बुधवार, ४ डिसेंबर, २०२४
"मल्लिनाथी-15 !"::
👍"मल्लिनाथी-15 !":👌
"विरोधाभासांची शृंखला,
की,
एकाधिकारशाहीची चाहूल ?":
😚 "महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात, शासन प्रमुखांच्या आणि नेत्यांच्या उठसूठ जणू टॅक्सीने बांद्रा-मंत्रालय, मंत्रालय-बांद्रा अशा मुंबई-दिल्ली, दिल्ली -मुंबई, विमानाने ज्या वाऱ्या चालल्या आहेत, आधीच महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी असूनही, या वाऱ्यांचा खर्च कोण करतो, कुठे आणि कसा नोंदवला जाणार आहे माहित नाही !
परंतु एकीकडे जर 'डिजिटल इंडिया' करायच्या वार्ता चालल्या असल्या, तर नेत्यांनी असे प्रत्यक्ष भेटण्याऐवजी, व्हिडिओ मीटिंगज् घेता येणार नाहीत कां ?
त्यामुळे वेळ, श्रम आणि पैसा यांचा योग्य तो विनियोग होणार नाही कां?
ह्या विरोधाभासाला काय म्हणावयाचे?
उगाचच नेत्यांच्या बिचाऱ्या तंगडतोडीला तरी आळा घालता येणार नाही कां ?":😚
-----------
2019 मध्ये 80 तासांचे सरकार पडल्यानंतर ताबडतोब राजवट लावणे कुठे?
अन आता राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर जवळजवळ दहा-बारा दिवस सरकार न स्थापन झाल्यावरही राष्ट्रपती राजवट लावणे टाळणे या विरोधाभासला काय म्हणायचे?
-----------------
एकीकडे डिजिटल इंडियाची ग्वाही आणि आग्रह धरत शिवाय तंत्रज्ञान विज्ञानाला पाठिंबा देत गगनाची भरारी घेत अवकाशाला गवसणी घालणं कुठे आणि केवळ पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिना असा
असा सुमूर्त सापडावा म्हणून सरकार स्थापनेला अक्षम्य विलंब करणे, याही विरोधाभासाला काय म्हणावे?
--------------------
एकीकडे खिरापती सारख्या योजना आखत महाराष्ट्र राज्याला कर्जाच्या खाईत ढकलले जात असताना, शिवाय तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण जगाला थेट टीव्ही प्रक्षेपणाची सोय असूनही, सरकार स्थापनेचा सोहळा राजभवनावर साधेपणाने न करता केवळ डामडौल आणि आत्मप्रौढीचे प्रदर्शन करत चाळीस हजार इतक्या प्रचंड संख्येला निमंत्रित करून साजरा करणे, याही विरोधाभासाला काय म्हणावे?
----------------------
ह्या व अशा कितीतरी घटना, निर्णय सर्वसामान्य नागरिकाच्या बुद्धीच्या पलीकडले असूनही, त्याने विरुद्ध आवाज उठवण्याऐवजी, निमुटपणे जे होते आहे ते स्वीकारत राहणे, या विरोधाभासाला काय म्हणायचे ?
या साऱ्या विरोधाभासाच्या श्रुंखला,
की,
एकाधिकारशाहीची चाहूल ?????":😚
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा