गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

" वाचा, फुला आणि फुलवा-६": "आत्मसमाधानाचे रहस्य":

 "वाचा, फुला आणि फुलवा-६":


हल्ली कॅलेंडरचं अथवा दिनदर्शिकेचं एवढं काही महत्त्व उरलेलं नाही. येऊन जाऊन भिंतीवरती, एक "कालनिर्णय" असलं की झालं ! अशी किती तरी बरीच विविध कॅलेंडर्स आता निघाली आहेत. त्याकडे आपलं फक्त सण, मुहूर्त वा गरजेच्या सुट्ट्या कधी, संकष्टी विषयक माहितीसाठी
आपण फक्त प्रत्येक महिन्याचे पुढचं पान,
बघतो. त्याच्या पाठीमागच्या पानांकडे आपलं सहसा लक्षच जात नाही, असा माझा तरी अनुभव आहे.

मागील लेखात कालनिर्णय २०२० मधील विशेष लेखांचा रसास्वाद मी मांडला होता. आणि आता कालनिर्णय २०२१ ह्या दिनदर्शिकैमधून मला विशेष आवडलेल्या लेखांतून, काय गवसते ते मी ह्या लेखांत मांडण्याचा माझ्या परिने प्रयत्न करत आहे

"कालनिर्णय २०२१":

१ "भल्या माणसासाठी":
श्री ज्ञानेश्वर मुळे

हा लेख हा लेख वाचल्यानंतर त्यामधून मला काय गवसले त्याच प्रमाणे माझ्या मनात कोणती स्पंदने निर्माण झाली यांचा एकत्रित विचार येथे मी केला आहे.

"भला माणूस" खरोखर कसा असतो, ते चित्र "कथा", "रजनीगंधा" व "छोटीसी बात" ह्या चित्रपटांतील सरळमार्गी नायकांच्या रूपाने, रंजकपणे लेखकाने येथे उभे केले आहे.

सर्वसाधारणपणे सरळमार्गी, प्रामाणिक माणसं पुष्कळ वेळेला पापभिरू असतात. आपण बरे आणि आपले काम बरे, अशा तऱ्हेची त्यांची वृत्ती असते. अशी भली माणसे मात्र एकंदर जीवनात, इतरांवर प्रभाव पाडू शकत नाहीत, नेतृत्व दाखवू शकतातच असे नाही. नेतृत्व किंवा अधिकार गाजवायचा असेल, तर त्याकरता वेगळे असे व्यक्तिमत्व लागते. तिथे "ठेविले अनंते तैसेची रहावे" अशा तर्‍हेची प्रवृत्ती असून चालत नाही.

भल्या माणसाचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे किलिंग इन्स्टिगचा अभाव, तोडू या फोडू या वृत्तीचा अभाव. प्रामाणिकपणाचा, शिस्तीचा व सचोटीचा दंश यांना आयुष्यभर पुरतो. पण त्यामुळे अधिकार पद किंवा सरसेनापती पद मिळू शकते असं नाही. त्याकरता वेगळेच गुण असावे लागतात. भला व चांगला माणूस व्यावहारिक
जीवनात यशस्वी होतोच असे नाही.

यासंबंधी एक नामवंत राजनीतिज्ञ इटालियन निकोलो मेकीवँली याने १५५३ चालली लिहिलेल्या त्याच्या पुस्तकात राजा होऊ इच्छिणाऱ्या भल्या लोकांना मार्गदर्शन केले आहे. आपला जसा आर्य चाणक्य त्याचे जसे सामूहिक आणि वैयक्तिक राजकीय आणि इतर तत्त्वज्ञानाचे वेगवेगळे मार्गदर्शक पथदर्शक असे तत्त्वज्ञान, त्याचप्रमाणे मॅकीवँली याचं जे तत्व, त्यासाठी मँकीवँलीयन शब्दप्रयोग वापरला जातो. जे काही नियम किंवा चिंतन त्याने केले त्यातील काही मुद्दे खरोखर विचारात घेण्यासारखे आणि आश्चर्यकारक असे आहेत:

१ इतरांना तुमच्याविषयी भीती आणि प्रेम दोन्ही वाचणार नसेल, तर भीती वाटणे चांगले.
२ राजकारण व राजनीतीचा नैतिकतेशी काही संबंध नाही.
३ आकांक्षा मोठ्या असतील तर तुमच्या समस्या मोठ्या असू शकत नाहीत.
४ ज्याला अधिकार हवा असेल त्याला अधिकार गाजवता आला पाहिजे.
५ राज्यकर्त्यांच्या बुद्धिमत्तेची पहिली कसोटी त्याच्या आजूबाजूच्या सल्लागारांवरून कळते...
इत्यादी, इत्यादी

त्याचे असेच इतर नियम या लेखामध्ये वर्णिलेले आहेत आणि ते म्हणजे खरोखर समूह जीवनाला किंवा एखाद्या शासन व्यवस्थेला व्यवस्थित हाताळायचं असेल तर काय कराव लागतं ते मार्गदर्शन आहे. त्यातील एक शेवटचे त्याचे निरीक्षण डोळ्यात अंजन घालणारेच म्हणावे लागेल: "कोणत्याही राजाला आश्वासनांची पूर्ती न करण्यासाठी किंवा वचनभंग करण्यासाठी कोणत्याही कारणांचा तुटवडा पडत नाही." हे !

सर्वसामान्यांच्या जीवनापेक्षा वेगळ्या प्रकारचे असे जीवन या धोरणी चतुर कावेबाज माणसांचे असते. तशी माणसेच कदाचित समूहावर समाजावर प्रभाव पाडू शकतात आणि अधिकार पद त्यांनाच मिळू शकते. सर्वसामान्यांच्या आवाक्यात पलीकडचे हे सारे आहे. चांगुलपणा हा जणू काही आजकालच्या दिवसात नष्ट होत चालला आहे. एकंदर कलियुगाची जी काही मांडणी आहे, त्या वास्तवतेचे जणू हे वरील चिंतन किंवा नियम दिसते.

या पार्श्वभूमीवर पार्श्‍वभूमीवर वास्तवता इकडे जर बघितले तर असे लक्षात येते की, आदर्श असे जे वाटते, ते प्रत्यक्षात आणणे खरोखर कठीण असते हे नाकारता येणार नाही. मात्र एकंदर सर्वांगीण जनहितासाठी चांगुलपणा आणि उत्तम प्रशासन, तसेच योग्य त्या नीतिमत्तेची आवश्यक आहे यात वाद नाही.

भल्या माणसाचा हा असा ऊहापोह या लेखात केला आहे. भला माणूस बनणे तसे सोपे नाही. शक्यतोवर आपल्यामुळे आपल्या कृत्यांमुळे इतरांना जरी फायदा होत नसला, तरी इतरांना त्रास होऊ नये, एवढे तारतम्य जर सर्व समाजाने माणसांनी पाळले, तर कदाचित आदर्श असे एकंदर आपले स्वप्न प्रत्यक्षात यायला मार्ग दिसू शकेल. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे खूप कठीण आहे एवढेच शेवटी म्हणावयाचे.

२ "शिकवणी कोरोनाची":
दत्तप्रसाद दाभोळकर

कोरोना, या बकासूर वा भस्मासुररुपी संकटाने २०२० ह्या भयानक वर्षात जगावर जे काही संकट आणले, त्याचा उहापोह इतका काही झाला आहे की अजून काही नव्याने सांगण्यासारखे आहे की नाही असे वाटावे. कोरोनाचे जसे दुष्परिणाम झाले त्याचप्रमाणे त्यापासून काही धडे मिळाले आणि जवळजवळ प्रत्येकानेच त्यादृष्टीने आपल्यामध्ये सुधारणा केली हे आपण पाहत आहोतच.

या महत्वपूर्ण लेखा मधलं मला जर काही घ्यावस आणि वेगळं वाटत असेल तर ते म्हणजे लेखकाने तुकोबांच्या एका अभंगाची केलेली आठवण. "तरी बरे" अमूक वाईट नाही घडले" ह्या अर्थाचा तो अभंग आहे. त्याचा मतितार्थ असा की, जे जे काय घडलंय ते जरी वाईट असलं तरी याहून अधिक काहीतरी वाईट घडलं नाही, हे किती चांगलं हा. तो संदेश "तरी बरं", कोरोनामुळे फक्त प्रत्यक्ष आमने-सामने संपर्क आला, तरच काही बाधा होण्याची शक्यता निर्माण होत होती, पण समजा टेलिफोन घेताना, एकमेकांचे आवाज ऐकून, टीव्ही बघताना त्यामधून जर या भस्मासुर रूपी विषाणूचे संक्रमण झाले असते तर...? असा तो प्रश्न.

ह्याचा मतितार्थ, म्हणजे काय घडलं ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं आहे. निदान अजून वाईट काय निर्माण झालं असतं ते तर झालं नाही ना, असा तो विचार. उदाहरण: एखाद्या माणसाची वाचा जाते आणि अचानक त्याला दुःख होते. परंतु तो विचार करू शकतो, ठीक आहे मला बोलता येत नाही, पण मी स्वतंत्र हिंडू फिरू शकतो बघू शकतो, माझे रोजचे आवश्यक व्यवहार कोणावरही अवलंबून न रहाता, करू शकतो, असा तो विचार.

थोडक्यात, जे आहे त्यात समाधान माना हा मुद्दा या तुकोबांच्या अभंगाच्या रूपाने "तरी बरं" या रुपाने या लेखात मांडला आहे आणि तो खरच मनात कायम लक्षात ठेवण्याजोगा आहे.

हा लेख वाचल्यावर योगायोगाने मला
एक एक छानशी व्हिडिओ फिल्म सोशल मीडियावर बघायचा योग आला:

"त्यात एक मांजरी गॅलरीच्या बाजूला टेबलावर बसली आहे आणि तिच्या बाजूला खाली जमिनीवरून एक छोटे मूल गॅलरीच्या कठड्यावर जायचा प्रयत्न करत, दांडीवर हात ठेवून पुढे पुढे वर जाण्याची धोकादायक प्रक्रिया करत आहे. अशा वेळेला त्या मांजरीचे लक्ष कायम त्या छोट्या बाळाकडे, मुलाकडे जाते आणि त्याने गॅलरीच्या लोखंडी दांड्यावर हात ठेवला रे ठेवला, की ती ताबडतोब तो पुढे होऊन त्याला बाजूला करत असे. एवढेच काय तो जास्त धडपड करायला लागल्यावर तर ती मांजर दांडीच्या वरती स्वतः उभं राहून त्या बछड्याने पुन्हा सुरक्षित रहावं, म्हणून त्याचे हात बाजूला करून त्यांना खाली पाठवत असे."

हे द्रुश्य खरंच विचार करण्याजोगे. कशी गंमत आहे, धोका पुढे आहे, त्या धोक्यापासून सावध राहिले पाहिजे, ही उपजत प्रेरणा मुक्या प्राण्यांना देखील असते. एवढेच काय पण निष्पाप अशा त्या मुलाला, जगाची कल्पना नसल्यामुळे तो जी धडपड करतोय ती बघून, या मांजरीला वाटते की त्याला आपण वाचवावे ! हीच तर गंमत आहे. कोरोना सारखे संकट येऊन सुद्धा माणसाच्या याच उपजत प्रवृत्तीमुळे तो या महासंकटावर मात करत मार्ग शोधत राहिला. हा एक प्रकारचा नवाच धडा आपल्याला मिळाला.

३ "पत्ते आणि निसर्ग":

खेळातले पत्ते घेऊन आपण लहान थोर नेहमी टाईमपास किंवा विरंगुळा म्हणून विविध प्रकारचे पत्ते खेळतो. त्यामुळे वेळ तर जातोच, शिवाय एकंदर परस्पर संबंध अधिक दृढ होत जातात. आता हे ५२ पत्ते आणि दोन जोकर या मागे निसर्गाचा काही संबंध आहे, असं निदान मला तरी इतके दिवस माहित नव्हतं. परंतु या 'कालनिर्णय'२१ मध्ये मला एक अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिलेली आढळली. लेखक कोण ते लिहिलेलं नाही. परंतु त्यातून आपल्याला खूप खूप काही नवं असं समजतं हे खरं.

आता निसर्ग आणि पत्ते यांचा काय संबंध आहे ते बघा. साधारण प्रत्येकी तीन रंगीत पत्ते राजा राणी गुलाम, बदाम इस्पत सिल्वर किंवा चौकट अशा प्रकारात असतात व ते १२ आणि दुर्री ते दश्शी असे ४० मिळून, एकूण ५२ पत्त्यांचा संच तयार होतो. बदाम आणि चौकट या चिन्हांचा रंग लाल तर इस्पिक व किलवर यांचा काळा असतो. शिवाय संपूर्ण संचात दोन जोकर असतात.

हे 52 पत्ते म्हणजे निसर्गाशी काय समतोल साधतात, ते बघा किती गमतीशीर आहे. हे 52 पत्ते म्हणजे वर्षभरातील 52 आठवडे, तर चार प्रकारचे पत्ते म्हणजे चार ऋतू जसे शिशिर, उन्हाळा, वर्षा किंवा पावसाळ आणि शरद. प्रत्येक ऋतूचे 13 आठवडे म्हणजे प्रत्येक प्यकारातले १३ पत्ते. या सर्व पत्त्यांचे बेरीज केली तर भरते ३६४ यात एका जोकर धरला तर ३६५ अर्थात ते एक वर्ष होते. यात दुसरा जोकर मिळावला तर होतात ३६६. म्हणजे लीप वर्षाचे ३६६ दिवस ! एकूण ५२ पत्त्यांमधले १२ चित्रपत्ते म्हणजे बारा महिने. लाल आणि काळ्या रंगांचे संच, म्हणजे दिवस आणि रात्रीचे प्रतिनिधित्व करणारे रंग ! कमाल की बात आहे, नाही कां?

ज्या कोणी अनामिक माणसाने ही खेळांतील पत्त्यांची अजरामर संकल्पना मांडून प्रत्यक्षात आणली, त्यांना लाख लाख प्रणाम !

पुढे जाऊन अजून एक नवल वाटावी अशी माहिती येथे आहे. ती म्हणजे श्री शंकर महाराज यांना देखील पत्याची आवड होती. त्यांनी पत्त्यांचे जे विश्लेषण केले किंवा अर्थ सांगितला तो अक्षरश: सार्या भवतालाचि वेध घेणे होय:

"दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश, तिर्री म्हणजे ब्रम्हा विष्णू व महेश, चौवी अर्थात चार वेद अथर्ववेद सामवेद ऋग्वेद यजुर्वेद. पंजी म्हणजे पंचप्राण प्राण अपान व्यान उदान समान छक्की म्हणजे अर्थात षड्रिपू काम क्रोध मद मोह मत्सर लोभ. सत्ती, सात सागर, अठ्ठी, आठ सिद्धी. नव्वी, नवग्रह. दश्शी दहा इंद्रिये, तर गुलाम म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या वासना इच्छा. तर राणी म्हणजे माया, तर राजा सर्वांचा शासक, आणि hold your breath, सगळ्यात कडी म्हणजे एक्का अर्थात मनुष्याचा विवेक, माणसाची सारासार बुद्धी या सर्व खेळाला स्वाधीन ठेवणारा एक्का. तर समोरचा भिडू म्हणजे प्रारब्ध, त्याच्या हातातले पत्ते आपल्याला माहित नसतात, पण त्याच्या मदतीने आपण डाव जिंकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच जीवन जगतो. खरंच पत्त्यांचा डाव इतक्या वेळा खेळलो, पण त्यामागे हे असे जीवन म्हणजे काय निसर्ग म्हणजे काय ते उमजले.

ज्या कोणी हे खेळातले पत्ते निर्माण केला, त्याचे अभिनंदन व आभार कितीही वेळा केले तरी ते कमीच पडेल. त्या अनामिकाला लाख लाख प्रणाम. तीच क्रुतज्ञता कालनिर्णय सारखे जगातील सर्वाधिक खपाचे नियतकालिक निर्मिणार्यांसाठी.

ह्या वैचारीक अम्रुतमंथनामुळे अखेरीस मला उमजलेले......

"आत्मसमाधानाचे रहस्य":
जे आपल्याला आवडते, जे आपण चांगले करू शकतो, ते करायला मिळणे हे भाग्यच. अशा भाग्यामुळे, जे आत्मसमाधान लाभते ते अद्भुतरम्यच!

"पसंद अपनी अपनी" प्रमाणे ज्याने त्याने वरीलप्रमाणे आत्मपरीक्षण करून
आपआपला मार्ग निवडावा, म्हणजे श्रेयस व प्रेयस एका समयीच लाभते."

धन्यवाद
सुधाकर नातू

ता. क.

माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडून........
असेच वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........

https://moonsungrandson.blogspot.com

हा लेख पसंतीस आला तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....
I have you tube channel:
moonsun grandson 
With over 50 interesting videos uploaded so far........
To see them......... 
pl. this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा