"ह्रदयसंवाद-35": "हरवले, ते गवसले !":
हरवलेली वस्तू मिळेल कां, मिळाली तर ती कुठे शक्यतो मिळेल, हे समजण्यासाठी काहीतरी मार्ग असतो. पंचांगात बघून, कुठल्या बाजूला एखादी हरवलेली गोष्ट आहे ती मिळेल की नाही, कधी मिळेल ह्याची काहीतरी कल्पना येऊ शकते. पण मला तर त्या विषयी काहीच माहिती नव्हती.ह्या पार्श्वभूमीवर माझी पुण्यातील महत्वाचे फोन नंबर असलेली छोटी डायरी हरवली होती. ती शोधण्याचा मी खूप प्रयत्न करत होतो. पण व्यर्थ.
माझ्या ड्राँव्हरमधून मी काही नोंदी, नव्या कल्पना, हातावेगळी करायची कामे ही नोंद करण्यासाठी मी नेहमी कोचवर जिथे बसतो, तिथे हाताशी ठेवत असे व जमेल तेव्हा त्यांत लिहितही असे. पुढे काही दिवस गेले.
दररोज सकाळी चहा पिताना मला नेहमी काहीना काही वाचायला लागते. दिवाळी अंक, मासिके वर्तमानपत्र अशा प्रकारचं साहित्य हाताशी घेऊन, एकीकडे गरम गरम चहाचे घुटके घेत मी वाचत असतो. 'त्या' दिवशी काय झाले कोणास ठाऊक; मला वाचण्यासाठी काहीच पेपर वि अंक दिसला नाही, म्हणून माझी ही आताशी येणारी, डायरी हातात घेतली आणि चहा पिऊ लागलो.
गंमत अशी की, पहिलेच पान उघडल्यावर तिथे मला फोन नंबर आणि नांवे लिहिलेली दिसली. पहिली चार-पाच पानं भरून हा सारा नोंदीचा ऐवज दिसला. म्हणजे माझ्या ह्या फोननंबरच्या ज्या नोंदी होत्या, ती प्रुष्ठे सोडून मी त्या पुढच्या पानांपासून मी लिहीणे सुरू केले होते. हे इतके दिवस करताना माझे ह्या फोन नंबर्सच्या माहितीकडे लक्षच गेले नव्हते ! सहाजिकच अचानकपणे, हरवलेली आपली डायरी मिळाली याचा आनंद अवर्णनीय होता. "तुझे आहे तुजपाशी, परि जागा तू चुकलाशी" असं म्हणतात ते खोटं नाही. पंचांग न बघताच, मला माझी हरवलेली मिळाली होती.
अगदी असाच अनुभव मला लाँकडाऊनच्या काळात आला होता. मी खबरदारी म्हणून घराच्या बाहेर न जाता, महिनोन्महिने घरातच फेर्या मारुन आवश्यक असलेला चालण्याचा व्यायाम करत असे. एक दिवस माझ्या भाच्याने माझी ख्याली खुशालीची चौकशी करताना म्हटले होते, "मामा, तू सकाळी फिरायला जाताना कोवळ्या उन्हात थोडा वेळ उभा रहातोस ना? त्यामुळे डी जीवनसत्त्व मिळते आणि immunity अर्थात प्रतिकार शक्ती सुधारते."
तो हे बोलल्यानंतर दुसर्याच दिवशी सकाळी, माझे आमच्या खोलीत खिडकीजवळ उभा राहिल्यावर अचानक लक्ष गेले ते खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हाकडे !. मला आवश्यक असलेली ही इतकी जवळ मला उपलब्ध होती की आणि दुर्दैवाने मी आपला तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत होतो ! नववर्षापासून मी खाली सोसायटीच्या बागेत फिरायला जाऊन आल्यावर वा जाण्यापूर्वी, घरातच खिडकीपाशी दहा पंधरा मिनिटे बसून ती कोवळी उन्हे अंगावर घेत असतो, एक मौल्यवान खजिनाच गवसल्याचा आनंद मिळवत रहातो. "तुझे आहे तुजपाशी" हेच खरे नाही कां?
लॉक डाऊन च्या काळातला असाच अजून एक अनुभव. आमच्या सोसायटीत एक चांगली बाग आहे, याची जाण ह्याच काळामध्ये आम्हाला अचानक झाली. सभोवताली उंच अशी मजबूत झाडे, त्याच प्रमाणे वेगवेगळी फुलझाडे अशा तर्हेची चौकोनी बाग इतकी वर्ष दुर्लक्षितच होती. इथे अगदी मोजकीच मंडळी कधीतरी फिरत असत.
आम्ही मात्र नेहमी घरापासून थोड्या दूरवरच्या मोठ्या बागेत सकाळी फिरायला जायचो किंवा सभोवतालच्या परिसरात रस्त्यावर फिरायचो. परंतु लाँकडाऊनच्या काळात बाहेर जास्त जायचं नसल्यामुळे, कुणाला तरी हे लक्षात आलं की या बागेला चांगलं रूप देता येईल. त्याप्रमाणे लवकरच सुधारणा करून भोवताली ज्याला जुजबी जाँगींग ट्रँक म्हणता येईल, असा फिरण्याचा चौकोनी मार्ग तयार झाला. या बागेचं वैशिष्ट्य इतके दिवस आम्हा बहुतेकांच्या कसं काय दुर्लक्षित झालं ! बागेत अगदी बरोबर मधोमध डेरेदार वडाचं झाड देखील होतं की !
कमाल आहे खरंच माणसं, किती वेगवेगळ्या गोष्टी आपल्यापाशी असूनही त्या बघत नाहीत आणि मोठ्या संधीला मुकतात, त्याचा हा अनुभव. तेव्हापासून सकाळी अथवा संध्याकाळी ह्याच बागेमध्ये जमतील तशा मारून आमचं आरोग्य रक्षण करायचा प्रयत्न सुरू केला आहे. Better late than never. "तुझे आहे तुजपाशी" हे मी जे म्हणतो किंवा "हरवले ते गवसले" असं जे मला तुम्हाला सांगायचय ते हे उदाहरण.
जे जेव्हा घडायचे असेल, तेथे तेव्हा ते केव्हाही घडू द्या. जे काही घडेल तेव्हा, ते खुल्या दिलाने जसेच्या तसे स्वीकारा. ना खंत ना खेद अशी वृत्ती असू द्या. शक्यतोवर मनातील विचारांचे भेंडोळे दूर करून त्यापासून पूर्ण मुक्त व्हायचा प्रयत्न करा. ताणतणाव अपेक्षांचे ओझे त्यामुळे दूर होऊ शकेल. शक्यतोवर कमीत कमी विचार मनात यावेत. जे विचार मनात येतील ते सर्व बोलून दाखवू नयेत, तारतम्याने निवड करून मगच बोलावे. शक्यतो सकारात्मक नवनिर्मितीच्या मार्गाने जाणारे विचार करावेत. त्याप्रमाणे कृती व्हावी. असे जर तुम्ही वागलात, तर तुमचं तुम्हाला समाधान व शांती मिळू शकेल. या सगळ्या अनुभवांमधून मला जे काही गवसले ते हे असही.

खरंच बऱ्याच वेळेला, आपण आपल्याजवळ असलेली ही गोष्ट लक्षात घेत नाही, आयुष्यात जे आपल्याला मिळाले आहे, त्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो आणि नको तिथे आपले मन, नको त्या विषयांवर वेगवेगळी कल्पना किंवा आपल्या पाशी नसलेल्या गोष्टींबद्दल चिंता वा दुःख नाहक करत बसतो. तुमच्या जवळ काय आहे याचा विचार करावा, नाही त्या भलतीकडे मन जाऊच देऊ नये, असा धडा मी या दोन छोट्याश्या अनुभवांवरून घेतला.
नेहमी आपणही जवळ आहे त्यांत आनंद माना.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
असेच अनेक विचारप्रवर्तक लेख वाचण्यासाठी
माझ्या ब्लॉगची लिंक संग्रही ठेलवा......
अधूनमधून जरूर ती उघडा.......
http//moonsungrandson.blogspot.com
लेख आवडले तर.....
लिंक शेअरही करा..........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा