गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

"Is it writing on the wall?: Back to Basics?":

 

# "Is it writing on the wall?:
Back to Basics?":

"वस्तुस्थितीचे वास्तव !":
मालिका भरकटलेल्या, बातम्या काही दम नसलेल्या, चर्चा अर्थहीन आणि जाहिरातींचा सुळसुळाट: ईडीयट बाँक्स बंद! रेडिओ चालसे.

आरोग्यासाठी हवे ताजे अन्न: शिळेपाके ठेवण्याचे गोडाऊन-फ्रिज बंद! मोदकपात्राची चलती.

बदलत्या जीवनशैलीपायी धोकादायक रोग टाळण्यासाठी: वाँशिंग मशीन, मिक्सर ग्राईंडर आदि ग्रुहोपयोगी गँजेटस् बंद! रामा गडी व आपली मेहनत बरी.

चढे इंधन दर, मर्यादित जागतिक इंधन साठा आणि ट्रँफीक जँम, प्रदुषणाचा विळखा: कार व टू व्हीलर्स बंद. सायकल आणि दोन पाय झिंदाबाद.

शहरात नागरी सेवा सुविधांचा चुथडा, सिमेंट काँक्रीटीकरण आणि झोपडपट्ट्यांचा, प्रदुषणाचा विळखा, दूध उतू जावं तशी माणसांची गर्दीच गर्दी, घाईच घाई: चला खेड्यांकडे आणि बारा बलूतेदारीकडे.

आणि आणि????:
विकासाला खिळ पाडणारी अमर्याद लोकसंख्या म्हणून????:

म्हणून मर्यादित आयुष्याच्या, कठोर कायद्याची अपरिहार्यता ???...
_______________________________________

P.S.:

माझ्याच ह्या एका सोशल मिडीयावरील पूर्वीच्या संदेशाची आठवण सध्याच्या तंत्रज्ञानाचा पसारा, आवाका आणि त्याचे संभाव्य घातक परिणांमुळे झाली. त्या 'बिंबा'चे असेही 'प्रतिबिंब' मी येथे पुनश्च निदर्शनास आणले इतकेच.
Believe me, the way, things are taking shape, it is likely to be the reality, sooner than latter."
-----------------------------------------------------

# "अनुभवाचे बोल":
आपण अनेक सुविचार वाचताना पाहतो, परंतु ते प्रत्यक्षात आणण्यात पुष्कळजण कमी पडतात. इतक्या सार्‍या सुविचारांमधून मात्र, तो एकमेव सुविचार मला पदोपदी आठवतोच, नव्हे आठवावाच लागतो.
तो असा आहे:

"ज्या ,गोष्टी बदलणे आपल्याला शक्य असते, त्यांच्याबद्दलच विचार करावा, परंतु आपल्याला ज्या गोष्टी बदलणे अशक्य व ज्या आपल्या परिघाबाहेर असतात, त्यांचा विचार वा त्यांची चिंता कधीही करू नये."

म्हणूनच, आपला भूतकाळ, जो आपण कधीही बदलू शकत नाही, तो होता तसाच चिरकाल रहाणार असल्याने, त्याची चिंता न करता, आपला वर्तमान, जो बदलणे केवळ आपल्याच हातात असते, त्याचा सांगोपांग आढावा घेऊन, आपला प्रगतीपर भविष्यकाळ घडवत रहावावा.
---------------------------------------------

# "लोकशाहीमध्ये, विरोधक मुक्त माहोल निर्माण करण्याची आस असणार्यांपेक्षा,
सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतेच देशासाठी हितावह असतात."

"अहंकारी,
हुकुमशाही प्रव्रुत्तीच्या
अन् आत्ममग्न नेत्रुत्वाची नाळ सर्वसामान्य जनांपासून तुटलेली असते."

"माणूस कितीही मोठा व कर्त्रुत्ववान असला,
तरी केव्हातरी
त्याच्या मर्यादा
व कमतरता स्पष्ट होतातच होतात."
------------------------------------------------
# "बदला'नंतरची आव्हाने":

नित्य बदल, ही निसर्गांतील एकमेव स्थिर गोष्ट आहे. बदल म्हणजे जीवनांतील आव्हाने स्विकारायला लावणारी जीवंत प्रेरणा होय. सुयोग्य वेळी, विचारपूर्वक नंतरच्या संभाव्य परिणामांची रास्त दखल घेवून केलेला बदलच गतीमान विकास व प्रगती घडवत असतो. अवेळी, अवचितपणे बेसावध क्षणी, लादला गेलेला बदल पचविणे, जड जाते खरेच; परंतु अशाही वेळी प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याचा शहाणपणाही अंगी येत असतो.

"कोरोना"च्या अशाच आकस्मिक भस्मासूरी महासंकटामुळे निर्माण झालेल्या कष्टकारक परिस्थितीकडे ज्या सकारात्मकतेने सामान्य जनतेने संयम बाळगत प्रतिकूल व अत्यंत बिकट परिस्थिती स्विकारली, तिला तोड नाही व त्यामधून गरजांचे व खर्चाचे योग्य ते प्राधान्य राखणे शिकत, काटकसरीचा, साध्या रहाणीचा मार्ग स्विकारला आहे. वायफळ नाहक खर्च टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे. सर्व आवश्यक नियम पाळत जीवनाचे रहाटगाडगे पूर्ववत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे.

अंधारातून प्रकाशाकडे नेणारी दिशा व मार्ग गवसत आहे.
------------------------------------------

# " वार !"

आज 'वार' कोणता ?
ते, कशाला जाणता ?
उद्योग, नाही कोणता !
मामला तो सारखा !
आज, उद्या व परवा !

खायला, 'हा' कहार,
भूईला, होई भार !
ऐका, ते वारंवार !
कुणाचा ना, आधार !
अर्थ, ना उरे फार !

कधी बरे, येणार?
अखेरचा तो 'वार' !
------------------------------------------------------------

"चिरंतन":
क्षणा क्षणांतूनी हे रंग भरा,
नसा नसांतूनी तो चंग करा,
मना मनांतूनी ते प्रेम बहरा,
चरा चरांतूनी हा नाद खरा !
-----------------------------------------------------------
आता अखेरीसही........
माझ्याच सोशल मिडीयावरील पूर्वीच्या
ह्या एका संदेशाची झलक........
# "कशा कशाचा आक्रोश?":

क्रुपया नीट वाचा आणि कशा कशासाठी, आक्रोश करावयाचा ते ठरवा:
१. आपण काळा पैसा निर्माण होणे थांबवू शकलेलो नाही व काळा पैसा बाळगणार्यांवर कारवाई करू शकलेलो नाही. 'गोंधळी' नोटबंदीसारखा, सरळमार्गी जनसामान्यांचे हाल करणारा उपाय, आपल्या यंत्रणेचा ह्या समस्येची सोडवणूक करण्याबाबतच्या अकार्यक्षमतेची, पराभवाची कबूली देतो.
२ आपण स्त्रियांवरील अत्याचार नाहिसे वा कमी करू शकलेलो नाही.
३ आपण बड्या कर्जदारांकडून कर्जाचे पैसे, जसे परत मिळवू शकलेलो नाही, वा त्यांना यथोचित शिक्षा करू शकलेलो नाही.
४ आपण परदेशातील काळा पैसा परत आणू शकलेलो नाही.
५ आपण परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगाराना परत आणून जबर शिक्षा देवू शकलेलो नाही.
६ आपण, कार्यक्षम सुरक्षित, सार्वजनिक वहातूक व्यवस्था निर्माण करू शकलेलो नाही.
७ आपण, सगळीकडे होत असलेला भ्रष्टाचार व सत्तेचा दुरूपयोग थांबवू शकलेल़ो नाही.
८ आपण, देशातील वाढती बेकारी नाहीशी करू शकलेलो नाही.
९ आपण, रस्त्यांवरील खड्डे, व पार्कींगचे प्रश्न जसे सोडवू शकलेलो नाही, तसेच वाढते अपघातही कमी करू शकलेल़ो नाही.
१० आपण सुरक्षित रेल्वेप्रवास देऊ शकलेलो नाही.
११ आपण, वाढती अनधिक्रुत बांधकामे व झोपडपट्ट्या नाहीश्या करू शकलेलो नाही.
१२ आपण सार्वजनिक आरोग्यव्यवस्था व स्वच्छता सुधारू शकलेलो नाही.
१३ आपण निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवू शकलेलो नाही व गुन्हेगारांना दिला जाणारा राजकीय आश्रय तसेच घोडेबाजार थांबवू शकलेलो नाही.
१४ आपण व्यवसायाभिमूख शिक्षणव्यवस्था निर्माण करू शकलेलो नाही.
१५ आपण आरक्षणाचा प्रश्न, सर्व घटकांंना समाधान होईल अशा तर्हेने सोडवू शकलेलो नाही, त्यामुळे होणारा गुणवत्तेचा ह्रास थांबवू शकलेलो नाही.
१६ आपण, काश्मिरचा व पाकिस्तानच्या छुप्या दहशतवादाचा प्रश्न सोडवू शकलेलो नाही.
१७. आपण, युनोच्या सुरक्षा परिषदेतील प्रवेश मिळवू शकलेलो नाही.
१८ आपण लोकाभिमूख सर्वांगीण विकास साधू शकलेलो नाही, तशीच विदारक आर्थिक विषमता, जीवघेणी गरिबी नष्ट करू शकलेलो नाही.
१९. निरक्षरता, वाढती लोकसंख्या, मुलींचे कमी होत जाणारे प्रमाण, हिंसाचार, गुन्हेगाराना वेळीच पकडून शिक्षा देणे, ह्यासारखे मुलभूत प्रश्नही सोडवू शकलेलो नाही.
२०. आपण समान नागरी कायदा आणू शकलेलो नाही.
२१. आपण पर्या्वरणाची होणारी हानी रोखू शकलेलो नाही.
दुर्दैवाने, ही कदाचित पूर्ण यादी नसेल व आक्रोश करण्याशिवाय, आपल्या हातात काहीही नसेल. अर्थात, तो केला वा न केला, तरी हे सारे आपण कधी, कसे बदलू शकणार हाच आजचा यक्षप्रश्न आहे."
-----------------------------------------------------------------------
इथवर वाचलेत, आता चिंतन मनन करून अंतर्मुख व्हा. कुठे होतो, कुठेतरी कां येऊन ठेपलो आणि सावरण्यासाठी, आता काय काय व कसकसे केव्हा कुणी करायचे त्याचा साकल्याने विचार करा....

धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा