बुधवार, २५ डिसेंबर, २०२४
" सोशल मीडियावरील मुसाफिरी-भाग 4"
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-306 !":👌
😁 "चिरंतन":😁
💐 "क्षणा क्षणांतूनी हे रंग भरा,
नसा नसांतूनी तो चंग करा,
मना मनांतूनी ते प्रेम बहरा,
चरा चरांतूनी हा नाद खरा !":💐
👍"मल्लिनाथी-16 !":👌
😙 " नांंव (हा) ठेवा !":😙
😇 "माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाकडून नाव ठेवून घेण्यासाठी !"
😁 "त्यानंतर नांव ठेवण्याचा हा सिलसिला अव्याहत चालूच राहतो !"
😭 "दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ काही कुणाला दिसत नाही !"
😝 "गुण टिपणाऱ्या गुणग्राहकतेपेक्षा दोष ठिपकागदासारखे टिपले जातात आणि नांव ठेवली जातात !"
🤢 "हे असे अगदी शेवटापर्यंत स्वतःचे नांव पुसले जाण्यापर्यंत चालूच राहते !":
एखादं पुस्तक वाचताना जेव्हा सद्भावनांमुळे, सन्मतीमुळे आणि सत्क्रुयांच्या कृतकृत्यतेमुळे सद्गतीत होऊन, जेव्हा डोळ्यातून अश्रू येतात, ते म्हणजे आनंदाचे व कृतार्थतेचे अश्रू असतात ! त्यांचे मोल अमोल असते !! म्हणूनच जे पुस्तक तुम्हाला असे रडायला लावते, ती एक श्रेष्ठतम कलाकृती होय.
प्राध्यापक शिवाजीराव भोसले लिखित 'प्रेरणा' हे पुस्तक जेव्हा मी वाचले तेव्हा मला जागोजागी प्रत्येक लेखानंतर असाच अद्भुत अनुभव आला. विविध क्षेत्रातील अत्यच्च कामगिरी करणाऱ्या, समाजाला नवे वळण देणाऱ्या 48 दिग्गजांची जीवनचित्रे खरोखर प्रेरणादायी होती. प्रत्येकाच्या जीवनातील ध्येये, आव्हाने, संघर्ष आणि त्यांना यशस्वीपणे तोंड देऊन आपले इप्सित कार्य तडीला नेणाऱ्या ह्या प्रत्येकाचे खरोखर आमच्यावर अनंत उपकार आहेत, कारण त्यांनी गेल्या शतकामध्ये विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण असे योगदान दिलेले आहे.
मुलांना आणि तरुणांना आदर्श समोर असावेत, या हेतूने हे लिहिलेले पुस्तक खरोखर आबालवृद्धांनीही वाचण्याजोगे आहे. कारण प्रत्येकाला त्यामुळे जाणीव होईल की, आपले आयुष्य आपण अजून अर्थपूर्ण रीतीने जगायला हवे. अशा तऱ्हेचे पुस्तक मला वाचायला मिळणे हे माझे खरोखर अहोभाग्यच !": 💐
--------------
चंद्र नभीचा तो ढळला,
दिवस सद्दी जिद्दीचा सरला,
मानभंग माझा हा घडला,
सत्तेचा हात मिळे न मजला
चंद्र नभीचा तो ढळला !":🤣
---------------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-302 !":👌
😜 'बदला'नंतरची आव्हाने !":
नित्य बदल, ही निसर्गांतील एकमेव स्थिर गोष्ट आहे. बदल म्हणजे जीवनांतील आव्हाने स्विकारायला लावणारी जीवंत प्रेरणा होय. सुयोग्य वेळी, विचारपूर्वक नंतरच्या संभाव्य परिणामांची रास्त दखल घेवून केलेला बदलच गतीमान विकास व प्रगती घडवत असतो. अवेळी, अविचाराने लादला गेलेला बदल पचविणे, जड जाते खरेच; परंतु अशाही वेळी प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याचा शहाणपणाही अंगी येत असतो !":😜
😊 " महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच वर्षे ज्या उचापती आणि उलथा पालतथी, झाल्या आणि निवडणुकीनंतर राक्षसी बहुमत मिळवूनही, पुन्हा 'येरे माझ्या मागल्या'प्रमाणे गोंधळात गोंधळ चालू आहेत, त्यांचे जर सोप्या भाषेत विश्लेषण आणि सार काढायचे झाले तर....
"A Selfish Leader in hurry, takes a (wrong) decision suitable for his short term gains at the cost of his long term losses; whereas a shrewd leader politely excepts his short term losses and ensures his long term gains and stability !"
'कराल घाई, तर होईल पळता भुई थोडी !
अन्
'संयम आणि सबुरी यशाची खात्रीच न्यारी !
:💐
--------------
👍"Different Strokes !":👌
💐"Vigyan & Adhyatma !":💐
👍"The Misuse of Vigyan can turn into Distruction and extintion, the misuse of Adhyatma takes the shape of 'Buabaji' which is equally destructive. Vigyan is the study of what exists and is visible, while Adhyatma is the study of what's invisible and invinvinsible. Vigyan looks 'outside', while Adhyatma looks 'within'. Vigyan takes a rational, logical path, while Adhyatma is the imagination of random path. Vigyan seeks an experiment, while Adhyatma seeks an experience. If Vigyan is the Life after Birth, Adhyatma is the Life after Death and so on....👌
-------------
टेलिरजन !":
ज्या प्रमाणे ५ दिवसांच्या कसोटीची जागा प्रथम ५०षटकांच्या, नंतर २०/२० षटकांच्या सामन्यांनी क्रिकेटमध्ये घेतली आहे, तसाच बदल TVवरील मराठी मालिकांनी करावा. निरर्थकपणे लांबत जाणार्या मालिकांची जागा आता २६,३९ वा५२ भागांच्या मालिकांनी घ्यावी. कारण 'जमाना बदल रहा है!'
-------------
मी सुधाकर नातू माहीम मुंबई येथील एक ज्येष्ठ नागरिक.
काही वाचलं अन् जर ते अगदी मनापासून जर भावलं तर ताबडतोब मी माझा प्रतिसाद त्या लेखकापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करतो, हा अनाहूत प्रयत्न देखील तसाच.
-----------
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच
!:👌
👍 "सोशल मीडियावरील मुसाफिरी-प्रा. शिवाजीराव भोसले यांचे साने गुरुजी वरील व्याख्यान !":👌
"अभिवाचन क्रमांक 325 !":
💐" बदल म्हणून अधून मधून आम्ही सोशल मीडियावरील काही वेचक वेधक असे अभिवाचन सादर करत असतो. साने गुरुजींची 125 वी जयंती त्यांना जाऊन आता 74 वर्षे ही झाली परंतु तरीही मराठी माणसांच्या मनामनात त्यांची थोरवी अजूनही जागी आहे. निमित्ताने व्हाट्सअप वरील श्री हेरंब कुलकर्णी यांनी पाठवलेली प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांच्या साने गुरुजींवरील व्याख्यानाची लिंक पुढे देत आहोत !":💐
https://youtu.be/fywoVug0Unc?si=UK8tZcP2S2SBgzC-
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-310 !":👌
😇 "कालाय तस्मै नम !":😇
"बदलत्या परिस्थितीनुसार एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली. स्वतंत्र जोडपी राहायला लागल्यापासून, कुटुंबातील आई, वडील दोघांनाही अर्थाजनासाठी घराबाहेर जावे लागत आहे. शिवाय 'हम दो, हमारे दो या एकच' या अत्यावश्यक गरजेपोटी मुलांचे लाड खूप केले जात आहेत आणि त्यामुळे ती हट्टी वा फुकटही जाण्याची शक्यता निर्माण होत आहे.
अशा वेळी मुलांवर सुसंस्कार कसे करायचे, ही एक मोठी समस्याच निर्माण झाली आहे!
😇"कालाय तस्मै नम !":😇
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-311 !":👌
😀 " न्यूटनचा पहिला नियम काय तर
'ACTION IS EQUAL TO REACTION' !
आपला कर्म सिद्धांत काय सांगतो:
' जैसे ज्याचे कर्म तैसे देतो फळ ईश्वर' !:
ही लिंक उघडून ऐका :😀
'ते बोल अमोल':
https://youtu.be/FLlAlD4Q7aA?si=fYazfEd0cBvi4zkf
त्या समस्येची उकल करणारा हा व्हिडिओ आपण जरूर पहा !":💐
त्यासाठी पुढील लिंक उघडा:
https://youtu.be/JkRXlDqbzsM?si=Oqhh6Bge_c17KN4S
----------
'टोका'ची भूमिका घेणे,
हे,
सत्तेचा 'गुळ' न सोडता आल्यामुळे विसरले,
करून करून भागले अन् 'देव' पुजेला लागले'!
---------
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच
!:👌
👍" अर्थपूर्ण-'आयुष्याचे स्टॉक मार्केट' !"👌
"अभिवाचन क्रमांक 318 !":
💐 बदल म्हणून नेहमीची अभिवाचनांची चाकोरी सोडून, आता दैनंदिन व्यवहारांकडे नेणारे आणि विचारमंथन करायला लावणार्या मालिकेतील हे पुढचे अभिवाचन. ते श्री उदय पिंगळे, येथे श्री राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या लेखाद्वारे उलगडत आहेत.
आयुष्य आणि स्टॉक मार्केट यांचा परस्पर काय संबंध असू शकतो, या प्रश्नाची उकल येथे आहे. जीवनात जसे यशाचे चढ- संकटांचे आव्हानांचे उतार असतात, त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये देखील कुठल्याही समभागाच्या किंमतीचे उच्च व निचांक असतात ! स्थितप्रज्ञासारखे आपण साऱ्या व्यवहाराकडे कसे बघायचे त्याचे विश्लेषण, आपल्यालाही अंतर्मुख करेल !":💐
--@------
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌
👍"आहे मनोहर तरी - भाग 29 !":👌
"अभिवाचन क्रमांक 321 !":
💐" अभिवाचनाच्या ह्या 29 व्या भागात, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व -'पुल' अर्थातच भाई यांच्या पत्नी सौ सुनीताबाई त्यांच्या मोटार विलक्षण धिटाईने चालवण्याचा एका चित्त थरारक अनुभवाची उजळणी येथे करत आहेत. गोव्याहून मुंबईकडे येताना त्यांच्या गाडीमध्ये स्वतः 'पुल' आणि वसंतराव देशपांडे हे सांस्कृतिक क्षेत्रातले दोन दिग्गज देखील होते. अशा वेळेला अचानक जंगलातील रस्त्यातून जाताना एक धोकादायक जनावर समोर येऊन टाकले आणि अक्षरशः जीवन मरणाचा प्रश्न कसा उभा राहिला, त्याची कहाणी निश्चितच उत्कंठावर्धक आहे.
वाचकस्वर कुणाचा आहे, ती कल्पना नाही. ते स्वर सादर करणार्या महिलेचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन !!":💐
ऐकण्यासाठी पुढील लिंक google drive वर उघडा.....
https://drive.google.com/file/d/1IdLFy0kkTVvRLWWaWOC8a8HB37yUXXOh/view?usp=drivesdk
https://drive.google.com/file/d/1CIgOCEfgAgNY-4k75-rsYVHpqfc4DDWM/view?usp=drivesdk
👍"Different Strokes !":👌
😭 "Lost Key !":😭
👍 "Every one is running an endless race, towards the 'Goal Post of Happiness and Contentment' but in vain. The result is that the Life Styles and Relationships have become mechanical and monotonous. Really an eye opener.
This is due to more and more externalization, than much needed internalization of today's Life styles. Off and on, 'Introspection' about the external happenings and internal responses/reactions to them, is the 'Lost Key' !"👌
-------------
👍"मल्लिनाथी-15 !":👌
😇"विरोधाभासांची शृंखला,
की,
एकाधिकारशाहीची चाहूल ?":😇
😚 "महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात, शासन प्रमुखांच्या आणि नेत्यांच्या उठसूठ जणू टॅक्सीने बांद्रा-मंत्रालय, मंत्रालय-बांद्रा अशा मुंबई-दिल्ली, दिल्ली -मुंबई, विमानाने ज्या वाऱ्या चालल्या आहेत, आधीच महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी असूनही, या वाऱ्यांचा खर्च कोण करतो, कुठे आणि कसा नोंदवला जाणार आहे माहित नाही !
परंतु एकीकडे जर 'डिजिटल इंडिया' करायच्या वार्ता चालल्या असल्या, तर नेत्यांनी असे प्रत्यक्ष भेटण्याऐवजी, व्हिडिओ मीटिंगज् घेता येणार नाहीत कां ?
त्यामुळे वेळ, श्रम आणि पैसा यांचा योग्य तो विनियोग होणार नाही कां?
ह्या विरोधाभासाला काय म्हणावयाचे?
उगाचच नेत्यांच्या बिचाऱ्या तंगडतोडीला तरी आळा घालता येणार नाही कां ?":😚
-----------
2019 मध्ये 80 तासांचे सरकार पडल्यानंतर ताबडतोब राजवट लावणे कुठे?
अन आता राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर जवळजवळ दहा-बारा दिवस सरकार न स्थापन झाल्यावरही राष्ट्रपती राजवट लावणे टाळणे या विरोधाभासाला काय म्हणायचे?
-----------------
एकीकडे डिजिटल इंडियाची ग्वाही आणि आग्रह धरत शिवाय तंत्रज्ञान विज्ञानाला पाठिंबा देत गगनाची भरारी घेत अवकाशाला गवसणी घालणं कुठे आणि केवळ पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिना असा
असा सुमूर्त सापडावा म्हणून सरकार स्थापनेला अक्षम्य विलंब करणे, याही विरोधाभासाला काय म्हणावे?
--------------------
एकीकडे खिरापती सारख्या योजना आखत महाराष्ट्र राज्याला कर्जाच्या खाईत ढकलले जात असताना, शिवाय तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण जगाला थेट टीव्ही प्रक्षेपणाची सोय असूनही, सरकार स्थापनेचा सोहळा राजभवनावर साधेपणाने न करता केवळ डामडौल आणि आत्मप्रौढीचे प्रदर्शन करत चाळीस हजार इतक्या प्रचंड संख्येला निमंत्रित करून साजरा करणे, याही विरोधाभासाला काय म्हणावे?
----------------------
ह्या व अशा कितीतरी घटना, निर्णय सर्वसामान्य नागरिकाच्या बुद्धीच्या पलीकडले असूनही, त्याने विरुद्ध आवाज उठवण्याऐवजी, निमुटपणे जे होते आहे ते स्वीकारत राहणे, या विरोधाभासाला काय म्हणायचे ?
या साऱ्या विरोधाभासाच्या श्रुंखला,
की,
एकाधिकारशाहीची चाहूल ?????":😚
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-301 !":👌
😁 "व्यवसाय धंद्याची मुळाक्षरे":
दखल, दशा, दाता, दावा, दादागिरी, दिवाळं,
दुफळी, देवदेव, दैव, दोष,
दौलत, दंभ !":😁
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-302 !":👌
😄 "जीविका म्हणजे जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते, भावते जी करण्यात आपले मन रमते ती गोष्ट; तर उपजीविका म्हणजे जिच्यामुळे आपले उदरभरण व जीवनावश्यक गरजा पुरवल्या जाऊ शकतात ती गोष्ट ! जीविका व उपजीविका या शब्दातच त्यांचे अर्थपूर्ण असे प्राधान्य दिसते. कोणती गोष्ट प्राधान्याची ते आपोआपच समजून जाते. जीविका आणि उपजीविका जर एकच झाल्या तर त्याच्यासारखा मणीकांचन योग नाही ! मात्र असे भाग्य केवळ काही भाग्यवंत कलावंत क्रीडापटू, गायक, लेखक इत्यादींनाच मिळू शकते.
श्रेयस आणि प्रेयस या संकल्पनांचेही अगदी तसेच ! यासाठी प्रत्येकाने जीविका आणि उपजीविका यांचे निश्चितच शोध घ्यावेत आणि आपले जीवन अधिक आनंदमयी समाधानाने समृद्ध करावे !":😄
"मुक्तसंवाद-अशाश्वत अमर्याद तर शाश्वत चिमुकले !":
💐II (अ) मंगल प्रभात II💐
😇 " मल्लिनाथी-18 !":😇
😭 "मुंबईमध्ये कधी नव्हे इतके पराकोटीचे हवेचे प्रदूषण किती झाले आहे, त्याची ही चित्त व्यथीत करणारी दृश्ये ! बेटासारख्या चिंचोळ्या अशा या महानगरात हजारो वाहनांचा वावर, दोन कोटीच्या आसपास लोकसंख्या, त्यात बरीच भर म्हणून जागोजागी उभ्या केलेल्या तितक्याच वाहनांची गर्दी, त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा संपूर्ण खेळ खंडोबा, मेंढरांसारखी कोंबून तुडुंब वाहणारी लोकल ट्रेनची अवस्था, इतके सारे झाले ते कमी नाही म्हणून की काय, जागोजागी उगवणारी उत्तुंग मनोऱ्यांची शेकडो बांधकामे इत्यादी अनेक कारणामुळे सोन्यासारख्या या महानगराची ही अशी बिकट अवस्था झाली आहे.
नियोजनाचा संपूर्ण बोजवारा दूरदृष्टीचा अभाव आणि बेशिस्तीने कसाही होत चाललेला कारभार अशामुळे ही विचित्र वेळ आली आहे. समुद्रासारखा साथी जवळ असूनही मुंबईसारख्या शहरात इतकी प्रदूषणाची अवस्था होईल असे कधीच कोणाला वाटले नव्हते.
खरंच
'कुठेतरी काहीतरी चुकतंय'
नरेची किती ही न केला नर' !
असेच म्हणायला हवे !":😭
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा