रविवार, ७ जुलै, २०२४

"छाप (पड)लेले शब्द-B !":👌

👍"प्रास्ताविक!":👌 छाप (पड)लेले शब्दांसमवेतची व्रृत्ते येथे upload करता आली नाहीत. परंतु त्यांच्या संदर्भातील निरीक्षणातून आपणास योग्य तो बोध घेता येतील, अशी आशा आहे. 👍"छाप (पड)लेले शब्द-1!":👌 👍"जिनोम कुंडली व जन्मपत्रिकेचे रहस्य!":👌 💐"मेडिकल सायन्स आता वेगाने प्रगत होत चालले आहे. विविध प्रकारचे औषधोपचार, त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा वापर याद्वारे माणसांचे आरोग्य आणि आयुर्मान सुधारत चाललेले आपण पाहत आहोत. त्यामधील माणसाच्या शरीरातील सूक्ष्मातीसूक्ष्म असा 'डीएनए' आता सगळ्यांनाच परिचित झालेला आहे. सोबतच्या वृत्तावरून संशोधकांनी इतकी मजल गाठली आहे की, माणसाच्या शरीरातील पेशींमधील गुणसूत्रांची जी मुळाक्षरे चार असतात त्यांच्या वेगवेगळ्या क्रमाप्रमाणे माणसाची जिनोम कुंडली तयार करता येते. अर्थातच जन्माच्या वेळेला त्याचा आयुष्याचा पटच जणू काही लिहिला असतो अशी ती संशोधनाची दिशा आहे. माणसाला कोणत्या वयात कोणते रोग होण्याचा संभव आहे याचे निदान अशा कुंडली वरून करता येईल अशी ती संकल्पना आहे. त्यावरून आठवण झाली की, चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिषशास्त्रामधील जन्मकुंडली, चंद्राची जन्माच्या वेळी असलेली अंशात्मक स्थिती आणि त्यावरून माणसाच्या जीवनातील 9 ग्रहांच्या महादशांचे कोष्टक. एकूण नऊ ग्रह आणि जिनाम कुंडलीतील मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे येथेही त्या नवग्रहांच्या महादशा पुढील प्रमाणे विशिष्ट क्रमाने येत असतात: केतू सात वर्ष, शुक्र वीस वर्ष, रवी सहा वर्ष, मंगळ सात वर्ष, राहू 18 वर्ष, गुरु सोळा वर्ष, शनि 19 वर्ष आणि बुध सतरा वर्ष. असा एकूण 120 वर्षांचा महादशांचा क्रम असतो. प्रत्येकाच्या आयुष्याची सुरुवात कोणत्या महादशेपासून सुरू होईल ते चंद्राच्या जन्मावेळीच्या स्थितीवरून काढता येते. तसेच या विषयांमधील वैशिष्ट्य असे की, वरील क्रमाने जशा महादशा येतात, त्याच क्रमाने प्रत्येक ग्रहाच्या अंतर्दशाही तशाच येतात. त्यापुढे ग्रहांच्या सूक्ष्मदशा देखील त्याच क्रमाने येतात. त्यापुढे जाऊन अतिसूक्ष्मदशा देखील काढता येऊ शकतात. ज्याप्रमाणे ही जिनोम कुंडली बनली आहे, त्याचप्रमाणे माणसाच्या एकंदर आयुष्याच्या प्रवासाचे निदान महादशांच्या या क्रमावरून ध्वनीत करता येऊ शकते. जन्मपत्रिकेमध्ये ज्या प्रकारे प्रत्येक ग्रहाची स्थिती असेल, त्याप्रमाणे त्या त्या महादशांचे/अंतर्दशा/सूक्ष्मदशा... फळे, कोणत्या स्थानाचे ते ग्रह अधिपती आहेत त्याप्रमाणे देता येऊ शकते असे ज्योतिष शास्त्र सांगते. जन्मानंतर सहाव्या दिवशी सटवाई येऊन बालकाच्या कपाळावर त्याचे आयुष्याचे फळ जशी लिहिते, असे पूर्वापार मानत आलो, तशीच ही संकल्पना ! साहजिकच या वृत्तामुळे आधुनिक वैद्यकशास्त्र आणि डीएनए वरून जीनोम कुंडली आणि भारतीय ज्योतिष शास्त्रातील ग्रहदशांची एकंदर सांगड घालून ह्या प्रकारच्या संशोधनाला नवी दिशा देता येऊ शकेल. निश्चितच अशा तऱ्हेचे संशोधन होणे हे खरोखर गरजेचेआहे, हेच खरे !":💐 ########### 👍"छाप (पड)लेले शब्द-2 !":👌 👍"डोळ्यात अंजन घालणारा लेख !":👌 भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये पाचवी आहे आणि लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर जाईल, तसेच जीडीपी इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे वगैरे वगैरे ढोल सातत्याने पिटले जातात आणि आपण आर्थिक मजबूत असण्याचा व्रुथा अभिमान बाळगला जातो. जिथे एका मागून एक पूल पडतात, अंधश्रद्धेच्या नांवाखाली बुवाबाजी करणाऱ्यांच्या मागे लागून प्रचंड गर्दीत धक्काबुक्की होऊन शंभराहून अधिक माणसे मृत्युमुखी पावतात, जगामध्ये दरडोई उत्पन्नाच्या 139 व्या क्रमांकावर असणारा आपला देश, जिथे 80 कोटी लोकांना पाच वर्ष मोफत अन्नधान्य पुरवण्याची वेळ येते किंवा जेथे एखाद्या राज्यात 'लाडकी बहीण' सारख्या योजना राबवण्याची आणि पंधराशे रुपये दरमहा देण्याची योजना करावी लागते, त्यासाठी हजारो गरजूंच्या रांगा लागतात, अशा कितीतरी गोष्टी असताना आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या मजबुतीचा अभिमान बाळगणं, गर्व करणे ही आत्मवंचना आहे. मुठभर 'आहे रे' आणि सुपभर 'नाही रे'वाले असणाऱ्या आणि भयावह विषम आर्थिक परिस्थितीत 70 टक्क्यांहून अधिक लोक जीवन जगण्याची लढाई करत असताना, आपण जागे होणे गरजेचे आहे. जोपर्यंत तळागाळातल्या माणसांना सन्माननीय जीवन जगण्याची परिस्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत या उत्तम जीडीपी वाढ, आर्थिक मजबुती वगैरे वल्गना करणे थांबवायला हवे. सोबतच्या लेखामध्ये हीच वस्तुस्थिती विस्ताराने मांडली आहे आणि आपले विकासाचा मॉडेल हे कसे अनुचित आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच सर्वांसाठी तसेच प्रामुख्याने अर्थतज्ञांसाठी हा लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे हे निश्चित !": ######### 👍"छाप(पड)लेले शब्द-3 !":👌 👍"माणूसकी अजून जिवंत आहे !":👌 💐"सगळीकडे भ्रष्टाचाराचा भस्मासुर, वाढती गुन्हेगारी त्यात भर म्हणून सायबर क्राईम सारखी आर्थिक गुन्हेगारी, फसवणूक, हीट & रन सारख्या भयानक अमानुष घटना, गर्दीतील चेंगराचेंगरी मध्ये शेकडो निरपराधांचा मृत्यू.... आणि अशाच अक्षरशा निराशा पसरवणाऱ्या बातम्या आणि घटना या माहोलमध्ये कधीकधी वाळवंटातील एखाद्या मृगजळाप्रमाणे अथवा ओव्यासीस प्रमाणे काही बातम्या समजतात त्या खरोखर माणुसकी अजून जिवंत आहे हेच दर्शवतात त्यामधील दहावीच्या परीक्षा मधून अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये निराश न होता नाव में न होता जिद्दीने उत्तम अभ्यास करून 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनेक मुलांचा आणि कुटुंबांचा परिचय वर्तमानपत्रातून महाराष्ट्र टाइम्स देत आहे आणि त्यासाठी हजारो मदतीचे हात विविध ड्रॉप बॉक्सच्या रूपाने या हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मुलांना देत आहे ही खरोखर समाधानाची बाब आहे तसेच सोबतच्या वृत्तामध्ये असाध्य रोगाने पीडित असलेल्या मुलाला एका नाटकाचा प्रयोग सादर करून, 'फुल ना फुलाची पाकळी' अशा स्वरूपात आर्थिक मदत सादर केल्याची माहिती आहे, खरोखर ही देखील एक मनभावन गोष्ट आहे. अजूनही सारेच काही संपले नाही, "There is Light at the end of the Tunnel" असे म्हणण्यास वाव आहे हेच ह्या साऱ्यावरून म्हणायचे !":💐 ######## 👍"छाप (पड)लेले शब्द-4 !":👌 👍"तंत्रज्ञानाची कमाल-अजून यौवनात मी !":👌 करमणूक क्षेत्रामध्ये रंगभूषा अर्थात मेकअप मधील प्रगतीमुळे एखादा तरुण जसा म्हातारा दाखवता येतो उदाहरणार्थ सारांश या चित्रपटात जेव्हा अनुपम खेर यांनी पदार्पण केले तेव्हा ते केवळ 28 वर्षांचे होते परंतु त्यांना रोल मिळाला भूमिका मिळाली ती 60/65 वर्षाच्या म्हाताऱ्याची त्याप्रमाणे त्यांना घडविण्यात मेकअप पण यशस्वी झाले. अशी अनेक उदाहरणे आपल्याला विविध कलाकृती मधून दिसली आहेत आणि त्यांची स्वीकारार्थही सिद्ध झालेली आहे. एखादा पन्नाशीतला नायक पंचविशीत कसा दिसत असेल त्याची कल्पना करून प्रगत अशा तंत्रज्ञानाद्वारे अर्थात AI- आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करून तो हुबेहूब तारुण्यात जसा असेल तसा दाखविण्याचे कौशल्य आता सिद्ध झाले आहे आणि त्याची प्रचिती आता लवकरच तू भेटशील नव्याने या मालिकेमध्ये सुबोध भावे यांच्या डबल रोल मधून दिसणार आहे तरुणपणी आपण असेच दिसत होतो अशी पावती देखील सुबोधिनी त्यांचे तरुणपणचे चित्र बघून केली यातच सारे आले अशा तऱ्हेचा प्रयोग ईडियट बॉक्स वर मालिक काही मध्ये होत आहे ही खरोखर एक चांगली गोष्ट आहे तसेच प्रगतीची नवनवीन दालने देखील त्यामुळे खुली होतील बालगंधर्व लोकमान्य अशा एकाहून एक सरस चरित्र भूमिका करणारे सुबोध भावे आता 'अजून यौवनात मी !' सांंगत, आपल्या डबल रोल मध्ये काय करामत दाखवतात, ते आता लवकरच सर्व रसिकांना कळेलच. सोबतच्या वृत्तामध्ये त्याच संबंधीची सविस्तर माहिती आहे आणि ती देखील मनोरंंजक आहे !": ############ 👍"छाप (पड)लेले शब्द-5 !":👌 👍"नव्वदीतले 'सावकारी' रहस्य!":👌 मराठी मासिकांमध्ये गेल्या शतकामध्ये हमखास ज्या लोकप्रिय लेखिकांची नांवे आणि साहित्यकृती हमखास असायची. त्यामध्ये श्रीमती इंद्रायणी सावकार यांचे नांव अग्रक्रम असे. आज वयाच्या नव्वदीला येऊनही त्यांचा उत्साह कमी झालेला नाही आणि लेखन हाच ध्यास घेतलेल्यामुळे पुढचे पाच प्रोजेक्ट्स हाता वेगळे कधी होतील अशी त्यांची सध्याची मनस्थिती आहे त्याचेच दर्शन त्यांच्याच या आत्मसंवादरूपी लेखांमध्ये आपल्याला वाचायला मिळते हल्ली गेल्या काही दशकामध्ये प्रत्येकालाच आपले आरोग्य आणि एकंदर व्यक्तिमत्व तरुण राहावे अशी आस निर्माण झाली आहे त्यामुळे जिम आणि योगा असे अनेक प्रयोग माणसं नेहमी करत असतात. शिवाय मेडिकल सायन्सची विस्मयकारी वेगाने प्रगती झाल्यामुळे व विविध प्रकारचे औषधोपचार, त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा वापर याद्वारे माणसांचे आरोग्य आणि आयुर्मान सुधारत चाललेले आपण पाहत आहोत. अशा वेळेला इंद्रायणी सावकार यांच्यासारख्या जेष्ठ लेखिका कडून त्यांच्या दीर्घायुष्याची आणि याही वयात कार्यरत राहणाऱ्या मानसिक स्थितीची रहस्य आपल्याला या लेखातून चांगले मार्गदर्शन करतील अशा या पार्श्वभूमीवर मला माझे Different Strokes ह्या सदरामधील पुढील अमोल बोल आठवतात: 💐"You must live your Life on your own terms; but for that You must understand what's your Life is for-The Purpose. ONCE YOU IDENTIFY IT, THEN ACT !":💐 धन्यवाद श्री सुधाकर नात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा