👍"आठवणीतल्या साठवणींची मंगल प्रभात !":💐
लहानपणापासून सकाळी रेडिओवर, सकाळी सहा साडेसहाच्या सुमारास 'मंगल प्रभात' हा भावमधुर भक्तीसंगीताचा कार्यक्रम ऐकण्याची माझी सवय होती. नंतर विविध माध्यमांच्या विशेषतः टीवी, स्मार्ट फोनच्या शिरकावामुळे घराघरातील रेडिओ जवळजवळ हद्दपार झाला आहे.Caravan mini घेतल्यामुळे रेडिओ ची सोय झाली आणि पुनश्च सकाळपासून मंगल प्रभात आणि नंतर चिंतन हा कार्यक्रम मी ऐकणे सुरू झाले. परंतु बदलत्या काळामुळे आमच्या आठवणीतल्या साठवणींची अपेक्षित गीते पुष्कळदा, मंगल प्रभातमध्ये ऐकायला मिळत नाहीत. अशा वेळेला मी youtube वर मला हवी असलेली भक्ती गीते ऐकतो.
अशा वेळेला मी मला आवडणारी गीते आठवायचा प्रयत्न करतो. त्यादिवशी मला शाहू मोडक आणि विठ्ठल पांडुरंग विठ्ठल असं एक गाणं खूपच सुश्राव्य आहे त्याची आठवण झाली पण काही केल्या ते गीत आठवेना. अशा वेळेला युट्युब वर सर्च मध्ये मी केवळ शाहू मोडक आणि पांडुरंग विठ्ठल संबंधित गाणं असं सर्च मध्ये टाकल्याबरोबर मला अपेक्षित असलेलं साठवणीतलं "निजरूप दाखवा हो.." हे गीत युट्युब वर मला ऐकता आले. त्या अर्थपूर्ण भक्तीगीताची लिंक दिली जाईल.
मंगल प्रभात झाल्यावर रेडिओवरील मुंबई अस्मिता वाहिनीवरील चिंतन हा कार्यक्रम देखील मी नेहमी ऐकतो योगायोगाने संत कवयित्री बहिणाबाई तिच्याबद्दल डॉक्टर मुक्ता राजे यांचे प्रथम ऐकायला मिळाले आयुष्यामध्ये खडतर अशी संकटे वाट्याला येऊ नाही या संत स्त्रीने आपले तन मन भक्ती भावाने पांडुरंग चरणी कसे वाहिले आणि त्यातूनच मार्गदर्शक असे अनेक अभंग कसे निर्माण केले ती कहाणी त्या चिंतनात होती साहजिकच त्या कार्यक्रमानंतर बहिणाबाईंचा लोकप्रिय अभंग "अरे संसार संसार जसा तवा चुलीवर !" मी youtube वर ऐकला त्याची लिंक दिली जाईल.
संत परंपरेतल्या या मंगलमय भक्ती गीता नंतर मला अचानक असंच एक अत्यंत नाद मधुर अर्थपूर्ण असं गीत आपण ऐकल्यात आठवलं ते काही केल्या आठवेना. युट्युब वर वेगवेगळ्या प्रकारे ज्ञानेश्वर हृदयनाथ मंगेशकर विवेक आणि पांडुरंग, सगुण निर्गुण संबंधित गीते अशा प्रकारे शोध घेण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक मला हवे असलेले साठवणीतले तुझं "सगुण म्हणू की निर्गुणा केंद्र रे " हे सुधीर फडके यांच्या श्रवणीय स्वरातले अभंग गीत गवसले. याची लिंक दिली जाईल.
माझ्या "आठवणीतल्या साठवण्यांची मंगल प्रभात !" ही अशी त्रिगुणात्मक सुमधूर भक्तीगीतांनी साजरी झाली आणि मनभावन क्षणांची माझ्यावर बरसात झाली.
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा