वार्षिक राशीभविष्य-२०/२१
"पुढचे पाऊल"
प्रास्ताविक राशीभविष्य:
१नोव्हे'२०ते ३१ डिसें''२१:
प्रास्ताविक:
भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य ज्योतिष रविला. त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना, जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते.
आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणि प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार निर्णय व क्रुतीवर प्रभाव पाडत असते, हे ओघाने आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.
अनुकूल गुण पद्धती:
कालचक्र अव्याहत फिरत असते, माणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतात. हा क्रम प्रत्येकाला अनुभवाला येतो. उद्याचा दिवस, आजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या आशेवर माणूस जगत असतो. उद्याचे पुढचे पाऊल कसे असेल, येणारा काळ कसा असेल, अनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो दर वर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात असतो.
माणूस उंच वा बुटका आहे, जाडा किंवा बारिक आहे, तो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशी काही कल्पना येत नाही. ती येण्यासाठी कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यक असते. जसे उंची सेंटी मीटर, वजनासाठी किलोग्राम, आर्थिक स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने दाखवता येते. ह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस कोणाला कसे जातील, हे भविष्याच्या ज्ञानाच्या आधारे सांगण्याची पद्धत म्हणजे राशीभविष्य होय.
नशिबाच्या परिक्षेची टक्केवारी:
पहिल्या स्तंभात प्रत्येक राशीच्या खाली डाव्या बाजूला त्या राशीचा नशिबाचा ह्या वर्षीचा तर उजव्या बाजूस मागील वर्षीचा अनुक्रम दाखवला आहे.
३१ दिवसांचा महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे जास्तीत जास्त गुण १८६, तर ३० दिवसांच्या महिन्यांचे जास्तीत जास्त गुण १८० आणि फेब्रुवारी'२१ चे जास्तीत जास्त अनुकूल गुण १६८. याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ग्रह किती शुभ दिवस आहेत ते अनुकूल गुण, त्या त्या महिन्याला शेकडा किती टक्के आहेत ते आपण आपल्या
चंद्रराशीच्या बाबतीत काढू शकाल. त्यामुळे प्रत्येक महिन्यात आपले नशिब किती टक्के गुण मिळवते, हे समजू शकेल आणि त्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल राखत समाधान मिळवण्याची युक्ती तुम्हाला मिळू शकेल अशी ही अनुकूल गुणांची कल्पना आहे.
अनुकूल गुणांच्या पद्धती: नियम
आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत. प्रत्येक राशीला सहा प्रमुख ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण देतो. ते नियम असे आहेत:
रवि: ३,६, १० व ११ वा शुभ
मंगळ: ३,६, व ११ वा शुभ
बुध: २,४,६,८,१० व ११ वा शुभ
गुरू: २,५,७,९, व ११ वा शुभ
शुक्र: १,२,३,४,५,८,९,११ व१२ वा शुभ
शनी: ३,६, व ११ वा शुभ
"नशिबाची गटवारी":
आगामी १४ महिन्यांच्या कालखंडात वरील महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ आहेत, ते आजमावून माहवार शुभदिवस अर्थात अनुकूल गुण देऊन, त्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे:
१.उत्तम पहिला गट: सिंह, व्रुश्चिक व मीन राशी.
२.उजवा दुसरा गट: मेष व मिथून राशी.
३.मध्यम तिसरा गट: तुळा, कुंभ, व धनु राशी.
४.डावा चौथा गट: मकर व व्रुषभ रास.
५.त्रासदायक पाचवा गट: कर्क व कन्या रास.
शनीची साडेसाती:
साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हां तुमच्या चंद्रराशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा साडेसाती सुरू होते व तुमच्या राशीच्या पुढील राशीनंतर येणार्या राशींत जातो, तोपर्यंत साडेसाती असते.....
उदा: सध्या संपूर्ण कालखंड मकर राशींत शनी आहे, म्हणून आता धनु, मकर व कुंभ राशींना साडेसाती असणार आहे. शनी कुंभेत जेव्हा प्रवेश करेल, तेव्हा धनु राशीची साडेसाती संपेल.
✴९. धनु▪ २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु सुरु झालेली असुन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.
✴१०. मकर▪२६ जानेवारी २०१७ रोजी सुरु सुरु झालेली असुन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.
✴ कुंभ▪२४ जानेवारी २०२० रोजी सुरु झाली व ती दिनांक २३ फेब्रुवारी २०२८ पावेतो असेल.
"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":
"अनुकूल गुणांचा राशीनिहाय तक्ता": ( वेगळा पाठवला आहे, तो येथे द्यावा.
Rashi Ty21 LY 20 फरक TY क्र. LY क्र.
१ मेष 1,034 1,063
-29 4
5
२ व्रुषभ 918 1,040 -122
10 6
३ मिथुन 1,022 1,003 19 5
8
४ कर्क 856
859 -3
11 11
५ सिंह 1,470
1,302 168 1
3
६ कन्या 834
964 -130 12
9
७ तुळा 992
897 95
6 10
८ व्रुश्चिक 1,173 1,406 -233 2
1
९ धनु
954 748 206
8 12
१० मकर 937
1,024 -87 9
7 ११ कुंभ 973
1,143 -170 7
4
१२ मीन 1,132
1,303 -171 3
2
मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल:
१मेष रास ५ क्र. वरून ४ थ्या क्रमांकावर सरकलेली आहे: थोडी सुधारणा
२.व्रुषभ राशीने गटांगळी खाऊन ६ व्या क्रमांटावरुन तळाच्या दहाव्या स्थानावर ढकलली गेली आहे: विशेष त्रास
३.मिथून राशीच्या नशिबी मागील आठव्या स्थानावरून आता तिसर्या स्थानी जाण्याचे मि आहे.
४. कर्क राशीचे नशीब जैसे धे राहील कारण यंदाही तळातील ११ वे स्थान मिळाले आहे: कष्टकारक वर्ष दिसते.
५ सिंह मंडळी यंदा बाजी मारतील कारण सर्वोत्तम पहिल्या स्थानी ते विराजमान असतील: भरभराट प्रगतीचा काळ.
६ कन्या रास नवव्या जागेवरून कटकटी वाढवणार्या तळाच्या बाराव्या स्थानी ढकलेली जाईल.
७ तुळा राशीने ह्या कालखंडात दहाव्या स्थानावरुन मध्यमवर्गी सहावे स्थान प्राप्त केले आहे: थोडी आशा वाढेल.
८ व्रुश्चिक रास आपला रुबाब मागील पहिल्या तर आता दुसर्या क्रमांकावर राखेल.
९ धनु राशीच्या गुणांमध्ये खूप वाढ झाल्यामुळे आता बाराव्या क्रमांकावरुन ८ व्या स्थानी असेल.
१० मकर राशीचे नशीब गुणांमध्ये घसरण झाल्याने ७व्या स्थानावरुन कसोटी पहाणारे ९ स्थान मिळवत आहे: त्रासात वाढ.
११ कुंभ राशीच्या गुणांमध्येही अशीच घसरण आहे, सहाजिकच मागील समाधानकारक ४ थ्या जागेवरून आता सातव्या स्थानी नशीबाची फरफट पाहील.
१२ मीन रास मानाच्या दुसऱ्या स्थानावरुन तिसर्या स्थानी समतोल साधेल.
।। शुभम् भवतु।।
सुधाकर नातू
माहीम मुंबई १६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा