मंगळवार, ३० जुलै, २०२४

" मल्लिनाथी 1": राजकारण

# "पक्षपाती अर्थसंकल्प !": "यावर्षीचाअ अर्थसंकल्प केवळ सत्ता टिकवण्यासाठीचा आहे दुसरे काही नाही केंद्रीय सत्ता म्हणून प्रत्येक राज्याला त्याच्या कर संकलनाप्रमाणे योग्य तो न्याय देणे हे कर्तव्य आहे त्याचा विचार पडलेला आहे कितीही पाठपुरावा आणि पुष्टी केली तरी हे आतापर्यंतचे सरळ सरळ पक्षपात करणारे बजेट आहे आणि सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देणारे नाही केवळ शब्दांचे बुडबुडे दुसरे काही नाही भक्ताने कितीही तुंतुणे वाजवले तरी उपयोग नाही. चक्रव्यूहाचे उदाहरण अत्यंत चपखल असल्याने ते जिव्हारी लागली असे दिसते "आरक्षणाचा तिढा आणि समस्या अक्षरशः कठीण होत चालली आहे. जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत कोणत्या जातीला किती टक्के आरक्षण आवश्यक आहे हे ठरविता येणे कठीण आहे. 75 वर्षानंतरही आरक्षण असणे योग्य आहे का? हाही विचार करणे गरजेचे आहे आणि एवढी जर जातीयवाद नष्ट करायची इच्छा असेल तर सध्याच्या सरकारने आरक्षण पूर्ण नष्ट करण्याची हिम्मत दाखवावी. त्यामुळे गुणवत्तेला प्राधान्य मिळेल. साहजिकच फुका वास्तव सोडून चर्चा अयोग्य आहे. # 80 कोटी लोकांना पाच वर्ष मोफत धान्य महाराष्ट्रात तर ह्या व्यतिरिक्त लाडकी बहीण लाडका भाऊ शिवाय जेष्ठांसाठी ही पेन्शन सारख्या योजनेचे गाजर या साऱ्या गोष्टी इतके विदारक चित्र उभे करतात की 75 वर्षानंतर सुद्धा आपण किती भीषण अशा अवस्थेत आहोत ! आर्थिक नियोजन आणि प्राधान्ये पूर्णतः फसलेली आहेत याचेच हे सारे वास्तव आहे 'आहे रे' आणि 'नाही रे' यांच्या मधली दरी आणि प्रमाण अत्यंत चिंताजनक अशा अवस्थेत असताना, केवळ तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार वगैरे वल्गना पूर्णतः अप्रस्तुत आहेत. सत्ताधारी जर वाईट वॉशिंग मशीन द्वारे भ्रष्टाचार करणाऱ्यांना शुद्ध करून घेत असतील तर अधिक काय बोलणार? इतकी नीतिमत्ता खालच्या थराला कधीही गेली नव्हती. When Character is Lost every thing is Lost. # महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचे अशलाग्य पाप न करता भाजपने जर समंजस विरोधी पक्ष म्हणून काम केले असते तर सध्या जी महाराष्ट्रात विदारक अवस्था झाली आहे आणि देशातही भाजपची मेजॉरिटी जाण्याची दुर्दैवी परिस्थिती उद्भवली आहे ती उद्भवली नसती. शेवटी करावे तसे भरावे हेच खरे # खरं म्हणजे कम्युनिस्ट वगळता भारतामध्ये केवळ दोनच पक्ष जे विचारधारेला आधारित आहेत असे राहिले पाहिजेत बाकीचे सारे पक्ष हे कोणतेही विशिष्ट विचारधारा नसलेले आणि वैयक्तिक स्वार्थासाठी निर्माण केलेले, पूर्वीच्या जाहागीरदारांप्रमाणे वैयक्तिक घराण्याची बेेटं आहेत. ही परिस्थिती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत भारतीय राजकारणाचे खेळखंडोबे असेच होत राहणार.

बुधवार, २४ जुलै, २०२४

"One Man Communication Industry": Sudhakar Natu ":

"Progress Report-15/6/'24 "One Man Communication Industry": Sudhakar Natu ": # 'प्रगतीची क्षितीजे' ह्या महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट पुस्तक पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे लेखक... # रंगांची दुनिया-फेसबुकवरील समुह: संस्थापक व Admin 2 years + Monthly Progress Report: 1 moonsun grandson blog: 532 articles 2 मुक्तसंवाद channel on you tube: 109 videos 3 आकाशातील पाळणे whatsapp अभिवाचन मंच: 259 4 स्वरानंद: 54 5 बोल अमोल: 153 6 छाप (पड)लेले शब्द: 50 + 7 माझी कथा: आठवड्यात 2/3 Mission: "ह्या ह्रदयाचे त्या ह्रदयी !" Be a witness to कल्पनांची आकाशगंगा !!....

शुक्रवार, १९ जुलै, २०२४

दिवाळी अंकांची मांदियाळी- पसंतीची मोहोर!"

दिवाळी अंकांची मांदियाळी": समस्त रसिकांनी चवीने अनुभूती घेत वाचावी, अशी... मला लेखनाप्रमाणे वैचारिक वाचनाची मनापासून आवड आहे. त्यांत दर वर्षींचा दिवाळी अंकांची मांदियाळी हा तर अपूर्व खजिनाच असतो. मी जे जे वाचतो, त्यातील मला भावलेले रूचलेले काही खास अंतर्मुख करणारे गवसले तर त्या त्या लेखकांना वा संपादकांना, माझ्या पसंतीची बावनकशी मोहोर पाठविल्याशिवाय मला चैनच पडत नाही. ही स्वानंदमयी 'वारी'ची आत्मानंद देणारी कहाणी आहे......... "दिवाळी अंकांची मांदियाळी": "असाही एक "वामनावतार !": 'इकतारा' प्रकाशन काढत असलेल्या 'सायकल' ह्या मुलांच्या मासिकाच्या आँगस्ट-सप्टेंबर २०२० च्या अंकात श्री वरुण ग्रोव्हर ह्यांनी लिहीलेल्या, अभिनयसम्राट इरफान खानसंबंधी लेखाचे 'अक्षर' दिवाळी अंक'२० मधील मराठी रुपांतर-'त्या चार भेटी' वाचणे, हा जणु वामनावताराप्रमाणे तीन/चार पावलात समस्त दिवाळी अंकांचे विश्व अनुभवणे भासावे, इतक्या ताकदीचा अनुभव आहे. इरफानच्या सहवासातील मोजक्या क्षणांचा लेखकाने उलगडलेला हा पट, वाक्यावाक्यांतून शब्दाशब्दातून आपल्याला खिळवून टाकतो. त्या मनस्वी तपस्वी अभिनेत्याची आपल्या कलेवरील असीम निष्ठा, प्रत्येक आगळ्यावेगळ्या भूमिकेचा सखोल अभ्यास करून ती जीवंत करण्याचे अविरत प्रयत्न, आपोआपच मनावर ठसा उमटवून जातात. १९८७ मध्ये नँशनल स्कूल आँफ ड्रामामधून पदवी घेणार्या ह्या गुणवंताची जगाने दखल घेण्यासाठी त्याला थोडी थोडकी नव्हे तर चक्क पंचवीस वर्षे तपश्चर्या करावी लागणे, ही बाब तर संवेदनशील वाचकाला चटका लावणारी आहे..... इरफानबरोबरच्या चार भेटींचा संवेदनशील मनाने घेतलेल्या ह्या लेखाजोख्यात, प्रत्यक्ष इरफान ह्यांच्या भावना, द्रुष्टिकोन अथवा स्वतः लेखकाचे विचार, हे जणु चिरंतन शाश्वत सत्याचे वा तत्वांचे ठसेच आहेत. नमुना म्हणून ह्या निवडक नोंदी पहा: # त्याच्या त्या जीवघेण्या आजारासंबंधी: "एक महान अभिनेता एका मोठ्या आजाराला कसा सामोरा जातो, असं जर कोणी स्क्रिप्ट घेऊन त्याच्याकडे आला असता त्यातील व्यक्तिरेखा तो आजार कसा स्वीकारते, कसा समजून घेते, प्रेक्षकांसाठी अनुभवांचं एक नवीन जग उलगडण्यासाठी स्वतःला कसा आकार देते-तर त्याने ती भूमिका अगदी अशाच पद्धतीने साकार केली असती. शांतपणे कुतुहूल शाबूत ठेवून आणि ग्रेसफुली." # "एखाद्या कलेवर प्रभुत्व मिळवणं, म्हणजे त्यात पूर्णपणे बुडून जाणं अगदी उध्वस्त होणे अशी तुलना त्याने आपोआपच केली होती." # "के. आसिफच्या आयुष्याचा जर विचार केला तर त्याच्या 'मुघल-ए-आझम' चित्रपटाच्या निर्मितीरूपी प्रवासावर जर सिनेमा केला तर मला-(इरफानला ) आसिफची भूमिका करायला खूप आवडेल." हे सांगताना, अचानक त्याला एवढा वेळ आलेला कंटाळा कुठल्या कुठे पळून गेला होता. तो असाच या सिनेमाच्या प्रेमाविषयी तो भरभरून बोलत होता. दुर्दैवाने त्या काळातल्या गोष्टींचे नीट जतन झालेलं नाही आणि एका दशकाहून अधिक काळ हा सिनेमा बनवण्यावर आसिफने कसा घालवला, याविषयी फारसे संशोधन झालं नाही, म्हणून तो (इरफान ) हळहळ व्यक्त करत होता. ह्या कहाणीमधला सर्वात कोणता भाग त्याला सर्वात आकर्षित करतो, असं मी-(लेखकाने ) विचारल्यावर तो म्हणाला, "फना हो जाना"! अर्थात् उद्ध्वस्त होऊन जाणं ! एका सिनेमावर एका माणसाने पंधरा वर्ष अथक मेहनत घेतली, त्या निर्मितीमधल्या छोट्या छोट्या बारकाव्यांविषयी तो कसा आग्रह होता, जणू काही सिनेमा नव्हे, तर तो आपलं उसवलेलं आयुष्यच पुन्हा जोडू पाहत होता. खरंच आहे हे. के. आसिफने हा सिनेमा करताना स्वतःला पार उस्कटवून टाकलं." # अभिनय संकल्पनेवरील लेखकाचे हे भाष्य तर प्रतिभेच्या कमालीची परिसीमाच आहेः "अभिनय करणं इतर कलांपेक्षा खूप खूप वेगळं असतं. अशासाठी की, त्यातून काही ठोस मूर्त अशी कलाकृती निर्माण होत नाही. इतकंच नाही तर अभिनयाच्या बाबतीत कला आणि कलाकार यांच्यात फरक करणं शक्य नसतं. चित्राला आपण स्पर्श करू शकतो, लेखन प्रकाशित होतं, तर संगीत टेप करून जपू शकतो. पण अभिनेत्याची कला म्हणजे तो किंवा ती अभिनय करण्याची करणारी व्यक्तीच असते. त्यामुळे ही कला जर समजून घ्यायची, तर त्या कलावंताला समजून घेणं हा एकच मार्ग आहे." खरंच आहे हे सारं. कारण अभिनेत्याचा आविष्कार हा तो समोर बघणार्या अनुभवणार्या रसिकांच्या मनःपटलावर उमटत रहाणारी, शब्द रहित अमूर्त प्रतिमाच तर असते ! 'अक्षर' दिवाळी अंक'२० अजून आपण वाचला नसेल तर आवर्जून तो मिळवा व वाचा... सुधाकर नातू, माझ्या सॅमसंग गेलेक्सी स्‍मार्टफोन वरून पाठवले.

बुधवार, १७ जुलै, २०२४

"छाप पडलेले शब्द-D !": 👌 👍"प्रयत्नांती प्रभावशाली कामगिरी !":👌

👍"छाप पडलेले शब्द-1D !": 👌 👍"प्रयत्नांती प्रभावशाली कामगिरी !":👌 💐"आपल्याला जे आवडते आणि जे सहज जमू शकते, तेच काम आपल्याला सारखे करावेसे वाटते. तसेच काम आपल्याला नेेहमी मिळावे असेही वाटत असते. सहाजिकच पुष्कळदा जे आवडत व जमतही नाही, अशी कामे टाळण्याची आपली प्रवृत्ती असते. इंग्रजीमध्ये Procrastination ही एक मानसिक अवस्था वर्णिलेली आहे. त्यामध्ये अळम टळम करत, आजचं काम उद्या, उद्याचं परवा अशी चालढकल सतत केली जाते. त्यामुळे समस्या उलट अधिक वाढतात व मानसिक ताण, चिंता निर्माण होतात. त्या उलट हे काम मला कां येेत नाही, कां जमू नये, असे आव्हान स्वीकारून त्या नावडत्या कामाला जर तुम्ही भिडलात, तर तुम्ही सहजपणे हळूहळू ते करू शकता, एवढेच नाहीतर चांगली कामगिरी देखील तुमच्याकडून होते. जीवनात आनंद मिळवायचा असेल तर अशाच अशक्य न आवडणाऱ्या कामांबद्दल आपण प्रयत्न करायला हवेत, हे उलगडणारा हा सोबतचा लेख खरंच अंतर्मुख करणारा आहे. प्रत्येकाने त्यापासून जागृत होऊन आपल्यात सुधारणा करायला हवी, प्रयत्न करून न जमणारी कामे यशस्वी करायला हवीत. मला त्याची आठवण ठेवायचं कारण माझ्या बाबतीत तसे शतशः खरे झालेले आहे. मला स्मार्टफोन वापरायच्याबद्दल भीती वाटे, जुनाच फोन मी वापरे. माझा मुलगा माझ्या मागे खूप लागला होता की, तुमच्या वाढदिवसाला मी स्मार्टफोन देतो. पण मला वाटायचे की, स्मार्टफोनवरील काचेवर आपण कसे काय बरे लिहिणार आणि काम करणार ! त्यामुळे मी एक दोन वर्ष टाळलं, पण शेवटी त्याने मला तो दिलाच. त्यानंतर जे घडले ते तुमच्यासमोर माझ्या सोशल मीडियावरील ब्लॉग व्हिडिओ Sudha डिजिटल दिवाळी अंक व विविध डिजिटल लेखसंग्रह, फेसबुकवरील 'रसिकांची दुनिया' खाजगीसमूह, whatsapp 'आकाशातील पाळणे' हा अभिवाचन मंच अशा अनेक रूपाने आता उपलब्ध झाले आहे. आता तर त्याला 'Moonsun Grandson' 'वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्री'असे रूप झाले आहे: 'ह्या हृदयीचे त्या हृदयी करू, जाणिवांचा भवताल विस्तारू !" ह्या ध्येयाने मी आता सतत त्या कामांमध्ये रस घेत असतो. मी नाउमेद न होता, जिद्दीने प्रयत्न केले, म्हणून हे सगळे होत गेले, असेच मला या लेखाने पुन्हा सांगितले. सारांश आव्हाने स्वीकारावीत, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करावेत शेवटी यश आपलेच असते, हाच धडा !":💐 धन्यवाद श्री सुधाकर नातू ############ 👍"छाप पडलेले शब्द-2 D !":👌 👍" चांंगुुलपणाची गर्भश्रीमंती !":👌 💐 "नुकत्याच पार पडलेल्या t20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारत विश्वविजयी झाला, ही खरोखर सर्व भारतीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब होती. त्यामागे खेळाडूंचे जसे योगदान होते त्याचप्रमाणे त्या संघाला घडवणाऱ्या प्रशिक्षक श्री राहुल द्रविड यांचेही समर्थ मार्गदर्शन कारणीभूत होते. त्यानिमित्ताने सर्व टीमला 125 कोटी रुपयांचे बक्षीस आयसीसीतर्फे देण्यात आले. तर प्रशिक्षक द्रविड यांना रूपये पाच कोटी व त्यांच्याबरोबरच्या सपोर्ट देणाऱ्या टीमला प्रत्येकी अडीच कोटी रूपये देण्याचे आयसीसीने ठरवले. परंतु द्रविड यांची थोरवी अशी की, त्यांनी सर्वांना समान बक्षीस द्यावे असे सांगून जास्तीचे रुपये अडीच कोटी नाकारले.अशा तऱ्हेचे चांगुलपणाचे गुण त्यांच्यात पहिल्यापासूनच आहेत हे आपण ध्यानात घेेतले पाहिजे. क्रिकेटची कारकीर्द संपल्यानंतर बहुतेक जण काही ना काहीतरी रूपाने टीमला जोडलेला राहतो आणि त्यामध्ये संघाचे परीक्षक व्हावं ही नेहमी इच्छा असू शकते. पण त्या पायरीपर्यंत जाण्यापूर्वी द्रविड यांनी विविध मधल्या पायऱ्या ओलांडतच प्रशिक्षण घेत, स्वतःला घडवत, मगच संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली, हे खरोखरच भूषणावर आहे. अशा तऱ्हेचा निस्प्रुह न्यायीपणा आणि चांगुलपणा खरोखर हल्ली दुर्मिळ होत चाललेला आहे. त्या दृष्टीने सोबतचे वृत्त हे खरोखर प्रत्येकाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आनंदाश्रू आणणारे आणि द्रविड यांना मानवंदना करणारे असणार यात शंका नाही. अशा तऱ्हेची सद्गुणी, सज्जन निस्वार्थी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत, हे दुर्दैवच नव्हे कां? विशेषत: सध्याच्या राजकारणात जे काही आपल्याला प्रताप दिसतात, त्यावरून राजकारण्यांनी या आदर्श पासून धडा घ्यावा अशीच ही घटना आहे. श्री द्रविड यांना सहर्ष मानवंदना व मनःपूर्वक शुभेच्छा !":💐 धन्यवाद श्री सुधाकर नातू ###### 👍"छाप पडलेले शब्द-3 D !":👌 👍" प्रगतीची क्षितिजे-भरारीच्या वाटा!":👌 💐 " बारावीनंतर घरोघरी आपल्या पाल्याचे भवितव्य कसे उज्वल होईल याचा घोर पालकांना लागतो. अनेक स्पर्धा परीक्षा, पदव्यांचे मार्ग समोर खुले असतात. सध्याची स्पर्धात्मक परीक्षांची जी काही दयनीय आणि शंकास्पद स्थिती झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर खरोखर यापुढे कुठल्या कोर्सला जाऊन काय फायदा होणार, याची चिंता अर्थातच वाढत जाणार. कोणे एके काळी एमबीएला खूप मागणी होती आणि वावही होता. परंतु एमबीए आणि तत्सम पदव्या व पदविका देणाऱ्या संस्थांचे जाळे पसरले, खरे पण एकंदर स्तर घसरत गेला. त्यामुळे एमबीए होऊनही विशेष काही प्रगती व आर्थिक उन्नती होईल याची शाश्वती नाही, कारण पैशाला बासरी प्रमाणे एमबीए तयार होऊ लागले. इंजीनियरिंगला जशी विद्यार्थ्यांनी धाव घेतली आणि अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस बाजारू वृत्तीने निर्माण होत गेली, त्याचप्रमाणे परिस्थिती एमबीएची देखील झाली आहे. त्यातले त्यात 'आयआयएम' सारख्या वा तत्सम नावाजलेल्या संस्थांमध्ये जर एमबीए केले, तर फायद्याचे होऊ शकते. परंतु त्याचीही सध्या शाश्वती नाही. त्यात भर म्हणून बीबीए, बीएमएम, बीसीए, बीएफएम.. अशासारख्या विविध पदव्यांचे जाळे विद्यार्थ्यां समोर घोंगावत आहे. त्यामुळे खरोखर काय केल्याने आपले आर्थिक व सामाजिक भवितव्य सुधारेल याची खात्री उरलेली नाही. आधीच नोकऱ्या मर्यादित, बेकारी वाढत चाललेली, नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यताही धूूसर आणि स्पर्धा तीव्र यामुळे खरोखर आगामी पिढीचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. ह्या पार्श्वभूमीवर सोबतचे एमबीए प्रवेशासंबंधीचे वृत्त प्रत्येक इच्छुक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी वाचावे आणि मगच निर्णय घ्यावा, अशी एकंदर स्थिती आहे. एका महत्त्वाच्या विषयाला योग्य तऱ्हेने ईथे वाचा फोडली आहे !":💐 ######## 👍"छाप पडलेले शब्द-4 D !":👌 👍" मुंबईमधील लोकल ट्रेनचा जीवघेणा प्रवास !":👌 💐 "मुंबई ही देशाची राजधानी असल्यामुळे संपूर्ण देशांमधून अनेक लोक मुंबईकडे रोजगारासाठी धाव घेतात. गेल्या 50 /60 वर्षात तर माणसांंचे लोंढेच्या लोंढे आल्यामुळे, चिंचोळे बेट असलेल्या मुंबई शहरावर प्रचंड लोकसंख्येचा भार पडला आहे. त्यामुळे अर्धी अधिक मुंबई झोपडपट्ट्या आणि लोकवस्ती सर्व दूर उपनगरांमध्ये अशी स्थिती आहे. आज मुंबईची दाटीवाटीने राहणारी लोकसंख्या 2 कोटी व घनता 73 हजार दर चौरस मैल एवढी प्रचंड झाली आहे. ती 1970 मध्ये 58 लाख होती. पश्चिम रेल्वेने डहाणूपासून,तर मध्य रेल्वेने कर्जत कसाऱ्या इतक्या दूरवरच्या अंतरावरून माणसं कामासाठी मुंबईकडे प्रवास करत असतात. दररोजचे जवळजवळ तीन ते चार तास त्यांचे अशा प्रवासातच जातात. त्या मानाने लोकल ट्रेनची सुविधा बिलकूूल चांगली नाही. उलट मेंढरं कोंबून भरावी त्याप्रमाणे लोकल ट्रेनमध्ये अक्षरश: लोंंबकळत माणसं जात असतात आणि हे चित्र काही गेल्या 50/ 60 वर्षात बदललेलं नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बस टॅक्सी ऑटो रिक्षा अशा अनेक सार्वजनिक वाहनांच्या सुविधा उपलब्ध असूनही, मुंबईमध्ये जाण्या येण्यासाठी अर्ध्याहून अधिक माणसं लोकल ट्रेनचाच उपयोग करतात. विशेषत: महिलांची गर्दी ही खरोखर चिंताजनक अशा अवस्थेत प्रवास करते. शिवाय सगळ्यात महत्त्वाची मुंबई शहराची बाब म्हणजे आणि लोकल ट्रेनच्या व्यवस्थेमधली बाब म्हणजे टॉयलेट किंवा स्वच्छतागृहांची प्रचंड कमतरता ! त्यामुळे विशेषतः महिलांना कठीण जाऊन त्यांना त्रास होतो. त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. स्वातंत्र्य मिळाल्यापासून 75 वर्षांमध्ये इतकी प्रगती झाली, उंच उंच इमारती उठल्या,परंतु लोकल ट्रेनची सेवा मात्र जशीच्या तशीच आहे विलंबाने धावणारी, आणि दररोज अनेक जीवांचे प्राणांशी खेळणारी. लोकल ट्रेनच्या प्रवासामध्ये एका वर्षांमध्ये जितकी माणसं मरतात तो आकडा बघून खरोखर कोणालाही शरम वाटावी. चार लाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या व्यवस्थेमध्ये सहा लाईन/आठ लाईन अशा करून जास्तीत जास्त लोकलस् उपलब्ध करणं अत्यावश्यक आहे. त्यातले त्यात महिलांचे डबे थोडेफार वाढले, खास महिलांसाठी देखील लोकल ट्रेन निर्माण झाल्या,12/ 15 डब्यांच्या लोकलही सुरू झाल्या. हे जरी खरे असले तरी सोबतच्या वृत्ताप्रमाणे महिलांची लोकल ट्रेनने प्रवास करण्याची अवस्था किती दयनीय आणि चिंताजनक आहे ते समजले अक्षरशः War footingवर ही व्यवस्था ताबडतोब सुधारली पाहिजे असं वाटतं !":🤣 ##### 👍"छाप (पड)लेले शब्द-5D !":👌 👍" सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा !":👌 🤣 "आरोग्य आणि शिक्षण या अत्यंत महत्त्वाच्या अशा क्षेत्रांकडे दुर्लक्ष होत गेले, तर एकंदर भौतिक प्रगती कितीही झाली तरी, प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसांचे जीवन कितपत सुसह्य होणार याची शंका वाटते. एकूण अर्थसंकल्पात आपण आरोग्य आणि शिक्षणावर त्यामानाने समाधानकााक पैसा खर्च करत नाही. मनुष्यबळाची शारीरिक, मानसिक क्षमता आरोग्य विषयाशी संबंधित, तर मनुष्यबळाचे कौशल्य आणि योगदान हे शिक्षणाच्या पायावर अवलंबून. अशा वेळेला अवाढव्य मनुष्यबळाचा आपण योग्य तो उपयोग करून घेत नाही, असेच म्हणायला नको कां? सोबतच्या वृत्तामध्ये महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचे कसे तीन तेरा वाजले आहेत, आणि संबंधित 40 वाहने एकाच जागी पडून आहेत, ह्याचे आरोग्य विभागाला काहीही सोयर सुतक नाही, ही कुणालाही व्यथित करणारी बाब आहे. त्यामुळे दुर्गम भागातील माणसांचे, विशेषत: आदिवासींचे काय हाल होत असतील, याची कल्पना करता येत नाही. पण शहरातील आपापल्या वातानुकूलित केबिनमध्ये मशगूल असणाऱ्या मंडळींना त्याचे काय सोयर सुतक ! अशा तऱ्हेची वृत्ते वाचनात आली की, संवेदनशील मन व्यथीत होते आणि वाटते, 'हम कभी भी नही सुधरेंगे !":🤣

" सोशल मीडियावर ची मुसाफिरी-मनोरंजक कोडी

1 🚩👣🚩👣🚩👣🚩👣🚩 *आषाढी एकादशी निमित्त अभंग स्पर्धा. पाहुया कोण जास्तीत जास्त अचूक अभंग ओळखतो......* १) *v2🤰za*👶👶👶👶 २) 👌👆 *d ✈️🕴v🖥ri* ३) 🌳🌲🌴🌱 *a* 🤰🤝🐯🦁🐵🦉🐘 ४) 🌾 *la🙏🚶c🤰za🚪i* ५) *👤ya🌾la👆za* 🚪🚶‍♀ ६) *🙏🤰zav2👤la* ७) *🤣che🌊🤣t🎨* ८) *👏👄🐤🦎lila💃🤰za🎤e* ९) *⛹🏻‍♀🏓🤼‍♀👨d🚶la-wall 1* ☕👦 १०) *🙋‍♂🤰🏡i🐼i🙏👆🙏za👈 @ a* ११) *🐼ri 🏡🤝🐼u🎨* 👏👍👏👍👏👍👏👍👏 2 रंजक शब्द कोडे चला मंडळी खाली दिलेल्या शब्दांच्या दोन उत्तरातून एक चपखल शब्द सांगायचा आहे. उदा: भुजा+दशा उत्तर : हस्तगत १ राघव +शर २ एक डझन + बुध्दी ३ अजगर +व्रत ४ पध्दत+ माळ ५ सत्व +दरवाजा ६ बंधू+ बी ७ त्वेष + वाळवंट ८ नित्य + थंड ९ मोल + मारल्याची खूण १० जल + कवाड ११ रज + गर्दभ १२ फट + समय १३ चाकर + आकलन १४ भाई + पर्वत १५ पृथ्वी+ बूड १६ मौक्तिक + तल्लीन १७ बरोबरी + काकडा १८ नेहमी+ पवित्र १९ उत्सव + वासर २० पोबारा+ मार्ग २१ संकट + प्रत्येक २२ डोके + तिढा २३ पाणी + खंदक २४ हस्त + वजन २५ वाईट सवय + हात 🙏🙏🙏🙏 सौ क्षमा एरंडे 🙏🙏🙏🙏🙏🙏 3 इंग्रजी शब्द मराठी नाटक कोडे जरा मजेशीर क्लू दिले आहेत इंग्रजीतून. तर त्या अर्थावरुन *५ अक्षरी नाटकांची नावे* शोधायची आहेत. नाटकं इंग्रजी नाहीत. जुनी नाटकं शोधायला थोडा ताण द्यावा लागेल. बघा तर. उदाहरणादाखल एक सोडवले आहे. १. Only one glass. - एकच प्याला. २. I am not that . toh me navhe ३. Honour dishonor - Maan apman ४. Golden scale. ५. Acceptance of hand. ६. Queen of music. Swarsamraddhni ७. 52 drawers. Bavankhani ८. Good work impact. ९. Line of hills. १०. Babies of sun. Suryachi pille ११. Wish of God. १२. Lack of law and order. १३. Non speaking hero. १४. Stamp demon १५. Sweety meera. Meera madhura १६. War bugle.(bigul). १७. Politics leaving. १८. Emotional bond. १९. Burocrat / officer. २०. The girl Shreedevi. २१. That flower queen. Tu ohulrani २२. Cobra circle. २३. The lust circle. २४. Horseface. २५. Wedding handcuffs. Lagnachibedi सगळी मराठी नाटके आहेत. #############

मंगळवार, ९ जुलै, २०२४

#छाप (पड)लेले शब्द-C !":

👍"प्रास्ताविक!":👌 छाप (पड)लेले शब्दांसमवेतची व्रृत्ते येथे upload करता आली नाहीत. परंतु त्यांच्या संदर्भातील निरीक्षणातून आपणास योग्य तो बोध घेता येतील, अशी आशा आहे. 👍"छाप (पड)लेले शब्द-1 !": 👍"Luck favours the Brave-1 !":👌 💐"माणसामध्ये साहस हा एक अत्यंत महत्त्वाचा गुण आहे साहसी माणसे अशक्य ते शक्य करून दाखवतात आणि अशांचे विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील सामावले जातात हे आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या साहसीकृती माणसे सातत्याने करत असतात त्यामध्ये धोका असतो अनिश्चितता असते आणि काळ वेळ श्रम आणि अर्थातच पैसा यांचा पुष्कळ खर्च होतो असे असले तरी साहसिक कृती जगावेगळे सहाशे कृती करण्यासाठी माणसे नेहमीच तत्पर असतात इंग्लिश खाडी फोन जाणे असो एव्हरेस्ट शिखरावर आरोहन करणे असो, सायकलने काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रवास करणे असो अनेक प्रकारच्या धोकादायक साहसीकृती आपल्याला केलेल्या दिसतात सोबतच्या वृत्तांमधली देखील लंडन ते ठाणे हा कारणे प्रवास करण्याचा जो यशस्वी प्रयत्न झाला तोही याच प्रकारचा आपल्या आईला भेटायला जाण्यासाठी हे ग्रस्त एका मित्रासमवेत लंडन पासून कारणे अनेक दिवस अनेक देश पार करून ठाण्याला पोहोचतात ही खरोखर कौतुकाची बाब आहे. अशी साहसी माणसे अवतीभवती असतात हाच तर जीवनामधला एक अभिमानाचा रोमांचक अनुभव आहे ! NO WONDER, Luck favours the Brave !":💐 ######### 👍"छाप (पड)लेले शब्द-2 !":👌 👍"Luck favours the Brave-2!":👌 💐"माणसाचे आयुष्य खूप गुंतागुंतीचे असते कुणाच्या आयुष्यात कशातरी ते कसोटी पाहणारे प्रसंग येतील याची कल्पनाच नसते आणि आयुष्याची धुरी जर बळकट असेल तर कल्पना करता येणार नाही अशा अनेक जीव घेण्या संकटांमधूनही एखादी व्यक्ती जेव्हा सई सलामत बाहेर येऊन ताठ मानेने आपले जीवन जगते आणि तेही थोडे थोडके नाही तर नव्वदीप पार करूनही त्याच उर्मीने जीवनाला सामोरे जाते अशा तऱ्हेचे वृत्त सोबत आहे आणि ते खरोखर कोणालाही थक्क करणारे असेच आहे साहजिकच आपल्याला म्हणावेसे वाटते: "Luck favours the Brave !":💐 ####### 👍"छाप (पड)लेले शब्द-3 !":👌 👍"And Show Must Go on !":👌 💐"सध्या करमणूक क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत एकेकाळी नाटक सिनेमांमध्ये जाणे म्हणजे फुकट गेले असे समजण्या ते दिवस होते आणि एकंदर आयुष्यातील आर्थिक परिस्थिती देखील करमणूक क्षेत्रातील माणसांची तेवढी चांगली नसेल पण गेल्या काही दशकांमध्ये विविध प्रकारचे माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे करमणूक क्षेत्राचा विस्तार प्रचंड झाला आहे नाटक सिनेमा टीव्ही मालिका ओटीपी वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स यामधून विविध प्रकारच्या कलाकृती सादर केल्या जातात साहजिकच कलाक्षेत्रामध्ये खूप संधी निर्माण झाल्या आहेत साधारणपणे चित्रपट क्षेत्रामध्ये पुरुष अभिनेत्यांच्या तुलनेत स्त्री अभिनेत्री यांचे कारकीर्द मर्यादित असे कारण विवाह झाल्यावर त्या अभिनेत्रीला एक तर काम करू दिले जायचे नाही किंवा जरी दिले तरी वयस्कर व्यक्तीच्या भूमिका निवडावून कराव्या लागत त्यामानाने पुरुष नट पन्नाशी आले तरी देखील नायक म्हणून चमकत असं सोबतच्या वृत्तामध्ये कोणी एकेकाळी नावाजलेल्या नायिका म्हणून गाजलेल्या अभिनेत्री आपली दुसरी इनिंग किती दिमाखाने आणि दमदारपणे सादर करायला सज्ज झाले आहेत आणि त्यांना माध्यमांच्या विस्तारामुळे ओटीपी मालिकांमध्ये किती चांगल्या चांगल्या भूमिका मिळत आहेत ते पाहून 'Show Must Go on' असे जे म्हणतात ते पटायला लागते !":💐 ####### 👍"छाप पडलेले शब्द-4 !": 👌 👍"निसर्गरम्य पाम बीच रोड !":👌 👍"चित्रकार धुरंधर मार्ग !":👌 👍"प्रभावशाली कामगिरीची आठवण !":👌 👍"सर पोचखानवाला रोड !":👌 💐"माणसाचे आयुष्य एकंदर कालप्रवाहाच्या तुलनेत मर्यादितच असते अशा वेळेला जे काही आयुष्य लाभते त्यामध्ये समाजासाठी देशासाठी विशेष योगदान करणाऱ्या व्यक्तींची आठवण ठेवणे गरजेचे असते अशावेळी विविध शहरांमध्ये आपल्याला ध्यानात येईल की रस्त्यांना नावे देताना त्या दिग्गजांची आठवण ठेवली जाते आणि त्यांच्या नावाचे रस्ते स्पर्धा पऱ्यांच्या शहरांमध्ये असतात उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीन व्यतिरिक्त देखील आपापल्या क्षेत्रात आपल्या पंचकरोची किंवा आपल्या समूहासाठी काही ना काही विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीही जागोजागी आपल्याला आढळून येतात त्यांची देखील आठवण ठेवण्याच्या दृष्टीने शहरातील त्यात त्यांचे जिथे वास्तव्य होते किंवा त्यांनी जिथे कार्य करतो तो केले त्याची दात म्हणून रस्त्यांना त्यांची नावे दिली जातात ही सगळी माहिती नियमितपणे महाराष्ट्र टाइम्सच्या नावलौकिक या लोकप्रिय सदरामध्ये सुयोग्य अशी छायाचित्रे देऊन प्रसिद्ध केली जाते शहरात मुंबई शहराचा इतिहास म्हणून इतिहासातील पाऊलखुणा ह्या अशा तऱ्हेने नोंदविल्या जातात ही एक चांगली गोष्ट आहे जुन्या व्यक्तींना पुनःप्रत्येचा आठवणींचा आनंद आणि नवीन पिढीला आपल्यामध्ये कोण कसे होऊन गेले त्यांची आठवण असे दुहेरी फायदे अशा तऱ्हेच्या सदरामधून होतात सोबत अशाच रस्त्यांविषयी मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्रुत्तांत आहे !":💐 धन्यवाद श्री सुधाकर नातू

रविवार, ७ जुलै, २०२४

@बिंब प्रतिबिंब- वैचारिक जुगलबंदी !"

"बिंब प्रतिबिंब-वैचारिक जुगलबंदी !": सोशल मीडिया वरती विविध प्रकारच्या विचारांची देवाणघेवाण होत असते त्यातीलच ए आणि बी अशा दोन व्यक्तींमधील वैचारिक जुगलबंदी ही बिंब प्रतिबिंब अशा स्वरूपात पुढे दिली आहे आपल्यालाही ती विचार प्रवर्तक वाटेल अशी आशा आहे अर्थातच ही त्या त्या व्यक्तींची व्यक्तिगत मते आहेत: B: 😃🙋🏼‍♂️ *आज सर्व उपद्रवी, देशविघातक आणि गुंड प्रवृत्तीच्या , साधारण कुवतीच्या तथाकथित लोकप्रतिनिधींना त्यांच्या निंदनीय वागणुकीमुळे निलंबित केले गेल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात दर्जेदार कामकाज झाले आणि ते आत्ता पण चालु आहे. सादर केलेल्या सर्व विधायकांवर साधकबाधक चर्चा झाली, ज्या विरोधी सभासदांचे त्यांच्या सभ्य वर्तनामुळे निलंबन झालेले नाही त्यांनी त्यात उत्साहाने भाग घेतला, आपल्या परीने सरकारला सुचना केल्या, सरकारने त्यांचे विचार शांतपणे ऐकून घेतले आणि त्यावर प्रत्यक्ष भेटुन विचारविनिमय करण्याचे आश्वासन दिले. देश आणि जनहितासाठी संसद कशी चालावी याचा आज प्रत्यय आला. जय भारत.* 👍🏽 A : जे होऊन गेले, जे होत आहे तसे आजतागायत वर्तन झाले नव्हते. साधे निवेदन करण्याचे टाळणे हा पळपुटेपणा होता. B: 👆🏾👆🏾👆🏾👆🏾 *राजीव गांधीच्या काळातली ही घटना आहे. ६३ खासदारांना त्यावेळी अध्यक्षांनी निलंबित केले होते. याहुन महान घटना म्हणजे १९७५ साली इंदिरा गांधींनी संपूर्ण विरोधकांना नुसते संसदेतुनच बाहेर काढले नव्हते तर त्यांना अनेक दिवस तुरुंगात टाकले होते. अपुऱ्या आणि चुकीच्या माहीतीच्या आधारे निष्कर्श काढु नयेत. सत्य कधी लपत नाही.* A : जवळ जवळ तशीच मानसिकता दिसत, तीच पुनरावृत्ती सध्या होत आहे. B: *यात पण परत अज्ञान आणि अपुरी माहीती दिसुन येते आहे. दोन्ही संसदेचे स्वामित्व आणि अधिकार दोन्ही अध्यक्षांचे असतात. म्हणुनच ओम बिडला यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारली, निवेदन केले आणि जाच कमिटी स्थापन केली. गृहमंत्र्यांचा याच्याशी काहीही संबंध नसतो. एव्हढे होऊन देखील गरज नसताना सरकारतर्फे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी निवेदन केले. या प्रकरणी गृहमंत्री किंवा पंतप्रधानांनी निवेदन करण्याचे काहीच औचित्य नाही. चौकशी पुरी झाल्यावर संसदेत यावर सविस्तर चर्चा नक्कीच होईल आणि त्यावेळी हे सर्व विरोधक बाहेर पळुन जातील कारण निष्कर्ष चौकानेवाले असतील हे निश्चित, जरा धीर धरा.* B: *शाळेत बिघडलेले विद्यार्थी शिक्षकांपुढे त्यांच्या टेबला भोवती नाचून अर्वाच्च भाषेत घोषणा द्यायला लागले तर ते शिक्षक काय करतील? त्या बिघडलेल्या मुलांना वर्गाबाहेर अंगठे धरुन उभे करतील, तेच इथे झाले आणि यापुढेही होईल याची आशा आहे. हे गुंड देशविकासासाठी कुठलेही योगदान देऊ शकत नाहीत, हा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे.* A : हे प्रतिपादन हास्यास्पद आहे. ज्या मंत्र्यांचा संबंध नाही, त्यांना पुढे करणे हा जबाबदारी टाळण्याचा अट्टाहास. अंगाशी शेकले की लपायचे हा प्रकार, सर्वोच्च दोन नेत्यांकडून नेहमी घडत आला आहे. A : घुसखोरीची घटना कां घडली, त्याची जबाबदारी टाळल्यावर दुसरे काय घडणार? येथे 'शिक्षकांनी संबंधित जबाबदार महाशयांना उत्तर द्यायला भाग पाडणे अपेक्षित होते. B: 🙋🏼‍♂️ गृहमंत्र्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. उद्या राष्ट्रपतींनी यावर निवेदन द्यावे अशीही मूर्ख मागणी होईल. या गुंडांचे तमाशे देशाने खुप पाहीले आणि सहन केले. यापुढे ते होणार नाही. सरकारचा आक्रमक पवित्रा पाहुन ही मंडळी आता बिथरली आहेत. त्यांनी आज पंतप्रधानांची भेट मागितली. पंतप्रधानांनी सर्व पक्षीय फ्लोअर मॅनेजरांबरोबर संवाद साधला. यातुन काय निष्पन्न होते ते बघायचे. A : केवळ आणि केवळ निरंकुश सत्तेसाठी विधिनिषेधशून्य राजकारण करणाऱ्यांचा निषेध करावा तितका थोडाच. B: शिक्षकांपुढे "जबाबदार महाशय" नव्हते तर बिघडलेले गुंड होते. तरीही सुसंस्कृत शिक्षकाने हात जोडून विनवुन पाहीले व शेवटी बडगा उचलला. खरेतर यांना मार्शलांच्या हस्ते उचलुन बाहेर टाकायला पाहीजे होते. संसदेचे रुल बुक आहे. सर्व त्यानुसारच चालते. थोडक्यात बिघडलेल्यांना त्यांची जागा दाखवण्यात आली. जय हो. B: *देशविघातकांच्यावतीने निषेध करत रहावा, नैतिकतेच्या गप्पा मारत राहाव्यात, देशाला त्याकडे बघायला आता वेळ नाही आणि गरज पण नाही. जय हो.* 😂😂😂😂😂😂 B: *काँग्रेसचा सध्याचा महान तरुण नेता गेली काही वर्षे एका विशिष्ट उद्देशाने, आपल्या संरक्षक यंत्रणेला चुकवून, सातत्याने विदेशी जातो. जाॅर्ज सोरोस आणि कंपनी सारख्या भारतविरोधी बदमाषांशी हातमिळवणी करतो आणि हार्वर्ड, केंब्रिज सारख्या विद्यापीठातल्या डाव्या जहाल लोकांच्या मदतीने भारत विरोधी वक्तव्य करतो. यासंबंधीची जबाबदारी आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची आहे. कारण तो देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. पण ते संसदेत नसल्याने गृहमंत्री त्यांच्यावतीने निवेदन करु शकतात. अशा देशविघातक अॅक्टीविटींवर निवेदन करण्याची मागणी या गुंड मंडळींनी सरकारकडे कधी केली आहे का? आपली तरी तशी इच्छा आहे का? आपल्याला ते आवश्यक वाटते का? याचे उत्तर कोणीही देणार नाही.* A : नैतिकतेला कस्पटासमान समान मानणारे, देशविघातक कोण हे ठरवणार, ह्यासारखा विनोद नाही. Remember When Character is Lost, everything is LOST B: 😂😂😂😂😂😂 नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी देशविघातकांची बाजु घेऊन कॅरॅक्टर की काय ते सांभाळत रहावे, जागृत झालेल्या देशाला त्याची आता पर्वा नाही, गरज पण नाही. आज संसदेत पास झालेल्या विधेयकांत देशविघातकांची आणि आतंकवाद्यांची पहिल्यांदाच व्याख्या करण्यात आली आहे. आता ही मंडळी कायद्याच्या कचाट्यातुन सुटणार नाहीत. आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारला असा कायदा करण्याचा सल्ला दिला होता. जय हो. 👍🏽😂 B: *आज देशांत "तेलगु देसम" "बिजु जनता दल " यासारखे भाजप विरोधी पक्ष आहेत. ते संसदेत पण आहेत. त्यांची अनेक मुद्यांवरची मते भाजपपेक्षा वेगळी आहेत. ती ते सर्वत्र खुलेपणाने मांडतात. सरकार त्यांच्या सुचना आवर्जून विचारात घेते. कारण " ते देशाच्या विभाजनाची योजना, इच्छा, कारस्थाने करत नाही ". त्यामुळे त्यांना कोणीही कधीही "देशविघातक " म्हणत नाही. हा फरक आहे. आजच्या संसदेतल्या चर्चेदरम्यान त्यांच्या प्रतिनिधींनी आपली मते सविस्तरपणे मांडली. त्यांनी सुचवलेल्या सुधारणा सरकारने सहज स्विकारल्या. डाॅ. सन्मित पात्रा या BJD च्या खासदाराने खुप वेगळी भुमिका मांडली. सरकार पक्षाने त्याचे खुल्या मनाने स्वागत केले, कौतुक केले. असे हे गुंड करु शकतात का? त्यांना १० मिनीटे मुद्देसुद भाषण पण करता येत नाही. असो. याचा विचार करुन आपली शक्ती आणि वेळ घालवायची गरज नाही.* 😂😂😂😂😂 A 😇 "आजच्या महाराष्ट्र टाइम्स 'संवाद' पुरवणीमध्ये, सध्या गाजत असलेल्या खासदारांच्या घाऊक निलंबनासंबंधीचे विडंबनात्मक स्फूट वाचण्यासारखे आहे आणि ते डोळ्यात अंजन घालणारे आहे, एकाधिकारशाही फार दूर नाही, हे ध्वनीत करणारे !": 😇 B 🙋🏼‍♂️ *वाह् वाह् मस्तच. निलंबित खासदारांपैकी काही उपद्रवी गुंड तुरुंगाच्या वाटेवर आहेत. मजा पहावी नाहीतर अश्रु ढाळावे. ज्यांना विडंबनात्मक लिहिण्यासाठी आणि ज्यांना ते वाचण्यासाठी फावला वेळ आहे त्यांनी आपले आत्ममनोरंजन करत राहावे. देशाला यांच्याकडे बघायला वेळ नाही आणि कारण पण नाही. देशात सर्वागिण बदलाचे वारे वाहातच राहणार आहेत. जय भारत!* A: 😂😂😂😂😂😂 🤗 अंध भक्तगण किती एकांगी, पूर्वग्रह दूषित द्रुष्टिकोन ठेवून त्यांच्या छुप्या मनसुब्यांची पाठराखण करतात, ते ह्यावरून ध्वनित होते आणि हेच देशाचे दुर्दैव आहे !" Ii इत्य अलम् ii 🤗🤗🤗🤗🤗 A: देशांतर्गत जी मंडळी केवळ सत्तेसाठी धाकधपटशा दाखवून व इतर काही अनुचित माध्यमातून आपल्या विरोधकांना नमवून, आपल्या समवेत घेण्याचे राजकारण करतात, त्यांचे कसले व कां गोडवे गायचे? महाराष्ट्रातील उदाहरण अशोभनीय नव्हे काय? 🤗🤗🤗🤗🤗

"छाप (पड)लेले शब्द-B !":👌

👍"प्रास्ताविक!":👌 छाप (पड)लेले शब्दांसमवेतची व्रृत्ते येथे upload करता आली नाहीत. परंतु त्यांच्या संदर्भातील निरीक्षणातून आपणास योग्य तो बोध घेता येतील, अशी आशा आहे. 👍"छाप (पड)लेले शब्द-1!":👌 👍"जिनोम कुंडली व जन्मपत्रिकेचे रहस्य!":👌 💐"मेडिकल सायन्स आता वेगाने प्रगत होत चालले आहे. विविध प्रकारचे औषधोपचार, त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा वापर याद्वारे माणसांचे आरोग्य आणि आयुर्मान सुधारत चाललेले आपण पाहत आहोत. त्यामधील माणसाच्या शरीरातील सूक्ष्मातीसूक्ष्म असा 'डीएनए' आता सगळ्यांनाच परिचित झालेला आहे. सोबतच्या वृत्तावरून संशोधकांनी इतकी मजल गाठली आहे की, माणसाच्या शरीरातील पेशींमधील गुणसूत्रांची जी मुळाक्षरे चार असतात त्यांच्या वेगवेगळ्या क्रमाप्रमाणे माणसाची जिनोम कुंडली तयार करता येते. अर्थातच जन्माच्या वेळेला त्याचा आयुष्याचा पटच जणू काही लिहिला असतो अशी ती संशोधनाची दिशा आहे. माणसाला कोणत्या वयात कोणते रोग होण्याचा संभव आहे याचे निदान अशा कुंडली वरून करता येईल अशी ती संकल्पना आहे. त्यावरून आठवण झाली की, चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिषशास्त्रामधील जन्मकुंडली, चंद्राची जन्माच्या वेळी असलेली अंशात्मक स्थिती आणि त्यावरून माणसाच्या जीवनातील 9 ग्रहांच्या महादशांचे कोष्टक. एकूण नऊ ग्रह आणि जिनाम कुंडलीतील मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे येथेही त्या नवग्रहांच्या महादशा पुढील प्रमाणे विशिष्ट क्रमाने येत असतात: केतू सात वर्ष, शुक्र वीस वर्ष, रवी सहा वर्ष, मंगळ सात वर्ष, राहू 18 वर्ष, गुरु सोळा वर्ष, शनि 19 वर्ष आणि बुध सतरा वर्ष. असा एकूण 120 वर्षांचा महादशांचा क्रम असतो. प्रत्येकाच्या आयुष्याची सुरुवात कोणत्या महादशेपासून सुरू होईल ते चंद्राच्या जन्मावेळीच्या स्थितीवरून काढता येते. तसेच या विषयांमधील वैशिष्ट्य असे की, वरील क्रमाने जशा महादशा येतात, त्याच क्रमाने प्रत्येक ग्रहाच्या अंतर्दशाही तशाच येतात. त्यापुढे ग्रहांच्या सूक्ष्मदशा देखील त्याच क्रमाने येतात. त्यापुढे जाऊन अतिसूक्ष्मदशा देखील काढता येऊ शकतात. ज्याप्रमाणे ही जिनोम कुंडली बनली आहे, त्याचप्रमाणे माणसाच्या एकंदर आयुष्याच्या प्रवासाचे निदान महादशांच्या या क्रमावरून ध्वनीत करता येऊ शकते. जन्मपत्रिकेमध्ये ज्या प्रकारे प्रत्येक ग्रहाची स्थिती असेल, त्याप्रमाणे त्या त्या महादशांचे/अंतर्दशा/सूक्ष्मदशा... फळे, कोणत्या स्थानाचे ते ग्रह अधिपती आहेत त्याप्रमाणे देता येऊ शकते असे ज्योतिष शास्त्र सांगते. जन्मानंतर सहाव्या दिवशी सटवाई येऊन बालकाच्या कपाळावर त्याचे आयुष्याचे फळ जशी लिहिते, असे पूर्वापार मानत आलो, तशीच ही संकल्पना ! साहजिकच या वृत्तामुळे आधुनिक वैद्यकशास्त्र आणि डीएनए वरून जीनोम कुंडली आणि भारतीय ज्योतिष शास्त्रातील ग्रहदशांची एकंदर सांगड घालून ह्या प्रकारच्या संशोधनाला नवी दिशा देता येऊ शकेल. निश्चितच अशा तऱ्हेचे संशोधन होणे हे खरोखर गरजेचेआहे, हेच खरे !":💐 ########### 👍"छाप (पड)लेले शब्द-2 !":👌 👍"डोळ्यात अंजन घालणारा लेख !":👌 भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये पाचवी आहे आणि लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर जाईल, तसेच जीडीपी इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे वगैरे वगैरे ढोल सातत्याने पिटले जातात आणि आपण आर्थिक मजबूत असण्याचा व्रुथा अभिमान बाळगला जातो. जिथे एका मागून एक पूल पडतात, अंधश्रद्धेच्या नांवाखाली बुवाबाजी करणाऱ्यांच्या मागे लागून प्रचंड गर्दीत धक्काबुक्की होऊन शंभराहून अधिक माणसे मृत्युमुखी पावतात, जगामध्ये दरडोई उत्पन्नाच्या 139 व्या क्रमांकावर असणारा आपला देश, जिथे 80 कोटी लोकांना पाच वर्ष मोफत अन्नधान्य पुरवण्याची वेळ येते किंवा जेथे एखाद्या राज्यात 'लाडकी बहीण' सारख्या योजना राबवण्याची आणि पंधराशे रुपये दरमहा देण्याची योजना करावी लागते, त्यासाठी हजारो गरजूंच्या रांगा लागतात, अशा कितीतरी गोष्टी असताना आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या मजबुतीचा अभिमान बाळगणं, गर्व करणे ही आत्मवंचना आहे. मुठभर 'आहे रे' आणि सुपभर 'नाही रे'वाले असणाऱ्या आणि भयावह विषम आर्थिक परिस्थितीत 70 टक्क्यांहून अधिक लोक जीवन जगण्याची लढाई करत असताना, आपण जागे होणे गरजेचे आहे. जोपर्यंत तळागाळातल्या माणसांना सन्माननीय जीवन जगण्याची परिस्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत या उत्तम जीडीपी वाढ, आर्थिक मजबुती वगैरे वल्गना करणे थांबवायला हवे. सोबतच्या लेखामध्ये हीच वस्तुस्थिती विस्ताराने मांडली आहे आणि आपले विकासाचा मॉडेल हे कसे अनुचित आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच सर्वांसाठी तसेच प्रामुख्याने अर्थतज्ञांसाठी हा लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे हे निश्चित !": ######### 👍"छाप(पड)लेले शब्द-3 !":👌 👍"माणूसकी अजून जिवंत आहे !":👌 💐"सगळीकडे भ्रष्टाचाराचा भस्मासुर, वाढती गुन्हेगारी त्यात भर म्हणून सायबर क्राईम सारखी आर्थिक गुन्हेगारी, फसवणूक, हीट & रन सारख्या भयानक अमानुष घटना, गर्दीतील चेंगराचेंगरी मध्ये शेकडो निरपराधांचा मृत्यू.... आणि अशाच अक्षरशा निराशा पसरवणाऱ्या बातम्या आणि घटना या माहोलमध्ये कधीकधी वाळवंटातील एखाद्या मृगजळाप्रमाणे अथवा ओव्यासीस प्रमाणे काही बातम्या समजतात त्या खरोखर माणुसकी अजून जिवंत आहे हेच दर्शवतात त्यामधील दहावीच्या परीक्षा मधून अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये निराश न होता नाव में न होता जिद्दीने उत्तम अभ्यास करून 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनेक मुलांचा आणि कुटुंबांचा परिचय वर्तमानपत्रातून महाराष्ट्र टाइम्स देत आहे आणि त्यासाठी हजारो मदतीचे हात विविध ड्रॉप बॉक्सच्या रूपाने या हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मुलांना देत आहे ही खरोखर समाधानाची बाब आहे तसेच सोबतच्या वृत्तामध्ये असाध्य रोगाने पीडित असलेल्या मुलाला एका नाटकाचा प्रयोग सादर करून, 'फुल ना फुलाची पाकळी' अशा स्वरूपात आर्थिक मदत सादर केल्याची माहिती आहे, खरोखर ही देखील एक मनभावन गोष्ट आहे. अजूनही सारेच काही संपले नाही, "There is Light at the end of the Tunnel" असे म्हणण्यास वाव आहे हेच ह्या साऱ्यावरून म्हणायचे !":💐 ######## 👍"छाप (पड)लेले शब्द-4 !":👌 👍"तंत्रज्ञानाची कमाल-अजून यौवनात मी !":👌 करमणूक क्षेत्रामध्ये रंगभूषा अर्थात मेकअप मधील प्रगतीमुळे एखादा तरुण जसा म्हातारा दाखवता येतो उदाहरणार्थ सारांश या चित्रपटात जेव्हा अनुपम खेर यांनी पदार्पण केले तेव्हा ते केवळ 28 वर्षांचे होते परंतु त्यांना रोल मिळाला भूमिका मिळाली ती 60/65 वर्षाच्या म्हाताऱ्याची त्याप्रमाणे त्यांना घडविण्यात मेकअप पण यशस्वी झाले. अशी अनेक उदाहरणे आपल्याला विविध कलाकृती मधून दिसली आहेत आणि त्यांची स्वीकारार्थही सिद्ध झालेली आहे. एखादा पन्नाशीतला नायक पंचविशीत कसा दिसत असेल त्याची कल्पना करून प्रगत अशा तंत्रज्ञानाद्वारे अर्थात AI- आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करून तो हुबेहूब तारुण्यात जसा असेल तसा दाखविण्याचे कौशल्य आता सिद्ध झाले आहे आणि त्याची प्रचिती आता लवकरच तू भेटशील नव्याने या मालिकेमध्ये सुबोध भावे यांच्या डबल रोल मधून दिसणार आहे तरुणपणी आपण असेच दिसत होतो अशी पावती देखील सुबोधिनी त्यांचे तरुणपणचे चित्र बघून केली यातच सारे आले अशा तऱ्हेचा प्रयोग ईडियट बॉक्स वर मालिक काही मध्ये होत आहे ही खरोखर एक चांगली गोष्ट आहे तसेच प्रगतीची नवनवीन दालने देखील त्यामुळे खुली होतील बालगंधर्व लोकमान्य अशा एकाहून एक सरस चरित्र भूमिका करणारे सुबोध भावे आता 'अजून यौवनात मी !' सांंगत, आपल्या डबल रोल मध्ये काय करामत दाखवतात, ते आता लवकरच सर्व रसिकांना कळेलच. सोबतच्या वृत्तामध्ये त्याच संबंधीची सविस्तर माहिती आहे आणि ती देखील मनोरंंजक आहे !": ############ 👍"छाप (पड)लेले शब्द-5 !":👌 👍"नव्वदीतले 'सावकारी' रहस्य!":👌 मराठी मासिकांमध्ये गेल्या शतकामध्ये हमखास ज्या लोकप्रिय लेखिकांची नांवे आणि साहित्यकृती हमखास असायची. त्यामध्ये श्रीमती इंद्रायणी सावकार यांचे नांव अग्रक्रम असे. आज वयाच्या नव्वदीला येऊनही त्यांचा उत्साह कमी झालेला नाही आणि लेखन हाच ध्यास घेतलेल्यामुळे पुढचे पाच प्रोजेक्ट्स हाता वेगळे कधी होतील अशी त्यांची सध्याची मनस्थिती आहे त्याचेच दर्शन त्यांच्याच या आत्मसंवादरूपी लेखांमध्ये आपल्याला वाचायला मिळते हल्ली गेल्या काही दशकामध्ये प्रत्येकालाच आपले आरोग्य आणि एकंदर व्यक्तिमत्व तरुण राहावे अशी आस निर्माण झाली आहे त्यामुळे जिम आणि योगा असे अनेक प्रयोग माणसं नेहमी करत असतात. शिवाय मेडिकल सायन्सची विस्मयकारी वेगाने प्रगती झाल्यामुळे व विविध प्रकारचे औषधोपचार, त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा वापर याद्वारे माणसांचे आरोग्य आणि आयुर्मान सुधारत चाललेले आपण पाहत आहोत. अशा वेळेला इंद्रायणी सावकार यांच्यासारख्या जेष्ठ लेखिका कडून त्यांच्या दीर्घायुष्याची आणि याही वयात कार्यरत राहणाऱ्या मानसिक स्थितीची रहस्य आपल्याला या लेखातून चांगले मार्गदर्शन करतील अशा या पार्श्वभूमीवर मला माझे Different Strokes ह्या सदरामधील पुढील अमोल बोल आठवतात: 💐"You must live your Life on your own terms; but for that You must understand what's your Life is for-The Purpose. ONCE YOU IDENTIFY IT, THEN ACT !":💐 धन्यवाद श्री सुधाकर नात

गुरुवार, ४ जुलै, २०२४

"मल्लीनाथी-1 !"

"भक्तीतून शक्ती?": भक्ती ही संपूर्णपणे वैयक्तिक आणि खाजगी बाब आहे व असावी. परंतु तिचे जर प्रदर्शन मांडले गेले आणि त्यातून ते प्रदर्शन जर सार्वजनिक रित्या आधुनिक प्रसार माध्यमातून प्रसारित केले गेले तर, ते तितकेसे योग्य कां अयोग्य हे ज्याचे त्याने ठरवायचे. मात्र अशा प्रकारची कृती केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी असू शकते हे मत, कदाचित खोडता येणार नाही. आपल्या जवळच्या सामर्थ्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करता येऊ शकते आणि त्याचा मुद्दामून उपयोग करणे हेही खरेच. परंतु तितकेसे रास्त असते कां? अर्थात् जेव्हा वैयक्तिक सामर्थ्य आणि स्वार्थ कसाही करुन साधण्याची प्रवृत्ती अंगात असेल, तेव्हा अशा प्रकारचे प्रदर्शन करणे भूषणावह आहे असेच समजून ते केले जाते. काळाचा महिमा दुसरं काय! परंतु परिस्थिती बदलू शकते आणि तेव्हां मागे वळून पहाताना तर, हे खेळ अखेर हास्यास्पदही ठरू शकतात, ह्याचे भान ठेवणे अत्यावश्यक होय. ###################### 👍" राजकारणाचा चिखल !":👌 "सध्या राजकारणाचा झालेला चिखल पाहता लोकसेवक म्हणून राजकारणात मिळविण्यासाठी, CET वा NEET प्रमाणे केंद्रीय प्रवेश परीक्षा घेतली जावी आणि त्यामध्ये नीतिमत्ता, विश्वासार्हता, निष्ठा, निस्वार्थता आणि जनहितकारक सेवावृत्ती यांची तपासणी केली जावी. कुठल्याही शैक्षणिक कोर्सकरता अथवा शासकीय, खाजगी नोकरी करता जर स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, तर समाजाचे, देशाचे भवितव्य घडवण्याची निर्णयशक्ती ज्यांच्या हातात आपण देणार, त्यांचे चारित्र्य बावनकशी असलेच पाहिजे. तेच जाणण्यासाठी अशा केंद्रीय प्रवेश परीक्षेची अत्यावश्यकता आहे. तरच कदाचित राजकारणाला योग्य ते वळण मिळून विकास व प्रगती साधली जाईल. After all one must remember: "When Character is Lost, Everything is Lost !" ###################### अखेरचे हे भयावह वास्तव... 😂😂😂😂😂😂 1 अंध भक्तगण किती एकांगी, पूर्वग्रह दूषित द्रुष्टिकोन ठेवून त्यांच्या छुप्या मनसुब्यांची पाठराखण करतात, ते ह्यावरून ध्वनित होते आणि हेच देशाचे दुर्दैव आहे !" Ii इत्य अलम् ii 🤗🤗🤗🤗 2 देशांतर्गत जी मंडळी केवळ सत्तेसाठी धाकधपटशा दाखवून व इतर काही अनुचित माध्यमातून आपल्या विरोधकांना नमवून, आपल्या समवेत घेण्याचे राजकारण करतात, त्यांचे कसले व कां गोडवे गायचे? महाराष्ट्रातील उदाहरण अशोभनीय नव्हे काय? 3 राजकारण हा बिन भांडवली, कुठल्याही प्रकारची अर्हता असण्याची आवश्यकता नसलेला, सगळ्यात फायदेशीर धंदा बनला आहे, हे दुर्दैव नव्हे कां? 4 परीक्षे"चा खराखुरा निकाल वेगळा, आणि अंदाज वेगळा "निकाल" अजून लागलेला नाही, म्हणून कुणी अर्ध्या हळकुंडाने पिवळे जसे होऊ नये, तसेच निराश होऊन देखील कुणी पाणी पाणी करू नये! घोडामैदान जवळच आहे. वाट बघा. शेवटी, कुणाची तरी वाट लागायची आहेच! 5 What is the State of Indian Economy ? 1950 US dollar =Rs 4.79 1924 US dollar = Rs83.15 🤗🤗🤗🤗🤗 ह्या सर्व मल्लिनाथीनंतर आपणास काय वाटते ?.... धन्यवाद श्री सुधाकर नातू

बुधवार, ३ जुलै, २०२४

"बोल अमोल-146 ते 171 !":

💐II (अ) मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-147 !":👌 💐"आपल्या वाटेला आले आहे, ते काम मनापासून व कुरकुर न करता, उत्तम रितीने करणे एवढेच नाही, तर त्यामध्ये सुधारणा करत अधिक चांगल्या परिणामांची आस धरत, सातत्याने करत राहणे ही प्रवृत्ती हल्ली दुर्मिळ होत चालली आहे. त्याउलट कर्तव्यापेक्षा हक्क जास्त महत्त्वाचे मानणारे, स्वार्थी, कामचुकार अधिक संख्येने वाढत आहेत. सर्वंंकष विळखा घालणाऱ्या भ्रष्टाचाराचे मूळ तिथेच आहे. नैतिक अधोगती हीच खरी आपली समस्या आहे !":💐 ##### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-147!":👌 💐"माणसाच्या आयुष्यामध्ये वयोमानपरत्वे, अपेक्षा, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या ह्या बदलत जात असतात. त्या त्या वेळी त्यांचे अचूक निदान ज्यांना होते आणि जे त्याबर हुकूम वागतात, ते आयुष्यात बहुश: यशस्वी होतात. जरा जरी कुठल्याही एका गोष्टीची चूक झाली, तर आयुष्याची गाडी भरकटत जाऊ शकते !":💐 ###### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-148 !":👌 💐 "दररोज सकाळी, काल आपण कोण कोणती कामं, यशस्वी केली त्यांची न चुकता नोंद ठेवणं, अत्यंत उपयुक्त असते. आपला वेळ आपण कसा वापरला हे त्यावरून समजून, सातत्याने आपल्यांत सुधारणा करण्याची प्रेरणा तर मिळतेच, पण त्याच बरोबर जी कामं राहिली, त्यांना प्राधान्यही देता येते !":💐 ##### 💐II (अ)मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-149 !":👌 😇 "माणसाला माणसाची सोबत नकोशी होत चालली आहे, आबालवृद्धांपासून प्रत्येकाला स्वतःची अशी स्पेस हवी, हे खूळ वाढतच चालले आहे. त्यामुळे माणसं ही बेटं बनत चालली आहेत, चहुबाजूने स्वतःच्याच कोशात वेढलेली ! मानवजातीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने व विकासाच्या दृष्टीने हे एक अवलक्षण नव्हे कां? असं कां घडावं? तंत्रज्ञानाच्या अक्राळ विक्राळ पाशांमुळे? की, जीवन जगण्याच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करण्याच्या ईर्षांमुळे?:😇 ###### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 💐" शारदोत्सव !":💐 💐"प्रत्येकाने वाचायलाच हवं असं !":💐 👍 " जीवनात चढ-उतार प्रत्येकाच्या जीवनात येत असतात संकटांना तोंड दे आत्मविश्वासपूर्वक कसं जगायचं त्याचं दर्शन घडवणार असं हे पुस्तक खरोखर प्रत्येकाने वाचायलाच हवं असंच आहे !":👍 ####### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-152 !":👌 💐 "शब्द" हे माध्यम, आणि "विचार" ही शक्ती, कशी, कशासाठी व केव्हां वापरावयाची ते ज्याचं त्यानं ठरवायचं!:💐 ####@@# 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-153 !":👌 💐"अडचणी ,संकटेही येतात.... त्यांतूनही मार्ग सापडतो.... लक्षांत येतं..... कुणाचच, कशाही वाचून अडत नसतं!":💐 ####### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-154 !":👌 💐""स्वप्नं" प्रत्यक्षात यायला, केवळ संधी मिळणे पुरेसे नसते, त्यासाठी अजोड गुणवत्ता, अथक परिश्रम, दूरद्रुष्टी व अनुभव असायला लागतो!":💐 ##### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-155 !":👌 💐"यातना, वेदना आणि कुचंबणा, ह्यांच्यासह जो डोळसपणे जीवन जगू शकतो, तोच खराखुरा पुरुषोत्तम ! ":💐 ###### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-158 !":👌 💐"सांजपर्व":💐 👍"माणसाच्या जीवनातील सर्वच अवस्था, ह्या त्या त्या वेळच्या परिस्थितीचे व मनोभूमिकेचे प्रतिबिंब असते......... त्यातील सांजपर्व, हे खरं म्हणजे दुर्लक्षितच रहाते. पण जर माणूस मनस्वी अन् तपस्वी असेल तर व्रुद्धत्वही हवेहवेसे वाटू शकते, कारण तेव्हां आत्मसंवेदनांच्या सह्रदय अश्रुंनी चिंब होऊन जाते...........👌 ###### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-159 !":👌 🤣 "माणसाच्या आयुष्यात आवड, निवड आणि नावड यांचा लपंडाव चालू असतो. परंतु जेव्हा काळजीपूर्वक आवडलेले निवडले असते, तेच जेव्हा नावडते होते तेव्हा केवळ परवडच भविष्यात सहन करावी लागते !":🤣 ###### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-160 !":👌 💐"नित्य नेमाने "पगडी" फिरविणार्यांची विश्वासार्हता रसातळाला जाते आणि दुर्दैव (की,सुदैव?) हे, की त्यांना ते कळतच नाही !":💐 ##### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-157 !":👌 🙃 "जाणीवपूर्वक निखळ व्यवहार सोडून, जे भावनिक वादळे निर्माण करतात, ते स्वत: अकार्यक्षम तर असतातच, पण अविश्वासार्हही संभवतात !":🙃 ####### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-161 !":👌 💐" काही करावयाचे आहे, पण वेळ नाही ! अशी अवस्था कुणाची, तर वेळ जाता जातच नाही, वेळ खायला उठलाय अशी कुणाची !! वेळ तीच आणि तशीच, पण अवस्था ह्या वेेगवेगळ्या. परंंतु जो वेळ आहे, तो स्वतःसाठी किती वापरता आणि इतरांसाठी किती वेळ देता, याचा कोणी कधी विचार केला आहे ?:💐 ###### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-162 !":👌 💐 "शेक्सपियरने म्हटल्याप्रमाणे 'टू बी ऑर नॉट टू बी' अशी द्विधा मनस्थिती पुष्कळदा प्रत्येकाची कोणताही निर्णय घेताना होत असते. अशा संभ्रमावस्थेत योग्य निर्णय, योग्य वेळी घेणे थोड्या जणांनाच जमते, अन् ज्यांच्या अंगी हे कौशल्य असते तेच जीवनात यशस्वी होतात !":💐 ###### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-163 !":👌 💐" विचारल्याशिवाय सांगू नये, मागितल्याशिवाय मदत करू नये, माणूस समजल्याशिवाय विश्वास ठेवू नये !":💐 ₹###### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-164 !":👌 💐"धावपळीच्या स्पर्धेच्या आजच्या माहोलांत, जिथे माणसामाणसांतला संवाद हरवत चालला आहे, तिथे स्वत:च स्वत:शी कोण काय बोलणार?":💐 ###### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-166 !":👌 💐 " आपले परस्परांबरोबर वागणे कसे आहे ते तपासणे आवश्यक असते. जे त्यातील स्वतःच्या चुका मानतात आणि सुधारणा करायची इच्छा प्रत्यक्षात आणतात, ते साहजिकच आवडते होऊ शकतात. त्या उलट आपण काही चुकाच करत नाही, अशा भ्रमात असणारे नावडते होणे अपरिहार्य असते !":💐 ###### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-165 !":👌 😇"क्रिकेटचा खेळात आणि माणसाच्या आयुष्यात चित्तथरारक अनिश्चितता असते. त्या खेळात जसं पुढच्या चेंडूवर काय होणार, हे कोणीही सांगू शकत नाही, तसंच माणसाच्या आयुष्यात पुढच्या क्षणाला काय होणार, हे देखील अनाकलनीय असते !":😇 ###### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-167 !":👌 😅 "दुसर्यांना मनापासूून समजून घेणे म्हणजे अनुकंपा. मात्र तो माणूस पारखल्याशिवाय कधीही विश्वास ठेवू नये !":💐 ##### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-169 !":👌 " एकमेकांना समजून घेणे म्हणजे सुसंवादाची पहिली पायरी. परंतु तिचाच दुष्काळ असल्यामुळे माणसामाणसात वादविवाद होऊन, परस्पर संबंध बिघडतात !":😅 ###### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-168 !":👌 💐 "अंत:प्रेरणा, विचारधन आणि अनुभवचिकित्सा या गुणत्रयीच्या मिलाफाने उत्कृष्ट साहित्य निर्मिती होत असते, तोच खरा शारदोत्सव होय !":💐 ###### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-170 !":👌 💐"कार्यतत्परता, सामंजस्य, परस्परावलंबन, क्रुतार्थता आणि चिरंतरता ह्या पंचसूत्री मूल्यांवरच, मानवतेचा हा प्रवाह अव्याहत रहाणार आहे !":💐 ###### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-171 !":👌 💐"आपली व्रत वैकल्ये सणवार, शिस्त नियमन, समाजमन निकोप ठेवत सांस्क्रुतिक संस्कार करणारी, आरोग्याचे ऋतू बदलानुसार भान ठेवणारी !":💐 धन्यवाद श्री सुधाकर नातू

"छाप (पड)लेले शब्द A !":

👍"प्रास्ताविक!":👌 छाप (पड)लेले शब्दांसमवेतची व्रृत्ते येथे upload करता आली नाहीत. परंतु त्यांच्या संदर्भातील निरीक्षणातून आपणास योग्य तो बोध घेता येतील, अशी आशा आहे. 1 👍"छाप (पड)लेले शब्द !":👌 👍" सायबर क्राईमचा भस्मासुर !":👌 🤗🤗🤗🤗🤗 🤣" रानटी अवस्थेतील माणसाचा उत्तरोत्तर प्रगतीचा प्रवास आज तंत्रज्ञानामुळे प्रमोच्च बिंदूला पोचला असला, तरी त्याची मूलभूत शिकारीवृत्ती अजूनही कमी झाली नाही, अशाच तऱ्हेचे सध्याचे एकंदर गुन्हेगारी विश्वाचे भयावह चित्र आहे. दुसऱ्याचे ओरबाडून घेण्याची ही प्रवृत्ती भीषणावह आहे. पॉकेटमारी,चोऱ्या दरोडे ही सारी त्याच प्रवृत्तीची अनिष्ट उदाहरणे आहेत. अशा तऱ्हेच्या गुन्हेगारीमध्ये प्रत्यक्ष शारीरिक हजेरी लावून, संभाव्य पकडले जाऊन मार खाण्याच्या धोक्याला तोंड देण्याची शक्यता गृहीत धरूनही हे गुन्हे काही केल्या कमी होत नाहीयेे. हा खरोखर मानवसंस्कृतीला लागलेला हा काळीमा कधी दूर होणार कुणास ठाऊक ! त्यात आता भर पडली आहे सायबर क्राईमस् भस्मासुराची ! सोबतच्या वृत्तामुळे आपल्याला लक्षात येईल की, फसवणुकीद्वारे किती भयानक अशा गुन्ह्यांची संख्या वाढत जात आहे आणि त्यामानाने पकडले जाणारे नगण्य आहेत. येथे तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाद्वारे रिमोट ठिकाणी हजेरी असूनही, कुठेही कसेही संभाव्य भक्ष हेरून त्यांना भीती दाखवून त्यांचेच पैसे या गुन्हेगारांना बिन दिक्कतपणे धाडले जातात. उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या सायबर क्राईमस्ममध्ये एकदा फसवणूक झाली की हातात तक्रार करण्याशिवाय काहीच उरत नाही, कारण समोर गुन्हेगार कोण आहे याचाच पत्ताच नसतो. भौतिक प्रगती जरी झाली तरी नैतिक अध्यपतन इतक्या थराला गेले आहे की, हे असले आधुनिक भामटे गुन्हेगार सहजतेने निरपराध सामान्य जनतेने घामाने मिळवलेल्या संपत्तीवर डल्ला मारत आहेत. ही मानवी प्रवृत्ती कधी कशी संपणार त्यासाठी खरोखर काय करायला हवे, प्रामाणिकपणा सचोटी निस्पृहता या गोष्टी समाज कसा कधी अंगी करणार, याचा विचार करायची गरज कधी नव्हे ती आता निर्माण झाली आहे. मानसशास्त्रज्ञ यासाठी पुढे यायला हवेत. अथक संशोधन करून अगदी बालपणापासून कोणते कसे संस्कार करायला हवेत याचे मार्गदर्शन त्यांनी करायला हवे. सर्वसामान्यांनीही जागृत राहून आपण फसवणुकीला बळी पडणार नाही, अनोळखी अशा कुठल्याच संपर्कात न येण्याची खबरदारी त्यांनी जर घेतली तर कदाचित काहीसा आळा या असल्या चिंताजनक सायबर क्राईमस् वर घालता येईल !":🤣 🤗🤗🤗🤗🤗 2 👍"छाप (पड)लेले शब्द !":👌 🤗"सुलेखनाचे धडे !";🤗 "शिक्षणाचा श्रीगणेशा करताना स्वच्छ, सुबक अक्षर व्हावे म्हणून, अ आ इ ई... तसेच क ख ग घ.. अशा बाराखड्या मुलांकडून हाताने आवर्जून लिहिल्या घेतल्या जायच्या. मोडीसारखी वलयांकित वळणदार अक्षरे असलेली भाषा तर ते करण्यासाठी अधिकच सुलभ व उत्तम असायची. बे एके बे पासून चक्क औटकीपर्यंत पाढे परवचा म्हणून रोज शिस्तीने म्हणून घेतले जायचे. त्या मुलांची पिढी आणि तो इतिहास जमा झालेला काळ पुनश्च आठवावा, अशा तऱ्हेचे सोबतचे वृत्त आहे. श्री अवधूत पालव उत्तम हस्ताक्षरात लिहीणे व्हावे म्हणून सुलेखनाचे धडे केवळ भारतातच नाही तर जगभर देत आहेत, त्यासंबंधीची ही माहिती खरोखर रंजक अशीच आहे. सध्याच्या काळात स्मार्टफोनच्या अवतारामुळे, हाताने काही लिहिण्याची सवय, वा पोस्टाने पत्रे पाठवणे वगैरे इतिहास जमा झाले आहे. केवळ सही हाताने केली जाते, एवढीच हाताची आणि लेखणीची कदाचित जोडी उरली आहे ! कॅल्क्युलेटर ने सर्वच काही तत्परतेने मिळत असल्यामुळे, आकडेमोड परवाचा पाढे सगळे काही इतिहास जमा झालेले आहे. तंत्रज्ञानाचा हा असा विपरीत परिणाम आपण पाहत आहोत. अशा वेळेला अक्षर चांगले व्हावे म्हणून जनरेशन झेड ने देखील प्रयत्न करायला हवेत, तसेच पुढच्या पिढ्यांनी देखील ! जाता जाता टीका म्हणून नव्हे, किंवा नांवे ठेवणे म्हणून नव्हे, पुष्कळ डॉक्टर मंडळींचे अक्षर वाचणे कठीण असते, तेच फक्त केमिस्ट मंडळीच वाचू शकतात, त्याची आठवण झाली. तसे कां होते या कोड्याचे संशोधन करायहला हवे, नाही कां ?: 🤗🤗🤗🤗🤗 3 👍"छाप (पड)लेले शब्द !":👌 👍" इतिहासाच्या पाऊलखुणा !":👌 💐 " मुंबई हे सात बेटांचे मिळून बनलेले एक शहर आहे हे आपल्याला आता माहीत झाले आहे इंग्रजांनी त्यांचा कारभार येथील फोर्ट विभागातून सुरू केला आणि उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला. त्यात मुंबईतील विविध रस्त्यांच्या आणि त्यामागील नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींच्या माहितीपूर्ण आठवणी महाराष्ट्र टाइम्सच्या "नावलौकिक" या मनोरंजक सदरामध्ये नेहमी उलगडल्या जातात. जुन्या पिढीला भूतकाळाच्या स्वप्नरंजनात, तर नवीन पिढीचे कुतुहूल दूर करणाऱ्या ह्या अशा संग्रह माहितीमुळे प्रत्येकाच्या जाणिवांमध्ये नक्कीच भर पडत असेल. जसा व्यक्तींना इतिहास असतो, तसाच रस्त्यांना त्यांच्या नावांना व इतर बहुतेक स्थळांना देखील स्वतःची अशी आगळीवेगळी खूणगाठ असते, हे त्यावरून उमजते. सोबतच्या वृत्तामध्ये मुंबईमध्ये ज्ञात असलेल्या सँडहर्स्ट रोड आणि एल्फिन्स्टंन रोड यांची उपयुक्त माहिती आणि त्या संबंधी सँडहर्स्ट व एल्फिन्स्टंन हे कर्तबगार इंग्रज अधिकारी आपले कार्य करून गेले त्यांची आठवण जागी केली आहे !":💐 ###### 4 👍"छाप (पड)लेले शब्द !":👌 👌"काव्यरसाचा शारदोत्सव !!":👌 💐"काव्य हे साहित्यातील प्रतिभाशाली रूप असते. महाराष्ट्र साहित्य शारदेतील तीन रसिकप्रिय कवीवर्य प्राध्यापक वसंत बापट मंगेश पाडगावकर आणि प्राध्यापक विंदा करंदीकर यांना एकाच व्यासपीठावर तीन-चार दशकांपूर्वी दादर येथील सभागृहात ज्या रसिकांनी एकत्र काव्यवाचन व गप्पाटप्पा असा अद्भुत शारदोत्सवाचा कार्यक्रम पाहताना अनुभवले, त्या भाग्यवंतांमध्ये आस्मादिकही होते. पॉप्युलर प्रकाशनाच्या शंभराव्या शतकपूर्ती निमित्त ज्ञानपीठ पारितोषक विजेते विंदा करंदीकर यांच्या काव्यप्रतिभेबद्दल समीक्षात्मक ओळख करून देणारा श्रीमती माधवी वैद्य यांचा रविवारच्या म.टा. मधील लेख सोबत वाचायला मिळाल्यामुळे त्या संस्मरणीय प्रसंगाची आठवण झाली. विंदांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या काव्यामध्ये वास्तवातील परिस्थितीचे परखड दर्शन जसे घडत असे, त्याचप्रमाणे तात्विक अध्यात्माचे विचारधन असे. त्यांच्या 'निर्वाणीचे गझल' व 'अष्टदर्शने' ह्या मौलिक रचनांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी एके ठिकाणी म्हटले होते 'देणाऱ्याचे हात हजार' तसेच प्रस्तुतच्या लेखाचे शीर्षकही 'लिहिणार्याने लिहित रहावे' ! ह्या सोबतच्या लेखाच्या शेवटी अद्भुत शब्द आहेत ते पुनश्च वाचत राहावे असेच आहेत: "वि स खांडेकर, कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर या (ज्ञानपीठ विजेत्या) तिघांमध्ये अपार मानवी करूणा हे समान सूत्र आहे. या सूत्रातून फुलणारा आशावाद हे मानवाचे अंतिम गोत्र आहे. या गोत्राचा जय जय जयकार करू या ! ":💐 ##### धन्यवाद श्री सुधाकर नातू

"स्वरानंद 55 ते 60 !":

👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-55 !":👌 नेहमीप्रमाणे 3 गीते ऐकण्यासाठी त्यांच्या लिंकस् उघडा... 1 फुले माझी अळू माळू..... https://www.facebook.com/share/v/Ddbb5zmSFfuYAueE/?mibextid=oFDknk 2 फांद्यावरी बांधलेले मुलींनी हिंदोळे..... https://youtu.be/JrlzqP0m8Uc?si=bdOL2P4HAscea8RY 3 दोन ध्रुवांवर दोघे आपण...... https://youtu.be/u8LD6_Q4OKQ?si=pyQVBaj1Y4R3eFFZ धन्यवाद सुधाकर नातू ########### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-56 !":👌 नेहमीप्रमाणे 3 गीते ऐकण्यासाठी त्यांच्या लिंकस् उघडा... 1 "ऐ मेरे दिल कही और चल.... https://youtu.be/_aFqiq7yHI8?si=JlaPLQb3YvQatNN8 2 " आसू भरी जीवन की ये राहे..... https://youtu.be/EUVsSz_D5xY?si=kT7Kmh2SkRqumQNB 3 "कही दीप जले कही दिल.... https://youtu.be/v_wBOmfMR1Y?si=Kd84x9FiE6svYzTD धन्यवाद सुधाकर नातू