सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

"टेलिरंजन-८": "अब, जमाना बदल रहा है!':

 "टेलिरंजन-८": "अब, जमाना बदल रहा है!':

मालिकांसंदर्भात जुन्या आठवणींना उजाळा म्हणून माझा चार वर्षांपूर्वी लिहीलेला लेख येथे पुन्हा येथे प्रदर्शित करत आहे. खलनायकांपेक्षा आजही मराठी मालिकांमध्ये खलनायिकांचेच अधिक प्राबल्य दिसते आहे.

मराठी मालिकांमधील एक से बढकर एक खडूस खलनायिका: :

आतापर्यंत मुळूमुळू रडणार्या, आंतल्या आंत कुढणार्या आणि निमूटपणे, त्यांच्यावर होणार्या अन्यायाचे घांव सहन करत जगणार्या, सती सावित्री रूपातल्या नायिकाच मराठी मालिकांमध्ये पहायला मिळत असत. त्यांच्या पीडा जितक्या जास्त, जेवढे त्यांचे अश्रु अधिक तेवढा टीआरपी वाढणारच असे सारे गणित होते.

# बिनधास्त मोनिका:
पण आता जमाना बदलला आहे नायकाशी विवाह होऊनही मालिकेतली बायको नायिका नसून एक पोहोचलेली खलनायिकाच आहे, हे 'खुकखु' मालिकेतील मोनिकाने आपल्या बेछूट बिनधास्त वागण्याने दाखवून देत आहे. ती विवाहापूर्वीच गर्भवती असूनही बावळट, नेभळट नायकाच्याच नव्हे, तर सर्वच कुटूंबियांपासून हे पाप लपविण्यात ती यशस्वी झाली आहे. इतकेच पुरे नाही म्हणून ती मुलीला जन्म दिल्यानंतरही आपल्या खलनायिकी व्रुत्तीचा कडेलोट बिनदिक्कतपणे करते आहे, तेही नायकाने घटस्फोटाचा बागुलबुवा उभा केला असताना! माहेरची तर राहोतच पण सासरच्याही सर्व 'शहाण्या' (?) मंडळींनी जणु बुद्धि सारासार विचार गहाण टाकला आहे! डाँक्टर असलेल्या ह्या नायकाला साधी DNA टेस्टही, मामला रफादफा करण्यासाठी आठवत नाहीये, म्हणजे दर्शकांना ग्रुहित धरण्याची शर्थ झाली.

करणार काय, अब जमाना बदल रहा है, सोशिक पापभिरू नायिकांची जागा त्याहूनही अधिक 'ताकदी' (?)ने मालिकांमध्ये नायकांनी घेतली आहे. इथला विक्रांत त्याबाबतीतले किती विक्रम प्रस्थापित करतो, तेवढेच पहाणे आपल्या हाती आहे!!

# 'विभा': हेरा फेरी करून वडिलांना रस्त्यावर आणते!
'अस्सं सासर सुरेख बाई', मधली थोरली बहिण 'विभा' प्रथम आपल्या धाकट्या बहिणीच्या जुईलीच्या संसारांत जेव्हढी म्हणून विघ्ने आणता येतील, तेवढी पुरेशी नाहीत म्हणून चक्क सगळी मालकी, हेरा फेरी करून आपल्या वडिलांना व दुसर्या विवाहीत बहिणीला घराबाहेर काढून, जवळ जवळ रस्त्यावर आणते! 'टीआरपी'साठी खलनायिकेला हे असे दुष्ट उद्योग केवळ मालिकाच करू जाणे!

# धाकटी वहिनीच खलनायिका!
'तुझ्यात जीव रंगला' मध्ये धाकटी वहिनीच आपल्या हाती घरातील सारा कारभार व सत्ता रहावी, म्हणून भोळ्या सरळमार्गी पेहलवान असलेल्या थोरल्या दीराचे राणाचा विवाहच होऊ नये म्हणून अंजली व राणाच्या मैत्रीत काय काय विघ्ने आणते, ते पाहून प्रेक्षकांच्या कपाळावर आठ्ठया आणत रहाते. त्यासाठी आपल्या सासर्यांच्या डोळ्यांत धूळ तर फेकतेच, पण आपल्या नवर्याला मुठींत ठेवत, त्याचा ही खलनायिका बिनदिक्कत खेळण्यासारखा उपयोग करताना दिसते.

# तीन तीन खलनायिका!
काहे दिया परदेस मधील आपल्या मुलाचे-शिवचा विवाह मुंबईवाली गौरीशी होऊ नये म्हणून तिच्याच नणंदेला-निशाला हाताशी धरणार्या अम्मा-जौनपूरवाली कोणत्या कोणत्या युक्त्या करतात! निशा, त्याना साथ देता देता, आपल्याला व नवर्याला आँस्ट्रेलीयाला न जाऊ देणार्या सासर्याना-सावंतांना कशी छळत रहाते, तेही पुरे नाही म्हणून गौरीचा विवाह जुळविण्याच्या बहाण्याने ही सून आपल्या महा बिलंदर आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे रहाते घरच बेमालूमपणे ही खलनायकी निशा विकते! ह्या तीन तीन खलनायिका असल्यावर मालिकेची गाडी फाँर्मांत येणार नाही तर दुसरे काय होणार. आता सारेच डाव उलटल्यावर ही नाठाळ सून साळसूदपणाचा आव आणत सगळ्या कुटूंबियांची सहानुभूती मिळवत आहे खरी, पण जर गौरीच्या बनारस मधील सासरचे दिल अभी भरा नही स्टाईल बाबूजी व अम्मांचा उगाचच लांबत जाणारा दुरावा जर कंटाळवाणा होऊ लागला, तर ही भोळी भाबडी (?) निशा परत बदलेकी आग लावायला समर्थ आहेच!!

# ‘शयाना’: राधिकेच्या सुखी संसारावर निखारे:
'माझ्या नवर्याची बायको' मधील शयाना, नायक गुरूनाथला केवळ स्वार्थापोटी, मोहांत पाडून त्याच्या व राधिकेच्या सुखी संसारावर निखारे टाकते. एवढेच नव्हे, तर ती गुरूनाथला राधिकेला चक्क घराबाहेर काढायला लावते आणि बिनदिक्कत त्याच्याबरोबर त्याच्या घरांत राहू लागते. तारुण्य आणि सौंदर्य ह्या जोरावर ही खलनायिका आपला कार्यभाग साधत रहाते. तिला ह्या ना त्या प्रकारे मदत करणारी शेजारच्या नानाजींची सून व शयाना बरोबर मैत्री साधणारी तिची मैत्रिण ह्या दोघीही मिनी खलनायिकाच आहेत.

# सावत्र आई; खलनायिकाच.
सरस्वती मालिकेतही मोठ्या मालकीणबाई देखिल आपले अधिराज्य सरस्वतीच्या आगमनामुळे जाणार म्हणून तिच्या संसारात बिब्बे घालण्याचे नाना प्रयत्न करतच असते. शिवाय ती, मोठ्या मालकांच्या पित्याशी मतलब ठेवून विवाह केल्यानंतर, आपल्या भावाच्या मदतीने स्वत:च्या पतीचा कपटीपणाने अंत घडवून आणते, हे रहस्यच लपवण्याचे डाव खेळते. अर्थांत अखेर तिचा हा खलनायिकी मुखवटा सरस्वती केव्हा ना केव्हां उघडकीस आणेलच! सावत्र आईच्या रूपांतील ही खलनायिकाच.

# खलनायिकेच्या ट्रेंडचा पाया:
मराठी मालिकांमध्ये नायिका खलनायिकेच्या रूपात आपले दुष्ट कारनामे करण्याच्या अशा ट्रेंडचा पाया बहुदा विलक्षण गाजलेल्या व लांबलेल्या 'चार दिवस सासूचे...' मालिकेतील मोठी सूनबाई सुप्रियाने घातला. नवर्यालाच घरगडी बनविणार्या ह्या खलनायिकेने आपली एका मागोमाग एक क्रुष्णक्रुत्ये चालूच ठेवली होती. हाच अंधारमार्ग असावा अपुला स्वप्नांचा बंगला मधील नायिका कम खलनायिका अंकीताने लाज वाटतील असे अनेक उपद्व्याप करुन सजवला (?) होता!

दूरदर्शन सारख्या माध्यमातून खलप्रव्रुत्तीना हे असे महत्व व प्राधान्य मिळावे आणि नायक, नायिकांपेक्षा खलनायिकांच्या खांद्यांवर मालिकांचे यशापयश ठरावे, हीच दुर्दैवाने आजची वस्तुस्थिती आहे!

थोडक्यांत काय, अब जमाना बदल रहा है!........

धन्यवाद
सुधाकर नातू

ता. क.
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडून........
असेच वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........

https://moonsungrandson.blogspot.com

हा लेख पसंतीस आला तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....
I have you tube channel:
moonsun grandson
With over 50 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा