बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा 14 !":💐

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा 14 !":💐

माझ्या 2010 वर्षाच्या दैनंदिनीमधील वैशिष्ट्यपूर्ण नोंदींसंबंधी ही लेखमाला मी लिहीत आहे. त्यातील हा पुढचा लेख देखील तुम्हाला आवडेल असे वाटते.

@ 15 नोव्हेंबर 👌

👍 दिनविशेष 👌
# 1825 अमेरिकेत जहाजांसाठी लाकडा ऐवजी प्रथमच लोखंडाचा वापर सुरू झाला
# 1915 क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे फासावर
# 1917 संगीतकार दत्ता डावजेकरांचा जन्म
# 1929 लेखिका शिरीष पैं चा जन्म
# 1949 महात्मा गांधीच्या हत्येमधले नथुराम गोडसे व नारायण आपटे फासावर
# 1956 आचार्य अत्रे यांचे दैनिक मराठा चालू झाले.
# 1982 भूदान चळवळीचे पुरस्कर्ते आचार्य विनोबा भावे यांचे निधन
# 2000 झारखंड हे भारताचे 28 वे घटक राज्य म्हणून अस्तित्वात आले.
##########################

👍विशेष नोंद 👌
# काल जो आज जो अनुभव आला त्यावरून एक धडा घेतला की, जे आपल्याला जमत नाही वा ज्यामुळे शरीर व मनाला इजा पोहोचू शकते व आपल्याला कुठलेही समाधान मिळू शकणार नाही असे वाटते, अशा गोष्टी करण्याचा निर्णय घेऊच नये.

थोडक्यात प्रत्येक क्षणी प्रत्येक निर्णय योग्यायोग्यतेचा विचार करूनच घ्यावा त्यातच आपले हित असते.
##########################

@ 16 नोव्हेंबर 👌💐

👍विशेष नोंद 👌
# एस ए ए आर सी: "साउथ एशिया असोसिएशन फॉर रीजनल कॉर्पोरेशन"
# यूजीसी चे सध्याचे अध्यक्ष सुखदेव थोरात
# जयपूर शहर हे सन सिटी म्हणून ओळखले जाते.
# कार्डियाक स्पेस मेकर चा शोध 1932 मध्ये लागला
# डॉक्टर क्लारेंट्स लिलेहाय यांना ओपन हार्ट सर्जरीचा जनक संबोधतात
##########################

@ 17 नोव्हेंबर 👌💐

👍विशेष नोंद 👌
# हा दिवस इंटरनॅशनल स्टुडंट्स डे मानला जातो
# सायप्रसची राजधानी निकोशिया
# जंतर मंतर ही वास्तू वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केली गेली आहे.
# एफडीआयः फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट
# नुकतीच मुंबईच्या समुद्रात MS चित्रा ही रासायनिक द्रव्य घेऊन जाणारी बोट कलंडली होती.
##########################

👍सुविचार 👌💐

"जे काही आपण काम करतो, एखादी जबाबदारी योग्य त्या खबरदारीने नीटनेटकेपणाने पूर्ण करतो, त्या प्रोसेस मध्ये योग्य त्या समयसुचकतेची खबरदारी घेतली, तर त्या साऱ्या अनुभवात आपल्या आंतरिक सिस्टीमला एक वेगळे समाधान आनंद लाभतो. आपणच परीक्षा घेत आहोत, असे वाटून आपण आपला प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस सोन्याचा करू शकतो.

ज्याचे त्याचे अनुभवविश्व, वेगळे ज्याचे त्याचे आकाश वेगळे ! त्याप्रमाणे आपल्याला ते जे ज्यावेळी जसे करावेसे वाटते, ते ते आपण सर्वोत्तम तऱ्हेने केले की झाले. बाह्य फळापेक्षा हे आंतरिक मनाचे फळ आपल्याला ताजेतवाने ठेवते आणि आपले मोटिवेशन कायम राखते !
##########################

@ 18 नोव्हेंबर 👌💐

👍विशेष नोंद 👌
# भारतीयांना दिले जाणारे यूआयडी क्रमांक 16 अंकांचे असतील.
# शास्त्रीय संशोधनासाठी डॉ शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार देतात
# राज्यसभेच्या पहिल्या अभिनेत्री सभासद
नर्गिस दत्त !
##########################

@ 19 नोव्हेंबर 👌💐

👍विशेष नोंद 👌
# "एपीईसी": एशिया पॅसिफिक इकॉनोमिक कोऑपरेशन
# बायफोकल लेन्सचा शोध बेंजामिन फ्रँकलिनने लावला
# गोल्फ खेळ सर्वप्रथम स्कॉटलंड मध्ये खेळला गेला.
# ढाक्का हे मशीनचे शहर म्हणून ओळखले जाते.
# लॉरा चिंचिला या कोस्टारिकाच्या महिला अध्यक्ष
# भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले परदेशी, खान अब्दुल खान.
# दिल्लीत 2012 मध्ये साउथ एशियन गेम्स होतील.
# "आयएईए": 'इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजन्सी
# 'नो कंट्री फॉर वुमन !' पुस्तकाच्या लेखिका तसलीमा नसरीन
# सोळावी सार्क परिषद भूतान मध्ये एप्रिल 2010 मध्ये भरली
# "बीआरआयसी": ब्राझील रशिया इंडिया चायना. # 26 एप्रिल हा बौद्धिक संपदा दिन म्हणून ओळखला जातो
# डुरांट चषक फुटबॉलची निगडित आहे.
##########################

@ 20 नोव्हेंबर 👌💐

👍विशेष नोंद 👌
# माओरी ही जमात न्यूझीलंड मध्ये आहे.
# रशियामध्ये वर्ल्ड टायगर समिट भरवतात
# राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात
# कडप्पा ह्या आंध्र प्रदेश मधील जिल्ह्याला डॉक्टर वाय एस आर रेड्डी यांचे नाव दिले गेले आहे.
# रिटा फारिया ही 1965 मध्ये 'मिस वर्ल्ड' हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला.
##########################

धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा