शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा 15 !":💐

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा 15 !":💐


माझ्या 2010 वर्षाच्या दैनंदिनीमधील वैशिष्ट्यपूर्ण नोंदींसंबंधी ही लेखमाला मी लिहीत आहे. त्यातील हा पुढचा लेख देखील तुम्हाला आवडेल असे वाटते.

@ 21 नोव्हेंबर 💐

👍"दिनविशेष !":👌
# 1963 विनोदी लेखक चिमणराव फेम टीव्ही जोशी यांचा मृत्यू
# 1927 नाटककार यांना नवरे यांचा जन्म
##########################

👍विशेष नोंद !":💐
# एटीएमः ऑटोमॅटिक टेलर मशीन
# 'ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम' हे पुस्तक स्टीफन हॉकिंग यांनी लिहिले
# 'बुकर' पारितोषक प्रथम मिळालेली पहिली भारतीय महिला अरुंधती रॉय 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्स' पुस्तकलेखनासाठी
# म्यानामार मधील स्वातंत्र्यासाठी वीस वर्षे तुरुंगवास मोगणारी नोबेल विजेती महिला 'आंग सान सून की'
##########################

@ 22 नोव्हेंबर !:💐

👍"विशेष नोंद !":👌
# सरोद वादनात निपुण अमजद अली खान
# सतार वादनात निपुण भारतरत्न रविशंकर
# बासरी वादनात निपुण हरिप्रसाद चौरसिया
# सनई वादनात निपुण भारतरत्न बिस्मिल्ला खान
# तबलावादनात निपुण अल्लारखा
# हार्मोनियम वादनात निपुण गोविंदराव टेंबे आणि पटवर्धन
# विजापूरचा गोल घुमट प्रसिद्ध आहे
,# जायकवाडी धरण विद्युत प्रकल्प गोदावरी नदीवर बांधले आहे
# 'ए सुटेबल एस टेबल बॉय' पुस्तकाचे लेखक विक्रम शेठ
# 'सेवन हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल पीपल' याचे लेखक स्टीफन कुवी
# जागतिक ग्राहक दिन 15 मार्च
# भारतातील महिला पहिला तेल शुद्धीकरणाचा कारखाना प्रथम दिब्रुगड येथे झाला
# सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे # कॉफी सर्वात जास्त ब्राझीलमध्ये होते
##########################

@ 23 नोव्हेंबर !:💐

👍विशेष नोंद !":👌
# बराक ओबामा हे अमेरिकेचे 44 अध्यक्ष
# अबुजा ही नायजेरियाची राजधानी आहे
# चीनमध्ये प्रथम ॲक्युप्रेशर थिअरी' चा शोध
लागला.
##########################

@ 24 नोव्हेंबर !":💐

👍विशेष नोंद !":👌
# 'एडवेंचर्स ऑफ टॉम सॉयर' हे पुस्तक मार्क ट्वेन यांनी लिहिले
# अलेक्झांड्रिया हे शहर एक ईजिप्तमध्ये आहे
# आखाती कुवैत इराक युद्ध 1991 मध्ये झाले.
##########################

@ 25 नोव्हेंबर !:💐

👍"दिनविशेष !:💐
# 1950 विख्यात निवेदक श्री सुधीर गाडगीळ यांचा जन्म
##########################

👍विशेष नोंद !":👌
# आज आमच्या विवाहाला 39 वर्षे पूर्ण झाली. किंबहुना प्रथमच अशा विवाहाच्या वाढदिवसाच्या दिवशी पती आणि पत्नी असे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी होतो. जवळच्याच एका नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे ही वेळ आली होती. हे लिहीत असतानाच सह्याद्री वाहिनीवर 'भेट तुझी माझी स्मरते अजूनही त्या दिसाची' ! हे गीत लागावे ही देखील योगायोगाची अतर्क्यच गोष्ट.

पावसाळ्याच्याच अशाच एका रात्री भुसावळ स्टेशनवर मी माझ्या पत्नीला 39 वर्षांपूर्वी प्रथम पाहिले अन् नंतर, जी आयुष्याला चांगल्या सहजीवनाची कलाटणी योगायोगाने मिळाली, ती अशी येथपर्यंत आली व अजूनही आमचे सहजीवन तसेच पुढे चालावे हीच प्रभु चरणी प्रार्थना.

एकंदर गेले दोन दिवस कडू आणि गोड अशाच आठवणींचे म्हणावयाचे.
##########################

@ 26 नोव्हेंबर !:💐
👍विशेष नोंद !":👌
# ☺️वाढदिवस लेखक डॉक्टर यशवंत पाठक लेखिका वीणा देव
##########################

@ 27 नोव्हेंबर !":💐

👍विशेष नोंद !":👌
# आज दिवस घरीच वाचन तसेच आराम व रात्री खुसखुशीत 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा '
झी टीव्ही'वर कार्यक्रम पहाण्यात घालवला.
# उषा दर्डा, पूर्वीच्या पुरोहित व जवाहरलाल दर्डा (लोकमत समुहाचे संस्थापक) यांच्या पत्नी. त्यांचे 'योगायोग' हे आत्मचरित्र वाचले. एखाद्याचे जीवन किती नाट्यमय, उलथापालथीचे अतर्क्य घटनांचे असते, ते समर्पक नांव असलेल्या या पुस्तकांने ठसवले. एका दमात सारे पुस्तक वाचून झाले, त्यातच त्याचे वैशिष्ट्य आले !
##########################

@ 29 नोव्हेंबर !":💐

👍विशेष नोंद !":👌
# यंदाचा 'डेविस कप' सर्बियाने जिंकला
# 'वोल्वो' ही कंपनी स्वीडन मधील आहे.
# अद्याप अस्तित्वातील सर्वात जुने रेल्वे इंजिन लिव्हर पूल रेल्वे स्टेशन येथे आहे.
# 'अकबरनामा' पुस्तक अबुल फजल यांनी लिहिले. # राष्ट्रीय जनता दल 1997 मध्ये स्थापन झाले. #;भारतातर्फे 'एशियन गेम्स'मध्ये पहिले सुवर्णपदक 'वेटलिफ्टिंग'मध्ये श्रीनिवास राव वेल्लुरी यांनी मिळवले.
##########################

@ 30 नोव्हेंबर !:💐

👍"दिनविशेष !:👌
# वाढदिवस सचिन जकातदार (सचिन ट्रॅव्हलचे व्यवस्थापकीय संचालक)
##########################

👍"दिनविशेष !:💐
# एखादी गोष्ट तत्परतेने करणे, योग्य त्या प्राधान्याचा विचार करून करणे, अत्यंत महत्त्वाचे असते, हे मी 'स्कॅनरच्या ड्रायव्हर इन्स्टॉल' करण्याच्या अनुभवावरून शिकलो. गेले कित्येक दिवस तो 'ड्रायव्हर' माझ्या लॅपटॉपवर अपलोड होतच नव्हता. लॅपटॉप रिपेअर करून तो 'ड्रायव्हर' खरं म्हणजे डाउनलोड करून शुक्रवारी सायंकाळी आणला होता. परंतु त्याची ओपन-ऑपरेट होण्याची चाचणी लगेच न घेता, मी आळस केला. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ-साडेनऊला जायचे आहे हे माहीत असूनही, दादरला निघण्याच्या वेळेआधी फक्त पंधरा मिनिटे आधी ते काम करण्याचे उद्योग मी केले. जाण्याच्या घाईत लॅपटॉप कसा बंद केला देव जाणे ! त्यानंतर आजतागायत दोन-तीन दिवसात तो 'ड्रायव्हर' काही केल्या इन्स्टॉल होत नाही. खरे म्हणजे टेस्ट करताना शनिवारी ओपन होत होता.
पूर्ण वेळ देऊन प्रारंभीच हे उद्योग केले असते, तर माझे काम मार्गी लागले असते, अशी चुटपुट आता मला लागली आहे. योग्य त्या 'प्रायोरिटी'प्रमाणे काम करावे हा अनुभव शिकलो !
##########################

धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा