गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२

"रद्दी'चे महाभारत ! ": 😊

 👍"रद्दी'चे महाभारत ! ": 😊

हल्ली वर्तमानपत्रांमध्ये वाचायला काही विशेष नसतं. ज्या बातम्या असतात त्यापैकी बऱ्याचशा विविध प्रकारची
गुन्हेगारी किती वाढत चालली आहे, त्याचेच भयानक दर्शन घडविणाऱ्या किंवा व्यवस्थेमध्ये किती, कुठे कशात त्रुटी आहेत ते दाखवणाऱ्या अथवा राजकीय सुंदोपसुंदी आणि त्यातून निर्माण होणारा गदारोळ, इ.इ. अशा मन उद्विग्न  करणाऱ्या बातम्या अधिक असतात.

त्यापेक्षा वासरात लंगडी गाय शहाणी असल्याप्रमाणे,
'पुरवणी' बऱ्यापैकी वाचनीय असते. विशेषत: त्यामधील शब्दकोडे सोडविल्याशिवाय दिवस जात नाही आणि तेच वर्तमानपत्रातले एकमेव (बहुतेकांसाठी) विशेष आकर्षण असते ! पुरवणीमध्ये काही वेधक व्यक्तिमत्वे किंवा समाज उपयोगी काही कार्य होत असल्याचे पुरावे देणारेही वाचनीय असते. तसेच माहितीपर ज्ञानात भर घालणारे वाचन करावयाला तेथे थोडाफार वाव मिळतो. सारांश रोजचा पेपर हा अगदी टाकाऊ म्हटला नाही, तरी पूर्वीसारखा वाचावासा वाटतोच असं नाही. कारण अग्रलेखांचाही दर्जाही तसा
सुमारच असतो. बहुदा मीडियावर हा विशिष्ट अशा समूहाचे नियंत्रण असल्यामुळे, असे होत असावे.

पण रोज रतीब वर्तमानपत्रांचा होणे अपरिहार्य असल्यामुळे, रद्दी मात्र खूप साठते. शहराप्रमाणे रद्दीचे भाव वेगळे वेगळे असतात. पुण्यामध्ये रद्दीला वीस रुपये भाव आहे हे आम्हाला समजले. त्या उलट मुंबईमध्ये दहा रुपये मिळाले तरी खूप अशी तफावत आहे ! वाचनापेक्षा या रद्दीचेच अधिक महत्त्व त्यामुळे वाढत चालले आहे की काय असे वाटते ! एकंदरच सामाजिक बाजारू वृत्ती वाढत जाण्यामुळे
सार्वत्रिक ह्रास अटळ असल्यामुळे मीडिया बाबतीत सुद्धा आपल्याला तसे चित्र दिसणे साहजिक आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे. ते बरोबर किंवा चूक हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. मला केवळ आज वर्तमानपत्र हा विषय चिंतनासाठी घ्यावासा वाटला, कारण कालच आम्ही तुडुंब अशी रद्दी विकली आणि तीच माझ्या घर मनात घर करून राहिली आणि काळ्यावर पांढरे हे असे उमटले !

धन्यवाद
सुधाकर नातू

ताजा कलम
😊 "खरं म्हणजे, नुकताच 'अक्षर' दिवाळी अंक'22,  मी थोडाफार चाळण्यासारखा वाचला आणि "दिवाळी अंकांची मांदियाळी"सदरामध्षे लेखन करावं असं वाटलं खरं, पण अंक बाजूला राहिला आणि हे "रद्दीचे महाभारत" माझ्याकडून लिहून गेले.
'अक्षर' वांग्मयाची चिरफाड पुढच्या लेखात करता येईल ! 

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

👍👍नाव हाच ठेवा !":👍👍

 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

"नाव हाच ठेवा !":
कुठलेही नाव घेतले की ठराविक व्यक्तींच्या प्रतिमा आपोआप मनात उमटतात.... .

# "मनमोहन" म्हटलं की.....
ताबडतोब आठवतात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग...
व जुन्या जमान्यातले विख्यात चरित्र अभिनेते मनमोहन कृष्ण !
किंवा
'ती पहा, ती पहा...'सारखी अजरामर कविता लिहिणारे कवी मनमोहन नातू
आणि आणि.....
मनमोहन म्हटलं की अर्थातच जीवन तत्वज्ञान उलगडणारं, 'भगवद् गीते' सारखं महाकाव्य अर्जुनाला सांगणारा....
योग योगेश्वर भगवान श्रीकृष्ण !....

# "नेताजी" म्हटलं की.....
अर्थातच समोर येतात भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात असीम योगदान देणारे, सेनापती नेताजी सुभाष चंद्र बोस....
किंवा लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा आडविणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नेताजी मुलायम सिंग...

# "आचार्य" म्हटलं की......
प्रथम आठवतात, भूदान चळवळीचे प्रणेते...
आचार्य विनोबा भावे !
तसेच आचार्य दादा धर्माधिकारी
आणि
'दहा हजार वर्षात' एकमेव असे वक्ते व चतुरस्त्र व्यक्तिमत्व आचार्य अत्रे !

# "राजेश" म्हटलं की....
अर्थातच डोळ्यासमोर येतो तो...
हिंदी चित्रपट सृष्टीतील एकमेव सुपरस्टार...
one & only one राजेश खन्ना

# "राहुल" म्हटलं की.....
साहजिकच समोर येतात भारताच्या तीन माजी पंतप्रधानांचा अलौकिक वारसा, "भारत जोडो" पदयात्रेतून पुढे नेणारे राहुल गांधी
आणि राहुल म्हटलं की "दिलवाले दुल्हनिया  ले जायेंगे" सारख्या विक्रमी चित्रपटातील राहुल...
अर्थात. किंग शाहरुख खान !.....

# "सिंधू"म्हटलं की,,,,
अर्थातच डोळ्यासमोर येतात अनेक अनाथांच्या पालनकर्त्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ
आणि
"सिंधू" म्हटलं की भाषा प्रभू राम गडकरी गणेश गडकरींच्या 'एकच प्याला' मधली अभागी सिंधू दुःख संकटे सहन करणारी बिचारी सिंधू !...

हा "नाव हाच ठेवा" सिलसिला वाचकही अशाच कल्पनाशक्तीवर पुढे पुढे नेऊ शकतात.....

अखेरीस...
# "सुधाकर" म्हटलं की नजरेसमोर येतो...
'एकच प्याला' मधील दारूच्या पूर्ण आहारी जाऊन आयुष्याची बरबादी करून घेणारा..
दुर्दैवी वकील..सुधाकर !
आणि.....
आणि...
अशा "एकमेवाद्वितीय नावाचा ठेवा"..
ज्याच्या नशिबात जन्माबरोबर लिहिला गेला...
तो मी सुधाकरच !

धन्यवाद
सुधाकर  नातू
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

👍"शनी आठवा: संबंधीची फळे!:"👌

 शनी आठवा: संबंधीची फळे:                                               आता जन्मपत्रिकेत ज्या स्थानी शनी असतो, त्याचे परिणाम पाहू. शनी पत्रिकेत ज्या स्थानापासून आठवा असतो, त्या स्थानासंबंधीची फळे, नुकसानकारक, त्रासदायक मिळण्याची शक्यता असते.


प्रथम स्थानी डोक्यावर शनी म्हणजे पत्रिकेतील रोगस्थान-सहाव्या स्थानाला तो आठवा असेल. म्हणून मानसिक चिंता, सातत्याने काही ना काही आजार अशी फळे.

दुसर्या स्थानचा शनी पत्रिकेतील विवाहस्थानाला आठवा, त्यामुळे विवाहजुळणीत अडचणी विलंबाने विवाह आणि वैवाहिक कौटूंबिक सुखात बाधा.

तिसर्या स्थानातील शनी, पत्रिकेतील आठव्या स्थानाला आठवा, म्हणून शारिरीक अपंगत्व परावलंबित्व देणारे रोग वा प्रसंग आणि हाल होऊन म्रुत्यू होण्याचा धोका.

चौथ्या स्थानांतील शनी पत्रिकेतील भाग्यस्थानाला आठवा होतो, त्यामुळे संधी डावलल्या जाणे, ईप्सित फळे व अपेक्षा पुरी न होणे वा त्यासाठी खूप कष्ट विलंब, ही फळे.

पाचव्या स्थानचा शनी पत्रिकेतील व्यवसायस्थानाला आठवा, म्हणून अशा माणसांनी धंद्यात पडू नये, नोकरीतही अपेक्षाभंग, मनस्ताप अडचणी, ही फळे.

सहाव्या स्थानचा शनी पत्रिकेतील लाभस्थानापासून आठवा, म्हणून संधी हुकणे, नुकसानीचे योग ही फळे मिळण्याची शक्यता.

सातव्या स्थानी-विवाहस्थानी शनी, पत्रिकेतील व्यय स्थानाला आठवा, म्हणून विवाहाला विलंब, आर्थिक नुकसान वा फसवणूक.

आठव्या स्थानी शनी हा पत्रिकेच्या प्रथमस्थानाला आठवा, त्यामुळे खडतर मंदगतीने प्रगती करणारं जीवन.

नवम-म्हणजे भाग्यस्थानचा शनी पत्रिकेच्या द्वितीय म्हणजे धन वा कौटुंबिक स्थानाला आठवा, त्यामुळे आर्थिक ओढाताण, कौटुंबिक कलह अशी फळे मिळू शकतात.

दशमस्थानचा शनी हा पत्रिकेतील त्रुतीय स्थानाला आठवा, त्यामुळे भावंडाशी मतभेद, प्रवासात कष्ट, अपघाताचा धोका.

लाभ अथवा अकराव्या स्थानचा शनी, पत्रिकेतील चतुर्थ अर्थात मात्रुस्थान सुखस्थानाला आठवा होतो, म्हणून मात्रुसुखात अडचणी, वियोग, मानसिक विवंचना अशी अनिष्ट फळे.

व्ययस्थानचा अर्थात बाराव्या स्थानी शनी असेल, तर तो पंचम म्हणजे विद्याभ्यास, संततीस्थानाला आठवा, त्यामुळे शिक्षणात अपेक्षाभंग, संतती विलंबाने व त्यांच्याशी मतभेद.
ही फळे विचारात घेताना पत्रिकेतील इतर शुभाशुभ ग्रहयोगांचा सखोल विचार करणेही आवश्यक आहे. वरील निरीक्षणे ही केवळ दिशादर्शनासाठी दिली आहेत.

शनीचा दाब:
शनिमहात्म्याच्या ह्या अखेरच्या विवेचनात विवाहजुळणीत शनीचा दाब असणे म्हणजे काय, ते पाहू. गुणमेलन करताना विवाहजुळणीत मंगळदोष असेल, अर्थात पत्रिकेत मंगळ प्रथम, चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानी असेल तर अशा वेळी जी पत्रिका अशा पत्रिकेशी जुळवायची असेल तिच्यातही मंगळदोष असावाच लागतो. तसा तो नसेल, तर गुण जमुनही विवाहासाठी ती पत्रिका जुळत नाही. ह्याला फक्त एकच अपवाद आणि तो म्हणजे, जर मंगळदोष नसलेल्या पत्रिकेत जर शनीचा दाब असेल तर ती पत्रिका मंगळदोष असणाऱ्या पत्रिकेशी गुण जुळत असतील तर विवाहासाठी चालू शकते. आता शनीचा दाब म्हणजे पत्रिकेत जर शनी प्रथम, पंचम सप्तम किंवा दशम स्थानी असणे. मंगळदोष व शनीचा दाब ठरविताना ह्या दोन ग्रहांच्या पत्रिकेतील स्थानावरून सातव्या अर्थात विवाहस्थानच्या द्रुष्टिचा विचार घेतलेला आढळून येईल.             

 
धन्यवाद
सुधाकर नातू 

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

👍अशी ही रामनामाची कहाणी"!:👌

 👍"अशी ही रामनामाची कहाणी"!:👌

हा मुलगा खरं म्हणजे परीक्षेत नेहमी नापास व्हायचा आणि झालाच पास, तर अगदी काठावर! पण एकदा त्याला वाटले की आपण चांगले मार्क मिळवावेत, पहिला यावे आणि वर्गामध्ये आपला दिमाख दाखवावा. त्याप्रमाणे त्यांने त्या वर्षी, खूप खूप अभ्यास केला आणि त्या इयत्तेत, तो एकदम उत्कृष्ट गुण मिळवून, चक्क पहिला आला आणि पुढच्या वर्गात गेला. सगळीकडे त्याचे कौतूक व गुणगान होऊ लागले.

पण नंतर झालं काय की, पहिला येण्याचा त्याला नको इतका अभिमान वाटू लागला, गर्व चढला आणि ती हवा त्याच्या डोक्यात गेली. आपण म्हणजे कोण, आपण काहीही करू शकतो, आपण अती हुशार असं समजून, तो वर्षभर उनाडक्या करत, मनाला येईल तसे वागत राहिला, अभ्यास सोडून वाटेल ते करत राहिला. आपल्याला कोण विचारतो आपण पहिले आलो, अशा दिमाखात वर्षभर मनमुरादपणे वावरला.

आणि अचानक उद्या परीक्षा आहे, हे त्या एका रात्री लक्षात येऊन, तो एकदम खडबडून जागा झाला. त्याला लक्षात आलं की, अरे आपण तर काहीच अभ्यास केला नाही. आता कसं होणार आपलं, एका रात्रीत वर्षाचा अभ्यास कसा होणार? काय करावे अन् काय काय करू नये हेच मुळी काही केल्या त्याला कळेच ना! 

अशा वेळेला आपण जर नापास झालो, तर आपलं काय राहिलं, मागच्या वर्षी पहिले आलेलो आता परत त्याच वर्गात नापास होऊन राहायचं ह्या कल्पनेने त्याचा जीव घाबराघुबरा झाला. चिंता वाढू लागली. मग काय, अशा वेळेला सगळी माणसं जे करतात, तेच करायचं त्याने ठरवलं. देवाचा धावा, रामनाम घेत तो रात्र काढू लागला. ह्यामुळे आपण पास होऊ अशी, आपली समजूत त्याने करून घेतली. 

आपल्या मुलाची ही अवस्था बघून, त्याच्या पालकांनाही लक्षात आलं की, अरे हा मुलगा तर वाया गेला. त्याने वर्षभर काहीच अभ्यास केला नाही. तर कसं होणार आता त्याचं? म्हणून त्यांच्या चिंता वाढू लागल्या. बिचार्यांची सारी भिस्त ह्या मुलावर अवलंबून होती. मग काय, त्यांनी पण रामनाम जप सुरू केला. त्यांतले त्यात, एक गोष्ट बरी होती की, वर्गातल्या इतर मुलांची अवस्था काही वेगळी नव्हती. हेच एकमेव समाधान होते. अशा वेळेला कोण पास होणार, कोण नापास होणार होणार, ह्याची उत्सुकता साऱ्यांनाच लागू लागली. 

अशी ही रामनामाची कहाणी!

धन्यवाद 

सुधाकर नातू 

👍"Looking Within!":😄

 

👍"Looking Within!":😄

Here are few of my notings in my learning Diary:
:1. Paradigm shift is seeing the 'Picture' in yet another way.                                        :2.Principles are like the path guiding ''Light Houses' that are stationary and can't be altered.                             
3.The objective 'Reality' is composed of 'Light House like Principles. Principles are 'Territory, Values are Maps. Various Principles are Fairness, Equity and Justice, Integrity, Honesty, Trust, Human Dignity, Service, Idea of contribution, Quality or Excellence, Growth potential, Patience, Nurturing, Encouragement,etc. etc.        
:4.Principles are classic truths that never change nor get affected.                        
5. To relate with anyone, we must first learn to listen.       
6.Value of sharing promotes respect to one another but
borrowing strength builds up weakness.                          
:7.Management is doing things right, Leadership is doing the right things.          Power, Security, Guidance, Wisdom are 4 stand alone virtues and strengths.      
:8.We are what we repeatedly do, excellence  then is not an act but a habit.                                  
:9.Time Management Matrix is divided into 4 quadrants:  1.Urgent and Important, 2. Important but not Urgent, 3. Urgent but not Important and finally, 4. Neither Urgent, Nor  Important.        
:10.The only thing that no one, no force can take away from us, is our freedom to choose the Response to a given situation.                  
:11.Self awareness,  imagination, conscience,  independent will are the tools at hand to understand and respond.
And finally,
👍"Being a perfectionist in every walk of Life, happens to be dangerous due to
"चालसे कल्चर" Everywhere!":😂

Sudhakar Natu

👍"लक्षवेध !":👌

 👍"लक्षवेध !":👌

👍"शहरातील  वा गावोगावीची सार्वजनिक वाहतूक  व्यवस्था किती सुधारायला  हवी  ते सांगणारे दृश्य!"😂

👍"एकमेकां सहाह्य करू, अवघे  धरू सुपंथ!":👌🌹

👍"टेलिरंजन!":😄
👍'स्टार प्रवाह'वरील "लग्नाची बेडी" मधली सिंधु, सुरवातीपासूनच डोक्यात जात आहे!
अशी सुनबाई कद्धी कद्धी,
नको ग बाई!!"😄

😂 'सन'टीव्ही वरील 'माझीं माणसं' मालिकेत, हर्षदाचा विघ्नेशच्या मामाकडून बळजबरीने गर्भापात करण्याचा प्रकार अक्षरशः अमानुष होता.😂
👍असले प्रसंग दाखविलेच जाता कामा नयेत. ह्यासाठीच टीव्ही मालिका Sensor केल्या जाव्यात!"😄

👍"मराठी चित्रपट प्राईम टाइम पासून मल्टिप्लेक्स मध्ये वंचित  ठेवले  जातात हे दुर्देवच !
परंतु  नाण्याला दुसरी  बाजू अशीही  असू शकते : आपले  किती मराठी  चित्रपट गर्दी खेचतील ह्याची शाश्वती पुष्कळदा नसते ह्या कटू सत्याच्यामुळे, असे होत तर  नसेल?😄

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा 15 !":💐

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा 15 !":💐


माझ्या 2010 वर्षाच्या दैनंदिनीमधील वैशिष्ट्यपूर्ण नोंदींसंबंधी ही लेखमाला मी लिहीत आहे. त्यातील हा पुढचा लेख देखील तुम्हाला आवडेल असे वाटते.

@ 21 नोव्हेंबर 💐

👍"दिनविशेष !":👌
# 1963 विनोदी लेखक चिमणराव फेम टीव्ही जोशी यांचा मृत्यू
# 1927 नाटककार यांना नवरे यांचा जन्म
##########################

👍विशेष नोंद !":💐
# एटीएमः ऑटोमॅटिक टेलर मशीन
# 'ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम' हे पुस्तक स्टीफन हॉकिंग यांनी लिहिले
# 'बुकर' पारितोषक प्रथम मिळालेली पहिली भारतीय महिला अरुंधती रॉय 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्स' पुस्तकलेखनासाठी
# म्यानामार मधील स्वातंत्र्यासाठी वीस वर्षे तुरुंगवास मोगणारी नोबेल विजेती महिला 'आंग सान सून की'
##########################

@ 22 नोव्हेंबर !:💐

👍"विशेष नोंद !":👌
# सरोद वादनात निपुण अमजद अली खान
# सतार वादनात निपुण भारतरत्न रविशंकर
# बासरी वादनात निपुण हरिप्रसाद चौरसिया
# सनई वादनात निपुण भारतरत्न बिस्मिल्ला खान
# तबलावादनात निपुण अल्लारखा
# हार्मोनियम वादनात निपुण गोविंदराव टेंबे आणि पटवर्धन
# विजापूरचा गोल घुमट प्रसिद्ध आहे
,# जायकवाडी धरण विद्युत प्रकल्प गोदावरी नदीवर बांधले आहे
# 'ए सुटेबल एस टेबल बॉय' पुस्तकाचे लेखक विक्रम शेठ
# 'सेवन हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल पीपल' याचे लेखक स्टीफन कुवी
# जागतिक ग्राहक दिन 15 मार्च
# भारतातील महिला पहिला तेल शुद्धीकरणाचा कारखाना प्रथम दिब्रुगड येथे झाला
# सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे # कॉफी सर्वात जास्त ब्राझीलमध्ये होते
##########################

@ 23 नोव्हेंबर !:💐

👍विशेष नोंद !":👌
# बराक ओबामा हे अमेरिकेचे 44 अध्यक्ष
# अबुजा ही नायजेरियाची राजधानी आहे
# चीनमध्ये प्रथम ॲक्युप्रेशर थिअरी' चा शोध
लागला.
##########################

@ 24 नोव्हेंबर !":💐

👍विशेष नोंद !":👌
# 'एडवेंचर्स ऑफ टॉम सॉयर' हे पुस्तक मार्क ट्वेन यांनी लिहिले
# अलेक्झांड्रिया हे शहर एक ईजिप्तमध्ये आहे
# आखाती कुवैत इराक युद्ध 1991 मध्ये झाले.
##########################

@ 25 नोव्हेंबर !:💐

👍"दिनविशेष !:💐
# 1950 विख्यात निवेदक श्री सुधीर गाडगीळ यांचा जन्म
##########################

👍विशेष नोंद !":👌
# आज आमच्या विवाहाला 39 वर्षे पूर्ण झाली. किंबहुना प्रथमच अशा विवाहाच्या वाढदिवसाच्या दिवशी पती आणि पत्नी असे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी होतो. जवळच्याच एका नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे ही वेळ आली होती. हे लिहीत असतानाच सह्याद्री वाहिनीवर 'भेट तुझी माझी स्मरते अजूनही त्या दिसाची' ! हे गीत लागावे ही देखील योगायोगाची अतर्क्यच गोष्ट.

पावसाळ्याच्याच अशाच एका रात्री भुसावळ स्टेशनवर मी माझ्या पत्नीला 39 वर्षांपूर्वी प्रथम पाहिले अन् नंतर, जी आयुष्याला चांगल्या सहजीवनाची कलाटणी योगायोगाने मिळाली, ती अशी येथपर्यंत आली व अजूनही आमचे सहजीवन तसेच पुढे चालावे हीच प्रभु चरणी प्रार्थना.

एकंदर गेले दोन दिवस कडू आणि गोड अशाच आठवणींचे म्हणावयाचे.
##########################

@ 26 नोव्हेंबर !:💐
👍विशेष नोंद !":👌
# ☺️वाढदिवस लेखक डॉक्टर यशवंत पाठक लेखिका वीणा देव
##########################

@ 27 नोव्हेंबर !":💐

👍विशेष नोंद !":👌
# आज दिवस घरीच वाचन तसेच आराम व रात्री खुसखुशीत 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा '
झी टीव्ही'वर कार्यक्रम पहाण्यात घालवला.
# उषा दर्डा, पूर्वीच्या पुरोहित व जवाहरलाल दर्डा (लोकमत समुहाचे संस्थापक) यांच्या पत्नी. त्यांचे 'योगायोग' हे आत्मचरित्र वाचले. एखाद्याचे जीवन किती नाट्यमय, उलथापालथीचे अतर्क्य घटनांचे असते, ते समर्पक नांव असलेल्या या पुस्तकांने ठसवले. एका दमात सारे पुस्तक वाचून झाले, त्यातच त्याचे वैशिष्ट्य आले !
##########################

@ 29 नोव्हेंबर !":💐

👍विशेष नोंद !":👌
# यंदाचा 'डेविस कप' सर्बियाने जिंकला
# 'वोल्वो' ही कंपनी स्वीडन मधील आहे.
# अद्याप अस्तित्वातील सर्वात जुने रेल्वे इंजिन लिव्हर पूल रेल्वे स्टेशन येथे आहे.
# 'अकबरनामा' पुस्तक अबुल फजल यांनी लिहिले. # राष्ट्रीय जनता दल 1997 मध्ये स्थापन झाले. #;भारतातर्फे 'एशियन गेम्स'मध्ये पहिले सुवर्णपदक 'वेटलिफ्टिंग'मध्ये श्रीनिवास राव वेल्लुरी यांनी मिळवले.
##########################

@ 30 नोव्हेंबर !:💐

👍"दिनविशेष !:👌
# वाढदिवस सचिन जकातदार (सचिन ट्रॅव्हलचे व्यवस्थापकीय संचालक)
##########################

👍"दिनविशेष !:💐
# एखादी गोष्ट तत्परतेने करणे, योग्य त्या प्राधान्याचा विचार करून करणे, अत्यंत महत्त्वाचे असते, हे मी 'स्कॅनरच्या ड्रायव्हर इन्स्टॉल' करण्याच्या अनुभवावरून शिकलो. गेले कित्येक दिवस तो 'ड्रायव्हर' माझ्या लॅपटॉपवर अपलोड होतच नव्हता. लॅपटॉप रिपेअर करून तो 'ड्रायव्हर' खरं म्हणजे डाउनलोड करून शुक्रवारी सायंकाळी आणला होता. परंतु त्याची ओपन-ऑपरेट होण्याची चाचणी लगेच न घेता, मी आळस केला. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ-साडेनऊला जायचे आहे हे माहीत असूनही, दादरला निघण्याच्या वेळेआधी फक्त पंधरा मिनिटे आधी ते काम करण्याचे उद्योग मी केले. जाण्याच्या घाईत लॅपटॉप कसा बंद केला देव जाणे ! त्यानंतर आजतागायत दोन-तीन दिवसात तो 'ड्रायव्हर' काही केल्या इन्स्टॉल होत नाही. खरे म्हणजे टेस्ट करताना शनिवारी ओपन होत होता.
पूर्ण वेळ देऊन प्रारंभीच हे उद्योग केले असते, तर माझे काम मार्गी लागले असते, अशी चुटपुट आता मला लागली आहे. योग्य त्या 'प्रायोरिटी'प्रमाणे काम करावे हा अनुभव शिकलो !
##########################

धन्यवाद
सुधाकर नातू

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा 14 !":💐

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा 14 !":💐

माझ्या 2010 वर्षाच्या दैनंदिनीमधील वैशिष्ट्यपूर्ण नोंदींसंबंधी ही लेखमाला मी लिहीत आहे. त्यातील हा पुढचा लेख देखील तुम्हाला आवडेल असे वाटते.

@ 15 नोव्हेंबर 👌

👍 दिनविशेष 👌
# 1825 अमेरिकेत जहाजांसाठी लाकडा ऐवजी प्रथमच लोखंडाचा वापर सुरू झाला
# 1915 क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे फासावर
# 1917 संगीतकार दत्ता डावजेकरांचा जन्म
# 1929 लेखिका शिरीष पैं चा जन्म
# 1949 महात्मा गांधीच्या हत्येमधले नथुराम गोडसे व नारायण आपटे फासावर
# 1956 आचार्य अत्रे यांचे दैनिक मराठा चालू झाले.
# 1982 भूदान चळवळीचे पुरस्कर्ते आचार्य विनोबा भावे यांचे निधन
# 2000 झारखंड हे भारताचे 28 वे घटक राज्य म्हणून अस्तित्वात आले.
##########################

👍विशेष नोंद 👌
# काल जो आज जो अनुभव आला त्यावरून एक धडा घेतला की, जे आपल्याला जमत नाही वा ज्यामुळे शरीर व मनाला इजा पोहोचू शकते व आपल्याला कुठलेही समाधान मिळू शकणार नाही असे वाटते, अशा गोष्टी करण्याचा निर्णय घेऊच नये.

थोडक्यात प्रत्येक क्षणी प्रत्येक निर्णय योग्यायोग्यतेचा विचार करूनच घ्यावा त्यातच आपले हित असते.
##########################

@ 16 नोव्हेंबर 👌💐

👍विशेष नोंद 👌
# एस ए ए आर सी: "साउथ एशिया असोसिएशन फॉर रीजनल कॉर्पोरेशन"
# यूजीसी चे सध्याचे अध्यक्ष सुखदेव थोरात
# जयपूर शहर हे सन सिटी म्हणून ओळखले जाते.
# कार्डियाक स्पेस मेकर चा शोध 1932 मध्ये लागला
# डॉक्टर क्लारेंट्स लिलेहाय यांना ओपन हार्ट सर्जरीचा जनक संबोधतात
##########################

@ 17 नोव्हेंबर 👌💐

👍विशेष नोंद 👌
# हा दिवस इंटरनॅशनल स्टुडंट्स डे मानला जातो
# सायप्रसची राजधानी निकोशिया
# जंतर मंतर ही वास्तू वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केली गेली आहे.
# एफडीआयः फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट
# नुकतीच मुंबईच्या समुद्रात MS चित्रा ही रासायनिक द्रव्य घेऊन जाणारी बोट कलंडली होती.
##########################

👍सुविचार 👌💐

"जे काही आपण काम करतो, एखादी जबाबदारी योग्य त्या खबरदारीने नीटनेटकेपणाने पूर्ण करतो, त्या प्रोसेस मध्ये योग्य त्या समयसुचकतेची खबरदारी घेतली, तर त्या साऱ्या अनुभवात आपल्या आंतरिक सिस्टीमला एक वेगळे समाधान आनंद लाभतो. आपणच परीक्षा घेत आहोत, असे वाटून आपण आपला प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस सोन्याचा करू शकतो.

ज्याचे त्याचे अनुभवविश्व, वेगळे ज्याचे त्याचे आकाश वेगळे ! त्याप्रमाणे आपल्याला ते जे ज्यावेळी जसे करावेसे वाटते, ते ते आपण सर्वोत्तम तऱ्हेने केले की झाले. बाह्य फळापेक्षा हे आंतरिक मनाचे फळ आपल्याला ताजेतवाने ठेवते आणि आपले मोटिवेशन कायम राखते !
##########################

@ 18 नोव्हेंबर 👌💐

👍विशेष नोंद 👌
# भारतीयांना दिले जाणारे यूआयडी क्रमांक 16 अंकांचे असतील.
# शास्त्रीय संशोधनासाठी डॉ शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार देतात
# राज्यसभेच्या पहिल्या अभिनेत्री सभासद
नर्गिस दत्त !
##########################

@ 19 नोव्हेंबर 👌💐

👍विशेष नोंद 👌
# "एपीईसी": एशिया पॅसिफिक इकॉनोमिक कोऑपरेशन
# बायफोकल लेन्सचा शोध बेंजामिन फ्रँकलिनने लावला
# गोल्फ खेळ सर्वप्रथम स्कॉटलंड मध्ये खेळला गेला.
# ढाक्का हे मशीनचे शहर म्हणून ओळखले जाते.
# लॉरा चिंचिला या कोस्टारिकाच्या महिला अध्यक्ष
# भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले परदेशी, खान अब्दुल खान.
# दिल्लीत 2012 मध्ये साउथ एशियन गेम्स होतील.
# "आयएईए": 'इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजन्सी
# 'नो कंट्री फॉर वुमन !' पुस्तकाच्या लेखिका तसलीमा नसरीन
# सोळावी सार्क परिषद भूतान मध्ये एप्रिल 2010 मध्ये भरली
# "बीआरआयसी": ब्राझील रशिया इंडिया चायना. # 26 एप्रिल हा बौद्धिक संपदा दिन म्हणून ओळखला जातो
# डुरांट चषक फुटबॉलची निगडित आहे.
##########################

@ 20 नोव्हेंबर 👌💐

👍विशेष नोंद 👌
# माओरी ही जमात न्यूझीलंड मध्ये आहे.
# रशियामध्ये वर्ल्ड टायगर समिट भरवतात
# राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात
# कडप्पा ह्या आंध्र प्रदेश मधील जिल्ह्याला डॉक्टर वाय एस आर रेड्डी यांचे नाव दिले गेले आहे.
# रिटा फारिया ही 1965 मध्ये 'मिस वर्ल्ड' हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला.
##########################

धन्यवाद
सुधाकर नातू

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

👍"दिवाळी अंकांची मांदियाळी-2":👌

 👍"दिवाळी अंकांची मांदियाळी-2":👌

☺️ "पद्मगंधा दिवाळी अंक'22-दाद प्रतिसाद !":💐

😊👍"पद्मगंधा दिवाळी अंक'22 वाचत असताना दोन अगदीआगळेवेगळे लेख वाचायला मिळाले. त्यामध्ये सध्या वाचन संस्कृती कशी नष्ट होत आहे हे आणि 'रहाते घर' या विषयावर एक अभिनेत्री तिच्या अनुभवाचे सार अगदी आऊट ऑफ बॉक्स अशा दृष्टीने सांगते, ते मला खूपखूप भावले. ताबडतोब मी त्या त्या लेखांच्या लेखिकेला आणि लेखकाला माझा प्रतिसाद अगदी अभिनव पद्धतीने, ध्वनिफितींरूपात ईमेलने कळवला.....
तो असा.....

To

श्रीमती सोनाली कुलकर्णी,

सादर वंदन 

मी, 78 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक, सुधाकर नातू.

दिवाळी अंकात किंवा कोणत्याही लेखात सर्वसाधारणपणे लेखकाला, हे सांगायचं असतं ते 'या हृदयीचे त्या हृदयी !' करायचे असते असे मी मानतो. जेव्हा एखादा चांगला लेख मनाला भिडतो, तेव्हा असेच त्याच्या निर्मात्याला लगेच अनाहूत प्रतिसाद देण्याची माझी आतापर्यंत पद्धत होती. 

अर्थात सध्या वाचनाची आवड, संवय स्मार्टफोनच्या अतिरेकामुळे जवळजवळ नष्ट झाल्यामुळे तिच्यात खंड पडला आहे. 

परंतु 'पद्मगंधा' दिवाळी अंकात'22, आपला ललित लेख 'घरं...घर करून जातात' वाचला, अंतर्मुख करून गेला आणि त्यामुळे आगळ्यावेगळ्या पद्धतीने, त्यावरील एका ध्वनीफितीच्या रूपात मी माझा प्रतिसाद कळवत आहे आपण तो जरूर ऐकावा आणि आपली प्रतिक्रिया कळवावी.

धन्यवाद.

https://drive.google.com/file/d/1-Avi5vNsl48yFhEkUz6PkoFAoFepSE2Q/view?usp=drivesdk

👍घरं......घर करतात-ध्वनीफित 

##########################

श्री वसंत डहाके,

सादर वंदन

मी, 78 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक, सुधाकर नातू.

दिवाळी अंकात किंवा कोणत्याही लेखात सर्वसाधारणपणे लेखकाला जे सांगायचे असते ते "या हृदयीचे त्या हृदयी" करायचे असते असे मी मानतो जेव्हा एखादा चांगला लेख मनाला तेव्हा असेच अनाहूत प्रतिसाद देण्याची माझी आतापर्यंत पद्धत आहे अर्थात सध्या वाचनाची आवड सवय स्मार्टफोनच्या अतिरेकामुळे जवळजवळ नष्ट झाल्यामुळे तिच्यात खंड पडला आहे परंतु पद्मगंधा दिवाळी अंकात आपला ललित लेख, 'पुस्तकांचा दुकानाची गोष्ट' वाचला मनाला भिडला आणि त्यामुळे आगळ्यावेगळ्या पद्धतीने दोन ध्वनीफितींच्या रूपात मी माझा प्रतिसाद कळवत आहे आपण तो जरूर ऐकावा आणि आपली प्रतिक्रिया कळवावी

धन्यवाद

Mb9820632655

https://drive.google.com/file/d/1-Kisjhr-A37ZVKvPMCqOffKINpjNO33P/view?usp=drivesdk

👍पुस्तकाच्या दुकानाची गोष्ट-ध्वनीफित 

😊 " वाचा तुला आणि फुलवा-प्रतिसाद
पुढील लिंक उघडून ऐका.....
https://drive.google.com/file/d/1-RXXBXgsfdAYg4iOHhxDnVL1uyuB_vOc/view?usp=drivesdk




सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

👍"दैनंदिन पाऊलखुणा 18 !":💐

 👍"दैनंदिन पाऊलखुणा 18 !":💐

माझ्या 2010 वर्षाच्या दैनंदिनीमधील वैशिष्ट्यपूर्ण नोंदींसंबंधी ही लेखमाला मी लिहीत आहे. त्यातील हा पुढचा लेख देखील तुम्हाला आवडेल असे वाटते.

@ "11 नोव्हेंबर !":💐

👍"दिनविशेष !":👌
# 1675 शिखांचे धर्मगुरू तेगबहादुर यांना औरंगजेबाने ठार केले
# 1866 तमासगीर शाहीर पट्टे बापूराव यांचा जन्म # 1972 किराणा घराण्याचे अब्दुल करीम खान यांचा जन्म
# 1888 पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म
# 1918 दैनिक मराठवाडा संपादक अनंतराव भालेराव यांचा जन्म
# 1997 अभिनेता यशवंत यांचे निधन.
###########################

👍"विशेष नोंद !":💐
इलेक्ट्रिक बॅटरीचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला
औरंगजेबाने मुस्लिममेतरांवर जीझीया कर लावला. 2014 मध्ये Common wealth गेम्स ग्लास्गोमध्ये भरतील
शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला.
###########################

@ "12 नोव्हेंबर !":💐

👍"दिनविशेष !":👌
# हा लोकप्रसारण दिन मानला जातो
# 1880 सेनापती बापट यांचा जन्म
# 1896 पक्षी तज्ञ डॉक्टर सलीम अली यांचा जन्म # 1904 स्वातंत्र्यसेवक संयुक्त महाराष्ट्रासाठी जगणारे एस एम जोशी यांचा जन्म
# 1947 भाऊच्या धक्क्यावरून निघालेल्या
"संत तुकाराम व जयंती" बोटी समुद्रात बुडून शेकडो ठार
# 1946 पंडित मदन मोहन मालवीय यांचे निधन # 1952 युनेस्कोचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राधाकृष्णन यांची निवड
# 1959 शे का पक्षाचे नेते केशवराव जेधे यांचे निधन
# 1983 अभिनेते बाबा वैशंपायन यांचे निधन
# 2005 कोकण रेल्वेचे एक शिल्पकार मधु दंडवते यांचे निधन
###########################

@ "13 नोव्हेंबर !":💐

👍"दिनविशेष !":👌
# 1870 शीख साम्राज्याचे संस्थापक रणजीत सिंह यांचा जन्म
# 1855 नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म
# 1873 पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर मुकुंद जयकर यांचा जन्म
# 1913 रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीला नोबल पुरस्कार जाहीर
# 1971 मंगळावर निर्मनुष्य मरीननर एक चा प्रवेश # 2009 नासाने चंद्रावर पाणी असल्याचे जाहीर केले.
###########################

@ "14 नोव्हेंबर !":💐

👍"दिनविशेष !":👌

#1848 महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सर्वप्रथम सुरू केली.
# 1889 पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्म हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
###########################

👍"विशेष नोंद !":💐
# "आयआयटी" "आयआयएम" "एम्स" या संस्था पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीत स्थापन करण्यात आल्या.
# Walt Disney ह्यांनी सुरु केलेली Disney Land कॅलिफोर्नियात आहे
# जे के रोलिंग हे 'हँरी पाँटर'च्या लेखिकेचे नाव आहे.
###########################

धन्यवाद
सुधाकर नातू

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

 👍"आठवणीतल्या साठवणींची मंगल प्रभात !":💐

 👍"आठवणीतल्या साठवणींची मंगल प्रभात !":💐

लहानपणापासून सकाळी रेडिओवर, सकाळी सहा साडेसहाच्या सुमारास 'मंगल प्रभात' हा भावमधुर भक्तीसंगीताचा कार्यक्रम ऐकण्याची माझी सवय होती. नंतर विविध माध्यमांच्या विशेषतः टीवी, स्मार्ट फोनच्या शिरकावामुळे घराघरातील रेडिओ जवळजवळ हद्दपार झाला आहे.

Caravan mini घेतल्यामुळे रेडिओ ची सोय झाली आणि पुनश्च सकाळपासून मंगल प्रभात आणि नंतर चिंतन हा कार्यक्रम मी ऐकणे सुरू झाले. परंतु बदलत्या काळामुळे आमच्या आठवणीतल्या साठवणींची अपेक्षित गीते पुष्कळदा, मंगल प्रभातमध्ये ऐकायला मिळत नाहीत. अशा वेळेला मी youtube वर मला हवी असलेली भक्ती गीते ऐकतो.

अशा वेळेला मी मला आवडणारी गीते आठवायचा प्रयत्न करतो. त्यादिवशी मला शाहू मोडक आणि विठ्ठल पांडुरंग विठ्ठल असं एक गाणं खूपच सुश्राव्य आहे त्याची आठवण झाली पण काही केल्या ते गीत आठवेना. अशा वेळेला युट्युब वर सर्च मध्ये मी केवळ शाहू मोडक आणि पांडुरंग विठ्ठल संबंधित गाणं असं सर्च मध्ये टाकल्याबरोबर मला अपेक्षित असलेलं साठवणीतलं "निजरूप दाखवा हो.." हे गीत युट्युब वर मला ऐकता आले. त्या अर्थपूर्ण भक्तीगीताची लिंक दिली जाईल.

मंगल प्रभात झाल्यावर रेडिओवरील मुंबई अस्मिता वाहिनीवरील चिंतन हा कार्यक्रम देखील मी नेहमी ऐकतो योगायोगाने संत कवयित्री बहिणाबाई तिच्याबद्दल डॉक्टर मुक्ता राजे यांचे प्रथम ऐकायला मिळाले आयुष्यामध्ये खडतर अशी संकटे वाट्याला येऊ नाही या संत स्त्रीने आपले तन मन भक्ती भावाने पांडुरंग चरणी कसे वाहिले आणि त्यातूनच मार्गदर्शक असे अनेक अभंग कसे निर्माण केले ती कहाणी त्या चिंतनात होती साहजिकच त्या कार्यक्रमानंतर बहिणाबाईंचा लोकप्रिय अभंग "अरे संसार संसार जसा तवा चुलीवर !" मी youtube वर ऐकला त्याची लिंक दिली जाईल.

संत परंपरेतल्या या मंगलमय भक्ती गीता नंतर मला अचानक असंच एक अत्यंत नाद मधुर अर्थपूर्ण असं गीत आपण ऐकल्यात आठवलं ते काही केल्या आठवेना. युट्युब वर वेगवेगळ्या प्रकारे ज्ञानेश्वर हृदयनाथ मंगेशकर विवेक आणि पांडुरंग, सगुण निर्गुण संबंधित गीते अशा प्रकारे शोध घेण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक मला हवे असलेले साठवणीतले तुझं "सगुण म्हणू की निर्गुणा केंद्र रे " हे सुधीर फडके यांच्या श्रवणीय स्वरातले अभंग गीत गवसले. याची लिंक दिली जाईल.

माझ्या "आठवणीतल्या साठवण्यांची मंगल प्रभात !" ही अशी त्रिगुणात्मक सुमधूर भक्तीगीतांनी साजरी झाली आणि मनभावन क्षणांची माझ्यावर बरसात झाली.

धन्यवाद
सुधाकर नातू

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

👍"Confusion of Options!":👌

 👍"Confusion of Options!":👌

Confusion & options are inversely proportional. The game of Expectations-Options-Confusion goes on in Life continuously. In a given environment, out of available options you make a choice & take action/s accordingly, Results occur.

While at any given situation, your specific expectation, the expected results are definite but most of the times due to your confusion to make the Right choice out of the options, you get some unwanted, unexpected results.

To make a Right Choice out of options & to take Right Action/s at Right Time is an art and your rate of Success or Failure in Life is dependent on this very skill of making a Right Choice. For that you need to have confidence, conviction in your way of outlook & thinking.

Finally, remember, Confidence & Confusion are inversely proportional. In all, this ever changing environment is not in your Hands and that's what Luck is All about. And Your Thoughts determine your destiny, with some assistance from the Lady Luck !

Frankly, this kind of self introspection & thoughtful exploration of the experience of different events is my regular habit. This gets converted with such play of Words that serves as a creative exercise for me-the exercise, I find so essential for my engagement as Free Lance Writer. Thank YOU.

Sudhakar Natu

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२

👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-13":👌

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-13 ":👌


माझ्या 2010 वर्षाच्या दैनंदिनीमधील वैशिष्ट्यपूर्ण नोंदींसंबंधी ही लेखमाला मी लिहीत आहे. त्यातील हा पुढचा लेख देखील तुम्हाला आवडेल असे वाटते.

@ 6 नोव्हेंबर !":💐

👍"दिनविशेष":👌
# 1167 लिंगायत धर्माचे संस्थापक संत बसवेश्वर यांचे निधन
# 1761 छत्रपती शिवाजी महाराजांची सून महाराणी ताराबाई भोसले यांचा मृत्यू
# 1924 न्यूयॉर्क येथे जागतिक पहिले इंजीनियरिंग कॉलेजची स्थापना
# 1954 मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळाची स्थापना
# 1987 पीडीएचे संस्थापक प्राध्यापक भालचंद्र भालभा केळकर यांचा मृत्यू
# 1998 कॉन्टिनेटल प्रकाशनचे अनंतराव कुलकर्णींचा मृत्यू
##########################

@ 7 नोव्हेंबर !":👌

👍"दिनविशेष":👌
# 1858 स्वातंत्र्य सेनानी बिपिनचंद्र पाल यांचा जन्म
# 1868 मराठी व्याकरणकार मोरो केशव दामले यांचा जन्म
# 1869 मोगल साम्राज्याचा अखेरचा सम्राट बहादूरशाह जफर याचा मृत्यू
#1888 नोबेल विजेते डॉक्टर सी व्ही रामन यांचा जन्म
# 1898 मादाम क्युरीने रेडियमचा शोध लावला.
# 1905 आद्य मराठी कवी केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांचा मृत्यू
# 2018 हरितक्रांती करणारे केंद्रीय क्रुषीमंत्री श्री सी सुब्रमण्यम यांचा मृत्यू
# 2009 पु लंच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांचा मृत्यू
##########################

@ 8 नोव्हेंबर !":💐

👍"दिनविशेष":👌
# 1674 इंग्रज महाकवी जाँन मिल्टन यांचा मृत्यू
# 1674 धूमकेतून शोध लावणारा हँलेचा जन्म
# 1867 दोनदा नोबेल पारितोषिक विजेत्या मादाम क्युरींचा जन्म
# 1895 क्ष किरणांचा शोध राँटजेनने लावला.
# 1909 स्वातंत्र्यसेनानी नरुभाई लिमये यांचा जन्म
# 1919 पु ल देशपांडे यांचा जन्म
# 1924 कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे अनंतराव कुलकर्णी यांचा जन्म
# 1987 राजीव गांधींच्या हस्ते पुणे मॅरेथॉनचे उद्घाटन
# 2002 रवींद्र नाट्य मंदिरात पु लंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण.
#########################

@ 9 नोव्हेंबर !":💐

👍"दिनविशेष":👌
# 1877 कवी महंमद ईकबाल यांचा जन्म
# 1911 मराठीचे समीक्षक डॉक्टर रा शं वाळींबे यांचा मृत्यू
# 1924 गायक पंडित सी आर व्यास यांचा जन्म
# 1927 कथा कादंबरीकार विद्याधर हेगडे यांचा जन्म
# 1947 साप्ताहिक विवेकचा पहिला अंक प्रसिद्ध झाला
# 1962 अभिनेते बाबूराव पेंढारकरांचे निधन
# 1977 संगीतकार केशवराव भोळे यांचे निधन 
# 1997 प्राध्यापक गंगाधर गाडगीळ यांना जनस्थान पुरस्कार
# न्युयाँर्कमध्ये पिकासोचे चित्र विक्रमी पाच कोटी 66 लाख डॉलर ना विकले गेले।
#########################

@ 10 नोव्हेंबर !":💐

👍"दिनविशेष":👌
# सम्राट अकबराच्या नवरत्नांपैकी एक असा, राजा तोरडमल ह्यांचे निधन
# 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडी, अफजलखानाचा वध केला.
# 1904 लेखिका कमलावती देशपांडे यांचा जन्म
# 1968 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अनंतात विलीन
# 1996 गायिका माणिक वर्मा यांचे निधन
# 1999 मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार पंडित व्यास यांना जाहीर
########################

धन्यवाद
सुधाकर नातू

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-12":👌

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-12 ":👌

माझ्या 2010 वर्षाच्या दैनंदिनीमधील वैशिष्ट्यपूर्ण नोंदींसंबंधी ही लेखमाला मी लिहीत आहे. त्यातील हा पुढचा लेख देखील तुम्हाला आवडेल असे वाटते.
 
@ 2 नोव्हेंबर !":💐

👍"दिनविशेष":👌
# 1780 शीख साम्राज्याचे संस्थापक महाराणा रणजीत सिंह यांचा जन्म
# 1885 आधुनिक संगीत मराठी नाटकांचे जनक अण्णासाहेब किर्लोस्करांचा मृत्यू
# 1897 निर्माते दिग्दर्शक सोहराब मोदींचा जन्म
# 1921 ध्वनिमुद्रण तज्ञ रघुवीर दाते यांचा जन्म
# 1950 प्रख्यात विचारवंत, लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा मृत्यू
# 1984 साहित्यिक शरदचंद्र मुक्तिबोध यांचा मृत्यू # 1955 पोलिओचा वायरस शोधण्यात शास्त्रज्ञाना यश
# 1991 संगीतकार अरुण पौडवाल यांचा मृत्यू
# 1990 उद्योगपती आबासाहेब गरवारे यांचा मृत्यू
###########################

☺️ "विशेष नोंद !:👌
# डब्ल्यू ए पी वायरलेस एप्लीकेशन प्रोटोकॉल.
# 'टेल ऑफ टू सिटीज'ही कादंबरी करण याने लिहिली आहे.
# चार भारतीय राज्यांच्या सीमा म्यानमार देशाला लागून आहेत.
###########################

@ 3 नोव्हेंबर !:💐

👍"दिनविशेष":👌
# 1689 मराठी स्वराज्याची राजधानी रायगड मोघलांच्या ताब्यात
# 1874 ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टंट चर्चिल यांचा जन्म
# 1906 अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा जन्म
# 1926 समीक्षक लेखक माधव अतुल यांचा जन्म # 1957 रशियन यान स्पुटनिक मधून 'लायका' नावाच्या कुत्रीचे अवकाश भ्रमण.
# 'आय एम ई आय': इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी
# भारतीय लष्कराच्या पहिल्या लेफ्टनंट जनरल सुनिता अरोरा
# 2004 मध्ये प्रथम मनमोहन सिंग पंतप्रधान झाले नंतर तेच पुन्हा दुसऱ्यांदा
# 2009 मध्ये देखील पंतप्रधान झाले
###########################

@ 4 नोव्हेंबर !":💐

☺️ "विशेष नोंद !:👌
# "राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार" मिळवणारा पहिला खेळाडू विश्वनाथन आनंद
# अंतराळात सोडलेला पहिला उपग्रह स्पुटनिक. # अयोध्या शहर शरयू नदीच्या काठी आहे
# युनायटेड नेशन्स डे 24 ऑक्टोबर
###########################

@ "5नोव्हेंबर !":💐

👍"दिनविशेष":👌
# 1817 इंग्रजांकडून खडकीच्या लढाई दुसऱ्या बाजीरावाचा पराभव
# 1843 विष्णुदास भावे लिखित "सीता स्वयंवर" नाटकाचा प्रथम प्रयोग सांगलीला हाच रंगभूमी दिन म्हणून पाळला जातो
# 1870 स्वातंत्र्य सेनानी देशबंधू चित्तरंजनदास यांचा जन्म.
# 1950 विख्यात गायक फैयाज खान यांचे निधन. # 1991 कादंबरीकार शकुंतला गोगटे यांचा मृत्यू. # 1994 'वाङ्मयशोभा' मासिकाचे संस्थापक संपादक मनोहर म केळकर यांचे निधन
# 1998 हिंदी साहित्यिक वैद्यनाथ मिश्र यांचे निधन.
###########################

☺️ "विशेष नोंद !:👌
# राष्ट्रीय विज्ञान दिन 18 फेब्रुवारीला साजरा केला जातो.
# "डब्ल्यू एम ओ": वर्ल्ड मटेरियल लॉजिकल ऑर्गनायझेशन
# इंडोनेशियाची राजधानी जकार्ता.
# पंडित पंडित जवाहरलाल नेहरूंनी पहिली पंचवार्षिक योजना 1951 मध्ये सादर केली.
###########################

धन्यवाद
सुधाकर नातू

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२

👍"मुक्तसंवादाच्या पाऊलखुणा !"💐 !

 👍"T2O चा थरार !":👌

👍 साहित्यात जसे नाटक, कादंबरी, लघुकथा कविता इत्यादी असे विविध प्रकार असतात, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये कसोटी सामना, एक दिवशीय व टी-ट्वेंटी असे तीन प्रकार प्रचलित आहेत. त्यातील टी ट्वेंटी हा फलंदाजी, क्षेत्ररक्षण गोलंदाजी आणि टेम्परमेंट या सगळ्या गोष्टींचा अक्षरशः कस बघणारा थरारक प्रकार आहे.

मी तरी या तिन्ही प्रकारांपैकी t20 मॅचेस बघणे जास्त पसंत करतो. इतर दोन प्रकार त्यामानाने कंटाळवाणे वाटतात, तेवढा पेशंन्स प्रत्येकच क्रिकेट प्रेमीला असेलच असं नाही. भारत ज्या ग्रुपमध्ये आहे, त्यामधील भारताची फलंदाजी काहीशी भरवशाची, परंतु त्यामानाने गोलंदाजी मात्र अस्थिर आणि भरवसा ठेवण्याजोगी नाही. मुख्य म्हणजे टेंपरामेंटच्या बाबतीत आज बांगलादेशने जी जिगर आणि जिद्द दाखवली, तशी आपल्याला नेहमी साधता येतेच असे नाही. अर्थात आज पाऊस संपल्यावर आपण नक्की चांगले टेंपरामेंट दाखवून सामना जिंकला हे जरी खरेच, तरी बांगलादेशच्या तळाच्या फलंदाज्यांनी अविश्वासनीय अफलातून कामगिरी करून, आपल्या तोंडचे पाणी पळवले होते, हे विसरता कामा नये.

बाकी संघांचा विचार करता, पाकिस्तानची गोलदाजी भरवशाची, झिम्बाब्वेचे क्षेत्ररक्षण व टेंपरामेंट कौतुकास्पद. अर्थात हे माझे विश्लेषण आहे अशाच तर्हेचे विश्लेषण आपणही प्रतिसादात मांडले तर चांगलेच.

जाता जाता एक मल्लीनाथी अशी की, t20 सामन्यांप्रमाणेच दूरदर्शनवरील मराठी मालिकांनी देखील असा ऑटोपशीर सादरीकरणाचा प्रयत्न केला तर सोन्याहून पिवळे !

😊 "मोबाईल खाईल वेळच वेळ !":😢
Morning walk च्या वेळेचा अनुभव असा असतो की जो तो हातात मोबाईल घेऊन काही ना काहीतरी बोलत चाललेला दिसतो. तर काही जण ब्लूटूथच्या साह्याने बोलत असल्यामुळे त्यांच्या हातात काहीच नसते आणि एखादा बडबडत काय चालला दिसतो. पूर्वी जर असं कधी हे असं द्रुष्य दिसलं असतं या मोबाईलच्या आविष्कारापूर्वी, तर कदाचित सर्वांना वाटलं असत हा वेडसर आहे. अशी माणसं, आपल्याला बोलत असलेली कायम दिसतात, एवढंच काय सायकलवरूनं जाणारा एखादा दूधवाला भेटेल जो खांद्याला टेकून मोबाईल आणि आपला तोंल सावरत बडबडत चाललेला असतो.
बऱ्याच वेळेला होतं काय कुणी वाहन चालवताना देखील बोलत चाललेला असतो. काय एवढी बिझी असतात माणसं कोण जाणे ! परंतु हे सर्व नियमांविरुद्ध चाललेलं आहे आणि ही गोष्ट खरोखर विचार करण्याची बाब आहे. कारण त्यामुळे अशा दृष्टीकोनातून बघायला हवं की ह्या अविरत मोबाईल प्रेमापायी किती समाजशक्तीचे तास आपण वाया घालवत आहोत याचा सर्वांनी विचार करायला हवा.

अर्थात कित्येक नवनवीन संधी मोबाइलच्या शोधामुळे मिळाल्या आहेत. मोबाईल वापरताना हवं, रोज विशिष्ट वेळी फक्त मोबाईल काही तासच वापरावा, अशी प्रत्येकाने शिस्त लावून घेतली पाहिजे. माझं सकाळी फिरायला जाताना आलेला अनुभव व निरीक्षण फक्त मी तुमच्याबरोबर शेअर केला.
👍" अजून यौवनात आम्ही !":👌
आज मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरील "चिंतन" कार्यक्रमामध्ये, श्री हेमंत कर्णिक यांचे "म्हातारपण" या विषयावर विचार ऐकले. त्याचा सारांश असा की:
👍"विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसांचे आयुर्मान आता वाढत आहे आणि त्या उलट पुष्कळ प्रगत देशामध्ये जन्मदर घटत आहे. साहजिकच जेष्ठ नागरिकांची संख्या अधिकाधिक वाढत आहे. शरीराचे म्हातारपण वेगळे आणि मनाचे म्हातारपण वेगळे. शरीराचे म्हातारपण येणे, अपरिहार्य आहे. परंतु आपण मनाला मात्र ताजेतवाने आणि तरुण ठेवू शकता. त्याकरता निष्क्रियता टाळून, काही ना काही तरी उपयुक्त आवडीचा उद्योग करत राहणे, एखादे समाजकार्य किंवा एखादा छंद जोपासणे आणि सतत काही ना काही नवनवीन शिकत राहणे, अशा तऱ्हेने आपले मन तरुण ठेवू शकता. त्यामुळे म्हातारपणाला दूर ठेवू शकता !" 👌

किती छान विचार आज मिळाला ! त्यातील एक उदाहरण तर लक्षात घेण्याजोगे: एक असाच ज्येष्ठ नागरिक, कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात त्याने काय केले? तर घरामध्ये स्वयंपाक करायला शिकला आणि आता तो इतका पारंगत झाला आहे की, घरातीलच काय पण कधी पाहुणे आले, तरी देखील तो त्यांना उत्तम स्वयंपाक करून चांगले खायला घालू शकतो. खरंच छान आहे नाही, हे उदाहरण !

जाता जाता,
👍"कुटप्रश्न १:😊
'सध्या शालिवाहन शक १९४४ शुभकृत नाम संवत्सर चालू आहे.
१ या चक्रवर्ती शालिवाहन राजाचे राजधानीचे ठिकाण कोणते होते?
२ त्याने कोणत्या चक्रवर्ती राजाचा पराभव केला आणि कसा केला होता?

डोके चालवा आणि द्या उत्तर !

धन्यवाद
सुधाकर नातू




👍उत्तरे:
1 पैठणः
2 चक्रवर्ती शालिवाहनाने उज्जैनच्या विक्रमादित्य राजाचा, मातीच्या सैन्यात प्राण ओतून युद्धात पराभव केला.

बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

👍""संगीत कलानिधी मास्तर कृष्णराव !":👌

 👍👍💐💐👍👍💐💐

👍"रंगांची दुनिया !": 👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !💐
👍" आनंद घ्या, आनंद द्या !":👌

👍"संगीत कलानिधी मास्तर कृष्णराव !":👌

कधी कधी ध्यानी मनी नसताना अवचित असे घडून जाते, नवल वाटावे असे. त्यामधून जुन्या आठवणींच्या हिंदोळ्यावर आपण जसे रमतो, त्याचप्रमाणे त्यामधून अनेक मनभावन क्षण आपल्या अंतर्मनात विलक्षण समाधान त्रुप्तीच्या लहरी निर्माण करतात.

आज सकाळी अवचित मला तसा अनुभव आला. "कॅरावान मिनी" सहज मी नाश्ता झाल्यावर लावला मात्र, मुंबई अस्मिता वाहिनी केंद्रावर मला एका चित्तथरारक मुलाखतीचा जो सिलसिला ऐकायला मिळाला तो अक्षरशः अवर्णनीय होता. विख्यात प्रतिभा संपन्न संगीतकार मास्तर कृष्णा यांच्या नातीने त्यांच्या आठवणी तिथे उलगडून दाखवल्या होत्या. मला त्याबद्दल विशेष अप्रूप या करता की, आम्ही जेव्हा सायनला राहायचो, त्यावेळेला तिथे त्यांची मुलगी श्रीमती वीणा चिटको यादेखील त्याच सोसायटीत रहावयाच्या. माझे वडील देखील मास्तर कृष्णांबद्दल अधून मधून खूप काही सांगायचे.
त्यामुळे आम्हाला मास्तर कृष्णांच्याबद्दल खूपच आपुलकी आदर उपजतच होता.

मास्तर कृष्णांच्या कार्यकर्तृत्वावर बोलावे तेवढे थोडेच आहे. त्यांची नात विद्याताई यांच्या
मुलाखती मधून त्या आठवणी आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आल्या होत्या. "वंदे मातरम् सारख्या राष्ट्रीय गीताला सांगणाऱ्या मास्तर कृष्णांच्या संगीतकलेचा अलौकिक वारसा पुढच्या पिढीला ज्ञात व्हावा यासाठी विद्याताईंनी आवर्जून सांगितले की, मास्तर कृष्णांच्या 125 व्या जन्मतिथी निमित्ताने कुटुंबाने मराठीमध्ये एक वेबसाईट निर्माण केली आहे:
www.masterkrishnarao.com ही.
तिच्यावर तिच्यावर मास्तर कृष्णांच्या विविध संगीत रचना देखील ऐकायला मिळतील. ताबडतोब मी स्वतः ही वेबसाईट उघडून पाहिली आणि तिच्यावर विविध अशा प्रकारच्या सुमधुर संगीत रचना त्याचबरोबर मास्तर कृष्णांचे एकंदर जीवनकर्तृत्व मराठीमध्ये दिलेले ही पाहिले अन् मी तृप्त झालो. आपणही वरील वेबसाईट उघडून हा आनंद घेऊ शकता

जाता जाता जी एक अविस्मरणीय गोष्ट मास्तर कृष्णांबद्दल सांगितली गेली. ती म्हणजे मास्तर कृष्णा चित्रपट व नाटकाला संगीत देताना कथानक ऐकत आणि जिथे कुठे गीत हवे आहे हे सांगितले जाई, तेव्हा केवळ त्या प्रसंगानुरूप अशी संगीताची पूर्ण स्वररचना ते त्यांच्या डोक्यात तयार करत कुठल्याही वाद्याच्या सहाय्यविना ! नंतर त्यावर हुकूम पुष्कळदा गीतकार गीत निर्माण करत असे.
कदाचित अशा आगळ्यावेगळ्या तऱ्हेने संगीत निर्माण करणारा मास्तर क्रुष्णराव हे भारतात एकमेव असावेत, अशीही कोणी आठवण सांगितली.

खरंच अशी असामान्य गुणवंत मोठी माणसं दुर्मिळच ! त्यांच्या केवळ आठवणी आपण जागवत रहायच्या, दुसरं काय ?

धन्यवाद
सुधाकर नातू

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

👍""दैनंदिनीच्या पाऊलखुणा-15 !":👌

 👍"दैनंदिनीच्या पाऊलखुणा-15 !":👌

माझ्या 2010 वर्षाच्या दैनंदिनीमधील वैशिष्ट्यपूर्ण नोंदींसंबंधी ही लेखमाला मी लिहीत आहे. त्यातील हा पुढचा लेख देखील तुम्हाला आवडेल असे वाटते.

@ "29 ऑक्टोबर":💐

👍"दिनविशेष":👌
# 1897 जर्मन प्रचार प्रमुख गोबेलचा जन्म
# 1911 पोलीस जर पारितोषकाचे जनक जोसेफ कुलजर यांचा मृत्यू
# 1930 कथा कादंबरीकार संपादक माधव कानिटकर यांचा जन्म
# 1958 मारुती अण्णासाहेब कर्वे यांना भारतरत्न प्रभाव .
#1981 अभिनेते दादासाहेब साळवी यांचा मृत्यू
# 1996 तानसेन पुरस्कारासाठी गायिका गिरीजा दैवी यांची निवड
###########################

👍"विशेष नोंद !":👌
# एपीएमसी: एग्रीकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग सेंटर # रेशमाचे उत्पादन प्रथम चीनमध्ये झाले
# 'सुब्रतो कप' हा फुटबॉल स्पर्धेत दिला जातो.
# खिल्लारीचा भूकंप 1993 मध्ये झाला
###########################

धन्यवाद
सुधाकर नातू


@ "30 ऑक्टोबर !":👌

👍"दिनविशेष !":👌

# 1823 यंत्रमागाचे संशोधक कोर्ट राईट यांचा जन्म # 1889 समाजवादी नेते आचार्य नरेंद्र देव यांचा जन्म
# 1883 आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वतींचा मृत्यू
# 1909 भारताच्या अनुशास्त्रज्ञ डॉक्टर होमी बाबांचा जन्म
# 1919 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांचा जन्म
# 1945 भारताला संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्यत्व
# 1966 शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा संपन्न
# 1974 गझल क्वीन बेगम अख्तर यांचे निधन
# 1998 विख्यात दिग्दर्शक लेखक विश्राम बेडेकर यांचे निधन रणांगण कादंबरीकार
###########################

👍"विशेष नोंद !":👌
# डब्ल्यू ए पी वायरलेस एप्लीकेशन प्रोटोकॉल
# सलीम अली सेंटर फॉर नॅचरल हिस्टरी गोइंग टूरला आहे
#2007 मध्ये अफगाणिस्तानला सार्कचे सदस्यत्व मिळाले
# ध्वनीचा अभ्यास करणाऱ्या शाखेला अँकोस्टिक्स असे म्हणतात
# जागतिक ओझोन दिन 16 सप्टेंबर
# देवळात प्रवेश करताना घंटानात गेल्याने ओंकार ध्वनी व पॉझिटिव्ह एनर्जी उत्पन्न होते तीच गोष्ट आरतीच्या वेळी टाळ आणि साज झांजा वाजवण्याचे वेळीही होते.
###########################

@ "31 ऑक्टोबर":💐

👍"दिनविशेष !":👌

# 1815 मध्ये उपयुक्त च्या डेव्हिड लॅम्प चा शोध सर हम्फरे डेव्हिड ने लावला
# राष्ट्रीय एकता दिन, राष्ट्रीय संकल्प मराठीतील दिन
# 1984 पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या
# 1880 पहिले संगीत नाटक शाकुंतल रंगभूमीवर आले
# आद्य नकलाकार गोपाळराव भोंडे यांचा जन्म
# 1887 आधुनिक चीनचा शिल्पकार चँग कै शेख ह्यांचा जन्म
###########################

👍"विशेष नोंद":👌
# 1920 इंटकची स्थापना
# 1966 पंजाबचे विभाजन पंजाब व हरियाणा राज्याची स्थापना दोघांची चंदिगड ही राजधानी
# 1971 स्वित्झरलँड मध्ये प्रथमच महिलांना मतदानाचा हक्क
# 1986 आत्मचरित्रकार आनंदीबाई शिर्के यांचे निधन
# 1999 चित्रकार भैय्यासाहेब ओंकार यांचा मृत्यू
###########################

@ "1 नोव्हेंबर !:💐

👍"दिनविशेष !":👌
# 1845 भारतातील पहिल्या ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना
# 1858 भारताचा कारभार ब्रिटिश संसदेच्या हाती जाऊन विक्टोरिया राणी भारताची सम्राज्ञी असल्याचे जाहीर
# 1918 विनोदी अभिनेते शरद तळवलकर यांचा जन्म
# 1956 विभाचिक मुंबई राज्याची स्थापना आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री
# 1988 राष्ट्रीय कीर्तनकार गोविंद स्वामी आफळे यांचा मृत्यू
# 1992 गानतपस्वनी इंदिराबाई खाडीलकर यांचा मृत्यू
# 2002 ब्रिटिश संसदेत प्रथमच दिवाळी साजरी झाली
# 2009 झारखंडचे मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या मालमत्तेवर आयटीचे छापे
# 2005 लेखिका अभिनेत्री योगिनी जोगळेकर यांचा मृत्यू
###########################

👍"विशेष नोंद":👌
# टाटाचा नॅनो प्रकल्प सानंद गुजरात मध्ये सुरू झाला
# अल्फ्रेड नोबेलचा जन्म स्वीडन मध्ये एका गावात झाला
# आशियातील पहिली डी एन ए बँक लखनऊ मध्ये स्थापन झाली
# वंदे मातरम हे गीत प्रथम 1906 मध्ये गायले गेले
###########################

धन्यवाद
सुधाकर नातू

👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा 11":👌

 👍"दैनंदिनीच्या पाऊलखुणा-11 !":👌

माझ्या 2010 वर्षाच्या दैनंदिनीमधील वैशिष्ट्यपूर्ण नोंदीं संबंधी ही लेखमाला मी लिहीत आहे. त्यातील हा पुढचा लेख देखील तुम्हाला आवडेल असे वाटते.

@ 26 आँक्टोबर 👌

👍"दिनविशेष !":👌
# 1761 संत नामदेवांचा जन्म
# छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 1874
# लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 1958
# 1923 नाटककार अनंत बर्वे यांचे निधन
# 1937 संगीत रत्न अब्दुल करीम खान यांचे निधन
# 1991 मराठवाडा वृत्तपत्राचे संपादक अनंतराव भालेराव यांचा मृत्यू
###########################

👍"विशेष नोंद !":👌

# मँकमोहन सीमारेषा भारत व चीनच्या दरम्यान आहे.
# डब्ल्यू ए डी ए वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी # जागतिक संगीत दिन 21 जून
# आधुनिक भौतिक शास्त्राचा जनक चार्लस डार्विन
###########################

@ "27 ऑक्टोबर 💐

👍"दिनविशेष !":👌
# 1795 सवाई माधवराव पेशव्यांचे निधन
# 1873 वाल्हेरचे कवी बी अर्थात भारतांबे यांचे निधन
# 1911 थोर प्रसूतीतज्ञ डॉ भालचंद्र पुरंदरेंचा जन्म # 1920 भारताचे दहावे राष्ट्रपती डॉक्टर के आर नारायणन यांचा जन्म
# 1964 भारतीय सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुं बाई मेहतांचा मृत्यू
# 1974 गझलसम्राज्ञ बेगम अख्तर चे निधन 1993 नवशक्तीचे माजी संपादक पुरा बेहेरे यांचे निधन
# 2001 बालसाहित्यकार भा रा भागवत उर्फ फास्टर फेणे फेम, यांचे निधन
###########################

👍"विशेष नोंद": 👌
# सीसीसीए कॉम्प्रिएशन इकॉनोमिक कोऑपरेशन एग्रीमेंट
# अमेरिका हे नाव अमेरीगो वेस्ट वरून पडले # नॉर्वेची राजधानी आँस्लो
# गोल्फपटू म्हणून जगप्रसिद्ध टायगर वूड्स
# गझल या काव्याचा जन्म पर्शिया मध्ये झाला.
###########################

धन्यवाद
सुधाकर नातू

👍"दैनंदिनीच्या पाऊलखुणा-15 !":👌

@ "29 ऑक्टोबर":💐

👍"दिनविशेष":👌
# 1897 जर्मन प्रचार प्रमुख गोबेलचा जन्म
# 1911 पोलीस जर पारितोषकाचे जनक जोसेफ कुलजर यांचा मृत्यू
# 1930 कथा कादंबरीकार संपादक माधव कानिटकर यांचा जन्म
# 1958 मारुती अण्णासाहेब कर्वे यांना भारतरत्न प्रभाव .
#1981 अभिनेते दादासाहेब साळवी यांचा मृत्यू
# 1996 तानसेन पुरस्कारासाठी गायिका गिरीजा दैवी यांची निवड
###########################

👍"विशेष नोंद !":👌
# एपीएमसी: एग्रीकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग सेंटर # रेशमाचे उत्पादन प्रथम चीनमध्ये झाले
# 'सुब्रतो कप' हा फुटबॉल स्पर्धेत दिला जातो.
# खिल्लारीचा भूकंप 1993 मध्ये झाला
###########################

धन्यवाद
सुधाकर नातू

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२

 👍"दैनंदिन पाऊलखुणा-१३ !":👌

 👍"दैनंदिन पाऊलखुणा-१३ !":👌


@ "21 ऑक्टोबर !":💐

☺️ दिनविशेष👌
# जागतिक आयोडीन कमतरता अभाव नियंत्रण दिन
# 1789 पेशवाईतील मुख्य न्यायाधीश रामशास्त्री प्रभूणे यांचा मृत्यू
# 1805 ट्राफल्गार लढाईत ब्रिटिश आरमार प्रमुख नेल्सन यांचा गोळी लागून मृत्यू. त्याने नेपोलियनचा धुव्वा उडवला.
# 1833 ज्याच्या भरघोस निधीतून नोबल पुरस्कार दिला जातो त्या नोबेलचा जन्म.
# जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन केला
# 1943 नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सेना सरकारची स्थापना केली. 
# 1977 मिमांसाकार श्रीपादशास्त्री हिंजवडीकर यांचे निधन
###########################

👍"विशेष नोंद ":👌
# 15 ऑगस्टला दक्षिण कोरियाचा स्वातंत्र्य दिन साजरा होतो.
# युनोचे सध्याचे सरचिटणीस बाम की मुन हे आहेत # इस्तंबूलचे पूर्वीचे नाव कॉन्स्टंटटीनापोल होते. 
# मिस्टर बीन्स विनोदी मालिकेत प्रमुख भूमिका रोवन अँटकिन्सनने केली आहे.
# फ्री कीक, थ्रो व ट्रिबल हे शब्द फुटबॉलशी निगडित आहेत.
###########################

@ 22 ऑक्टोबर 💐

👍"विशेष नोंद ":👌
# बलून व पॅराशुटचे सहाय्याने हवेत झेप घेऊन नंतर जमिनीवर उतरणारा जॅक्स गँगेरियन हा पहिला माणूस
# 1962 पंडित नेहरूंच्या हस्ते पाखरा नांगल धरण देशाला अर्पण
# 1978 मराठी लघुनिबंध कादंबरीकार ना सी फडके यांचा मृत्यू
# कोकाकोला चा शोध 1885 मध्ये लागला. 
# पहिल्या स्पेस रॉकेट चा शोध प्राध्यापक जोसेफ गोडार्ड यांनी लावला
# ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय नॉर्मल प्रिचार्ड
#########################

@ 23 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष 👌
# 1629 रामायणकार संत तुलसीदास यांचे निधन. # 1772 अहमदशहा अब्दालीचे निधन
# 1915 इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू जी ग्रेस यांचे निधन
# 1921 रबरी टायरचे संशोधक डनलाँप यांचे निधन
# 1924 व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचा जन्म 
# 1924 पंडित राम मराठे, नाट्यसंगीत अभिनयपटू यांचा जन्म
# 1940 असामान्य फुटबॉलपटू पेले यांचा जन्म.
 # 1979 कवी नारायण सुर्वे यांना मध्य प्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार
###########################

👍"विशेष नोंद !":👌
# KVIB -खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री बोर्ड
# अँडाल्फ हिटलरचा जन्म ऑस्ट्रिया देशात झाला
 # ईटली मध्ये 13 आकडा शुभ फलदायी मानतात. 
# माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात लहान व्यक्ती उत्तर प्रदेश मधली अर्जुन वाजपेयी
# पहिले शब्दकोडे लंडन संडे एक्सप्रेशन या वृत्तपत्राने 
1924 मध्ये छापले
###########################

@ 24 ऑक्टोबर 💐

☺️ "दिनविशेष !":👌
# 1577 शीख धर्मगुरु रामदास यांनी अमृतसर शहराचे नामकरण केले
# 1868 औध संस्थांचे अधिपती भवानराव पंतप्रतिधींचा जन्म
# 1898 इतिहासकार रा वि ओतुरकर यांचा जन्म
 # 1964 झांबियाचा स्वातंत्र्य दिन
# 1989 लष्कर प्रमुख म्हणून पहिले महाराष्ट्रीयन जनरल बेवूर यांचा मृत्यू
###########################

@ 25 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष !:👌
# 1296 संत ज्ञानेश्वर आळंदीला समाधीस्थ
# 1890 ह ना आपटे यांचे करमणूक साप्ताहिक सुरू
# 1919 कुलाबा (आत्ताचा रायगड ) समाचार चा पहिला अंक प्रसिद्ध
# 1881 जगप्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार पिकासो चा जन्म
# 1937 नाट्यछत्र लोकसंगीताचे जाणकार अशोक रानडे यांचा जन्म
# 1980 गीतकार साहीर लुधियानवी यांचे निधन
 # 2005 स्वाध्याय परिवारचे संस्थापक पांडुरंग शास्त्री आठवले यांचा मृत्यू
# 2009 नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर यांचा मृत्यू
###########################

👍विशेष नोंद !":👌
# 2012 मध्ये दिल्ली येथे दक्षिण आशियाई स्पर्धा होतील
# EPFO -एम्प्लॉईज प्राव्हीडंट फंडऑर्गनायझेशन # हाँर्वर्ड विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय प्राध्यापिका गीता गोपीनाथ
# सूर्यापासून सर्वात दूर सूर्यमालेतील ग्रह प्लुटो 
# स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे1893 ला जगप्रसिद्ध भाषण केले.

###########################

धन्यवाद
सुधाकर नातू

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

 👍"दिवाळी अंकांची मांदियाळी -१":👌

 👍"दिवाळी अंकांची मांदियाळी -१":👌


दिवाळी म्हटली की फराळ जसा आठवतो, त्याचप्रमाणे मराठी माणसाला दिवाळी अंक हा एक ऋणानुबंधाचा भाग वाटतो. दरवर्षी कोरे करकरीत दिवाळी अंक वाचण्याची गंमत काही वेगळीच असते. गेल्या एक-दोन वर्षात ग्रंथाली आणि मॅजेस्टिक यांचे खास दिवाळी संच घेण्याचे आम्ही सुरू केले आणि त्याचा वर्षभर खूप फायदा झाला.

निवांतपणे एक एक दिवाळी अंक वाचत जाणे, ही एक मोठी आनंददायी गोष्ट असते. यावर्षीचेही दिवाळी अंक सगळे त्याप्रमाणे आलेले आहेत आणि एका मागोमाग एक असे दिवाळी अंक वाचनाला मी सुरुवात केली आहे. कुठलाही दिवाळी अंक म्हटला, की प्रथम मी संपादकीय नजरे खालून घालतो.
पुष्कळशी संपादकीय तितकीशी दखल घेण्याजोगी असतातच असं नाही. पण आज पहिलाच दिवाळी अंक "पद्मगंधा" घेतला आणि मला त्यातील संपादकीय खूपच उद्बोधक रोचक आणि प्रेरणादायी वाटले, म्हणून ही दखल.

सर्वसाधारणपणे संपादकीय त्या अंकामध्ये कोणत्या साहित्याचा ऐवज आहे याची यथासांग ओळख करून दिली जाते. खरं म्हणजे, मला नवल वाटलं की पद्मगंधा हा दिवाळी अंक निघाला याची. कारण संपादकीयातच म्हटल्याप्रमाणे मागच्या वर्षी त्याचे संस्थापक, संपादक अरुण जाखडे यांचे दुर्दैवाने आकस्मित निधन झाले. तरी देखील त्यांच्या साहित्य प्रेमाचा वारसा पुढे त्यांचे सुपुत्र श्री अभिषेक चालवत आहेत, ही एक खरोखर कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे.

संपादकीयातील सुरुवातीचेच वाक्य म्हणून आपल्या मनात रुजून जाते. अरुण जाखड्यांचे शब्द आहेत: "एखाद्याला कायम आपल्या सोबत ठेवायचे असेल, तर त्याचे कार्य पुढे घेऊन चला !" किती प्रेरणादायी वाक्य आहे हे ! साहजिकच संपादकीय पुढे आपोआपच वाचले गेले. 'वारसा आणि सलगता' हा विषय घेऊन यावेळचा पद्मगंधा दिवाळी अंक १७ वेगवेगळ्या विचारवंतांनी सजवलेला आहे हे त्यामध्ये नमूद केले गेले होते. तसेच इतर कथा कविता यांची योग्य ती ओळख संपादकीयमध्ये देण्यात आली होती आणि त्यामुळेच मला वाटले की हा अंक आपण प्रथम वाचलाच पाहिजे.

त्याप्रमाणे मी आता सुरुवात करणार आहे. त्यासाठी जशी सुरुवात अरुण जाखडेंच्या चटका लावणाऱ्या निधनाच्या बातमीने संपादकीय सुरुवात झाली, त्याचप्रमाणे पद्मगंधाचे लेखक कुमार नवाथे यांना "सी ऑफ कॉपीज" याच्या अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार झाला मिळाला ही आनंददायी घटना आहे परंतु ती ऐकायला आणि अनुभवायला कुमार नवाथे हे आपल्यात नाहीत ही दुःखद बाब आहे. हा मजकूर खरोखर चटका लावून देणार होता.

या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रख्यात कथाकार आणि आपल्या विशिष्ट अशा प्रकारच्या शैलीने एकमेवाद्वितीय असे ठरलेले, जीए कुलकर्णी या कथाकाराची आणि नुकतीच जन्मशताब्दी संपली त्या कवी शंकर रामाणी यांच्या कार्यकर्तृत्वाची साहित्यिक योगदान किती त्यांनी दिले याची दखल घेणारा वाचनीय मजकूर या अंकात आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नर्मदा प्रदक्षिणा नर्मदा आंदोलन फेम समाजसेविका श्री मेधा पाटकर यांच्या काव्यरचना.

जाता जाता, सगळ्यात महत्त्वाची आणि दखल घेण्याजोगी ह्रद्य बाब म्हणजे अंकाच्या सुरुवातीलाच श्री अभिषेक जाखडे यांनी, त्यांच्या वडिलांना-अरुण जाखडे यांना वाहिलेली शब्दरूप आदरांजली ! तिची सुरुवातच सगळ्यांनी मनामनात रुजवण्याजोगी आहे:

👍" प्रत्येक व्यक्तीने एक कला तरी जोपासावी आपली प्रतिभा त्यात आपापल्या परीने विकसित करण्यासाठी सतत कार्यरत राहावे आपले मन समृद्ध करण्यासाठी टवटवीत ठेवण्यासाठी रोजच्या जीवनात उत्साह निर्माण करण्यासाठी याचा सर्वाधिक उपयोग होतो त्यातून करिअरच घडले पाहिजे असे नाही पण सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे.":👌
-अरूण जाखडे

धन्यवाद
सुधाकर नातू

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

👍" दिवाळी-तेजोमय प्रकाशाची आणि विचारांचीही !":👌

 👍" दिवाळी-तेजोमय प्रकाशाची आणि विचारांचीही !":👌


# चिंतन व मुक्तसंवाद #
👍चिंतन हा स्वतःचा, स्वतःशी केलेला मुक्तसंवाद असतो. एखादा मुद्दा मनात घ्यायचा आणि त्यावरील आपल्या जाणिवांच्या क्षितिजापर्यंत संचार करून, वेगवेगळ्या विचारांचे मणी जोडत जायचे, म्हणजेच चिंतन होय. अशा प्रकारचे चिंतन प्रत्येकाने केव्हा ना केव्हातरी विशेषतः सकाळच्या रामप्रहरी करणं गरजेचं आहे. कारण त्यामधून आपण आपला वैचारिक विकास तर साधत असतोच, शिवाय आपल्या अनुभवांच्या शिदोरीमध्ये भर पडत असते. हे असं व्यक्त होणं, हा देखील एक मुक्तसंवाद अथवा चिंतन आहे !👌

# गुन्हेगारी #
👍गुन्हेगारी हा मुद्दा मनात घेतला की पहिला विचार मनात येतो, तो म्हणजे नुकतीच वाचलेली यासंबंधीची माहिती. उत्तरोत्तर वर्षानुवर्षै विविध प्रकारची गुन्हेगारी विलक्षण गतीने वाढत आहे, विशेषता स्त्रियांवरील अत्याचार किंवा चोर्या, दरोडे, फसवणूक, भ्रष्टाचार, दुसऱ्याची गोष्ट हडप करण्याच्या प्रवृत्तीचा प्रचंड असा झंजावात सभोवताली फोफावत जाणाऱ्या गुन्हेगारीच्या आकडेवारीवरून दिसतो.

हे असं का व्हावं, हा विचार गांभीर्याने निरीक्षण करण्याचा मुद्दा आहे. कारण माणूस जन्मतःच कधीच गुन्हेगार नसतो, तो जसजसा वाढत जातो, वयाने मोठा होत जातो, तसतसा त्याच्या वृत्ती- प्रवृत्तीत बदल घडत जातो आणि अनिष्ट संगत, चुकीचे संस्कार यांचा मोठा परिणाम त्याच्यावर होतो. कदाचित परिस्थिती देखील त्यावर प्रभाव टाकते, हे सगळं जरी असलं, तरी जे आपलं नाही जे दुसऱ्याच आहे, ते असं ओरबाडून घेण्याची वृत्ती प्रवृत्तीत रूपांतरित होते आणि ती प्रवृत्ती शेवटी कृतीमध्ये प्रत्यक्ष आल्यावर, हे गुन्हेगारीच झाड असं उंच उच भरारी घेत जातं !

इथे, कुठेतरी त्याच्यावर "मुळे कुठारः" म्हणतात तसा घाव घातला गेला पाहिजे. समाजाने, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणसाने यावर गांभीर्याने विचार करून गुन्हेगारी कमी कशी होईल ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी एक नवा मार्ग असा असू शकेल कां?:👌
☺️ "अपराधी अपत्यांच्या गुन्ह्यांबद्दल, त्यांच्या बरोबरच त्यांच्या आईवडील
वा पालकांनाही शिक्षा देणारा कायदा करणे गरजेचे
आहे कां?":👌
निदान ह्यामुळे तरी वाढती गुन्हेगारी कमी व्हावी.

👍"परोपकारी व्रुत्ती !":👌
गुन्हेगारी वृत्ती म्हणजे दुसऱ्याचं दुःख म्हणजे आपले सुख आणि त्या दुःखातूनच आपला सुख समृद्धीचा मार्ग शोधणे. खरोखर ही व्रुत्ती अत्यंत वाईट आहे. याच्या उलट मला अचानक आज एक अनुभव आला आणि तो यायचं कारण ठरलं ते म्हणजे "कॅरवान मिनी"!

ज्यावेळेला आम्हाला रेडिओची गरज वाटली तेव्हा आम्ही हा छोटासा 'कॅरावान मिनी' घेतला आणि त्याचं कारण म्हणजे आमची पूर्वीची रेडिओ वरती मुंबई केंद्रातील 'मंगल प्रभात'चु गीते ऐकणे. त्यासाठी खरं म्हणजे हा 'कॅरवान मिनी' घेतला. तेव्हापासून आम्ही दररोज सकाळी त्या सुमारास उठून, साडेसहा वाजता 'चिंतन' हा कार्यक्रम आवर्जून ऐकतो. त्यापूर्वीची मंगल प्रभाती गाणी मात्र पूर्वीच्या इतकी आनंद देत नाहीत. कारण कुठली तरी अपरिचित अशीच गीते पुष्कळदा वाजवली जातात.

एका 'चिंतन' कार्यक्रमात दिवाळीबद्दल डॉक्टर अनुराधा कुलकर्णी यांचे विचार ऐकले. किती छान सांगितलं त्यांनी ! त्याचा सारांश एवढाच होता की, दुसऱ्याचे सुख हे आपले सुख मानणे, त्यासाठी आपल्या मनाला मुरड घालायला लागली तरी चालेल हा संदेश त्यामधून दिला गेला होता. दिवाळी म्हटलं की तेजाची आरती, सगळीकडे तेजोमय वातावरण. पण एवढ्या पुरतंच दिवाळीकडे बघायला नको. मनाची देखील तेजोमय अशी विचारसरणी किंवा बुद्धी, भावना तुम्हाला अंतर्बाह्य प्रकाशित करते. असाच त्या चिंतनाचा मतीतार्थ होता.
त्या चिंतनात सांगितलेली एक गोष्ट तर न विसरण्याजोगी होती:

एका जोडप्याचं पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा तो दिवस. त्या वेळेला त्या वहिनींनी आपल्या नवऱ्याला आवडते अशी साडी नेसली होती आणि नवरा मात्र दिवसभर एका अनाथ मुलांना संभाळणाऱ्या संस्थेत त्यांची आरोग्याची आणि इतर विचारपूस करायला गेला होता. त्यांना हे असं काम आवडतं म्हणून या वहिनी घरी थांबल्या होत्या. त्याचही कारण मोठं विलक्षण होतं. घरी एकट्या वृद्ध सासूबाई ज्या विकलांग आहेत त्या कशा राहतील या विचाराने व आपल्या नवऱ्याला देखील बरं वाटेल, स्वतःला देखील बरं वाटेल, ह्या निर्मळ हेतूने, त्यांनी त्यांच्या सासूबाईंच्या बरोबर त्यांची सेवा करत, घरी राहणं पसंत केलं होत. म्हणजे बघा दुसऱ्यांच्या सुखात आनंद शोधणे हा जणू द्विगुणीत करणारा आनंद असतो, हा मुद्दा त्या चिंतनातून कळला.

कुठे ती गुन्हेगारी वृत्ती आणि कुठे ही
सत्सद् विवेकबुद्धीने चालणारी मानवी मनाला, श्रीमंत करणारी अशी परोपकारी व्रुत्ती !

धन्यवाद
सुधाकर नातू

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

👍"पुढचे पाऊल":👌 अर्थात संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य":👌

 👍"नियतीचा संकेत":👌:

👍"पुढचे पाऊल":👌
अर्थात संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य":
१नोव्हें’२२ ते ३१ डिसें''२३💐

👍प्रास्ताविक:

भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य
 ज्योतिष रविला.  त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र 
ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली 
जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही 
राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते. 

आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली
क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणि प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे 
सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के 
पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार 
निर्णय व क्रुतीवर प्रभाव पाडत असते, हे ओघाने 
आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत 
मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.

👍अनुकूल गुण पद्धती:

कालचक्र अव्याहत फिरत असते, माणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतात. हा क्रम प्रत्येकाला अनुभवाला येतो. उद्याचा दिवस, आजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या आशेवर माणूस जगत असतो. उद्याचे पुढचे पाऊल कसे असेल, येणारा काळ कसा असेल, अनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो दर वर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात असतो.

माणूस उंच वा बुटका आहे, जाडा किंवा बारिक आहे, तो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशी काही कल्पना येत नाही. ती येण्यासाठी कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यक असते. जसे उंची 
सेंटी मीटर, वजनासाठी किलोग्राम, आर्थिक 
स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने 
दाखवता येते. ह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस कोणाला कसे जातील, हे भविष्याच्या ज्ञानाच्या 
आधारे सांगण्याची पद्धत म्हणजे राशीभविष्य होय. 

👍नशिबाच्या परिक्षा: 

पहिल्या स्तंभात प्रत्येक राशीच्या खाली डाव्या बाजूला त्या राशीचा नशिबाचा ह्या वर्षीचा तर उजव्या बाजूस मागील वर्षीचा अनुक्रम दाखवला आहे.  

३१ दिवसांचा महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे जास्तीत जास्त गुण १८६, तर ३० दिवसांच्या महिन्यांचे जास्तीत जास्त गुण १८० आणि फेब्रुवारी २०२३चे जास्तीत जास्त अनुकूल गुण १६८. याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ग्रह किती शुभ दिवस आहेत ते अनुकूल गुण 
दाखवले आहेत. त्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल राखत समाधान मिळवण्याची युक्ती 
तुम्हाला मिळू शकेल अशी अनुकूल गुणांची कल्पना आहे. 

👍अनुकूल गुणांच्या पद्धती: नियम
आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत. प्रत्येक राशीला सहा प्रमुख ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण 
देतो. ते नियम असे आहेत:

रवि: ३,६, १० व ११ वा शुभ
मंगळ: ३,६, व ११ वा शुभ
बुध: २,४,६,८,१० व ११ वा शुभ
गुरू: २,५,७,९, व ११ वा शुभ
शुक्र: १,२,३,४,५,८,९,११ व१२ वा शुभ
शनी: ३,६, व ११ वा शुभ

👍"नशिबाची गटवारी":👌

आगामी १४ महिन्यांच्या कालखंडात वरील महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ आहेत, ते आजमावून माहवार शुभदिवस अर्थात अनुकूल गुण देऊन, त्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे
१.उत्तम पहिला गट: धनु, कन्या व मीन राशी
२.उजवा दुसरा गट: कर्क, सिंह व मेष राशी
३.मध्यम तिसरा गट: व्रुश्चिक व मिथुन राशी.
४.डावा चौथा गट: व्रुषभ व तुळ रास
५.त्रासदायक पाचवा गट: कुंभ आणि मकर रास.

👍"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":👌
सोबत राशीने हाय या संपूर्ण कालखंडातील माहवार अनुकूल गुणांचे कोष्टक दिले आहे प्रत्येक महिन्यामध्ये राशीचा नशीबाचा क्रमांक ही खाली दिलेला आहे वर्ष कालखंडाच्या अखेरीस मागच्या वर्षीच्या तुलनेत अनुकूल गुण तसेच क्रमांक नशिबाच्या बाबतीत कुठला ते देखील दिले आहे त्यावरून तुमचे तुम्हालाच समजू शकेल की आपले नशीब इतरांच्या तुलनेत कसे आहे. या पद्धतीमुळे आपण आपल्या अपेक्षा आणि प्रयत्न यांची सांगड घालून योग्य ते कृती करून आपल्या समाधानाचा मार्ग शोधू शकता तुमचे नशीब तुमच्या हातात असाच जणू काही हा एकंदर मार्ग.
मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल:

मेष: मागच्या वर्षी सातवा नंबर होता आता सहावा आहे म्हणजे प्रगती आहे.
वृषभ: बरोबर उलटं झालंय मागच्या वर्षी आठवा क्रमांक होता बारा राशींमध्ये तो आता नववा झालाय.
मिथुन: राशीची प्रगती आहे कारण गेल्यावर्षी बारा राशींमध्ये त्याचा तळाला 11 वा क्रमांक होता तो आता उडी मारून आठ झाला आहे.
तर कर्क रास नवव्या क्रमांकावरून प्रगती करत चौथ्या क्रमांकावर पोचली आहे.
सिंह: रास दिमाखाने दुसऱ्या क्रमांकावर होती तिची घसरगुंडी होऊन ती पाचव्या नंबरवर स्थिरावणार आहे, म्हणजे दिवस मागच्यापेक्षा आता जरा तेवढे चांगले नाहीत.
कन्या: राशीचे बरोबर उलट झालं आहे कारण तिने मागच्या वर्षी पाच क्रमांक वरून दुसऱ्या क्रमांकावर ह्या वेळेला उडी मारणार आहे म्हणजे त्यांची चांगली प्रगती आहे.
तुळ: जैसे थे तळाला दहाव्या क्रमांकावर कठीण दिवस तसेच पहात राहणार आहे.
वृश्चिक रास मागच्या वर्षी दिमाखात पहिल्या क्रमांकावर होती ती आता घसरून सातव्या क्रमांकावर कटकटी पाहणार आहे.
धनु: त्याउलट अगदी बरोबर मागच्या वर्षी मध्यममार्गी ६ व्या क्रमांकावरून चक्क पहिला क्रमांक मिळवणार आहे.
मकर : रास बिचारी बाराव्या तळाच्या क्रमांकावर यावर्षीही किया मारुन कठीण दिवसांना तोंड देणार आहे.
कुंभ: राशीची जबरदस्त घसरगुंडी होऊन ती तिसर्या नंबरवरून चक्क अकराव्या क्रमांकावर तळाला जाणार आहे.
मीन: रास आहे त्या परिस्थितीत किंचित सुधारणा करत चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर उडी मारणार आहे.
अशा तऱ्हेने राशींचे नशिबाचे आगामी वर्षांतील चढउतार तुम्हाला मार्गदर्शक ठरतील.

👍"शनीची साडेसाती":

साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हां 
तुमच्या चंद्रराशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा  
साडेसाती सुरू होते व  तुमच्या राशीच्या पुढील 
राशीनंतर येणार्या राशींत जातो, तोपर्यंत साडेसाती 
असते.
उदा: 
सध्या मकर राशींत शनी वक्रीआहे, म्हणून आता 
धनु, मकर  कुंभ राशींना साडेसाती आहे. शनी कुंभेत 
१७ जानेवाली'२३ रोजी जेव्हा करेल, तेव्हा धनु राशीची साडेसाती 
संपेल, मात्र तेव्हा पुन्हा मीन राशीला साडेसाती सुरु होईल.
✴९. धनु▪ २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु झालेली असुन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.​
✴१०. मकर▪२६ जानेवारी २०१७ रोजी  सुरु 
झालेली असुन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.​
११. कुंभ:
शनीची साडेसाती २४ जानेवारी'२०२० पासून सुरु झाली, ती २३ फेब्रुवारी'२०२८ पर्यंत असेल.
१२ मीन: शनीची साडेसाती २९ एप्रिल'२२ ते १२ जुलै'२२ व नंतर पुन्हा १७ जाने'२३ ते पर्यंत ती राहील.

👍वयोमानानुसार आता मी वैयक्तिक ज्योतिष सल्ला देणे बंद केले आहे, ह्याची क्रुपया नोंद घ्यावी.

👍सर्व वाचकांना आगामी दिवाळी तसेच कालखंड सुख शांती व समाधानाचा जावो ही मनःपूर्वक शुभेच्छा.

धन्यवाद
सुधाकर नातू

।। शुभम् भवतु ।।

👍राशीनिहाय अनुकुलगुण कोष्टक:'२२/२३ 👌
ज्या इच्छुक वाचकांना हे गोष्ट हवे असेल, त्यांनी 
आपले नाव देऊन 9820632655 येथे व्हाट्सअप संदेश करावा.

Bhavishya 2022-23.png

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

👍"दिवाळी आली अन् वाचनसंस्कृती निकाली ?"😢


👍"दिवाळी आली अन् वाचनसंस्कृती निकाली ?"😢

दिवाळी आता आली जवळ आणि त्यामुळे आपल्याला आनंदाचे असे अनेक क्षण मिळणार आहेत. आज लक्षात आले की, या वेळेला दिवाळी फक्त दोन दिवसांची आहे आणि असा अनुभव मला तरी माझ्या आयुष्यात यापूर्वी कधी आल्याचे आठवत नाही.

नेहमी दिवाळी चार दिवसांची असायची, फार तर तीन दिवसांची. पण फक्त दोन दिवसांची असा अनुभव हा प्रथमच येत आहे. सारे काही आक्रसत चालले आहे असे वाटावे असेच हे सारे लक्षण नव्हे कां? त्यातून दिवाळीच्यामध्ये सूर्यग्रहण हा एक अनिष्ट म्हटलं तर आणि कदाचित जगावर प्रभाव पाडणारा असा प्रसंग देखील उद्भवणार आहे.

थोडक्यात कोरोनाच्या संकटानंतर येणारी ही दिवाळी, आपल्याला हेच सांगते आहे की,
"राजा, वैऱ्याची रात्र आहे, सावध राहा !" आणि याचं कारण म्हणजे एकंदर बिकट आर्थिक परिस्थिती, वाढती महागाई आणि जगावरती येणारे मंदीचे संकट चक्क 'आ' वासून उभे आहे. त्यातून युरोपमध्ये युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध चाललं आहे, त्यावरून कोणते प्रसंग भयानक परत येणार ही चिंता जगाला लागली आहे.

सर्वसाधारण वेळेला दिवाळी म्हटली की, मराठी माणसाला 'दिवाळी अंक' हा जिव्हाळ्याचा एक अविभाज्य भाग आहे. तसे मार्केटमध्ये हळूहळू दिवाळी अंक येऊही लागले आहेत. दिवाळी अंक जास्तीत जास्त खपावेत, म्हणून बरेच जण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्नही करत आहेत. त्यासाठी, वेगवेगळी अशी आकर्षणे, पुस्तकांच्या भेटी म्हणा किंवा ध्वनिफितींचा एखादा काही संच, काही दिवसांसाठी विनामूल्य देणं म्हणा किंवा 'दिवाळी पहाट' सारखे कार्यक्रम म्हणा. अशी प्रलोभनं दाखवून पाच-सहा दिवाळी अंक एकदम संचाच्या स्वरूपात आपल्या प्रकारे वितरित करायचा प्रयत्नही करत आहेत.

त्यामुळे नेहमीसारखीच दिवाळी अंकांची ही दिवाळी चालूच राहणार हे खरे आहे. दिवाळीत अंक म्हटले की विचारांची देवाण-घेवाण, अंतर्मुख करणाऱ्या अशा भावनांची, अनुभवांची उजळणी हा एक पुढे तीन-चार महिने आनंद देणारा असा कार्यक्रम आपल्याला सातत्याने अनुभवायला येणारच आहे.
मराठी माणसाचं हे तर वैशिष्ट्य आहे की, जशी रंगभूमी त्याला प्रिय, त्याचप्रमाणे मराठी माणसाला दिवाळी अंक देखील अजून तरी हवेहवेसेच !

ह्या पार्श्वभूमीवर, आज एक दिवाळी अंक वाचताना मला बातमी कळली-त्याच्या संपादकीयामध्ये की, आता यापुढे दरमहा अंक न निघता केवळ वार्षिक दिवाळी अंकच काढले जातील. तसं बघितलं तर, बहुतेक मराठी मासिके हळूहळू अस्ताला गेलेली आहेत. कदाचित हाताच्या बोटावर मोजावी एवढीच मराठी मासिकं सध्या अस्तित्वात असतील आणि ही एक खेदाची बाब आहे. कारण दिवाळी अंक फक्त याच्यापुढे निघणार, म्हणजे वाचनाची जी काही आपली संस्कृती आहे ती आटत जाणार.....

वाचनाचे मानवी जीवनातील महत्त्व वेगळे काही सांगायला नको. आज माणूस इथपर्यंत यायला, त्याची प्रगती करायला विज्ञानाबरोबरच वाचन संस्कृतीचा प्रचंड मोठा हात लागलेला आहे हे विसरता येणार नाही. माणूस आणि इतर प्राणी यांच्या मधला जो फरक आहे, तो इथेच आहे. मानव विचार करू शकतो विचार देऊ शकतो आणि त्यासाठी वाचन हे अत्यावश्यक आहे. वाचन संपले तर कदाचित माणूस देखील संपेल, अशी भीती आहे. म्हणून हा सारा लेखाचा प्रपंच.

धन्यवाद
सुधाकर नातू

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

👍"दैनंदिन पाऊलखुणा-१३ !":👌

 👍"दैनंदिन पाऊलखुणा-१३ !":👌

ह्या वैशिष्ट्यपूर्ण लेखमालिकेला "जुने ते सोने"म्हणतात ते काही खोटे नाही. माझ्या 2010 च्या डायरीमध्ये ज्या दररोज नोंदी मी घेतल्या, त्यांचा थोडक्यात परामर्श या लेखमालिकेत घेत आहे.

@ 15आँक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌

#1542 मुघल सम्राट अकबराचा जन्म
# 1888 गो ग आगरकरांचे सुधारक पत्र सुरू
# 1918 साईबाबा पंचत्वात विलीन
# 1920 लेखक मारियो पूझो यांचा जन्म
#1926 कवी नारायण सुर्वे यांचा जन्म
# 1932 टाटांनी कराची ते मुंबई अशी विमान सेवा सुरू केली
#2002 विनोदी लेखक वसंत सबनिसांचा मृत्यू
# 1997 अरुंधती रॉय यांना गोड ऑफ स्मॉल थिंगस् बद्दल बुकर पुरस्कार
##########################

👍विशेष नोंद 👌
#साहित्यातील नोबल पारितोषक पेरूचे व्हर्गास सोया यांना
# आठ मे जागतिक थँलौस्मिया दिन
# आय एस ए एसः इंटरनॅशनल सिक्युरिटी असिस्टंट फोर्स
##########################

@ 16 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌
# 1905 बंगालच्या फाळणी विरोधात कायदेभंगावरील चळवळीला आरंभ
# 1886 लेखिका नाटककार गिरीजाबाई केळकर यांचा जन्म
# 1921 प्रबोधनकार ठाकरेंच्या 'प्रबोधन' चे प्रकाशन
#1944 ओगले काच कारखान्याचे संस्थापक गुरुनाथ ओगले यांचे निधन
# 1950 पुणे अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक दादासाहेब केतकर यांचे निधन
#1998 भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांना नोबेल पुरस्कार
# 2002 इतिहास कादंबरीकार ना स इनामदारांचा मृत्यू
##########################

👍 विशेष नोंद 👌
# ब्रेड बनविण्यासाठी यीस्ट वापरतात
# फायनान्स कमिशन दर बारा वर्षांनी नेमतात
# हवेतील आर्द्रता 'हायग्रोमीटर' ने मोजतात
# दुरंद रेषा भारत आणि अफगाणिस्तान मध्ये आहे # 2014 मध्ये स्कॉटलंडमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा होतील
##########################

@ 19 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌
# 1761 ब्रिटिश सेनापती लॉर्ड कॉर्नवाँलिसने अमेरिकन सेनापती जॉर्ज वॉशिंग्टन समोर शरणागती पत्करली
# 1902 मराठी लघुकथेचे शिल्पकार दिवाकर केळकर यांचा जन्म
# 1920 'स्वाध्याय परिवार'चे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म : हा दिवस मनुष्य गौरव दिन म्हणून पाळला जातो
#1936 गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म # 1973 इंग्लिश पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा मृत्यू
##########################

👍 विशेष नोंद 👌

# RDX: रिझर्व डेव्हलपमेंट एक्स्प्लॉजिव्ह
# गोवळकोंडा किल्ला हैदराबाद जवळ आंध्र प्रदेशात आहे
# भारतात ओरिसा राज्याचे दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे
# राज्यसभेचे अध्यक्ष पद उपराष्ट्रपती भूषवतात #जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे
##########################

@ 20 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌

# 1915 अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचा जन्म
# 1917 शाहीर अमर शेख यांचा जन्म
# 1932 गायक संगीतकार कमलाकर भागवत यांचा जन्म
# 1969 अकोला येथे पंजाबराव विद्यापीठाची स्थापना
# 1974 गायक संगीतकार कृष्णराव फुलंब्रीकर यांचे निधन
# 1995 देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी पुरस्कार जाहीर
# ☺️1970 डॉक्टर नॉर्मन बोरलॉक यांना हरितक्रांतीसाठी नोबल पुरस्कार
# 2001 पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरव पदक
##########################

👍 विशेष नोंद 👌

# गँमन इंडिया लिमिटेड कंपनी 1922 मध्ये स्थापन झाली
# क्रॉम्प्टन ग्रीव्हज लिमिटेड कंपनी 1937 मध्ये स्थापन झाली
# व्होल्गा ही युरोपातील नदी कॅस्पियन समुद्राला जाऊन मिळते
# चीनचे राष्ट्रीय फळ किवी
# नोबल पारितोषक मिळालेल्या पहिल्या पाकिस्तानी नागरिकाचे नाव अब्दुल सलाम
# लॉंग कॉर्नर व शॉर्ट कॉर्नर ह्या संज्ञा हॉकीशी निगडित आहेत
##########################

धन्यवाद
सुधाकर नातू

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

👍 "अधुरी जीवनरेखा- अधुरी एक कहाणी !":😊

👍 "अधुरी जीवनरेखा- अधुरी एक कहाणी !":😊

☺️ सुमारे पाच दशकांपूर्वी मी ज्योतिषाचा अभ्यास सुरू केल्यापासून मी कोणाचीही ओळख झाली की, त्याची जन्मतारीख, जन्मवेळ व जन्मस्थळ विचारत असे आणि घरी आल्यावर त्या त्या तारखेला एका डायरीमध्ये त्या व्यक्तीची पत्रिका करून ठेवत असे. त्यासाठी एक छोटी डायरी होती काळ्या पुठ्ठ्याच्या कव्हरची. ती अजूनही माझ्याकडे आहे.👌

👍हल्ली सकाळी चहा पिण्याच्या वेळेला, मला काहीतरी वाचायला किंवा निरीक्षण करायला लागतं. त्या दिवशी, मी सहज ती काळी डायरी उघडली आणि उघडल्याबरोबर पहिली पत्रिका समोर आली, ती व्यक्ती 32 व्या वर्षीच मरण पावली होती. मला वाटले हे असं का व्हावं, तो एक कर्तबगार तरुण होता, विवाह झाला होता तसेच एक मुलगी पण झाली होती आणि अचानक 32 व्या वर्षी, हार्ट अटॅक घेऊन हा तरुण गेला. पत्रिकेत बघितलं तर काय बाबा कारण असेल ? अभ्यास केला. 😊

☺️ त्यामुळे वाटलं आणि इतरही अशाच अल्पायुषी व्यक्तींच्या पत्रिका, मी त्या डायरीतून बघितल्या. त्यातून मला जो निष्कर्ष सापडला, तो आज इथे मांडतोय:
👍शनि व मंगळ हे मोठे महाप्रतापी आणि अनिष्ट ग्रह आहेत. विवाह विलंब आणि विवाहसुखामध्ये काही ना काहीतरी अडचणी, अडथळे याच्यामागे सप्तमेश, सप्तम स्थान आणि त्याच्यावर शनी वा मंगळाची दृष्टी वा युती, अथवा एखादा षडाष्टकासारखा अनिष्ट योग ही कारणं हे सर्व ज्ञात आहे. 👌

☺️ तशीच एक बाब मला या बहुतेक अल्पायुषी पत्रिकांमध्ये आढळली व ती मला इथे नोंद घ्यावीशी वाटली. अनुभवाचे बोल म्हणून सप्तमेश जसा विवाहा साठी महत्त्वाचा, तसाच आयुर्मान चांगले मिळण्यासाठी लग्नेश, षष्ठेश व अष्टमेश हे महत्त्वाचे आणि त्यांच्या अधिपतींवर शनी वा मंगळाच्या अनिष्ट दृष्टी जर असल्या, तर कदाचित ती माणसं अल्पायुषी ठरत असावीत, असं मला आढळलं. मंगळाचा वा शनीचा षडाष्टक योगाची त्यांच्यावर दृष्टी, मंगळ शनीचा पाप कर्तरी योग आणि षडाष्टक योग अथवा लग्नेश अष्टमात अशा तऱ्हेची काही निरीक्षणे मला सापडली. 👌

👍थोडक्यात लग्न स्थान खूप महत्त्वाचं. लग्नेश महत्त्वाचा. तसाच षष्ठेश, अष्टमेश महत्वाचे. या तीन स्थानांच्या अभ्यासावरून आणि मंगळ शनी, तसेच राहू व केतू यांच्या त्या संबंधित योगांचा सखोल अभ्यास करून एखादी व्यक्ती अल्पायुषी ठरणार आहे कां, याचा कदाचित अभ्यास करता येईल, असं मला वाटतं. 😊

👍विशेषतः गेल्या दोन-तीन वर्षात कोरोना संकट झाल्यावर देखील अचानक अनेक व्यक्तींचे अल्पायुष्यात मरण पावलेले आलेले दिसते तरुण मंडळी ही कुठे गरबा खेळता खेळता, किंवा क्रिकेट व तत्सम खेळ खेळताना किंवा एखाद्या धावण्याच्या स्पर्धेत मध्ये धावताना, अचानक कोसळून मृत्यू पावल्याचे आपल्याला सातत्याने ऐकायला मिळते आहे. हा मृत्यूचा खेळ खरोखर व्यथित करणारा आहे. सध्याची वेगवान जीवनशैली, ताण-तणाव आणि वाढत्या अपेक्षा हे तर कारण नक्कीच आहे, परंतु आपली जीवनशैली कोणी बदलायला तयार नाही किंवा तो बदलू शकत नाही हे सत्य आहे. परंतु अशाच वेळी ज्योतिष अभ्यासकांनी या अत्यंत महत्वाच्या विषयाचा सखोल अभ्यास करावा आणि माणसाचे आयुर्मान पत्रिकेवरून कसे काढता येईल त्याचा विचार करायला हवा. 💐

☺️ माझ्या आठवणीप्रमाणे दीर्घायुष्यी माणसांच्याही मी पत्रिका कधीतरी अभ्यासल्या होत्या आणि त्यातूनही वेगळे निष्कर्ष मी काढले होते. पण तेव्हा देखील लग्नेश षष्ठेश द्वादशेष आणि अष्टमेश यांचा अभ्यास केला होता हे मला स्मरते. तो लेख कुठे पुन्हा मला माझ्या संग्रहात आढळला, तर तो पुन्हा अभ्यासेन व निष्कर्ष मांडेन. 😊

👍 याशिवाय माझ्या स्मरणाप्रमाणे, जन्मपत्रिकेत प्रत्येक ग्रह किती अंश कला विकला आणि कोणत्या राशीत आहे, त्याचा विचार करायचा आणि त्यावरून एकूण त्याचे आयुर्मान काढायचे, याचे एक सूत्र मला आढळले होते. प्रत्यक्ष हयात नसलेल्या व्यक्तींच्या आयुर्मानांच्या उदाहरणांवरून, त्या सूत्राचे मी अवलोकनही केले असता 90% ते सूत्र बरोबर आढळले होते. ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बहुदा ग्रहांकीत मासिकात मी यासंबंधी एक लेखही लिहिला होता. पण दुर्दैवाने त्याची प्रत आता माझ्याकडे नाही. तसेच तो शोधण्याचा प्रयत्नही अजून अयशस्वी झाला आहे. तो जर लेख मिळाला तर या विषयावर अधिक प्रकाश टाकता येईल, असं मला वाटतं.👌

विचित्र अशा सद्यस्थितीमुळे, ही अशी आयुर्मानासंबंधी अभ्यासाची वेळ आली आणि मी हा लेख लिहू शकलो. चूक भूल, द्यावी घ्यावी.

धन्यवाद
सुधाकर नातू

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

 👍"The Fundamental Realities in Life !":👌 

 👍"The Fundamental Realities in Life !":👌 

1. Hope, Inspiration and Hard Work are the three Great accomplishments in Life.            

 2. Nature, Time and Patience are the three Great Doctors.                         

3. Wonders, Coincidences and Calamities are the three Great Surprizes in Life.                            

4. Attitude, Skills and Knowledge are the three Great Weapons in Life.     

5. Love, Fragrance and Melody are the three Delights in Life.                                                           

 6. Creativity, Innovation and Intelligence are the three Gifts in Life.  

7. Systems, Structures and Methods are the three Great Essentialities in Life.                  

 8. Success is an End of the Journey, whereas, Failure is the Ongoing Journey.                                            

9. Accidents, Probabilities and Mistakes are the three Great Uncertainties in Life.

10. Co-ordination, Commitment and Co-operation are the three main  needs of the Collective Actions.      

11. Human Error, Nature's Fury and Failed Technology are the three main reasons for Disasters.             

12. Cause, Reason and Result are the three the most Interconnected Factors.                              

13. Misunderstandings, Different Intents and Enmity are the three roots of the Conflicts.


Thank you

Sudhakar Natu

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-१0!":😊

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-१0 !":😊

दैनंदिनी लिहीणे, हा एक मोठा चांगला अनुभव असतो कारण त्यामधून आपल्याला स्वतःशीच स्वतःला संवाद साधता येतो. याचं कारण म्हणजे आपण त्या वेळेला एकांतात असतो आणि आपल्या समोरची रोजनिशी, आपण आणि आपले मन, मनातला आरसा त्यातून जाणीवांच्या दृष्टीने आपण सभोवतालचा घडलेल्या घटनांचा आणि आपल्या स्वतःच्या विचारांचा आढावा घेत असतो, त्याची नोंद करत असतो. साहजिकच अशा दैनंदिनी लिहिण्याच्या सवयीचा खूप फायदा होतो. 

पुढे, मागे वळून पाहताना आपण काय केले कुठे बरोबर होतो, कुठे चुकलो, काय नवीन शिकलो हे देखील बघता येते. अशी सवय नेहमी पाळता येणं फार कठीण असतं. माझ्या वाचनाप्रमाणे किंवा ऐकल्याप्रमाणे मला आठवतंय की श्री सुधीर गाडगीळ सातत्याने अशा तऱ्हेची दैनंदिनी वर्षानुवर्ष लिहीत आले आहेत. परंतु माझे मात्र तसे काही झालेले नाही. मी फक्त कधी मधी कुठल्या ना कुठल्या वर्षी हे व्रत पाडू शकलोय. आता माझ्या २०१० सालातील रोजनिशीतील नोंदी, मी दैनंदिनी तेल पाऊलखुणा असं नाव देऊन त्यावर माझी ही लेखमालिका देखील ब्लॉगवर लिहीत आहे.

# आपल्या इच्छेप्रमाणे नेहमी सगळं घडतच असं नाही आणि तसं समजणं मोठं चुकीचं असतं, असा अनुभव अजून मधून येतो. याबाबतीत अपेक्षाभंगामुळे आपले नुकसान होते. प्रकृतीत विपरीत परिणाम होतो आणि ते महागात पडू शकते. दोन्ही बाबतीत शेवटी आपल्यालाच त्रास होतो. यावर उपाय शोधून सापडत नाही आणि 'कालाय तस्मै मः' ! व्यक्ति त्याच्या प्रकृती ( की विकृती) असे म्हणून गप्प बसणे आपल्या हातात असते.

# कोण कसा केव्हा वागेल सांगता येत नाही. त्यामुळे कठीण वाटणाऱ्या गोष्टींचा त्रास होतो. अर्थात त्यांचाही केव्हातरी अंत होतो आणि सर्वसाधारण सुसह्य असे वातावरण परिस्थिती केव्हातरी निर्माण होतेच होते. तिचा इंतजार करण्यासाठी धीर धरायला हवा, असेच अनुभवांती समजते. 

# अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा, विचार करून त्या ठेवा. त्या न पूर्ण झाल्यास समजूतदारपणा हवा. कधी कधी आपल्या मनाप्रमाणे होत नाही. सगळेच आपल्याच मनाप्रमाणे होईल असा हट्ट कधीही नको. आपल्या उपेक्षेचे कारण आपल्या अपेक्षा असतात, म्हणून नेहमी योग्य अपेक्षा ठेवायला शिकायला हवं.

# नियमित आहार एकपट खाणे, दुप्पट पाणी पिणे तिप्पट चालणे आणि चौपट हसून आनंदी राहणे. शक्यतो शाकाहारी असणे, निर्व्यसनी असणे. दुसऱ्याचे भले करता नाही आले, तरी निदान दुसऱ्यांचे वाईट न चिंतणे, यामुळे मानसिक समाधान मिळते.

धन्यवाद

सुधाकर नातू

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

 👍"दैनंदिन पाऊलखुणा-11 !":👌

 👍"दैनंदिन पाऊलखुणा-11 !":👌

ह्या वैशिष्ट्यपूर्ण लेखमालिकेला "जुने ते सोने"म्हणतात ते काही खोटे नाही. माझ्या 2010 च्या डायरीमध्ये ज्या दररोज नोंदी मी घेतल्या, त्यांचा थोडक्यात परामर्श या लेखमालिकेत घेत आहे.

@ 10 आँक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌

# 1731 हायड्रोजन वायूचे संशोधक कॅव्हेंडीश यांचा जन्म
# 1844 स्वातंत्र्य सेनानी काँग्रेसचे दुसरे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यदजींचा जन्म
# 1899 कम्युनिस्ट नेते कॉम्रेड डांगे यांचा जन्म
# 1902 कन्नड साहित्यिक डॉक्टर के शिवराम कारंथ यांचा जन्म
# 1906 इंग्रजी साहित्यिक आर के नारायण यांचा जन्म
# 1910 चीनमध्ये वैद्यकीय सेवा देणारे
डॉ द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म
# 1954 आचार्य अत्रेंच्या श्यामची आई चित्रपटाला
पहिले राष्ट्रपती पदक
# 2000 श्रीलंकेच्या माजी पंतप्रधान सिरीमावो बंदरनायके यांचा मृत्यू
##########################

@ 11 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌
# 1492 कोलंबसने बहामा बेटांचा शोध लावला # 1916 समाजसेवक भाजप नेते नानाजी देशमुख यांचा जन्म
# 1902 लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म
# 1968 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पंचत्वात विलीन
# 2001 व्ही एस नायपॉल यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार
##########################

👍 विशेष नोंद 👌
# नोबेल पारितोषक स्वीडन तर्फे दिले जाते
# डीएनए चा शोध फ्रीडरिश मिशर यांनी लावला
# इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटीचे मुख्य कार्यालय जिनिव्हा येथे आहे
# इन्फोसिस ची स्थापना 1981 साली झाली
# भारतीय विद्यापीठाचे संस्थापक डॉ पतंगराव कदम
#########################

@12 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌
# 1688 इराणचा बादशाह नादिरशहा चा जन्म
# 1911 क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचा जन्म
# 1921 लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक यांचा जन्म
# 1922 कवयित्री शांता शेळके यांचा जन्म
# 1946 क्रिकेटपटू अशोक मंकड यांचा जन्म
# 1961 अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचा जन्म
# 1967 स्वातंत्र्यसेनानी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा मृत्यू
# 1999 पाकिस्तानात लष्करी क्रांती व जनरल परवेज मुशर्रफ सत्ताधीश
# 1968 इक्विटोरियल 'गिनी' देश स्वतंत्र
# 1942 अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांचा जन्म
##########################

👍 विशेष नोंद 👌

# गोल्फ हा खेळ, सर्वप्रथम स्कॉटलंड येथे खेळला गेला
# जगातील सर्वात जुनी संसदीय लोकशाही ब्रिटनची
# नॉर्वेची राजधानी आँस्लो
# व्हायोलीनला चार तारा असतात
# इलेक्ट्रॉनचा शोध सर जे जे थॉमस यांनी लावला
##########################

@ 13 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌
# युनोचा नैसर्गिक आपत्ती निवारण निधी निवारण दिन
# 1833 नोबेल पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो त्या अल्फ्रेड नोबेलचा जन्म
# 1884 'GMT' ग्रिनीज जवळून जाणाऱ्या रेखांशाला शून्य मानून जगाची वेळ निश्चित केली गेली
# 1980 साहित्यिक पु भा भावे यांचे निधन
##########################

👍विशेष नोंद 👌
# जगात सर्वाधिक सोन्याची खरेदी व वापर भारतात होते
# राणी एलिझाबेथ 2 ह्यांच्या आधी किंग जॉर्ज सहावे हे ब्रिटनचे सम्राट होते
# टॉम अँड जेरी कार्टूनला 69 वर्षे झाली
# ग्रीस मध्ये द्राक्मा हे जलन होते.
##########################

@14 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌
# 1947 साहित्यसम्राट न चिं केळकर यांचा मृत्यू # 1953 कुटुंब नियोजनाचे पहिले प्रसारक रं धों कर्वे यांचा मृत्यू
# 1958 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लाखो अस्पृश्यांसह बौद्ध धर्मात प्रवेश
# 1993 उद्योगपती लालचंद हिराचंद यांचे निधन
# 1994 इतिहासकार सेतू माधव पगडींचे निधन 2004 भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडीचे निधन
# 1989 शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता व धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले
# 2005 महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक द्वा भ कर्णिक ह्यांचे निधन
##########################

👍 विशेष नोंद 👌
#' न्युझीलँड'ची राजधानी वेलिंग्टन
# युरोपच्या इतिहासात 1848 हे वर्ष क्रांतिकारी वर्ष म्हणतात
# झांबिया तांब्याचा देश, or ए कंट्री ऑफ पॉवर कॉपर म्हणून ओळखली जातो.
##########################

धन्यवाद
सुधाकर नातू

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०२२

 👍"दैनंदिन पाऊलखुणा-10 !":👌

 👍"दैनंदिन पाऊलखुणा-10 !":👌

"जुने ते सोने"म्हणतात ते काही खोटे नाही. माझ्या 2010 च्या डायरीमध्ये ज्या दररोज नोंदी मी घेतल्या, त्यांचा थोडक्यात परामर्श या लेखमालिकेत घेत आहे.

@ 6 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌
# 1893 शास्त्रज्ञ मेघनाथ सहा यांचा जन्म
# 1913 कविवार वा रा कांत यांचा जन्म
# 1949 पंडित नेहरूंच्या हस्ते खडकवासला येथे एनडीएचा पायाभरणी समारंभ
# 1963 आकाशवाणीच्या सांगली उपकेंद्राचे उद्घाटन
# 1979 म. म. दत्तो वामन पोतदार यांचा मृत्यू
# 2004 अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेट मध्ये
400 बळी घेतले
##########################

👍 विशेष नोंद 👌
# आतापर्यंत रसायनशास्त्रात भारतीयाला कोणतेही नोबल पारितोषक मिळालेले नाही
# पीओएस म्हणजे पॉईंट ऑफ सेल
# राष्ट्रकुल 2010 मध्ये 54 देश सामील आहेत
##########################

@ 7 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष 👌
# वन्य पशु दिन
# आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन

#1708 पठाणांच्या हल्ल्यात शिखांचे गुरु गोविंदसिंग ठार
# 1866 कवी केशवसुत तथा केशव कृष्णाजी दामले यांचा जन्म
# 1867 पुण्याच्या ससून हॉस्पिटलचे उद्घाटन
#1897 शास्त्रज्ञ मादाम क्युरी यांचा जन्म
# 1885 अणुअंतरंग स्पष्ट करणारे शास्त्रज्ञ नोबेल पारितोषक विजेते निल्स बोहर यांचा जन्म
#1914 गानसम्राज्ञी बेगम अख्तर यांचा जन्म
##########################

👍विशेष नोंद 👌
# रशियन राज्यक्रांती 1917 मध्ये झाली
# माऊंट एव्हरेस्ट सर करणारी भारतीय पहिली महिला बचेंद्री पॉल
# आग्रा येथील भारतातील पहिली मुघल गार्डन बाबराने बांधली
# अमेरिकेतील टोनी पुरस्कार रंगभूमीसाठी दिला जातो
##########################

@ 8 आँक्टोबर 💐

☺️ दिनविशेष 👌
# 1860 लॉस एंजलिस आणि सँनफ्रँस्निस्को दरम्यान पहिली टेलिफोन लाईन कार्यान्वित
# 1891 किर्लोस्कर मासिकांचे संपादक
शं वा किर्लोस्कर यांचा जन्म
#1922 नोबल पारितोषक विजेते डॉक्टर रामचंद्रन यांचा जन्म
#1931 साहित्यिक उद्धव ज शेळके यांचा जन्म
# 1931 भारतीय वायुसेना स्थापनेचा वायुसेना दिन # 1936 हिंदी साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांचे निधन # 1962 लोकमान्य टिळकांचे साप्ताहिक केसरी दैनिक झाले
#1991 सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड गोदावरीबाई परुळेकरांचे निधन
#1979 स्वातंत्र्यसेनानी आणीबाणीचे विरोधक जयप्रकाश नारायण यांचे निधन
# 1999 वीणा मासिकाचे संपादक उमाकांत ठोंबरे यांचा मृत्यू
##########################

@ 9 आँक्टोबर💐

☺️ दिनविशेष 👌
# 1876 ज्येष्ठ धर्मपंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म
# 1892 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचे निधन
# 1914 मराठी बालसाहित्याचे जनक विनायक एडक यांचे निधन
# 1955 विख्यात हार्मोनियम वादक गोविंदराव टेंबे यांचे निधन
# 1976 मुंबई लंडन थेट टेलिफोन सेवा सुरू
# 1987 आँपरैशन 'ब्लू स्टार' योजनाकार जनरल अरुणकुमार वैद्यांची हत्या
# 2009 अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांना
शांततेचे नोबल पारितोषक
##########################

👍विशेष नोंद 👌
# ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम चे लेखक स्टीफन हॉकिंग
# पक्षांशी संबंधित अभ्यास आँनिपोलाँजी
# "लोकांचे, लोकांनी चालवलेले आणि लोकांसाठीचे सरकार म्हणजे लोकशाही" ही व्याख्या अब्राहम लिंकन ह्यांची
##########################

धन्यवाद
सुधाकर नातू