रविवार, २९ डिसेंबर, २०२४
बोल अमोल-305 to 312
[12/12, 7:43 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-305 !":👌
😁 "वाचाल तर(च?) वाचाल !":😁
👍"सध्या मी रवींद्र पिंगे यांचे
'मोकळे आकाश' हे पुस्तक वाचत आहे. मला जे लेखक मनापासून भावतात, त्यामध्ये रवींद्र पिंगे यांचा समावेश होतो. त्यांची भाषा आणि विचार खरोखर मनाला भिडणारे आणि प्रसादिक असतात. कुठेही मी पणाचा भाव नसलेले असे त्यांचे हे बोल खरोखर आयुष्याचा अर्थ किती अमोल आहे ते सांगून जातात:
"मागच्या घटना आगामी घटनांची सूचना देत असतात. म्हणजे सगळ्याच घटनांचे जळ पुढे पुढे पसरत जाते. सगळ्या घटना मिळून एक पुण्याई बनते, एक आयुष्य बनतं. त्यात काढाघाली कोणा करता येत नाही. जे झालं, ते जसंच्या तसं ऊनसावलीसह स्वीकाराव लागतं. अविरत पानगळ आणि अक्षय फुलोरा यांची एक जुडी नियती हातात देते. प्रज्ञा आणि प्रयत्न यांच्या कक्षेबाहेरच्या नियतीच्या तालावर आपल्याला नाचावं लागत. तेच आपलं संपन्न परंतु पराधीन आयुष्य पुढे पुढे वाहत जाणारं !":👌
-रवींद्र पिंगे :💐
[15/12, 7:46 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-306 !":👌
😁 "चिरंतन":😁
💐 "क्षणा क्षणांतूनी हे रंग भरा,
नसा नसांतूनी तो चंग करा,
मना मनांतूनी ते प्रेम बहरा,
चरा चरांतूनी हा नाद खरा !":💐
[19/12, 7:56 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-307 !":👌
🤑 "वाचाल तर वाचाल !":🤑
👍"वाचनासारखा दुसरा कुठलाही छंद नाही. तुमच्या जाणिवा समृद्ध करणारा हा एक उत्तम उपाय आहे. वाचनसंबंधी खूप खूप काही लिहिलं गेलं आहे, बोललं गेलेलं आहे. वाचनाच्या मूळ गाभ्याशी जाण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न !
साहजिकच पहिला प्रश्न समोर येतो तो म्हणजे 'तुम्ही वाचता कां?'
या प्रश्नांमध्ये दोन अर्थ ध्वनीत आहेत, पहिला म्हणजे तुम्ही खरोखर वाचन करता कां? हा प्रश्न आणि दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही जे वाचन करता त्याचे कारण काय ?
आता जे वाचतच नाहीत त्यांनी शोधायला हवे की, आपल्याला वाचन करायला कां आवडत नाही, दुसऱ्या कुठच्या गोष्टी आपल्याला अधिक आकर्षित करतात. वाचन आपल्याला करावसं वाटण्यासाठी आपण खरोखर काय केलं पाहिजे, याचाही त्यांनी शोध घ्यावा.
जे वाचन करतात, त्यांनी आपल्याला प्रश्न करावा की, आपण कोणत्या प्रकारचे वाचन करतो- आत्मचरित्र व्यक्तिचित्रे ऐतिहासिक पौराणिक सामाजिक कादंबऱ्या, कविता ललित लेख आणि का करतो इतर वाचन प्रकार आपल्याला का करावेसे वाटत नाहीत आणि ते जर करावे याचे असले तर आपण खरोखर काय बदल केला पाहिजे.
थोडक्यात भाषा जेव्हा निर्माण झाली संपर्कासाठी तेव्हा अर्थातच माणसाला अक्षर ओळख झाली. अक्षर ओळखी बरोबरच माणूस साक्षर जसा झाला. तसा तो वाचायलाही शिकला. दुर्दैवाने सध्याची परिस्थिती वाचनासंबंधी गंभीर आहे. जे काही पंधरा-वीस टक्के लोक वाचतात त्यांचे प्रमाणही आता दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा अर्थ माणूस त्याच्यापाशी ज्या निसर्गाने शक्ती दिलेल्या आहेत-त्या म्हणजे स्वतंत्र बुद्धी, विचार करण्याची शक्ती आणि अर्थातच कल्पनाविहार अशी अनेक योगदाने जी निसर्गाने दिलेली आहेत,
त्यांचा वापर तुम्ही वाचनांमधून अधिकाधिक करू शकता. दुर्दैवाने तो जर तुम्ही टाळत असाल, तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या जाणिवांच्या क्षितिजाला मर्यादा घालत आहात. याकरता जे वाचत नाहीत, त्यांनी अंतर्मुुख होवून वाचनाला सुरुवात करावी आणि जे वाचतात त्यांनी आपले वाचनाचे जो काही भवताल आहे तो अधिकाधिक विस्तारित करत जावा. कारण वाचन हा एकट्याला एकांतात दुसरे कुठलेही पुस्तक सोडून साधन न घेता, वेळ घालवायचे जसे साधन आहे, त्याचप्रमाणे आपल्या जाणीवा अधिक सकस समृद्ध करण्याची ती एक उत्तम युक्ती आहे. थोडक्यात 'वाचाल तरच 'वाचाल' आणि तुम्ही जीवनाचे सार्थक करू शकाल !:👌
😁 " वाचाल, तर( च?) वाचाल !":😁
[20/12, 7:45 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-308 !":👌
😀 "ह्रदयी धरा, हा बोध खरा":😀
संकल्प आणि सिद्धी ह्यामध्ये, उत्तम अंमलबजावणीचा काळ जावा लागतो.
त्याकडे दुर्लक्ष करून, केवळ केलेल्या वारेमाप संकल्पांचा उदोउदो करत फुशारकी मारणे, म्हणजे अर्ध्या हँळकुंडाने पिवळे होणे असते !":😀
[23/12, 7:49 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-309 !":👌
💐"काही हवेहवेसे जोपर्यंत वाटते,
तोपर्यंत संघर्ष करण्याचा अनुभव,
मनाला जो आनंद व समाधान देतो,
त्याची सर ते गवसल्यानंतर नसते !":💐
[25/12, 8:26 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-310 !":👌
😇 "कालाय तस्मै नम !":😇
"बदलत्या परिस्थितीनुसार एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली. स्वतंत्र जोडपी राहायला लागल्यापासून, कुटुंबातील आई, वडील दोघांनाही अर्थाजनासाठी घराबाहेर जावे लागत आहे. शिवाय 'हम दो, हमारे दो या एकच' या अत्यावश्यक गरजेपोटी मुलांचे लाड खूप केले जात आहेत आणि त्यामुळे ती हट्टी वा फुकटही जाण्याची शक्यता निर्माण होत आहे.
अशा वेळी मुलांवर सुसंस्कार कसे करायचे, ही एक मोठी समस्याच निर्माण झाली आहे!
😇"कालाय तस्मै नम !":😇
[26/12, 9:06 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-311 !":👌
😀 " न्यूटनचा पहिला नियम काय तर
'ACTION IS EQUAL TO REACTION' !
आपला कर्म सिद्धांत काय सांगतो:
' जैसे ज्याचे कर्म तैसे देतो फळ ईश्वर' !:
ही लिंक उघडून ऐका :😀
'ते बोल अमोल':
https://youtu.be/FLlAlD4Q7aA?si=fYazfEd0cBvi4zkf
[28/12, 8:03 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-312 !":👌
😇 "दररोजच्या जीवनामध्ये निर्णय घेणे ही एक अत्यंत महत्त्वाची अशी कृती असते. सातत्याने आपल्याला नवनवीन निर्णय घ्यावे लागतात, तरच आपले जीवन सुलभ, अडथळा विरहित होण्याची शक्यता निर्माण होते.
कोणताही घेताना त्याच्या सर्वांगीण परिणामांची जर पर्वा केली नाही आणि तसाच निर्णय घेतला तर त्यामुळे आपले अतोनात नुकसान होऊ शकते. जी गोष्ट निर्णय घेण्याबद्दल तीच गोष्ट एखादा निर्णय न घेण्यामुळे देखील तशीच विपरीत परिणाम घडवण्याजोगी !
या करता म्हटले आहे:
LOOK BEFORE YOU LEAP,
Or
THINK NOT TO SINK !":😇
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा