-"पुढचे पाऊल_जन्मचंद्रराशी”:
लेखक श्री. सुधाकर नातू
प्रास्ताविक:
भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य ज्योतिष रविला. त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो,ती आपली जन्मरास मानली जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपलीजन्मरास ठरविताना, जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिषअधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते.
आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली क्रुती वा न केलेली क्रुतीह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागेआपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणिप्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे सर्वश्रुत आहे. आपल्याशरिरात सुमारे सत्तर टक्के पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार निर्णय व क्रुतीवर प्रभाव पाडत असते, हेओघाने आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्यआहे.
१.मेष:
मेष रास मंगळाची रास आहे रवी येथे उच्चीचा होतो त्यामुळे तुम्ही शीघ्रकोपी महत्त्वाकांक्षी
असतात उद्योग करत राहणे हा तुमचा स्थायीभाव असतो येथे शनी नीचेचा होत असल्याने शनीच्या साडेसातीचा तुम्हाला जास्त असतो वय वर्ष 28 नंतर सर्वसाधारणपणे
तुमचा भाग्यदय येतो विवाह हे दृष्टीने तुला राशि तुमचे चांगले धागेदोरे बोलतात सिंह धनू राशीच्या व्यक्ती तुमचा संसार गोडीचा होऊ शकतो कारण त्यांच्याशी नवपंचम योग होतो मात्र मृत्यू षडाष्टक आतील कन्या रास मात्र तुम्हाला त्याकरता पूर्ण वर्ज्य असते.
# २. व्रुषभ:
क्रुत्तिका नक्षत्राचे तीन, पूर्ण रोहिणी व म्रुगाचे दोन चरण ह्यांनी ही शुक्राची रास बनली आहे. चंद्र इथे उच्चीचा होतो व कुणीही ग्रह नीचीचा नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी उत्साही आनंदी असून उद्योग मग्नता हे तुमचे वैशिष्ट्य आहे. रसिकता विलासी व्रुत्ती व खिलाडूपणा असतो. नेहमी नीटनेटके व प्रसंगानुसार व्यवस्थित रहाणे पसंत करता. आळस नसतो, तारुण्यात अडचणींवर मात करून तुम्ही स्वबळावर जीवनात स्थैर्य व प्रगती साधता. म्रुत्युषडाष्टकातील धनु राशी, विवाहासाठी वर्ज्य आणि व्रुश्चिक ह्या मंगळाच्या राशीबरोबर तसेच नवपंचम योग साधणार्या कन्या मकर राशीच्या जोडीदारांबरोबर संसार सुख समाधानाचा होऊ शकतो.
# 3.मिथून:
मिथुन रास हि विचारही बुद्धिमान बुद्धाची रास आहे. स्त्री-पुरुषाचे युगुल असे बोधचिन्ह असल्याने स्त्रीची कोमलता व तर पुरुषाचा अहंकार असे द्विस्वभावी रूप तुमच्या राशीचे असते. कोणताही ग्रह येथे उच्चीचा वा नीचीचा होत नाही. आपल्या मनात काय चाललंय हे तुम्ही कुणालाच कधी जाणवू देत नाही. बोलघेवडेपणा मिश्किल थट्टा तुम्हाला आवडते. तूळ व कुंभ या नवपंचम योगातल्या राशीचे जोडीदार तुमच्याशी संसार चांगला करतात, मात्र वृश्चिक ही बुधाचा शत्रू असलेल्या आणि तुमच्या षडाष्टकात असलेल्या मंगळाची रास तुम्हाला विवाह साठी टाळावी लागते. म्रुगाचे दोन चरण रोहिणी पूर्ण व पुनर्वसु नक्षत्राचे तीन चरण मिळून ही राशी बनते.
४ कर्क:
कर्क रास ही चंद्राची रास असल्यामुळे भावनाप्रधान कल्पक व प्रतिभा माणसांची राशी आहे. मंगळ येथे नीचीचा तर गुरु उच्चीचा होतो. संसारात तुम्हाला खूप गोडी असते. तुम्हाला माणसे हवीहवीशी असतात. प्रेमात तुमच्या चंचल स्वभावामुळे नुकसान फसगत होऊ शकते. कवी-लेखक कलावंतांची ही रास जीवनात सुखदुःखाचे वादळवारे नेहमी पचवत असते. विवाह करता मृत्यू षडाष्टकातील कुंभ रास वर्ज्य, तर मीन व वृश्चिक राशी नवपंचम योगामुळे शुभ फळे संसारात देतात. पुनर्वसु चा एक चरण तर सर्वात शुभ नक्षत्र पुष्य पूर्ण व अनिष्ट आश्लेषा नक्षत्राने ही रास बनते.
५ सिंह:
वनराज सिंहाची ही रास, सर्वांवर अधिकार गाजवते कुणाकडे हार जाणे तुम्हाला आवडत नाही. आपला शब्द हा अंतिम असावा असा तुमचा आग्रह असतो. एक प्रकारचा हट्टी स्वभाव हे तुमचे वैशिष्ट्य असते. मात्र तुम्ही दीर्घोद्योगी निश्चय व महत्त्वाकांक्षी असल्यामुळे जीवनात नेहमी अग्रेसर राहून यश मिळवू शकता. नवपंचम योगातील मेष व धनु राशीचे जोडीदार विवाहासाठी अनुकूल ठरतात, तर मृत्यू षडाष्टकातील मकर रास चालत नाही, पूर्ण बघा आणि पूर्ण पूर्वा नक्षत्र तर उत्तरा नक्षत्राचा एक चरण मिळून ही रास बनते. जीवनात मध्यम वयात तुम्हाला स्थैर्य व भरभराट अनुभवास येते.
6. कन्या:
अत्यंत चिकित्सक कन्या राशीची माणसे संशयी व आतल्या गाठीची असतात अकाउंट्स ऑडिट वकिली पेशात उत्तम यश मिळवतात ही बुद्धाची रास असून बुद्ध येथे उच्चीचा होतो मात्र शुक्र येथे नीतीचा होतो शैक्षणिक यश वाद-विवादात तुम्ही छाप पाडतात मात्र तुम्ही नेहमी काळजी किंवा चिंता करत असतात त्यामुळे कपाळावर कायमच्या असे हे माणसांचे स्वरूप असते निर्भेळ सुख मिळवणे तुम्हाला कठीण होते विवाह हे दृष्टीने मृत्यू षडाष्टक आतील मेष रास टाळावी तर बुद्ध व मकर हे नवपंचम रात्रीतले जोडीदार तुमच्या बरोबर संसार आनंदाचा करू शकतात उत्तरा नक्षत्रातील पूर्ण हस्त व चित्रा नक्षत्राचे दोन चरण यांनी कन्या रास बनते.
# ७ तुळा:
चित्रा नक्षत्राचे दोन चरण स्वाती पूर्ण व विशाखा नक्षत्राचे तीन चरण यांनी बंधारे तुला रास शुक्राची असून शनि येथे उच्चीचा व रवि नीचीचा होतो, त्यामुळे तुम्हाला शनीच्या साडेसातीचा त्रास तितकासा जाणवत नाही. तराजू हे बोधचिन्ह विवेकबुद्धी व सारासार विचार करून विवेकाने कोणताही निर्णय घेण्याची वृत्ती तुमची असते. टापटीप छान दिसण्याची हौस व मौज-मजा तुम्हाला आवडते. वयाच्या तिशीनंतर उत्तम प्रगती होते. नाट्य-चित्रपट व प्रसिद्धी क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळते. विवाहाचे दृष्टीने मेष राशीबरोबर, तुमचे चांगले सूत जुळतंय तर मिथुन या नवपंचम राशीचे जोडीदार आनंदी समाधानी संसार दर्शवितात. मात्र मीन रास अष्टका मृत्यू षडाष्टक योगामुळे तुम्हाला वर्ज्य असते.
# ८ व्रुश्चिक:
सगळ्यात गुढ व आपल्या मनातील खळबळ इतरांना जाणवून देणारी ही मंगळाची रास, शक्यतो एकला चालो रे अशा वृत्तीची असते. चंद्र नीचीचा होतो. अतिरेकी अरेरावी तुमचा घात करू शकते. महत्त्वाकांक्षी, आपलाच अधिकार गाजवण्याच्या ईर्षैमुळे तुम्ही सुरक्षा क्षेत्रात व इंजिनीअरिंगमध्ये यश मिळवता. मात्र जीवनात वैफल्याचा धोका अधिक असतो, कारण तुमची सहनशक्ती मर्यादित असते. विवाहाचेदृष्टीने मिथुन रास मृत्यूषडाष्टक योगामुळे वर्ज्य. वृश्चिक राशीची माणसे वृश्चिक राशी बरोबरच विवाहाचे दृष्टीने योग्य ठरतात. येथे कोणतेही ग्रह उच्चीचे होत नाहीत. विशाखा एक चरण पूर्ण अनुराधा व जेष्ठा नक्षत्र यांनी ही रास बनते.
# ९. धनु: "दे माय धरणी ठाय"!
ही गुरूची रास असून येथे कोणताही ग्रह उच्चीचा व नीचीचा होत नाही. मूळ पूर्वाषाढा ही नक्षत्रे पूर्ण व उत्तराषाढा चा एक चरण यांनीही राशी बनते. मूळ नक्षत्री जन्म असेल तर त्याची शांती करावी लागते. सोशिकता चांगुलपणा व कष्टाळू वृत्ती यामुळे अडचणीतून मार्ग काढून तुम्ही पस्तिशीनंतर जीवनात स्थैर्य मिळवता. मेष व सिंह राशीचे जोडीदार संसारात नवपंचम योगामुळे उत्तम साथ देतात. तर शुक्राची रास मृत्यू षडाष्टका मुळे चालत नाही.
# १०. मकर:
उत्तराषाढा नक्षत्राचे तीन चरण पूर्ण श्रवण व धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण मिळून ही रास बनते. मकर रास ही शनिची रास असल्याने तुम्हाला, त्याच्या साडेसातीचा खास असा त्रास होत नाही. तिथे मंगळ उच्चीचा तर गुरु निश्चित होतो. ध्येय गाठेपर्यंत चिवटपणा, त्याला कष्टाची जोड यामुळे नोकरी-व्यवसायात धीम्या गतीने तुमची प्रगती होते. आपली फुशारकी तुम्ही मारत नाही. कर्तबगार थंड डोक्याने काम करणारी ही माणसे असतात. सिंह रास मृत्यू षडाष्टक योगामुळे विवाहासाठी अयोग्य. तर नव पंचमातील व्रुषभ व कन्या जोडीदार संसारात गोडी आणतात.
# ११. कुंभ :
मातीचा घडा असे कुंभ राशीचे चिन्ह आहे. ज्ञानाचा माहितीचा जणू सागर असे तुमचे स्वरूप असते. काहीशा अबोल पण हुशार माणसांची ही रास शनीने आपली मानली आहे. येथे कोणताही ग्रह उच्चीचा वा नीचीचा होत नाही. कुंभ व्यक्तीनाही साडेसातीचा तेवढा त्रास होत नाही. संसाराबाबतीत आपण उदास असता व एकंदर निरीच्छ. संशोधन अभ्यास वृत्ती व ज्ञानलालसा ही तुमची खास वैशिष्ट्ये. कर्क रास मृत्यू षडाष्टकामुळे विवाहासाठी टाळावी. मिथुन व तुला राशीचे जोडीदार तुमच्याशी कसेबसे जुळवून घेतात.
# १२. मीन:
दोन विरुद्ध दिशेला धावणारे मासे असे तुमचे बोधचिन्ह आहे ही गुरूची रास असल्याने साधी सरळ माणसं धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात चंचलता व धरसोड वृत्ती तुमचे नुकसान करू शकते शुक्र येथे उच्चीचा तर बुध्दीची चाहो तो सहसा तुम्ही कुणावर विश्वास ठेवत नाही व्यावहारिक जीवनात ठेचा खात खात पुढे जावे लागते तूळ राशीचे जोडीदार मृत्यू षडाष्टक or मुळे मीन व्यक्तींना चालत नाही कर्क व कन्या रास विवाह हे दृष्टीने नवपंचम योग होत असल्याने चांगल्या असतात.
"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":
"अनुकूल गुणांचा राशीनिहाय तक्ता": ( वेगळा पाठवला आहे, तो येथे द्यावा.
Rashi Ty21 LY 20 फरक TY क्र. LY क्र.
१ मेष 1,034 1,063
-29 4
5
२ व्रुषभ 918 1,040 -122
10 6
३ मिथुन 1,022 1,003 19 5
8
४ कर्क 856
859 -3
11 11
५ सिंह 1,470
1,302 168 1
3
६ कन्या 834
964 -130 12
9
७ तुळा 992
897 95
6 10
८ व्रुश्चिक 1,173 1,406 -233 2
1
९ धनु
954 748 206
8 12
१० मकर 937
1,024 -87 9
7
११ कुंभ 973
1,143 -170 7
4
१२ मीन 1,132
1,303 -171 3
2
मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल:
१मेष रास ५ क्र. वरून ४ थ्या क्रमांकावर सरकलेली आहे: थोडी सुधारणा
२.व्रुषभ राशीने गटांगळी खाऊन ६ व्या क्रमांटावरुन तळाच्या दहाव्या स्थानावर ढकलली गेली आहे: विशेष त्रास
३.मिथून राशीच्या नशिबी मागील आठव्या स्थानावरून आता तिसर्या स्थानी जाण्याचे मि आहे.
४. कर्क राशीचे नशीब जैसे धे राहील कारण यंदाही तळातील ११ वे स्थान मिळाले आहे: कष्टकारक वर्ष दिसते.
५ सिंह मंडळी यंदा बाजी मारतील कारण सर्वोत्तम पहिल्या स्थानी ते विराजमान असतील: भरभराट प्रगतीचा काळ.
६ कन्या रास नवव्या जागेवरून कटकटी वाढवणार्या तळाच्या बाराव्या स्थानी ढकलेली जाईल.
७ तुळा राशीने ह्या कालखंडात दहाव्या स्थानावरुन मध्यमवर्गी सहावे स्थान प्राप्त केले आहे: थोडी आशा वाढेल.
८ व्रुश्चिक रास आपला रुबाब मागील पहिल्या तर आता दुसर्या क्रमांकावर राखेल.
९ धनु राशीच्या गुणांमध्ये खूप वाढ झाल्यामुळे आता बाराव्या क्रमांकावरुन ८ व्या स्थानी असेल.
१० मकर राशीचे नशीब गुणांमध्ये घसरण झाल्याने ७व्या स्थानावरुन कसोटी पहाणारे ९ स्थान मिळवत आहे: त्रासात वाढ.
११ कुंभ राशीच्या गुणांमध्येही अशीच घसरण आहे, सहाजिकच मागील समाधानकारक ४ थ्या जागेवरून आता सातव्या स्थानी नशीबाची फरफट पाहील.
१२ मीन रास मानाच्या दुसऱ्या स्थानावरुन तिसर्या स्थानी समतोल साधेल.
।। शुभम् भवतु।।
सुधाकर नातू
माहीम मुंबई १६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा