मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४
" सोशल मीडियावरची माझी लेखणी भाग 2 !":
हृदयीचे त्या हृदयी'करण्यासाठी माझी नेहमी धडपड चाललेली असते त्याचाच एक भाग म्हणून सोशल मीडियावर मी विविध प्रकारचे वैविध्यपूर्ण संदेश प्रसारित करत असतो येथे त्यातीलच पहिला भाग सादर आहे:
--------------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-298 !":👌
💐"💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-298 !":👌
💐"एखादं पुस्तक वाचताना जेव्हा सद्भावनांमुळे, सन्मतीमुळे आणि सत्क्रुयांच्या कृतकृत्यतेमुळे सद्गतीत होऊन, जेव्हा डोळ्यातून अश्रू येतात, ते म्हणजे आनंदाचे व कृतार्थतेचे अश्रू असतात ! त्यांचे मोल अमोल असते !! म्हणूनच जे पुस्तक तुम्हाला असे रडायला लावते, ती एक श्रेष्ठतम कलाकृती होय.
प्राध्यापक शिवाजीराव भोसले लिखित 'प्रेरणा' हे पुस्तक जेव्हा मी वाचले तेव्हा मला जागोजागी प्रत्येक लेखानंतर असाच अद्भुत अनुभव आला. विविध क्षेत्रातील अत्यच्च कामगिरी करणाऱ्या, समाजाला नवे वळण देणाऱ्या 48 दिग्गजांची जीवनचित्रे खरोखर प्रेरणादायी होती. प्रत्येकाच्या जीवनातील ध्येये, आव्हाने, संघर्ष आणि त्यांना यशस्वीपणे तोंड देऊन आपले इप्सित कार्य तडीला नेणाऱ्या ह्या प्रत्येकाचे खरोखर आमच्यावर अनंत उपकार आहेत, कारण त्यांनी गेल्या शतकामध्ये विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण असे योगदान दिलेले आहे.
मुलांना आणि तरुणांना आदर्श समोर असावेत, या हेतूने हे लिहिलेले पुस्तक खरोखर आबालवृद्धांनीही वाचण्याजोगे आहे. कारण प्रत्येकाला त्यामुळे जाणीव होईल की, आपले आयुष्य आपण अजून अर्थपूर्ण रीतीने जगायला हवे. अशा तऱ्हेचे पुस्तक मला वाचायला मिळणे हे माझे खरोखर अहोभाग्यच !": 💐
--------------
चंद्र नभीचा तो ढळला,
दिवस सद्दी जिद्दीचा सरला,
मानभंग माझा हा घडला,
सत्तेचा हात मिळे न मजला
चंद्र नभीचा तो ढळला !":🤣
---------------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-296 !":👌
😊 " महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच वर्षे ज्या उचापती आणि उलथा पालतथी, झाल्या आणि निवडणुकीनंतर राक्षसी बहुमत मिळवूनही, पुन्हा 'येरे माझ्या मागल्या'प्रमाणे गोंधळात गोंधळ चालू आहेत, त्यांचे जर सोप्या भाषेत विश्लेषण आणि सार काढायचे झाले तर....
"A Selfish Leader in hurry, takes a (wrong) decision suitable for his short term gains at the cost of his long term losses; whereas a shrewd leader politely excepts his short term losses and ensures his long term gains and stability !"
'कराल घाई, तर होईल पळता भुई थोडी !
अन्
'संयम आणि सबुरी यशाची खात्रीच न्यारी !
:💐
--------------
👍"Different Strokes !":👌
💐"Vigyan & Adhyatma !":💐
👍"The Misuse of Vigyan can turn into Distruction and extintion, the misuse of Adhyatma takes the shape of 'Buabaji' which is equally destructive. Vigyan is the study of what exists and is visible, while Adhyatma is the study of what's invisible and invinvinsible. Vigyan looks 'outside', while Adhyatma looks 'within'. Vigyan takes a rational, logical path, while Adhyatma is the imagination of random path. Vigyan seeks an experiment, while Adhyatma seeks an experience. If Vigyan is the Life after Birth, Adhyatma is the Life after Death and so on....👌
-------------
टेलिरजन !":
ज्या प्रमाणे ५ दिवसांच्या कसोटीची जागा प्रथम ५०षटकांच्या, नंतर २०/२० षटकांच्या सामन्यांनी क्रिकेटमध्ये घेतली आहे, तसाच बदल TVवरील मराठी मालिकांनी करावा. निरर्थकपणे लांबत जाणार्या मालिकांची जागा आता २६,३९ वा५२ भागांच्या मालिकांनी घ्यावी. कारण 'जमाना बदल रहा है!'
-------------
मी सुधाकर नातू माहीम मुंबई येथील एक ज्येष्ठ नागरिक.
काही वाचलं अन् जर ते अगदी मनापासून जर भावलं तर ताबडतोब मी माझा प्रतिसाद त्या लेखकापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करतो, हा अनाहूत प्रयत्न देखील तसाच.
-----------
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच
!:👌
👍"मुक्तसंवाद-मुलांवर संस्कार कसे करायचे ?":👌
"अभिवाचन क्रमांक 317 !":
💐"बदलत्या परिस्थितीनुसार एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली. स्वतंत्र जोडपी राहायला लागल्यापासून, कुटुंबातील आई, वडील दोघांनाही अर्थाजनासाठी घराबाहेर जावे लागत आहे. शिवाय 'हम दो, हमारे दो या एकच' या अत्यावश्यक गरजेपोटी मुलांचे लाड खूप केले जात आहेत आणि त्यामुळे ती हट्टी वा फुकटही जाण्याची शक्यता निर्माण होत आहे.
अशा वेळी मुलांवर सुसंस्कार कसे करायचे, ही एक मोठी समस्याच निर्माण झाली आहे. त्या समस्येची उकल करणारा हा व्हिडिओ आपण जरूर पहा !":💐
त्यासाठी पुढील लिंक उघडा:
https://youtu.be/JkRXlDqbzsM?si=Oqhh6Bge_c17KN4S
----------
'टोका'ची भूमिका घेणे,
हे,
सत्तेचा 'गुळ' न सोडता आल्यामुळे विसरले,
करून करून भागले अन् 'देव' पुजेला लागले'!
---------
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच
!:👌
👍" अर्थपूर्ण-'आयुष्याचे स्टॉक मार्केट' !"👌
"अभिवाचन क्रमांक 318 !":
💐 बदल म्हणून नेहमीची अभिवाचनांची चाकोरी सोडून, आता दैनंदिन व्यवहारांकडे नेणारे आणि विचारमंथन करायला लावणार्या मालिकेतील हे पुढचे अभिवाचन. ते श्री उदय पिंगळे, येथे श्री राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या लेखाद्वारे उलगडत आहेत.
आयुष्य आणि स्टॉक मार्केट यांचा परस्पर काय संबंध असू शकतो, या प्रश्नाची उकल येथे आहे. जीवनात जसे यशाचे चढ- संकटांचे आव्हानांचे उतार असतात, त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये देखील कुठल्याही समभागाच्या किंमतीचे उच्च व निचांक असतात ! स्थितप्रज्ञासारखे आपण साऱ्या व्यवहाराकडे कसे बघायचे त्याचे विश्लेषण, आपल्यालाही अंतर्मुख करेल !":💐
--@------
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌
👍"आहे मनोहर तरी - भाग 27 !":👌
"अभिवाचन क्रमांक 318 !":
💐"ह्या भागात, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व -'पुल' अर्थातच भाई यांच्या पत्नी सौ सुनीताबाई यांनी त्यांच्या सहजीवनातील एकमेकांच्या आवडीनिवडींबद्दल सूक्ष्म निरीक्षण करत, काही स्पष्ट मते मांडली आहेत. त्याशिवाय स्त्री-पुरुष संबंधांबद्दल देखील काळापुढचा विचार त्यांनी परखडपणे व्यक्त केला आहे. त्यांची विचारस्पष्टता ग्रहणशक्ती आणि कल्पकता यांचे अनोखे मिश्रण या अभिवाचनात झाले आहे. ते तुम्हाला देखील विचारात पाडणारे आहे.
वाचकस्वर कुणाचा आहे, ती कल्पना नाही. ते स्वर सादर करणार्या महिलेचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन !!":💐
ऐकण्यासाठी पुढील लिंक google drive वर उघडा.....
https://drive.google.com/file/d/1y-0eM_LmtOCLhR3nImHWne183-fz1kEq/view?usp=drivesdk
-------------
👍"मल्लिनाथी-14 !":👌
😚 "गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात
अनेेक खळबळजनक आणि वेदनादायी अशा सामुहिक गद्दारी, पक्ष फोडी, अशा तऱ्हेच्या अनेेक अनाकलनीय घटना घडत राहिल्या. आमदार अपात्रतेचा आणि पक्षांच्या चिन्हांचा कुठलाही न्यायनिवाडा न होता, निवडणुकही झाली. परंतु राक्षसी बहुमत मिळूनही अजून सरकार स्थापन झालेले नाही.
अशा पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात, शासन प्रमुखांच्या आणि नेत्यांच्या उठसूठ जणू टॅक्सीने बांद्रा-मंत्रालय, मंत्रालय-बांद्रा अशा
मुंबई-दिल्ली, दिल्ली -मुंबई, विमानाने ज्या वाऱ्या चालल्या आहेत, आधीच महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी असूनही, या वाऱ्यांचा खर्च कोण करतो, कुठे आणि कसा नोंदवला जाणार आहे माहित नाही !
परंतु एकीकडे जर 'डिजिटल इंडिया' करायच्या वार्ता चालल्या असल्या, तर नेत्यांनी असे प्रत्यक्ष भेटण्याऐवजी, व्हिडिओ मीटिंगज् घेता येणार नाहीत कां ?
त्यामुळे वेळ, श्रम आणि पैसा यांचा योग्य तो विनियोग होणार नाही कां?
उगाचच नेत्यांच्या बिचाऱ्या तंगडतोडीला तरी आळा घााता येणार नाही कां ?":😚
-----------
Qn noticed on the social media:
"What is your expert advise to become 3rd largest economy in world?
Any suggestions?"
My Answer:
It's futile, absolutely meaningless and not worth to dwell on, boost for, unless the totally skewed income pattern with 90% of population owning just less than 10% of wealth and vice versa is brought back to reasonable/ acceptable level.
---------------
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा