"माझा सोशल मिडीयावरील 'संसार'!-१ ":
आठवणींची गोडी मोठे गमतीशीर असते. आता सोशल मीडियावर सहभागी होऊन मला दहा वर्ष लवकरच पूर्ण होतील. त्यामुळे तेव्हापासून सोशल मीडियावर माझ्या स्वतःच्या वैचारिक कल्पना मांडायला मी सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत माझा ह्या माध्यमातून जो प्रगतीपर प्रवास झाला, तो आपल्याला अनेकानेक स्वतंत्र संदेश, ब्लॉगवरील लेख, विविध डिजिटल अंक आणि विडीओज् याद्वारे माहीत झाला आहे.आज सहज सर्फिंग करताना एक अंतर्मुख करणारा संदेश, माझ्या वॉलवर नजरेस
आल्यावरून कल्पना सुचली की, गेल्या दशकात ज्या संदेशांद्वारे आपण सोशल मीडियाचा हा वैचारिक संसार सुरू केला, त्यातील निवडक वेचक-वेधक विविध विषयांवरील असे संदेश, या लेखमालेचे द्वारे मांडावेत.
म्हणून हा पहिला प्रयत्न:
चुकभूल द्यावी घ्यावी !
१
"कुठे लंडन, कुठे शांघाय आणि कुठे मुंबई!"
खड्डयात गेलेले रस्ते, अपरंपार अनधिक्रुत बांधकामे, घाणीचे साम्राज्य असलेल्या झोपडपट्ट्यांचा विळखा, कचर्यामुळे रोगराई, नीट चालता न येऊ शकणारे फुटपाथ, अंधारी, असुरक्षित भुयारी रस्ते, नाहक बांधलेले निरुपयोगी स्कायवाँक, अपुरी दुर्लक्षित सार्वजनिक वहातूक, पार्कींगची जटील समस्या, जागोजागचे ट्रँफिक जँम, फेरीवाल्यांचे अडथळे, रिक्षावाल्यांचा हैदोस अशा अनेक तर्हेच्या मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबत जाणार्या समस्या, ह्यामुळे हया आर्थिक राजधानीची अवस्था from bad to worst अशी दुर्दैवाने, वेगाने होत आहे.
कुठे ते अप्रतिम लंडन आणि कुठे हे ब्रिटीशांनी प्रती लंडन बनविण्याचे स्वप्न पाहिलेले, तसेच इथल्या मतलबी राजकारण्यांनी, ज्याचे शांघाय बनविण्याचे 'गाजर' दाखविलेले हे मुंबई शहर! अधोगतीची किती ही परीसीमा !! दूरद्रुष्टिचा अभाव, फसलेले दिशाहीन नियोजन आणि अकार्यक्षम, गलथान अंमलबजावणी; हे कमी नाही म्हणून की काय भीषण भ्रष्टाचार आणि बोकाळलेला कामचुकारपणा ह्यापायी, आणखी दुसरे काय होणार होते?
(फेबु-१६-२-२०१७)
२
"नगरभक्षक?":
सन्मान्य अपवाद वगळता, अपेक्षित कामे न करता, केवळ 'मलिद्या'ची अपेक्षा बाळगून, 'सेवे'चे सोंग घेत सत्तेची हाव ठेवणार्यांना काय म्हणायचे? 'नगरसेवक' की 'नगरभक्षक'?
(फेबु-१६-२-२०१७)
३
Nobody is indispensable":
काळाच्या तात्कालिक गरजेप्रमाणे, काळाच्या ओघात, नेहमीच समर्थ पर्याय निर्माण होत असतात. Nobody is indispensable. अमूकच व्यक्ती पर्याय होईल, ह्याची कुणालाच कधीही खात्री देता येत नाही, आजवरचा इतिहास हेच सांगतो. भाबडी आशा बाळगण्याखेरीज, आपण काहीही करू शकत नाही. जे जे जसे जसे घडत रहाते, त्याचाच परीपाक उद्या घडत असतो आणि हे चक्र अव्याहतपणे चालू रहाणे हा निसर्गनियम आहे. अखेरीस, सुयोग्य परिस्थितीच अपेक्षित पर्याय पुढे आणते.
(Whatsapp-७-१-२०२१)
४
"नशिबाचा फेरा !":
"एखादा, काही वर्ष अक्षरश: डोक्यावर घेतला जातो, जिकडेतिकडे त्याचा उदोउदो होतो. परंतु बघता-बघता काळ बदलतो आणि डोक्यावर होता तो आता पायदळी तुडवला गेल्यासारखा, कुठेतरी अंधःकारमय दुनियेत फेकला जाऊन विसरलाही जातो......
घरी दारीही तोच अनुभव पहायला मिळतो. घरांमध्ये दोन तीन मुलं असली तर त्याच्यातला एखादा तरी फुकट जातो, बाकीचे थोडेफार यशस्वी होतात. म्हणजे उडदामाजी काळे-गोरे हा जो काही स्थायीभाव आहे, तो सातत्याने आपल्या नजरेस येतो...........
हे असं का होतं ते समजण्यासाठी......
ही लिंक उघडा...........
https://moonsungrandson.blogspot.com/2019/08/blog-post_8.html
हा लेख आवडला तर.....
लिंक शेअरही करा.......
(Whatsapp ३१-१-२०२१)
५
"नियतीचे खेळ!":
गरज ही शोधाची जननी, तशी वेदना ही नवनिर्मितीची, प्रतिक्षा ही फळाची, मीमांसा ही टीकेची, अन्याय वा उपेक्षा प्रतिशोधाची, बंधने ही मुक्ततेची, स्फूर्ती ही प्रतिभेची माता होय. देणे-घेणे, सोसणे-पुसणे, करणे-भरणे, रूसणे-हसणे, उमलणे-फुलणे-कोमेजणे असे नियतीचे खेळ हे सारे चालती अव्याहत!
(फेबु-१६-२-२०२१)
६
"सत्तेचे गुलाम !":
निष्कलंक चारित्र्य हा सार्वजनिक जीवनात प्रवेश व वावर करण्यासाठी प्रमुख निकष असणे अत्यावश्यक आहे. नितीमत्ता व प्रचलित कायदा ह्यामधील दरी जोपर्यत मिटत नाही, तोपर्यत सार्वजनिक जीवनातील तथाकथित नेते सत्ता सहजासहजी सोडणे अशक्य.
(Whatsapp १५-१-२०२१)
७
प्रत्येकाच्या कर्तृत्वाला मर्यादा असतात;
जो आपल्या मर्यादा जाणतो,
त्यालाच समाधान मिळण्याची शक्यता अधिक असते.
(Whatsapp १२-२-२०२१)
८
"उबग आणणारा पोरखेळ!"
"माझा होशील ना!" ह्या मालिकेत दादामामा आजारी पडल्यापासून सुरु झालेला, आदित्य व सई ह्यांचा एकमेकांवरील प्रेमाचा लपंडाव, काही केल्या संपता संपतच नाही. जोडीला डॉ सुयश व मेघना ह्यांच्या अधूनमधून लुडबुडण्याने, प्रेमाचा त्रिकोण की, चौकोनाचा पोरखेळ, किती लांबवत न्यायचा ह्यावर काही धरबंधच उरलेला नाही. अक्षरशः उबग आला ह्या मालिकेचा.
(फेबु-७-१-२०२१)
९
"चारोळी":
"अग्गबाई, सासूबाई !"
"नक्को ग बाई, नक्को ग बाई",
"पुरे ग बाई, पुरे ग बाई",
"ऐक ग बाई, ऐक ग बाई":
(Whatsapp १३-१-२०२१)
१०
"कसेही, काहीही"!:
बहुतेक मालिकांमध्ये सहसा काहीच घडत नाही, नुसता कसाही टाईम पास केला जातो. मध्येच केव्हातरी जरा झटका देतात इतकेच.
हे असे कसेही, काहीही पाहिले जाते?
Whatsapp ३-१२-२०२०)
११
"अर्थशून्य भासे मजला...!":
मराठी मालिकांमध्ये नेहमी तर्काला किंवा व्यवहारात अशक्य असेल किंवा कोणालाही मनाला पटणार नाही अशाच तर कां दाखवतात, काही कळत नाही.
"अग बाई सासुबाई" मध्ये इतकी वर्ष वैधव्य काढणारी असावरी, आपल्या मुलाचं लग्न झाल्यानंतर म्हातारचळ लागल्यासारखं अभिजीत यांच्या प्रेमात काय पडते आणि त्यानंतर त्यांचे काय काय खेळ चालतात खरोखर न पटणारेच. असंच "माझा होशील कां" मालिका चांगली रंगतदार बनत असताना, आदित्य आणि सई यांचं त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्त आश्रमात गेल्यापासून त्यानंतर जे जे काही घडत जात, ते केवळ मूर्खांचा बाजार असल्यासारखं आहै. त्याचे साहेब लोक त्याला काय बनवतात किंवा वेड्यासारखी सई, त्याने दिलेली भेट कचऱ्यात काय शोधत बसते, काही न पटण्याजोगे.
नावाजलेली "आई कुठे काय करते" ही मालिकेत देखील असंच काहीतरी होतं. आपला नवरा बाहेरख्यालीपणा करतोय, हे कळूनही अगदी कडेलोट होईपर्यंत असावरी, आप्पा व कांचन म्हणजे सासूबाईंना त्याचे काही प्रताप सांगायचं सोडून इतरच काही सांगत बसते हे पटत नाही. तसंच इतक्या हुशार सासूबाईंना देखील संजना आणि अनिरुद्धमध्ये काही अनुचित झालं असेल हे कळत नाही.
प्रेक्षकांना अक्षरशः संताप येईल, अशा तर्हेचा तमाशा, दाखवत बसणाऱ्या या मालिकांचा मला इतका उबग आला की, शेवटी मी सोशल मीडियावर एक संदेश प्रदर्शित केला, त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यामुळे टीव्हीवर काहीही दाखवलं जातं त्याची कल्पना येईल.
(Whatsapp २६-१०-२०२०)
१२
"संक्रांती" सारख्या
गोड गोड बोलण्याच्या सणाला "संक्रांत"
म्हणणे हे नवलच,
कारण "संक्रांत" म्हणजे नको असलेली त्रासदायक गोष्ट!
(Whatsapp १३-१-२०२१)
१३
संकटातूनही संधी मिळते असे म्हणतात ते खोटे नाही. कोरोनासारख्या महामारीच्या बिकट परिस्थितीत ऑक्सी मीटर आणि स्टीम इन्हेलर या उपकरणांना सुवर्ण संधी मिळाली. वाईटातून चांगले निघते ते असे.
(फेबु-१८-११-२०२०)
१४
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर
माझा एकहाती
लेखन प्रयत्न असलेला
प्रसिद्ध झाला....
१ 'हृदय संवाद'-५७ प्रुष्ठे
२'आजोबांचा बटवा'-५१ प्रुष्ठे
३ 'रंगांची दुनिया'-५० प्रुष्ठे
आणि
४ 'नियतीचा संकेत'-६८ प्रुष्ठे
असे विभाग.
मानधन फक्त रु.१००/- तेही.......
online अंक मिळाल्यावरच करावयाचे....
शिवाय
"Management Musings Digital issue"
हा अंक विनामूल्य खास दिवाळी भेट......
त्वरा करा...
लगेच प्रतिसादात आपला होकार व whatsapp no द्या.
धन्यवाद
सुधाकर नातू
Mb 982063265
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
(Whatsapp-१५-११-२०२०)
१५
" येणार ते दिन, कधी येणार ?":
सोशल मिडिया नाही, तर किती शांती, सामंजस्य अन् जिव्हाळा !
(Whatsapp ९-१-२०२१)
हा वैचारिक मसाला कसा वाटला?
ही वरात अशीच पुढे पुढे जाणार.....
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा