"वाचा, फुला आणि फुलवा-२":
सोशल मीडियावर आपल्याला खूप खूप काही अंगीकारता येईल असं आपण मिळवू शकतो, असा माझा अनुभव आहे. मात्र त्याकरता सोशल मीडियावरील आपण जे काही पाहतो, वाचतो त्याकडे योग्य त्या दृष्टीने पाहायची तयारी मात्र हवी. ज्याप्रमाणे पक्षी आपल्याला काय हवे ते बरोबर निवडून चोचीतून अचूक उचतात, त्याप्रमाणे आपल्याला सभोवताली सोशल मीडियावर जे-जे काही संदेश व माहिती दिसते त्याकडे बघायला हवं आणि नीरक्षीर बुद्धीने काय चांगलं काय उपयोगी काय मार्गदर्शक आणि काय अनुकरणीय असायला हवं ते ते. माझा नेहमी असाच प्रयत्न असतो. या पार्श्वभूमीवर नुकतीच एक अनुकरणीय शहाणपणाची संवय मला गवसली.जेव्हा, एखादा माणूस आपल्याला अपेक्षित असलेले निर्णय घेत नाही व क्रुती करत नाही, तेव्हा मनस्ताप होऊन ताणतणाव वाढतो. त्यामुळे आपल्या विचारांचे केंद्र, ती व्यक्ती आणि तिचे आपल्या द्रुष्टीने विपरीत असलेले वागणे हेच होऊन, आपण त्याच त्या विचारांच्या भोवर्यांत सापडतो. आपले ताणतणाव सहाजिकच असह्य होतील इतके वाढत जातात. परस्पर संबंधांतही कटूता येते. भांडण तंटे, वितुष्ट शत्रुत्व ह्या त्या नंतरच्या अनिष्ट गोष्टी असतात. अपेक्षा भिन्नता, स्वभावां प्रव्रुत्तींमधले फरक ह्या सार्याच्या मुळाशी असतात. व्यक्तिगत, व्यावसायिक जीवनांत हे तर पुष्कळदा असेच घडत असते, घडत रहाते आणि राहील. सामंजस्य, परस्पर सहकार ह्यांची नितांत गरज आहे, हेच खरे. हा महत्वाचा शहाणपणा कसा असतो, त्याचे उदाहरण म्हणून ही सोशल मिडीयावर मी वाचलेली गोष्ट आहे:
ही आदित्य बिर्ला यांची आठवण, तेथे मांडली होती. आदित्य बिर्ला हे अत्यंत यशस्वी उद्योजक आणि एका मोठ्या उद्योग समूहाचे प्रमुख आणि त्यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर त्यांच्या 'आदित्य बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज'ला यशाच्या शिखरावर नेलं. त्यांच्या एका आस्थापनामध्ये एका उच्च अधिकाऱ्याची काही चूक झाली आणि त्या कंपनीला खूप मोठा नुकसानीचा फटका बसला. त्यामुळे त्या अधिकाऱ्याची यथोचित विचारपूस करण्यासाठी आदित्य बिर्लांनी, त्याला भेटायला बोलावलं होतं. साहजिकच इतर सर्व अधिकारीवर्ग समजून चालला की, आता साहेब त्याची चांगली खरडपट्टी करतील आणि कदाचित त्याला कंपनीतून काढतील सुद्धा. परंतु झाले वेगळेच ! आदित्य बिर्लानी त्या अधिकाऱ्याला भेटण्यापूर्वी, आपल्या समोर एक पॅड आणि पेन ठेवले, शांतचित्ताने या अधिकाऱ्याचे विशेष गुण आणि आतापर्यंतचे त्याचे योगदान, ते एका पाठोपाठ एक नोंदवत कागदावर गेले. हे सगळं नीट अभ्यासल्या नंतरच त्यांनी अधिकाऱ्याला आपल्या कचेरीत बोलावलं.
अखेर ती मुलाखत झाली. मात्र त्या वेळेला त्या अधिकार्याला, आदित्यजींनी, ना कंपनीतून काढलं, ना काही जास्त वेडंवाकडं बोलले. कारण ह्या माणसाने आतापर्यंत खूप खूप काही कंपनी व समूहाला मोलाचे योगदान दिले आहे, हे त्यांना समजलं होतं. त्यांची ही अशी अभिनव समजुतीने समस्या हाताळण्याची पद्धत खरंच किती दुर्मिळ, किती अभिमानास्पद व कौतुकापद !
कुणाला त्याच्या काही चुकांबद्दल वाटेल तसे बोल, लावण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या एकंदर सर्व गुणांचा योगदानाचा आढावा घेऊनच आदित्य बिर्लासाहेब त्याच्याशी बोलणी करत. खरंच ही माणसांना हाताळण्याची पद्धत अतिशय उपयोगी अशीच आहे. कारण आपण जेव्हा असे नुकसान होते किंवा कोणी एखादा विचित्र वागतो, तेव्हा आपला राग उतू जाऊन, आपण तोल सोडून नको नको ते त्याला बोलतो आणि कदाचित चुकीची कृती करतो. ते होऊ नये, योग्य तो न्याय त्या व्यक्तीला मिळावा, म्हणून ही आदित्य बिर्ला यांची पद्धत खरोखर अनुकरणीय अशीच आहे. हे त्या गोष्टीचे सार.
ही शहाणपणाची कहाणी वाचल्यानंतर अचानक मला भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या बालपणीची एक गोष्ट मी कुठेतरी वाचल्याचे आठवले.
तो प्रसंग असा: एकदा ते वडिलांसमवेत आणि भावंडांसमवेत जेवायला बसले असताना, सर्वांना लक्षात आले की, आईने बनवलेल्या स्वयंपाकात काही ना काही तरी चूक होती आणि भाजी किंवा कुठलाच पदार्थ चांगला झाला नव्हता. त्यामुळे त्यांना वाटले की, आपले वडील आता आईला खूप ओरडतील. पण तसं काहीही त्यांच्या वडिलांनी केलं नाही. उलट जणू काही, काहीच घडलं नाही, रोजच्या सारखा चांगला स्वयंपाक झाला आहे, अशा अविर्भावात त्यांनी संपूर्ण भोजन केले. त्यानंतर आईलाही जेव्हा कळलं की, आज आपल्या अमुक पदार्थ नीट झाला नव्हता.
आपले वडील आईला कां रागावले नाहीत, असा प्रश्न मुलांनी केला, तेव्हा वडिलांनी जे उत्तर दिलं ते खरोखर अनुकरणीय आहे. ते म्हणाले की, "तुमची आई दररोज कष्ट करून, नेहमी आपल्याला चांगला स्वयंपाक मन लावून करून वाढते, हे मी कसं विसरु शकेन? एखाद्या दिवशी काही कारणामुळे स्वयंपाक जमला नाही, म्हणून त्याकरता तिला रागे भरणे योग्य नव्हे. म्हणून मी तो स्वयंपाक आनंदाने प्राशन केला."
खरंच किती मार्गदर्शक आणि अनुकरणीय असे हे दोन्ही अनुभव आहेत.
आपणही नेहमी कुणाला बोलण्यापूर्वी, रागवण्यापूर्वी सारासार विचार करावा आणि त्या व्यक्तीचे सर्व गुण आणि एकंदर सर्वांगीण योगदानाची जाण ठेवून, नंतरच शांतपणे तिने जी चूक केली किंवा जे आपल्याला आवडले नाही ते सोप्या सौम्य शब्दात सांगणे हितकर असते. त्यामुळे परस्परसंबंध तर बिघडत नाहीतच शिवाय त्या व्यक्तीलाही आपल्यात सुधारणा करायला हवी याची अधिक जाण येते. आपण जर वेडेवाकडे बोललो तर नंतर आपल्यालाच खंत वाटू शकते वा आपले ब्लड प्रेशर वाढू शकते. हे जसे खरे एका बाजूला, त्याच प्रमाणे तशा बोलण्यामुळे आपले परस्पर संबंध तुटू शकतात हेही खरे.
सोशल मीडियावर दररोज आपल्याला खूप खूप काही मिळू शकतं, फक्त त्याकरता दृष्टी हवी, विचारांची दिशा हवी आणि मोकळे मन हवे, तरच तुमच्याही असं काही ना काही पदरात पडू शकेल, हेच मला या लेखातून सांगायचे आहे
धन्यवाद
सुधाकर नातू
ता. क.
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडून........
असेच वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........
https://moonsungrandson.blogspot.com
हा लेख पसंतीस आला तर....
लिंक शेअरही करा.....
ह्या शिवाय.....
I have you tube channel:
moonsun grandson
With over 50 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. this link.........
https://www.youtube.com/user/SDNatu.
And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा