रविवार, १३ डिसेंबर, २०२०

"दिवाळी अंकांची मांदियाळी-पसंतीची बावनकशी मोहोर !":

 

"दिवाळी अंकांची मांदियाळी-पसंतीची बावनकशी मोहोर !":

मला लेखनाप्रमाणे वैचारिक वाचनाची मनापासून आवड आहे. त्यांत दर वर्षींचा दिवाळी अंकांची मांदियाळी हा तर अपूर्व खजिनाच असतो. मी जे जे वाचतो, त्यातील मला भावलेले रूचलेले काही खास अंतर्मुख करणारे गवसले तर त्या त्या लेखकांना वा संपादकांना माझ्या पसंतीची बावनकशी मोहोर पाठविल्याशिवाय मला चैनच पडत नाही. हा विशेष लेख हा त्या स्वानंदमयी 'वारी'चा प्रारंभ.........


श्री भानु काळे
संपादक,
'अंतर्नाद' दिवाळी अंक'२०

सादर वंदन.

मी सुधाकर नातू, ७६ वर्षांचा एक ज्येष्ठ नागरिक असून माझ्या 'प्रगतीची क्षितीजे' ह्या ग्रंथाली प्रकाशित पुस्तकाला शैक्षणिक विभागात महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार मिळालेला आहे. हा अनाहूत संदेश तुमचे कौतुक करण्यासाठी पाठवत आहे.

गेला आठवडाभर मी तुमचा "अंतर्नाद दिवाळी अंक'२० चवीने वाचत आहे. आपल्या १९९५ पासून "सांस्कृतिक सम्रुद्धीसाठी" अंतर्नादच्या रुपाने प्रारंभ केलेल्या केलेल्या, शारदोत्सवातील better than the Best असा हा संग्राह्य मौल्यवान शब्दब्रम्हाचा ऐवज माझ्यासारख्या वाचकाला इतका आवडला, भावला की ते व्यक्त करायला कौतुकाचे शब्दभांडार कमी पडेल. मुखप्रुष्ठापासून अखेरच्या पानापर्यंत अंतर्मुख करणारी ही साहित्यक्रुती मला अनुभूतीच्या अदभूत दुनियेत कशी घेऊन गेली, ते मी पुढे मांडत आहे.....

# "In search of the Eternal Exctacy!": 
( $$$ ता.क. मधील मजकूर वाचा)☺️

Habits r actions repeated again and again, without any compulsion, but due to self-will. They are either good or bad, depending upon their effect on u.

Of all the good habits that exist, the Best and the Most likable habit, at least for me, is 'the habit of Reading'. Firstly, it gives u a space, all by yourself, with icing of a 'companion'-the book or magazine etc, as long as u wish.
Secondly, it creates a 'New World' in your mind and takes u thru' the caledeoscopic journey of the Time, of people, of the emotions, of events and experiences.
More over, it enables u to Think, introspect, reflect and respond to what u go thru'.

That is not all, precious 'Presents', still await u, in the form of New information and Fresh Learning, taking u, from the unknown to the known, thus broadening and shaping up your horizens of awareness and impressions.

Finally, in The Twilight days of Life, it's the Best friend, offering u the meaningful Way of the Time Pass ! With all that, the Eternal Exctacy, is what else?"

Eternal Exctacy, ह्या दोन शब्दांना व्यक्त करायला मराठीत अविस्मरणीय वा परमोच्च आत्मानंद असा शब्दही हा "अंतर्नाद दिवाळी अंक'२० वाचल्यावर थिटा पडतो. @@
म्हणून अशी Eternal Exctacy मला ह्या वाचनमंथनातून, प्रदान केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.

आपला
सुधाकर नातू,
माहीम, मुंबई १६
Mb 9820632655

@@ अशी Eternal Exctacy कां कशामुळे ते उमजावे म्हणून ह्या लेखाच्या अखेरपर्यंत जरूर वाचा.

----------------------------

श्री अरुण शेवते
संपादक
"ऋतुरंग' दिवाळी अंक'२०"

सादर वंदन.
आपला ऋतुरंग दिवाळी अंक'२० एक दोन बैठकीत संपूर्णपणे वाचला, आवडला आणि मनापासून भावला.
ताबडतोब सुचले स्फुरले ते लिहून काढले.
माझ्या पसंतीची ती मोहोर इथे पाठवत आहे.
जरूर
"वाचा, फुला आणि फुलवा"!
माणूस सुरुवात कुठून कशी करतो अन् संघर्ष व अनेक अडचणींवर मात करून, कुठवर मजल मारतो, ते ज्याचे त्याचे कर्तृत्व असते. मागे वळून पहाताना हा प्रवास घडताना, अचानक संपूर्ण कलाटणी देणारे टर्निंग पाँईंटस् देखील बहुतेकांच्या वाट्याला येतात. ते प्रसंग संधी आणून प्रगतीची नवी दिशा दाखविणारे असू शकतात अथवा वेगळाच बरा वाईट परिणाम घडविणारे असतात. ह्या सार्यावरच माणसाची पुढची वाटचाल ठरते.

ह्या संग्राह्य अंकात एकसे बढकर एक अशा विविध क्षेत्रातील मंडळींच्या जीवनात कलाटणी आणणार्या प्रेरणादायी अनुभवांचा सम्रुद्ध खजिना आहे. तो सर्व चित्तवेधक तपशील वाचताना, माझ्या संवेदनशील मनाला आत्मशोध घेत, जगावेगळी अनुभूती देत विलक्षण आत्मानंद देणारा होता.

नेहमी प्रमाणे ह्याही वर्षी असा वाचनीय व अंतर्मुख होऊन वाचकांना विवेकबुद्धीने विचार करायला लावणारा उत्तम दिवाळी अंक प्रकाशित केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.

धन्यवाद
सुधाकर नातू
माहीम, मुंबई'१६
Mb 9820632655

---------------------------

श्री सुनील मेहता,
मेहता पब्लिशिंग हाऊस.
मेहतासाहेब,
सादर वंदन.

"ऋतुरंग दिवाळी अंक'२०, ह्यामध्ये तुमचा
"अंबाबाईचं प्रांगण ते दगडूशेटचं आवार":
हा लेख वाचला. त्यावर माझा हा अनाहूत प्रतिसाद:

"पुणे काँलेज हाँस्टेल ते कोल्हापूर अजब पुस्तकालय ते पुन्हा पुणे प्रकाशन व्यवस्था. पेपरचे पैसे दोन दोन महिने न देण्यामुळे चांगला प्रिंटर गमावणे....असे आयुष्याला कलाटणी देऊन वळण घेेत, आज सन्माननीय नामवंत प्रकाशक म्हणून घेतलेली भरारी आपण अगदी मोजक्या शब्दात, पण विलक्षण परिणामकतेने आपल्या लेखात मांडली आहे. अभिनंदन व शुभेच्छा."

धन्यवाद
आपला
सुधाकर नातू
माहीम मुंबई १६
Mb 9820632655
ता.क.
ह्या अंकाच्या संपादकांना मी पाठवलेली पसंतीची पावती तुम्हालाही पाठवत आहे

प्रतिसाद:
श्री नातूसाहेब,
अभिप्राय वाचून आनंद झाला.
खुप आभारी आहे.
धन्यवाद
सुनील मेहता.
--------------------------.

श्री आशिष जाधव
प्रमुख संपादक
झी २४ तास

सादर वंदन.
' Zee 24 तास'वरील तुमचा 'रोखठोक' हा प्रचलित महत्वाच्या विषयांवरील चर्चा सफाईदारपणे घडवून आणणारा कार्यक्रम मी नेहमी आवडीने पहातो. त्यातील तुमची विषयावरील पकड व आत्मविश्वास निश्चितच कौतुकास्पद आहे. चर्चेत भाग घेणार्या मान्यवरांना हाताळण्याचे तुमचे कसब व सहजता कार्यक्रम अधिक परिणामकारक करते. म्हणून प्रथम अभिनंदन व शुभेच्छा.

"ऋतुरंग दिवाळी अंक'२०, ह्यामध्ये तुमचा
"कलाटणी", हा लेख नुकताच वाचला. त्यावर माझा हा अनाहूत प्रतिसाद:

'अचानक माणसाच्या जीवनात एखादा माणूस वा प्रसंग येतो आणि त्या क्षणानंतर त्याच्या आयुष्याला कलाटणी अर्थात Turning point येतो आणि त्याला प्रगतीचा नवा मार्ग वा दिशा मिळून जाते.

तुमच्या तरुणपणात, परिस्थितीवश नाईलाजाने हार्ड वेअर दुकानात काम करणारा, एक सुशिक्षित बिहारी इंजिनिअर काय येतो आणि त्याचे बोल तुम्हाला अंतर्मुख करुन,  जीवनात आपण कोण, काय करायचे हे समजून नंतरच येणाऱ्या संघर्षाला तोंड देत संधी शोधत पुढे पुढे जात रहायचे अशी जाग्रुती काय करतो, सारे खरंच नवलच ! त्यानंतर आपण मारलेली प्रगतीची, काँपी रायटर ते चक्क आता zee समुहात प्रमुख संपादक-(आणि तेही कोणतीही पत्रकारितेची डिग्री वा पार्श्वभूमी नसताना)-हनुमानउडी कुणालाही प्रेरणादायी आहे.

मोजक्या शब्दात उलगडलेली ही कलाटणी मला आवडली, भावली आणि म्हणूनच ही पसंतीची मोहोर. अशीच प्रगती करत रहा ह्या शुभेच्छा.'

धन्यवाद
आपला
सुधाकर नातू
माहीम मुंबई १६
Mb 9820632655
--------------------------
 
@@ अशी Eternal Exctacy कां कशामुळे ते उमजावे म्हणून ही अंतर्नाद' दिवाळी अंक'२० मधील "शहरे" ह्या जगभरातील अनेक नामवंत शहरांची जीती जागती ओळख करून देणार्या श्री दत्ता दामोदर सराफ ह्यांच्या लेखातील
अमेरिकेतील " सँनफ्रँन्सिसको" ह्या महानगरासंबंधीची ही संग्राह्य व मनमंजुषेत जपून ठेवावी व कायम स्मरावी अशी नोंद:

"ह्या महानगरातील सिटीलाईट बुक स्टोअरच्या भिंतीवर प्रख्यात अमेरिकन कवी लाँरेन्स फेर्लिंगिटी ( Ferlingiti) यांची एक कविता लिहीली आहे:

"Pity the nation whose people are sheep
and whose shepherds mislead them.
Pity the Nation whose leaders are liars,
whose sages are silenced.
and whose bigots haunt the airwaves.
Pity the nation that raises not its voice,
except to praise the conquerors and acclaim the bully as hero
and aims to rule the world with force and by torture.
Pity the nation that knows no other language but its own
and no other culture but its own.
Pity the nation whose breath is money
and sleeps the sleep of too well fed.
Pity the nation- oh, pity the people who allow their rights to erode
and their freedoms to be washed away.
My country, tears thee, sweet land of
Liberty."

Simply outstanding Eternal Exctacy nothing else!
--------------------------------------------------------------
धन्यवाद.
सुधाकर नातू

ता.क.
$$$
"अंतर्नाद दिवाळी अंक'२० साठी ही पसंतीची मोहोर मी मराठीत नाही, तर इंग्रजीत कां पाठवली असा प्रश्न मला ह्या लेखाला प्रतिसाद देताना एका वाचकाने whatsapp वर विचारला. त्याला माझे हे उत्तर....

"तुम्ही माझा हा लेख सत्वर वाचून आपला प्रतिसाद पाठविला त्याबद्दल आनंद व आभार. अंतर्नाद दिवाळी अंक'२० हा त्यांच्या पंचवीस वर्षांच्या साहित्याचा अक्षरशः सर्वोत्तम अर्क आहे. हा सारा अनेकविध विषय व अनुभवांना स्पर्श करणारा ऐवज वाचल्यावर मी अक्षरशः भारावून गेलो आणि काय व किती कसकसे लिहावे हा मला प्रश्न पडला असतानाच मला facebook वरील माझी एक जुनी पोस्ट दिसली, ती वाचली आणि माझ्या ह्या वाचनमंथनातून त्या क्षणीच्या भावभावनांना चपखल व्यक्त करणारी भासली.

ह्यामुळे ती इंग्रजीत असूनही मी तीच पसंतीची मोहोर म्हणून मांडली. अखेर मनातले असे जनात नेतानाचे भावविश्व, उलगडण्याचे कसब ज्या भाषेतले आपणास अधिक प्रभावी वाटते, ते महत्वाचे. माझ्या मनावर अंतर्नाद वाचनापायी जो ठसा उमटला तो ह्या पोस्ट इतका मराठीत मला मांडणे जमलेच नसते.

अर्थात तुम्ही तुमची प्रतिक्रिया देऊन कुठलेही औधत्य केलेले नाही, उलट मीच तुमचा आभारी आहे, कारण त्यामुळे मला हे असे आंतरिक दाद, माझी मलाच देण्याजोगे लिहीता आले."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा