"पुढचे पाऊल"
अर्थात अभिनव राशीभविष्य:
१नोव्हे.20 ते ३१ डिसें'21:
लेखक श्री. सुधाकर नातू
"मागे वळून पहाताना”:
आज जे कोरोनारुपी महामारीचे भीषण संकट गेले कित्येक महिने जगभर घोंगावत आहे. ते मागील वर्षी, आमच्या सारख्या अनेक भविष्य अभ्यासकांच्या नजरेत आलेच नव्हते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. ते कटू सत्य प्रथम मान्य केलेच पाहिजे. अचानक कुणाच्या ध्यानीमनी नसताना भयानक संसर्गजन्य अशा कोरोना महामारीचे महासंकट जगावर कोसळले. मात्र हे राशीभविष्य जुलै'२० अखेरच्या आठवड्यात लिहीत असताना त्यावरील प्रतिबंधक लस निर्माण करण्यात यश येऊ लागल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत, ही एक समाधानाची गोष्ट आहे. ह्या महासंकटातून सर्व जगाची लौकरात लौकर सुटका होवो आणि पुनश्च सर्वसाधारण समाधानकारक वातावरणात सुख सम्रुद्धीचे शांतीचे दिवस येवोत ही प्रथम प्रभूचरणी प्रार्थना.
सालाबादप्रमाणे दिवाळी अंकांमध्ये हे आगामी राशीभविष्य लिहीण्याची आमची आता त्रेचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत.ह्याचा आम्हाला आनंद होत आहे.
"अभिनव राशिभविष्य":
आमचे हे अभिनव राशिभविष्य अनुकूल गुणांवर आधारित आहे अशा तऱ्हेचे भविष्य आपल्याला कुठेही मिळणार नाही जास्त वस्तुनिष्ठ हे मार्गदर्शन आहे. येथे १ नोव्हेंबर'२० ते ३१ डिसेंबर'२१ह्या कालखंडात, प्रत्येक राशीला सहा प्रमुख ग्रहांच्या-रवि, मंगळ, बुध, गुरू, शुक्र व शनी ह्याच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून पुढे प्रत्येक राशींचे अनुकूल गुण दाखवले आहेत.
३१ दिवसांचा महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे जास्तीत जास्त गुण १८६, तर ३० दिवसांच्या महिन्यांचे जास्तीत जास्त गुण १८० आणि फेब्रुवारी'२१ चे जास्तीत जास्त अनुकूल गुण १६८. याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ग्रह किती शुभ दिवस आहेत ते अनुकूल गुण, त्या त्या महिन्याला आपण आपल्या चंद्रराशीच्या बाबतीत पाहू शकाल. आपले नशिब किती ते ह्या अनुकूल गुणांच्या आधारे समजून घेऊन, प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल राखत समाधान मिळवण्याची युक्ती तुम्हाला मिळू शकेल अशी ही अनुकूल गुणांची कल्पना आहे. आता राशीनिहाय राशीभविष्य त्या पार्श्वभूमीवर देत आहोत:
१ मेषः वस्तुस्थितीचा स्विकार करुन तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे, हे ह्या वर्षीचे सार आहे.
|
Nov-20 |
Dec-20 |
Jan-21 |
Feb-21 |
Mar-21 |
Apr-21 |
May-21 |
Jun-21 |
Jul-21 |
Aug-21 |
|
76 |
66 |
62 |
64 |
56 |
72 |
118 |
135 |
88 |
53 |
|
Sep-21 |
Oct-21 |
Nov-21 |
Dec-21 |
TY 21 |
LY 20 |
Diff |
TY Rank |
LY Rank |
|
|
63 |
77 |
64 |
40 |
1,034 |
1,063 |
(29) |
4 |
5 |
|
मागील वर्षीच्या ५ क्र. वरून यंदा ४ थ्या क्रमांकावर सरकलेली आहे: सहाजिकच जिथे आहात त्यात थोडी सुधारणा होईल हा दिलासा प्रारंभीच देतो.
आगामी वर्षात गुरू काळ लाभस्थानी असल्याने ह्या कालखंडात अनेक उत्साहवर्धक घटना घडतील. प्रगतीपथावर तुमची चाल थोडी धीमी राहील.
शनी दशमस्थानी स्वग्रुही असल्याने नोकरी-व्यवसायात तुम्हाला आवडते काम मिळू शकेल. नोकरीमध्ये शुभवार्ता आहे. तसेच नवीन उद्योगाला उर्जितावस्थेत नेऊ शकाल. असे असले तरी आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या. जुनी येणी मिळणे लांबणीवर पडू शकेल. विद्यार्थीवर्गाला अभ्यासात गोडी लागून स्पर्धात्मक परिक्षात चांगले यश मिळणार आहे. विवाहोत्सक मंडळींना अनुरूप जोडीदार मिळल्याने ते खुष होतील अशी परिस्थिती आहे. प्रवासात जरी अडचणी आल्या तरी त्यातून नव्या ओळखी होऊ शकतील, ज्या तुम्हाला पुढे उपयोगी पडतील.
कौटुंबिक स्वास्थ्य बिघडणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. थोडा वाणीवर ताबा ठेवा, नाहीतर गैरसमज होऊ शकतात. कुटुंबामध्ये वडीलधाऱ्यांच्या तब्बेतीची चिंता निर्माण होऊ शकेल. मात्र, संसारात मुलांकडून एखादी चांगली बातमी कळू शकेल. जोडीदाराचेही म्हणणे ऐकणे फायद्याचे ठरेल. एकंदर तथ्यांश हा की, प्रसंगावधान आणि समतोल राखत, प्रकृती सांभाळून मार्गक्रमणा करा. आपला आब व स्थान अबाधित राखण्यात आपण यशस्वी व्हाल.
२ व्रुषभः योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी "संयम" असणे हीच खरी जीवनातील अवघड परीक्षा आहे ! आगामी कालखंडात हे कायम ध्यानात ठेवा.
|
Nov-20 |
Dec-20 |
Jan-21 |
Feb-21 |
Mar-21 |
Apr-21 |
May-21 |
Jun-21 |
Jul-21 |
Aug-21 |
|
69 |
86 |
69 |
68 |
82 |
65 |
36 |
59 |
85 |
64 |
|
Sep-21 |
Oct-21 |
Nov-21 |
Dec-21 |
TY 21 |
LY 20 |
Diff |
TY Rank |
LY Rank |
|
|
28 |
56 |
99 |
52 |
918 |
1,040 |
(122) |
10 |
6 |
|
तुमची रास गटांगळी खाऊन मागील ६ व्या क्रमांकावरुन तळाच्या दहाव्या स्थानावर चौथ्या गटात ढकलली गेली आहे: सहाजिकच ह्या कालखंडात विशेष त्रास सहन करायचा आहे.
राशीने प्रतिकूल ग्रहमान काय जबरदस्त फटका देऊ शकते ते आता अनुभवायचे आहे.
थोडक्यात एकंदर काळ हा प्रतिकूल आहे, हे विसरून चालणार नाही. मनस्थिती ठीक राहणार नाही. स्थावर निर्णय वेळेत न घेणे वा चुकणे असा अनुभव घ्याल. मातेच्या तब्बेतीची चिंता निर्माण होऊ शकेल. रहाटगाडग्याप्रमाणे नशिबाचे चक्र गोलाकार फिरत असते. आज उंचावर असलेले उद्या खाली, तर आजचे तळाला तर उद्या उंचावर, हे नशिबाचे खेळ अव्याहत चालतात. संयम व अविरत प्रयत्न ह्यांचा आधार घेत, तुम्हाला सुख शांती मिळवताना खूप धडपड करावी लागेल, अशी परिस्थिती आहे. संसारात जोडीदाराचे आडमुठे वागणे, एकमेकांशी वाद विवाद आणि पाहुण्यांची उगाचच वर्दळ यामुळे त्रस्त रहाल.
त्यात भर म्हणून, मुलांकडून अपेक्षाभंग व वडिलधाऱ्या मंडळींसंबंधी चिंता निर्माण होऊ शकते. प्रवास अडचणीचे तब्येतीची विशेष काळजी घ्या. प्रवासामध्ये अपघाताचा धोका.
अचानक मनाविरुद्ध नुकसान करणारे वादाचे प्रसंग तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. नोकरीधंद्यात प्रयत्नांचे फळ मनाप्रमाणे मिळणारे नाही, तर व्यवसायात आडाखे चुकल्यामुळे एखादा मोठा नुकसानीचा फटका बसू शकतो. विवाहोत्सुकांना घाई करून चालणार नाही कारण फसगत गैरसमज असे अनुभव येऊ शकतात.
तब्येतीची वेळीच काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करूनही कदाचित अपेक्षाभंग होणार असल्यामुळे त्यांनी अपेक्षा कमी ठेवाव्यात. एक लक्षात ठेवा कठीण काळ भविष्यात केव्हा तरी जाणारच आहे तोपर्यंत धीर व सहनशीलता हाच मंत्र आपल्याला जपायला हवा.
३ मिथून: जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभवतीच असतो, फक्त त्याला शोधता आलं पाहीजे, हे तुम्ही यंदा खरे करुन दाखवू शकाल.
|
Nov-20 |
Dec-20 |
Jan-21 |
Feb-21 |
Mar-21 |
Apr-21 |
May-21 |
Jun-21 |
Jul-21 |
Aug-21 |
|
67 |
89 |
56 |
72 |
44 |
106 |
75 |
59 |
78 |
120 |
|
Sep-21 |
Oct-21 |
Nov-21 |
Dec-21 |
TY 21 |
LY 20 |
Diff |
TY Rank |
LY Rank |
|
|
83 |
31 |
48 |
94 |
1,022 |
1,003 |
19 |
5 |
8 |
|
मिथून राशीने मागील 8 व्या क्रमांकावरून येणाऱ्या कालखंडात ५ व्या क्रमांकावर उडी मारली आहे. तेव्हाच्या गुणांमध्ये घसघशीत वाढ होऊन आता शुभ नशिबाचा आनंद अनुभवणार आहात.
प्रतिकूल ग्रहस्थितीचे भ्रमण मनाविरुद्ध परिस्थिती निर्माण करून तुमची परिक्षा होती. मनस्थिती संभ्रमित राहिल्याने योग्य ते निर्णय घेणे कठीण जात होते. मात्र आता आमुलाग्र बदल होऊन गुरु बहुतांश काळ भाग्यांत कुंभ राशीत असेल. तो विस्कळित घडी पुष्कळ अंशी सावरू शकेल. स्थावर विषयक समस्या दूर होऊन स्थैर्य भरभराट होईल. नोकरीत काही भाग्यवंतांना प्रमोशन वा पुरस्कार मिळू शकेल.
मात्र राहू केतुचे अनुक्रमे बाराव्या व सहाव्या स्थानातले भ्रमण, अडचणी निर्माण करेल. त्यांचा मुकाबला करण्यासाठी धैर्य हवे. संघर्षातून मार्ग काढाल. विवाहोत्सुकांना मनाप्रमाणे जोडीदार मिळून आयुष्यात सुख समाधान मिळू शकेल. अनुकूल संधी मिळून, नोकरी व्यवसायात वरिष्ठ खुष वा स्पर्धेत आघाडी होऊ शकते. आर्थिक घडी हवी तशी बसेल. प्रवास मनाजोगते , दौरे वा पर्यटनाचे मनसुबे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रम घ्यावे तरच अपेक्षित यश मिळू शकेल.
जीवनशैलीत सुखासिनतेमुळे डायबेटीस सारखी अनारोग्याची वेळीच तपासणी करून घ्यावी. महिलावर्गाला घरातील खेळीमेळीच्या वातावरणात मनाला उभारी येईल. मनाजोगती महत्वाची खरेदी होईल. अनुकूल गुणांचा विचार करता वर्षांतील मधले महिने नशीबाच्या रखरखीत उन्हाळ्यात ओअँसीस भासतील. एकंदर अंधारातून प्रकाशाचे कवडसे शोधत यशदायी मार्गक्रमणा करणार आहात. चिंता नको.
४ कर्क: सारी उम्र एक सबक याद रखना...!
दोस्ती और दुआ में "नियत" साफ रखना...! हे यंदाच्या तुमच्या प्रारब्धाचे सार सांगता येईल.
|
Nov-20 |
Dec-20 |
Jan-21 |
Feb-21 |
Mar-21 |
Apr-21 |
May-21 |
Jun-21 |
Jul-21 |
Aug-21 |
|
55 |
56 |
70 |
46 |
112 |
56 |
77 |
77 |
37 |
49 |
|
Sep-21 |
Oct-21 |
Nov-21 |
Dec-21 |
TY 21 |
LY 20 |
Diff |
TY Rank |
LY Rank |
|
|
94 |
76 |
14 |
37 |
856 |
859 |
(3) |
11 |
11 |
|
कर्क राशीचे नशीब आता जैसे धे राहील कारण यंदा तळातील ११ वे स्थान मिळाले आहे: पुनःश्च एक कष्टकारक वर्ष तुमच्या नशिबी दिसते. परिक्षा पहाणार्या चौथ्या गटात फेकले गेला आहात. प्रतिकूल ग्रहमानापायी हलाखीची स्थिती झाल्यामुळे तुमची विविध क्षेत्रांमध्ये पिछेहाट होऊ शकते. म्हणून सावधानतेने वागा, योग्य मार्गानेच व्यवहार करा. कुणावर नाहक विश्वास नको.
निराशाजनक संपूर्ण कालखंड अडचणी आणि विरोध त्याला योग्य प्रकारे तोंड देत तुम्ही नोकरी व्यवसायात कसेबसे टिकून रहाण्याचा आटापिटा कराल. आहे. यावर्षी नोकरीमध्ये डिमोशन, नको त्या विभागात वा जागी बदली, सहकार्यांकडून अपमान वरिष्ठांची बोलणी असे प्रसंग येतील.
मात्र कुठलाही घाईघाईने निर्णय घेण्याची चूक करू नका व तब्येतीस जपावे लागेल. संसारामध्ये जोडीदाराच्या प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी लागेल. दूरचे प्रवासात विशेष काळजी घ्या, अपघात, विलंब वा नुकसान होऊ शकते. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळणे कठीण आहे, तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विशेष अपेक्षा ठेवू नका.
महिलांना आणि कुटुंबामध्ये आजारपणे, जोडीदाराचे उरफाटे वागणे अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. विवाहोत्सूकांनी नववर्षारंभी अधिक प्रयत्न केले तर चांगले, नंतर अस्वस्थ वातावरण राहणे, मंगल कार्य रद्द होण्याची शक्यता अशा कटकटी आहेत. थोडक्यात, आहे ती स्थिती अधिक खालावत जाणार नाही ह्याची चिंता करत काळ काढावयाचा आहे. अथक परिश्रम, श्रद्धा, संयम ठेवला तरच तुम्ही तग धरु शकाल.
५ सिंह: "जे जे हाती घ्यायचं ते ते सर्वोत्तमच करावयाचे असे तुमच्या नशिबाचे यंदा सार आहे.
तुम्ही मंडळी,यंदा बाजी माराल, कारण सर्वोच्च पहिल्या स्थानी विराजमान असाल: भरभराट प्रगतीचा काळ.
|
Nov-20 |
Dec-20 |
Jan-21 |
Feb-21 |
Mar-21 |
Apr-21 |
May-21 |
Jun-21 |
Jul-21 |
Aug-21 |
|
|
102 |
91 |
96 |
64 |
57 |
117 |
147 |
149 |
133 |
96 |
|
|
Sep-21 |
Oct-21 |
Nov-21 |
Dec-21 |
TY 21 |
LY 20 |
Diff |
TY Rank |
LY Rank |
|
|
|
94 |
113 |
138 |
73 |
1,470 |
1,302 |
168 |
1 |
3 |
|
|
"कधी नव्हे अशी आश्चर्यकारक तुमच्या नशीबाने कमाल केली आहे. कारण तुमच्या राशीला ह्या वर्षी सर्वोच्च अनुकूल गुण मिळाले आहेत. कारण गुरू आता काही काळ शुभफलदायी धन स्थानी रहाणार आहे. शिवाय शनी संपूर्ण वर्ष षष्ठ स्थानी असल्याने यंदा हनुमान उडी घेत पहिले स्थान मिळवले आहे.
तुम्हाला यावर्षी गेमचेंजर असल्यासारखा काळ आनंदात अनुभवायचा आहे. नोकरी-व्यवसायात अनुकूल घटना आणि परदेशगमनाची संधी तुम्ही हस्तगत कराल. यावर्षी तुमची विविध क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळवून स्पर्धात्मक अशा निवडीमध्ये अपेक्षापूर्ती होईल. विवाहोत्सूकांना, गोड बातमी मिळू शकेल. नोकरी धंद्यामध्ये तुमच्या उत्तम योगदानामुळे आर्थिक भरभराट संभवते. काही भाग्यवंतांना अपेक्षित प्रमोशन मिळू शकेल. प्रवासाचे योग येऊन नवीन ओळखी होतील. त्यांचा तुम्ही युक्तीने आपल्या प्रगतीसाठी उपयोग कराल. मात्र ज्या महिन्यात कमी गुण तेव्हां
प्रतिकूल ग्रहमानापायी ज तुम्हाला सावधानतेने निर्णय घ्या असे मी सांगतो.
महिलांना उत्साहवर्धक आणि कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील आणि संततीबाबत कौतुकास्पद बातमी कानावर येईल. पुढील भवितव्यासाठी योग्य ते निर्णय आत्ताच दूरदृष्टीने घेऊन मजबूत पाया घालू शकणारे हे वर्ष आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमुळे तुम्ही पहिला क्रमांक मिळवला असल्याने आगामी कालखंडात तुम्ही मिळालेल्या संधीचे सोने करा. माझे शुभ आशीर्वाद तुम्हाला आहेत.
६ कन्या: 'जग तुम्हाला कमजोर समजणार आहे आणि तुमची चक्रव्यूहातील अभिमन्यू सारखी कोंडी होणार आहे' असे यंदा समजा.
|
Nov-20 |
Dec-20 |
Jan-21 |
Feb-21 |
Mar-21 |
Apr-21 |
May-21 |
Jun-21 |
Jul-21 |
Aug-21 |
|
64 |
62 |
65 |
66 |
65 |
40 |
33 |
51 |
104 |
53 |
|
Sep-21 |
Oct-21 |
Nov-21 |
Dec-21 |
TY 21 |
LY 20 |
Diff |
TY Rank |
LY Rank |
|
|
54 |
31 |
45 |
101 |
834 |
964 |
(130) |
12 |
9 |
|
ही रास ह्या कालखंडात नवव्या जागेवरून खूप कटकटी वाढवणार्या तळाच्या बाराव्या स्थानी ढकलेली जाईल.
पंचमातील गुरुचे केवळ काही काळ सहाय्य वगळता इतर आसामाधारक ग्रहमानापायी विविध क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीशी तोंड द्यावे लागणार आहे. विविध महिन्यात जे अनुकूल गुण मिळत आहेत, ते ध्यानात घेऊन कोणताही धोका न पत्करता आता वाटचाल करायची आहे कारण खरोखर वाळवंट सुरू झाले आहे. अपेक्षा कमी ठेवून प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. नोकरीधंद्यात वरिष्ठ तुमचा पाणउतारा करतील, तर सहकारी अडचणीचे प्रसंग आणतील. व्यवसायामध्ये तीव्र स्पर्धेत टिकाव धरणे कठीण झाल्याने तुम्हाला मानसिक त्रास होईल.
संसारात पाहुण्यांची ढवळाढवळ, वडिलधाऱ्या मंडळींच्या प्रकृती संबंधित नवीन चिंता आणि जोडीदाराचे आजारपण ह्यामुळे त्रस्त व्हाल. विशेषतः ह्यावर्षी तुमच्या जबाबदार्या वाढल्याने, आर्थिक ओढाताण होईल काटकसरीने रहा. विद्यार्थी वर्गाला परीक्षांमध्ये अभ्यास अपुरा झाल्याने अपेक्षित यश कठीण असेल. प्रवासात सावध रहा, दिरंगाई विलंब आणि अडचणी संभवतात. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. "दे माय धरणी ठाय" अशी तुमची यावरची परिस्थिती झालेली आहे. पुढे धोका असणार असे समजत प्रसंगावधान राखत स्धतःला संभाळा.
७ तुळा: योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी "संयम" असणे हीच खरी जीवनातील अवघड परीक्षा आहे....हे यंदा ध्यानात ठेवा.
|
Nov-20 |
Dec-20 |
Jan-21 |
Feb-21 |
Mar-21 |
Apr-21 |
May-21 |
Jun-21 |
Jul-21 |
Aug-21 |
|
64 |
97 |
66 |
52 |
58 |
52 |
84 |
86 |
85 |
150 |
|
Sep-21 |
Oct-21 |
Nov-21 |
Dec-21 |
TY 21 |
LY 20 |
Diff |
TY Rank |
LY Rank |
|
|
62 |
28 |
40 |
68 |
992 |
897 |
95 |
6 |
10 |
|
तुळा राशीने ह्या कालखंडात दहाव्या स्थानावरुन मध्यमवर्गी सहावे स्थान प्राप्त केले आहे: थोडी आशा वाढेल.
तुमची विविध क्षेत्रामध्ये संथगतीने वाटचाल होणार आहे. ह्या कालखंडात काही काळ गुरु नवपंचमात असल्याने, व्यावसायिक जीवनात तुम्हाला अनेक संधी मिळतील मात्र त्यात मनाजोगते घडण्यासाठी संयम व प्रयत्न ह्यांची जोड हवी. विवाहोत्सुक मंडळींची स्वप्ने पुरी होण्यासाठी तोच काळ अनुकूल आहे. सुदैवाने परिक्षा काळातच गुरु शुभ, विद्यार्थ्यांना या वर्षी चांगले गुण मिळतील.
तुमच्या कष्टाळू वृत्तीचा अतिरेक मात्र तुम्ही करू नका. त्यामुळे हितशत्रुंची नाराजी ओढवून घ्यावी व नुकसान सोसावे लागेल. कोणती गोष्ट किती मर्यादेपर्यंत ताणायचे याचा विचार करा. आता आर्थिक बाजू सुधारणार असल्याने मागील देणी देऊ शकाल. नवीन महत्त्वाच्या खरेदी बद्दल मात्र निर्णय लांबणीवर टाका. प्रवास थोडेफार अडखळत काही अडचणी येत पूर्ण होतील. संसारात नातेवाईकांबरोबर मतभेद, मात्र संतती विषयक काही चांगली बातमी मिळू शकेल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. स्वतःला शारीरिकस्वास्थ्य जपावे लागेल, विशेषतः पोटदुखी. मानसिक शांती मिळणे अवघड दिसते. थोडक्यात तारेवरची कसरत करत विवेकबुद्धीने प्रतिकूल दिवसातून आपल्या अपेक्षा पुर्या करायच्या आहेत. समतोल साधत अतिरेक टाळणे हा मूलमंत्र राहील.
८ व्रुश्चिक: कुदरत का नियम है......
*मित्र और चित्र दिल से बनाओगे तो उनके रंग जरुर निखर आएंगे...आनंदी रहाल असा नशीबाचा यंदा अर्थ आहे.
|
Nov-20 |
Dec-20 |
Jan-21 |
Feb-21 |
Mar-21 |
Apr-21 |
May-21 |
Jun-21 |
Jul-21 |
Aug-21 |
|
86 |
67 |
119 |
79 |
82 |
70 |
52 |
60 |
64 |
87 |
|
Sep-21 |
Oct-21 |
Nov-21 |
Dec-21 |
TY 21 |
LY 20 |
Diff |
TY Rank |
LY Rank |
|
|
153 |
78 |
83 |
93 |
1,173 |
1,406 |
(233) |
2 |
1 |
|
व्रुश्चिक रास आपला रुबाब मागील पहिल्या तर आता दुसर्या क्रमांकावर राखेल.
शनी संपूर्ण कालखंडात पराक्रम स्थानी असल्यामुळे ह्या वर्षी तुम्हाला अनुकूल गुण पहिल्या गटातील मिळाल्याने सहाजिकच तुमची प्रगती आता कोणी रोखू शकणार नाही. बाराही राशींच्या नशिबाच्या परिक्षेत दुसऱ्या स्थानी आपण दिमाखाने वाटचाल करणार आहात ही गोड बातमी प्रथमच देतो. याच बरोबर इतर ग्रहांचे तुमच्यावर कृपा लोभ, यामुळे हे वर्ष तुम्हाला खरोखर प्रगतीपर आनंददायी असे जाणार आहे. नोकरी व्यवसायात अनुकूल घटना घडून तुमचा एकंदर महत्त्वाकांक्षेचा मार्ग खुला होईल. उत्तम अर्थार्जन आणि व्यवसाय धंदा करणाऱ्यांना स्पर्धेमध्ये चांगल्यापैकी भरभराट करणारे यश अशी फळे आहेत.
विद्यार्थी वर्गाला धवल यश मिळण्याचा काळ आहे, स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्हाला मनोकामना पुऱ्या करता येतील. विवाहोत्सूक मंडळींना वर्षाचा मध्य काळ लाभ देणारा आहे अथवा वर्ष अखेरीचे दोन महिने चांगले आहेत. संसारामध्ये नवीन खरेदी होईल, पावणेरावणे यांचे चांगले आदरातिथ्य केले जाईल. स्थावर यासंबंधीचे प्रश्न मार्गी लागू शकतील. दूरचे प्रवास मात्र काळजीपूर्वक करा. आर्थिक बाजू जरी सुधारणार असली तरी नाहक खर्च होणार नाही व नवीन गुंतवणूक करताना याची काळजी घ्या. एकंदर तुमची तब्येत व मनस्थिती उत्साहवर्धक राहील. चंचलतेवर लगाम घातलात तर हे वर्ष तुमच्यासाठी नव्या आशांचे, नव्या दिशांचेच असेल.
९ धनु: "खोट्या होकारापेक्षा "स्पष्ट नकार" नेहमी चांगला असतो", हे ध्यानात ठेवत समतोल वागण्यात शहाणपण" हा ह्या वर्षीच्या नशीबाचा मतितार्थ आहे.
धनु राशीच्या गुणांमध्ये चांगली वाढ झाल्यामुळे आता मागील वर्षीच्या कष्टकारक शेवटच्या बाराव्या क्रमांकावरुन जराशी सुधारणा होत ८ व्या स्थानी असेल.
|
Nov-20 |
Dec-20 |
Jan-21 |
Feb-21 |
Mar-21 |
Apr-21 |
May-21 |
Jun-21 |
Jul-21 |
Aug-21 |
|
96 |
61 |
83 |
113 |
86 |
61 |
45 |
49 |
41 |
22 |
|
Sep-21 |
Oct-21 |
Nov-21 |
Dec-21 |
TY 21 |
LY 20 |
Diff |
TY Rank |
LY Rank |
|
|
59 |
103 |
110 |
25 |
954 |
748 |
206 |
8 |
12 |
|
केतु तुमच्या राशीत पुष्कळ काळ व राहू समोरच असल्याने मागील वर्षी दिवसेंदिवस तुम्ही पिछाडीवर व अनेक समस्यांशी मुकाबला करत होतात. आता त्यांचे स्थित्यंतर झाले आहे व गुरू ह्या कालखंडारंभी व अखेरीस धनस्थानी शुभस्थितीत राहील. त्यामुळे शुभफळे मिळण्यात जरी अडचणी आल्या तरी त्यांतून मार्ग काढू शकाल. मात्र अतिशय काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची खप्पामर्जी झाली तरी संयम ठेवा, हेही दिवस जातील असा विश्वास ठेवा. व्यावसायिकांना बाजारामध्ये स्पर्धा वाढल्यामुळे तुमच्या नफ्यात घट होऊन तोटा सहन करावा लागू शकतो. म्हणून धोका न पत्करता, सावधपणे निर्णय घ्यावे लागतील.
विद्यार्थी वर्गाला मात्र मनाजोगते यश मिळेल. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जास्त प्रयत्न करावे लागतील. विवाहोत्सुकांना हा कालखंड अनुकूल आहे-गुरू शुभ असेल जेव्हा राशीत धनस्थानी असेल तेव्हा. कौटुंबिक स्वास्थ्य तुमच्या चतुराईने सुधारावे. प्रवासामध्ये कुणावर नाहक विश्वास टाकू नका घाईगर्दी टाळा-नुकसानीची दाट शक्यता आहे, तसेच छोटे-मोठे अपघात होऊ शकतात, काळजी घ्या. संततीचे बाबतीत शुभवार्ता मिळाल्याने कौटुंबिक स्वास्थ सुधारेल. वडीलधाऱ्या मंडळींचे मार्गदर्शन घ्या.
आठव्या स्थानी मध्यम गटात संमिश्र काळ भविष्यात असणार आहे. संयम व सहनशक्ती वाढवणे हेच गरजेचे आहे.
१० मकर: यंदा कसोटी पहाणार्या दिवसात कितीही झाले तरी आपली प्रतिष्ठा खूप प्रयत्नपूर्वक सांभाळायची आहे, कारण हीच एक अशी गोष्ट आहे, जी आपल्या वयापेक्षा जास्त टिकते.
|
Nov-20 |
Dec-20 |
Jan-21 |
Feb-21 |
Mar-21 |
Apr-21 |
May-21 |
Jun-21 |
Jul-21 |
Aug-21 |
|
84 |
77 |
37 |
31 |
68 |
99 |
91 |
45 |
81 |
80 |
|
Sep-21 |
Oct-21 |
Nov-21 |
Dec-21 |
TY 21 |
LY 20 |
Diff |
TY Rank |
LY Rank |
|
|
25 |
42 |
75 |
102 |
937 |
1,024 |
(87) |
9 |
7 |
|
मकर राशीचे नशीब, गुणांमध्ये घसरण झाल्याने ७ व्या स्थानावरुन कसोटी पहाणारे ९ स्थान मिळवत आहे: त्रासात वाढ.
एकंदर परिस्थिती प्रतिकूल असेच राहणार आहे, तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील, अशा भ्रमात राहू नका. कारण तुमचा राशीस्वामी शनि ग्रह तुमच्या सहाय्यास नाही. उलट शनी हा तुमच्याच राशीवर असल्यामुळे साडेसाती. तुमचे निर्णय घेताना चल-बिचल होऊन खूप वेळा नुकसान होईल.
ग्रहमान प्रतिकूल असले की घराचे वासेही कसे फिरतात, त्याचा अनुभव या वर्षी घ्यायचा आहे. नोकरी-व्यवसायात पिछेहाट व विरोधकांच्या कारवायांमुळे त्रस्त व्हाल. आर्थिक ओढाताण तुमच्या कौटुंबिक स्वास्थ्यांत अडथळे निर्माण करेल. थोडासा दिलासा गुरु वर्ष अखेरीस कुंभेत धनस्थानी गेल्यानंतर मिळू शकेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालाची धास्ती वाटू शकेल. अधिक नेटाने अभ्यास करायला हवा. घरातील वडीलधारी तुमच्या चिंता वाढवतील, मनस्ताप वाढवतील. प्रवासात तसेच, नवीन गुंतवणूकीत नाहीतर फसवणूक होऊ शकेल. तुमच्या संशयी स्वभावामुळे अडचणीचे तसेच गैरसमजाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. विवाहोत्सुकांना आँक्टोबर'२१ अखेरी नंतरच शुभकाळ, म्हणून घाईगर्दी नको. सगळेच फासे उलटे पडत आहेत असे म्हणायची वेळ आली, तरी धीर सोडू नका, केवळ श्रद्धा संयम आणि सबुरी या जोरावर दिवस काढायचे आहेत.
११. कुंभ : आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही, ज्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव कधीच होत नाही, हा बीजमंत्र यंदा ध्यानात ठेवून धीराने वाटचाल करायची आहे.
|
Nov-20 |
Dec-20 |
Jan-21 |
Feb-21 |
Mar-21 |
Apr-21 |
May-21 |
Jun-21 |
Jul-21 |
Aug-21 |
|
99 |
138 |
69 |
48 |
31 |
62 |
69 |
80 |
45 |
47 |
|
Sep-21 |
Oct-21 |
Nov-21 |
Dec-21 |
TY 21 |
LY 20 |
Diff |
TY Rank |
LY Rank |
|
|
67 |
59 |
68 |
91 |
973 |
1,143 |
(170) |
7 |
4 |
|
कुंभ राशीच्या गुणांमध्येही अशीच घसरण आहे, सहाजिकच मागील समाधानकारक ४ थ्या जागेवरून आता सातव्या स्थानी नशीबाची फरफट ह्यावर्षी तुमची परिक्षा पहाणार आहेत.
नोकरी-व्यवसायात वाढत्या जबाबदारी बरोबरच अपमान सहन करावे लागू शकतात व अधिक कष्ट घेतले तरी पदरी चीज नाही, अशी बिकट अवस्था. व्यवसायात तुमचे आडाखे चुकून ठरून आर्थिक घडी विसकटू शकेल. त्यातले त्यात समाधान हेच की, आगामी वर्षाच्या-'२१ मध्यास धनु राशीत, तुमच्या लाभस्थानी गुरू असेल तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईल, नवे मार्ग नव्या दिशा खुल्या होउ शकतील. विवाहोत्सूकांनी ह्याच काळात प्रयत्न वाढवावेत.
स्थावर विषयक निर्णय व कृती शक्यतो लांबणीवर टाका. घरामध्ये वडीलधाऱ्यांचा विचित्रपणा व आक्रस्ताळेपणा अशांती निर्माण करेल. जोडीदाराला सहाय्य करत रहा, त्यातच तुमचे हित आहे. मात्र मकर राशीवरचा शनी तुमच्या मनाच्या काळज्या वाढवू शकतो व खर्च आवाक्याबाहेर टाकू शकतो. डोकेदुखी वा मानसिक दुखण्याची वेळीच काळजी घ्या. अनोळखी माणसांबरोबर वाद वाढवू नका. प्रवासामध्ये फसगत वा नुकसानीचा धोका आहे. एकंदर काय परिस्थिती तुम्हाला प्रतिकूल आहे, आपली प्रगती यंदा तरी कठीण दिसते!
१२ मीन: सहनशीलता' आणि 'हास्य' हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत, कारण हास्य त्याचे प्रश्न दिसु देत नाही,तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही. हे दोन मार्ग तुमच्या ह्या कालखंडातील यशाचे गमक असतील.
|
Nov-20 |
Dec-20 |
Jan-21 |
Feb-21 |
Mar-21 |
Apr-21 |
May-21 |
Jun-21 |
Jul-21 |
Aug-21 |
|
45 |
41 |
110 |
127 |
138 |
91 |
84 |
80 |
75 |
95 |
|
Sep-21 |
Oct-21 |
Nov-21 |
Dec-21 |
TY 21 |
LY 20 |
Diff |
TY Rank |
LY Rank |
|
|
82 |
38 |
35 |
91 |
1,132 |
1,303 |
(171) |
3 |
2 |
|
मीन रास मानाच्या ह्या कालखंडात अनुकूल गुण थोडे कमी झाल्यामुळे दुसऱ्या स्थानावरुन तिसर्या स्थानी समतोल साधेल.
मीन राशीची मंडळी मागच्यासारखीच यंदाही तुमच्या नशीबाची वेगाने प्रगती होत रहाणारच कारण शुभफलदायी गुरु पूर्वाधात तर शनी पूर्ण वर्षभर लाभस्थानातून शुभ फळे देण्यास समर्थ आहे.
कालचक्राचा महिमा अगाध असतो. योग्य व अचूक आर्थिक निर्णय यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. स्थावर विषयक प्रश्न मनासारखे सुटतील. नोकरी व्यवसायात तुम्हाला नवीन संधी मिळून गुणांचे चीज करता येईल. वरिष्ठ व सहकारी मदतगार रहाणार, अशी उत्साह वाढवणारी स्थिती रहावी. अशी अनुकूल स्थिती जरी असली तरी सावधानतेचा इशारा असा की, वर्षाच्या मध्यास व अखेरीस राशीस्वामी अनुकूल नसल्याने प्रगतीत अडचणी व वेग मंदावू शकेल.
विवाहोत्सुकांना पूर्वार्ध चांगला असल्याने त्यांनी तेव्हा प्रयत्न करावेत गोड बातमी देईल. संसारात जोडीदाराकडून प्रोत्साहन आणि वडीलधार्यांकडून चांगले कौतुक होऊ शकेल. संतती विषयक प्रगतीच्या वार्ता येतील. मनःशांती मिळाल्यामुळे तब्बेत सुधारेल. प्रवास मनाजोगते होऊ शकतात. काही भाग्यवंतांना परदेशगमनाचे योग. विद्यार्थीवर्गाच्या अपेक्षा पूर्ण होतील. काही अडचणींचा काळ वगळता नशीबाच्या परिक्षेत, पहिल्या गटात मजेत अन् आनंदात आता तुम्हाला वाटचाल करायची आहे. आगे बढते रहो!
शेवटी धन्यवाद व समस्त वाचक हितचिंतकांना सध्याच्या संभ्रमित करणार्या काळात योग्य ती बुद्धी विचारशक्ती मिळो अन् आनंद गवसो, ह्या मनःपूर्वक शुभेच्छा.
।। शुभम् भवतु ।।
सुधाकर नातू
MB 9820632655
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा