सोमवार, २९ मे, २०२३

"IPL: एका रोमहर्षक जत्रेची अफलातूून अखेर !":

 "IPL: एका रोमहर्षक जत्रेची अफलातूून अखेर !":


IPL रोमहर्षक जत्रा अखेर काल मध्यरात्री संपली आणि एक प्रकारची पोकळी यापुढे काही दिवस निर्माण होणार आहे. पहिले काही आयपीएल सीझनस् वगळता मी त्यानंतर सहसा मुंबई इंडियन सोडून इतर सामने कधीच बघितलेच नव्हते. मात्र या वेळेला ज्या तऱ्हेचे एकापेक्षा एक नाट्यमय सामने झाले, त्यामुळे जवळजवळ प्रत्येक सामना मी निदान अधून मधून तरी पाहत आलो. त्यामुळे गेल्या काही रात्री खरोखर आनंददायी होत राहिल्या.

कालचा सीएसके आणि गुजरात टायटन्स यामधील अंतिम सामना देखील दोलायमान अवस्थेमध्ये पहिल्या दिवशी पावसामुळे ..रद्द करावा लागला  आणि दुसऱ्या दिवशी देखील पुन्हा नको तेव्हा पाऊस आल्यामुळे जवळ जवळ मध्यरात्रीपर्यंत हा सामना लांबला. त्यामुळे एक सूचना अशी की, अंतिम सामना, अशा वेळी अगदी
दुसऱ्या दिवशी सकाळी दहा नव्हे, पण  साडेतीन वाजता ठेवायला काय हरकत आहे? त्यामुळे भरपूर वेळ जरी मधून मधून पाऊस आला, तरी अडचण येणार नाही. उगाचच हट्टाने नियमानुसार रात्री साडेसातला सामना सुरू करायचा अट्टाहास टाळावा असं मला वाटतं.

250 इतके विक्रमी आयपीएल सामने खेळणाऱ्या धोणीचाच संघ विजयी व्हावा, असेच बहुतेक जणांना पहिल्यापासून वाटत असेल. परंतु गुजरात टायटनच्या 214 धावसंख्येमुळे हे अशक्य आहे अशी भीती निर्माण झाली. मात्र कदाचित पाऊस धावून आला आणि संख्या धावसंख्या 200 च्या खाली आली त्याचा फायदा मानसिक दृष्ट्या निश्चितच केला झाला.

गुजरातचा डाव संपल्यानंतर सीएसकेचा डाव सुरू व्हायला खूप वेळ लागला. मध्येच पाऊस सुरू झाला. त्यामुळे मी सामना न बघता झोपून गेलो. परंतु सामन्याचे काय होते हे कुठून डोक्यात कुठेतरी असल्यामुळे त्यानंतर जेव्हा जेव्हा जाग आली, तेव्हा गुगलवर जाऊन काय स्कोअर काय ते बघत राहिलो आणि अशा तऱ्हेने शेवटी सीएसकेने सामना जिंकला हे समजल्यावर झोपी गेलो.

काल सीएसके च्या क्षेत्ररक्षणातील कमकुवतपणामुळे त्याचप्रमाणे गोलंदाजांचाही स्वेेर मारा, तेवढासा प्रभाव नसल्यामुळे कधी नव्हे इतकी फायनल मध्ये गुजरात टायटल ने 214 ही धावसंख्या उभारली. मुंबई इंडियन्स विरुद्ध जी कामगिरी शुभमनने केली, तिचाच कित्ता सुदैवाने या वेळेला साई सुदर्शनने गिरवल्यामुळे आणि इतरही खेळाडूंनी चांगली साथ दिल्यामुळे गुजरातला 214 ही आव्हानात्मक धावसंख्या उभी करता आली. धोनीला खरोखर मानले पाहिजे कारण त्याने जी चपळाई, शुभमनला यष्टिचीत करताना दाखवली, तशी आजतागायत बहुदा चपळाई कुणीही कधी दाखवली नसेल.

पावसामुळे अंतिम लक्ष कमी करणे याबद्दलही विचार व्हावा. कारण मानसिक दृष्ट्या आपोआपच 200 च्या वरची धावसंख्या पार पडायची नाहीये, तर त्या 171 या धावसंख्येमुळे तेवढे दडपण सीएसके वरचे कमी झालेले असू शकते. त्यामुळे हे खरोखर न्यायाचे आहे कां, याचाही विचार व्हावा. मात्र काही झाले तरी विजयी संघ हा विजयीच होय आणि त्याचे सारे श्रेय कॅप्टन कूल धोणीला जाते, असा कॅप्टन होणे नाही एवढेच खरे !

IPL: एका रोमहर्षक जत्रेची अफलातूून अखेर !":


171 धावांचे लक्ष त्यात सीएसकेच्या
प्रारंभीच्या फलंदाजांची लवकरच एक्झिट, शेवटची ओव्हर 13 रन्स हव्या, त्यातील पहिल्या चार चेंडूंमध्ये केवळ तीन, शेवटच्या दोन बॉल मध्ये दहा पाहिजेेत, अक्षरश: दोलायमान परिस्थिती-उस पार या इस पार अशी! रविंद्र जाडेजा अशा कसोटी पहाणार्‍या क्षणी, चक्क एक चौकार आणि एक षटकार मारून संभाव्य पराभवाचे रूपांतर विजयात केले हे सारे नंतर सकाळी विडीओतूून समजल्यावर मी अक्षरशः थक्क झालो अन् व्यथितही, कारण एका विलक्षण न भूतो न भविष्यती असा प्रसंग बघायला आपण मुकलो याचा खेद वाटला.

मात्र यंंदा IPL मध्ये, भरपूर मोबदला देऊन जे नामवंत खेळाडू घेतले गेले, त्यांच्यापेक्षा त्यामानाने माफक मूल्य असणाऱ्या नवोदित अनेक खेळाडूंनी या वेळेला जो परक्रम गाजवला त्याला तोड नाही. त्यामुळे शेवटी क्रिकेट अन्सरटंटीचा खेळ आहे, आपण जास्त मूल्य मोजले म्हणजे उत्तम कामगिरी मिळेलच असे नाही, हेच यावरून समजायला हवे. कोण केव्हा कशी कामगिरी करेल, काही सांगता येत नाही. एकापेक्षा एक चांगले उमदे तरुण खेळाडू, आयपीएलमुळे गवसले ही एक उत्साहवर्धक बाब आहे.

सामना संपल्यावर सकाळी उठलो आणि मनामध्ये जे जे आले, ते या सामन्यासंबंधी मी येथे लिहिले ही माझी वैयक्तिक मते आहेत चूक भूल द्यावी घ्यावी.

धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा