"मराठी रंगभूमी: एक चिंतन":
माणसाला एकदा एखादे व्यसन लागले की त्या गोष्टीच्या नादात तो वास्तवता विसरतो, त्या अनुभवांचे जणू त्याला भूल पडते, भान हरपते. कोणाला दारूचे व्यसन असते, तर कोणाला दारुचे, तर कुणाला संगीताचे, नाटकाचे. दोन्ही व्यसनात जमीन-अस्मानाचा फरक असला तरी उद्देश एकच असतो, आपले मन रमविणे. मराठी माणसासाठी नाटक हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे नाट्यरसिकांना नाटकांची अशीच विलक्षण ओढ असते.नाटक हा खरोखर एक रोमांचक अनुभव आहे. कोणत्याही व्यवसायात पैसा अथवा कँपिटल, मनुष्यबळ, भूमी अर्थात जागा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहक, ही मूलभूत तत्वे असतात. त्यांचा रंगभूमीवरही समावेश होतो, कसे ते सांगतो. रंगमंच हे त्या व्यवसायाचे ठिकाण म्हणजे भूमी, काम करणारे कलावंत हे मनुष्यबळ, तर व्यवसायाकरता पैसा हे भांडवल अर्थात कॅपिटल, तर आश्रयदाता रसिक प्रेक्षक हा ग्राहक, व्यवसायाकडून बाहेर पडणाऱ्या पक्या प्रोडक्टचा फायनल प्रॉडक्टचा नाटकाचा उपभोक्ता.
धंदा किंवा व्यवसायाचा मूळ उद्देश म्हणजे कष्ट करत, गुंतवलेल्या भांडवलावर अर्थातच जास्तीत जास्त फायदा मिळवणे. मात्र नाटक हा केवळ फक्त एक धंदा नसतो, तर कला, तसेच विचार अशा त्रिमूर्तीचा अद्भुत संगम घडवणारी गोष्ट आहे. विविध विषयांवर समाजाच्या मानवाच्या जीवनातील विविध समस्यांवर नाटकाच्या रूपातून भाष्य केले जाते तेव्हा एक नवा विचार नाटक नवी दिशा देत असते, तर नाटकाराच्या मनातले नाट्य कलाकारांनी यथातथ्य रंगभूमीवर जीवंत करणे ही कला होय. त्यामुळे धंदा, कला व विचार या त्रिवेणी संगमातून मिळणारा आनंद खरोखर शब्दातीत असतो.
अर्थात प्रत्येक नाटक ह्या तीनही अत्यंत दुर्मिळ अशा गोष्टींचा एकत्रित परिणाम सादर करतेच असे नाही. मराठी रंगभूमीवर गाजलेली निवडक लोकप्रिय नाटके ही त्रिवेणी संगमाची किमया साधतात ही अभिमानाची बाब आहे. जगात मराठी रंगभूमी एक अग्रगण्य स्थान राखून आहे तेही ह्याच तीन पेडी चमत्कारामुळेच.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
ता.क.
वैविध्यपूर्ण वाचनीय मजकूर देणारे चित्रपट रंगभूमी,टेलिव्हिजन,राजकारण, व्यवस्थापनशास्र आणि ज्योतिष अशा विविध विषयांवरील सुमारे 300 लेख आजपर्यंत, केवळ चार वर्षात, माझ्या ब्लॉगवर मी लिहीले आहेत. उत्तरोत्तर हा ब्लॉग चांगला लोकप्रिय होत आहे. त्याची लिंक:
https://moonsungrandson.blogspot.com
क्रुपया ही लिंकही आपल्या स्नेहवर्तुळांत शेअर करावी. आपल्याला कोणत्या विषयांवरील लेख वाचावेसे वाटतात, ते आपण मला, प्रतिसादात जरूर कळवावे.
धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा