👍"बिंब प्रतिबिंब !":👌
1
# "श्री विजय केंद्रे ह्यांचे महाराष्ट्र टाईम्स मनोरंजन पुरवणीतील प्रतिपादन:
'छोटी नाट्यगृहे हवीत !'
त्यावरील मतमतांतरे:
# सुनील :
'आजच तुमच्या नाटकाचे तिकीट परवडत नाहीत...छोटी नाट्यगृह झाल्यावर तिकिटाचा दर आणखी वाढेल !'
# सुबोध
'अनेक शाळा काॅलेज मधुन अशी छोटी नाट्यगृहे उभी राहात आहेत. त्यांची संख्या वाढली पाहिजे त्यांना अनुदान मिळते पण त्याची माहिती शाळा महाविद्यालयांना मिळाली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मुख्याध्यापक आणि प्राचार्य या विषयाची जाण असलेले पाहिजे !'
# संजय :
'आम्ही आधीपासून बोंबलतोय पण मुंबई वाले बोलल्याशिवाय हे लोक खोकलात नाही. महाराष्ट्रात 85 थिएटर ची अवस्था वाईट आहे !'
# विरेंद्र :
'आता बाल्कनी नकोच दोनशे ते अडीचशे आसन वेवस्था पुरे !'
# डिगी :
'पण मी म्हणतो हल्लीच्या मनोरंजन मैदानातच छोटेछोटे स्टेज असतात. त्यावर सादरीकरण का सुरू करत नाही?...... असे स्टेज, त्याचसाठी असतात.
इमारत छोटी जरी असली तरी त्याला मेन्टेनन्सचा खर्च येतोच. तेव्हा ह्या छोट्या नाट्यगृहांवर कोण खर्च करणार?
आधीच्या मोठ्या नाट्यगृहांनाच कोणी वाली नाही.
ज्यांना जहांगीर मध्ये show करायला मिळत नाही, त्यांच्या साठी art plaza उत्तम पर्याय आहे. तसाच ह्या गार्डन स्टेजचा वापर करता येईल का?'
# निलेश :
'लोकसंख्येच्या तुलनेने नाट्यगृहांची संख्या वाढली पाहीजे व टिकलीही पाहीजे !'
# सतीश व अनंत :
'100 % बरोबर !'
# प्रदीप:
'खरे आहे !'
##########################
2
""वारसा, खालसा!":
नामवंत घराण्याची मूळ व्यक्ती जितकी धोरणी, कर्तबगार व नेत्रुत्वगुण, दूरद्रुष्टि असणारी असते, तेवढे व तसे कार्यक्षम तिचे नंतरचे वारसदार अभावानेच निपजतात.
राणा भीमदेवी थाटाने अशा वारसदारांनी कितीही वल्गना केल्या, तरी केव्हा ना केव्हातरी त्यांचे पितळ उघडे पडतेच
कुठल्याही क्षेत्रातील नावाजलेल्या घराण्यांची घसरगुंडी, जरी लगेच दुसर्याच पिढीत झाली नाही, तरी तिसर्या वा चौथ्या पिढीनंतर र्हास सुरु होतो, ह्याला इतिहास साक्ष आहे.
त्यावरील मतमतांतरे:
#विश्वास :
'पहिल्यानं कर्तृत्वान "मिळवलं "असतं, पुढच्याला मिळालेलं असतं, वाढवलं तर ते वाढतं! आणि त्याला तेच "ओझं "वाटलं तर कोसळतं, पण टिकविण्या कडे "प्रवृत्ती "होते !'
# सुधीर :
'निसर्गाचा क्रूर नियम आहे, निसर्ग एकाच घराण्यात पिढ्यानपिढ्या सतत कर्तृत्ववान व्यक्ती जन्माला येऊ देत नाही. लोकमान्य, स्वातंत्र्यवीर यांच्या घरात बघा.
किंवा अतिशय गरीब, निरक्षर घरात अत्यंत बुद्धिमान, कर्तबगार, शूर व्यक्ती जन्माला येतात !'
# प्रणव :
साहजिक आहे. विशेष कर्तृत्ववान व्यक्ती एकाच घराण्यात सातत्याने निपाजव्यात ही अपेक्षा अवास्तव आहे. पण तरीही पूर्वजांच्या पुण्याईवर उभी राहिलेली त्यांचे वंशज म्हणून आपल्याप्रती लोकांची जी निरपेक्ष सद्भावना आहे, तिचा फायदा घेत सामान्यातील उत्तम आयुष्य जगता यायला हवे. आज पेशव्यांचे वंशज उत्तम वकील म्हणून पुण्यात जगत आहेतच. लोकांना त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, मात्र अपेक्षा कसलीच नाही. त्यांनीही राजकारणात वैगरे उतरून पेशवा व्हायला जाण्याचे दुःसाहस केले नाही.
मात्र आपल्या पूर्वजांच्या बरोबरीचा मान, मरातब आणि पद मिळवायचा अट्टाहास केला, तर मात्र असलेली अब्रू निघून जाते आणि कीर्ती धुळीस मिळते. आता याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर सध्या किळसवाण्या अवस्थेत राजकीय अस्तित्व टिकवतानाची धडपड करताना दिसताच आहेत !'
# हेमंत :
'सहमत! प्रत्येक जीव आपले आपले कर्माचे गाठोडे घेऊ जन्माला येतो!'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा