शनिवार, ६ फेब्रुवारी, २०२१

"वाचा, फुला आणि फुलवा-३":


"वाचा, फुला आणि फुलवा-३":
नववर्षाचा एक संकल्प म्हणून मी वाचलेल्या निवडक पुस्तकांचा रसास्वाद सादर करत आहे. आतापर्यंत "अबीर गुलाल" "झिम्मा" आणि "युगांत" इ.इ. पुस्तकांचा परामर्ष घेऊन झाला. आता हे पुस्तक:

"अचूक निदान' तर आरोग्य प्रदान":
डाँ. रवी बापट लिखीत 'अचूक निदान' हे पुस्तक हाती आले अन् ते वाचता वाचता, प्रथम आठवले की, ह्याच पुस्तकाच्या प्रकाशनसमारंभासाठी मला डाँ. साहेबांनी मला आमंत्रण देताना 'त्यामध्ये माझाही उल्लेख आहे' असे सांगितले होते ते ! काही कारणाने मी मात्र त्या समारंभाला जावू शकलो नव्हतो. सहाजिकच मोठ्या उत्सुकतेने व उत्साहाने मी पुस्तक वाचले.

कोणताही आजार बरा करण्यासाठी, त्याचे अगदी अचूक निदान होणे किती नितांत गरजेचे असते, ते प्रत्यक्ष अनुभवांतील विविध उदाहरणांचा दाखला देवून, ह्मा वाचनीय पुस्तकांत प्रभावीपणे मांडले गेले आहे.

रोग्याबरोबरचा दुखण्यासंबधीचा, त्याच्या मनाचा मागोवा घेत, केलेला मनमोकळा संवाद, नंतर त्याची आमूलाग्र शारिरीक तपासणी आणि शेवटी गरजे प्रमाणे चांचण्या करणे ह्या क्रमाने, सुयोग्य उपचार-निदान पद्धत सध्याच्या आरोग्यक्षेत्राच्या व्यापारीकरणांत कशी डावलली जाते आहे, त्याचेही विषण्ण करणारे चित्रण येथे आहे. ही अचूक निदान करणारी रीतच सातत्याने वापरून डॉ. बापटांनी, नाना तर्हेच्या दुर्धर व्याधीग्रस्तांना कसे बरे केले ते येथे समजते.

माणसाच्या शरीररचनेची गुंतागुंत आणि सर्वपरिचित दुखण्यांची कारणे व उपचार ह्यांचेही धडे वाचकाला पुस्तकातून मिळतात. 'Hit and Miss चा लपंडाव' करत रोग्याची प्रयोगशाळा बनवणार्या आजच्या जमान्यांत, डॉ. रवी बापटांसारखे अत्यंत प्रामाणिक, ध्येयवादी, सेवाभावी आणि निष्णात धन्वंतरीचे अनुभवाचे हे बोल खरोखर सर्वांनीच वाचावेत असेच आहेत. उगाच नाही केवळ तीन महिन्यांत 'अचूक निदान' पुस्तकाच्या तीन आव्रुत्त्या निघाल्या! सरते शेवटी, एक रोगी म्हणून नव्हे तर, एक हौशी ज्योतिषी मित्र म्हणून, माझा यथोचित उल्लेख मला पुस्तकात, अखेर १५७ व्या पानावर सापडला ! सुखद धक्का बसून, माझे मन भरून आले.

अखेरीस म्हणावेसे वाटते की, 'सर्वसाधारणपणे कोणीही डाँक्टर, माणसाच्या वर्तमानांतील दुरावस्थेचे अचूक निदान करण्याचा प्रयत्न करत, त्याला योग्य ते उपचार करत, बरे करण्यासाठी झगडतो, तर ज्योतिषी माणसाचे भूत, वर्तमान जाणत भविष्यातील अवस्थेचेही चित्र यथामती त्याच्यापुढे उभं करण्याचा प्रयत्न करतो'.

थोडक्यात,
वाचाल, तरच वाचाल!:
मराठी सम्रुद्ध होण्यासाठी जास्तीत जास्त माणसांनी वाचनाचा छंद मनापासून जोपासायला हवा. वाचनाच्या माझ्या छंदाला सहाय्य करण्यासाठी, मी विविध स्रोत तपासून काही वाचनीय पुस्तकांची माहिती गोळा केली:
लेखक: मिलिंद जोशी- 'प्राचार्य'
लेखक:ना. धो. मनोहर: वास्तुपुरुष
लेखक: ,शरदच़ंद्र चिरमुले: 'वास्तुपुरुष श्रीनिवास खळे: अंतर्यामी सूर गवसले'.
रवी अभ्यंकर: पन्नाशीचा भोज्जा
जयंत नारळीकर: 'चार नगरांतले माझे विश्व
सुरेश जाखडे: 'समर्थ चिंतन',
राघवेंद्र भीमसेन जोशी: गाणार्याचे पोर
नरेंद्र चपळगांवकर: 'मनांतली माणसे
रामदास फुटाणे: मुक-संवाद'
'मंडालेचा राजबंदी': अरविंद व्ही गोखले
'उन्हांत बांधलेली घरे' :संध्या देवरुखकर
झगमगत्या दुनियेत: सुधीर गाडगीळ
कुणा एकाची भ्रमणगाथा: गो. नी. दांडेकर
प्रथम पुरुषी एकवचनी: पु भा भावे
जीवलग: विजय पाडळकर
टिवल्या बावल्या: शिरीष कणेकर
जीनियस: अच्युत गोडबोले
कार्यमग्न: अनिल अवचट
आठवणींचे असेच असते: अरुण शेवते
अध्यात आणि मध्यात: हेमंत कर्णिक
अन्यथा: गिरीश कुबेर
विरामचिन्हे: वि.वा. शिरवाडकर-कुसुमाग्रज
काही आंबट, काही गोड: शकुंतला परांजपे
मुंबई, ब्रिटिशांपूर्वीची: माधव शिरवळकर

ह्या व्यतिरिक्त, आवर्जून वाचावीत, अशी ही तीन पुस्तके योगायोगाने माझ्या वाचनात आली:

१. 'जगले जशी':
लेखिका: लालन सारंग,
२. 'साहित्यिकांचे अंतरंग':
लेखिका:रत्नप्रभा जोशी.
३. 'एका स्टुडिओचे आत्मव्रुत्त': लेखक:प्रभाकर पेंढारकर.
रंगभूमी, चित्रपट आणि साहित्यविश्वातील आंबट ग़ोड जीवनानुभवांचं अनोखे दर्शन, ह्या तीन पुस्तकांच्या वाचनांतून तुम्हाला घडेल.
ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांनी ही पुस्तके जरुर वाचावीत.

"वाचा, फुला आणि फुलवा !

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच उत्तमोत्तम ललित लेख वाचण्यासाठी.....
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडा:

http//moonsungrandson.blogspot.com

हा लेख आवडला तर......
ही लिंक शेअरही करा......

ह्या शिवाय.....
I have you tube channel:
moonsun grandson
With over 50 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा