रविवार, ७ मे, २०२३

"छाप(पड)लेले शब्द-39, 38, 37, 28, 29,

 👍"छाप (पड)लेले शब्द !":👌

💐"हरवले ते गवसले !":💐

👍" सोबतच्या वृत्तामधील आजोबांचा चष्मा समुद्रात पडून देखील पुन्हा सापडला हे वाचल्यावर, मला तशाच एका प्रसंगाची आठवण झाली. काही कामानिमित्त मी माहीमहून दादरला बसने चाललो होतो. सर्वसाधारणपणे मी बाहेर पडल्यावर टोपी घालतो.त्या बसमध्ये बसल्यावर ती टोपी बहुदा बाजूला मी सीटवर ठेवली होती, पण ते मी विसरून गेलो. बसमधून दादरला उतरून काम करून, पुन्हा काही वेळाने घरी जायच्या वेळेला आपल्या डोक्यावर टोपी नाही हे माझ्या लक्षात आले. खूप हळहळ वाटली आणि मी बससाठी स्टाॅपशी उभा राहिलो,  मेचकी मी दाारला जिने आलो तीही 52 नंबरची बस होती, बहुदा तीच उलटा प्रवास करून योगायोगाने मला मिळाली ! बघतो ते काय एका सीटवर कोपऱ्यात माझी टोपी तशीच पडलेला होती. कोणी ती उचलून नेली नव्हती, हे एक आश्चर्यच ! त्यावेळेला मला जो आनंद झाला, तसाच आनंद बहुदा ह्या चष्मा हरवलेल्या आजोबांना झाला असेल. 

खरंच काय योगायोग असतात कळत नाही. 'हरवलेले अवचित गवसते आणि ते तसे कां होते, हे कुणाला कधीच कळत नाही !:"👌

#######@####

👍"छाप(पड)लेले शब्द-29 !":💐
👍"मराठी भाषा, दिन'( की, दीन?)":👌
"मराठीबद्दल प्रेम केवळ भाषा दिनीच दरवर्षी २७ फेब्रुवारीलाच फक्त कां येते, आणि नंतर त्याचे काय होते, याचा विचार करायलाच हवा.

अशा वेळी मुंबईतील, सेंट झेवियर्स कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळाने मराठी भाषा जपण्यासाठी केलेला उपक्रम आणि त्याचे हे वृत्त निश्चितच आशादायी आहे. फक्त इच्छा अशी की अशा तरी चे उपक्रम केवळ कॉलेजातील वांग्मय मंडळांपुरतेच मर्यादित न राहता, सर्वच समाज घटकांनी त्यासाठी हातभार आणि कृती करायला हवी.

👍"छाप(पड)लेले शब्द-34 !":💐
👍 "देणाऱ्याचे हात हजार !:👌
💐"अचानक अवचितपणे आपल्याला असे प्रेरणादायी वृत्त वाचायला मिळते की, आपण अक्षरशः अचंबित होतो. ही बातमी देखील तशीच आहे. एका माजी विद्यार्थ्याने, त्याने ज्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन पुढे प्रगतीचे कळस गाठले, त्या महाविद्यालयाची आठवण ठेवून त्या संस्थेला थोडी थोडकी नव्हे, तर चक्क सव्वा आठ कोटी रुपयांची देणगी दिली !
खरंच, देणाऱ्याचे हात हजार !"👌👌👌

👍"छाप(पड)लेले शब्द-28 !":💐
👍 " तुझ्या विना, जीव झाला वेडा पिसा !:👌
"स्मार्टफोन आणि टीव्ही हा अविभाज्य भाग बहुतेकांच्या विशेषत: जेष्ठ नागरिकांच्या जीवनाचा अत्यावश्यक भाग बनला आहे. सोबतच्या वृत्ताप्रमाणे केबल टीव्हीवर अवलंबून असणाऱ्या दर्शकांसाठी, केबलवाल्यांचा संपाचा काळ हा म्हणजे, 'तुझ्या विना जीव झाला वेडा पिसा ! असेच वाटणारा होता. हे म्हणजे 'कथा कुणाची व्यथा कुणा !' असेच झाले.

या साऱ्या टीव्हीच्या व्यवहारात जो पोशिंदा ग्राहक तोच भरडला जातो, हे केवढे दुर्दैव तीच गोष्ट, संबंधितांच्या संपामुळे, बहुतेक अत्यावश्यक सार्वजनिक सेवेवर अवलंबून असणाऱ्या ग्राहकांवर येत असते. पण लक्षात कोण घेतो !

शिक्षक व शिक्षकेतर मंडळींच्या आडमुठेपणाच्या वागण्यामुळे, बारावी सारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे हाही तसाच प्रकार. स्वतः पलीकडे, व्यापक सामाजिक दृष्टिकोन व जबाबदारी विसरण्याचा ही प्रर्वुत्ती अत्यंत घातक आहे.

👍"छाप(पड)लेले शब्द-28 !":💐
👍 " अजून यौवनात मी !":👌
💐"हल्ली पुुष्कळांना आपण तरुण दिसावे असे वाटत असते. वय वाढले तरी ते दिसू नये, यासाठी काही ना काही प्रयत्न अशी मंडळी करत असतात. सौंदर्यप्रसाधनांची विक्री प्रचंड प्रमाणात त्यामुळेच वाढत आहे, स्त्रियांप्रमाणेच पुरुषही या तऱ्हेच्या  खरेदीत मागे नसतात.

अर्थात शरीर तरुण असले, तरी मन तरुण असेलच असे नाही. कारण हल्ली ताण-तणावामुळे मानसिक आरोग्य खूप ढासळत चालले आहे-विशेषत: तरुण वर्गाचे. त्याउलट केस पांढरे झाले, तरी मनाने तरुण असणारे पुष्कळ वरिष्ठ नागरिक आपल्याला दिसतात. तसेेच स्त्रियाच फक्त वय चोरतात असे नाही, तर पुरुषांना देखील हल्ली आपण रुबाबदार तरुण दिसायचा प्रयत्न करत असतात.

हा पार्श्वभूमीवर विज्ञान आणि संशोधन आता खूपच पुढे गेले आहे आणि वय रोखण्याची गुरुकिल्ली शोधण्याचा संशोधक कसा आटापिटा करत आहेत, ते ह्या व्रुत्तावरुन समजेल. तरुण दिसण्याची गुरुकिल्ली मनाच्या समाधानात आहे हेच खरे. शेवटी,
"अजून यौवनात मी !", हे म्हणण्यासाठी मन देखील नेहमी प्रसन्न आणि सकारात्मक विचार करणारे हवे !"
👍"छाप(पड)लेले शब्द-39 !":💐
👍 "बोल हे अमोल !":👌
💐"कोणतीही गोष्ट आत्मसात करायची तयारी हवी. त्यासाठी मडके होण्यापेक्षा मातीचा गोळा होणे, हे जास्त श्रेयस्कर !" असे बोल अमोल विख्यात लेखक श्री अरुण खोपकर यांनी मांडले. त्याचा हा व्रुत्तांत....":💐

👍"छाप(पड)लेले शब्द-39 !":💐
👍 "स्नेहवन'- असामान्य प्रेरक प्रवास !":👌
👍"इथून तिथून सातत्याने नकारात्मक अशा घटना आणि बातम्या आपल्यासमोर येत असताना, अचानक या वृत्तातील स्नेहवन आणि ती स्थापन करणाऱ्या देशमाने दाम्पत्याची कहाणी वाचून आपले मन कौतुकाने भरून जाते.

आयटी कंपनीतील नोकरी सोडून, विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन, आपल्या पत्नीच्या सहकार्याने शेतकरी मुलांच्या सर्वांगीण जडणघडणीचे आणि विकासाचे व्रत अंगावर घेऊन ते यशस्वी पद्धतीने पार पााणारे हे दाम्पत्य खरोखर सर्वांनी आदर्श ठेवावा असेच आहे.
अशी माणसे सेवाभावी, त्यागी माणसे जोपर्यंत समाजात आहेत, तोपर्यंत आपल्याला आपल्या आशेला वाव आहे.":💐

👍"छाप(पड)लेले शब्द-40 !":💐
👍" आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास!":👌

"सध्या, हवेतील वाढते जीवघेेणे प्रदूषण ही एक मोठी समस्याच होऊन गेली आहे. विशेषत: मुंबईसारखे महानगर तर, भारतात दिल्ली पाठोपाठ किंवा दिल्लीपेक्षाही जास्त प्रदूषित अशी बिरुदावली मिळवत आहे, ही केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे. उंच उंच इमारती आणि वाढते, नको इतके बांधकाम शिवाय हजारो वाहनांची दाटीवाटी आणि माणसांची अतोनात गर्दी यामुळे पूर्वी कधीही नाही इतकी, मुंबई आता बकाल आणि प्रदूषित झाली आहे. अनारोग्याला निमंत्रण देणाऱ्या भौतिक विकासाचा वेगळ्याने विचार करावा लागेल अशी वेळ, या वृत्तातील धडकी भरवणार्या धोक्याने आणली आहे. ओझोन चे प्रदूषण हा एक नवा प्रकार, हृदयविकाराच्या धोका वाढवणारा आहे असे हे वृत्त आहे. म्हणून म्हणायचे 'आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास" !:

👍"छाप(पड)लेले शब्द-37 !":💐
👍"सर्वसमावेशक दूरदृष्टी असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व!":👌
👍"एकोणिसाव्या शतकापूर्वीच्या काही शतकांमध्ये, महाराष्ट्रात ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ, नामदेव अशी संतांची मांदियाळी होऊन गेली. तिने "ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान !" अशी निरपेक्ष स्थितप्रज्ञ वृत्ती दिली, तशीच अध्यात्म व मोक्ष प्राप्तीसाठी करावयाची साधना देखील.

तर 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक थोर समाजसुधारक, राजकारणी आणि प्रतिभासंपन्न विचारवंत यांची मालिकाच येथे अवतरली. त्यांच्या असामान्य योगदानामुुळे, नव्या युगाची, स्वातंत्र्याची पहाट आपण पाहू शकलो. त्या साऱ्या थोरांंच्या मालिकेमध्ये अग्रणी शोभावेत असे, सर्वसमावेशक दूरदृष्टी असलेले कृतिशील नेतृत्व, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी दिले. त्यांच्या वैविध्यपूर्ण कहाणी, सोबतच्या वृत्तात आहे.

अशी गुुणवंंत माणसे येथे होऊन गेली, म्हणून, आज आपण त्यांच्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे.":💐

👍"छाप(पड)लेले शब्द-38 !":💐
💐" आठवणीतली साठवण !":👌
👍"माझे आजोळ आंजर्ले अन् तेच माझे प्रिय जन्मगांव ! त्याच्या मनोहारी आठवणी जागी करणारी माहिती, या वृत्तांत आल्यामुळे, माझ्या बालपणच्या नयनरम्य घटनांची उजळणी झाली....
रमणीय असे निसर्ग सौंदर्य असलेल्या आंजर्ले गावाबद्दल, मी बालपणी एक कविताही केली होती:

'खेडेगावची निसर्ग शोभा असे,
फारच सुंदर,
कड्यावरचा गणपती आणि 
समुद्रावरचे बंदर ...'

त्याकाळी, आमच्या घरातून सायन ते आंजर्ल्याला जायचं, म्हणजे एक मोठी त्रिस्थळी यात्राच असे. प्रथम चालत स्टेशन, तिथून आगगाडीने मशिदबंदर स्टेशनला उतरायचं. त्यानंतर टांग्यात बसून भाऊच्या धक्क्यावर जायचं. तेथे समुद्रात उभ्या असलेल्या सेंट अंथुनी, रोहिदास वा चंपावती अशा भल्या मोठ्या बोटींमध्ये चढायचं आणि डेकवरून प्रवास करत, समुद्रावरची सुसाट हवा खात, जंजिरा, श्रीवर्धन बंदर घेत, हर्णे बंदराला समुद्रात बोट उभी राहायची. मग पडावात आम्हा बाळगोपाळांना अक्षरश: फेकलं जायचं. तिथून किनाऱ्यावरच्या बसमध्ये बसायचं, धूळ उडवणारं मार्गक्रमण करत आंजर्ल्याला बंदराच्या पलीकडे उतरायचं. पुन्हा 'तरी'वरच्या होडीतून आंजर्ले किनाऱ्यावर उतरायचं व घरी काळोख होईल त्या सुमाराला पाखाडीमधल्या घरी चालत वा बैलगाडीतून जायचं. हा एक विलक्षण अनुभव होता. तेव्हा वीज नव्हती, कंदिलाच्या प्रकाशात, आजी आमची वाट पाहत असायची.

तिथल्या वास्तव्यात, नारळाचे खोबरे व मधुर पाण्यावर ताव मारायचा,
हापूसचे आंबे, फणस मनसोक्त खायचे, सकाळी, विहिरीवर आमचा गडी काशा, आपली बैलजोडी घेऊन वाडीचे शिपणे काढायला आला की, रहाटांच्या धो धो पाण्यात डुंंबत आंघोळी करणे किंवा सायंंकाळी डोंगरकड्यावरच्या श्री गणपतीमंंदिराला जाणे, समुद्रावरच्या बंदरावर जाऊन हॉटेलमधली गरमागरम भजी खाणे, असे अनेक उद्योग आमचे असायचे.

उभाघरच्या दुर्गादेवीच्या यात्रेमध्ये मी बालपणी लोकमान्य टिळकांची 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत' ही गोष्ट मोठ्या धीटाईने सर्वांसमोर सांगितली होती आणि त्यामुळे आनंदाने आजोबांनी मला खांद्यावर घेऊन घरापर्यंत मिरवत आणले होते ! ही न विसरणारी गोष्ट पुन्हा जागी झाली.

तो काळच अक्षरशः हृदयंगम आणि
मनभावन होता. त्याच गावचे हे वृत्त वाचून, तुम्हालाही आंजर्ले गावची यात्रा करावीशी वाटेल !"...💐💐💐


👍"छाप(पड)लेले शब्द-36 !":💐
👍"उचलली जीभ, लावली टाळ्याला !":👌
👍"सध्या वादविवाद, आरोप-प्रत्यारोप आणि काहीही करून नवे नवे असे उपद्व्याप करत, भांडणे वाढत चालली आहेत. कोणत्याही समंजस माणसाला उद्विक न करावे असेच वातावरण आहे. 'आपणच बरोबर, दुसरा मात्र चुकीचा' हे ठरवण्याची अहमहमिका सुरू आहे. समंजसपणा, शहाणपणा खुंटीला टांगून वैमनस्याच्या अशा तमाशांमुळे, "उचलली जीभ, लावली टाळ्याला !" या म्हणीचा प्रत्यय सतत येत आहे.

सोबतच्या वृत्तांत याच नाण्याच्या एका आगळावेगळ्या बाजूकडे लक्ष वेधले आहे. दोन स्त्रियांचे रस्त्यामध्ये भांडण सुरू झाले की, शब्दांमधून निर्माण होणाऱ्या दंगलीचा तमाशा बघायला कशी गर्दी होते, ते मांडले आहे.
"नको रे मना क्रोध हा अंगीकारू" हे संत रामदासांचे सांगणे, झिडकारून भांडणाऱ्यांबरोबरच इतरांचाही मनस्ताप वाढवणाऱ्या घटना अधिकाधिक होत आहेत हे दुर्दैव !:👌

👍"31 डिसेंबर 2015 !":👌


👍"छाप पडलेले शब्द-26" :👌
👍" अंधश्रद्धेचे खेळ खंडोबे !":👌
"आज 21 व्या शतकामध्ये तंत्रज्ञान आणि विज्ञानाने इतकी प्रगती केल्यानंतरही सामान्य माणसांनी, कोणाही भोंदू बाबावर विश्वास ठेवून अंधश्रद्धेपोटी त्याच्या आहारी किती जायचं, त्यासाठी तारतम्य सोडायचं आणि त्याचे भयानक दुष्परिणाम या म.टा. अग्रलेखात मांडले आहेत.

कार्

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा