"छाप पडलेले शब्द-24" :
"96 व्या साहित्य संमेलना नंतरचे कवित्व !":"अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी साहित्य संमेलन आयोजिले जाते. त्याकरता जनतेतर्फे देणगी रूपात निधी उभारण्याचे काम पुरेसे झाले नाही, इतकी वर्ष झाली तरी. परंतु नेहमीच शासनाकडून घसघशीत देणगी मिळावी, ही अपेक्षा मात्र ठेवली जाते. यावर्षी तर महाराष्ट्र शासनाकडून उदार अंतकरणाने घसघशीत दोन कोटी रुपये इतकी अनुदानाची रक्कम या संमेलनासाठी दिली गेली. परंतु त्यानंतर सोहळा तर दिसण्यापुुता पार पडला. मोठाले भव्य सुशोभित मंडपही उभारले गेले. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने नंंतर प्रकाशात आली, ती म्हणजे रसिक वाचकांचा त्या संमेलनाला पुुरेसा प्रतिसाद नव्हता. रिकामे मंडप किंवा रिकाम्या खुर्च्या बघण्याची वेळ आली. शिवाय मोठी देणगी मिळाल्यामुळे खर्चही तसाच आवाक्या बाहेर गेला असे वृत्तांवरून समजते.
पण सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे साहित्याचा जो दोन विभागांमुुळे विस्तार आणि प्रसार होतो, तो लेखक आणि प्रकाशक ह्या जोडगोळी शिवाय साहित्य वाचकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या दोन्हीही आवश्यक अशा समूहांना योग्य तो मानसन्मान व व्यवस्था मिळायला हवी. लेखकांचा बडेजाव केला जातो, मांडला जातो. परंतु प्रकाशक मात्र दुर्लक्षित राहतात अशी व्यथा या सोबतच्या वृत्तांत समजते.
ही खरोखर अयोग्य व चिंताजनक अशी गोष्ट आहे. अशा महत्त्वपूर्ण सोहळ्यात कुठल्याच प्रकारची अव्यवस्था होता कामा नये, याची दक्षता यापुढे तरी घेतली जावी. आगामी शतक महोत्सवी साहित्य संमेलनात, रसिक वाचक, लेखक आणि प्रकाशक तसेच आयोजक व शासन या सर्वांचा चांगला खेळीमेळीचा सहयोग अपेक्षित आहे. त्याप्रमाणे संबंधितांकडून आतापासूनच तयारी व्हायला हवी, असे सुचवावेसे वाटते.
धन्यवाद
सुधाकर नातू
############
👍"छाप(पड)लेले शब्द !": 👌
👍"वाचा, फुला आणि फुलवा !":👌
💐 "प्रसन्न सकाळ असावी आणि अंगणातील पारिजातकाच्या झाडाखाली, पांंढर्याशुभ्र नाजूक पाकळ्या आणि लाल चुटुक देठ असलेल्या फुलांचा सडा पसरलेला असावा, त्या फुलांचा मंद सुगंध मनाला ताजेतवाने करत आनंदात आपण न्हाऊन निघावे, हा एक विलक्षण अनुभव असतो.
"वाचा फुला आणि फुलवा !" हे जे म्हटले आहे तेही खरेच आहे. कारण वाचनामुळे आपल्याला विविध अशा अनुभवांचा मागोवा घेत, आपल्या जाणीवांचा परिघ विस्तारला जाऊन मनाला जो आत्मानंद मिळतो, तोही हा अशाच पारिजातकाच्या फुलांच्या मंद सुगंध सारखा असतो. परंतु सध्याच्या भाऊबंदकी, वादविवाद उखाळ्यापाखाळ्या, टोमणे आणि अर्वाच्य शब्द याचबरोबर विलक्षण धक्का देणारे अपघात, अनेक प्रकारच्या गुन्हेगारीच्या बातम्या अशा सगळ्या नैराश्यजनक बातम्यांनी सारा माहोल झाकोळलेला असताना, "छाप (पड)लेले शब्द" शोधणे हे एक जिकीरीचे काम असते.
मानवाला अग्नीचा शोध लागण्याआधी एकमेकांची संपर्क साधण्यासाठी शब्द आणि भाषा यांचा शोध लागला ही एक मानव जातीला नव्या वळणावर नेणारी घटना होती शब्दांचे सामर्थ हे शस्त्रापेक्षाही जास्त असते, हे आपण सारे जाणतो. भाषा अनेकविध असल्यामुळे दोन भाषांमधील प्रत्येक शब्दाचे अर्थ व साधर्म्य जाणणे हे अत्यंंत गरजेचे असते.
या पार्श्वभूमीवर अचानक आज एक मनाला उभारी देणारे व्रुत्त अवचित नजरेत आली. शब्दकोश निर्मितीचा इतिहास वाचकांसमोर थॉमस मोल्सवर्थ ह्यांनी मराठी-इंग्रजी शब्दांचा अपार कष्ट करून एक परिपूर्ण शब्दकोश निर्माण केला, हे ते व्रुत्त. त्याचीच आठवण म्हणून 'शब्दप्रभू मोल्सवर्थ' या पुस्तकाचे प्रकाशन मोल्सवर्थच्या 151व्या स्मृतिदिनी प्रकाशित केले जाणार आहे.
अशा तऱ्हेच्या शब्दकोशांमुळे दोन मने, दोन भाषिक एकमेकांना जोडणारे अनंत पूल आपोआप निर्माण होतात. अशा तऱ्हेचे मुुलभूूत काम परिपूर्ण करणे, हे एक खरोखर कठीणातले कठीण काम असते. अशी ध्येेयवादी 'मोल्सवर्थ' सारखी माणसे आगामी पिढीला वर्षानुवर्ष उपयुक्त होईल असे योगदान देत असतात, म्हणून प्रगतीचे नवनावे मार्ग मिळत जातात. खरंच अशी माणसे हा इतिहासातला भावगर्भ ठेवाच म्हणावा लागेल !":💐
##############
####################
👍"छाप पडलेले शब्द-26" :👌
👍" अंधश्रद्धेचे खेळ खंडोबे !":👌
"आज 21 व्या शतकामध्ये तंत्रज्ञान आणि विज्ञानाने इतकी प्रगती केल्यानंतरही सामान्य माणसांनी, कोणाही भोंदू बाबावर विश्वास ठेवून अंधश्रद्धेपोटी त्याच्या आहारी किती जायचं, त्यासाठी तारतम्य सोडायचं आणि त्याचे भयानक दुष्परिणाम या म.टा. अग्रलेखात मांडले आहेत.
कार्य कारण भाव आणि प्रात्यक्षिक प्रयोगांतीच कोणताही निष्कर्ष काढून नंतरच समतोल बुद्धीने यथायोग्य निर्णय घेणे, किती आवश्यक आहे तेच यावरून समजावे. सर्वात महत्त्वाची बाब अधोरेखित होते ती ही की, शासन व्यवस्थेने अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचे टाळणे आवश्यक आहे."
👍"छाप(पड)लेले शब्द-3 !": 💐
(25th dec22 )
"बदलत्या जीवनशैलीमुळे विविध प्रकारचे रोग होत आहेत. त्यामध्ये डायबिटीस हा प्रामुख्याने आढळून येणारा आहे. अनियंत्रित खाणे पिणे, आणि डायबिटीज अशा विविध कारणांनी माणसाचे मूत्रपिंड पूर्ण क्षमतेने काम करेनाहीशी होतात. अशा वेळेला डायलिसिस हाच एक उपाय असतो.हा खर्चिक उपाय करूनही अखेरीस अशी वेळ येते की मूत्रपिंड कामच करत नाहीत अशा वेळेला मूत्रपिंड प्रत्यारोपण अनिवार्य असते. त्यासंबंधी उपयुक्त माहिती देणारा हा वृत्तांत सगळ्यांनी गांभीर्याने घेणे, गरजेचे आहे."
#################
👍"छाप(पड)लेले शब्द-2 !:👌
👍"आठवणी दाटतात !": 💐
(21dec22)
"बोलका चेहरा, डोक्यावर दाट कुरळे केस आणि दमदार आवाज या जोडीला धडाडी, नैसर्गिक सहजसुंदर अभिनय असे अतुलनीय मिश्रण असलेल्या, विनय आपटे यांच्या स्मृतीनिमित्त जो वृत्तांत महाराष्ट्र टाईम्स पुरवणीतआला, तो येथे द्यावासा वाटला.
विनय आपटेचे वडील आणि माझे वडील दोघेही रुईया कॉलेजमध्ये होते. माझे वडील अकाउंटंट तर विनय आपटेचे वडील पी टी फिजिकल ट्रेनिंग शिकवायचे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा कौटुंबिक परिचय होत गेला. ते कधी कधी आमच्या सायनच्या घरी देखील यायचे. त्यानंतर योगायोगाने विनय आणि माझी गाठ मुंबईच्या दूरदर्शन केंद्रावर, जेव्हा जेव्हा मी काही निमित्ताने किंवा माझा सहभाग असलेले काही कार्यक्रम रेकॉर्डिंग करायला जात असे, तेव्हा त्याची आणि माझी भेट व्हायची.
आत्मविश्वास असलेला आणि अत्यंत तडफदार
उत्साही असा हा तरुण माझ्या मनावर खूप छाप पाडून गेला. त्यानंतर मी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये पब्लिसिटी डिपार्टमेंटमध्ये असताना, देखील काही व्यावसायिक निमित्ताने त्याची माझी थोडीफार भेेटगाठ होत गेली. त्याच्या दादरच्या डि एल वैद्य रोडवरील जाहिरात संस्थेमध्ये मी एकदा गेलोही होतो आणि तिथे तो त्यांच्या सहकार्यांबरोबर तो ज्या उत्साहाने काम करायचा तेही माझ्या चांगले लक्षात आहे.
पुुढे खूूप उशिराने झालेेली, त्याची माझी भेट ही कदाचित शेवटचीच ठरली, असे नंतर लक्षात आले. माझ्या मुलाकडे मी लंडनला 2011 मध्ये गेलो असताना, तिथे विख्यात अभिनेते निर्माते श्री महेश मांजरेकर यांनी आयोजित केलेला भव्य दिव्य कार्यक्रम Mifta मी पाहायला गेलो होतो, त्या वेळेला जी मांदियाळी कलाकारांची आली, त्यामध्ये विनयची माझी भेट झाली.
असा हा अत्यंत गुणवंत चतुरस्त्र कलाकार नंतर सात डिसेंबर 2013 रोजी निधन पावल्यावर खूप दुःख झाले. आता त्यांच्या स्मृतीनिमित्त जो कार्यक्रम त्यांच्या पत्नी सौ आपटे यांनी आयोजित केला, त्याच्या ह्या वृत्ताने, मला या सगळ्या आठवणी उलगडायला प्रवृत्त केले."
Open Roj kay ka gappa maar do Chintan
🙏🏼 🙏🏼🙏🏼 🙏🏼🙏🏼🙏🏼
############
👍"छाप(पड)लेले शब्द-18 !":💐
"बदलत्या काळाचा महिमा !":
कोणे एकेकाळी, 'ब्रेन ड्रेन' सुरू झाले आणि आपल्या सुशिक्षित आणि तंत्रज्ञानात पारंगत, मनुष्यबळ परदेशात गेली स्थायिक होण्याचा ओघ सुरु झाला. त्याचे जे काय परिणाम होत राहिले आहेत त्यावर भरपूर उहापोह झालेला आहे.
पण आता जागतिक परिस्थिती बदलत चालल्यामुळे जर हे चक्र उलटे होत असेल आणि आपल्या मनुष्यबळाला इथे चांगल्या संधी मिळू लागतील तर ते नक्कीच स्वागतार्ह आणि आवश्यक आहे. फक्त इच्छा एवढीच की हा उलटा ओघ तात्पुरता ठरु नये.
##########
👍"छाप (पड)लेले शब्द !":👌
💐"वाचावे, ते ते नवलच !":💐
👍"कधी कधी वर्तमान पत्रामधले, एखादे वृत्त आपले लक्ष त्याच्या शीर्षकामुळे वेधून घेते. 'सनातन' ध्यासाचा सन्मान" या शीर्षकानेही माझे लक्ष ते वृत्त वाचण्यासाठी उद्युक्त झाले आणि काय आश्चर्य ! एकाहून एक नवल वाटाव्यात, अशा कितीतरी गोष्टी त्यामधून गवसल्या. गोरखपूरची 'गीता प्रेस' या संस्थेला, 2021 चा "गांधी शांतता पुरस्कार" जाहीर झाला आहे.
आज पर्यंत ह्या प्रेसने 93 कोटी होऊन अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत ! पंधरा भाषांमधील 1800 प्रकारची पुस्तके हे वाचून मी थक्क झालो !! त्या पुढचा या पुरस्काराचा आकडा वाचून मी तर हवेतच उडालो एक कोटी रुपये आणि इतर बऱ्याच काही गोष्टी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे !!!
खरंच एखादी संस्था निरलसपणे, इतके
उपयोगी आणि अवर्णनीय कार्य करत असेल याची आपल्याला कल्पनाच नसते.":👍
##########
👍"छाप(पड)लेले शब्द-33 !":💐
"आरोग्यम् धनसंपदा !":
👍"वाचनांमधून असे काही गवसते की, जे इतरांना देखील पाठवावेसे वाटते. त्यांच्या आरोग्यविषयक जाणीवा देखील विस्तारित व्हाव्यात, म्हणून हे प्रयत्न !
पूर्वी Cataract म्हणजे डोळ्याच्या ऑपरेशनची चलती होती. उतारवयात बहुतेकांना हे ऑपरेशन करावे लागायचे जणूकाही स्टेटस सिम्बॉल ! आता बैठक जीवनशैलीमुळे व्यायामाच्या अभावामुळे वजन वाढणे आणि इतर काही तक्रारीमुळे गुडघेदुखी आणि नी रिप्लेसमेंट, ही खूप जणांची डोकेदुखी झालेली आहे कालाय तस्मै नम: दुसरे काय म्हणायचे !": 💐
":👌
#############
👍"छाप(पड)लेले शब्द-28 !":💐
"लोकमान्य फिल्ममेकर!":
👍" छोट्या पडद्यावरती "लोकमान्य" ही लोकमान्य टिळकांवरची मालिका उत्तरोत्तर विलक्षण लोकप्रिय होत चालली आहे. याच विषयावरच्या चित्रपटापेक्षा अगदी वेगळा अभिमानास्पद इतिहास त्यामधून उलगडला जात आहे.
अशा महत्त्वाच्या विषयावरती मालिका निर्माण करणारे श्री नितीन वैद्य, हे खरोखरच 'लोकमान्य फिल्म मेकर' आहेत. त्यांच्या वैविध्यपूर्ण आणि समाज प्रबोधनासाठी धडपडणाऱ्या कारकिर्दीचे यथातथ्य चित्र उभे करणारे हे वृत्त निश्चितच प्रेरणादायी ठरावे.":👌
###########
👍"छाप(पड)लेले शब्द-20 !":💐
👍"वाचा, फुला आणि फुलवा !":👌
💐" प्रतिभासंपन्न लेखक आणि रसिक वाचक, ही जोडगोळी माणसांच्या आयुष्यांची गोडी वाढवत असते. लेखन, हा लेखकाने अंतर्मुख होऊन स्वतःचा घेतलेला शोध आणि बोध असतो. तर वाचक तीच प्रक्रिया पुढे नेत, पुस्तकांशी बोलत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माणसांच्या आणि इतर सजीवांच्या हाच तर फरक आहे तो म्हणजे विचारांची शब्दांची नवनिर्मिती करत स्वतः भोवतालचा भवताल अधिक समृद्ध करण्याची त्याची शारदोत्सवी ताकद.
खरं म्हणजे प्रत्येकातच एक लेखक आणि वाचक हा दडलेला असतो, पण त्याला ती जाणीव नसते, जशी कस्तुरीमृगाला जाण नसते, त्याच्या जवळच्या सुगंधाची, तशी !"💐
👍"निखळ वास्तव !": 💐
👍"प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दोनच स्थिती नेहमी कार्य करत असतात. पहिली म्हणजे परिस्थिती, त्याच्यावर नियंत्रण ठेवत असते
आणि
दुसरी म्हणजे, तो स्वतः परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकतो.
सातत्याने बदल हाच निसर्गाचा स्थायीभाव असल्यामुळे, या दोन गोष्टी चक्रनेमिक्रमाने, सातत्याने प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात.
#########
👍"छाप(पड)लेले शब्द-20 !":💐
"ऐकावे ते नवलच !":
रस्तो रस्ते वाहतूक कोंडी ही तर सर्वच महानगरे शहरे आणि आता
कदाचित गावांमध्ये सुद्धा सर्व माणसांना त्रस्त करणारी गोष्ट झाली आहे वेळेचा अपव्यय आणि मनस्ताप त्याचप्रमाणे आर्थिक नुकसान अशा अनेक गोष्टी त्यामुळे सहन कराव्या लागतात वाहतूक कोंडी नंबर मुंग्यांच्या शिस्तीचा कसा उपयोग करता येईल यासंबंधीचे हे वृत्त म्हणूनच थक्क करणारे आहे.
👍"छाप(पड)लेले शब्द-20 !":💐
"ऐकावे ते नवलच !":
रस्तो रस्ते वाहतूक कोंडी ही तर सर्वच महानगरे शहरे आणि आता
कदाचित गावांमध्ये सुद्धा सर्व माणसांना त्रस्त करणारी गोष्ट झाली आहे वेळेचा अपव्यय आणि मनस्ताप त्याचप्रमाणे आर्थिक नुकसान अशा अनेक गोष्टी त्यामुळे सहन कराव्या लागतात वाहतूक कोंडी नंबर मुंग्यांच्या शिस्तीचा कसा उपयोग करता येईल यासंबंधीचे हे वृत्त म्हणूनच थक्क करणारे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा