"मनांतले जनांत":
चिंतनिकाः
# 'ह्या' मनीचे,'त्या' मनी,
जाणे कां, कुणी मनोमनी?
मनांतले गुपित ठेवती मनांत,
कधी, कसे कां, सांगती जनांत??
# नशीबाचे चक्र फिरते असते,
जे आज वर आहेत,
ते उद्या खाली जाणारच!
# "यश व प्रसिद्धी कायम टिकतीलच असे नाही. अंगभूत दोष पहाता, पहाता रंग दाखवतात, ध्यानात येतातच, येतात.
सर्वगुणसंपन्न कोणीही नसतो."
# खरोखरच मनापासून कौतूक करावे अशी असामान्य कामगिरी जेव्हां होते, तेव्हांच नांव घ्यावेसे वाटते. तसे नसेल तर नांवं ठेवली जाणे सहाजिकच!
#"जाणून बुजून, अपेक्षित स्वार्थ मनांत ठेवून,
जे अशक्य आहे,
ते शक्य करून दाखविण्याचे स्वप्न म्हणजे म्रुगजळ."
# हलते फिरते,
अन् चालते बोलते रहाणं,
हे अती ज्येष्ठ नागरिकांचं,
खरंखुरं भाग्यच!
# 'आजचा दिवस,
कालच्यापेक्षा चांगला होता,
असे उद्या वाटायला हवें.'
#"परिस्थिति व आपण, एकमेकांवर सतत प्रभाव पाडत असतो.
आपला निर्णय,
क्रुती कुशलताच, आपले भवितव्य ठरवत असते."
# "किती काळ जीवन जगता,
ह्यापेक्षा कसे जगता आणि
त्यामुळे इतरांना
किती, कसा आनंद व समाधान देता, ह्यावरच जीवनाचे खरे मूल्य ठरते."
# दारुण अपयशासारखेच अतोनात यश पचवणे कठीण असते. अहंकार, मग्रुरी आणि गर्व ह्यांचा कैफ डोक्यात भिनून पहाता मिळवलेले सारे गमावते.
# "क्षणा क्षणांतच रंग भरा,
अमर प्रितीचा,
हा मंत्र खरा!"
# "चिरंतन":
क्षणा क्षणांतूनी हे रंग भरा,
नसा नसांतूनी तो चंग करा,
मना मनांतूनी ते प्रेम बहरा,
चरा चरांतूनी हा नाद खरा!"
# "जबाबदारीचे उत्तरदायित्व
पूर्ण न करता, जनतेच्या सेवकांनी, अवास्तव वेतनवाढीचा हट्ट धरणे,
हा राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय ठरावा."
# "कर्तव्यपूर्तीचे उत्तरदायित्व व गुणवत्तेला स्थान नाही.
म्हणून,
"चालसे कल्चर" पूर्वापार चालू आहे
व पुढेही चालत रहाणार आहे."
# "नितीमत्ता, गुणवत्ता, कर्तव्यपरायणता, निस्वार्थता
आणि सहिष्णूता ह्यांची नितांत गरज, कधी नव्हे ती,
आता भासत आहे."
# प्रत्येकापाशी देण्याजोगे असे काही ना काही असतेच, असते.
जे देण्यामुळे आपल्याला आनंद होतो,
ते नेहमी देत रहावे.
# सातत्याने आपला दिनक्रम,
एकाग्रता ठेवून वेळेवर पाळला, की तो आपल्या नैसर्गिक बाँडी क्लाँकबरोबर जुळतो. आपले आरोग्य त्यामुळे सुधारते.
# सत्य खरोखर काय आहे,
ते ज्याचे त्याला माहीत असते.
मुखवट्यांच्या आड,
ते एकमेकांपासून लपविण्याचा खेळखंडोबा मात्र नेहमीच चालतो!
# जगाला फसवले तरी, कुणी
कधीही
आपल्या मनाला फसवू शकत नाही. देहबोली मनातल्या भावभावना प्रकट करतच असते.
# आपले समाधान-असमाधान,
हे आपण परिस्थितीवर नियंत्रण ठेऊ शकतो की, परिस्थिती आपल्यावर, ह्यांच्याशी निगडीत असते.
ऊन-पावसाचा
सारा खेळ!
# विश्वास ठेवावा:
प्रकाश देणाऱ्या सूर्यावर, फुले देणार्या वेलींवर, जन्मभर खस्ता खाणाऱ्या
आईवर.......
# विश्वास ठेवावा:
ऋतुचक्र आणणाऱ्या निसर्गावर,
कडक शिस्तीने कार्य करणाऱ्या मुंग्यांवर, अनिवार्य असणार्या मृत्यूवर!
# दिवस येतात् अन् जातात.
आयुष्याच्या मण्यांची ही माळ कधी ओघळून जाणार,
हे रहस्य कधीच कुणालाही उलगडतच नाही!
केवढे हे वरदान!!
# सध्याच्या "सार्वजनिक उत्सवां"तील उन्माद व विक्रुतीकरण पाहून, स्वर्गात माननीय "लोकमान्य" विषादाने म्हणतील:
"हेचि फळ काय मम तपाला?"!
# एक खोटं, दहादा खरं म्हणून ठोकणारेच,
डोळ्यांवर झापड बांधून,
स्वत:चेच ढोल, स्वत:च बडव बडव बडवतात!
# "बोलायचं अन् सोईस्कर विसरायचं."
अशांना,
सांगा, काय बरं, म्हणायचं?
"विसरभोळे की, साळसूद??!
# "सोशल मिडीया" वर,
कोणता संदेश कोणत्या समुहात प्रकाशित करायचा,
हे ज्यांना अचूक उमजते, ते विजयी;
हे न कळणारे, लाईकस् ची वाट पहाणारे!
# समाधानाची सप्तपदी:
१. दृष्टी बदला.
२. बुद्धी बरोबर तारतम्य हवे.
३. जिभेवर नियंत्रण ठेवायला शिका.
४. हाताने देत रहा.
५. कान उघडे ठेवा.
६. पायाने पुढे चालत रहा.
७. मन काबूत ठेवा.
सुधाकर नातू माहीम मुंबई १६
Mb 9820632655
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा