बुधवार, ३ जुलै, २०२४
"छाप (पड)लेले शब्द A !":
👍"प्रास्ताविक!":👌
छाप (पड)लेले शब्दांसमवेतची व्रृत्ते येथे upload करता आली नाहीत. परंतु त्यांच्या संदर्भातील निरीक्षणातून आपणास योग्य तो बोध घेता येतील, अशी आशा आहे.
1
👍"छाप (पड)लेले शब्द !":👌
👍" सायबर क्राईमचा भस्मासुर !":👌
🤗🤗🤗🤗🤗
🤣" रानटी अवस्थेतील माणसाचा उत्तरोत्तर प्रगतीचा प्रवास आज तंत्रज्ञानामुळे प्रमोच्च बिंदूला पोचला असला, तरी त्याची मूलभूत शिकारीवृत्ती अजूनही कमी झाली नाही, अशाच तऱ्हेचे सध्याचे एकंदर गुन्हेगारी विश्वाचे भयावह चित्र आहे. दुसऱ्याचे ओरबाडून घेण्याची ही प्रवृत्ती भीषणावह आहे. पॉकेटमारी,चोऱ्या दरोडे ही सारी त्याच प्रवृत्तीची अनिष्ट उदाहरणे आहेत.
अशा तऱ्हेच्या गुन्हेगारीमध्ये प्रत्यक्ष शारीरिक हजेरी लावून, संभाव्य पकडले जाऊन मार खाण्याच्या धोक्याला तोंड देण्याची शक्यता गृहीत धरूनही हे गुन्हे काही केल्या कमी होत नाहीयेे. हा खरोखर मानवसंस्कृतीला लागलेला हा काळीमा कधी दूर होणार कुणास ठाऊक !
त्यात आता भर पडली आहे सायबर क्राईमस् भस्मासुराची ! सोबतच्या वृत्तामुळे आपल्याला लक्षात येईल की, फसवणुकीद्वारे किती भयानक अशा गुन्ह्यांची संख्या वाढत जात आहे आणि त्यामानाने पकडले जाणारे नगण्य आहेत. येथे तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाद्वारे रिमोट ठिकाणी हजेरी असूनही, कुठेही कसेही संभाव्य भक्ष हेरून त्यांना भीती दाखवून त्यांचेच पैसे या गुन्हेगारांना बिन दिक्कतपणे धाडले जातात. उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या सायबर क्राईमस्ममध्ये एकदा फसवणूक झाली की हातात तक्रार करण्याशिवाय काहीच उरत नाही, कारण समोर गुन्हेगार कोण आहे याचाच पत्ताच नसतो.
भौतिक प्रगती जरी झाली तरी नैतिक अध्यपतन इतक्या थराला गेले आहे की, हे असले आधुनिक भामटे गुन्हेगार सहजतेने निरपराध सामान्य जनतेने घामाने मिळवलेल्या संपत्तीवर डल्ला मारत आहेत.
ही मानवी प्रवृत्ती कधी कशी संपणार त्यासाठी खरोखर काय करायला हवे, प्रामाणिकपणा सचोटी निस्पृहता या गोष्टी समाज कसा कधी अंगी करणार, याचा विचार करायची गरज कधी नव्हे ती आता निर्माण झाली आहे. मानसशास्त्रज्ञ यासाठी पुढे यायला हवेत. अथक संशोधन करून अगदी बालपणापासून कोणते कसे संस्कार करायला हवेत याचे मार्गदर्शन त्यांनी करायला हवे.
सर्वसामान्यांनीही जागृत राहून आपण फसवणुकीला बळी पडणार नाही, अनोळखी अशा कुठल्याच संपर्कात न येण्याची खबरदारी त्यांनी जर घेतली तर कदाचित काहीसा आळा या असल्या चिंताजनक सायबर क्राईमस् वर घालता येईल !":🤣
🤗🤗🤗🤗🤗
2
👍"छाप (पड)लेले शब्द !":👌
🤗"सुलेखनाचे धडे !";🤗
"शिक्षणाचा श्रीगणेशा करताना स्वच्छ, सुबक अक्षर व्हावे म्हणून, अ आ इ ई... तसेच क ख ग घ.. अशा बाराखड्या मुलांकडून हाताने आवर्जून लिहिल्या घेतल्या जायच्या. मोडीसारखी वलयांकित वळणदार अक्षरे असलेली भाषा तर ते करण्यासाठी अधिकच सुलभ व उत्तम असायची. बे एके बे पासून चक्क औटकीपर्यंत पाढे परवचा म्हणून रोज शिस्तीने म्हणून घेतले जायचे. त्या मुलांची पिढी आणि तो इतिहास जमा झालेला काळ पुनश्च आठवावा, अशा तऱ्हेचे सोबतचे वृत्त आहे. श्री अवधूत पालव उत्तम हस्ताक्षरात लिहीणे व्हावे म्हणून सुलेखनाचे धडे केवळ भारतातच नाही तर जगभर देत आहेत, त्यासंबंधीची ही माहिती खरोखर रंजक अशीच आहे.
सध्याच्या काळात स्मार्टफोनच्या अवतारामुळे, हाताने काही लिहिण्याची सवय, वा पोस्टाने पत्रे पाठवणे वगैरे इतिहास जमा झाले आहे. केवळ सही हाताने केली जाते, एवढीच हाताची आणि लेखणीची कदाचित जोडी उरली आहे ! कॅल्क्युलेटर ने सर्वच काही तत्परतेने मिळत असल्यामुळे, आकडेमोड परवाचा पाढे सगळे काही इतिहास जमा झालेले आहे. तंत्रज्ञानाचा हा असा विपरीत परिणाम आपण पाहत आहोत. अशा वेळेला अक्षर चांगले व्हावे म्हणून जनरेशन झेड ने देखील प्रयत्न करायला हवेत, तसेच पुढच्या पिढ्यांनी देखील !
जाता जाता टीका म्हणून नव्हे, किंवा नांवे ठेवणे म्हणून नव्हे, पुष्कळ डॉक्टर मंडळींचे अक्षर वाचणे कठीण असते, तेच फक्त केमिस्ट मंडळीच वाचू शकतात, त्याची आठवण झाली. तसे कां होते या कोड्याचे संशोधन करायहला हवे, नाही कां ?:
🤗🤗🤗🤗🤗
3
👍"छाप (पड)लेले शब्द !":👌
👍" इतिहासाच्या पाऊलखुणा !":👌
💐 " मुंबई हे सात बेटांचे मिळून बनलेले एक शहर आहे हे आपल्याला आता माहीत झाले आहे इंग्रजांनी त्यांचा कारभार येथील फोर्ट विभागातून सुरू केला आणि उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला.
त्यात मुंबईतील विविध रस्त्यांच्या आणि त्यामागील नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींच्या माहितीपूर्ण आठवणी महाराष्ट्र टाइम्सच्या "नावलौकिक" या मनोरंजक सदरामध्ये नेहमी उलगडल्या जातात. जुन्या पिढीला भूतकाळाच्या स्वप्नरंजनात, तर नवीन पिढीचे कुतुहूल दूर करणाऱ्या ह्या अशा संग्रह माहितीमुळे प्रत्येकाच्या जाणिवांमध्ये नक्कीच भर पडत असेल.
जसा व्यक्तींना इतिहास असतो, तसाच रस्त्यांना त्यांच्या नावांना व इतर बहुतेक स्थळांना देखील स्वतःची अशी आगळीवेगळी खूणगाठ असते, हे त्यावरून उमजते. सोबतच्या वृत्तामध्ये मुंबईमध्ये ज्ञात असलेल्या सँडहर्स्ट रोड आणि एल्फिन्स्टंन रोड यांची उपयुक्त माहिती आणि त्या संबंधी सँडहर्स्ट व एल्फिन्स्टंन हे कर्तबगार इंग्रज अधिकारी आपले कार्य करून गेले त्यांची आठवण जागी केली आहे !":💐
######
4
👍"छाप (पड)लेले शब्द !":👌
👌"काव्यरसाचा शारदोत्सव !!":👌
💐"काव्य हे साहित्यातील प्रतिभाशाली रूप असते. महाराष्ट्र साहित्य शारदेतील तीन रसिकप्रिय कवीवर्य प्राध्यापक वसंत बापट मंगेश पाडगावकर आणि प्राध्यापक विंदा करंदीकर यांना एकाच व्यासपीठावर तीन-चार दशकांपूर्वी दादर येथील सभागृहात ज्या रसिकांनी एकत्र काव्यवाचन व गप्पाटप्पा असा अद्भुत शारदोत्सवाचा कार्यक्रम पाहताना अनुभवले, त्या भाग्यवंतांमध्ये आस्मादिकही होते.
पॉप्युलर प्रकाशनाच्या शंभराव्या शतकपूर्ती निमित्त ज्ञानपीठ पारितोषक विजेते विंदा करंदीकर यांच्या काव्यप्रतिभेबद्दल
समीक्षात्मक ओळख करून देणारा श्रीमती माधवी वैद्य यांचा रविवारच्या म.टा. मधील लेख सोबत वाचायला मिळाल्यामुळे त्या संस्मरणीय प्रसंगाची आठवण झाली.
विंदांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या काव्यामध्ये वास्तवातील परिस्थितीचे परखड दर्शन जसे घडत असे, त्याचप्रमाणे तात्विक अध्यात्माचे विचारधन असे. त्यांच्या 'निर्वाणीचे गझल' व 'अष्टदर्शने' ह्या मौलिक रचनांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी एके ठिकाणी म्हटले होते 'देणाऱ्याचे हात हजार' तसेच प्रस्तुतच्या लेखाचे शीर्षकही 'लिहिणार्याने लिहित रहावे' ! ह्या सोबतच्या लेखाच्या शेवटी अद्भुत शब्द आहेत ते पुनश्च वाचत राहावे असेच आहेत:
"वि स खांडेकर, कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर या (ज्ञानपीठ विजेत्या) तिघांमध्ये अपार मानवी करूणा हे समान सूत्र आहे. या सूत्रातून फुलणारा आशावाद हे मानवाचे अंतिम गोत्र आहे. या गोत्राचा जय जय जयकार करू या ! ":💐
#####
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा