रविवार, ७ जुलै, २०२४

@बिंब प्रतिबिंब- वैचारिक जुगलबंदी !"

"बिंब प्रतिबिंब-वैचारिक जुगलबंदी !": सोशल मीडिया वरती विविध प्रकारच्या विचारांची देवाणघेवाण होत असते त्यातीलच ए आणि बी अशा दोन व्यक्तींमधील वैचारिक जुगलबंदी ही बिंब प्रतिबिंब अशा स्वरूपात पुढे दिली आहे आपल्यालाही ती विचार प्रवर्तक वाटेल अशी आशा आहे अर्थातच ही त्या त्या व्यक्तींची व्यक्तिगत मते आहेत: B: 😃🙋🏼‍♂️ *आज सर्व उपद्रवी, देशविघातक आणि गुंड प्रवृत्तीच्या , साधारण कुवतीच्या तथाकथित लोकप्रतिनिधींना त्यांच्या निंदनीय वागणुकीमुळे निलंबित केले गेल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात दर्जेदार कामकाज झाले आणि ते आत्ता पण चालु आहे. सादर केलेल्या सर्व विधायकांवर साधकबाधक चर्चा झाली, ज्या विरोधी सभासदांचे त्यांच्या सभ्य वर्तनामुळे निलंबन झालेले नाही त्यांनी त्यात उत्साहाने भाग घेतला, आपल्या परीने सरकारला सुचना केल्या, सरकारने त्यांचे विचार शांतपणे ऐकून घेतले आणि त्यावर प्रत्यक्ष भेटुन विचारविनिमय करण्याचे आश्वासन दिले. देश आणि जनहितासाठी संसद कशी चालावी याचा आज प्रत्यय आला. जय भारत.* 👍🏽 A : जे होऊन गेले, जे होत आहे तसे आजतागायत वर्तन झाले नव्हते. साधे निवेदन करण्याचे टाळणे हा पळपुटेपणा होता. B: 👆🏾👆🏾👆🏾👆🏾 *राजीव गांधीच्या काळातली ही घटना आहे. ६३ खासदारांना त्यावेळी अध्यक्षांनी निलंबित केले होते. याहुन महान घटना म्हणजे १९७५ साली इंदिरा गांधींनी संपूर्ण विरोधकांना नुसते संसदेतुनच बाहेर काढले नव्हते तर त्यांना अनेक दिवस तुरुंगात टाकले होते. अपुऱ्या आणि चुकीच्या माहीतीच्या आधारे निष्कर्श काढु नयेत. सत्य कधी लपत नाही.* A : जवळ जवळ तशीच मानसिकता दिसत, तीच पुनरावृत्ती सध्या होत आहे. B: *यात पण परत अज्ञान आणि अपुरी माहीती दिसुन येते आहे. दोन्ही संसदेचे स्वामित्व आणि अधिकार दोन्ही अध्यक्षांचे असतात. म्हणुनच ओम बिडला यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारली, निवेदन केले आणि जाच कमिटी स्थापन केली. गृहमंत्र्यांचा याच्याशी काहीही संबंध नसतो. एव्हढे होऊन देखील गरज नसताना सरकारतर्फे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी निवेदन केले. या प्रकरणी गृहमंत्री किंवा पंतप्रधानांनी निवेदन करण्याचे काहीच औचित्य नाही. चौकशी पुरी झाल्यावर संसदेत यावर सविस्तर चर्चा नक्कीच होईल आणि त्यावेळी हे सर्व विरोधक बाहेर पळुन जातील कारण निष्कर्ष चौकानेवाले असतील हे निश्चित, जरा धीर धरा.* B: *शाळेत बिघडलेले विद्यार्थी शिक्षकांपुढे त्यांच्या टेबला भोवती नाचून अर्वाच्च भाषेत घोषणा द्यायला लागले तर ते शिक्षक काय करतील? त्या बिघडलेल्या मुलांना वर्गाबाहेर अंगठे धरुन उभे करतील, तेच इथे झाले आणि यापुढेही होईल याची आशा आहे. हे गुंड देशविकासासाठी कुठलेही योगदान देऊ शकत नाहीत, हा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे.* A : हे प्रतिपादन हास्यास्पद आहे. ज्या मंत्र्यांचा संबंध नाही, त्यांना पुढे करणे हा जबाबदारी टाळण्याचा अट्टाहास. अंगाशी शेकले की लपायचे हा प्रकार, सर्वोच्च दोन नेत्यांकडून नेहमी घडत आला आहे. A : घुसखोरीची घटना कां घडली, त्याची जबाबदारी टाळल्यावर दुसरे काय घडणार? येथे 'शिक्षकांनी संबंधित जबाबदार महाशयांना उत्तर द्यायला भाग पाडणे अपेक्षित होते. B: 🙋🏼‍♂️ गृहमंत्र्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. उद्या राष्ट्रपतींनी यावर निवेदन द्यावे अशीही मूर्ख मागणी होईल. या गुंडांचे तमाशे देशाने खुप पाहीले आणि सहन केले. यापुढे ते होणार नाही. सरकारचा आक्रमक पवित्रा पाहुन ही मंडळी आता बिथरली आहेत. त्यांनी आज पंतप्रधानांची भेट मागितली. पंतप्रधानांनी सर्व पक्षीय फ्लोअर मॅनेजरांबरोबर संवाद साधला. यातुन काय निष्पन्न होते ते बघायचे. A : केवळ आणि केवळ निरंकुश सत्तेसाठी विधिनिषेधशून्य राजकारण करणाऱ्यांचा निषेध करावा तितका थोडाच. B: शिक्षकांपुढे "जबाबदार महाशय" नव्हते तर बिघडलेले गुंड होते. तरीही सुसंस्कृत शिक्षकाने हात जोडून विनवुन पाहीले व शेवटी बडगा उचलला. खरेतर यांना मार्शलांच्या हस्ते उचलुन बाहेर टाकायला पाहीजे होते. संसदेचे रुल बुक आहे. सर्व त्यानुसारच चालते. थोडक्यात बिघडलेल्यांना त्यांची जागा दाखवण्यात आली. जय हो. B: *देशविघातकांच्यावतीने निषेध करत रहावा, नैतिकतेच्या गप्पा मारत राहाव्यात, देशाला त्याकडे बघायला आता वेळ नाही आणि गरज पण नाही. जय हो.* 😂😂😂😂😂😂 B: *काँग्रेसचा सध्याचा महान तरुण नेता गेली काही वर्षे एका विशिष्ट उद्देशाने, आपल्या संरक्षक यंत्रणेला चुकवून, सातत्याने विदेशी जातो. जाॅर्ज सोरोस आणि कंपनी सारख्या भारतविरोधी बदमाषांशी हातमिळवणी करतो आणि हार्वर्ड, केंब्रिज सारख्या विद्यापीठातल्या डाव्या जहाल लोकांच्या मदतीने भारत विरोधी वक्तव्य करतो. यासंबंधीची जबाबदारी आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची आहे. कारण तो देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. पण ते संसदेत नसल्याने गृहमंत्री त्यांच्यावतीने निवेदन करु शकतात. अशा देशविघातक अॅक्टीविटींवर निवेदन करण्याची मागणी या गुंड मंडळींनी सरकारकडे कधी केली आहे का? आपली तरी तशी इच्छा आहे का? आपल्याला ते आवश्यक वाटते का? याचे उत्तर कोणीही देणार नाही.* A : नैतिकतेला कस्पटासमान समान मानणारे, देशविघातक कोण हे ठरवणार, ह्यासारखा विनोद नाही. Remember When Character is Lost, everything is LOST B: 😂😂😂😂😂😂 नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी देशविघातकांची बाजु घेऊन कॅरॅक्टर की काय ते सांभाळत रहावे, जागृत झालेल्या देशाला त्याची आता पर्वा नाही, गरज पण नाही. आज संसदेत पास झालेल्या विधेयकांत देशविघातकांची आणि आतंकवाद्यांची पहिल्यांदाच व्याख्या करण्यात आली आहे. आता ही मंडळी कायद्याच्या कचाट्यातुन सुटणार नाहीत. आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारला असा कायदा करण्याचा सल्ला दिला होता. जय हो. 👍🏽😂 B: *आज देशांत "तेलगु देसम" "बिजु जनता दल " यासारखे भाजप विरोधी पक्ष आहेत. ते संसदेत पण आहेत. त्यांची अनेक मुद्यांवरची मते भाजपपेक्षा वेगळी आहेत. ती ते सर्वत्र खुलेपणाने मांडतात. सरकार त्यांच्या सुचना आवर्जून विचारात घेते. कारण " ते देशाच्या विभाजनाची योजना, इच्छा, कारस्थाने करत नाही ". त्यामुळे त्यांना कोणीही कधीही "देशविघातक " म्हणत नाही. हा फरक आहे. आजच्या संसदेतल्या चर्चेदरम्यान त्यांच्या प्रतिनिधींनी आपली मते सविस्तरपणे मांडली. त्यांनी सुचवलेल्या सुधारणा सरकारने सहज स्विकारल्या. डाॅ. सन्मित पात्रा या BJD च्या खासदाराने खुप वेगळी भुमिका मांडली. सरकार पक्षाने त्याचे खुल्या मनाने स्वागत केले, कौतुक केले. असे हे गुंड करु शकतात का? त्यांना १० मिनीटे मुद्देसुद भाषण पण करता येत नाही. असो. याचा विचार करुन आपली शक्ती आणि वेळ घालवायची गरज नाही.* 😂😂😂😂😂 A 😇 "आजच्या महाराष्ट्र टाइम्स 'संवाद' पुरवणीमध्ये, सध्या गाजत असलेल्या खासदारांच्या घाऊक निलंबनासंबंधीचे विडंबनात्मक स्फूट वाचण्यासारखे आहे आणि ते डोळ्यात अंजन घालणारे आहे, एकाधिकारशाही फार दूर नाही, हे ध्वनीत करणारे !": 😇 B 🙋🏼‍♂️ *वाह् वाह् मस्तच. निलंबित खासदारांपैकी काही उपद्रवी गुंड तुरुंगाच्या वाटेवर आहेत. मजा पहावी नाहीतर अश्रु ढाळावे. ज्यांना विडंबनात्मक लिहिण्यासाठी आणि ज्यांना ते वाचण्यासाठी फावला वेळ आहे त्यांनी आपले आत्ममनोरंजन करत राहावे. देशाला यांच्याकडे बघायला वेळ नाही आणि कारण पण नाही. देशात सर्वागिण बदलाचे वारे वाहातच राहणार आहेत. जय भारत!* A: 😂😂😂😂😂😂 🤗 अंध भक्तगण किती एकांगी, पूर्वग्रह दूषित द्रुष्टिकोन ठेवून त्यांच्या छुप्या मनसुब्यांची पाठराखण करतात, ते ह्यावरून ध्वनित होते आणि हेच देशाचे दुर्दैव आहे !" Ii इत्य अलम् ii 🤗🤗🤗🤗🤗 A: देशांतर्गत जी मंडळी केवळ सत्तेसाठी धाकधपटशा दाखवून व इतर काही अनुचित माध्यमातून आपल्या विरोधकांना नमवून, आपल्या समवेत घेण्याचे राजकारण करतात, त्यांचे कसले व कां गोडवे गायचे? महाराष्ट्रातील उदाहरण अशोभनीय नव्हे काय? 🤗🤗🤗🤗🤗

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा