बुधवार, ३ जुलै, २०२४
"बोल अमोल-146 ते 171 !":
💐II (अ) मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-147 !":👌
💐"आपल्या वाटेला आले आहे, ते काम मनापासून व कुरकुर न करता, उत्तम रितीने करणे एवढेच नाही, तर त्यामध्ये सुधारणा करत अधिक चांगल्या परिणामांची आस धरत, सातत्याने करत राहणे ही प्रवृत्ती हल्ली दुर्मिळ होत चालली आहे.
त्याउलट कर्तव्यापेक्षा हक्क जास्त महत्त्वाचे मानणारे, स्वार्थी,
कामचुकार अधिक संख्येने वाढत आहेत. सर्वंंकष विळखा घालणाऱ्या भ्रष्टाचाराचे मूळ तिथेच आहे. नैतिक अधोगती हीच खरी आपली समस्या आहे !":💐
#####
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-147!":👌
💐"माणसाच्या आयुष्यामध्ये वयोमानपरत्वे, अपेक्षा, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या ह्या बदलत जात असतात. त्या त्या वेळी त्यांचे अचूक निदान ज्यांना होते आणि जे त्याबर हुकूम वागतात, ते आयुष्यात बहुश: यशस्वी होतात.
जरा जरी कुठल्याही एका गोष्टीची चूक झाली, तर आयुष्याची गाडी भरकटत जाऊ शकते !":💐
######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-148 !":👌
💐 "दररोज सकाळी, काल आपण कोण कोणती कामं, यशस्वी केली त्यांची न चुकता नोंद ठेवणं, अत्यंत उपयुक्त असते. आपला वेळ आपण कसा वापरला हे त्यावरून समजून, सातत्याने आपल्यांत सुधारणा करण्याची प्रेरणा तर मिळतेच, पण त्याच बरोबर जी कामं राहिली, त्यांना प्राधान्यही देता येते !":💐
#####
💐II (अ)मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-149 !":👌
😇 "माणसाला माणसाची सोबत नकोशी होत चालली आहे, आबालवृद्धांपासून प्रत्येकाला स्वतःची अशी स्पेस हवी, हे खूळ वाढतच चालले आहे. त्यामुळे माणसं ही बेटं बनत चालली आहेत, चहुबाजूने
स्वतःच्याच कोशात वेढलेली !
मानवजातीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने व विकासाच्या दृष्टीने हे एक अवलक्षण नव्हे कां? असं कां घडावं? तंत्रज्ञानाच्या
अक्राळ विक्राळ पाशांमुळे? की, जीवन जगण्याच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करण्याच्या ईर्षांमुळे?:😇
######
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
💐" शारदोत्सव !":💐
💐"प्रत्येकाने वाचायलाच हवं असं !":💐
👍 " जीवनात चढ-उतार प्रत्येकाच्या जीवनात येत असतात संकटांना तोंड दे आत्मविश्वासपूर्वक कसं जगायचं त्याचं दर्शन घडवणार असं हे पुस्तक खरोखर प्रत्येकाने वाचायलाच हवं असंच आहे !":👍
#######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-152 !":👌
💐 "शब्द" हे माध्यम, आणि "विचार"
ही शक्ती,
कशी, कशासाठी
व केव्हां वापरावयाची ते ज्याचं त्यानं ठरवायचं!:💐
####@@#
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-153 !":👌
💐"अडचणी ,संकटेही येतात....
त्यांतूनही मार्ग सापडतो....
लक्षांत येतं.....
कुणाचच,
कशाही वाचून अडत नसतं!":💐
#######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-154 !":👌
💐""स्वप्नं" प्रत्यक्षात यायला, केवळ संधी मिळणे पुरेसे नसते,
त्यासाठी अजोड गुणवत्ता, अथक परिश्रम, दूरद्रुष्टी
व अनुभव असायला लागतो!":💐
#####
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-155 !":👌
💐"यातना, वेदना आणि कुचंबणा,
ह्यांच्यासह जो डोळसपणे जीवन जगू शकतो,
तोच खराखुरा पुरुषोत्तम ! ":💐
######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-158 !":👌
💐"सांजपर्व":💐
👍"माणसाच्या जीवनातील सर्वच अवस्था,
ह्या त्या त्या वेळच्या परिस्थितीचे व मनोभूमिकेचे प्रतिबिंब असते.........
त्यातील सांजपर्व, हे खरं म्हणजे दुर्लक्षितच रहाते. पण जर माणूस मनस्वी अन् तपस्वी असेल तर व्रुद्धत्वही हवेहवेसे वाटू शकते, कारण तेव्हां आत्मसंवेदनांच्या सह्रदय अश्रुंनी चिंब होऊन जाते...........👌
######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-159 !":👌
🤣 "माणसाच्या आयुष्यात आवड, निवड आणि नावड यांचा लपंडाव चालू असतो. परंतु जेव्हा काळजीपूर्वक आवडलेले निवडले असते, तेच जेव्हा नावडते होते तेव्हा केवळ परवडच भविष्यात सहन करावी लागते !":🤣
######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-160 !":👌
💐"नित्य नेमाने "पगडी" फिरविणार्यांची विश्वासार्हता रसातळाला जाते आणि दुर्दैव (की,सुदैव?) हे,
की त्यांना ते कळतच नाही !":💐
#####
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-157 !":👌
🙃 "जाणीवपूर्वक निखळ व्यवहार सोडून,
जे भावनिक वादळे निर्माण करतात,
ते स्वत: अकार्यक्षम तर असतातच,
पण अविश्वासार्हही संभवतात !":🙃
#######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-161 !":👌
💐" काही करावयाचे आहे, पण वेळ नाही !
अशी अवस्था कुणाची, तर वेळ जाता जातच नाही, वेळ खायला उठलाय अशी कुणाची !! वेळ तीच आणि तशीच, पण अवस्था ह्या वेेगवेगळ्या. परंंतु जो वेळ आहे, तो स्वतःसाठी किती वापरता आणि इतरांसाठी किती वेळ देता, याचा कोणी कधी विचार केला आहे ?:💐
######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-162 !":👌
💐 "शेक्सपियरने म्हटल्याप्रमाणे 'टू बी ऑर नॉट टू बी' अशी द्विधा मनस्थिती पुष्कळदा प्रत्येकाची कोणताही निर्णय घेताना होत असते. अशा संभ्रमावस्थेत योग्य निर्णय, योग्य वेळी घेणे थोड्या जणांनाच जमते, अन् ज्यांच्या अंगी हे कौशल्य असते तेच जीवनात यशस्वी होतात !":💐
######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-163 !":👌
💐" विचारल्याशिवाय
सांगू नये,
मागितल्याशिवाय
मदत करू नये,
माणूस समजल्याशिवाय
विश्वास ठेवू नये !":💐
₹######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-164 !":👌
💐"धावपळीच्या स्पर्धेच्या आजच्या माहोलांत, जिथे माणसामाणसांतला संवाद हरवत चालला आहे,
तिथे स्वत:च स्वत:शी कोण काय बोलणार?":💐
######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-166 !":👌
💐 " आपले परस्परांबरोबर वागणे कसे आहे ते तपासणे आवश्यक असते. जे त्यातील स्वतःच्या चुका मानतात आणि सुधारणा करायची इच्छा प्रत्यक्षात आणतात, ते साहजिकच आवडते होऊ शकतात. त्या उलट आपण काही चुकाच करत नाही, अशा भ्रमात असणारे नावडते होणे अपरिहार्य असते !":💐
######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-165 !":👌
😇"क्रिकेटचा खेळात आणि माणसाच्या आयुष्यात चित्तथरारक अनिश्चितता असते. त्या खेळात जसं पुढच्या चेंडूवर काय होणार, हे कोणीही सांगू शकत नाही,
तसंच माणसाच्या आयुष्यात पुढच्या क्षणाला काय होणार, हे देखील अनाकलनीय असते !":😇
######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-167 !":👌
😅 "दुसर्यांना मनापासूून समजून घेणे म्हणजे अनुकंपा. मात्र तो माणूस पारखल्याशिवाय कधीही
विश्वास ठेवू नये !":💐
#####
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-169 !":👌
" एकमेकांना समजून घेणे म्हणजे सुसंवादाची पहिली पायरी. परंतु तिचाच दुष्काळ असल्यामुळे माणसामाणसात वादविवाद होऊन,
परस्पर संबंध बिघडतात !":😅
######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-168 !":👌
💐 "अंत:प्रेरणा, विचारधन आणि
अनुभवचिकित्सा या गुणत्रयीच्या मिलाफाने उत्कृष्ट साहित्य निर्मिती होत असते, तोच खरा शारदोत्सव होय !":💐
######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-170 !":👌
💐"कार्यतत्परता, सामंजस्य, परस्परावलंबन, क्रुतार्थता आणि चिरंतरता ह्या पंचसूत्री मूल्यांवरच, मानवतेचा हा प्रवाह अव्याहत रहाणार आहे !":💐
######
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-171 !":👌
💐"आपली व्रत वैकल्ये सणवार, शिस्त नियमन, समाजमन निकोप ठेवत
सांस्क्रुतिक संस्कार करणारी,
आरोग्याचे ऋतू बदलानुसार
भान ठेवणारी !":💐
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा