शनिवार, ३१ जुलै, २०२१

"जन्मपत्रिकेतील अनुवांशिक ग्रहयोग !":

 "जन्मपत्रिकेतील अनुवांशिक ग्रहयोग !"

वैद्यकशास्त्रातील डी एन ए आणि जेनेटिक शास्त्र यानुसार अनुवांशिकतेचा अभ्यास कायम होत असतो आणि मागील पिढ्यांमधील गुणावगुण यांचा जो पुढे प्रवास नव्या पिढीमध्ये चालू राहतो तो आपल्याला नेहमी प्रत्यक्षात अनुभवायला येतो. 'ती' अगदी तिच्या आईची कॉपी आहे किंवा हा मुलगा
अगदी बापा सारखा दिसतो, अशा तर्‍हेची वाक्य
आपण कायम ऐकली आहेत. वडील ४५ व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन पावले आणि त्यांचा मुलगा देखील अगदी त्याच वयात हार्ट अटॅकने गेला असे उदाहरण पाहण्यात आले आहे. अनुवंशिकता हे एक अत्यंत महत्त्वाचे असे ज्ञानाचे, अभ्यासाचे क्षेत्र आहे.

गेली चाळीसहून अधिक वर्षे मी एक हौशी अभ्यासू ज्योतिषी म्हणून विविध पत्रिकांचा सखोल अभ्यास करत आलो आहे. अनुवंशिकता हा विषय जेव्हा माझ्या डोक्यात आला, तेव्हा काही महिन्यांपूर्वी मी विविध जन्मपत्रिका अधिक चिकित्सक दृष्टीने पहात होतो, तेव्हा मला लक्षात आले की, काही महत्वाचे ग्रहयोग अथवा ग्रह विशिष्ट स्थानात किंवा राशींमध्ये कुटुंबामध्ये पुन्हा परावर्तित होत असलेले त्यांच्या पत्रिकांवरून आढळले.

"गजकेसरीयोग":
रवी गुरु जर केंद्रात म्हणजे एकमेकांपासून नव्वद अंशांवर असले, तर त्याला गजकेसरी योग म्हणतात, हे आपल्याला माहीत आहे. तर हा गजकेसरी योग आई-वडिलांकडून मुलांमध्ये आलेला आपल्याला पत्रिके मधून आढळून येऊ शकतो. तीच गोष्ट रवि गुरू नवपंचम योग हा शुभयोगही आपल्याला कुटुंबामध्ये अनुवंशिकतेच्या उदाहरणासारखा पुढच्या पिढीत जन्मपत्रिकांत पुनश्च दिसू शकतो.

म्हणून एका कुटुंबाची माहिती अशी:
# आई: हिच्या जन्मपत्रिकेत गुरु आणि चंद्र यांचा गजकेसरी योग, चंद्र तृतीय स्थानी तर गुरु षष्ठस्थानी. # वडील: त्यांच्या पत्रिकेत गुरु अष्टमांत तर चंद्र लाभस्थानी. अशा तऱ्हेने त्यांच्याही पत्रिकेत गजकेसरी योग.
त्यांना चार मुले त्यापैकी दोन जणांच्या पत्रिकेत हाच शुभयोग पुन्हा आपल्याला आढळतो:
# मोठा मुलगा: त्याच्या पत्रिकेत चंद्र तृतीय स्थानी गुरु षष्ठस्थानी म्हणजे आईच्या पत्रिके सारखाच पुनश्च गजकेसरी योग त्याच स्थानांतून.
# मोठी मुलगी: तिच्या पत्रिकेत चंद्र प्रथम स्थानी तर गुरु लाभस्थानी म्हणजे तिच्याही पत्रिकेत गजकेशरी योग !

बाकीच्या दोन मुलांच्या पत्रिकेत मात्र हा योग परावर्तित झालेला नाही. डायबेटिस जसा आई-वडिलांना जर असेल वा दोघांपैकी कोणाला असेल, तर त्यांच्या काही मुलांमध्ये तो आढळतो आणि काही मुलांमध्ये आढळत नाही, तसाच जणु हा प्रकार ! कुतूहलाने मी वरील उदाहरणांतील थोरल्या मुलाच्या मुलीची पत्रिका अभ्यासली, म्हणजे त्या गृहस्थांच्या नातीची. तर त्या पत्रिकेमध्ये गुरु नवम स्थानी तर चंद्र व्यय स्थानी, असा गुरु चंद्र केंद्रयोगात असणारा गजकेसरी योग, अनुवंशिक नियमासारखा बघायला मिळाला. तिसर्‍या पिढीत देखील हा योग पुढे आढळला.

"रवी-गुरू नवपंचमयोग":
वरील उदाहरणांमध्ये वडिलांच्या पत्रिकेत रवि व्यय स्थानी, तर गुरु अष्टम स्थानी, असा गुरु रवि नवपंचम योग आहे. ज्येष्ठ मुलाच्या, थोरल्या मुलाच्या म्हणजे या गृहस्थांच्या नातवाच्या जन्मपत्रिकेतही रवी द्वितीय स्थानात आणि गुरु षष्ठ स्थानी असा रवी-गुरू नवपंचम योग तिसर्‍या पिढी परावर्तित झालेला सापडला. अनुवंशिक ग्रहयोग म्हणून जणू या मुलाच्या आईच्या पत्रिकेत अर्थात वरील गृहस्थांच्या सुनेच्या पत्रिकेत देखील रवि लाभस्थानी तर गुरु सप्तम स्थानी असा रवी गुरु नवपंचम योग आहे. आईकडून मुलाला देखील हा योग पुढे पाठवला गेला असंही आपल्याला म्हणता येईल !

"कालसर्पयोग":.
ज्याप्रमाणे रवी गुरु गजकेसरी योग अथवा रवी गुरु नवपंचम योग हे एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये पत्रिकांम़ध्ये असू शकतात, त्याच प्रमाणे कालसर्पयोग- राहू केतूच्या एका बाजूच्या अर्धवर्तुळात उरलेले ग्रह असणे, एका पिढी मधून दुसऱ्या पिढीच्या पत्रिकेत देखील आढळू शकतात. या आजोबांच्या पत्रिकेत सहा आणि बाराव्या स्थानामध्ये राहू-केतू असून त्या पत्रिकेत
कालसर्पयोग होतो. अगदी तशीच परिस्थिती त्यांच्या नातवाच्या पत्रिकेतही कालसर्पयोग आढळून आला.

"राजयोग":
जन्मलग्न पत्रिकेमध्ये जर केंद्र व त्रिकोण यांचा स्वामी जर एकच ग्रह असेल तर त्या पत्रिकेला राजयोग आहे असे मानतात. सहा जन्मलग्नांना शनि, शुक्र अथवा मंगळ यांचे राजयोग होतात, तर उरलेल्या सहा जन्मलग्नांना तशी परिस्थिती न आल्यामुळे राजयोग होत नाही. हा राजयोगही अनुवंशिकतेने पुढच्या पिढीमध्ये संक्रमित झालेला आढळतो. ह्या उदाहरणात आजोबा, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या मुलाची मुलगी ह्या तिघांच्याही पत्रिकेत राजयोग होतो असे आढळून आले. तसेच दुसर्‍या एका उदाहरणात आईच्या पत्रिकेत शनीचा राजयोग तर तिच्या तीन मुलांच्या पत्रिकांत देखील असेच राजयोग आढळले. त्यापैकी एका मुलाच्या पत्रिकेत शनीचा राजयोग तर उरलेल्या दोन मुलांच्या पत्रिकेतील मंगळाचा, सहाजिकच राजयोग देखील अनुवंशिकता पाळतो असे म्हणायचे !

कोणतीही गोष्ट जेव्हा किंवा घडायची तेव्हाच बहुदा घडत असावी. कारण अशा अनेक पत्रिका मी गेली कित्येक वर्ष नजरेखालून घालत असूनही ही ग्रहयोगांच्या अनुवंशिकतेची बाब माझ्या बिलकुल लक्षात आली नव्हती. अलीकडच्या काळात ती ध्यानात यावी, हे एक नवलच. मी पुन्हा त्या पत्रिका अधिक सखोलपणे अभ्यासल्या आणि माझ्या लक्षात आले की, केवळ ग्रहयोगच अनुवंशिकतेने पुढे परावर्तित होतात असे नाही, तर विशिष्ट ग्रह विशिष्ट स्थानी किंवा राशीत असण्याचीही शक्यता असते.

वरील उदाहरणातील आईच्या पत्रिके शनी हा पंचम स्थानी आहे, तर तिच्या जेष्ठ मुलाच्या पत्रिकेत देखील शनि पंचम स्थानी आढळला. या आईच्या पत्रिकेत मंगळ द्वितीय स्थानी तर तिचा नातू-जेष्ठ मुलाचा तसेच मुलीचाही मुलगा याच्या पत्रिकेत देखील मंगळ द्वितीय स्थानात आहे ! ही आजी आणि ह्यातील एक नातू, यांच्या पत्रिकेत शुक्र देखील व्ययस्थानात आहे.

जी गोष्ट ग्रहांच्या त्याच स्थानात असण्याची,
ती ग्रह एका विशिष्ट राशीत असण्याचीही शक्यता अनुवंशिकतेने असू शकते. ते आपल्याला अधिक सखोलपणे पत्रिकेचा जर चिकित्सक दृष्टीने अभ्यास केला, तर ध्यानात येते. या पत्रिकेमध्ये वडील आणि त्यांची मुलगी यांच्या पत्रिकांमध्ये शनी व्रुषभ राशित आहे. दुसऱ्या एका उदाहरणामध्ये आजोबांच्या पत्रिकेत बुध शनि आणि रवी ज्या राशींमध्ये आहेत त्याच राशीत ते त्यांच्या नातवाच्या पत्रिकेत आढळले !

मेडिकल सायन्सप्रमाणे जणू ज्योतिषाचा अभ्यास केला, तर एका कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या पत्रिकांमध्ये असा योगांचा ग्रहयोग यांचा किंवा ग्रह विशिष्ट स्थाने व राशि पुन्हा-पुन्हा असण्याचा अनुवंशिक असा जणू योग असतो, असेच या संशोधनावरून म्हणायचे. अभ्यासकांनी या विषयाला चालना देऊन अधिकाधिक कुटुंबांच्या पत्रिका तपासून वेगवेगळे निष्कर्ष काढावेत. विज्ञानात जसं संशोधन, प्रयोग यामधून नवनवीन असे शोध लागतात, तसाच हा प्रयत्न मी येथे केला आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....
खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......
ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......

आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....

धन्यवाद
सुधाकर नातू

बुधवार, २८ जुलै, २०२१

"ह्रदयसंवाद-३५": "गृहिणींना शतशः सलाम !":

 "गृहिणींना शतशः सलाम !":

दररोज घरात वावरणारी गृहिणी एकापाठोपाठ एक अशी आपली कामे कशी पटापट निगुतीने आणि निमूटपणे पार पाडत असते, हे आतापर्यंत कधी माझ्या लक्षातच आले नव्हते. परंतु कोरोना महामारीच्या काळात अशीच घरातली काही निवडक कामे माझ्या अंगावर आल्यामुळे, विशेषता पाणी भरणे वगैरे, तेव्हा हे मला लक्षात आले की, आपल्यासमोर आपोआपच पुढचे पुढचे काम पुढे उभे राहते आणि ते केल्याशिवाय आपल्याला करमत नाही.

ही भावना माझ्या मनात आल्याबरोबर मला कळून चुकले की, गृहिणीही कशी मन लावून सकाळपासून रात्रीपर्यंत, समोरचे एक एक काम करून पुढच्या कामांकडे वळते, खरंच एक प्रकारची लयबद्धता त्यामध्ये आपोआप येते. मॅनेजमेंट क्लासमधील खूप वर्षांपूर्वी प्रोफेसरांनी सांगितलेले एक महत्वाचे वाक्य त्या क्षणी मला आठवले. त्यांनी म्हटले होते:

"द हाऊस वाइफ इस द बेस्ट अँड द मोस्ट ईफीशिअंट मटेरियल्स मॅनेजर इन द वर्ल्ड !"

सकाळपासून रात्री झोपेपर्यंत घरासाठी ती झटत असताना, कुठलं काम केव्हा करायचं, कोणत्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत, काय काय संपलेलं आहे, वगैरे वगैरेंची नोंद ठेवून आपोआपच कधीही काहीही कमतरता भासणार नाही, अशा तऱ्हेने संपूर्ण व्यवस्था सांभाळून घर कायम समाधानी आणि आनंदी ठेवत असते. हे सारं करताना ना तिला कुठला कॉम्प्युटर लागतो, ना कुठली नोंदवही. सारे डोक्यात ठेवत, आपली जबाबदारी अचूकपणे अव्याहत आनंदाने ती पार पाडत असते. Thanks & Hats off to her.

एक संस्मरणीय आठवण":
घरातील गृहिणींबरोबर कशी वागणूक असावी, त्याचा एक आदर्श उदाहरण म्हणून, मला भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या बालपणाची ही आठवण वाचल्याचे आठवते. लहानपणी ते आपल्या भावंड व वडिलांबरोबर जेवायला बसलेले असताना मुलांच्या लक्षात आलं की, भाजी काही बरोबर जमली नव्हती, खूप तिखट किंवा खूप खारट झाली होती. मुलं त्याप्रमाणे बोलायला उद्युक्त होती की, ही भाजी कशी कां झाली आहे. पण वडिलांकडे बघून ती गप्प राहिली. संपूर्ण भोजन संपेपर्यंत वडिलांनी कुठल्याही प्रकारचं आईला लागेल असं स्वयंपाकाबद्दल वा भाजीबद्दल बोलणे केले नाही. उलट आज छान स्वयंपाक झाला होता, असंच काहीसं ते बोलले.

त्यामुळे यानंतर जेव्हा मुलांनी आश्चर्य वाटून, आपल्या वडिलांना विचारलं की, असं आपण कां केलंत? तर तेव्हा त्यांनी जे सांगितलं, ते खरोखर प्रत्येकाने आपल्या घरातील प्रत्येकाने, गृहिणींची, स्त्रियांशी वागताना लक्षात ठेवावं असंच होतं ते म्हणाले "तुमची आई दररोज आपला संसार नीटनेटका करते, वा आपल्याला चांगलं वेळेवर खायला मिळावं यासाठी खूप कष्ट घेत असते. अशा वेळेला ती, तिच्या पद्धतीने मन लावून स्वयंपाक करते, एखादे दिवशी समजा भाजी बिघडली, स्वयंपाक बिघडला म्हणून आपण तिला बोलणं बरोबर नव्हे."

किती चांगले व आदर्श विचार होते, त्यांच्या वडिलांचे! पण आपण कधी हे ध्यानात ठेवतो कां, घरात वावरताना आपण कसे आपल्या घरातील स्रियांबरोबर कसे वागतो, हे ज्याचं त्याने पारखून बघावं अशी ही छोटीशी छान गोष्ट आहे.

थोडक्यात काय तर आपण समोर जे घडत असते, त्याकडे इतक्या डोळसपणे, तोपर्यंत कधी बघत नाही, जोपर्यंत आपल्याला स्वतःला तसा अनुभव येत नाहीं !

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....
खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......
ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......

आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....

धन्यवाद
सुधाकर नातू

मंगळवार, २७ जुलै, २०२१

"वाचा, फुला आणि फुलवा-भाग ४": "असामान्य, प्रेरणादायी गरुडभरारी !":

 "वाचा, फुला आणि फुलवा-भाग ४": "असामान्य, प्रेरणादायी गरुडभरारी !":

'कोरोना'च्या महामारीच्या लाँकडाउनच्या काळात लायब्ररीमध्ये अर्थात वाचनालयामध्ये जाणं अशक्य झाल्यामुळे, वाचनाचं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला असताना, मला माझ्या मुलाने निवडक दिवाळीअंक संच सप्रेम भेट म्हणून पाठवला. शिवाय एका स्नेही संस्थेने देखील 5 दिवाळी अंकांचा संच मला पाठवला. त्यामुळे दहा ते बारा दिवाळी अंक माझ्याकडे वाचनासाठी जमा झाले आणि ते मला वाचायला बरेच दिवस पुरले. त्यानंतरच्या काळात अचानक परत माझ्या मुलानेच काही पुस्तके ऑनलाईन ऑर्डर करून पाठवली.

त्यामुळे मला पुन्हा वाचन अधून-मधून करता येऊ लागले आणि मी ती पुस्तके एकामागोमाग एक वाचत गेलो. त्या मध्येच अचानक बाजूला तसं पडलेलं, "आधुनिक स्फूर्तीगाथा" हे छोटंसं पुस्तक माझ्या नजरेत आलं. त्याचं नांवही मोठे उत्साहवर्धक होत. आधीच मला चरित्रात्मक पुस्तक वाचायला आवडतात, कारण त्यामधून आपण वेगवेगळ्या जीवनांच्या जणु कादंबर्‍या वाचू शकतो. सहाजिकच मी ते पुस्तक वाचून संपवले.

पूर्वी 'इसापनिती' च्या बोधकथा, आपण बालपणी किंवा उभरत्या वयात वाचल्या असतीलच. त्यामध्ये पशु, पक्षी यांच्या सहाय्याने इसापने योग्य ते समंजस मार्गदर्शन केलेले आपल्याला आढळते. त्यावरून व्यावहारिक जीवनात शहाणपणानं वागायचं कसं, हे समजत असे, किंवा दुसरं जर उदाहरण घ्यायचं झालं तर, आपल्या पुराणात दशावतारांची कथा आहे. दहा विविध सजीव रूपात परमेश्वराने जगावरील संकटे कशी दूर केली त्याचे स्फूर्तिदायी चित्र आपण नेहमीच आठवत राहिलो आहोत. डार्विनच्या सिद्धांताला-Survival of the fittest, द्वारे सजीवांची जलचर उभयचर ते भूचर अशी उत्क्रांती झाली, त्याची आठवण करून देणारे हे दशावतार.

"आधुनिक स्फूर्तिकथा"
(लेखिका: श्रुती पानसे, समकालीन प्रकाशन)

"आधुनिक स्फूर्तिकथा" हे देखील अशाच आधुनिक दशावतारांचे चित्र आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज अशा मंडळींचा जीवनपट मोजक्या शब्दात आणि प्रत्येक सेलिब्रिटीचे त्या त्या क्षेत्रातील समाजोपयोगी योगदान ह्या अप्रतिम वाचनीय मार्गदर्शक पुस्तकात मांडलेले आहे. सुरवातीचीच 'बीज पेरणी' किती प्रत्ययकारी आहे, ते पहा:

"प्रत्येकाचं स्वतःचं असं खास स्वप्न असतं, मोठं झालं की काय व्हायचं, हे जणू काही प्रत्येकाचं ठरून गेलेलं असतं जे मनात असतं ते प्रत्यक्षात आणणं प्रत्येकाला जमतेच असे नाही पण जमतील तेवढे प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. काहींची स्वप्न छोटी असतात तर काहींनी खूप मोठी स्वप्न बघितलेली असतात. स्वप्न छोटी असोत अथवा मोठी असोत, ती पूर्ण करायची असली तर खूप प्रयत्न करावे लागतात, मेहनत करावी लागते, अभ्यास करावा लागतो, चिकाटी अंगी बाणवावी लागते, बुद्धी तेज करावी लागते. स्वतःच्या क्षमता सर्वार्थाने वाढवाव्या लागतात, दृष्टीचा पल्ला वाढवावा लागतो, स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची सवय लावावी लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वप्न अपडेट करावी लागतात, एक स्वप्न प्रत्यक्षात आलं की आणखी भव्य स्वप्न पहायला शिकावं लागतं.

मोठ्या माणसांच्या चरित्रावरून नजर फिरवली की, लक्षात असतं की, त्याने आपल्या आयुष्यात या गोष्टी सहजासहजी मिळवलेल्या नसतात. स्वतःतील क्षमतांचा बुद्धीचा अनुभवाचा पुरेपूर उपयोग करत असतात, पडत, धडपडत ते उत्तम स्थानावर पोहोचलेले असतात. या पुस्तकात ज्या निवडक दहा व्यक्तिमत्त्वांच्या कर्तृत्वाची जडणघडणीची आणि कार्याची ओळख करून दिली आहे. त्या साऱ्यांच्या आयुष्यात या सूत्राचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं."

"एकसे बढकर एक दिग्गज":
भारतरत्न व भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगपती श्री नारायण मूर्ती, अझिम प्रेमजी, बंगाली लेखिका-समाजसेविका महाश्वेतादेवी, तळागाळातील मजूर गरिब स्रियांच्या पुनरुज्जीवनासाठी 'सेवा' या समाजसेवी संस्थेच्या संस्थापक इला भट,
राजस्थानमधील दुष्काळावर-पाणी समस्येवर यशस्वी मार्ग काढणारे राजेंद्र सिंह, त्याचबरोबर डॉ एम एस स्वामीनाथन, ज्यांनी शेतीमध्ये आमूलाग्र क्रांती घडवून आणली आणि भारतात हरितक्रांती घडवत भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी असामान्य योगदान दिले,

"अमूल" या संस्थेद्वारे दुधउत्पादन क्षेत्रामध्ये भारताला जगात अग्र स्थानावर नेऊन पोहोचवणारे डॉ वर्गीस कुरीयन, याच बरोबर अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते डॉ अमर्त्य सेन आणि धडाडीच्या पोलीस महिला पोलीस अधिकारी किरण बेदी- ज्यांनी तिहार जेलचा कायापालट केला, अशा महान व्यक्तींच्या यशोगाथा थक्क करणार्या आहेत. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील ही दैदिप्यमान मांदियाळी व त्यांची सामान्यांतून असामान्यत्व गांठणारी गुणसंपन्नतेची, अद्वितीय योगदानाची गरुडभरारी खरोखरच अदभूत आहे.

लहान थोरांनी मनापासून वाचावे आणि त्या त्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवनाचे अंतर्मुख होऊन मूल्यमापन करावे असे हे पुस्तक आहे. त्यामधून जर धडा घ्यायचा असेल तर तो हा की "आपणही आपल्यातील गुणवत्ता विकसित करून, आपल्या क्षमतेनुसार समाजासाठी, आपल्या आवडीच्या, कोणत्याही क्षेत्रात काहीना काही हितकारक योगदान केले तर उत्तम" हाच.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच तीनशेहून अधिक वैविध्यपूर्ण वाचनीय लेख
वाचण्यासाठी पुढील लिंक संग्रही ठेवा.....

https://moonsungrandson.blogspot.com

आपल्या स्नेहवर्तुळांत ती शेअरही करा....

मंगळवार, २० जुलै, २०२१

"वाचा, फुला आणि फुलवा-भाग३":

 "वाचा फुला आणि फुलवा-भाग ३": 

कधी कधी वर्तमानपत्रातदेखील उत्तम साहित्य वाचायला मिळते. आजच्या-२१जुलैच्या महाराष्ट्र टाईम्स पुरवणीमध्ये तशा वळणाचे तीन छोटेसे लेख वाचायला मिळाले. 

"जीवनात रंग भरणारी मैत्री":

त्यातील एक लेख चार मैत्रिणींच्या समूहाची काँलेजपासून वयाची साठी पार करेपर्यंतच्या पन्नास वर्षातील जीवाभावाच्या मैत्रीची वाटचाल अगदी मोजक्या शब्दात आणि बदलत जाणार्या परिस्थितीमधील वैशिष्ट्ये वर्णन करणारा होता. त्या निखळ, नितळ मैत्रीमध्ये गप्पा काय होत हे जरी आठवत नसले, तरी एकमेकांशिवाय करमत नसे हे त्यातून ध्वनित होत होते. तसेच पन्नास वर्षे उलटून गेल्यावरही वेगवेगळे स्थान बदल व वैयक्तिक जीवनातील कडू गोड घडामोडी होऊनही, अजून त्यांची मैत्री तशीच कशी दृढ आहे, त्याचा तो धांडोळा होता. 

मैत्री या विषयाचा मतितार्थ पटवणारा, ती कसकशी फुलत जाते,  योग्य ती दिशा कशी मिळते आणि त्यामध्ये एकमेकींबद्दलचा जिव्हाळा, सुखदुःखामध्ये सामील व्हायची मनापासूनची इच्छा, तसेच एकमेकींना सहाय्य देत, आवड-निवड जपत, एकमेकींना स्पेस देत, आपोआपच ती मैत्री कशी दृढ होते, याचा हा लेख म्हणजे वस्तुपाठच होता. 

"अभ्यासू समर्पित व्यक्तिमत्त्व":

दुसरा लेख, आपल्या एका प्राध्यापकांबद्दल क्रुतज्ञता व्यक्त करणारा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वैशिष्ट्ये तर त्यांत वर्णन केली होतीच, त्याचप्रमाणे त्यांचा, स्वतःच्या विषयातील जो सखोल अभ्यास आणि तो इतरांना समजावून सांगण्याची जी हातोटी होती तीसुद्धा त्या लेखामध्ये व्यवस्थितपणे उलगडली होती. कठीण विषय असूनही त्या विषयात त्यामुळे  तिची मैत्रीणही ज्ञानगंगेच्या त्या प्रवाहात सामील होत, दोघींचीही त्या विषयात प्रगती कशी झाली हे अगदीच थोडक्यात वर्णन केले होते. एखादं व्यक्तिमत्व कसं वेगळं अन् वैशिष्ट्यपूर्ण असतं ते चपखलपणे मांडणारा तो लेख अगदी छोटासा परंतु प्राध्यापकांची जीवनप्रतिमा आपल्या पुढे हुबेहूब दर्शविणारा होता.

"मुलांशी कसे वागू नये?":

स्पर्धात्मक जीवनामध्ये पालकांनी मुलांशी कसे वागू नये, याचा योग्य तो धडा देणारा, आत्मपरीक्षण करायला लावणारा तिसरा लेखही वाचनीय होता. मुलं वाढत असताना त्यांच्यासमोर आई-वडिलांची भांडणे वाद-विवाद आणि ते आपल्या आई-वडिलांना कसे वागवतात, त्याचेही चित्र जर योग्य नसेल, तर मुलांवर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो, त्या त्या लेखामध्ये सोदाहरण उलगडले होते. 

मुलांना चांगल्या संस्थेत शिक्षण देणे, त्यांना जे जे हवे ते ते मागताच पुरवणे आणि पैसा वाटेल तसा त्यांच्यावर ओतणे, म्हणजे आपले कर्तव्य पार पाडले असे समजणाऱ्या पालकांसाठी हा लेख म्हणजे अक्षरशः डोळ्यात अंजन घालणारा होता. अशा तर्‍हेच्या वातावरणात मुले वाढली की, कशी विपरीत परिस्थिती येऊ शकते, तेही समोर उभी करणारा हा सारा मजकूर निश्चितच अंतर्मुख करणारा आणि सध्याची विचित्र परिस्थिती दर्शविणारा होता. उद्याची पिढी अधिकाधिक एककल्ली, स्वार्थी आणि विधीनिषेध शून्य बनण्याचा धोका कसा "आ" वासून उभा आहे, ते बिंबविणार्या ह्या लेखाने जीवनशैलीचे आयुष्याच्या जडणघडणीतील महत्व पटविले.

वर्तमानपत्राच्या केवळ चतकोरभर पानात बेतलेले ते तीन लेख, वाचनीय, मनाला भिडणारे, तसे  कसे उत्तम लिहावे, त्यामधील बारकावे कोणते, हे सांगणारे होते. असे लेखन सगळ्यांना जमतेच असे नाही आणि तसे लेखन जमण्यासाठी पारदर्शकता, सकस जीवनानुभव व संवेदनशील मनाची भट्टी जमायला हवी, हेच यातून जाणवले. सुरुवातीपासून अखेरपर्यंत सलग वाचावा, असा हा साहित्यमेळा अनुभवायला मिळाला, तो आनंददायी होता, माझ्यासारख्या लेखनाची आवडणार्या माणसासाठी तर एक मार्गदर्शक धडा होता.

धन्यवाद

सुधाकर नातू

ता.क.

असेच तीनशेहून अधिक वैविध्यपूर्ण, वाचनीय लेख 

वाचण्यासाठी पुढील लिंक संग्रही ठेवा.....

https://moonsungrandson.blogspot.com

आपल्या स्नेहवर्तुळांत ती शेअरही करा....

सोमवार, १९ जुलै, २०२१

"वाचा, फुला आणि फुलवा-भाग २":

 "वाचा, फुला आणि फुलवा-भाग २":

"एक जुनी आठवण-पुन्हा":

मी सहज माझा टेबलमधला खण आवरत होतो आणि अचानक मला एक जुने नोटबुक दिसले. ड्रॉईंग बुक होते ते. ह्या बहुमोल ड्रॉईंग बुकची मला आठवणच गेले कित्येक वर्षे झाले नव्हती. हे ड्रॉईंग बुक म्हणजे जवळजवळ सात वर्षांपूर्वी मी एक संकल्पना प्रत्यक्षात आणली होती, तिचेच प्रत्यक्ष स्वरूप होते.

टीव्हीवरील मालिका बघून कंटाळा आला आणि मग लक्षात आलं की, आपण आपला बहुमूल्य वेळ वाया घालवतो. तर मी ठरवलं की, रात्री रोज आठ ते नऊ प्राइम टाईम मध्ये, मालिका बघायच्या नाहीत, त्या वेळेला आपल्याला जे काही उत्तम, संग्राह्य विचारधन, वेगवेगळ्या वाचनातून मिळतं, त्याची कात्रणे एका ड्रॉईंग बुकमधील कोऱ्या कागदांवर चिटकवायची ही ती संकल्पना. तिची मला खरोखर इतकी गोडी लागली की, जवळजवळ काही दिवसातच ५० पानांचा एक अतिशय बहुमुल्य विचारधन आणि साहित्य असणारं असं ट्रेझर बुक त्यामुळे बनलं. इतक्या वर्षांनी ते गवसलं आणि लक्षात आलं मात्र, तत्क्षणी माझं "वाचा, फुला आणि फुलवा" ह्या सदर सुरू झालं. त्याचाच हा भाग दुसरा:

"विचार कसे ?":

//मनात कमीत कमी विचार यावेत. 

//जे विचार मनात येतील ते सर्व बोलून दाखवू नयेत. तारतम्याने निवड करून योग्य त्या व्यक्तीशी योग्य तेच, वेळ पाहून बोलावे.

//शक्यतो सकारात्मक, नवनिर्मितीच्या मार्गाने जाणारे विचार करावेत आणि त्याप्रमाणेच आपली कृती व्हावी.

---------------------

"सुविचार": 

# कोणाच्या तरी मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहावे. 

# केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. 

# आपल्या सुख-दुःखाचे निर्माते आपणच असतो.

# सतत नावीन्याचा ध्यास घ्यावा, काही नवे शिकण्याची आत्मसात करण्याची किमया साधत राहावे. 

# फक्त ध्येय व उद्दिष्ट मनाशी बाळगून चालत नाही, त्यासाठी अपार कष्ट हवेत. 

# आपली दुर्बलता हाच आपल्या आयुष्यातील मोठा दोष आहे. 

# कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यासाठी जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ हवा.

# दुसऱ्याचे वाईट चिंतून वा करून, आपले कधीही भले होत नाही.

--------------------

"वाट पाहू नका !": 

@ जे जे जेव्हा घडायचे असेल, ते ते तेव्हा, केव्हाही घडू द्या. जे जेव्हा घडेल, तेव्हा तेव्हा ते खुल्या दिलाने जसेच्या तसे स्वीकारा.

@ ना खंत, ना खेद अशी वृत्ती असू द्या. 

@ वेळेच्या, घड्याळाच्या काट्यांपासून मुक्त व्हायचा प्रयत्न करा, पुष्कळसे ताणतणाव, अपेक्षांचे ओझे त्यामुळे कमी होईल वा दूर होईल.

---------------------

"मजेशीर व्याख्या:" तुम्हाला कोणती आवडली ते तुमचे तुम्हीच ठरवा:

$ अनुभव: सभ्य शब्दात मांडलेल्या चुका. 

$ मोह: जो आवरला असता, माणूस सुखी राहतो, पण जर आवरला नाही, तर अजून सुखी होतो !

$ शेजारी: तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते, तो.

$ सुखवस्तू: वस्तुस्थितीत सुख मानणारा.

# वक्तृत्व: मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना, दोन तास घोळवणे.

# लेखक: चार पानात लिहून संपणार्या गोष्टींसाठी, चारशे पानं खर्ची घालणारा.

$ फॅशन: शिंप्याच्या हातून झालेल्या चुका. 

$ पासबुक/बँकबुक: जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव-( जर भरपूर बॅलन्स असेल तर)

$ गॅलरी: वरच्या मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा.

$ लेखणी: एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन.

$ छत्री: एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ ! 

$ कॉलेज: शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे एक साधन. 

$ परीक्षा: पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ.

$ दाढी: कुरुपपणा लपवण्याचे रुबाबदार साधन. 

$ काटकसर: कंजूषपणाचे एक गोंडस नाव. 

(दैनिक चौफेर-२७/१०/१४)

---------------------

सध्या ट्रेजरबुकमधून इतके पुरे. आपणही या संकल्पनेचा जरूर विचार करा. जेव्हा शक्य असेल तेव्हा, रोज एक तास निवडून, अशा तऱ्हेची माहिती वा ज्ञान गोळा करायचा प्रयत्न करा आणि आनंद व समाधानाचे धनी व्हा.

शेवटी जाता जाता...... 

हा लेख लिहीताना 'सोमि'वर आलेला हा संदेश:

"*जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा आयुष्य सुंदर असते पण जेव्हा तुमच्यामुळे इतरांना आनंद होतो तेव्हा आयुष्य सार्थकी लागते . आपल्यामुळे कधीही कोणाच्याही डोळ्यात पाणी येऊ देऊ नका . हसावता नाही आलं तरी अश्रूंचे कारण बनू नका . दुसऱ्यांच्या दुवा घ्या तळतळाट नको* .

 *फक्त गरज पडल्यावर आठवण काढणाऱ्या माणसांवर कधीच रागवू नका .. कारण काही माणसं देवाचीही आठवण तेव्हाच काढतात जेव्हा त्यांना कोणताच पर्याय दिसत नसतो*.

*संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होय . दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे . जेव्हा आपण दुसऱ्यासाठी दिवा लावतो तेव्हा आपलीही वाट उजळून निघते . फक्त माणूसकी जपायला शिका सर्व नाती आपोआप निभावली जातील*."

--------------------

धन्यवाद

सुधाकर नातू

ता.क.

असेच तीनशेहून अधिक वैविध्यपूर्ण वाचनीय लेख 

वाचण्यासाठी पुढील लिंक संग्रही ठेवा.....

https://moonsungrandson.blogspot.com

आपल्या स्नेहवर्तुळांत ती शेअरही करा....

शनिवार, १७ जुलै, २०२१

"मुशाफिरी-अनुभव आणि कल्पनांची भरारी !":

 "मुशाफिरी-अनुभव आणि कल्पनांची भरारी !":

👍👍
"मानाचा मुजरा-'शहेनशहा'ला !":
आमच्या पिढीचे दोन आदर्श म्हणजे दिलीपकुमार आणि देव आनंद. प्रत्येक तरुण त्यावेळेला आपापल्या एकंदर व्यक्तिमत्वाला साजेशा, आवडीनिवडीप्रमाणे त्यातील एकाला आपला हिरो समजायचे. त्यातील 'शहेनशहा' दिलीपकुमार हा माझ्या कायम लक्षात राहिलेला, एकमेवाद्वितीय असा अभिनयसम्राट होता यात वाद नाही.

आज त्याच्याबद्दल गेल्या रविवारच्या महाराष्ट्र टाईम्समधील प्रभा गणोरकर यांचा दिलीपकुमार वरील, "एकमेवाद्वितीय" हा अप्रतिम लेख अथपासून इतिपर्यंत वाचल्यावर, माझ्या जुन्या अनेक स्मृती जागृत झाल्या. या लेखात त्यांनी दिलीपकुमारच्या वेधक वेचक अशा मोजक्‍याच चित्रपटातील भूमिकांचा यथातथ्य ऊहापोह करून, त्याची अभिनय वैशिष्ट्ये आणि त्या त्या भूमिकेतील खास बारकावे, असे काही जीवंतपणे समोर उभे केले आहेत की, त्यांना तोड नाही. भरीस भर म्हणून, त्या गाजलेल्या चित्रपटांतील नादमधूर अर्थपूर्ण गीताचा चपखल उहापोह करून, संगीतमय अशा एका त्यावेळच्या 'गोल्डन मेलोडी' काळाला जागे केले आहे. त्या चित्रपटांची ही मांदियाळीच पहा"
दीदार, देवदास, अंदाज, मुगले आजम, मेला, तराना, नया दौर, राम और श्याम आणि शक्ती, सौदागर...

तो लेख केव्हा वाचून संपला ते मला कळलेच नाही आणि मी अक्षरशः भारावून गेलो. सहाजिकच माझे हात स्मार्ट फोन मधील "यु ट्युब" कडे वळले आणि एकाहून एक सरस अशी मधुर गीते असलेल्या 'दीदार' चित्रपटांची गाणी मला ऐकावीशी वाटली. त्यामधील "ओ ओ, बचपन के दिन भुला ना देना" हे गीत तर आम्ही त्या काळात स्वतः गुणगुणत होतो. प्रत्यक्ष सुरेल गीते आणि त्यांचा समोरचा चित्रमय असा आभास बघताना,अक्षरशः काळ हरवल्यासारखे वाटले.

हिंदी चित्रपटातील ह्या एकमेवाद्वितीय 'शहेनशहा'ला शतशः सलाम !
-------------------------------------
👍👍
"वाचा आणि विचार करा !":

Whatsapp वरून 'आलेला' संदेश वा विडीओ क्वचित आँडीओ क्लिप (कधी कधी न पहाता/वाचता ) पुढे ढकलण्याचा उद्योग अव्याहत चाललेला असतो. लांबलचक मजकूराचे संदेश फक्त नजरेखालून घालून पुष्कळदा डिलीटही केले जातात. मात्र प्रश्न आहे पुढे ढकललेल्या विडीओज् बद्दलचा.

विडीओज् पुढे पाठवताना त्यांची यथोचित ओळख करून देणार्या मजकूराचे संदेश त्याबरोबर पाठवणे अत्यंत गरजेचे नाही कां? कारण त्यामुळे ते उघडून पहायचे की नाही हे जसे ठरविता येईल आणि पहिलेच तर अधिक योग्य तऱ्हेने समजतील. पण हे कुणी लक्षातच घेत नाही आणि मोबाईलमध्ये अनेकानेक विडीओज् चा कचरा जमा तर होतोच, शिवाय (अनावश्यक) मोबाईल डेटाही खर्च होतो.

ह्या अनुभवामुळे मी तरी शक्यतो तशी ओळख करून देणारा संदेश पुढे पाठवावयाच्या विडीओबरोबर धाडणार आहे. सहाजिकच विडीओचा रसास्वाद बनवण्याची किमया तर साधली जाईलच, शिवाय आपोआपच उगाचच 'आला-पुढे ढकलला' ही चुकीची संवयही त्यामुळे बंद होईल.

बघा, विचार करा आणि आजपासूनच तशी पद्धत कसोशीने अंगिकारा.

--------------------------------------
👍👍

"कल्पनांची भरारी !

# काही वर्षांपूर्वी पूर्वी मी एका मराठी नियतकालिकात 'प्रगतीची क्षितिजे' या नावाचे एक सदर लिहीत असे. त्यामध्ये मी नवनवीन काही संकल्पना सुचवत असे.

# मला आठवते जाहिरात व्यवसाय उत्तरोत्तर महत्त्वाचा होत जाईल आणि आपण जे कपडे घालतो त्यावरही जाहिराती छापून, लोक अशा तऱ्हेचे कपडे घालून वावरतील, असे एका लेखात लिहिले होते. आज ती संकल्पना प्रत्यक्षात आलेली दिसते, जेव्हा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू त्यांच्या गणवेषांवर जाहिराती मिरवताना आपण पाहतो तेव्हा.

# दुसरी एक अफलातून संकल्पना त्या वेळेला माझ्या मनात रस्त्यावरील एकंदर ट्रॅफिक जँममुळे मनात आली होती. (अर्थात आता तर ट्रॅफिक जॅम एवढा भयंकर असह्य झाला आहे.) त्यावेळेला एका लेखात मी कल्पना मांडली होती की, आपण ज्या मोटारीत आहोत ती जर उडवता आली तर किती बहार होईल ! आपोआप ट्रँफिक कोंडीमधून आपण बाहेर पडून, पाहिजे त्या ठिकाणी लवकर आपल्याला जाता येईल. ती त्यावेळेला अक्षरशः वेडगळ कल्पना होती. कदाचित तुमच्याही मनात आजकाल प्रवास करताना तसं काही येतही असेल.

# आज हे आठवायला पुढे पाठवलेली एक व्हिडिओ क्लिप पहायला मिळाली:ज्यामध्ये जगात प्रथमच मोटार हवेतून विमानाने सारखी उडताना दाखवली होती !:
---------------------------------
👍👍
"प्रभावी बोलणे ही एक कला आहे.":
[ ] आपल्या मनामध्ये जे ईप्सित आहे, समोरच्याकडून आपल्याला काही करून घ्यायचंय वा आपल्याला त्याला काही सांगायचं असतं, तेव्हा आपल्या मनामध्ये निश्चित अशी रूपरेखा असली पाहिजे आणि ती योग्य शब्दात समोरच्याला सांगता आली पाहिजे, तरच तुम्ही प्रभावी संवाद करू शकता. त्यामुळे आपल्या बोलण्यातून जे काही आपल्याला अभिप्रेत आहे, ते समोरच्याच्या डोक्यात उतरवू शकता, मात्र त्याप्रमाणे कृती करायची की नाही हे त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही किती प्रभावीपणे स्पष्टपणे पारदर्शकपणे त्याला समजेल अशा शब्दांत माहिती वा तुमचा हेतू त्याला सांगू शकता, त्यावर तुमच्या संभाषणाचा योग्यायोग्य परिणाम अवलंबून असतो.
--------------------------------
👍👍
"अनुभवाचे बोल":
# आपल्याजवळ नाही त्याची चिंता करण्यापेक्षा आपल्या जवळ जे आहे त्यामध्ये समाधान मानावे जी परिस्थिती आपल्या वर आली आहे ती गोड मानून नेहमी आपला पुढचा मार्ग चालत राहावे.

# ज्या गोष्टी बदलणे आपल्या हातात नाही त्यांच्याबद्दल जास्त विचार करणे किंवा त्या बदलण्याचा अट्टाहास करणे सोडून देऊन आपण ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्यावर जर आपण लक्ष केंद्रित केले तर बरीशी दुःखे कमी होतील.

# नको त्या गोष्टी चिंता करण्यापेक्षा आज आत्ता काय आपण आनंदासाठी समाधानासाठी करू शकतो आणि आजचा दिवस आपल्यासाठी गोड करू शकतो त्याचा सतत विचार करत राहून त्याप्रमाणे वागावे.
-------------------------------------

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच तीनशेहून अधिक वैविध्यपूर्ण वाचनीय लेख
वाचण्यासाठी पुढील लिंक संग्रही ठेवा.....

https://moonsungrandson.blogspot.com

आपल्या स्नेहवर्तुळांत ती शेअरही करा....

बुधवार, १४ जुलै, २०२१

"फिरूनी नवीन जन्मेन मी-अर्थात् कर्म सिद्धांत !":

 "फिरूनी नवीन जन्मेन मी":

"कर्म सिद्धांताचा मतितार्थ":

सध्या मी श्री. हिराभाई ठक्कर यांचं कर्म सिद्धांतावरचे पुस्तक वाचत आहे. त्यामध्ये मला जे उमजले ते थोडक्यात सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न मी ह्या छोट्या लेखात करणार आहे. 

# जन्ममृत्यू पुनर्जन्म, ही मोक्ष मिळेपर्यंतची एक प्रक्रिया आहे. मोक्ष म्हणजे जन्म म्रुत्युच्या फेर्यांतून मुक्तता. आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे आपण जन्म घेतो आणि त्यानंतर मृत्यू पावल्यानंतर, आपल्या चांगल्या आणि वाईट कृत्यांचा जो जमाखर्च असतो, त्यानुसार आपल्याला पुन्हा जन्म मिळतो. 

# "कर्म आणि त्याचे प्रकार":

आपण जन्मापासून काही ना काहीतरी कृती अथवा कर्म सतत करत असतो. कर्मांचे तीन प्रकार आहेत: 

एक: क्रियमाण कर्म 

दोन: संचित कर्म 

आणि तीन: प्रारब्ध कर्म. 

# क्रियमाण कर्म हे असे कर्म की, ज्याचे फळ ताबडतोब मिळते. आपण एकामागोमाग एक दुसरे कार्य किंवा कृत्य करत जातो. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जी काही कृत्य करतो, त्या सर्वांना क्रियमाण कर्म म्हणतात. ही क्रियमाण कर्मे केल्यावर ती करणाऱ्याला फळ देतात. थोडक्यात प्रत्येक क्रियमाण कर्म फलद्रूप होते व फळ देऊन मगच आपल्याला त्या कर्मापासून मुक्ती मिळते. 

# संचित कर्म म्हणजे असे कर्म की, त्याचे फळ लगेच मिळत नाही, त्या करता काही काळ थांबायला लागते. उदाहरणार्थ परीक्षेचा पेपर लिहिला तरी त्याचे फळ मिळायला रिझल्ट येईपर्यंत वाट बघावी लागते. त्याचप्रमाणे आपण अशा अनेक कृती वा कर्मे करत जातो. उदाहरणार्थ माता-पित्यांना दुःख दिले, तर तुमच्या वृद्धावस्थेत त्याचे फळ तुम्हाला मिळू शकते.

# काही क्रियमाण कर्मे तात्कालिक फळे देत नाहीत, परंतु कालांतराने ती जेव्हा पक्व होतात तेव्हा तुम्हाला वेळ देऊन शांत समाप्त होतात. तो पर्यंत ही संचित कर्म म्हणून तुमच्या खाती जमा राहतात.  म्रुत्यु समयी, जीवनामध्ये अशी अनेक फलद्रुप न होऊ शकलेली संचित कर्मे, म्हणून त्याचे खातेवहीत जमा म्हणून, पुढील जन्मात भोगण्यासाठी शिल्लक राहिलेली असतात.

# प्रारब्ध कर्म म्हणजे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते, त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. अशा रीतीने जन्मजन्मांतरांत संचित कर्मांचे असंख्य हिमालय पर्वताएवढे पर्वत तुमच्या खात्यात जमा झालेले असतात. मृत्यूसमयी जी अशी फळे पक्व होतात, तशीच संचितात जमा होतात. ती पुढच्या जन्मात जेव्हा परिपक्व होतात, त्या वेळेला त्यांचे फळ मिळते. 

# थोडक्यात कर्म केलं की त्याचे जे फळ आहे, निश्चित आहे आणि ते तुमचे तुम्हालाच ह्या भूतलावर ह्या जन्मात नाही, तर पुढच्या जन्मात भोगायला लागतेच लागते. म्हणून वाईट कर्म करण्यापूर्वी दहावेळा नव्हे, हजार वेळा विचार करावा. कर्म केल्यावर त्याचे फळ आज नाही तर उद्या, भोगलेच पाहिजे हा स्रुष्टीचा अलिखित नियम आहे, एवढे लक्षात ठेवावे.

# सारांश, आपल्यामुळे दुसर्‍याचे नुकसान कधी होऊ नये, एवढे जरी व्रत, तुम्ही निष्ठेने जीवनामध्ये पाळले तर तुमच्याकडून अनिष्ट अशी कार्ये होणार नाहीत. त्याउलट शक्यतोवर आपल्यामुळे इतरांना काहीतरी हितकारक असे लाभ होऊ शकतील, अशा तऱ्हेचे जर तुम्ही प्रयत्न केलेत, तर तुमच्या पदरी चांगली कर्मे केल्याचे फळ मिळू शकते. 

विज्ञानाचा विचार केला तर न्यूटनचा जो पहिला नियम आहे एक्शन इज इक्वल टू रिएक्शन तो म्हणजे आपला कर्म सिद्धांत असे थोडक्यात म्हणायला काय हरकत आहे?

धन्यवाद

सुधाकर नातू

ता.क.

असेच तीनशेहून अधिक वैविध्यपूर्ण वाचनीय लेख 

वाचण्यासाठी पुढील लिंक संग्रही ठेवा.....

https://moonsungrandson.blogspot.com

आपल्या स्नेहवर्तुळांत ती शेअरही करा....

मंगळवार, १३ जुलै, २०२१

"जन्मगांठ?: नव्हे, फसवाफसवीचा खेळ !":

"जन्मगांठ ?: नव्हे, फसवाफसवीचा खेळ !":

"बायको अशी हव्वी !"

कलर्स चँनेलवरील ह्या मालिकेतील डॉक्टर असलेली नायिका, जान्हवी ही, तिच्या वडीलांची शंभर एकर जमीन आपल्याला मिळवून देणारे माध्यम समजून, त्यामुळे आपल्या उद्योगसमुहाला जो रू. 350 कोटींचा प्रचंड कर्जाचा बोजा आहे, तो दूर व्हावा या कुटील हेतूने नायक विभास तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक करतो.  त्याकरिता विभास त्याच्या कुटुंबाचे आदर्श वागण्याचे जे विपरीत खेळ घडवून आणतो. कारण त्यांच्या घरी स्त्रियांना बिलकुल किंमत दिली जात नसते. जान्हवीच्या आईच्या आजारपणाचा फायदा घेऊन प्रेमाचे नाटक करून विभास जान्हवीशी विवाह करतो खरा, पण पुढे काय होते, ते या दोघांतील चित्तथरारक जुगलबंदीमधून समजते. कारण जान्हवीचे वडील देखील बेरकी असतात, म्हणूनच जमीन विकली अशी काही पुडी ते सोडून देतात. त्यामुळेच जो प्रसंग  उद्भवतो तो असा:

"अशी ही जबरदस्त जुगलबंदी !":

"बायको कशी हवी" या कलर्स वरील मालिकेमध्ये तरुण जान्हवी आणि तिचा पती विभास यांच्यामधील जुगलबंदी खरोखर चित्तथरारक होती. विभास हा एका बड्या कुटुंबातील परंतु पोकळ वासा असलेल्या परिस्थितीत, ज्यांच्यावर खूप करोडो रुपयांचे कर्ज आहे. अशा अवस्थेतील विभास त्यातून मार्ग काढण्यासाठी बँकेमध्ये गेल्यावर, जे तेथील कर्मचार्‍यांना बरोबर तसेच स्त्री असलेल्या मँनेजरबरोबर अश्लाघ्य वर्तन करतो, ते जान्हवीला बिलकूल न पटल्यामुळे ती संतापाने विभासला जे काही धडाधड बोलते, ते खरोखर अक्षरशः विखारी शब्दांचेआसूड असतात. 

तिचे प्रत्येक वाक्य हे अत्यंत समर्पक आणि जिव्हारी लागणारे असते. तिला स्त्रीयांवरील पुरुषांची मुजोरी मुळीच पसंत नसते, विभासकडून तिची तशी अपेक्षाही नसते. तिचे तोफेच्या गोळ्यांसारखे धडाधड असे वार जेव्हा होतात, तेव्हा विभास शांतपणे ते ऐकून घेतो, मध्ये कुठेही कुठल्याही प्रकारचे असे प्रतिसाद, वाद वा भांडण करत नाही. तिचा हा क्लेशदायक मारा संपल्यानंतर, तो त्याचे स्वार्थी परंतु निश्चित असे जे काही मार्ग होते ते उघड करत, यापुढे हे रिलेशन त्याला टिकवायचेच नाही, असे तो तिला ज्या तडफेने आत्मविश्वासाने निक्षून सांगतो ते गैर असूनही बघण्यासारखे होते. 

त्याने केवळ तिच्या वडिलांच्यापाशी असलेल्या १०० एकर जमिनीमुळे, हे सारे नाटक केले होते आणि जान्हवीशी विवाह केला होता, हे तो स्पष्टपणे सांगतो. यापुढे या रिलेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही, ते तोडून टाकू या असेही तो सांगतो. त्याचे स्पष्ट आणि जरी गैर वाटले तरी त्याच्या दृष्टीने बरोबर असे बोलणे हे बघून बहुदा जान्हवी गप्प होईल आणि कदाचित आपल्या वडिलांना ही  जमिन विकल्याबद्दलचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला सांगेल, अशी त्याची कदाचित अपेक्षा असावी.

परंतु ती देखील तशीच शेरास सव्वाशेर असल्यामुळे त्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेते आणि बोलणे झाल्यावर हात पुढे करून Done असं तीनदा ज्या पद्धतीने म्हणते ते खरोखरच स्तिमित करण्याजोगे होते. विभास आणि जान्हवीची ही जबरदस्त जुगलबंदी खरोखर बघण्याजोगी, अनुभवण्याजोगी अशीच होती. ह्या दोन्ही कलाकारांनी ज्या पद्धतीने ती सादर केली तेही अवर्णनीय होते.

"फुलाला सुगंध मातीचा":

वरील प्रसंग हेच ध्वनीत करतो की, कोणत्याही विवाहामध्ये वर किंवा वधूकडील बाजूचा स्वतःचा असा स्वार्थ असतो. त्यामध्ये एक बाजू पुष्कळदा फसली जाते, तर दुसरी बाजू फसवली जाते. टीव्हीवरील मालिकांमध्ये, कदाचित हाच ट्रेंड बऱ्याच वेळेला दिसून येतो. "फुलाला सुगंध मातीचा" या मालिकेमध्ये चांगली शिकलेली सवरलेली अशी नायिका कीर्ती आणि केवळ आठवीपर्यंत शिकलेला केवळ स्वयंपाक करून खाद्यपदार्थ विकणारा, असा शुभम यांचा विवाह असाच फसवणुकीवर आधारलेला असतो. नवरा मुलगा शुभम खूप शिकलेला आहे अशी बातमी कीर्तीचा भाऊ तिला देतो आणि हा विवाह त्याच्या स्वार्थासाठी घडवून आणतो. म्हणजे एक बाजू फसली जाते आणि तीही शुभमच्या कुटूंबाच्या नकळत.

"सुंदरा मनामध्ये भरली":

"सुंदरा मनामध्ये भरली" मालिकेमध्ये तर विपरीतच कहाणी आहे. अभिमन्यू आणि लतिका यांची जी विचित्र अशी जोडी, जेव्हा विभक्त होते, तेव्हा संपूर्ण गांवाच्यासमोर विदारक नाट्य घडते. त्यामुळे अभिमन्यूने कशी फसवणूक केली आहे ते समस्त गांवाच्या समोर येतं. सासरे बापूंचे २० लाख रुपयांचं कर्ज डोक्यावर असल्यामुळे आणि आपल्या वडिलांच्या दबावामुळे अभिमन्यू लतिकेशी विवाह करतो. पैसे जमल्यावर कर्ज फेडूनआणि ही लतिका बापूंनी साभार परत तिच्या माहेरी करायची हा त्याचा हेतू साऱ्या साऱ्या समाजापुढे वटपौर्णिमेच्या दिवशी उघड होतो. यातून सगळ्यांना कळून चुकते की कुणाची फसवणूक झाली ते.

"जीव माझा गुंतला":

"जीव माझा गुंतला" या नव्या मालिकेतसुद्धा नायक मल्हारला, श्वेता आपल्या बहिणीची-अंतराची पत्रिका-जीच्यात काही दोष आहे आहे, ती आपली पत्रिका म्हणून देते. ह्या फसवणुकीमधून तिचा मल्हारशी विवाह होण्याचे घाटते. मालिकेत पुढे काय होईल माहित नाही. परंतु पत्रिकांची ही अशी फसवाफसवी हासुध्दा जन्मगांठ जुळवितानाचा एक भयानक प्रकार.

"आई कुठे काय करते":

एवढेच काय,  सध्या गाजत असलेल्या "आई कुठे काय करते" या मालिकेतसुद्धा, झोपेच्या गोळ्या घेण्याचे, जीव देण्याचे खोटे नाटक करून अंकिता अभिषेकचा, त्याला आवडणार्या अनघाबरोबर ठरलेला साखरपुडा काय मोडते आणि त्याला आपल्याशी विवाह करायला भाग काय पाडते ! दुर्दैवाने त्या कूटील कारस्थानामध्ये अभिषेकचे वडील अनिरुद्धदेखील सामील असणे, याला काय म्हणायचे ? 

"जन्मगांठ ?: नव्हे, फसवा फसवीचा खेळ !":

वास्तव जीवनांतही फसवाफसवी हा जन्मगांठी जुळवितानाचा स्थायीभाव आहे की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती असते. हे वरचे सारे मालिकामधील प्रसंग आणि कथानक, वास्तव जीवनातसुद्धा असेच अनुभव पदोपदी येत असलेले पुष्कळदा आढळून येतात, हे दुर्दैव. सहाजिकच मनाविरुद्ध सहजीवनाचे नाटक आणि त्यामधील ताणतणाव सहन करत, किती जोडपी जीवन कंठत असतात, कोण जाणे ! एकाचा स्वार्थ, हा दुसऱ्याच्या दुःखाला कारणीभूत होतो, हे कोणी मुळी लक्षातच घेत नाही आणि फसवणूकीची ही वाटचाल अनेकानेक जन्मगांठीमधून कायम चालू रहाते. हे निकोप समाजाचे लक्षण निश्चितच नव्हे.

धन्यवाद 

सुधाकर नातू.

ता.क.

वैविध्यपूर्ण वाचनीय मजकूर  देणारे चित्रपट रंगभूमी,टेलिव्हिजन,राजकारण, व्यवस्थापनशास्र आणि ज्योतिष अशा विविध विषयांवरील सुमारे 300 लेख आजपर्यंत, केवळ चार वर्षात, माझ्या ब्लॉगवर मी लिहीले आहेत. उत्तरोत्तर हा ब्लॉग चांगला लोकप्रिय होत आहे. त्याची लिंक:

https://moonsungrandson.blogspot.com

क्रुपया ही लिंकही आपल्या स्नेहवर्तुळांत शेअर करावी. आपल्याला कोणत्या विषयांवरील लेख वाचावेसे वाटतात, ते आपण मला, प्रतिसादात जरूर कळवावे. 

धन्यवाद.

सोमवार, १२ जुलै, २०२१

"मराठी रंगभूमी: एक चिंतन":

 "मराठी रंगभूमी: एक चिंतन":

माणसाला एकदा एखादे व्यसन लागले की त्या गोष्टीच्या नादात तो वास्तवता विसरतो, त्या अनुभवांचे जणू त्याला भूल पडते, भान हरपते. कोणाला दारूचे व्यसन असते, तर कोणाला दारुचे, तर कुणाला संगीताचे, नाटकाचे. दोन्ही व्यसनात जमीन-अस्मानाचा फरक असला तरी उद्देश एकच असतो, आपले मन रमविणे. मराठी माणसासाठी नाटक हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे नाट्यरसिकांना नाटकांची अशीच विलक्षण ओढ असते.

नाटक हा खरोखर एक रोमांचक अनुभव आहे. कोणत्याही व्यवसायात पैसा अथवा कँपिटल, मनुष्यबळ, भूमी अर्थात जागा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहक, ही मूलभूत तत्वे असतात. त्यांचा रंगभूमीवरही समावेश होतो, कसे ते सांगतो. रंगमंच हे त्या व्यवसायाचे ठिकाण म्हणजे भूमी, काम करणारे कलावंत हे मनुष्यबळ, तर व्यवसायाकरता पैसा हे भांडवल अर्थात कॅपिटल, तर आश्रयदाता रसिक प्रेक्षक हा ग्राहक, व्यवसायाकडून बाहेर पडणाऱ्या पक्या प्रोडक्टचा फायनल प्रॉडक्टचा नाटकाचा उपभोक्ता.

धंदा किंवा व्यवसायाचा मूळ उद्देश म्हणजे कष्ट करत, गुंतवलेल्या भांडवलावर अर्थातच जास्तीत जास्त फायदा मिळवणे. मात्र नाटक हा केवळ फक्त एक धंदा नसतो, तर कला, तसेच विचार अशा त्रिमूर्तीचा अद्भुत संगम घडवणारी गोष्ट आहे. विविध विषयांवर समाजाच्या मानवाच्या जीवनातील विविध समस्यांवर नाटकाच्या रूपातून भाष्य केले जाते तेव्हा एक नवा विचार नाटक नवी दिशा देत असते, तर नाटकाराच्या मनातले नाट्य कलाकारांनी यथातथ्य रंगभूमीवर जीवंत करणे ही कला होय. त्यामुळे धंदा, कला व विचार या त्रिवेणी संगमातून मिळणारा आनंद खरोखर शब्दातीत असतो.

अर्थात प्रत्येक नाटक ह्या तीनही अत्यंत दुर्मिळ अशा गोष्टींचा एकत्रित परिणाम सादर करतेच असे नाही. मराठी रंगभूमीवर गाजलेली निवडक लोकप्रिय नाटके ही त्रिवेणी संगमाची किमया साधतात ही अभिमानाची बाब आहे. जगात मराठी रंगभूमी एक अग्रगण्य स्थान राखून आहे तेही ह्याच तीन पेडी चमत्कारामुळेच.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
ता.क.
वैविध्यपूर्ण वाचनीय मजकूर देणारे चित्रपट रंगभूमी,टेलिव्हिजन,राजकारण, व्यवस्थापनशास्र आणि ज्योतिष अशा विविध विषयांवरील सुमारे 300 लेख आजपर्यंत, केवळ चार वर्षात, माझ्या ब्लॉगवर मी लिहीले आहेत. उत्तरोत्तर हा ब्लॉग चांगला लोकप्रिय होत आहे. त्याची लिंक:

https://moonsungrandson.blogspot.com

क्रुपया ही लिंकही आपल्या स्नेहवर्तुळांत शेअर करावी. आपल्याला कोणत्या विषयांवरील लेख वाचावेसे वाटतात, ते आपण मला, प्रतिसादात जरूर कळवावे.
धन्यवाद.

शनिवार, १० जुलै, २०२१

"नवे बदल, नव्या संकल्पना !":


"नवे बदल, नव्या संकल्पना !":
'कोरोना' महामारीच्या सध्याच्या विचित्र काळामध्ये गेली दीड वर्ष जवळ-जवळ घरामध्ये कोंडून घेऊन एक प्रकारची कोंडी झाली आहे, एकलकोंडेपणा आला आहे. त्यामुळे दररोज त्याच त्याच प्रकारचे काम, त्याच त्याच पद्धतीचे वातावरण आणि तीच तीच माणसे सभोवती, सहाजिकच जीवनामध्ये नको इतका कंटाळवाणा एकजिनसीपणा आलेला आहे. हे जवळजवळ सगळ्याच मंडळींबाबतचे एक कटू सत्य आहे. विविध प्रकारचे मानसिक अस्वास्थ्य, नैराश्य व उद्विग्नता असे वेगवेगळे अनुभव प्रत्येकालाच येत आहेत. उद्या परवा वा पुढेही काहीच भवितव्य नाही अशा तऱ्हेची पोकळी व सर्वसाधारण मनस्थिती सगळ्यांचीच आहे.

अशा वेळेला काय करायचं, म्हणजे परत मनाला उभारी येईल असा प्रश्न कायमचा मधून मधून आपल्याला सतावत असतो. माझीही काही वेगळी परिस्थिती नाही. गेले दीड पावणे दोन वर्ष मी याच एका प्रकारच्या एकलकोंडेपणाचा अनुभव घेत आलो आहे आणि त्यामुळे करायचं काय याचा मी अधून मधून सातत्याने विचार करत आलो, इथपर्यंत येऊन पोहोचलो. त्यासंबंधीचे माझे अनुभव तुम्हाला माझ्या विविध व्हिडीओजमधून वा ध्वनिफितींमधून आणि लेखांमधून सातत्याने मी प्रदर्शित करत आलो आहे. माझे अनुभव, विचार वा कल्पना तुमच्या पुढे मांडत आलो आहे आणि हाच माझा विरंगुळा ठरत आलेला आहे. पण अखेरीस मला देखील पुन्हा तोचतोचपणाचा आता अक्षरशः कंटाळा आला आहे आणि आता काय करायचं हा प्रश्न आ वासून समोर उभा आहे. त्याचे उत्तर काढणं सोपं नसतं. अर्थात असा अनुभव मी गेल्या दीड वर्षात तीन चार वेळा तरी घेतला. दर वेळेला कुठलीतरी नवीन संकल्पना निर्माण करून त्यात मग्न होऊन काळ पुढे नेत आलो.

आता पुन्हा तशाच संभ्रमित अवस्थेत असताना, योगायोगाने मला अचानक एक चांगला लेख वाचायला मिळाला 'चतुरंग लोकसत्ताच्या पुरवणी' मध्ये, "ज्याच्या त्याच्या कॉफी बीन्स" हा तो लेख. त्या लेखामध्ये लेखिकेने-सारिका कुलकर्णी ह्यांनी, अशी कोंडी झालेल्या मनस्थितीची बाब प्रकर्षाने पुढे आणली आहे. एक उदाहरण फार चांगलं दिलं आहे: अत्तर आपल्याला सुवासिक म्हणून खूपआवडतं आणि जेव्हा आपण अत्तराची निवड करण्याकरता वेगवेगळ्या अत्तरांचे वास घ्यायला लागतो, त्या वेळेला, काही वेळाने आपले नाक काम बरोबर करत नाही आणि वास काही घेता येत नाही. ही देखील तोच तोचपणाची स्थिती असते. त्यावर बदल म्हणून आपल्याला कॉफीच्या बियांचा वास देतात, ज्यामुळे पुन्हा तुम्ही अत्तराचे वास घ्यायला मोकळे होता. असं चपखल उदाहरण घेऊन, विविध प्रकारच्या मंडळींचा बदल घडवण्याचे अनुभव लेखिकेने त्या लेखात वर्णिलेले आहेत.

"कोरोना" महासंकटात व लाँकडाउनच्या कोंडमार्यापासून, त्याच त्या वातावरणापासून सुटका म्हणून आपणही काही ना काही नित्य नवे उपाय शोधले पाहिजेत, हे अत्यंत आवश्यक आहे.
त्यासाठी माझी एक कल्पना अशी आहे: सोशल मीडियावर आपल्याला जसे व्हिडिओज येतात तसेच्या तसे त्या विषयांबद्दल काहीही माहिती न देता, आपण पुढे ढकलतो. यापेक्षा आपण आपल्याला भावलेल्या व्हिडिओचा नीट आस्वाद घेतल्यानंतर इतरांना तो पाठवण्यापूर्वी, त्यांना त्याची पूर्वकल्पना योग्य तऱ्हेने जर दिली तर चांगलेच. अशी मला आयडिया सुचली आणि मी ती लगेच अमलात आणली कशी ते पुढच्या दोन उदाहरणावरून तुम्हाला कळेल-एक श्री निळू फुल्यांची दूरदर्शन सह्याद्री वरील बहारदार मुलाखत व दुसरा हवेत उडणार्या मोटारगाडीचा विडीओ ! ## ( लेखाच्या शेवटी वाचा.)

ह्यामधूनच मला अजून एक नवा मार्ग सापडला, तो म्हणजे नुसते दर वेळेला ध्वनीफिती बनवा, व्हिडिओ बनवा ब्लागवर लेख लिहा, यापेक्षा सोशल मीडियावर आपण काय काय बघतो, पाहतो वा कुठे वाचतो अनुभवतो, त्यातील जर आपल्याला काही चांगलं पुढे शेअर करावं वाटलं तर त्यासाठी आपल्या कल्पनाशक्तीचा असाही उपयोग करता येईल ही नवीन संकल्पना यापुढे माझ्याकडून अमलात आणली जाईल.

दुसरी एक संकल्पना माझ्या मनामध्ये आली ती अशी की, आपण फोनवरून एखाद्या परिचिताशी, मित्राबरोबर गप्पा मारायच्या आणि त्या गप्पा रेकॉर्ड करायच्या. त्या ध्वनीफितीमध्ये जर काही चांगलं घेता वा देता येण्याजोगं असलं, तर तसा प्रयत्न करावयाचा. त्यासाठी अगोदरच संभाषण करणार्या दोघांनी तशी तयारी करायची, अशी ती संकल्पना वा आयडिया मला कशी सुचली. आकाशवाणी वर जसा "पुन्हा प्रपंच" असा लोकप्रिय कार्यक्रम असायचा तसा. ह्या संदर्भातील एक आठवण सांगतो. वर्ष-दीड वर्षापूर्वी मी "थप्पड" चित्रपट बघितल्यावर माझ्या एका तरुण परिचिताबरोबर मी फोन-संवाद साधला होता आणि तो संवाद रेकॉर्ड केल्यावर मला जाणवलं की तिथे जे रेकॉर्डिंग आहे ती ध्वनीफित सोशल मीडियावर शेअर करण्याजोगी आहे. ही नवीन संकल्पना त्या प्रयत्नासारखाच एक उपयुक्त विरंगुळा वा बदल आहे.

ह्या पुढे आधी मित्राला कल्पना देऊन परस्परांना सुलभ अशा कुठल्याही विषयावर गप्पा एकमेकांशी मारावयाच्या. त्यामधून वेगवेगळे विचार निर्माण होतील असा प्रयत्न करायचा. त्यामधून जर ध्वनिफीत एखादी चांगली जमलीच, तर ती सोशल मिडियावर शेअर करायची. म्हणजे इथे आपल्या विचार करणे, विचार घेणे, कल्पना करणे, शेअर करणं, हा जो काही आवडता छंद आहे त्याला नवा मार्ग मिळणार आहे. हीच माझी जणु काँफी बिन्स ! त्याच त्याच माहोलापासून, बदल हा असा यापुढे घडवता आला, तर घडवायचा. बघू या जमतं कां !

तुम्हीही एवढे वाचल्यावर आता तुमच्या परिस्थितीत असाच एखाद्या बदलाचा विचार करू लागला असाल. तसे जेव्हा गवसेल, तेव्हा तो बदल आम्हालाही प्रतिसादात कळू द्या.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
## १ "श्री निळू फुलेंची "एक बहारदार मुलाखत":
"यु ट्युब"वर सर्फिंग करताना कधी कधी असा एखादा अप्रतिम कार्यक्रम नजरेला येतो की बोलता सोय नाही. श्रीराम रानडे, ह्यांनी श्री. निळूभाऊ फुले यांच्या 'दूरदर्शन'वरील बहारदार मुलाखतीचा कार्यक्रम त्यातीलच एक. अचानक तो गवसला आणि न चुकता शेवटपर्यंत मी चवीने बघितला आणि खरोखर कृतकृत्य झाल्यासारखे वाटून गेले.

दिलखुलासपणे, मनमोकळ्या आणि प्रामाणिक प्रांजल गप्पांमधून निळू फुले कसे घडत गेले, अंगभूत गुणवत्ता, निरीक्षणशक्ती आणि प्रामाणिक कष्ट ह्यांचे जोरावर, यशाचे प्रतिष्ठेचे शिखर कसकसे गाठतं गेले, त्याचे चित्रमय भावचित्र आपल्याला अनुभवायला मिळते. यातील अनेक मनाजोगत्या आणि स्मरणात ठेवाव्यात अशा आठवणी देखील, मनाला अंतर्मुख करतात. शेवटी गप्पांमध्ये "आपला दिवस चांगला कसा गेला अस़ं तुम्हाला केव्हा वाटतं?" या प्रश्नाला निळूभाऊंनी दिलेले मनापासूनचे उत्तर, शिवाय "अजूनही आशेला वाव आहे, अजूनही विविध क्षेत्रात चांगली माणसं समाजासाठी, माणसांसाठी उपयुक्त काम करत आहेत" हे त्यांचे बोलही निश्चितच मनात कायम ठेवण्याजोगे आहेत.

शेवटी जाता जाता हा महत्वपूर्ण प्रश्न व त्याचे उत्तर आपण रोज दिले पाहिजे असं वाटून गेलं. तो प्रश्न अर्थातच हा:

"आपला दिवस चांगला कसा गेला अस़ं तुम्हाला केव्हा वाटतं ?"
ह्या दिलखुलास मुलाखती मुळे माझा तरी दिवस आज चांगला जात आहे, असे वाटले.
त्याकरिता तुम्हीही, जरूर पुढील चित्रफीत पहा आणि पुनःप्रत्ययाचा आनंद घ्या.

धन्यवाद.
सुधाकर नातू
## २
"हवेत भरारी घेणारी मोटरगाडीचा विडीओ":
"कल्पनांची भरारी !"
# ता.क. (मुद्दाम प्रारंभीच !):
सोशल मिडीयावर आपण पुष्कळदा आलेले काही विडीओज् तसेच्या तसे पुढे पाठवतो. त्यांच्या विषयासंबंधी थोडी ओळख करून देणे उपयुक्त ठरू शकते अशी कल्पना मनात आली म्हणून हा संदेश":

# काही वर्षांपूर्वी पूर्वी मी एका मराठी नियतकालिकात 'प्रगतीची क्षितिजे' या नावाचे एक सदर लिहीत असे. त्यामध्ये मी नवनवीन काही संकल्पना सुचवत असे.

# मला आठवते जाहिरात व्यवसाय उत्तरोत्तर महत्त्वाचा होत जाईल आणि आपण जे कपडे घालतो त्यावरही जाहिराती छापून, लोक अशा तऱ्हेचे कपडे घालून वावरतील, असे एका लेखात लिहिले होते. आज ती संकल्पना प्रत्यक्षात आलेली दिसते, जेव्हा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू त्यांच्या गणवेषांवर जाहिराती मिरवताना आपण पाहतो तेव्हा.

# दुसरी एक अफलातून संकल्पना त्या वेळेला माझ्या मनात रस्त्यावरील एकंदर ट्रॅफिक जँममुळे मनात आली होती. (अर्थात आता तर ट्रॅफिक जॅम एवढा भयंकर असह्य झाला आहे.) त्यावेळेला एका लेखात मी कल्पना मांडली होती की, आपण ज्या मोटारीत आहोत ती जर उडवता आली तर किती बहार होईल ! आपोआप ट्रँफिक कोंडीमधून आपण बाहेर पडून, पाहिजे त्या ठिकाणी लवकर आपल्याला जाता येईल. ती त्यावेळेला अक्षरशः वेडगळ कल्पना होती. कदाचित तुमच्याही मनात आजकाल प्रवास करताना तसं काही येतही असेल.

# आज हे आठवायला पुढे पाठवलेली एक व्हिडिओ क्लिप पहा: ज्यामध्ये जगात प्रथमच मोटार हवेतून विमानाने सारखी उडताना दाखवली आहे !:

धन्यवाद
सुधाकर नातू

बुधवार, ७ जुलै, २०२१

"दाद, प्रतिसाद व पडसाद":

"दाद, प्रतिसाद व पडसाद":

1

From: सुधाकर नातू


डॉ. रविन थत्ते
नमस्कार.

तसा दररोज आमच्याकडे महाराष्ट्र टाइम्स तो सुरू झाल्यापासून दररोज येतो. हल्ली मात्र मी दर शनिवारी लोकसत्ताही घेतो, कारण त्यातील चतुरंग पुरवणी आणि त्या चतुरंग पुरवणीमधील गद्धे पंचविशी हे सदर मी प्रथम नेहमी वाचत असतो.

परवाच्या शनिवारी, सहज असाच सकाळी नाष्टा झाल्यावर पहुडलो असताना लोकसत्ता चतुरंग पुरवणींत आपण लिहिलेला गद्धेपंचविशी लेख वाचला व त्याला अलौकिक, अविस्मरणीय की दिलखुलास काय म्हणू कळत नाही. हा लेख एका दमात वाचला आणि मी अक्षरशः भारावून गेलो, आपण पाहता-पाहता गद्धेपंचविशी बद्दल जे भाष्य केलं आहे त्या संदर्भात माझी ही दाद त्याला देत आहे.

गद्धेपंचविशी हा आयुष्यातला सगळ्यात रोमांचक आणि वळण देणारा कलाटणी देणारा असा कालखंड. या वयामध्ये तारुण्य सळसळते, उत्साह उतू जात असतो आणि काहीना काहीतरी नवनवीन करावे असे वाटत असते. म्हणजेच नाविन्याची ओढ, धोका पत्करण्याची तयारी आणि काही तरी कसेही करून आपल्याला स्वतःला सिद्ध करणे, ह्या इर्षेचा तो रोमहर्षक पंचविशीचा काळ असतो. आपण म्हटल्याप्रमाणे तुमची ही गद्धे पंचविशी सातत्याने पुढे तशीच अक्षरशः उतू जावी अशीच होत राहिली आहे, ह्याचे आश्चर्य मिश्रीत कौतुक वाटते.

आपली गद्धेपंचविशी केवळ त्या काळापुरतीच मर्यादित न राहता, आज ८२ व्या वर्षापर्यंतही अबाधित राहिली आहे, ते अनेक 'उचापतीं'मधून, आपल्या यशस्वी वाटचाली वरून सिद्ध केले आहे त्याबद्दल अभिनंदन. माझे काही चुकत नसेल तर "ग्रंथाली" च्या नोबेलनगरीची नवलकथा अर्थात नोबेल पुरस्कार मिळविणार्यां विषयीचे आपले लेखन ह्या लेखात कसे नाही, हे जाणवलं.
आपल्या लेखामधील काही काही वाक्यांतून, तर खरोखर शाश्‍वत, सनातन, चिरकाल टिकणारी अशी सत्येच आपण मांडली आहेत असे जाणवले, ती अशी:

* झालेली चूक कबूल करणे, यात थोडा त्रास होतो, मात्र नंतर खूप शांतता मिळते.
* तुम्हाला झोप येवो अगर न येवो काळ पुढे चालतच राहतो, तेव्हा झोपमोड करण्यात काहीच हशील नसतो.
* अमेरिकेला चलाख लोक हवे असतात, शहाणे नव्हे.
* गोष्टी घडत जातात, त्या कोणी करत नाही, त्यावर काळाची छाया असते, असे म्हणतात ते खोटे नाही.
* कर्माचे काहीना काही फळ मिळतेच, परंतु अध्यात्म दुष्कर आहे.

आपली ही गद्धे पंचविशी अशीच यापुढेही अविरत नवनवे योगदान देत राहो, ही मनःपूर्वक सदिच्छा.

आपला
सुधाकर नातू
माहीम, मुंबई १६
Mb 9820632655

ता.क.
माझीही शहात्तराव्या वयात बहरत असलेली गद्धे पंचविशी:
"माझा सोशल मिडीयावरील 'संसार'! ":
माझा ब्लॉग:
एकसे बढकर एक अडीचशेहून अधिक वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........
ही लिंक उघडा....

https://moonsungrandson.blogspot.com

लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....
I have you tube channel:

moonsun grandson

With over 75 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. Open this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

ह्याला आलेला प्रतिसाद:
प्रिय सुधाकर मनःपूर्वक आभार. मी लिहिलेल्या विधानांमध्ये तत्त्वद्न्यान दडलेले होते हा आपल्या शोधामुळे माझे मन हरखले . शेवटी प्रत्येक माणूस लेखक आणि तत्त्ववेत्ता असतो हेच खरे. नोबेल वर लिहिणारा सुधीर माझा आडनाव बंधू आहे आणि मित्रही परंतु तो मी नव्हेच. तो माझ्या इतका खट्याळ नाही सज्जन आहे. .सवड मिळताच तुमचे लिखाण वाचण्याचा प्रयत्न करीनच 

तुमचा रवीन थत्ते 
Ravin Thatte
MS, FRCS (Edin) Ad Hominem
Plastic & Reconstructive Surgeon
-------------------------------------------------
2.

 मित्राच्या संदेशाला माझी ही दाद:

👍👍💐💐उपजत तरल स्मरणशक्ती, माणसांतील माणूसपणाची वैशिष्ट्ये वेचण्याची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि भावनाप्रधान मनोव्रुत्ती ह्यांचा त्रिवेणी संगम झाला की एक एक व्यक्तीरेखा कशी जीवन्तरुपाने वावरलेली भासते, त्याचे हे एक ह्रद्य उदाहरण. 


ह्यामधील दोन व्यक्ती मीही जवळून अनुभवलेल्या असल्यामुळे मला पुनःप्रत्ययाचा आनंद व समाधान लाभले. 

श्री. उपेंद्रराव पटवर्धन, तर मी व प्रसाद, कित्येकदा मी एकटा असलो तरी किंग जाँर्ज शाळेतून सायनला येताना जर रुईया काँलेजजवळील बस थांब्यावर उभे असलो तर ते तेथून जाताना आम्हाला/मला कारमध्ये घेऊन घरी

सोडत असत. तेव्हा खाकी हाफ पँट व पांढरा स्वच्छ परीट घडीचा शर्ट यामधील त्यांची रूबाबदार मूर्ती व आत्मविश्वास पहाण्याजोगा असे. नंतर बी.ई. परीक्षा संपल्यावर महीनाभर मला कामाचाअनुभव मिळावा म्हणून त्यांच्या विद्या विहार येथील कारखान्यात त्यांनी स्वतः होऊन संधी दिली होती. वसंतराव वळाम्यांबद्दल लिहावं तितकं थोडच. जावई काँँलनीतील दोन पिढ्यांची जडणघडण व्यक्ती मत्व विकास त्यांच्यमुळे झाला. 

ह्या  आठवणी आपोआपच जाग्या झाल्या त्या तुझ्या ह्या उत्तम लेखामुळे. 

अभिनंदन व शुभेच्छा. 👌👌💐

सुधाकर नातू

------------------------------------------------------

3

श्री. प्रभाकर बोकील
सादर वंदन.
मी सुधाकर नातू, एक जेष्ठ नागरिक मुंबई येथला.

कालच्या शनिवारच्या लोकसत्ता "चतुरंग" पुरवणी मधील तुमचा "टू इडीयट्स" हा लेख वाचला आणि डोळे भरून आले ताबडतोब हा अनाहुत संदेश यायला मी उद्युक्त झालो. सर्वसाधारणपणे एखादी गोष्ट वाचली, पाहिली आवडली तर तिची संबंधितांना पसंतीची यथोचितदाद मी असतो. त्यातलाच हा प्रकार.

त्यातून आज रविवार, टीव्हीवर धड काही पहाण्याजोगा कार्यक्रम नाही, अशा वेळेला विरंगुळा म्हणून "चतुरंग" पुरवणीचा पेपर हातात घेतला आणि तुमच्या लेखाच्या शीर्षकाने आकर्षित झालो. पाहता पाहता सुरुवातीपासून अखेरपर्यंत लेख वाचूनही झाला. त्यामध्ये तुम्ही सध्याच्या कोरोना महामारीमध्ये विश्वासरावांसारख्या एका मनस्वी माणसाच्या त्याहूनही अधिक वेगळ्या अशा विद्या या मुलीचा आणि तिला साथ देणाऱ्या विनय या तरुणाचा जो सहवासपट आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आलेले चिंताजनक संकट, त्याला दिलेले तोंड या साऱ्याचा उहापोह अतिशय तरलतेने केला आहे.

स्वतः चांगली सी. ए. असूनही उत्तम पगाराची नोकरी सोडून दूर वर्ध्याजवळच्या शाळेत मुलांना शिकवायला जाणारी विद्या आणि तिला साथ देणारा, स्वतः सॉफ्टवेअर इंजिनिअर असूनही तिच्यासारखेच शाळेतील मुलांना शिकवण्याचे ध्येय प्रत्यक्षात आणणारा विनय अशांसारखी माणसं सध्याच्या काळात खरोखर दुर्मिळच. आपल्या विचारांशी ठाम आणि निश्चित ध्येय असलेली, जगावेगळे श्रेयस व प्रेयस साध्य करणारी जोडी खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यामुळेच मला आनंदाचे अश्रू आले.

या लेखामुळे अनेकांना निश्चितच आपण अंतर्मुख होऊन आपण काय केले पाहिजे, कसे वागले पाहिजे याचा एक वस्तुपाठ मिळू शकेल. ह्या वाचनाने  मला जे समाधान लाभले, त्याला तुमची लेखणी कारणीभूत आहे, म्हणून तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

धन्यवाद
सुधाकर नातू
मुंबई
ह्याला आलेला हा प्रतिसाद:

"नमस्कार सुधाकरजी, 
मुद्दाम वेळ काढून दिलेल्या  तुमच्या इतक्या सविस्तर प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. हे देखील लिहिणाऱ्या साठी आनंदाचे क्षण. असो. 

लोभ असावा. सध्या काळजी घ्या. 
प्रभाकर बोकील"


--------------------------------------------------------------

"जग, झाले एक बंदीशाळा !!!":

 "जग, झाले एक बंदीशाळा !!!":


आढे वेढे, 

वाकडे तिकडे, 

इथे अन् तिथे 

कळेना कुठे आणि 

कसे जायचे असे !!


आजकाल, उद्या नाही,

आजकाल उद्या नाही. 

उद्या नाही, फक्त आज,

आजचा आज आणि आजच !!


सोमवार वा बुधवार नाही

मंगळवार बिंगळवार वारच नाही, 

कुठलाच वार नाहीच नाही. 

रोज फक्त एकच वार: 

वारच 'वार', वारच 'वार' !!


कोरोना बिरोना,

सबको पुरा धोना ही धोना,

और रोना ही रोना,

केव्हा जाणार, केव्हा संपणार,

कळेना वळेना, काय हा कळेना.

कोणती विद्या, कुठली शाळा,

जग, झाले एक बंदीशाळा !!!


सुधाकर नातू