंभ दमदार, पण नंतर सुमार
हे सिद्ध करणाऱे कार्यक्रम....
# रोज सगळीकडे त्याच त्याच,
कणभर बातम्या आणि मणभर जाहिराती. पुन्हा पुन्हा दाखवणाऱ्या वाहिन्या....
# प्रतिभा, कल्पकतेचा दुष्काळ...
अन्
निखळ करमणुकीचे मृगजळ !
# आता दर्शकांनी
कीव करावी,
की दया दाखवावी,
करमणुकीचा बाजार उठवणाऱ्यांची !":
#सहजजगत्या मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग जवळजवळ सगळ्याच समाज माध्यमांवर वाढत चालला आहे, हे दृश्य खरोखर चिंताजनक आहे. कारण त्यामुळे उपलब्ध तंत्रज्ञान आणि संसाधने यांचा इतका दुरुपयोग होत असताना समाजामध्ये नको ते आदर्श उभे रहात आहेत, याचा सगळ्यांनी गंभीर्याने विचार करायला हवा पण दुर्दैव हे की, याला आळा घालायला कोणालाच सध्या तरी शक्य नाही. अंध:कारमय वातावरणात, नीतिमत्ता हरवलेला गमावलेला समाज हे उद्याचे कदाचित वास्तव असेल असेच सध्या दिसते !":
शेवटी हेच खरे...
What goes up goes down !":😭
-------------
😇 "मल्लिनाथी- टेलीरंजन !":😇
😭 # आता 'काहीही हं हं 'नाही,
तर
'इडियट बॉक्स'चे नांव
सार्थक करण्याची अहमहीका !":
# 'घरोघरी मातीच्या चुली'
' मुलगी पसंत आहे'
' नवीन जन्मेन मी'....
सारख्या पोरखेळ करत लांबत
जाणाऱ्या अनेक मालिका !
# 'लॉ ऑफ डिमिनिशिंंग रिटर्नस्'
आणि 'प्रॉडक्ट लाइफ सायकल'
प्रमाणे
प्रारंभ दमदार, पण नंतर सुमार
हे सिद्ध करणाऱे कार्यक्रम....
# रोज सगळीकडे त्याच त्याच,
कणभर बातम्या आणि मणभर जाहिराती. पुन्हा पुन्हा दाखवणाऱ्या वाहिन्या....
# प्रतिभा, कल्पकतेचा दुष्काळ...
अन्
निखळ करमणुकीचे मृगजळ !
# आता दर्शकांनी
कीव करावी,
की दया दाखवावी,
करमणुकीचा बाजार उठवणाऱ्यांची !":😭
# सहजजगत्या मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग जवळजवळ सगळ्याच समाज माध्यमांवर वाढत चालला आहे हे दृश्य खरोखर चिंताजनक आहे कारण त्यामुळे उपलब्ध तंत्रज्ञान आणि संसाधने यांचा इतका दुरुपयोग होत असताना समाजामध्ये आदर्श हे भलतेच उभे राहत आहेत, याचा सगळ्यांनी विचार करायला हवा.
दुर्दैव हे की याला आळा घालायला कोणालाच सध्या तरी शक्य नाही. अंधकारमय भवितव्य, नीतिमत्ता हरवलेला गमावलेला समाज हे उद्याचे कदाचित वास्तव असेल, असेच सध्या दिसत आहे !
शेवटी....हेच खरे...
What goes up, goes down !
--------
बोल अमोल-314 ते 320A !":
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-314 !":👌
💐"मराठी रंगभूमी हे एक मराठी माणसाचे जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. रंगमंचावर नाटक सादर होणे आणि ते समोर असून पाहणे, हा त्याच्या अत्यंत आवडीचा विषय
आहे. आज मराठी रंगभूमीला दीडशे वर्ष होऊन गेली परंतु मराठी माणसाचे नाटकांवरील प्रेम तसूभर ही कमी झालेले नाही. या व्हिडिओमध्ये आठवणींना उजाळा देत रंगदर्शन घडवले आहे !"💐
ही लिंक उघडा...
https://youtu.be/BeVPDw94VrU?si=qktC4aDjF5JwuVyt
-----------------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-315 !":👌
😀 "नववर्षात जेन बिटाचे स्वागत !":😀
सालाबाद प्रमाणे मावळत्या 2024 वर्षाला समस्त जगाने उत्साहाने आनंदाचा जल्लोष करत निरोप दिला आणि 2025 या नववर्षाचे उत्स्फूर्त स्वागत केले गेले.
तंत्रज्ञानाच्या स्फोटामुळे अनेक नवनवे बदल आगामी दशकात घडणार आहेत आणि यापुढे जन्माला येणाऱ्या पिढीला जेन बीटा असे नांवही देण्यात आले आहे.
चंगळवादाचा तीन दशकापूर्वी उदय झाल्यापासून सातत्याने अशा तऱ्हेचे सामूहिक अत्यानंद बेदरकारपणे साजरे करण्याची प्रथा पडली आहे. म्हणूनच जाता जाता हे जाणवत जाते की,अशा तऱ्हेचे स्वागत दैदीप्यमान रोमहर्षक परंपरा असलेले आपण आपल्या नववर्षाचे म्हणजे गुढीपाडव्याचे करतो कां !":😇
---------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-317 !":👌
💐"माणसाला मिळालेले सर्वोच्च वरदान- वाणी !":
"ओंकार' त्यातून सारे विश्व निर्माण झाले असे म्हणतात. ओंकारातून वाणी आणि वाणी द्वारे शब्द, शब्दांमुळे परस्परसंबंध आणि ज्ञानाचे जाणिवांचे माहितीचे आदान प्रदान ! वाणी आणि शब्दब्रह्माची किमया
खरोखर अलौकिक असते !":💐
----------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-318 !":👌
💐 "समाधानाची सप्तपदी":💐
आज हे सात मंत्र देताना मला विलक्षण आनंद होत आहे:
१. डोके वापरा.
२. दृष्टी बदला.
३. जीभेला आवरा.
४. हाताने नेहमी देत रहा.
५. ह्रदयापासून प्रेम करा.
६. मन काबूत ठेवा.
७. पायाने चालत रहा !":💐
----------.
---------------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-316 !":👌
😀 "कसं जगायचं, असं की तसं?!":
शरीर हे एकमेवाद्वितीय साधन,
तर मन आश्चर्यकारक शक्ती; त्यांच्या समन्वयाने,
होतं जीवनाचं सोनं, वा माती!":😀
?--------
💐II मंगल प्रभात II💐
👍" बोल अमोल 318 !":👌
💐""संभवामी युगे युगे"!:
"आगळे वेगळे, हे सगळे"!!:
पुराणातले दशावतार आपल्याला माहीत आहेत आणि आपण ह्या संकल्पनेची तुलना, डार्विनच्या 'सजीवांच्या उत्क्रांती सिद्धांता'सारख्या अत्यंत महत्त्वाच्या व जगमान्य गोष्टीशी करू शकतो.
"संभवामि युगे युगे" हे सूत्र आपल्याला गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात. ह्याचाच अर्थ एका जन्मानंतर दुसरा जन्म शक्य आहे हे ध्वनित होते. पुनर्जन्मावर विश्वास ठेवावा, असे हे सारे आपले संचित आहे.
जर पुनर्जन्म असेल तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे जी व्यक्ती आपल्या आई-वडिलांच्या अगोदरच मृत्यू पावते, तिला पुनर्जन्म मिळण्यासाठी जेवढा वेळ लागेल, त्या तुलनेत ज्या व्यक्तीच्या आई-वडिलांचा मृत्यू तिच्या हयातीतच होतो, त्या व्यक्तीला
पुनर्जन्मासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा खूप जास्त असणार हे उघड आहे.
आपण येथे "डी एन ए" ह्या मूलभूत सूत्राची कामगिरी लक्षात ठेवली पाहिजे. कारण कुणीही त्याच आई-वडिलांच्या पदरी जन्माला येऊ शकणार, हे सत्य यामागे आहे. कदाचित म्हणूनच आपल्या परंपरेमध्ये स्त्रिया जन्मोजन्मी हाच पती लाभो असं तर म्हणत नसतील?
पुनर्जन्माची ही कथा
--------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-319 !":👌
जीवनात असे ही काही दिवस येतात,
माणसाला माणसापासुन लांब घेऊन
जातात …. पण जी माणसे लांब
असुनही आठवण काढतात,
त्यांनाच तर आपली खरी माणस
म्हणतात…!
🙏🏻शुभ सकाळ 🙏🏻
𝗚𝗼𝗼𝗗 𝗠𝗼𝗿𝗻𝗶𝗻𝗚
----------
बोल अमोल-320
किमयागार भाषा:
१ तीन वर्षे: तीन तेरा!
उपरोधिक, पण ठाम विधान.
आता, जर उद्गार चिन्हाऐवजी, प्रश्नचिन्ह येथे टाकले, तर....
२ तीन वर्षे: तीन तेरा?
हो अथवा नाही अशी शक्यता दर्शविणारे विधान.
३ तीन वर्षे: तीन तेरा, कां?
इथे फक्त स्वल्पविरामामुळे, होकारार्थी विधानाची संभाव्य कारणे अपेक्षित असलेले विधान.
शब्दांचे अर्थ, एक चिन्ह बदलू शकते.
'Our days are numbered.'
Myth: This is a statement meant for senior citizens.
Truth: This is a statement meant for One and All.
शब्दांचे अर्थ फसवे असतात, गर्भितार्थ पूर्ण वेगळाच असू शकतो.
------------
💐II (अ?)मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-320 A !":👌
😇 "यक्षप्रश्न !":😇
😭 "2019---ते------2024 आणि पुढेही...
"सुवर्णसंधी----------ते-------संकटांचा चक्रव्यूह?"
"असे काय केले गेले नाही म्हणून आणि काय केले गेले म्हणून, आताची अशी धायकुतीची वेळ महाराष्ट्रावर आली"?:😭
शनिवार, २२ मार्च, २०२५
"सोशल मीडियावरील मुसाफिरी-भाग 2 !";
सोशल मीडियावरील मुशाफिरी अनेक वेळा काही काही मनात ठेवण्याजोग्या भावणाऱ्या अशा संदेशांना सामोरे जाते त्यातीलच काही निवडक येथे उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत
*नवऱ्याची २१ कर्तव्ये*
*०१.* कुकरखालचा गॅस
तीन शिट्यांनंतर बंद करणे.
*०२.* उतू जाणाऱ्या दूधाखालचा गॅस
धावत जाऊन बंद करणे.
*०३.* डोअरबेल अटेंड करणे.
*०४.* उंचावरचा डबा काढून देणे.
*०५.* डब्याचं झाकण उघडून देणे.
*०६.* सॉसच्या बाटलीचं बुच
ओपनरने उघडून देणे
*०७.* घरात पाल, झुरळ इत्यादी डायनासोर्स पेक्षा भयंकर वन्य प्राणी मारुन घराबाहेर टाकणे.
*०८.* नविन गॅस सिलेंडर शेगडीला लावून देणे.
*०९.* सांगितलं तरंच मुलांना रागावणे, संभाळणे.
*१०.* पेपर आल्यावर लगेच न वाचणे, शब्दकोडं न सोडवणे.
*११.* बाहेर पडतंच आहात, तर
'ह्या खतरनाक वाक्यानंतर', दिलेल्या
यादीनुसार सर्व वस्तू आणणे.
*१२.* कपडे इस्त्रीला देणे, आणणे.
गिरणी वरुन दळण दळून आणने
*१३.* बिलं भरणे, बँक व्यवहार संभाळणे.
*१४.* महिन्याचं सामान मॉलमधून
आणतांना पिशव्या उचलणे, पेमेंट करणे.
*१५.* शॉपिंग करतांना मॉलमधे तासनतास, निरर्थक, न कंटाळता मागेमागे फिरणे,
इशारा होताच चपळाईने पेमेंट करणे.
*१६.* सासरचे पाहुणे येऊन जाईपर्यंत
घरात पडेल ते काम करणे,
शहाण्या मुलासारखं वागणे.
*१७.* घरातली प्लंबिंग, इलेक्ट्रिकची
छोटीमोठी कामं करणे.
*१८.* वारंवार जमिनीवर पडणारा रिमोट, जरासंधासारखा परत-परत जिवंत करणे (दुरुस्त करणे)
*१९.* घरचं वाहन असेल तर वाहनचालकाची भूमिका न कंटाळता पार पाडणे.
*२०.* वाहन नसेल तर भाड्याची गाडी ऑनलाईन बुक करणे, इत्यादी इत्यादी.
---------------
आणि.
*२१.* 'मलाच मेलीला घरातील
सर्व कामे करावी लागतात.
एकाची मदत होत नाही'
असे वाक्य ऐकून शांत बसणे.
अजून बरीच कर्तव्यनिष्ठ कामं बायकोची नवऱ्याला करावी लागतात.
*बिचारे नवरे......😃😃😃*
----------------------
शुक्रवार, २१ मार्च, २०२५
"छाप (पड)लेले शब्द-!": " माणसातले माणूसपण हरवत आहे कां?":
छाप (पड)लेले शब्द-!": " माणसातले माणूसपण हरवत आहे कां?":
आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधील श्री दिनकर गांगल यांचा लेख खरोखर सुसंस्कृत माणसाला विचार करायला लावणारा आहे. भौतिक विकास झाला, परंतु सांस्कृतिक वातावरण अक्षरशः भकास होत चालले आहे. कारण सगळीकडे ताण-तणाव चढाओढ आणि अधिकाधिकाची हाव यापायी कोणालाच आता सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावावी असे वाटत नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळे मोबाईल वरील डिजिटल माध्यमांमध्ये देखील टाइमपास सारखीच अवस्था आलेली आहे.
खरं म्हणजे विचार, संस्कृती आणि नैतिकता या साऱ्यांचाच दुष्काळ होत चाललेला दिसत आहे. तीन दशकापूर्वी बाजारूवृत्ती आल्यापासून पैसा हेच सर्वस्व झाले आहे आणि अक्षरशः समाज आपली संस्कृती हरवत चालला आहे की काय अशी भीती वाटते.
कुठल्याही छापील व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये बातम्या कसल्या येतात, तर त्या जास्तीत जास्त गुन्हेगारी भ्रष्टाचार घोटाळे अशा दुरावस्थे संबंधित अधिक असतात. हे खरंच दुर्दैव आहे आणि कुठेतरी थांबायला हवे. समाजामध्ये शांती समाधान आनंद निर्माण व्हायला हवा. आपला देश जगामध्ये आनंदी माणसांच्या गणनेत 118 वा आहे ही आजची बातमी तर मन व्यथीत करणारी आहे.
त्या निमित्ताने विचार मंथन व्हावे म्हणून 22 मार्चला ठाणे येथे जो कार्यक्रम होणार आहे तो खरोखर महत्त्वाचा आहे. अशा उपक्रमांना शुभेच्छा देता देता मला असे सुचवावेसे वाटते की अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा व्हिडिओ यु ट्यूब सारख्या डिजिटल माध्यमांवर प्रकाशित केला तर लाखो लोक त्याचा अनुभव घेऊ शकतील आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हायला मदत होईल.
सोबत चालले एक वाचा आणि अंतर्मुख होऊन जरूर विचार करा.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
सोमवार, १७ मार्च, २०२५
"चिंतन-मनन !":
😄 "नव्या वर्षाचे नवे संकेत !":
"चिंतन-मनन-1!":😄
💐"काहीही न करता निर्विकार, निर्विचार केवळ पाचही मिनिटे देखील माणूस स्वास्थ बसू शकत नाही. त्याला कुठल्या ना कुठल्यातरी व्यवधानात तन मन गुंतवावेसे वाटते, व्यग्र रहावेसे वाटते. हा कदाचित त्याचा नैसर्गिक स्वभावधर्म असावा.
खरं म्हणजे जगाच्या, त्या पलीकडे जाऊन विश्वाच्या अफाट अनंत फापटपसार्या पुढे, तुम्ही काही केले नाही किंवा केले तरी काहीही फरक पडत नसतो. सातत्याने काही ना काही साध्य करण्याचे, मिळविण्याचे माणसाचे जे प्रयत्न सातत्याने चाललेले असतात, त्याची खरं काय गरज ?
मनाला जर शांती सुुख समाधान हवं असेल, तर निर्विकार निर्विचार राहायला शिकणं ही आजची नितांत गरज आहे. पूर्वी तपस्वी म्हणूनच एका पायावर उभे राहून कित्येक दिवसच नव्हे तर वर्षानं वर्ष कशी एकाग्रता राखत तपश्चर्या करत असतील याचे नवल वाटते. आज तशा तऱ्हेचा क्रांतिकारी बदल दिवसातून निदान एकदा तरी माणसाने साधायला हवा !":💐
------------------
😀 "कल्पनांचे तराजू-1"::😀
या शीर्षकामुळे गोंधळून जाऊ नका. मनांतील कल्पना, तोलून मापून प्रत्यक्षात येणे, कितपत शक्य आहे हे उमंगण्यासाठी तराजू हा शब्द वापरला आहे. या नव्या उपक्रमामध्ये मला सुचणाऱ्या कल्पना मी मांडत जाणार आहे.
शुभारंभ असा:
ज्याला आपण ड्रेस कोड किंवा गणवेश अथवा युनिफॉर्म असं म्हणतो, तो आपल्याला जागोजागी सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणाऱ्या मंडळींच्या रूपाने दिसतो. जसे परिवहनामधल्या चालक, वाहक किंवा निरीक्षक, संरक्षण विभागात लष्करी अधिकारी आणि जवान सिक्युरिटी गार्ड्स अशांच्या अनेक गणवेशांचे आपल्याला दर्शन पदोपदी घडत असते. त्यामुळे कोणती व्यक्ती कोणत्या स्वरूपाचे काम आणि जबाबदारी पार पाडत आहे, याचा अंदाज येतो.
याच कल्पनेला पुढे नेऊन लोकसेवक अर्थात अगदी ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्यांचे सदस्य आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान एवढेच काय तर उपराष्ट्रपती, ते राष्ट्रपती अशा सगळ्या महोदयांना देखील योग्य तो गणवेश सार्वजनिक ठिकाणी वावरताना असावा, अशी ती कल्पना आहे !"
आपल्या प्रतिक्रिया माझ्या व्हाट्सअप पेजवर देऊ शकता.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू---------
-----------------------
/🌹🌹माझ्या एका मित्राने 1970 सालातील डेक्कन परिसरातील एक सुंदर छोटी फिल्म मी पाहीली. एकदम 55 वर्षांपूर्वीच्या काळात आपण कधी जातो कळत पण नाही.🌹🌹
मला वाटून गेले...
🤕 " अहा, ते सुंदर दिन हरपले !":🤕
🤢 " आज अविश्वसनीय वाटावा असाच हा सारा मनभावन नजारा आहे. त्यावेळचे पुणे आणि त्या वेळच्या पुण्यातला माहोल व वावरणारी माणसे खरंच किती शांत शीतल आणि ध्वनी प्रदूषण/हवेचे प्रदूषणाच्या विरहित असे चढाओढ नसलेले ताण-तणाव कमी असलेले जीवन जगत होती !
आज 55 वर्षानंतर हे सारे पाहताना कुठे होतो आणि कुठे आलो असे वाटू शकते. तंत्रज्ञान वेगाने वाढले, भौतिक विकास कमालीच्या वेगाने होत आहे. परंतु माणसांच्या जीवनातील समाधानाचे, आनंदाचे काय? त्या वेळेला जर हल्ली जगातल्या समाधानी, आनंदी देशांचे सर्वेक्षण केले जाते तसे केले गेले असते, तर आजच्यासारखा 118 वा नंबर नक्कीच आला नसता. उलट कदाचित आपण पहिल्या 10त असतो असे वाटूून गेले.
"अहा, ते सुंदर दिन हरपले !,
भुलल्या त्या साऱ्या आठवणी !!"🤢👍"कालच्या महिलादिनाच्या निमित्ताने....
खास आठवणीतील भेट.....👌💐
"हा खेळ सावल्यांचा !":
"प्रेरणादायी दिशादर्शक 'आनंदी गोपाळ'":
"आनंदी गोपाळ" हा चित्रपट बघितला. पाल्हाळ न लावता, पहिलाच मुद्दा सांगतो की, हा चित्रपट इतका सर्वांगसुंदर आहे की, तो भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात यावा.
"त्या" वेळची माणसं, आणि "त्या" वेळचे वातावरण, तसेच कर्मठ समाजाची परंपरागत मनोधारणा, अशा माहोलात गोपाळराव जोशींसारख्या एका विक्षिप्त म्हणवल्या जाणाऱ्या माणसाने, स्त्रियांच्या परावलंबित्वातून निर्माण झालेल्या अगतिकतेवर उपाय म्हणून, आपल्या बायकोला काहीही करून सुशिक्षित करावयाचे हा घेतलेला अट्टाहास, पाहिलेले ते स्वप्न, हा खरोखर जगावेगळा वेडेपणा होता. कारणपरत्वे आपले मूल योग्य तर्हेची लक्षणांची जाणीव, व सत्वर उपाय न मिळाल्यामुळे व डॉक्टर वेळेवर न मिळाल्यामुळे मरण पावले, या विषण्ण करणार्या जाणिवांतून आनंदीबाईंच्या मनात तर, भावी समाजाच्या भल्यासाठी, डॉक्टर होण्याचे स्फुल्लिंग निर्माण होते हीच बाब अतुलनीय! त्या आदर्शवत् ध्येयाचा पाठपुरावा, हे अद्वितीय जोडपे, अनेक अडचणी संकटे येऊनही कसे पूर्ण करते, त्याचे ह्रदयंगम चित्रण हा बोलपट प्रभावीपणे करतो.
अशा जीवघेण्या कसोटी पहाणार्या धडपडीमुळेच, आनंदीबाई जोशी, ह्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आणि तेही केवळ २२ वर्षांच्या अल्पायुष्यात, एखादी ग्रीक ट्रँजेडी शोभावी अशा दुर्देवी तर्हेने. चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारा असला, तरी आजपर्यंत, ज्या ज्या स्रीयांनी विविध क्षेत्रांत, असे चाकोरीबाहेरचे 'पहिल्यात पहिले', असे योगदान दिले, त्या सार्यांची मांदियाळी रूपेरी पडद्यावर झळकते व ती पहात पहात सारे प्रेक्षक ताठ मानेने व भारावून जावून चित्रपटग्रहाबाहेर पडतात.
हा चित्रपट खरोखर उत्तम अभिनय योग्य असे संवाद आणि कार्यकारणभाव पटेल, परिणाम आणि कृती यांचा मेळ घालता येईल असे प्रसंग, त्याचबरोबर योग्य त्या पार्श्वभूमीचे चित्रण, त्या जोडीला अनुरूप असे संगीत ह्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. प्रमुख योगदान अर्थातच नायक ललित प्रभाकर आणि नायिकेच्या रूपात भाग्यश्री मिनिंग यांनी दिले आहे. प्रथम पत्नीच्या सासुबाई झालेल्या श्रीमती कुलकर्णींचेही खरोखर वैशिष्ट्यपूर्ण असे काम झाले आहे. एकूणच सर्वच पात्रे आपाआपली व्यक्तिरेखा चपखलपणे सादर करत असल्यामुळे, हा चित्रपट एक चविष्ट असा हवाहवासा मसाला बनलेला आहे. हे सारे घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून, श्री. समीर विद्वांस ह्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
उत्क्रांती हा सर्व सजीवांचा मूलभूत असा आविष्कार आहे, नव्हे त्यांची ती गरज आहे. सहाजिकच हजारो वर्षे स्त्रियांना जाणीवपूर्वक शिक्षणापासून दूर ठेवल्यामुळे, त्यांच्यावर जी परावलंबित्वाची, एक प्रकारच्या गुलामीची वेळ आली होती, ती द्रष्ट्या अशा अनेक समाजसेवकांच्या कामगिरीमुळे दूर झाली. त्यामध्ये गोपाळराव जोशी या माणसाचा सिंहाचा वाटा होता हे आपल्याला मान्य करावेच लागेल.
आज आपल्या भोवती स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर काम करताना दिसतात. त्याचे मूळ गेल्या शतका दीडशतकातील क्रांतिकारक अशा समाजसुधारणांत आहे.
हा चित्रपट बघितल्यामुळे प्रत्येकच व्यक्तीला, विशेषतः स्त्रियांना वाटेल की आज माझी जी परिस्थिती आहे, ती मी काही करून अधिक उत्तम बनविण्यासाठी कष्ट घेईन; तसेच पुरुषही स्वतःची प्रगती करता करता, आपल्या कुटुंबातील समस्त स्त्रीवर्गालाही, योग्य ते प्रोत्साहन देऊन त्यांच्या गुणांना योग्य तो मार्ग दाखवत प्रगतीसाठी साधू शकतील. अशा तऱ्हेची प्रेरणा देणारा चित्रपट खरोखर दुर्मिळच! म्हणूनच सुमार चरित्रपटांच्या भाऊगर्दीत "आनंदी गोपाळ" हा चित्रपट एखाद्या कोहिनूर हीर्यासारखा मुकूटमणी म्हणून शोभतो.
धंदा कला आणि विचार अशा त्रिवेणी संगमातून निर्माण केली जाणारी करमणुकीची कलाकृती ही नेहमीच असामान्य मानली जाते. त्या तुलनेत "आनंदी गोपाळ" चित्रपटाने ह्या गुणत्रिवेणीचा यथोचित समतोल साधून, वेगळी दिशा दाखवण्याचे महत्कार्य केले आहे. म्हणूनच पुन्हा सांगतो की, हा चित्रपट ऑस्कर मिळविण्याच्या लायकीचा आहे. प्रत्येकाने तो बघावाच अशी माझी कळकळीची सुचना आहे.
सुधाकर नातू.
----------
👍"कालच्या महिलादिनाच्या निमित्ताने....😄 "नव्या वर्षाचे नवे संकेत !":
"चिंतन-मनन-1!":😄
💐"काहीही न करता निर्विकार, निर्विचार केवळ पाचही मिनिटे देखील माणूस स्वास्थ बसू शकत नाही. त्याला कुठल्या ना कुठल्यातरी व्यवधानात तन मन गुंतवावेसे वाटते, व्यग्र रहावेसे वाटते. हा कदाचित त्याचा नैसर्गिक स्वभावधर्म असावा.
खरं म्हणजे जगाच्या, त्या पलीकडे जाऊन विश्वाच्या अफाट अनंत फापटपसार्या पुढे, तुम्ही काही केले नाही किंवा केले तरी काहीही फरक पडत नसतो. सातत्याने काही ना काही साध्य करण्याचे, मिळविण्याचे माणसाचे जे प्रयत्न सातत्याने चाललेले असतात, त्याची खरं काय गरज ?
मनाला जर शांती सुुख समाधान हवं असेल, तर निर्विकार निर्विचार राहायला शिकणं ही आजची नितांत गरज आहे. पूर्वी तपस्वी म्हणूनच एका पायावर उभे राहून कित्येक दिवसच नव्हे तर वर्षानं वर्ष कशी एकाग्रता राखत तपश्चर्या करत असतील याचे नवल वाटते. आज तशा तऱ्हेचा क्रांतिकारी बदल दिवसातून निदान एकदा तरी माणसाने साधायला हवा !":💐
खास आठवणीतील भेट.....👌💐
"हा खेळ सावल्यांचा !":
"प्रेरणादायी दिशादर्शक 'आनंदी गोपाळ'":
"आनंदी गोपाळ" हा चित्रपट बघितला. पाल्हाळ न लावता, पहिलाच मुद्दा सांगतो की, हा चित्रपट इतका सर्वांगसुंदर आहे की, तो भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात यावा.
"त्या" वेळची माणसं, आणि "त्या" वेळचे वातावरण, तसेच कर्मठ समाजाची परंपरागत मनोधारणा, अशा माहोलात गोपाळराव जोशींसारख्या एका विक्षिप्त म्हणवल्या जाणाऱ्या माणसाने, स्त्रियांच्या परावलंबित्वातून निर्माण झालेल्या अगतिकतेवर उपाय म्हणून, आपल्या बायकोला काहीही करून सुशिक्षित करावयाचे हा घेतलेला अट्टाहास, पाहिलेले ते स्वप्न, हा खरोखर जगावेगळा वेडेपणा होता. कारणपरत्वे आपले मूल योग्य तर्हेची लक्षणांची जाणीव, व सत्वर उपाय न मिळाल्यामुळे व डॉक्टर वेळेवर न मिळाल्यामुळे मरण पावले, या विषण्ण करणार्या जाणिवांतून आनंदीबाईंच्या मनात तर, भावी समाजाच्या भल्यासाठी, डॉक्टर होण्याचे स्फुल्लिंग निर्माण होते हीच बाब अतुलनीय! त्या आदर्शवत् ध्येयाचा पाठपुरावा, हे अद्वितीय जोडपे, अनेक अडचणी संकटे येऊनही कसे पूर्ण करते, त्याचे ह्रदयंगम चित्रण हा बोलपट प्रभावीपणे करतो.
अशा जीवघेण्या कसोटी पहाणार्या धडपडीमुळेच, आनंदीबाई जोशी, ह्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आणि तेही केवळ २२ वर्षांच्या अल्पायुष्यात, एखादी ग्रीक ट्रँजेडी शोभावी अशा दुर्देवी तर्हेने. चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारा असला, तरी आजपर्यंत, ज्या ज्या स्रीयांनी विविध क्षेत्रांत, असे चाकोरीबाहेरचे 'पहिल्यात पहिले', असे योगदान दिले, त्या सार्यांची मांदियाळी रूपेरी पडद्यावर झळकते व ती पहात पहात सारे प्रेक्षक ताठ मानेने व भारावून जावून चित्रपटग्रहाबाहेर पडतात.
हा चित्रपट खरोखर उत्तम अभिनय योग्य असे संवाद आणि कार्यकारणभाव पटेल, परिणाम आणि कृती यांचा मेळ घालता येईल असे प्रसंग, त्याचबरोबर योग्य त्या पार्श्वभूमीचे चित्रण, त्या जोडीला अनुरूप असे संगीत ह्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. प्रमुख योगदान अर्थातच नायक ललित प्रभाकर आणि नायिकेच्या रूपात भाग्यश्री मिनिंग यांनी दिले आहे. प्रथम पत्नीच्या सासुबाई झालेल्या श्रीमती कुलकर्णींचेही खरोखर वैशिष्ट्यपूर्ण असे काम झाले आहे. एकूणच सर्वच पात्रे आपाआपली व्यक्तिरेखा चपखलपणे सादर करत असल्यामुळे, हा चित्रपट एक चविष्ट असा हवाहवासा मसाला बनलेला आहे. हे सारे घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून, श्री. समीर विद्वांस ह्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
उत्क्रांती हा सर्व सजीवांचा मूलभूत असा आविष्कार आहे, नव्हे त्यांची ती गरज आहे. सहाजिकच हजारो वर्षे स्त्रियांना जाणीवपूर्वक शिक्षणापासून दूर ठेवल्यामुळे, त्यांच्यावर जी परावलंबित्वाची, एक प्रकारच्या गुलामीची वेळ आली होती, ती द्रष्ट्या अशा अनेक समाजसेवकांच्या कामगिरीमुळे दूर झाली. त्यामध्ये गोपाळराव जोशी या माणसाचा सिंहाचा वाटा होता हे आपल्याला मान्य करावेच लागेल.
आज आपल्या भोवती स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर काम करताना दिसतात. त्याचे मूळ गेल्या शतका दीडशतकातील क्रांतिकारक अशा समाजसुधारणांत आहे.
हा चित्रपट बघितल्यामुळे प्रत्येकच व्यक्तीला, विशेषतः स्त्रियांना वाटेल की आज माझी जी परिस्थिती आहे, ती मी काही करून अधिक उत्तम बनविण्यासाठी कष्ट घेईन; तसेच पुरुषही स्वतःची प्रगती करता करता, आपल्या कुटुंबातील समस्त स्त्रीवर्गालाही, योग्य ते प्रोत्साहन देऊन त्यांच्या गुणांना योग्य तो मार्ग दाखवत प्रगतीसाठी साधू शकतील. अशा तऱ्हेची प्रेरणा देणारा चित्रपट खरोखर दुर्मिळच! म्हणूनच सुमार चरित्रपटांच्या भाऊगर्दीत "आनंदी गोपाळ" हा चित्रपट एखाद्या कोहिनूर हीर्यासारखा मुकूटमणी म्हणून शोभतो.
धंदा कला आणि विचार अशा त्रिवेणी संगमातून निर्माण केली जाणारी करमणुकीची कलाकृती ही नेहमीच असामान्य मानली जाते. त्या तुलनेत "आनंदी गोपाळ" चित्रपटाने ह्या गुणत्रिवेणीचा यथोचित समतोल साधून, वेगळी दिशा दाखवण्याचे महत्कार्य केले आहे. म्हणूनच पुन्हा सांगतो की, हा चित्रपट ऑस्कर मिळविण्याच्या लायकीचा आहे. प्रत्येकाने तो बघावाच अशी माझी कळकळीची सुचना आहे.
सुधाकर नातू.
-----------
"अनुभवाचे बोल !":
"काळ अन् वेळेचा जमाखर्च!":
कुणालाही न सांगता काळ हा जातच असतो पुढे पुढे. त्याला मागे वळणे माहीत नाही, तो अव्याहत पुढेच जात रहाणार असतो. मागे गेलेला काळ आणि वेळ फुकट गेली की, चांगल्या समाधानकारक अशा गोष्टींसाठी वापरली गेली, ह्याची आपल्याला कायमच रुखरुख लागली पाहिजे. कारण उपलब्ध वेळ तुम्ही कसा वापरता, कशा करता वापरता, ह्यावर आणि फक्त ह्यावरच तुमचे समाधान, यश अवलंबून असते. ध्यानात ठेवा, आयुष्य हा लिमिटेड ओव्हर्सचा सामना असतो आणि ज्याचा "रन रेट" अधिक तोच जिंकणार! थांबला, तो संपला!
पण दुर्दैवाने, आपल्याला वेळेचे भान राहत नाही, आपण नको त्या गोष्टीत वेळ घालवत राहतो, आणि नंतर फक्त पश्चाताप करायची पाळी येऊ शकते. कायम सजग राहून आपण वेळ कसा घालवला, वा कसा अधिक चांगल्या प्रकारे घालवता येईल किंवा घालवण्यापेक्षा वापरता येईल, ह्याचाच सातत्याने विचार केला पाहिजे.
त्यासाठी दररोज सकाळी, कालचा दिवस समाधानकारक आणि कोणत्या उपयुक्त योगदानांमध्ये गेला, ह्याची नोंद ठेवणे उपयुक्त ठरू शकते.
हे अंतिम सत्य आहे की, काळ, वेळ ही सगळ्यांना सारखी असते. कदाचित मृत्यु आणि वेळ ह्या, दोनच गोष्टी अशा आहेत की, जिथे कुठलीही भेदभावाची सुतराम शक्यता नाही. ते लक्षात ठेवून, समोर आलेला प्रत्येक क्षण अधिकाधिक उपयुक्त गोष्टींसाठी, स्वतःला किंवा इतरांना समाधान देण्यासाठी वापरता आला तर आपला दिवस चांगला गेला असे म्हणता येईल.
-----------
दिवाळी अंकांची मांदियाळी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक साहित्य चपराक
गेले काही दिवस मी साहित्य चपराक असे चमत्कारिक नाव असणारा 2024 सालचा दिवाळी अंक वाचत आहे त्यातील प्रत्येक लेख हा माहितीपूर्ण मनोरंजक आणि आपल्याला वेगळ्या जाणीव करून देणारा आहे तसेच अंतर्मुख करून त्या त्या विषयावर आपल्या मनातील स्पंदने व्यक्त करणारा असा आहे व्यक्त करायला लावणारा असा आहे ज्या वेळेला जे वाटते ते त्याच वेळेला संग्रहित करणे गरजेचे असते हे आता माझ्या ध्यानात आले आहे आणि म्हणूनच मी नुकताच त्या अंकामधील नवकवितेला जन्म देणारे बासी मर्ढेकर यांच्या मरणे येथील गिरणाशीरणा झालेल्या घराचे नूतनीकरण करून त्याला नवीन शांत प्राप्त करून देण्याचे जी धडपड कोषाध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद विनोद कुलकर्णी यांनी त्यांच्या लेखात मांडली आहे ती वाचून मी सद्गतीत झालो आणि या सगळ्या इंद्रधन शिवधनुष्य मिळण्यासाठी त्यांना जी यातायात करावी लागली त्यामध्ये त्यांना कस कसे वेगवेगळ्या मर्ढेकर नातेवाईकांचे सहाय्य लाभले आणि अखेरीस दिमागदार अशी मर्ढेकरांची माडी उभी राहिली त्याचीच कथा या अप्रतिम जिव्हाळ्याने मांडलेल्या शब्दातील लेखाची आहे या एका लेखावरूनच आपल्याला ध्यानात येईल की किती उत्कृष्ट दर्जाचा हा दिवाळी अंक आहे असा दिवाळी अंक सहसा वाचायला मिळत नाही आणि तो मिळाला याचे मला एक वाचक रसिक रसिक वाचक म्हणून समाधान वाटते
-------
----------------
शुक्रवार, १४ मार्च, २०२५
"रंगोत्सव-आठवणीतील मोती !":
"रंगोत्सव-आठवणीतील मोती !":
'आठवणीतील मोती' हे नटवर्य प्रभाकर पणशीकर यांनी लिहिलेले पुस्तक सध्या मी वाचत आहेप्रत्येक शब्दाशब्दाबरोबर वाचकाला आपल्याबरोबर कसं घेऊन जायचं, हे कसब त्यांना साधलेल आहे. ते मला प्रत्येक पानंपान वाचताना ध्यानात आलं. साहजिकच एक रकमी, एका बैठकीत या उत्कृष्ट पुस्तकाची जवळजवळ 70 पाने मी त्यामुळेच वाचू शकलो.
तो मी नव्हेच या नाटकातील लखोबा लोखंडेच्या रूपाने प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर स्वतंत्र ठसा उमटवला आहे. ते साठ वर्षाहून अधिक रंगभूमीची सेवा करत आलेले आपण जाणतो. उत्तम दिग्दर्शक निर्माता आणि अभिनेता तर ते होतेच, पण ह्या पुस्तकामुळे मला ध्यानात आले की ते एक श्रेष्ठ दर्जाचे लेखकही सहज होऊ शकले असते !
कितीतरी जुन्या आठवणींना यामध्ये उजाळा मिळाला आहे आणि त्यांच्या रंगभूमीवरील आयुष्याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये कसे कसे चढ उतार आणि आव्हाने येत गेली त्यांनी त्या साऱ्याला तोंड देत न भूतो न भविष्यती असे यश कसे मिळवले याची ही हृदयस्पर्शी, मनाला भिडणारी आणि तितकीच मनोरंजक अशी कहाणी आहे. प्रस्तुत पुस्तकाची उरलेली जवळजवळ दीडशेहून अधिक पाने माझं वाचन चालूच राहील या शंका नाही.
साहजिकच एक अतिशय उत्तम पुस्तक वाचण्याचा मला आनंद लाभत आहे. वाचनासारखा आनंद नाही आणि वाचन हे माणसाच्या मनाचं भावनांच पोट कसं भरू शकतो, याचा अनुभव
वसंत वाचनालय मी सुरू केल्यापासून मला गेली दोन वर्ष ठाई ठाई घेत आहे. आतापर्यंत मासिके आणि पुस्तके मिळून जवळजवळ दीडशे साहित्यकृतींचा ऐवज माझ्या मनाच्या गाभाऱ्यात तुडुंब भरलेला आहे आणि मी अक्षरश: त्यामध्ये चिंब चिंब होत आहे. आपणही ह्या आणि अशाच पुस्तकांचा वाचनाचा आनंद जरूर घ्या, एका वेगळ्याच विश्वात गेल्याची अनुभूती तुम्हाला येईल.
हे पुस्तक वाचता वाचता, माझ्या लक्षात आलं-एक जुनी आठवण ताजी झाली. खूप वर्षांपूर्वी श्री सदाशिव सावंत संपादित 'सुगंध सरिता' या दिवाळी अंकामध्ये मी मराठी नाट्यनिर्मात्यांवरती एक लेखमाला दरवर्षी लिहित असे. त्यामध्ये जवळजवळ मराठी मधील सर्वच प्रमुख नाटक निर्माणसंस्थांचे प्रमुखांच्या मुलाखती आणि त्यांच्या कार्याची ओळख मी करून देत असे. अर्थातच 'नाट्यसंपदा' ही अग्रगण्य संस्था असल्यामुळे मी स्वतः शिवाजी मंदिर मधील नाट्यसंपदेच्या कार्यालयात पंंतांना जाऊन भेटलो आणि त्यांच्याशी गप्पाटप्पा व त्यांनी दिलेल्या माहितीवरून एक लेख त्यावर्षीच्या सुगंध सरिता दिवाळी अंकात माझा प्रसिद्ध झाला होता. अशा थोर कलावंताची आणि माझी देखील प्रत्यक्ष भेट व्हावी आणि तीने मला एक लेख लिहायला प्रवृत्त करावे, ह्या आठवणीने माझे मन मोहरून गेले.
जाता जाता एक विनंती मला या लेखाच्या वाचकांना करावीशी वाटते. दुर्दैवाने मी गेली चार दशके जरी विविध नियतकालिकात करमणूक क्षेत्रावर लिहीत असलो तरी मी माझ्या लेखनाचे काहीही ऐवज जवळ ठेवले नाहीत. त्याचे महत्व मला आता लक्षात येत आहे. त्यामुळे ज्या कुणाजवळ त्या कालखंडातील 'सुगंध सरिता'चे दिवाळी अंक कुणाकडे असतील, तर त्यामधील नाट्यनिर्मात्यांच्या संबंधीच्या माझ्या लेखांची फोटोकॉपी त्यांनी मला जर प्रतिसादात किंवा व्हाट्सअप वर पाठवली तर मी आभारी राहीन.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
रविवार, २ मार्च, २०२५
" सोशल मीडियावरील माझे योगदान
😝 "फसवा फसवी !":😝
😄 "असं म्हटलं जातं की,
'दिसतं तसं नसतं'
आणि म्हणून जग फसतं !'
पुुस्तक वाचनासंबंधी माझा एक अनुभव इथे त्या संदर्भात मांडण्याचा मी प्रयत्न करतोय.
मी काही मोठा दर्दीवाचक नाही, पण वाचनाची मात्र मला जरूर आवड आहे. त्यामुळे वाचनालयातून पुस्तके आणणे व मासिके आणणे हा माझा अत्यावश्यक ऑक्सीजन आहे. सर्वसाधारणपणे मला व्यक्तीचित्रे वा आत्मचरित्रे वाचायला आवडतात. कथा मला बिलकुल आवडत वा पटत नाहीत. कारण जे सांगायचं ते खरं म्हणजे एका पानात संपू शकत असतं, तेच उगाचच लांबत नेलं जातं आणि पाच दहा पानं उगाचच आपल्याला वाचायला लागतात, असं माझं मत आहे. साहजिकच माझ्या वाचनाच्या मर्यादा आहेत हे मी मान्य करतो.
आता मुद्द्यावरच येतो. वाचनालयात गेल्यावर मी पुस्तके शोधताना नेहमी व्यक्तीचित्रे आत्मचरित्र आहेत ना याची खात्री करूनच पुस्तक घरी नेत असतो. पण परवा मोठी गंमत झाली आणि आजचा जो विषय 'फसवा फसवी' चा त्याचा सुखद अनुभव आला.
शिरीष कणेकरांचे
'एकला बोलो रे' हे पुस्तक निवडण्यासाठी मी हाती घेतले आणि अनुक्रमणिका पाहायला गेलो तर तिथे अनुक्रमणिकाच नव्हती. पण त्यांच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकांची यादी होती.
साहजिकच मी पुस्तकातील धडेच म्हणतो (प्रकरणे म्हणत नाही) पहायला सुरुवात केली आणि मला फक्त धड्यांचे क्रमांक दिसले आणि बरोबर त्या त्या धड्याच्या क्रमांकांवर वेगवेगळ्या व्यक्तींची रेखाचित्रे दिसली. सुरुवातच मुळी माधव मनोहर, व पु काळे, राजेश खन्ना ऋषी कपूर एवढेच काय, जयवंत दळवी यांची रेखाचित्रे पाहून मला वाटले हे त्या त्या व्यक्तीच्या संदर्भातील जसे कणेकरांना अनुभव आले तसे असेल.
साहजिकच मी ते पुस्तक वाचायला घरी आणले आणि वाचायला लागलो तर लक्षात आले की, हाती घेतलेले हे पुस्तक त्यांच्या 'फिल्लंबाजी' 'फटकेबाजी' 'कणेकरी' अशा एकपात्री अर्थात 'एकला बोलो रे' या नावाला समर्पक असे त्यांचे त्या कार्यक्रमासमोर संदर्भीचे विविध बरे वाईट, चमत्कारिक आणि कधी कोपरखळ्या मारणारे अनुभव उलगडलेले होते.
माझा कल्पनेप्रमाणे हे व्यक्तीचित्रात्मक पुस्तक नव्हते तर कणेकरांच्या नेहमीच्या खेळकर (की खोडकर ?) भाषेतील लघुनिबंध होते. अर्थात पुस्तक तितकेच वाचनीय होते आणि मी दोन-तीन दिवसात ते वाचून पूर्णही केले.
'दिसते तसे नसते',
'तरी जग फसतेच असे नाही !' असेच आता शेवटी मला म्हणणे भाग आहे !":😄
----------------------
"👍"Thought of the Day !":👌
'Learning is an exploration from darkness to Light, from the unknown to known, from unawareness to awareness; thus expanding your 'World', broadening your horizons.
Our five sense organs that enable us to see, to smell, to hear-listen, to feel and to think, are the tools for this learning process and also to our critical appreciation ability.
What one does, when he sees a scene, a picture, a film or a drama, or reads literature,or interacts with others, etc. he likes it or hates, or avoids it and differentiates between what's good and what's not.
Thus critical appraisal is an advance application of the unique 'Learning Process":
काल मराठी भाषा दिनी, 'माहेर' दिवाळी अंकातील श्रीमती मोनिका गजेंद्रगडकरांच्या वडिलांसंबंधीच्या-( विद्याधर पुंडलिक) लेखातून मला तीन अनोखे शब्द गवसले: शहाणीव, ( शहाणपण)
प्रातिभ रुप ( प्रतिभावान)
आणि शब्दस्पर्श !
आपली मराठी ही अभिजात भाषा कां आहे याचा त्यामुळे प्रत्यय आला !":😄
😄 "आज मराठी भाषा दिन. कवी श्रेष्ठ आणि भाषा प्रभू कुसुमाग्रजांचा हा जन्मदिन 27 फेब्रुवारी 1912. यावेळच्या मराठी भाषा दिनाचे वैशिष्ट्य आहे की आता मराठीला अभिजात भाषा हा दर्जा प्राप्त झाला आहे.
अशा या मंगल दिवशी आपण प्रत्येकाने निश्चय करूया:
# यापुढे मी कायम व्यवहारात घरात सगळीकडे मराठी भाषा वापरीन.
# माझ्या मुलांना व इतरांनाही सांगेन की त्यांच्या मुलांना त्यांनी मराठी भाषा शाळेत शिकवावे.
# माझ्या वाढदिवसाच्या व इतर समारंभा निमित्तच्या कार्यक्रमातील केकवर मराठी भाषेत शुभेच्छा देईन.
# मराठी चित्रपट नाटके मालिका आणि बातम्या आवर्जून पाहिन.
# " माझ्या मोबाईलवर मराठी भाषा प्रामुख्याने डिफॉल्ट भाषा म्हणून वापरीन...
😄
मुक्त संवाद जन्मगाठीचे रहस्य
https://youtu.be/c5kjMdJTBlY?si=BRwnFED_pP2Az7In
😇पर्याय आणि द्विधा मनस्थिती म्हणजे बिंब प्रतिबिंब किंवा कोंबडी आधी का अंड आधी असा प्रकार माणसाच्या आयुष्यात अशी अनेक वेळा वेळ येते की जेव्हा त्याला पर्याय निवडावे लागतात आणि तेव्हा त्याची द्विधा मनस्थिती होते जो अचूक पर्याय अचूक वेळी निवडतो आणि त्याप्रमाणे कृती करतो तो आयुष्यात विकसित होत जातो आणि समाधानी होतो !":😇
*दिव्यातील तेल संपले की दिवा विजला जातो तसेच माणसाची कर्म संपली की त्याच्या भाग्यरेषा देखील पुसून जातात म्हणून माणसाने आपल् मन कर्मावर लावल की भाग्य कधीच संपत नाही.*
*🙏राम कृष्ण हरी 🙏*
*शुभ सकाळ*
💐"स्वार्थासाठी जवळ आलेली माणसं काही क्षणात तुटतात,पण विघांरांनी व
प्रेमाने जुळलेली माणसं आयुष्यभर
सोबत असतात.
सुप्रभात,शुभ सकाळ,सुंदर दिवस
आनंदमय शुभेच्छा !"💐
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
💐 ";पैज लावायची तर स्वत: सोबतच लावा कारण जिंकला तर,स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल---आणि हरला तर स्वत:चाच अहंकार हराल--- ध्येय
दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका--!!
शुभ रविवार सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌷🌷🙏🏻🙏🏻🌷🌷
आमची मराठी अभिजात मराठी !":💐
👍"Intensity- जवळीक,
यामधील भावनिक असोशी जवळीक या शब्दातून अधिक प्रभावीपणे मांडली जाते.
Mevaric- अतरंगी, तीच कहाणी अतरंगी शब्दाची त्यामधून माणसाचे जे व्यक्तिमत्त्व अभिप्रेत आहे ते अधिक संकल्पना प्रकट होते.
Plane- भवताल, येथे परिप्रेक्ष हा शब्द अप मार्केट असू शकतो पण भवतालाचा जो आसमंत प्रकट होतो तो अधिक पारदर्शक असतो, नाही कां?
म्हणूनच 'आमची मराठी अभिजात मराठी !'
त्याकरताच भाग्य आम्हाला लाभले बोलूया मराठी !!":👌
मुक्त संवाद अरे वेड्या मना कांरे, तळमळीतून ?
जीवनातील ताणतणावामुळे सध्या मानसिक आरोग्य ही एक मोठी समस्या झाली आहे. मन चंगा तो कठौती में गंगा असं म्हटलंय ते खोटं नाही आनंदी मन ठेवायचं कसं आणि ती साऱ्यांना जमते असं नाही. मानसिक अनारोग्य याविषयी सोप्या भाषेत आपल्याला माहिती दिली आहे.
ही लिंक उघडा
https://youtu.be/Qxmh1quyJhk?si=AlS6saaSj6zkMKln
मुक्तसंवाद-जन्मगाठींचे रहस्य !":
जीवनामध्ये जन्मानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे विवाह योग. पण विवाहाच्या जन्म गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात ते कितपत खरे असा तो अनाकलनीय एक प्रकारचा जुगारच म्हणावा सगळ्या बाजू अनुकूल असूनही विवाह न जुळण्याची कारणे काय यामागची याचा उहापोह येथे केला आहे
ही लिंक उघडा
https://youtu.be/c5kjMdJTBlY?si=PQrhuOKdxSLqqtjW
3
💐II " नवीन वर्षाचा नवा संकल्प-6 II💐
👍" शारदोत्सव-रसास्वाद !":👌
'नटखट नट-खट मोहन जोशी':
एक मनस्वी, तेजस्वी, यशस्वी कहाणी!
--–👌--------------👌--------------👌---------
'नटखट नट-खट मोहन जोशी' हे श्री. जयंत बेंद्रे ह्यांनी शब्दबद्ध केलेले सुमारे 500 पानी आत्मनिवेदन, ह्या अत्यंत मनस्वी आणि कर्तबगार अभिनेत्याची एखाद्या कादंबरीपेक्षाही चित्तथरारक जीवनकहाणी नुकतीच वाचून झाली.
अंगभूत गुणांना आणि कौशल्याला अपार जिद्द व कष्ट, निश्चित ध्येय आणि ह्या जोडीला थोडी नशिबाची साथ मिळाली, म्हणजे सामान्यांतून अचंबित करणारे यशस्वी कर्तुत्व कसे आकाराला येते त्याचे एखाद्या आशयघन चित्रपटासारखे दर्शन येथे घडते.
गरजूंना, अडचणीत सापडलेल्या अभाग्यांना सर्वशक्तीनिशी मदत करणारा हा माणूस, जेवणांत जर काही अन्न उरले तर ते वाया न जाऊ देता गरजू भुकेलेल्यांच्या तोंडी जाईपर्यंत स्वस्थ न बसणारा हा माणूस, एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की, मग कितीही अडचणी, संकटे आडवी आली तरी न डगमगता ती यशस्वीपणे पूर्णत्वाला नेणारा हा माणूस, आपले कुटूंबीय, पत्नी मुले ह्यांची काळजी घेणारा, जिव्हाळ्याने वागणारा हा माणूस, व्यावसायिक जीवनांत प्रामाणिकपणे आपल्यांतील कर्तुत्वाला सिद्ध करणारा हा माणूस इतक्या पोटतिडकीने आणि तटस्थ प्रांजलपणाने आपला जीवनपट येथे उलगडतो की थक्क व्हावे.
अनेक हिंदी, मराठी चित्रपट तसेच मालिका आणि नाटके करणारा, विविध पुरस्कार मानसन्मान मिळवणारा, हा गुणवंत अभिनेता सुरेल गीतेही गातो. अ.भा.नाट्यपरिषदेचा अध्यक्ष ह्या नात्याने ते करत असलेली रंगभूमीची सेवा तर थक्क करणारी आहे. अशा ह्मा माणसाने व्यावसायिक जीवनाची सुरवात मालवहातूकीच्या क्षेत्रांत एक वहानचालक-मालक म्हणून केली होती! जीवनसंग्रामात माणूस कुठे असतो आणि किती थक्क करणारी शिखरे पादाक्रांत करू शकतो ते ह्या पुस्तकावरून जसे समजले, तसेच कुणालाही नेहमी उपयोगी पडतील असे अनुभवाचे मंत्र येथे आहेत.
ह्या पुस्तकातील अनोखा आगळा वेगळा असा भाग म्हणजे, त्यांच्या पत्नीने एक प्रियकर पती म्हणून आणि दोन मुलांनी एक कर्तव्यदक्ष प्रेमळ वडील म्हणून आलेल्या सहवास क्षणांची केलेली ह्रदयंगम उजळणी होय. तसेच मोहन जोशींनीच स्वत:शीच स्वत:चा घेतलेला रोखठोक लेखाजोखाही ह्या आत्मनिवेदनाची उंची वाढवतो.
कुठेही कंटाळा न येता उत्सुकतेने वाचावी अशी ही आत्मसमाधान देत, आत्मपरिक्षणही करायला लावणारी, ५०० पानी जीवनगीता मला अवचितपणे वाचायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
हँटस् आँफ टू श्री मोहन जोशी
व-त्यांचे शुभचिंतन.
4
https://youtu.be/gALHjo9z1a8?si=BIqS7YMISseqSC8T
😇 "प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच प्रश्न!":😇
😀 'आपण आपल्या जागतेकपणीचा वेळ कसा घालवतो, हा प्रश्न वैयक्तिक आवश्यक व्यवधाने व व्यावसायिक जबाबदारी सोडून किंवा प्रवासाचा वेळ सोडून आपण कसा उपयोगात आणतो ? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने निदान दर महिन्यात एकदा तरी शोधले पाहिजे. एक प्रकारचा असा आत्मसंवाद केला पाहिजे, त्यामुळे आपण कसे जगतो, कां जगतो याचे उत्तर मिळू शकेल.
विशेषत: जेष्ठ नागरिकांना काही सन्मानानीय अपवाद वगळता, हा तर मोठा यक्षप्रश्नच असतो की वेळ कसा घालवायचा? त्यासंबंधीचा आमचा गमतीशीर अणुुकथेचा भाग आपण ऐकला असेलच. आपल्याला विविध प्रश्नांची प्राथमिक उत्तरे देण्याची गरज आहे, ते प्रश्न असे किंवा मुद्दे असे:
झोपण्यात गेलेला वेळ
सकाळी व सायंकाळी फिरण्यातला वेळ लिहिणे, वाचन करणे, टीव्ही बघणे,
सिनेमा व नाटकाला जाणे इत्यादी इत्यादी, अनेक गोष्टी आपण नेहमी करत असतो त्यासाठी किती वेळ गेला हे आपण पाहिले पाहिजे. त्याशिवाय वेळे व्यतिरिक्त आपण प्रश्न असा केला पाहिजे की, या प्रत्येक गोष्टी बाबतीत आपण त्या त्या गोष्टी का करतो, त्या नाही केल्या तर आपले काही नुकसान होणार असते कां? त्या गोष्टीचा फायदा काय ? इत्यादी इत्यादी सर्वंकष व्यापक दृष्टिकोनातून आपण गेलेल्या किंवा घालवलेल्या वेळेविषयी जागृत राहून प्रश्न विचारले पाहिजेत.
एक ध्यानात ठेवा, वरीलपैकी कुठलीही गोष्ट आपण जरी केली नाही तरी वेळ कुणासाठी थांबत नसतो.
त्यामुळे तो आपोआप तर जाणारच असतो. तर आपण हे सगळं कां करतो? खरोखर त्याची गरज आहे कां? थोडक्यात आपल्या वेळेचा व आपल्या भावविश्वाचा परस्पर संबंध काय असतो, काय असावा? याचा सखोल शोध घेण्यासाठी हा सारा खटाटोप ! त्यामुळे मूलभूत योग्य वा अयोग्य गोष्टी आपल्यासमोर येतील आणि त्यातून आपल्याला आपला वेळ अधिक सकारात्मक अधिक योगदान देण्याजोगा व आत्मसमाधान देण्याजोगा वापरता येईल, असे मला वाटते !"
आता जाता श्री स्वामी समर्थ रामदास यांचे
हे विचार ध्यानात घ्या म्हणजे मला काय सांगायचंय ते चांगले लक्षात राहील
# "अलिप्तपण दे रे राम,
मजविण तू मज दे रे राम !"
# " मनी आणावे ते होते,
विघ्न अवघेची नासोनी जाते !":😄
5
निवडणूकीचे विदारक वास्तव:
धोरण नियोजन व त्यांची अंमलबजावणी फसल्याची लक्षणे
“What can happen, due to whatever has happened.” By Peter Drucker.
ध्येय व धोरण ठरविणार्या शासनकर्त्यांनी जरूर ध्यानांत ठेवावेत असे हे बोल, त्या जागतिक कीर्तीच्या व्यवस्थापकीय सल्लागाराचे आहेत. आज सात दशकांनंतरही अपयशाचे आक्रोश करावयाची वेळ येणे, हे धोरण नियोजन व त्यांची अंमलबजावणी फसल्याची लक्षणे आहेत.सर्व प्रकारची नैसर्गिक साधन सामुग्री आणि विपुल सुशिक्षित कुशल मनुष्यबळ लाभूनही, अन्न, वस्त्र, निवारा अशा मुलभूत गरजांपासून आणि नागरी सुविधांपासून लोकसंख्येतील लक्षणीय भागाला वंचित रहावे लागते आहे, ह्यासारखे दुर्दैव ते कोणते? शहरी आणि ग्रामीण, इंडीया आणि भारत, आहेरे आणि नाहीरे, अशी विचित्र विभागणी, सात दशकांच्या प्रयत्नांचे फलित होय, हे कटू वास्तव नाही कां?
लोकसेवकांना परत बोलविण्याचा अधिकार
खरे म्हणजे जनतेच्या आशा आकांक्षा जाणून घेवून, लोकसेवकांनी शासकीय यंत्रणेद्वारे त्या प्रत्यक्षांत आणत कायद्याच्या चौकटींत राहून जनहित व विकास साधायचा असतो. लोकसेवकांचे हितसंबंध आणि प्रत्यक्ष आम जनतेचे भले होणे, असे परस्परांच्या विरूद्ध कसे असू शकते? म्हणूनच न्यायाने जनतेलाही अशा लोकसेवकांना परत बोलविण्याचा अधिकार असणे, संयुक्तिक नव्हे कां? त्या अनुषंगाने कायद्यांत योग्य ते बदल करण्याचा विचार व्हावा....
ह्या आठवड्याच्या वेधक विचारमंथनासाठी log on to my blog http//moonsungrandson.blogspot.com
💐II आकाशातील पाळणे अभिवाचन समूह II💐
👍 "अर्थसाक्षर- गरीबी मागील अर्थशास्त्र भाग दोन !":👌
"अभिवाचन क्रमांक 343 !":
😄" पैसा आहे सर्वस्व मानायला सुरुवात झाल्यापासून गरीब आणि श्रीमंत यामधील दरी वाढत चालली आहे. गरिबी कमी करण्यावर बहुतेक देशांचा विकसनशील देशांचा धोरणात्मक प्रयत्न चाललेला असतो परंतु त्या कितपत यश येतं याची शंका आहे कारण गरीब आणि श्रीमंत यामधील दरी स्वातंत्र्य मिळाल्यापासून वाढतच चालली आहे 90% लोकांकडे केवळ दहा टक्के संपत्ती तर दहा टक्के लोकांकडे 90% संपत्ती असे भीषण व्यस्त प्रमाण असल्याचे दाखले दिले जातात या अभिवाचनामध्ये श्री उदय पिंगळे यांनी त्यांच्याच लेखाच्या आधारे गरिबी मागील अर्थशास्त्र आपल्याला सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे त्यामुळे अर्थव्यवहाराकडे बघण्याचा डोळसपणा आपल्याला अंगी करता येईल असा विश्वास आहे !"😀
खाऊजा' किंवा 'LPG' संस्कृती 1991 नंतर निर्माण झाल्यापासून चंगळवाद फोफावला. कमीत श्रमामध्ये जास्तीत जास्त पैसा मिळवायचा काही जणांना छंद लागला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींनी तर 'सायबर क्राईम' सारखे उपद्व्याप केले. झटपट श्रीमंतीचे हे वेड कुठे जाऊन थांबते, ते हल्ली अनेकांनेक घोटाळ्यांमधून बाहेर येऊ लागले. तरीही कुठलाही विचार न करता जास्त परतावा मिळतोय, म्हणून अति हाव ठेवून लोकांचे करोडो रुपयांचे नुकसान केले गेले. येथे श्री उदय पिंगळे त्यांच्या मार्गदर्शक आणि डोळे उघडणाऱ्या लेखाचे अभिवाचन करताना, नुकत्याच झालेल्या एका महाघोटाळ्याचा ढांडोळा घेत आहेत. असे नुुकसान होऊ नये, म्हणून काय करायचे तेही ते सांगत आहेत !":😭
https://drive.google.com/file/d/17xWTJqNbxe-0G4ovx17SGu-Ihfuc3Alz/view?usp=drivesdk
6
💐II मंगल प्रभात II💐
👍" बोल अमोल 332 !":👌
😀 "
7
"काव्यरंग!"
":😀
8
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-92 ":👌
💐 " हिंदी चित्रपट सृष्टीतील गीत संगीताची स्वरबहारयुगांतील 3
सुमधुर गीते, पुढील लिंकस् उघडून....
1 प्यार किया दिल ने कहा हो तुम......
2 नही चांद होगा ना तारे रहेंगे हम हमेशा तुम्हारे रहेंगे....
3 बाबूजी जरा धीरे चालना.....
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
9
👍 "छाप डलेले शब्द !":👍
💐"
!":💐
😀 "
वाटले ते पारदर्शकपणे मांडले.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
" बिंब प्रतिबिंब भाग दोन
A: I am just pointing out that the moral fabric is getting torn into pieces! Just reflect on today's horrific instance at Swar Gate ST stand !
डोळ्यावरची झापडं काढून वास्तवाचे सत्य काय आहे हे आता तरी कळावं ! With moral degradation & corrupt Charactor, any material progress is of no value.
B: 🙋♂️😂 *हे आपण गेली ६०/७० वर्षे इमानेइतबारे जपले, वाढु दिले. एव्हढे कशाला आजही या वृत्तीला हाताशी धरुन राजकारण करण्याचा खुप प्रयत्न होत आहे. दिल्लीत केजरीवालनी हेच केले आणि आपण टाळ्या वाजवत होतो. बघुया भाजप काय करते ते. बुलडोझर हाच त्याच्या वरचा उपाय आहे. पण मग आपणच व्यक्ती स्वातंत्र्याचा कडेलोट झाला म्हणुन ओरडायला लागतो. सरकारने त्याकडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे.*
🙋♂️😂 *हे अगदी खरे आहे, थोडेफार याकडे लक्ष असावे. पण शेवटी प्राथमिकता येतेच. तसेच ह्या सामाजिक अन्यायाच्या आणि व्यभिचाराच्या बातम्या पाहुन, ऐकुन स्वतः त्यावर काही सकारात्मक कारवाई आपण करणार नसु व फक्त टीकात्मक ओरडा ओरड करणारे असु तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही.*
🙋♂️😂 *ज्याला आपण "इतर उठाठेवी" म्हणतो त्याच आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी, देशासाठी आणि सनातन धर्मासाठी महत्वाच्या असतात. त्याबाबत जनजागृती करणे हे आपल्या प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. कारण नाहीतर वाईट हेतुने प्रसारित केलेल्या चुकीच्या बातम्या आणि लेख वाचुन अनभिज्ञ जनता विकृत मते बनवते आणि त्यांचा बिनदिक्कत प्रसार करते. याने देशाचे आणि धर्माचे खुप नुकसान होते.*
A:Hmm...
B:🙋♂️ *आपल्या इथे असंख्य कायदे अजुन ब्रिटिशांनी जे आपल्या सत्तेसाठी आणि वर्चस्वासाठी प्रस्थापीत केले होते तेच चालु आहेत. आणि ६०/७० वर्षांत काँग्रेस सरकारने त्यात अनेक देशविरोधी बदल केले आणि आपल्या इथले उद्योग संपवले. आपल्या अद्वितीय बुद्धिमत्ता असलेल्या असामान्य भारतीयांच्या उद्योजकतेला आळा घातला, त्याला जाणीवपूर्वक खीळ घातले. त्यामुळे आपण सर्वच क्षेत्रात चीनच्या मागे पडलो. आता ती परिस्थिती खुपच बदलली आहे. गेल्या १० वर्षांत त्या जुन्या कारद्यातले जवळपास १५०० कायदे रद्दबातल केले गेले किंवा त्यात सुधारणा करण्यात आल्या. किरण शॉ मुजूमदार कारखानदारांची प्रतिनिधी आहे. सरकारने फक्त यांचेच हित जपले तर डावे लाल सलाम वाले आणि देशविघातक काँग्रेसवाले सरकार अंबानी अडानीची मदत करते आहे असा कांगावा करतात. थोडक्यात हे मंडळी लबाड आहेत. ही परिस्थिती येत्या काळात योजनाबद्ध रितीने बदलेल हे निश्चित.*
B: *आपल्या न्यायालयात हे आजही घडते आहे, सरकार या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढते आहे. वेळ लागेल पण ही परिस्थिती निश्चितच बदलेल. आपण याचा मागोवा घेणे गरजेचे आहे.*
-----------------------
*राष्ट्रविरोधी स्वयंसेवी संस्था + लोभी वकील.*
*यांचे कारनामे.*
*सर्वोच्च न्यायालय डोळे बंद करून बसले आहे, परंतु एका ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशाने हे कट आणि अपवित्र संबंध तोडण्याचे आदेश देण्याचे धाडस दाखवले आहे.*
३ जानेवारी २०२५ रोजी एनआयए कोर्टाचे विशेष न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी (व्ही.एस. त्रिपाठी) यांनी २६ जानेवारी २०१८ रोजी कासगंज येथील अभिषेक उर्फ चंदन गुप्ता यांच्या क्रूर हत्येप्रकरणी मुस्लिम समुदायातील २८ आरोपींना दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर २ आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष सोडले. चंदनच्या तिरंगा यात्रेदरम्यान मुस्लिम समुदायातील लोकांनी ही भयानक हत्या केली.
*आजीवन कारावासाच्या शिक्षेव्यतिरिक्त, न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि तो म्हणजे सर्वोच्च वकिलांच्या पैशासाठी संगनमत, ज्यावर सर्वोच्च न्यायालय आणि प्रत्येक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डोळेझाक करतात.*
न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी शिक्षा सुनावताना, *"गुन्हेगारांचे रक्षण करण्यात गुंतलेल्या राष्ट्रीय आणि परदेशी स्वयंसेवी संस्था"* च्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्यावर अंकुश लावण्यासाठी त्यांच्या आदेशाची प्रत केंद्रीय गृह मंत्रालय आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाला पाठवली.
*न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी त्यांच्या आदेशात असेही म्हटले आहे की, "या स्वयंसेवी संस्थांना कुठून निधी दिला जात आहे, त्यांना कोण निधी देत आहे, त्यांचे सामूहिक उद्दिष्ट काय आहे याची चौकशी करावी; असा आरोप आहे की जेव्हा जेव्हा एखादा दहशतवादी पकडला जातो तेव्हा अशा स्वयंसेवी संस्था त्याच्या बाजूने वकिली करण्यासाठी आणि त्याला निधी देण्यासाठी मोठी नावे पुढे करतात आणि ही देशासाठी मोठी चिंतेची बाब आहे*”
न्यायालयाने त्यांच्या आदेशात खालील ७ स्वयंसेवी संस्था / संघटनांची नावे दिली आहेत, उदा.
१. न्याय आणि शांतीचे नागरिक, मुंबई;
२. पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज, दिल्ली;
३. रिहाई मंच;
४. अलायन्स फॉर जस्टिस अँड अकाउंटेबिलिटी, न्यू यॉर्क;
५. इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल, वॉशिंग्टन डीसी;
६. साउथ एशिया सॉलिडॅरिटी ग्रुप, लंडन;
७. जमियत उलेमा हिंदचा कायदेशीर विभाग
न्यायाधीश त्रिपाठी यांचा आदेश खरोखरच ऐतिहासिक आहे आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही अशीच मागणी केली होती. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या वकिलांचे शुल्क किती आहे, ते सार्वजनिक क्षेत्रात असले पाहिजे आणि त्यांचे मालमत्ता आणि दायित्व विवरणपत्र देखील सार्वजनिक माहितीसाठी प्रसिद्ध केले पाहिजे. त्यांनी दरवर्षी किती उत्पन्न कर भरला आहे हे देखील जाहीर केले पाहिजे; वकिलांचे शुल्क फक्त चेक/बँकिंग चॅनेलद्वारे घेतले पाहिजे;
सर्वोच्च न्यायालयाच्या ६ प्रमुख वकिलांकडून त्यांचे शुल्क कोणी दिले याबद्दल शपथपत्रे मागितली पाहिजेत, जेणेकरून निधी कोणत्याही दहशतवादी संघटनेने दिला आहे की नाही हे निश्चित करता येईल.
रोहिंग्या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याची मागणी करणारी अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांची याचिका २०१७ पासून प्रलंबित आहे.
भिकाऱ्यांसारखे दिसणारे मोहम्मद सलीमुल्ला आणि मोहम्मद शाकीर या दोन रोहिंग्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ६ उच्च श्रेणीचे वकील हजर झाले. हे वकील होते - डॉ. राजीव धवन, प्रशांत भूषण, डॉ. अश्विनी कुमार, कॉलिन गोन्साल्विस, फली नरिमन (आता मृत) आणि कपिल सिब्बल.
जबरदस्तीने धर्मांतर थांबवण्यासाठी अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेला १० प्रमुख वकील विरोध करत आहेत.
उपाध्याय यांच्या प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेला २२ प्रमुख वकील विरोध करत आहेत. यामध्ये खासदार, आमदार आणि माजी कायदा मंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि शिक्षण मंत्री यांचा समावेश आहे.
अशा वकिलांमुळेच तो खटला अजूनही प्रलंबित आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्येच, आणखी एका स्वयंसेवी संस्थेने - सोशल ज्युरिस्ट - रोहिंग्या मुस्लिमांसाठी त्यांचे हृदय तुटले आणि त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि केंद्राला "रोहिंग्या निर्वासितांच्या मुलांना" सार्वजनिक शाळांमध्ये प्रवेश देण्याचा आदेश देण्याची मागणी केली.
जेव्हा उच्च न्यायालयाने रोहिंग्या परदेशी आहेत आणि त्यांना देशात प्रवेश करण्याची कायदेशीर परवानगी नाही आणि ते देशाच्या सुरक्षेसाठी धोका आहेत असे म्हणत याचिका फेटाळून लावली, तेव्हा ही स्वयंसेवी संस्था आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे - त्यांना निधी कोण देत आहे ????
असे अनेक वकील आणि स्वयंसेवी संस्था आहेत, त्या सर्वांच्या निधीची चौकशी झाली पाहिजे.
*देशाच्या हितासाठी, कृपया हा संदेश शक्य तितका फॉरवर्ड करा, जेणेकरून हुकूमशाही आणि असंवेदनशील न्यायव्यवस्था जनतेला जबाबदार असेल.*
B: *स्वारगेट सारख्या घटना अशा बेपर्वाई आणि सावधानता न बाळगल्याने घडतात. आपण आपल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात कुठेतरी कमी पडतो याची जाणीव होते. पण काही लोक कसलाही सारासार विचार न करता त्याबद्दल सरकारला आणि सुरक्षा यंत्रणेला दोषी ठरवतात.*
A: कायदा आणि सुव्यवस्था यांचा बोजवारा उडालेला महाराष्ट्र मध्ये उघड उघड दिसत असताना अशा घटना घडल्यावर टीका होणे साहजिकच आहे. त्यातून धडा घेऊन सुधारणे हे अपेक्षित आहे. राजकारणी त्यांच्या
सत्तालोलुपतेपोटी, काय आदर्श समाजापुढे ठेवताय ते उघड दिसत असताना गप्प राहून कसे चालेल.
अक्षम्य विलंबाने न्याय मिळणे हेही एक अत्यंत महत्त्वाचे कारण सध्याच्या दुरावस्थेसाठी आहे
B: 😂. 🙆🏼♂️. 🤷🏼♂️. 🤦🏼♂️
*अशा घटनांवर टीका करणे यात काहीच गैर नाही, मग सरकार कोणाचेही असो. तसेच अशा निर्घृण अत्याचाराचा गाजावाजा झालाच पाहिजे. अन्यथा या मानवी विचारांचे विकृत स्वरुप आणि सामाजिक दूराचार लोकांपुढे येणार नाही. परंतु अशा घटना महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार , फार कशाला सर्व देशांत गेली अनेक दशके सर्रास घडत होत्या त्यावर सगळे मूग गिळून गप्प होते. तेव्हा तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हता तर सामाजिक समस्या होता. आणि जेव्हा योगी सारख्या सक्षम मुख्यमंत्र्यांने अशा निर्दयी विकृत लोकांच्या तंगड्या तोडायला सुरुवात केली आणि त्याचे एन्काऊंटर व्हायला लागले तेव्हा ज्ञानी समाजसेवकांचे वैयक्तिक हक्कांची पायमल्ली झाली म्हणून रडणे आणि आक्रोश करणे सुरु झाले. आजही तेच होते आहे. सर्व राजकारण्यांनी आणि सामान्यनागरिकांनी समाजापुढे आदर्श ठेवायचे असतात. पण त्याची सुरुवात प्रत्येक घरातुन होते. आपली न्यायव्यवस्था सामान्य जनांना तत्परतेने न्याय देत नाही हे सर्वश्रुत आहे. ती व्यवस्था राजकीय आश्रयाने गेल्या अनेक दशकांत प्रस्थापित झाली आहे. पूर्वीची सरकारे, राजकारणी आणि पोलिस यंत्रणा यांचे साटेलोटे होते. मोदी या अन्यायावर अनेक वेळा उघड भाष्य करतात. तो दूर करण्यासाठी आपल्या न्यायव्यवस्थेत अमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे. ती प्रक्रिया हळूहळू सुरु आहे. त्यात गुंडांना, देशविघातकांना राजाश्रय देणारे विरोधी सतत बाधा आणत आहेत. ही लढाई खुप मोठी आणि खडतर आहे. पण ती लढावीच लागणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नितिमत्ता बाजुला ठेवुन चाबुक हातात घेणे आवश्यक आहे. न्यायव्यवस्थेवर अवलंबून राहाण्यात अर्थ नाही. पण आपण याचा गाजावाजा करत आहात ते फारच छान आहे.*
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)