रविवार, ७ मे, २०२३

"छाप(पड)लेले शब्द, नव्या रुपात!"

 👍"छाप(पड)लेले शब्द, नव्या रुपात!":

"करा कर्तव्यांकडे दुर्लक्ष, समस्या, लक्ष लक्ष !":👌

# "अवैैध झोपडपट्ट्यांमुळे, खारफुटी धोक्यात..
# रस्ते, फूटपाथ, कुणासाठी? पादचाऱ्यांसाठी की, फेरीवाल्यांसाठी?"👌
👍"शासकीय यंत्रणा, राजकारणी आणि जागरूक नागरिक यांनी आपापली विहित कर्तव्ये न केल्यामुळे, निर्माण होणारे हे प्रश्न आहेत. त्यामध्ये सुयोग्य आर्थिक नियोजनाची हेळसांड, तसेच सरसकट नागरिक शास्त्रातले नियम वाऱ्यावर सोडणे, राजकारण्यांनी मतपेट्यांसाठी अवैैध गोष्टींंना प्रोत्साहन देणे, अशा विविध गोष्टी प्रामुख्याने असे प्रश्न निर्माण व्हायला कारणीभूत आहेत. त्यामुळे जगायचे कसे? हा प्रश्न सामान्यांसमोर उभा राहिला आहे. आपापली कर्तव्ये जर निमूटपणे चोख, सगळ्यांनीच जर केली, तर असे प्रश्न निर्माणच होणार नाहीत !":👌


मोटो' या स्टार्टअपने बनवली आहे. त्यांना यंदा स्टार्टअप मधील दळणवळण क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळाला आहे, त्याचे हे वृत्त आहे. बेरोजगारीच्या गहन समस्येवर स्वतंत्र उद्योग करणे हेच उत्तम उत्तर आहे. त्याचे महत्त्व जसजसे तरुणांना कळत जाईल, तसतशौ आर्थिक आघाडीवर आपल्याला वेगाने प्रगती करता येईल हेच खरे!:👌
-------------------------------------

👍"छाप(पड)लेले शब्द, नव्या रुपात-2 !":👌

"इतिहासाच्या पाऊलखुणा !":


👍"नळदुर्ग !":👍
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक ठिकाण. लोकसंख्या ७,३६७ (१९७१). क्षेत्रफळ ३४·७० चौ. किमी., स. स. पासून उंची ६७०·५६ मी. असून येथील हवामान आरोग्यवर्धक आहे.

हे तुळजापूरच्या आग्नेयीस सु. ३२ किमी. मुंबई-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे. येथील बोरी नदीकाठावरील चौदाव्या शतकातील नळदुर्ग हा किल्ला प्रसिद्ध असून या किल्ल्यावरूनच या ठिकाणास नळदुर्ग नाव पडले असे म्हणतात.

१८५३ पर्यंत नळदुर्ग जिल्ह्याचे आणि १९०५ पर्यंत तालुक्याचे हे मुख्य ठिकाण होते. नळदुर्ग दख्खन पठारावरील तटबंदी केलेल्या सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. यावर चालुक्य, बहमनी व आदिलशाही इत्यादींची सत्तांतरे झाली.

दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहाने बोरी नदीवर धरण बांधून पाणीपुरवठ्याची कायमची सोय केली. स्वतःच्या सुखसोयींसाठी त्याने किल्ल्यात बांधलेला पाणी-महाल हे येथील मुख्य आकर्षण आहे. येथे १९४६ पासून नगरपालिका आहे. कर्नल मेडोज टेलरच्या कारकीर्दीत (१८५३-५७) याची फार भरभराट झाली. त्याने येथील बाजारपेठ सुधारून व्यापारास चालना दिली आणि या किल्ल्याचा मनोवेधक वृत्तांतही लिहिला.

नळदुर्गच्या आसमंतात ज्वारी, गहू, कापूस इ. पिके होतात. येथे दवाखाना, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय आहे. राम, महादेव व हनुमान यांची मंदिरे येथे आहेत. वनवासकाळात रामाचा येथे काही दिवस मुक्काम होता, असे म्हटले जाते. येथे रामनवमीचा उत्सव होतो व पौष पौर्णिमेस खंडोबाची यात्रा भरते.
लेखक - य. रा. कांबळे

बदामी आणि हंपी ही २ अद्भुत स्थळांची नावे आहेत. भारताची स्थापत्य कला किती विकसित होती ह्याची ती "मूर्ति"मंत उदाहरणे आहेत.
बदामी येथे काही गुफा आणि कआळभैरवाचे अतिशय सुंदर मंदिर आहे. ह्या देवळाचा दगड हा बदामी रंगाचा अतिशय सुरेख दगड आहे. ह्या परिसरात बदामी रंगाचे दगड आढळतात. अतिशय काटेकोर प्रमाणबद्धता आणि दगडांचा सुंदर रंग आणि आजूबाजूचा परिसर ह्यामुळे हे मंदिर अलौकिक वाटते.

हंपी ला पोचल्याबरोबर आपण कुठेतरी वेगळ्या गूढ जगात प्रवेश केला आहे असे लगेच जाणवायला लागते. तेथील दगड हे वेगळ्याच आकाराचे आणि कोणीतरी मुद्दाम त्याची रचना करून ठेवली आहे असे वाटत राहते. तेथील विरूपाक्ष मंदिर आणि दगडी रथ तर अलौकिकच.  तेथील पट्टदकल येथील मंदिरे सौंदर्याची आणि स्थापत्यकला यांची उधळणच आहे. I would say if Hampi is maintained like Rome then it will beat Rome hands down with its Marvel and structures. आजतरी तिथे जाण्याचे रस्ते आणि सुविधा यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पण कदाचित त्याचमुळे ही स्थळे जीर्णावस्थेत का होईना आपल्या रम्य भूतकाळाची साक्ष म्हणून उभी आहेत. आपल्याकडे गर्दीच्या ठिकाणी किती encroachment होते हे सर्वांना माहीत आहेच. परंतु भारतातील एक अतिशय सुरेख किंबहुना जगातील अनेक स्थळांपेक्षा काकणभर श्रेष्ठ असा आपला वारसा विस्मरणात जाणार नाही ना अशीही भीती वाटते.

धन्यवाद 
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा